नो कमबॅक्स……१

Written by  on June 29, 2020

असं का व्हावं? माझ्याच बाबतीत असं का व्हावं? आज पर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा मी, कुठलेही पाऊल उचलतांना शक्याशक्यतेचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करणारा, मग या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा सर्वोपांगी विचार का केला नव्हता? आज पर्यंत कमावलेले करोडो रुपये, समाजातलं स्थान, या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग?

काय झालं? माफ करा,स्वतःची ओळख करुन द्यायला विसरलो मी. मी कॅप्टन राज. वय वर्षे ४२. मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हंटलं तरीही चालेल. माझ्या बद्दल तुम्ही मागच्या कथे मधे वाचले आहेच.  नसल्यास , आधीची  कथा इथे वाचा ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/12/03/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9C/).  सध्या माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असे वाटतंय. अहो दररोज दिवसभर काहीतरी करत वेळ काढायचा आणि रात्री बॉम्बे जिमखाना क्लब मधे   जायचं. रात्री उशीरा पर्यंत  घरी आलं की मग दुपारी उशीरा उठायचं, आणि पुन्हा तेच आयुष्य मागील पानावरून पुढे सुरु.

इतका पैसा गाठीशी असतांना आता या पुढे नेमकं काय करावं हेच समजत नव्हतं. करोडो रुपये कमावलेले, कितीही दोन्ही हातांनी जरी उधळले तरीही कधी संपणार नाही इतकी संपत्ती.लग्न केलेले नसल्याने पुन्हा कुठलेही बंधन नाही. हा सगळा दिनक्रम व्यवस्थित सुरु होता, असलेल्या पैशाकडे पाहून आजपर्यंत बऱ्याच मुली जवळ येण्याचा प्रयत्न करायच्या, पण मी मात्र कटाक्षाने असे संबंध केवळ वन नाईट स्टॅंड पुरतेच मर्यादित ठेवले होते. कुठेच मानसिक गुंतवणूक होऊ दिली नव्हती. लाइफ  वॉज गुड- पण जो पर्यंत ती आयुष्यात आली नव्हती तो पर्यंत!

सोशल  पार्टी मधे  ती नेहेमी दिसायची. कुठल्यातरी एका कोपऱ्यात हातात ब्लडी मेरीचा ग्लास घेऊन पहिलाच ग्लास शेवटपर्यंत पुरवत बसायची. कोणाशी कधी फारसं बोलणं नाही, की कोणा मधे फारसं मिक्स अप होणं नाही. तिचा नवरा नेहेमीच सोबत असायचा. सुजीत मेहेरा.   पण तो अशा पार्टी आपले बिझिनेस संबंध  दुरुस्त करण्यासाठी वापरायचा. अशा प्रसंगी बायको बरोबर असली की समोरचा माणूस थोडा सॉफ्ट होतो -आपोआप!  एक्स्पोर्ट इम्पोर्टचा मोठा धंदा असलेला हा सुजीत पार्टी मधे केवळ धंदा वाढवण्यासाठी म्हणूनच यायचा. या अशा पार्टीज चा उपयोग धंदा वाढवण्यासाठी कसा करून घ्यावा ते यांच्याकडून शिकावे.

स्वतःवर प्रचंड विश्वास असलेला माणूस. स्वतः बरोबर बॉडीगार्ड लवाजमा घेऊन फिरणे याला आवडायचे नाही. पार्टीला येतांना पण स्वतःच आपली बी एम डब्लु ड्राइव्ह करत यायचा. शेजारी बायको बसलेली, मागच्या सीटवर ड्रायव्हर.  कस्टम बिल्ट कार होती ती.  पूर्णपणे बुलेट प्रुफ. अगदी चाकं, टायर्स सुद्धा. जवळपास एखादा बॉम्ब ब्लास्ट जरी झाला तरी त्या कारला काही होणार नाही. असंही म्हणतात की त्याच्या कार मधे सिक्रेट वेपन्स पण बसवलेले आहेत. जेम्स बॉंड च्या कार सारखे. हेच कारण असेल, त्याला बॉडी गार्डची गरज पडत नसावी. पण पार्टी संपली की मग मात्र हा मागच्या सिटवर शांतपणे झोपी जायचा.

जगणं म्हणजे दारू पिणं बस्स .. इतकच त्याचं आयुष्य होतं बहुतेक. सारखं दारू पिण्यामुळे आणि खाण्यामुळॆ अवाढव्य शरीर झाले होते.  पार्टी मधे पण याचे लक्ष बायकोकडे कधीच नसायचे. कोणाशी तरी कोपऱ्यात बसून बिझीनेस बद्दल बोलत बसणे हाच याचा नेहेमीचा उद्योग. पेज थ्री पार्टी मधे असेल त्या दिवशी त्या पार्टीला , आणि ज्या दिवशी पार्टी नसेल त्या दिवशी हा बॉम्बे जिमखाना क्लब मधे नक्की असणार. या क्लबची मेंबरशीप मिळणे फार कठीण.  एक्स्ल्युजीव क्लब फॉर इलाईट्स अशी टॅग लाइन आहे या क्लबची..

या सुजीत शी ओळख तर झाली होतीच. दररोज  पार्टी मधे किंवा क्लब मधे भेट व्हायचीच.थोडं फार बोलणं पण व्हायचं . एक गोष्ट बाकी आहे, माझा पूर्वेतिहास माहिती असल्याने कदाचित असेल, तो माझ्याशी नेहेमी सांभाळूनच रहायचा. कॅप्टन लेट्स ड्रिंक.. म्हणून बार कडे घेऊन जायचा, आणि हातात स्कॉच ऑन द रॉक्स चा ग्लास घेतला की एका बाजूला निघून जायचा.

साधारण महिनाभरापूर्वी गोष्ट असेल. बॉम्बे क्लब चा बार. समोर टेबल वर काही लोकं  पूल खेळत बसले होते, आणि एका बाजूला एका टेबल वर सहा लोकं पत्ते खेळत बसले होते. त्या मधे एक सुजीत पण होता. चार पेग झाले होते त्याचे. तांबारलेले डोळे आणि समोर पत्ते- बहुतेक सारखा जिंकत होता, म्हणून त्याचा मुड पण चांगला दिसत होता.

एका कोपऱ्यात सुजीत मेहेरा ची बायको रश्मी मेहेरा बसली होती. समोर नेहेमीप्रमाणे ब्लडी मेरी चा ग्लास ठेवलेला होता. पूर्णपणे कंटाळलेली दिसत होती ती. तिला एकटीला रहायची वेळ फार कमी यायची. तिच्या सौंदर्यामुळे तिच्या मागे पुढे सारखं कोणी ना कोणी तरी असायचंच. आता पण ती एका तरूणी बरोबर गप्पा मारत बसली होती.    चेहेऱ्यावरचा कंटाळा दिसत होता तिच्या ..मला एक समजत नव्हते, की जर तिला आवडत नाही पार्टी मधे किंवा क्लब मधे तर ती इथे येते तरी कशाला?

गेले कित्येक दिवसा पासून मी  तिच्या मधे कळत नकळत गुंतत चाललो होतो.  पार्टी मधे, क्लब मधे दुरूनच एकमेकांकडे पहाणं सुरु होतं. पण नजर मिळाली, की नजर चुकवायची हा खेळ सुरु होता. नजर का चुकवतोय आपण? साधं सरळ स्मित हास्य का देऊ शकत नाही? बरं , आपल्या प्रमाणे ती पण कधीच चुकून नजर मिळाली, तर हासत नाही. पण पहात असते हे नक्की.

आज मात्र तिच्या कडे पाहिलं, आणि तिने पण नजरेत कुठलेही भाव न येऊ देता नजरेला नजर मिळवली. खूप जुन्या दिवसांची ओळख असल्या प्रमाणे , नजरेनेच बोलणं झालं.   तिच्या समोरच्या दोन्ही लोकांना टाळून ती बार कडे वळली. तिचा ब्लडी मेरीचा न संपलेला ग्लास टेबलवरच सोडून. मी पण हातातला स्कॉच चा ग्लास खाली ठेऊन तिच्या दिशेने बार कडे वळलो. तिथे जाऊन व्हिस्की  ऑन द रॉक्स ची ऑर्डर दिली. तिच्याकडे बघून हसलो, आणि हात समोर केला. तिने हातात हात घेऊन  नांव सांगितले. म्हणाली, बरेच दिवसापासून बोलायचं होतं.. पण तेवढ्यात वाजवीपेक्षा जास्त वेळ हात हातात आहे ही गोष्ट लक्षात आल्याने, तिने हात काढून घेतला, आणि म्हणाली, उद्या रात्री याच ठिकाणी, आणि काही न बोलता आपला ब्लडी मेरी चा नवीन ग्लास घेऊन तिथून निघून गेली. माझ्या तर अजिबात काही लक्षात आले नाही, पण स्वतःच्याच नशिबावर जाम खूष झालो आज.

किती तरी दिवसांपासून मी ह्याच दिवसाची वाट पहात होतो. उद्या काय बरं असावं? मी मेहेरा खेळत असलेल्या टेबलकडे वळलो . नेमका त्याच टेबलवर न बसता मेहेराच्या टेबलच्या मागच्या टेबलवर बसलो. तिथून मला मेहेराचे बोलणे चांगले स्पष्ट ऐकू येत होते. अर्धा तास झाला तरीही काहीच झाले नाही. केवळ खेळणे सुरु होते सुजीत मेहेराचे. तेवढ्यात मेहेराचा सेल फोन वाजला, कोण होतं ते माहिती नाही, पण मेहेराचे एक वाक्य कानी पडलं, ” हां, भाई, मै आ रहा हूं कल दुबई, टिकिट भी बुक कर  लिया है” आणि आकस्मित पणे कसलं तरी अनामिक दडपण आल्याप्रमाणे टेबल वरून हातातले पत्ते फेकून तो उठून गेला. रश्मी मेहेरा कडे इशारा करून निघाला सुध्दा तो परत. रश्मीने माझ्याकडे पाहिले, आणि ओळखीचे स्मित हास्य दिले आणि सुजीत मेहेताच्या मागे चालायला लागली. नेहेमी रात्री दोन वाजेपर्यंत पार्टी मधे मश्गूल रहाणारा सुजीत मेहेरा आज मात्र अकरा वाजताच परत जात होता. काही तरी बिनसलं होतं हे नक्की.

**********

कंटाळा…

Written by  on June 28, 2020

कंटाळा म्हणजे प्रत्येकालाच नको असलेला पाहुणा!     आज सकाळपासून  माझ्या कडे ठाण मांडून बसलेला आहे हा न बोलावलेला पाहुणा! काही केल्या दूर होत नाही. टिव्ही वर पण एकही आवडीची सिरियल, सिनेमा नाही ज्यामुळे काही वेळ बरा जाईल. वाचायला पुस्तक उचललं तर त्यातही लक्ष लागत नाही. पेपर सगळे वाचून झाले. फेसबुक वर गेल्यावर दहा मिनिटे बरे वाटले, पण नंतर पुढे काय करायचे हा प्रश्न होताच?

हा कंटाळा म्हणजे नेमकं काय? तर बराच वेळेस सगळं जग संथ झालेलं असतं, काहीच घडत नाही, तेंव्हा  आपल्याला प्रकर्षाने  काही तरी व्हावं असं वाटत असतं,   तेंव्हा  येतो तो कंटाळा. तसंही आपण करमणुकी साठी काहीही करायला तयार असतो. वाचन, लेखन, सिनेमा, टिव्ही, फिरायला जाणे, मित्रांबरोबर गप्पा मारणे वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टींची पण इतकी सवय होऊन जाते, की प्रत्येक गोष्ट अगदी ठरवल्याप्रमाणे होत असते, आणि मग कंटाळा येतो. थोड्या जड भाषेत, जीवनात स्वतः पासूनच  एक प्रकारची अलिप्तता, पोकळी  निर्माण झाली की   कंटाळा येतो.

जे काही तरी व्हायला हवं असतं ते नेमकं काय असतं? अर्थात त्याची काही व्याख्या केली जाऊ शकत नाही. मनाला रिफ्रेश करणारी,  उत्तेजित करणारी  कुठलीतरी गोष्ट व्हायला हवी असते. खूप चांगलीच गोष्ट असली पाहिजे असे पण नाही, तर एखादी उत्कंठा वाढवणारी लहानशी गोष्टही कंटाळा दूर करू शकते. तसं म्हटलं तर पूर्वीच्या काळा पेक्षा हल्ली बऱ्याच करमणुकीच्या गोष्टी उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी फक्त सण वार, आणि त्यानुसार येणारे प्रासंगिक कार्यक्रम हेच काय ते करमणुकीचे साधन असायचे. त्या मानाने आज इतकी साधनं उपलब्ध असूनही कंटाळा काही आपली पाठ सोडायला तयार नसतो.

आठवडाभर काम केल्यावर जेंव्हा एखादा मित्र संध्याकाळी कुठेतरी भेटायचं का असे जेंव्हा पिंग करतो, तेंव्हा दिवसभरातला कंटाळा कुठल्या कुठे पळून जातो, आणि आपण संध्याकाळची वाट पहात उत्साहाने काम करायला लागतो. हा अनुभव प्रत्येकानेच कधी ना कधी तरी घेतला असेलच.

किंवा, ऑफिसमधे गेल्यावर बॉस  चिडचिड करणार , समोरची ती मुलगी जी तुम्हाला खूप आवडते, जी नेहेमी दुसऱ्या एखाद्या बरोबर लंच ला  जात असते, तुम्ही बोलायला गेलात तर , की दुर्लक्ष करणारी – हे सगळं अपेक्षित असतं, आणि म्हणून ऑफिसला गेल्यावर एकदम कंटाळा येतो. पण जस्ट इमॅजिन करा, की तुम्ही सकाळी ऑफिसला गेला, आणि बॉस एकदम चांगला वागतो, तुमच्या कामावर अजिबात काही कॉमेंट करत नाही, ती समोरच्या टेबलवरची तुमच्याकडे पाहून चक्क हसते, आणि पिंग करून तिच्या टेबलवर  तिच्या काहीतरी प्रॉब्लेम साठी बोलावते आणि नंतर म्हणते, की दुपारी लंचला सोबतच जाऊ, आणि संध्याकाळच्या नाटकाची दोन तिकिटं आहेत येणार का?????, सगळं काही अनपेक्षित , तुमच्या कल्पनेच्या एकदम   विपरीत घडतं, आणि मग कंटाळा  अगदी आसपासही फिरकायला तयार नसतो. तुम्ही  अगदी पूर्ण उत्साहाने कामाला लागता, लंच टाइम कधी होतो याची वाट पहात.

एखादी आवडीची  गोष्ट, की जिचा तुम्हाला कधीच कंटाळा येऊ शकत नाही असे वाटत असते, ती सुद्धा सारखी करत राहिल्यास तोच तो पणा येऊन कंटाळा येतो.  लग्नापूर्वी बायको गर्ल फ्रेंड असतांना तुम्ही तिच्याबरोबर फोन वर तास अन तास बोलू शकता, पण लग्न झाल्यावर काही दिवसातच काय बोलायचं हा प्रश्न पडतो. कारण  एकच, तुम्हाला सहजसाध्य असलेली गोष्ट कंटाळा आणू शकते- मग ती   खाण्याची, वाचन, टिव्ही, सिनेमा, भटकंती – अगदी काहीही असो. जीवन  एकसुरी व्हायला लागले, की  कंटाळा येतो. मला तर नेहेमी वाटतं, की आयुष्यात काहीतरी एन्झायटी असायला हवी.

कंटाळ्याचे अजून एक कारण म्हणजे , एखाद्या गोष्टी बद्दलची आपली कल्पना ही काही तरी वेगळीच असते, पण प्रत्यक्षात जेंव्हा ती गोष्ट अनुभवतो, तेंव्हा किंवा तिच्याबद्दल पुर्ण पणे  माहिती झाल्यावर , आपल्या मनातली “प्रतिमा” आणि “वास्तव” या मधला फरक दिसला की मग  त्या गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो.  एखादी गोष्ट न आवडणं म्हणजे कंटाळा नाही.कंटाळा म्हणजे अनुत्साह वाटणे. कुठलेतरी थ्रिल अनुभवायला मिळावे असे वाटणे .

कंटाळ्या पासून दूर पळणे हा माणसाचा स्वभाव आहे. आपण नेहेमीच अशा थ्रिल च्या शोधात असतो, म्हणूनच तर एस्सेल वर्ल्ड मधल्या जिवघेण्या राईड्स मधे पण  मनातून भीती वाटत असतांना पण आपण जीव मुठीत धरुन बसतो, आणि  तो क्षण जपून ठेवायचा प्रयत्न करत असतो. कार रेस, क्रिकेट, मोटरसायकल ड्रायव्हिंग, ट्रेकिंग हे असेच खेळ. पण फक्त ट्रेकिंगच शारीरिक थकवा आणून ताजेतवाने करु शकते. काहीतरी चित्तथरारक अनुभवायला मिळावे ही आपली खास मनापासून इच्छा असते.

एखाद्या गोष्टीचे व्यसन असलेल्या माणसाला ती गोष्ट ठरावीक वेळेस नाही मिळाली तर कंटाळा होतो, बेचैनी वाढते. जर तुमचा एखादा मित्र तंबाखू किंवा सिगरेट ओढणारा असेल, तर तुम्ही त्याला बरेचदा सिगरेट साठी कासावीस होतांना पाहिले असेल. व्यसना मुळे येणारा कंटाळा हा फक्त व्यसनी लोकांनाच समजू शकतो. या कंटाळ्याला उपाय नाही. पण फक्त सिगरेट, तंबाखू नंतर पुढची स्टेज म्हणजे ड्रग्ज वगैरे घेण्यापर्यंत मुलांची झेप जाऊ नये एवढीच इच्छा. मी स्वतः पण सिगरेट , तंबाखू ओढायचो, पण गेल्या कित्येक वर्षापासून बंद केली आहे. जेंव्हा तुम्ही सिगरेट सोडता, तेंव्हा जो कंटाळा येतो तो असह्य असतो, ही गोष्ट मी अनुभवली म्हणून सांगतोय.

कंटाळा हा कधी प्रॉडक्टिव्ह होऊ शकतो का? कदाचित ह्याचं उत्तर होय असे दिले जाऊ शकेल. मनोरंजनाची एक लिमिट असते, तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात, की मग पुन्हा पुन्हा त्या पेक्षा वरचढ मनोरंजन हवे असे वाटू लागते, नाहीतर मग त्या मनोरंजनाचा पण कंटाळा येऊ लागतो. मनोरंजनाचा अतिरेक हा टाळण्याची सवय अगदी लहानपणापासूनच लावून ठेवली , तरच पुढल्या आयुष्यात थोडं संथ आयुष्य जगायची सवय लागु शकते. माझ्या एका मित्राच्या चार वर्षाच्या मुलाला दिवसभर कार्टुन नेटवर्क पहाण्याची सवय आहे. रविवारी तर दिवसभर कार्टून पहात असतो. अशी काही न करता करमणुकीची सवय झाली की मग हात पाय हलवायची पण इच्छा होत नाही, मग व्यायाम तर दूरच राहिला. तरुणांसाठी फेस बुक सारख्या सोशल साईट्स कंटाळा आला की वेळ घालवण्याचे साधन म्हणून वापरले जाते, पण खरंच त्याने कंटाळा जातो का? हा प्रश्न आहेच.

जाता जाता एक गोष्ट सहज लक्षात आली, की अंबानीज, गोदरेज, वगैरे मंडळींकडे तर खूप पैसा आहे, आयुष्यभर काही न करता पण ते आयुष्य घालवू शकतात .दररोज काहीतरी चित्तथरारक गोष्टी अनुभवणं त्यांना शक्य होत असेल का? की त्यांना पण कंटाळा येत असेल? माझं मत आहे, की त्यांना पण नक्कीच कंटाळा येत असेल. एकदा तुम्ही मनोरंजनाचा हाय डोझ रात्री घेतला, की मग सकाळी उठल्यावर जी पहाट होते , ती रात्रीच्या तुलनेत नक्कीच कंटाळवाणी होत असेल नाही का? तुमच्या कडे कितीही पैसा असला तरीही, जीवनात दररोज काही तरी थ्रिलिंग घडवून आणणे शक्य नाही हे नक्की!

करमणुकीच्या अतिरेकाने मन आणि शरीर दोन्ही थकून जातं. संवेदना बोथट होतात, म्हणूनच म्हणतोय, कंटाळा आला, तरीही तो एंजॉय करायला शिका, कंटाळ्यातही एक वेगळीच मजा आहे. जर तुम्ही एकसुरी आयुष्यामध्ये येणारा कंटाळा मान्य करण्याची शरीराला आणि मनाला सवय लावाल, तर  आयुष्य एकदम सोपं होऊन जाईल.

कंटाळा आला , की मग सगळे जण काही तर कर , सिनेमा पहा वगैरे सांगून कंटाळ्याला दूर करा असा सल्ला देतात, पण मी म्हणतो,कंटाळा आलाय ना?  ” बी विथ इट”  आणि कंटाळा पण एंजॉय करा.

रसेल चा एक  लेख वाचला होता, तो सारखा आठवत होता लिहितांना.आता तुम्हाला ह्या  कंटाळ्याची कंटाळवाणी  पोस्ट वाचून   जर कंटाळा आला असेल तर जे वाचलं ते विसरून जा! मला पण कंटाळाच आलाय, म्हणून हे पोस्ट लिहिलं  आहे.:)

एअर सेल..

Written by  on June 28, 2020

पावसाळा आला की सगळ्या न्यूज चॅनल्सचे लोकं खार सबवे आणि मिलन सबवे च्या शेजारी आपल्या  व्हॅन्स उभ्या करुन ठेवतात.   अगदी प्रेताची वाट पहात असलेल्या गिधाडा प्रमाणे !कधी तो सबवे बंद होतो आणि आपण कधी ब्रेकिंग  न्यूज देतो याची वाट पहात तिथे उभे असतात. त्या भागात रहाणारे लोकं सबवे बंद होऊ नये म्हणून प्रार्थना करत असतात, आणि हे लोकं कधी सबवे बंद होतो   याची वाट पहात असतात…………! असो…

जाहिरातींचे विश्व मला नेहेमीच खुणावत असतं.जर मी इंजिनिअरींग च्या फिल्ड मधे नसतो तर नक्कीच ऍडव्हर्टायझिंग हे फिल्ड सिलेक्ट केलं असतं. पण खरं म्हणजे माझ्यामध्ये हिम्मत नव्हती आपल्या आवडीच्या फिल्ड मधे जायची नाहितर माझ्या एका मित्रा प्रमाणे मी पण ऍड्व्हर्टायझिंग एजन्सी सुरु केली असती.माझा एक जवळचा मित्र आहे, त्याने इंजिनिअर होऊन चक्क ऍडव्हर्टाइझ एजन्सी सुरु केली. आणि ती एजन्सी तो यशस्वीपणे चालवतोय!.. असो… मॊस्ट फॅसिनेटिंग फिल्ड..

एखाद्या वस्तूची जाहिरात करायची तर त्या वस्तूची व्हिजिब्लिटी वाढवावी लागते. नुसता ऑडिओ व्हिडीओ ऍड्सचा मारा करूनही बरेचदा ऍड कसली आहे तेच लक्षात रहात नाही..

एअरसेल सेल कंपनीने मात्र  अगदी  थोडे पैसे खर्च  करुन खूप मायलेज मिळवलं. आपल्या प्रॉडक्ट ची जाहिरात अगदी मटा सारख्या , आणि टाइम्स किंवा मुंबई मिरर च्या फ्रंट पेजला एक कपर्दीकही खर्च न करता छापून आणली…..

त्यांनी काय केलं , मिलन सबवे जवळ एक मोठं होर्डींग लावलं होतं-एअरसेलच्या जाहिरातीचं. हे होर्डींग पावसाळा सुरु होतांना -किंबहुना पावसाळ्याच्या आधीच लावलं होतं, त्यावर एक  इन्फ्लेटेड नाव बांधलेली  आहे बघा..

. फक्त एकच सांगायचंय की पहिला फोटो हा पावसाळ्याच्या खूप पूर्वीचा आहे.. अगदी पाउस सुरु होण्या पूर्वी एक महिना आधीचा!

.इथे खाली  एक  फोटो सिक्वेन्स दिलाय.. तो बघा…

milan subway 0.पाउस जस्ट सुरु झालाय.. ते होर्डींग अजूनही लक्ष वेधून घेत नाही.milan subway 1पाउस वगैरे काहीच नसतांना त्या नावेकडे कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं.बरेच दिवस अगदी अन नोटीस्ड गेलं ते होर्डींग! पण नेहेमी प्रमाणे पाउस आला, मुंबईला मिठी नदीचं पाणी वाढलं..सबवेला पाणी भरलंय..

milan subway 2

हे फोटोग्राफ्स बरेचदा पाहिले असतील टिव्ही वर.. मिलन सबवेचे..

milan subway 3अरे… होर्डींगवरची बोट कुठे गेली??तिथे लिहिलं होतं, इन केस ऑफ इमर्जन्सी, कट द रोप….कोणीतरी रोप तोडला वाटतं..

milan subway 4होर्डींग वरची बोट खाली काढलेली दिसते आहे   लोकांनी..

milan subway 5आणि त्या बोटीने सबवे क्रॉस करण्यासाठी मदत करताहेत.. लोकांना..milan subway 6आयडीया वाले, नुसतं व्हॉट ऍन आयडीया सरजी, करित राहिले, खरी आयडीया तर एअरसेलचीच!

milan subway 7milan subway 810119वर दिलेले फोटोग्राफ्स मी काढलेले नाहित!!!!

सती.. एक शापित प्रथा…

Written by  on June 27, 2020

सती

आज सकाळी उठलो आणि मुख्य बातम्या बघाव्यात म्हणून   टिव्ही सुरु केला. सर्फिंग करतांना एका चॅनल वर आपोआपच रेंगाळलो. मंगल पांडे हा सिनेमा सुरु होता त्या चॅनलवर. एक सीन होता, एक प्रेत यात्रा जाते आहे, एका मुलगी लाल साडी मधे नखशिखान्त मेकप करुन एका तिरडीवर बसलेल्या अवस्थेत  नेली जात आहे. तिरडी ला चार लोकांनी खांदा दिलेला आहे. ती स्त्री ट्रान्स मधे असल्यासारखी नुसती बसलेली आहे. मागे बरेच लोकं हातामधे काठ्या घेउन सती माता की जय .. हा जय घोष करत जात आहेत.

इकडे नदीकिनारी आल्यावर तिथे एक चिता रचून ठेवलेली आहे. त्यावर त्या स्त्रीच्या नवऱ्याचं प्रेताशेजारी त्या स्त्रीला बसवतात. तिच्या मांडीवर त्या मेलेल्या नवऱ्याचं डोकं ठेवलेलं असतं.  जय घोष सुरु असतो.. सती माता की जय .. चा आणि त्या चितेला आग लावली जाते. जोर जोरात जय जय कार करणे सुरु असते.. त्या स्त्रीला जेंव्हा चटके बसतात ती तेंव्हा एकदम भानावर येते, आणि त्या चिते वरुन उतरायचा प्रयत्न करते. आजूबाजूचे लोकं तिचा जय घोष करित तिला हातातल्या काठ्यांनी मारुन पुन्हा चिते मधे ढकलतात.इकडे त्यांचा सती माता की जय चा घोष सुरु असतो… आणि हे सगळं होत असतांना बघुन मी चॅनल चेंज करतो.. पण मनावर  त्या सीनचा जो इम्पॅक्ट व्हायचा तो माझ्यावर झालाच. एकदम उदास वाटू लागलं.

थोड्या वेळाने सौ. म्हणाली की भाजी घेउन या.. सगळी भाजी संपली आहे – मी बाहेर निघालो आणि लिफ्ट पर्यंत पोहोचलो तर मागून आवाज ऐकू आला  येतांना राणी सती मार्गावरुन   फॉल पिको ला दिलेली साडी दिलेली साडी घेउन या.. राणी सती नाव ऐकल्यावर मस्तकामधे एकदम तिडीक ऊठली ,कदाचित सकाळी पाहिलेल्या सीनचा परिणाम असावा.  इथे पण मंदीर आहे राणी सतीचं, कधी गेलो नाही त्या मंदिरात, आणि आजपर्यंत कधी लक्षात पण आलं नाही त्या मंदिराबद्दल- पण आजचा सकाळी पाहिलेला सीन.. तो मला स्वस्थ बसू देत नव्हता.

मुंबईसारख्या शहरामधे पण सती ची पुजा करणाऱ्या बायका आहेत आजही, हे प्रकर्षानं जाणवलं, जेंव्हा तिथे साडी घ्यायला गेलो तेंव्हा मंदिरांमधून अगदी अप टू डेट कपडे घातलेल्या सुशिक्षित स्त्रीया दर्शन घेउन बाहेर येतांना दिसल्या, आणि लक्षात आलं- आजही अशा प्रथेचा उदो उदो करणाऱ्या स्त्रिया आहेत मुंबई सारख्या शहरात. जर मुंबई सारख्या शहरात ही परिस्थिती आहे, तर लहान गावांत कशी असेल?

सती प्रथे वर बंदी आणुनही आज १८१ वर्ष झाले आहेत. तरीही अर्जुनही कधी तरी एखाद्या कोपऱ्यात लहानशी बातमी असतेच पेपर मधे – एखाद्या स्त्रीने सती जाण्याचा प्रयत्न (??) केला म्हणून! आता तिने स्वतः सती जायचा प्रयत्न केला की इतर लोकांनी तिला सती जाण्यासाठी भाग पाडले? हे कधीच समजत नाही. ही बातमी नेहेमी   एखाद्या लहान गावातलीच असते.  एखाद्या स्त्री ने सती गेल्यावर तिचं मंदीर बांधण्याची प्रथा  म्हणजे त्या अघोरी  प्रथेचं उदात्तीकरण आहे.

राजस्थानात आजही सती प्रथेचे उदात्तीकरण होते आहे. खुप मोठं मंदिर आहे सतीचं.लोकं आजही राजस्थानात गेले की या मंदिरात आवर्जुन जातात दर्शनाला.

एका गोष्टीचं वाईट वाटतं , की आजही ह्या शिकल्या सवरल्या स्त्रिया   सती मंदिरात जाउन प्रार्थना करतात. एक तुळशी वृंदावन, त्यातुन बाहेर निघणारे दोन जोडलेले हात. त्यामधे अगदी कोपरापर्यंत बांगड्या, म्हणजे सती मंदीर जवळच आहे याची खात्री!!!!

राजा राममोहन रॉय , हे ब्रह्मो समाजाचे स्थापन कर्ते इ.स. १९२८ .पश्चिमी सभ्यते मधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी यांनी आपल्या देशात रुजण्यासाठी खुप मोठे कार्य केले. ह्या माणसाने सोशल रिफॉर्म्स साठी केलेले कार्य   भारतीय स्त्रियांनी अजिबात विसरू नये- पण दुर्दैवाने आज त्यांचे नाव पण कुणालाच माहिती नाही- काळाच्या ओघात विस्मृती आड गेले आहे. केवळ राममोहन रॉय यांच्याच प्रयत्नाने १८२९ साली सती प्रथा ही लिगली चुक आहे म्हणून लॉर्ड विल्यम बेंटींग यांनी  सती प्रथेवर बंदी आणली.

स्पेशली उच्च वर्गातील स्त्रियांचे सती जाण्याचे प्रमाण खूप जास्त होते. ही प्रथा बंद करुन फायदा झाला तो उच्चवर्गीयांचाच . कारण विधवा विवाह हा सर्व सम्मत नव्हता. विधुर दुसरे लग्न करु शकत असे, पण विधवा मात्र कधीच पुनर्विवाह करु शकत नव्हती- सामाजिक रूढी आणि बंधनांमुळे स्त्री ही पुरुषाची मालमत्ता हा कन्सेप्ट होता, आणि कदाचित म्हणूनच पुरुषाच्या मृत्यु नंतर स्त्री ने पुन्हा आयुष्य जगू नये म्हणून तिला सतीचा दर्जा देऊन खून करणे ह्याला उदात्तीकरण प्राप्त झाले असावे.

स्त्रीच्या मनावर पण जर लहानपणापासून असं बिंबवलं की पुरुष नसेल तर तुझं आयुष्य निरर्थक, की मग ती सती जाण्यास तयार  होइलच! या शतकात सती गेलेल्या स्त्रियांची माहिती इथे सापडेल.. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.boloji.com/wfs6/wfs1058.htm)

आजच्याही युगात स्त्री भृणाची हत्या जी केली जाते ती कदाचित याच मानसिकतेचा बळी आहे. पूर्वीच्या काळी स्त्री जन्म म्हणजे एक शापच समजला जायचा. सती प्रथे मुळे, हुंडा पद्धती मुळे किंवा बालविवाह आणि अकाली येणाऱ्या वैधव्यामुळे  असं झालं असावं कदाचित.पण त्या काळच्या मानसिकतेचा इंपॅक्ट अजूनही आपल्या समाजावर आहे आणि आजही वंशाला दिवा हवा असा अट़्टाहास असणारे बरेच लोकं आहेत.

राजस्थानात आजही सती प्रथेचे उदात्तीकरण होते आहे. खूप मोठं मंदिर आहे सतीचं.लोकं आजही राजस्थानात गेले की या मंदिरात आवर्जून जातात दर्शनाला.  आता तरी स्त्रियांनी स्वतःच जागं होऊन अशा रानटी प्रथा आणि त्यामुळे लादलेल्या देवत्वाला आणि मंदिरांना न जाणे हीच राजा राममोहन रॉय यांना श्रध्दांजली ठरेल.

एक विरोधाभास….

Written by  on June 27, 2020

मी आणि कविता..

ही कविता कोण? असा प्रश्न पडला असेल तुम्हाला. खरंय, म्हणा पडायलाच हवा. जर पडला नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे ! कविता म्हंटलं की मुलगीच आठवायला हवी जर तुम्ही पुरुष असाल तर… पुस्तकातली कविता नाही. पण जर… तुम्हाला पुस्तकातली कविता आठवत असेल तर तुमचं वयं झालंय एवढं नक्की समजा…

किती मेलोडीयस शब्द आहे नाही का कविता?? काही शब्द उगाच मनात घर करुन बसतात त्यातलाच हा एक.

कविता वाचायला मला आवडतात. माझी कविता वाचायची पद्धत जरा वेगळी आहे. संग्रही असलेले कुठलेही पुस्तक घ्यायचं, आणि उघडून सरळ समोर येइल ते पान वाचायचं. आणि दुसरा दंडक असा की एका वेळी एक किंवा फार तर दोन कविता वाचायच्या. एखादी कविता वाचली की मग तिचा रसस्वाद घ्यायला वेळ हा लागतोच. अन्यथा, एखाद्या कादंबरी प्रमाणे कवितांची पुस्तकं वाचणारे लोकही मी पाहिले आहेत.

पण इतकी पुस्तके किंवा इतर लेखकांच्या कविता वाचल्यावर आपणही कविता करावी असं क्धीच वाटलं नाही.अर्थात याला अपवाद एकदाच!

एका ऑर्कुट कम्युनिटिवर एकदा एका  ऑर्कुट मित्राने ( देवेंद्र ने) विषय टाकला , की “पाउस पडत असतांना”  ही एक ओळ घेउन पुढची कविता तुम्ही करा असा टॉपिक होता.

… तो कवितांचा टॉपिक पोस्ट केलेला पाहिला आणि कविता म्हणून नाही पण जे काही सुचलं ते लिहिलं.. चारोळीच्या स्वरुपात.. म्हणून त्या पोस्ट वर काही चारोळ्या पोस्ट केल्या. त्या इथे खाली देतोय… एका चारोळी चा दुसऱ्या चारोळीशी संबंध नाही..

1) पाउस पडत असतांना
भजी तु तळली नाहीस
कानफटातवाजवून तुझ्या
पोट माझे भरले नाही……

2) पाउस पडत असतांना
तुझी गाडी पंक्चर झाली!
लिफ्ट द्यायला म्हणून थांबलो,
तर तू शिव्यांची लाखोली वाहिली!

3) पाउस पडत असतांना
तुला का रडू आलं
नदीचं पाणी बघ
सगळं खारट झालं

4) पाउस  पडत असतांना
आभाळाला छिद्र पडलं
नशिबाला ठिगळ लावायला
माझं आयुष्य कमी पडलं.

5) पाउस पडत असतांना
स्कुटीवर जाऊ नकोस
कपडे भिजतील तुझे
म्हणशील,
माझ्याकडे पाहू नको

6)पाउस  असतांना

ट्रॅफिक जाम झाला
शेजार कार मधलीकडॆ
बघत वेळ  तसा बरा गेला.

7)पाउस पडत असतांना
पावसात खेळलेला फुटबॉल आठवतॊ
आणि खिडकीची काच फुटल्यावर
शेजाऱ्याने दिलेला मार पण आठवतो.

8)पाउस पडत असताना
समुद्रावर संध्याकाळी फिरताना
वात्रटपणा करावासा वाटतॊ
पण तू जवळ नसते तेंव्हा
“इतरांचाच” पहावा लागतो.

9)पाउस पडत असतांना
पदरा खाली मुलाला लपवणारी भिकारीण दिसली
दारिद्र्य रेषा किती वर गेली ह्याची खात्री पटली
डोक्यावर छप्पर पण नसलेले हे जीवन पाहून
खिशात असलेल्या पैशांची लाज वाटू लागली

अशा कविता करता करता थोडं नॉस्टेलजिक वाटायला लागलं….आणि मग.. अशा काही ओळी सुचल्या..

पाउस पडत असतांना
मनाला वयाचा विसर पडतो ,
वठलेल्या खोडाला पण
हिरवा कोवळा कोंब फुटतो..

पाउस पडत असतांना
त्या कोंबाची फांदी होते
बायकोने झटकल्यावर
वास्तवाची जाणिव होते.

पाउस पडत असतांना
मन आतल्या आत धुमसत ,
स्वप्नातून वास्तवात का आलो
म्हणून स्वतःलाच दोष देतं.

बांगड्यांना पण हलकेच
कंगोरे फुटू लागतात,
कुणीतरी मागे सरकवावं
म्हणून समोर येउ लागतात!

पण तेंव्हा खोडाचे कोंब
कोमेजुन गेलेले असतात.
आणि वठलेले खोड
पुन्हा पावसाची वाट पाहू लागतं…..

ज्या कवितेला ना शेंडा न बुडखा ती ही नवकविता ….प्रयत्न केलाय.. फार कष्ट नाही घावे लागले…
तुमच्या सहनशक्ती चा अंत पहात नाही. अत्याचार करण्यावर पण काही मर्यादा असावी… म्हणून माझे काव्य ईथेच थांबवतो..

रिस्पॉन्स  खुप एनकरेजिंग होता. बऱ्याच मित्रांनी तुला’ ट ला ट ’ जोडता येतो, “तुजे काही लिहिलय, ली कविता वाटते” तेंव्हा लिहित जा म्हणून स्क्रॅप्स केलेत.

तरी पण स्वतःच्या लिमिटेशन्स माहीत असल्या मुळे मी तो प्रांत आपला नाही हे जाणून तसा प्रयत्न कधी केला नाही.

हल्ली ऑर्कुट वर बरंच पिक आलंय  नव कविंचं. कविता  मुक्त छंदातली असली तरी मला आवडते पण केवळ मुक्त छंद म्हणून काय वाट्टॆल ते लिहुन कुठल्या तरी कवितांच्या कम्युनिटीवर पोस्ट करणं , ही  एक फॅशन झाली आहे.

हे काहीही जरी असलं तरी एका गोष्टीचं बरं वाटतं , की ह्या निमित्याने का होईना पण, पण कविता हा प्रकार केवळ मध्यमवयिन लोकांचाच नव्हे तर तरुणांमध्ये लोकप्रिय झाला.

कशाही कविता करुन पोस्ट केल्या तरी त्यामुळे माय मराठीचे काहीच नुकसान होत नाही, उलट जे लोक कविता वगैरे करतात त्यांचं  मराठी वरचं प्रेमच दिसून येतं. पूर्वी मला अशा कसल्याही कविता पोस्ट केलेल्या पाहिल्या की मग राग यायचा. परंतु आता कौतुक वाटतं ह्या मुला-मुलींच..

एकदा अगदी लहान असतानाच्या काळात, मंगेश पाडगांवकर, विंदा करंदिकर आणि वसंत बापट एकत्र कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम करित. तेंव्हा  एकदा त्यांचा कार्यक्रम यवतमाळला टिळक स्मारक मंदीरामधे ऐकला होता. फार तर ५०-७५ श्रोते असतील पण कार्यक्रम एकदम बहारदार झाला होता. त्याच दिवसा पासून कविते मधली “गम्मत” समजली आणि कविता आवडायला लागली.

त्याच ठिकाणी आप्पांचे व्याख्यान पण ऐकण्याचा योग आला होता. आप्पा म्हणजे गोनिदा. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट अजुन चांगलीच लक्षात आहे म्हणण्यापेक्षा मनात घर करुन बसली आहे. एकदा एक माणुस जंगलातून चालला होता. सुंदर सुवासिक फुल पडलेले दिसले त्याला, त्याने पाहिले आणि दुर्लक्ष करुन पुढे गेला, परत थोड्या थोड्या अंतरावर तशीच फुलं पडलेली दिसत होती. पण तो पांथस्थ पुढे चालत राहिला.

त्याच रस्त्याने त्याच्या पाठोपाठ दुसरा माणुस चालला होता. त्याने ती सगळी फुलं एका पाठोपाठ एक गोळा केली. आणि एक सुंदर माळ बनवली..

“हे तुमच्या हातात आहे की आनंदाचे लहान लहान क्षण बरोबर गोळा करुन त्यांचा हार आस्वाद घ्यायचा , की ते क्षण तसेच टाकुन देऊन पुढे निघून जायचं!”आप्पा वॉज ग्रेट. आप्पांकडे स्वाक्षरी मागायला गेलो , तर आप्पा म्हणाले, बेटा पत्र पाठव , मी तुला उत्तर पाठवीन. ” नंतर मी आप्पांना पत्र पण लिहिलं, त्यांचं आलेलं उत्तर खूप वर्ष जपून ठेवलं होतं..

लिहितोय, पण फार सेंटि वाटतंय,, थांबतो इथेच आत..

कान्ट यु सी? आय ऍम बिझी?

Written by  on June 26, 2020

दिवसभर कॉम्प्यूटर च्या समोर बसून,   एस ए पी च्या त्याच त्या स्क्रिन्स बघून, कंटाळा येतो आपल्याला. बरं जरी एसएपी वर जास्त काम नसलं तरीही, रिपोर्ट्स  डाउन लोड करुन बघायचे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे  पेमेंटस फॉलो अप करणं…सेल फिगर्स बघून शॉर्टफॉल असलेल्या भागातल्याल्या लोकांशी संपर्क साधायचा, वगैरे बरीच  कामं असतातच…

आणि ते काम झाल्यावर  आउटलुक मधे तर सारखे घागरीत नळाखाली धरल्यावर थेंब थेंब पाणी गळावे तसे एका पाठोपाठ एक इ मेल्स येतच असतात.

तुम्ही पण सचिन जसा   प्रत्येक बॉल लिलया सीमेपार धाडतो, त्या प्रमाणेच प्रत्येक इ मेल ला  दुसऱ्याच्या इन बॉक्स मधे टोलवत असता-बरेचदा एफ वाय एन ए ( फॉर युवर नेसेसरी (?) ऍक्शन)  म्हणून किंवा एफ.वाय. आय. प्लिज.. म्हणजे ( फॉर युवर इन्फो प्लिज) करुन.

पाचच मिनिटात तोच इ मेल पुन्हा तुमच्या इन बॉक्स मधे दिसतो… तुम्ही ज्याला पाठवला त्याने तो कुणाला तरी फॉर्वर्ड केलेला असतो.. प्लिझ रेफर ट्रेलिंग मेल फ्रॉम एक्स वाय झेड ऍंड प्लिज  ऍडव्हाइस द स्टेटस…. ( जे तुम्हाला कधीच मिळत नाही) असा हा इमेल-इमेल चा खेळ दिवसभर सुरु असतो.

बरेचदा लोकं ऑफिस मधे टी टी पण खेळतात. म्हणजे  एखादं काम आलं की ते काम टेबल टु टेबल ( टीटी ) टोलवत रहातात, निर्णय  घेणं टाळून हा खेळ चांगलाच रंगतो. मग मिटींग मधे मी ह्याला मेल दिला होता, हा म्हणतो त्याला मेल दिला होता आणि ब्लेम गेम सुरु होतो..

एखाद्या कामासाठी   मेल केला, की बॉक्स मधे आल्या आल्या तो अजुन चार पाच लोकांना फॉर्वर्ड करुन परत तुम्हाला पण कॉपी मार्क केलेली असते, हे सांगायला की मी ऍक्शन घेतली आहे  तुझ्या मेल वर..बरेचदा तर  मी तुझा मेल रिस्पॉन्सिबल लोकांना फॉर्वर्ड केलाय आता ते उत्तर  देत नाहीत तर मी काय करू?  बस, एक इ मेल केला .. माझं काम झालं.. अशी पण अटिट्युड दिसुन येते..

बरं लोकांना अजुन एक सवय असते, मेल केल्यावर लगेच फोन करतात विचारायला ’ मेल मिळाला का? मी म्हणतो, हो, मिळाला. ( मनातल्या मनात म्हणतो  की आता फिमेल पाठव!!!! हे आपलं उगाच गम्मत बरं का.. हा जोक फार फेमस होता १९९९ मधे)  ”  इ मेल पाठवला तर मिळेलच नां.. जाईल कुठे तो.. पण  नाही.. ताबडतोब फोन करुन  विचारायची गरज काय? लोकांचा अजुन इलेक्ट्रॉनिक मिडिया वरचा विश्वास बसलेला नाही  बहुतेक..  बरं मेल मिळाला म्हटल की पुन्हा पाच मिनिटात पुन्हा फोन करुन लोकं  विचारतात की   हं.. तुला काय वाटतं मग, ( त्याने जो  इ मेल पाठवला त्याबद्दल?).. अरे बाबा कुठे आग लागली आहे कां? इतकी काय घाई आहे??वाचु तर दे आधी मग सांगतो.. !!असो..

पण ही मेंटॅलिटी भारतामधे खूप आहे. जसं मुंबईचे बाइक वाले रस्त्यावरून जातांना – डाव्या लेन मधुन जात असताना   एकाएकी उजव्या साईडचा हात दाखवून दोन लेन्स कट करुन जसे अगदी हक्काने  उजवीकडे वळता.. आणि ही पण अपेक्षा ठेवतात की सगळ्यांनी थांबलंच पाहिजे -“अहो हात दाखवला होता नां.. मग?? “म्हणजे  त्याने नियम पाळला ना??  आणि जर तुम्ही ब्रेक मारला,आणि त्याला थोडा धक्का जरी लागला तर ताबडतोब बाईक उभी करुन भांडायला येइल आणि  तुम्हाला कायदे शिकवेल तो माणुस. .. हात दिखाया था नां.. दिखता नै क्या??

अगदी सेम टु सेम असतं , ऑफिस मधे. मेल पाठवला होता नां?? मग??  इ मेल ही कम्युनिकेशन  फॅसिलिटी म्हणून न वापरता ब्लेम गेम साठी जास्त वापरली जाते असे माझे तरी मत झालेले आहे.

बरेचदा अशा गमती जमती घडतात..एक अजुन गम्मत असते, काही सबॉर्डीनेट्स  मेल पाठवतात हे केवळ आपली जबाबदारी टाळायला. तुम्ही मॅनेजर आहात, मग तुम्हाला एखाद्या सबॉर्डीनेटने एखादा इशु रेझ केला  म्हणण्यापेक्षा काम कसं केलं जाऊ शकत नाही हे लिहिलं, आणि तुमचा सल्ला मागितला -(आता आयटी वाले प्रॉब्लेम्स ला इशू म्हणतात ना? म्हणून तो शब्द वापरलाय, तसं आम्ही मात्र प्रॉब्लेम ला प्रॉब्लेमच म्हणतो.) आणि समजा तुम्ही विसरलात त्याला उत्तर द्यायला, तर बी शुअर यु आर लाइकली टू बी कॉर्नर्ड व्हेन यु ट्राय टु टेक द स्टॉक ऑफ सिच्युएशन.. नंतर कधी तरी तुम्ही त्या  मधे अडकलात,  आणि   विचारलं, की काय रे बाबा, कामाचं काय झालं? तर उत्तर येतं.. मेल पाठवला होता सर तुम्हाला….. !!!

अशी परिस्थिती कशी हॅंडल करायची हे प्रत्येकाचं वेगळी पद्धत असते. बरेच लोकं.. अरे हो कां?? मी विसरुनच गेलो बघ .. असं म्हणतात तर काही लोकं  सरळ  ऑफेन्सिव्ह होतात .. मेल पाठवला म्हणजे झालं का? अरे फोन का नाही केलास? दिवसभरात इतके मेल्स येतात ,  मला तेवढंच काम आहे का? तुझं काम आहे, तेंव्हा तूच आठवण करुन द्यायची नाही कां??  हाउ कॅन यु बी सो  इर्रिस्पॉन्सिबल??   आय ऍम गोइंग टु रिमेंबर युवर  धिस काइंड ऑफ अटीट्य़ूड..

बरेचदा सबॉर्डीनेट   नुसता फोन करतो इ मेल करित नाही , तेंव्हा पण तुमच्याकडुन काम करायचं राहुन गेलं, तर मग अरे इ मेल का नाही पाठवलास? तु सांगितलं मला पण, इतकी कामं असतात, की लक्षात रहात नाही. यु मस्ट सेंड अ नोट , इमिडिअटली आफ्टर डिस्कशन्स.. असंही हॅंडल करतात .

येणाऱ्या इमेल्स मधे एखादा फॉर्वर्ड पाठवणाऱ्या मित्राचा इ मेल आधी पाहिला जातो उघडून.. असो.. खूपच भरकटलंय हे पोस्ट, मी खरं तर हे पोस्ट सुरु केलं होतं ते  या वेब साईट  ^(http://rangmarathiche.com/goto/http://cantyouseeimbusy.com/)बद्दल सांगायला. की ज्या मधे असे गेम्स आहेत की तुम्ही खेळत असतांना बॉस जरी समोर आला तरीही त्याला कळणार नाही.  सगळे ऑन लाइन गेम आहेत.. अवश्य ट्राय करा…

स्वाईन फ्लु

Written by  on June 26, 2020

आजपर्यंत बर्ड फ्लु ऐकलं होतं. मॅड काउ पण ऐकलं होतं . आता  हा अजुन एक नवीन प्रकार दिसतोय..

नावावरून तर तो चक्क डुकरांच्यामुळे होणारा ( म्हणजे पाकिस्तान्यांच्या मुळे नाही) रोग वाटतो.खरं तर हा फ्लु डुकरांच्या मधे अगदी कॉमन आहे. अमेरिकेत डुकरं पाळणं (खाण्यासाठी) हा एक मुख्य धंदा आहे. अगदी आपल्या इथे ज्या प्रमाणे पोल्ट्रीज आहेत तशात तिथे पिगरीज आहेत. सॉसेजेस हा तिथला आवडता पदार्थ.आत्ता पर्यंत डुकरांना पाळताना देण्यात येणारे व्हॅसिन्स योग्य रितीने रोगाला अटकाव करित होते. पण आता मात्र व्हायरस अजिबात दाद देईनासा झालाय, त्या व्हॅसिन्स ला.  डुकरांच्या सान्निध्यात काम करणाऱ्या लोकांना पण हा रोग होऊ शकतो.

२००४ मधे युनिव्हर्सिटी ऑफ लोवा मधे एका सर्विलन्स स्टडी मधे हे सिद्ध झालं होतं की , जे लोकं पोल्ट्री आणि स्वाइनरी हॅंडल करतात त्यांना झोनोटीक इन्फेक्शन विथ इन्फ्लुएन्झा व्हायरस मुळे त्रास होऊ शकतं .तसा, सहजा सहजी हा रोग माणसांना होत नाही, पण एकदा   झाला की मग मात्र फार वेगाने स्प्रेड होतो.

१९७६, नंतर १९८८ नंतर आताच २००९ मधे ह्या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले .आताच्या या अटॅक मधे १७२ डेथ मेक्सिको मधे आणि २० डेथ आणि १००० च्या वर इन्फेक्शन्स झालेले आहेत.

कांही दिवसापूर्वी एक लेख वाचला होता कृष्ण उवाच ^(http://rangmarathiche.com/goto/http://shrikrishnasamant.wordpress.com/2009/03/22/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0/) मधे सामंत साहेबांचा. त्यात त्यांनी म्हंटलं होतं की अमेरिकेत रहाणाऱ्या भारतीयांनी विनाकारण अमेरिकनांचे अंधानुकरण करू नये. बिफ, पोर्क, बेकन्स खाणं टाळावं. आजच्या परिस्थितीत तेच अगदी संयुक्तिक वाटतं. बेकन किंवा पोर्क खाण्यामुळे पण हा रोग होऊ शकतो असे कांही लोकांचे म्हणणे आहे पण कांही डॉक्टर्स म्हणतात की वेल कुक्ड फुड खाल्लं तर कांही धोका नाही.

याचे सिंपटम्स पण अगदी आपल्या नेहेमीच्या फ्लु सारखेच असतात. गळणार नाक,घशातली खवखव ताप, थकवा, भुक न लागणं, खोकला, उलट्या आणि डीसेंट्री, त्यामुळे  ह्या रोगाला इतर रोगापासुन वेगळं आयडॆंटीफाय करणं पण तसं कठीणंच. तरीही अमेरिकेत डॉक्टर्सना सांगण्यात आलेलं आहे .तुमच्या कडे कुठलिही व्हायरल इन्फेक्शन ची केस  किंवा रिस्पायरेटरी इन्फेक्शन ची केस आली तर “स्वाइन व्हायरस” टेस्ट करा म्हणजे हा रोग पसरणे थांबण्यास मदत होईल..

हे कळतं कसं ? किंवा हे कन्फर्म कसं केलं जातं की एखाद्याला स्वाइन फ्लु आहे म्हणुन? तर नाकातलं फ्लुड आणि कफ यांच्यावरपॅथॅलॉजिकल टेस्ट्स केल्या की मग कळतं    स्वाइन फ्लु आहे की नाही ते.

हा डीसिझ कॉंटेंजिनियस आहे. खोकल्या मुळे प्रसारित होणारे जर्म्स – मुळे हा रोग पसरु शकतो. शक्यतोवर हा रोग झालेल्या माणसाबरोबर शेक हॅंड केल्यास साबणाने हात धुणे  आवश्यक आहे. हा रोग शिंकांमुळे पण पसरु शकतो. एखाद्या माणसाला हा फ्लु झाला तर तो  साहाजीकच खोकला आल्यावर तोंडासमोर हात धरेल आणि मगच खोकेल. किंवा शिंक आली तरी पण तो नाकासमोर हात धरेल. असे करण्यामूळे रोगाचे जर्म्स हातावर ट्रान्स्फर होऊन नंतर मग लॅपटॉप्स, टेलिफोन्स, टेबलटॉप्स वर हा व्हायरस फ्लोट होतो. इथून हा डोळॆ, नाक, किंवा तोंडावाटे दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करु शकतो.

अल्कोहल बेस्ड जेल्स, किंवा फोम वापरला तर ह्या व्हायरस पासुन बचाव होऊ शकतो. शोशल डीस्टंन्सिंग ही एक दुसरी साधी पद्धत पण व्हायरस दुर ठेवण्यास मदत करु शकते. डब्लु एच ओ ने गाइडलान्स मधे सांगितलंय की ज्याला फ्लु लाइक सिम्पटम्स असतिल त्याने हा फ्लु स्वाइन फ्लु नाही, हे कन्फर्म होई पर्यंत इतरांपासून दुर च रहावे.

अमेरिकेत सध्या टॅमिफ्लु किंवा रेलेन्झा हे ड्रग्ज प्रिव्हेंटिव्ह म्हणुन दिले  जातात.भारत, आणि इतर एशियाई देशात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट करणे सुरु केले आहे. अगदी ह्याच प्रकारच्या ऍक्शन्स बॅंकॉक मधे पण घेण्यात आल्या आहेत. बॅंकॉक मधे तर फॉरिनर्स ला परत पाठवा असाही प्रस्ताव आहे.

आता हा रोग कधी आटोक्यात येइल ते काळच ठरवेल.

गोवा कार्निव्हल.

Written by  on June 25, 2020

कार्निव्हल म्हंट्लं की रंभा संभा डान्स करणाऱ्या रिओ द जिनेरिओ च्या सुंदऱ्या आठवतात .. खरं ना? अर्थात तसं असेल तर त्यात कोणालाच दोष देता येत नाही , कारण त्यांचे डान्सच (???मला माहिती आहे तुम्ही मनातल्या मनात हसताय म्हणुन- ब्राझिलच्या कार्निव्हल मधे डान्स कोण बघतो???? खरं नां??)- इतके मस्त असतात की ते आठवण सहाजिकच आहे.

कार्निव्हल म्हणजे काय?? तर खा, प्या, मजा करा. कुठल्यातरी एका रोमन शब्दाचा हा अपभ्रंश आहे हा.कार्निव्हल चा   ख्रिश्चन लोकांचा सण, पण सगळे हिंदु लोकं पण यामधे तेवढ्याच उत्साहाने भाग घेतात.  १९६१ पर्यंत पोर्तुगिझ लोकांनी गोव्यावर राज्य केलं, आणि कळत नकळत  त्यांची  संस्कती ही गोव्याची संस्कृती झालेली आहे. कार्निव्हल हा   तर गोव्याची सांस्कृतिक  ओळख बनलाय.

दर वर्षी साधारणपणे फेब्रूवारी महिन्यात   कार्निव्हल सिलेब्रेट केला जातो. अगदी नक्की वेळ सांगायची तर गुड्फ्रायडेच्या ४३ दिवस आधी कार्निव्हल सुरु होतो.    गुडफ्रायडेच्या आधीचे  हे चाळीस दिवस रोमन कॅथलिक  ख्रिश्चन लोकं उपवास करतात.   चाळीस दिवस फिश, मिट न खाणे अगदी कटाक्षाने पाळतात हे लोकं . पुढे चाळिस दिवस मिट नाही- म्हणुन उपवासाच्या पुर्वीचे तिन   दिवस खाउन पिउन मस्ती करण्यासाठी म्हणुन हा कार्निव्हल ! मुस्लीम लोकं जसे उपवास संपले की इद मनवतात, तसंच हा कार्निव्हल म्हणजे  उपवासाच्या आधीचं सिलेब्रेशन.

गोव्या मधे इतक्या वेळेस आलोय, अगदी इस्टर च्या वेळेस पण गोवा पाहिलंय. तो इस्टरचा कॅंडल मार्च, आणि झेविअर्स चर्च च्या बाहेर उभं राहुन ( आत जाणं अलाउड नाही, जर तुम्ही कॅथलीक नसाल तर – आणि विथ ड्यु रिस्पेक्ट मी बाहेरच थांबलो होतो) मास ऐकलाय, पण हे कार्निव्हल एकदम कलरफुल फेस्टिव्हल असतो. इतक्या वेळा आलोय गोव्याला पण  असुनही कार्निव्हल च्या वेळेस गोव्यात रहाण्याचा योग आजपर्यंत कधीच आला नव्हता- या वर्षी पहिली वेळ कार्निव्हल पहाण्याची 🙂 .

फार पुर्वी एक किंग मोमो होऊन गेला. त्याच्या काळापासुन हा फेस्टीव्अल सुरु करण्यात आलाय ( कृपा करुन हा किंग मोमो कोण , कुठला असे प्रश्न डोक्यात  आणुन  त्रास करुन घेउ नका -उत्तर सापडणार नाही)  🙂 मी शोधलंय पण सापडलं नाही नेट वर म्हणुन सांगतोय!!. तर  एक दिवस राजाने अनाउन्स केलं की आता तिन दिवस काम वगैरे बंद -कारण आता उपवास सुरु होणार पुढे चाळीस दिवस तेंव्हा आता हे तिन दिवस  फक्त मजा करा…  आणि तेंव्हा पासुन हा कार्निव्हल सुरु झालाय.

सध्या एक कार्निव्हल कमीटी  आहे पणजीला. ती कमीटी एक मोमो राजा निवडते . निवडीची प्रोसिजर अगदी गुप्त राखण्यात येते.  कार्निव्हलची सुरुवात खास निवडुन दिलेला  किंग मोमो करतो. कार्निव्हल चा पहिला शोभारथ हा किंग मोमोचा असतो. त्यावर निवडुन दिलेला  किंग  ड्रेस, दागिने वगैरे घालुन  बसलेला असतो, आणि तो किंग मोमो ऑफिशिअली कार्निव्हल सुरु झाला आहे असं अनाउन्स करतो – हा कार्निव्हल  पणजी ला पहिल्या दिवशी , नंतर एक दिवस वास्को आणि एक दिवस मडगांवला  असतो.   ’किंग मोमो’ औट घटकेचा म्हणजेच तिन दिवसांचा राजा असतो गोव्याचा.

त्या दिवशी त्या मोमोचा थाट अगदी बघण्यासारखा असतो. आम्हाला पहायला मिळाला नाही, पण मागच्या वर्षीच्या किंग चा फोटॊ इथे पोस्ट करतोय.

दुपारी ३ वाजता गोव्याला येउन पोहोचलो- फ्लाईट दिड तास लेट!! पोहोचल्याबरोबर ताबडतोब  बॅग्ज टॅक्सीमधेच ठेउन पणजीला कामासाठी निघालो.जेट कनेक्ट ची फ्लाइट होती, त्यामुळे खाणं वगैरे काहीच नव्हतं फ्लाइट मधे. कोल्ड सॅंडविच चा मला मनापासुन तिटकारा आहे. अगदी काहीच खायला नसेल, आणि भुकेने जीव जायची वेळ आली तरच मी ते कोल्ड सॅंडविच खातो. गोव्याला पोहोचल्यावर आधी काहीतरी पोटात ढकलावं म्हणुन ड्रायव्हरला अनंताश्रम मधे गाडी घे म्हंटलं. एखादा दिवस खराब असतो तो असा..

हॉटेल बंद. हीच एक गोव्याची गोष्ट मला आवडत नाही. शेवटी ड्रायव्हरला म्हंटलं, की रस्त्याने जे कुठलं हॉटेल उघडं दिसेल तिथे थांबव. एक हॉटेल सापडलं उघडं. तिथे गेलो, तर फक्त   प्रॉन्स बिर्याणी आहे- बाकी सगळं संपलं.. असं म्हणाला तो. एक बिर्याणी आणी प्रॉन्स वेफर्स, सोबत एक ग्लास बिअर वर सेटल केलं. हे प्रॉन्स वेफर्स द बेस्ट प्रकार आहे गोव्यातला. बहुतेक सगळ्याच बार मधे मिळतो. व्यवस्थित जेवण नशिबातच नव्हतं.थोडं फार पॊटात ढकलुन तिथुन निघालो ते सरळ कामाला लागलो.

सगळी कामं आटोपली पणजीची, आणि मग तिथुन टॅक्सीने  कोलव्याला निघालो.  इतकी वर्ष येतोय गोव्याला, पण अजुनही मला कोलवा बिच आवडतो.  दर वेळेस इथलं एक हॉटेल ठरलय रहाण्यासाठी .समुद्र किनाऱ्यावर असल्याने, सकाळी उठुन पाण्यात पाय बुडवायला बरं वाटतं इथल्या समुद्रात!  आणि सकाळचा टाइमपास पण मस्त होतो :). इथल्या बिच वरची रेती पण खुपच नरम आणि स्वच्छ आहे.

मडगांवला पोहोचलो, तर पुढे ट्रॅफिक जॅम दिसला म्हणुन ड्रायव्हरला सांगुन कार बाजुला लावली – पहातो तर कार्निव्हलचा रंग अगदी टिपेला पोहोचला होता. लोकं बेधुंद होऊन नाचत होते. रस्ता जाम झालेला होता पण कोणाच्याही कपाळावर आठि दिसत नव्हत

वलेले होते. प्रत्येकाची थिम वेगळी होती. या कार्निव्हलचा फायदा करुन घ्यायला म्हणुन हिरो होंडा बाइकवाल्यांनी पण आपली बाईक एका फ्लोट वर डिस्प्ले केली होती. प्रत्येक फ्लोट वर मोठे मोठे स्पिकर्स आणि मोठ्या आवाजात म्युझिक सुरु होतं. मुलं, मुली, नाचत होते. एक वेगळी झिंग होती वातावरणात. आपणही नाचावंसं वाटत  होतं . असं होतंच बहुतेक- जेंव्हा असं म्युझिक असलं की नाचावसं वाटतंच.. मुलं मुली  कलरफुल कपडे  – मुद्दाम या ऑकेजन साठी बनवलेले  घालुन फिरत होते. एकाही मुलीचे किंव मुलाचे कपडे अंग उघडे टाकणारे नव्हते हे इथे नमुद करावसं वाटतं.

आम्ही चालत चालत पुढे निघालॊ. हे फ्लोट्स बघुन लक्षात यायचं की हे बनवण्यासाठी बरीच मेहेनत घेतली आहे , आणि खर्चही भरपुर केलाय. हे फ्लोट बनवणारे कारागीर म्हणजे लोकल लोकं. हे फ्लोट्स ओपन ट्रक्सवर सजवलेले असतात.   कार्निव्हल सोहळा  हा नेहेमी   पणजीलाच सुरु होतो.

प्रोसेशन संपलं की स्टेज वर रात्री लोकल मुलं, नाटकं, आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात, या मधे नाच, गाणी, नाटकं किंवा एक पा्त्री प्रयोग वगैरे सगळं काही असतं. मुलं मुली मुद्दाम डिझाइन केलेले कार्निव्हल चे कपडे घालुन असतात. थोडक्यात नुसतं खा, प्या, मजा करा असा माहौल असतो.सगळ्यात चांगल्या डिझाइन केलेल्या , आणि त्यावरच्या मुलांचे कपडे, नाच या सगळ्या गोष्टींना जज करुन पहिल्या तिन फ्लोट्स ला बक्षीस दिलं जातं.

मी पण व्हिडीओ घेतलाय, पण माझ्या पेक्षा पण एक चांगला व्हिडीओ मला नेट वर सापडला म्हणुन तो युज करतोय इथे.

मुलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. अगदी दहा बारा वर्षाच्या मुलामुलींपासुन तर चांगले वयात आलेले मुलं मुली या प्रोसेशन मधे नाचत होते. एक फ्लोट तर चक्क गांधीजींचा होता. त्यावर एक माणुस टकलु करुन पदयात्रेच्या पोझ मधे उभा होता, एवढंच नाही तर त्या फ्लोट बरोबरचे बरेच लोकं टकलू करुन फिरत होते.

रस्त्याने जातांना बरेच ठिकाणी प्रोसेशन थांबत होतं- पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे. मला एका गल्ली मधे कमीत कमी ६ प्रोसेशन आपली पाळी येण्याची वाट पहात थांबलेले दिसले. त्यामुळे त्यांचे फोटॊ चांगल्या रितिने काढता आले. इतक्या सगळ्या प्रोसेशनस मधे पण कुठेही ट्राफिकची वाट लागलेली नव्हती. थोडा फार जाम होणं तर सहाजिकच आहे, पण ट्राफिक मुव्हिंग होता.

मला हे कार्निव्हल फार वेळ पहात रहाणं  शक्य नव्हतं, कारण संध्याकाळी एका डिलरला भेटायला जायचं होतं. जवळपास तास -दिडतास कार्निव्हल एंजॉय करुन हॉटेलवर परत गेलो.

इथे कार्निव्हलची मजा म्हणजे दिवस भर आणि रात्रभर इथे हुंदडणे आणि प्रोसेशन बरोबर फिरणे यातच आहे. याच प्रोसेशन मधे काही मुलांनी मुलींचे कपडे घालुन केलेले डान्स वगैरे पण खरंच खुप छान जमले होते. भरपुर फोटो काढले , व्हिडिओ पण घेतलेत , आणि या प्रोसेशनचा एक भाग होऊन त्यांच्या बरोबर थोड्ं अंतर चालुन पण गेलो. अधुन मधुन एखादी पिल्लु बिअर हातात धरुन नाचणारा गोवनिज तुम्हाला गळ्यात हात घालुन नाचायला ओढायचा.

कार्निव्हल म्हणजे धमाल.. बस्स.. संध्याकाळी एका स्टेजवर  लोकल मुलं मुली नाटकं, नाच वगैरे कार्यक्रम करतात. उत्तररात्रीपर्यंत चालतो हा सोहळा. माझी इच्छा होती रात्रीचा कल्चरल कार्यक्रम पहायची, पण शक्य झालं नाही. असो. इतकंच पहायला मिळालं हे पण खुप झालं. जर शक्य असेल तर गोव्याला ह्याच पिरियड मधे व्हिजीट प्लान केली तर रात्री खुप छान करमणुक होऊ शकेल, आणि एक सुंदर अनुभव घेता येइल

( बरेच फोटो पण काढले आहेत, ते उद्या सकाळी पोस्ट करीन. फोटो ऑफिसच्या लॅप टॉप वर आहेत आणि आज चार्जर विसरुन आलोय ऑफिसमधे ….. )

तिचा ब्लॉग..

Written by  on June 25, 2020

मुलांना सुंदर आणि बिनडोक मुली जास्त आवडतात !! आता हे कसलं स्टेटमेंट ?? माझं नाही हे स्टेटमेंट! असंच वाचलंय कुठेतरी… समस्त स्त्री वर्गाची  माझ्यावर वैतागण्यापुर्वीच   माफी मागतोय- जरी हे स्टेटमेंट माझ नसलं तरिही.इथे कोणाचाही अपमान करण्याचा हेतु नाही. कृपया विनोदाच्या अंगाने घ्या या पोस्टची सुरुवात.

ह्याचा अर्थ हा नाही की जर तुम्ही सुंदर असाल आणि मुलांच्या मधे पण लोकप्रिय असाल तर बिनडोक आहात.. किंवा  असाही नाही की  तुम्ही मुलांच्या मधे पॉप्युलर नाही म्हणजे दिसायला सो सो आणि फार हुशार आहात!

सुन्दर आणि  हुशार पण असाल तर मुली  मुलांना आवडणार नाही,असही नाही!!  छे!!  छे!! किती कन्फ्युज करतोय ना मी?  मी स्वतः पण कन्फ्युज झालोय माझ्या स्वतःच्या या लिखाणाबद्दल.

!कुठेतरी वाचल्याचं आठवतं… नक्कीच मिल्स ऍंड बुन्स मधे असावं.. नक्की आठवत नाही- तुम्ही म्हणाल, काय माणुस आहे , अगदी एम ऍंड बी पण वाचतो आणि ते पण ओपनली कबुल पण करतो.. पण मी खरंच एंजॉय करायचॊ एम ऍंड बी.. अगदी लपुन छपुन पुस्तकं वाचायचो.. लग्नाच्या पुर्वी… म्हणजेच .. कोणे एके काळी…….  🙂

“द ओनली वे टु विन हिम  इज ऍक्ट डंब”- असा सल्ला एका पुस्तकात त्या पुस्तकाच्या नायिकेला त्या टीडीएच मुलाची आई देते…   तर ब्लॉंड्स ऍंड ब्युटीफुल हे कॉम्बो फार लोकप्रिय आहे.असाही समज/गैरसमज आहे की ब्लॉंड्स या बिनडोक असतात… बिनडॊक हा खास नागपुरी शब्द आहे, याचा समानार्थी शब्द आहे निर्बुध्द!! अर्थात हा सगळा विनोदाचा एक  भाग आहे .

आपल्या कडे जसे सरदारजीचे जोक्स असतात, ( जरी आपले पंतप्रधान हार्वर्ड चे ग्रॅजुएट असले तरिही) तसेच माझे अमेरिकेतिल मित्र ब्लॉंड्स चे जोक्स इमेल ने पाठवतात. ..असो. .

मी  रहातो एका हारम मधे, घरात माझ्या व्यतिरिक्त सगळ्या स्त्रियाच आहेत,( बायको+मुली) त्यामुळे घरी जर कोणी हे वाचले तर मात्र नुसती बोंब आहे, अर्थात घरी मी जे काही लिहितो ते कधिच वाचत नाहित म्हणुन तर इतक्या बिनधास्त पणे लिहितोय नां. अहो नाही तर  .. घरी जेवायला पण मिळणार नाही, हे असं काही लिहिलं म्हणुन..

आज मला काय झालंय असं वाटतं कां? हे काय लिहितोय मी.. ? हा लेख सुरु केला तेंव्हा बॅक ऑफ द माइंड एक सौंदर्यवती होती. तिच्या बद्दल बातमी वाचली की तिला एक रेअर बोन मॅरो शी रिलेटेड कॅन्सर झालाय म्हणुन… तेंव्हाच ठरवलं की तिच्या बद्दल लिहायच,पण लेखाची सुरुवात ही अशी झाली. 🙂

तुम्ही आजचा पेपर वाचला असेलच.. लिसा रे या  मॉडेल, अभिनेत्रीला झालेल्या कॅन्सर बद्दल पण सगळं वाचलं असेलंच . .मी इथे तिला झालेल्या कॅन्सरची माहिती देणार नाही- आजचा कुठलाही पेपर उघडा .. दिसेल तिसऱ्या पानावर!!भारतामधे जरी ती एक अभिनेत्री म्हणुन फारसी प्रसिध्द झाली नसली तरिही तिचा वॉटर मधला अभिनय वाखाणण्यासारखा आहे. अवश्य पहा .. टाइम्स ऑफ इंडीयाच्या “टॉप  टेन ब्युटीफुल इंडीयन वुमन” मधे तिचं नावं आहे.

एके ठिकाणी वाचलं की लिसा रे ला न बरा होऊ शकणारा कॅन्सर झालाय आणि तिने तिच्या ब्लॉग वर या बद्दल  लिहिलंय !  सर्च केला आणि तिची साईट आणि ब्लॉग  ^(http://rangmarathiche.com/goto/http://lisaraniray.wordpress.com/2009/09/08/gently-carbonating/)शोधुन काढला. लिसाचे स्वतःवरचे  कॅन्सर झाल्या बद्दलचे पोस्ट वाचले . इतक्या तटस्थ पणे कोणी स्वतःबद्दल लिहुच कसं शकतं??  तिच्या धैर्याची कमाल वाटते. सौंदर्य आणि बुध्दिमत्ता दोन्ही असलेली एक तरुणी म्हणजे लिसा रे, हे तिचा ब्लॉग वाचल्यावर जाणवते.

इतका मोठा जीवघेणा रोग झाला तरी पण तिचा ब्लॉग  ^(http://rangmarathiche.com/goto/http://lisaraniray.wordpress.com/2009/09/08/gently-carbonating/)म्हणजे एक बॅलन्स्ड पोस्ट   आहे.कुठेही तिने स्वतःबद्दल कणव यावी असे लिहिलेले नाही. जे कांही आहे ते.. प्राक्तनात आहे .. असा सुर वाटला त्या पोस्टचा. तिला झालेल्या रोगाबद्दल इतक्या साधी सर्दी ताप आणि फ्लु झाल्याप्रमाणे सरळ आणि सहजपणे लिहिलंय . तिचे पोस्ट वाचतांना तिच्या धैर्याबद्दल खरंच आदर वाटला.

सुर्य प्रकाशाइतकं  स्पष्ट   असतांना, की हा रोग बरा होऊ शकत नाही, लिसाचा मानसिक तोल कुठेही ढासळलेला दिसत नाही. तिने लिहिलंय,  पुर्ण आत्मविश्वास आहे की ती बरी होणार म्हणुन!तिच्या पोस्टवरच्या इतरांच्या कॉमेंट्स पण वाचण्यासारख्या आहेत. लोकं तिला रेकी पासुन तर ऍक्युप्रेशर ते योगा प्रॅक्टिस चा सल्ला देताहेत.

ती अतिशय ब्रेव्ह ,सुंदर आणि बुद्धिमान आहे हे तिचा ब्लॉग वाचल्यावर लक्षात आलं.इतक्या सगळ्या क्वॉलिटीज एकाच स्त्री मधे?? मी हे पोस्ट केवळ ती खुप सुंदर आहे किंवा ती एक अभिनेत्री आहे म्हणुन लिहायला घेतलं नाही, तर तीचा ब्लॉग वाचल्यावर इम्प्रेस झाल्यामुळे हे पोस्ट लिहिलंय.या लेखाच्या सुरुवातिला लिहिलेलं पहिलं स्टेटमेंट हे अगदी खोटं ठरवलेलं दिसलं या अभिनेत्रीने.

एकच प्रार्थना कराविशी वाटते.. गेट वेल सुन..

अंतरंगातले मित्र..

Written by  on June 24, 2020

काही लोकं भेटतात, आणि एकदम जवळचे मित्र कधी होऊन जातात तेच कळत नाही. मैत्री होण्यासाठी रोज भेट होणे किंवा रोज फोनवर गप्पा झाल्याच पाहिजे असं नाही. एखादी लहानशी भेट पण पुरेशी ठरते. कामाच्या संदर्भात मध्यंतरी आसामला आणि मेघालयाला गेलो होतो.

माझी कलकत्ता गौहाती फ्लाईट दुपारची होती . पण काही कारणामुळे रिशेड्य़ुल होऊन संध्याकाळी निघाली. रात्री साधारणपणे ९ वाजता गौहाती ला पोहोचलो. एअर पोर्टला मनोज ( डिलर) आला होता. बाहेर हातामधे फुलांचा गुच्छ घेउन उभा. मला तर लाजल्या सारखं झालं.. असा फुलांचा गुच्छ मला फक्त सेंड ऑफ आणि स्वतःच्या लग्नात मिळाला होता.

मनोज! साधारण पणे ३५ वय असेल, तोंडात कलकत्ता पानाचा तोबरा भरलेला, गोरा रंग, आणि लक्षात रहाणारी गोष्ट म्हणजे हसतमुख चेहेरा. हा माणुस अगदी कायम हसत रहायचा. नमस्कार चमत्कार झाल्यावर आम्ही हॉटेल नंदन ला रवाना झालो.

रुमवर पोहोचल्यावर गप्पा सुरू झाल्या . माझी आणि मनोज ची ही काही तशी पहिली भेट नव्हती. दर वर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला किंवा डीलर मिट ला भेट व्हायची. पण इतक्या गडबडीत  वैयक्तिक संबंध तयार झाले  नव्हते.  खरं तर मी वेस्टर्न रीजन चा माणुस, पण केवळ माझा कलकत्याचा काउंटर पार्ट सुटीवर होता , आणि  कामाची अर्जन्सी होती ,म्हणून मला तिथे जावं लागलं.

ह्या माणसाची  वागणूक  खूप सोज्वळ आणि कल्चर्ड ! अगदी जाणवण्या इतकं  ..  रॉयल चॅलेंज बरोबर गप्पा सुरु झाल्या. म्हंटलं, मनोज भाई, तुम्ही इथे आसाम मधे कधी पासून आलात?

“म्हणाला, माझे वडील इथे आले होते, आणि नंतर इथलेच होऊन राहिले. . पुन्हा एक पुस्ती जोडली, “हम मारवाडी जहां भी जाते है उस जगह कॊ अपना वतन बना लेते है” .

या भागातल्या नक्षल टेररिझम बद्दल बोललो, तर म्हणाला की उल्फा वाले असो किंवा टेररिस्ट असओ , सगळ्यांचा फंडा एकदम एकच आहे,  इथला सगळा बिझिनेस हा मारवाडी समाजाच्याच हातात आहे.  हे उल्फा वाले एखाद्या गावात जाऊन एखाद्या मारवाड्याला सरळ गोळी मारतात आणि  दुसऱ्या दिवशी गावातल्या  इतर मारवाडी व्यावसायीकांनाही   निरोप पाठवतात, की जर जिवंत रहायचं असेल तर पैसे द्या…  पुलिस कुछ कर नही सकती.

असा निरोप आला की आम्ही सगळे जिवाच्या भितीमुळे पैसे देऊन मोकळॆ होतो.  हम भी देते है.. “भैया फिअर इज द की”.. पहले आदमी को जब कुछ कहे बगैर गोली मार दी , तो बाकी सब लोग पैसा दे ही देते है.. कोई किडनॅपिंग नही , कोई मारधाड नही. क्लिन गेम.. और हम बिझिनेस मन ही तो इझिएस्ट प्रे है इनके लिये.

थोडा शॉक बसला.. पण  सावरलो. इथे लोकल असामी लोक फारच गरीब आहेत आणि खालच्या दर्जाची कामं करतात. थोडे फार लोक सरकारी नौकरी मधे आहेत. पण तशी परिस्थीती गंभीरच आहे. दुसऱ्या दिवशीचा म्हणजे त्याच्या फॅक्टरीला जाण्याचा प्लॅन करुन तो निघुन गेला. पण मला विचारात टाकुन… भारतामधला एक भाग.. ज्या बद्दल ना सरकारला काही काळजी आहे ना जनतेला.. तेंव्हा ह्या उल्फा च्या लोकांचं अघोषित राज्य आहे तिथे.

ही परिस्थिती आसाम ची .. नागालँड बद्दल तर न बोललेलेच बरे! तिथली राज्य भाषा इंग्रजी. चेहेरा पट्टी मंगोलियन्स स्टाइलची , त्यामुळे ते  भारतीय असूनही परदेशी वाटतात. ते लोक तूम्हाल विचारतात, आप इंडीयासे आये है क्या…??  काय बोलणार? ह्या लोकांना पण ते  स्वतः भारतीय  आहेत असे वाटत नाही! ना शासनाचे लक्ष ना  कुठल्याही प्रकारे त्यांचे शासना मधे कॉंट्रिब्युशन  .

काही कंपन्या आपले प्रॉडक्टस इथे विकायला तयार नसतात आणि विकले तरी वॉरंटी सर्विस मिळणार नाही असे स्पष्ट लिहिले असते वॉरंटी टर्म्स मधे. दोन वर्षापूर्वी क्रॉंप्टन ग्रिव्ह्ज च्या सर्व्हीस इंजिनिअरला किडनॅप करून काही लाखांची मागणी केली होती. कंपनीने पैसे दिले नाहीत म्हणून त्याला हाल हाल करून मारले . तेंव्हा पासून त्यांचं ऑफिस बंद करून टाकलं आणि तिथल्या इंजिनिअरला पण परत बोलावून घेतलं.

गौहाती हा असा भाग आहे की त्या भागापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवायची म्हणजे नॉर्थ बंगालला पुर्ण वळसा घालुनच जावं लागतं-मध्ये बांगला देश  असल्यामुळे. हे इतकं अंतर  रस्त्याने कापणं तसं   तसं अवघडच.. कारण सगळा हिमालयातला दऱ्या खोऱ्यात ला रस्ता.. पुण्याहून ट्रक निघाला तर कमीत कमी १० दिवस तरी लागणारच पोहोचायला. आणि पुन्हा प्रवासातले   इतर धोके आहेतच.  फक्त हेच टाळण्यासाठी तिथे त्याने जनरेटर्स असेंब्ली ची फॅक्टरी उघडली . केवळ इंजिन, अल्टरनेटर चे ट्रान्सपोर्टेशन केले आणि लोकल असेंब्ली केली तर ट्रान्सपोर्टेशन चा बराच खर्च वाचतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज आला आणि म्हणाला, चलो सर आपकॊ माताजीके दर्शन कराता हु.. म्हणुन देवी ला गेलॊ . लहान गावातला फायदा म्हणजे, इतकी मोठी रांग असूनही मनोज च्या मुळे ५ मिनिटात दर्शन घेउन आम्ही बाहेर पडलो.

डीजी सेट्स ची सिओपी  म्हणजे सेंट्रल पोल्युशन बोर्डाच्या माणसांकडुन कन्फर्मेशन ऑफ प्रॉडक्शन चे इन्स्पेक्शन असते, ते होते. आमच्या डीलर ची फॅक्टरी गौहाती पासून ३० किमी अंतरावर असेल . बरं कॅंपस पण अगदी रिझर्व पोलिस फोर्स च्या स्पेशल एरिया मधे. तिथे पोहोचताना जागोजागी बॅरियर्स लागले होते. शेवटच्या बॅरियर पासुन १०० मिटर अंतरावर त्यांची शेड असेल.

मनोजचा फॅक्टरी इंचार्ज म्हणजे फुकन. हा एक लोकल माणुस. दिसायला अगदी  पक्का आदिवासी !  त्यामुळे जरी चांगले कपडे घातले असले तरीही त्याच्याकडे पाहिले की संशय   यायचा की हा उल्फा वाला तर नाही? बरं हे केवळ मलाच वाटलं असं नाही, दुपारी आम्ही जेंव्हा काझिरंगाला निघालो तेंव्हा प्रत्येक चेक पोस्ट वर याला खाली उतरवुन तपासणी करण्यात आली.

त्याची कामाची तयारी पाहिली आणि तेवढ्यात शेवटच्या गेट जवळ मोठा फटाका फुटल्या सारखा आवाज आला. आम्ही जाउन पाहिलं तर सिक्युरिटी वाला जखमी होऊन पडला होता. गावठी बॉंब चा स्फोट झाला होता. सगळे खिळे , छर्रे इकडे तिकडे पडलेले दिसत होते. सिआरपिएफ ची  कॉलनी असल्याने ५च मिनिटात मिलिट्री पोलीस आले. नया आदमी कौन है म्हणून माझ्याकडे बोट दाखवून चौकशी सुरू झाली. पण मनोज ने सांभाळून घेतले.. माझं निसर्ग सौंदर्याने भारावलेले मन एकदम वास्तवात आलं आणि वाटलं  की  नकॊ हे सुंदर हिमालय, आपलं चिपचिप वातावरण असलेलं मुंबईच बरं..

केवळ दोन दिवसांचा सहवास, पण मनोज एकदम  अंत रंगातला मित्र झाला होता. जेंव्हा कधी मुंबईला पाउस पडतो, किंवा २६/११ सारख्या प्रसंगी त्याचा फोन हमखास असतो. सब कुशल मंगल है ना?? असा सदा परिचित हसऱ्या आवाजात विचारतो. तसेच प्रत्येक सणाला एक एस एम एस ठरलेला.. आणि प्रत्येक वेळी फोन ठेवतांना म्हणणार… ’सरजी.. भाभीजी और बच्चॊको लेके जरुर जरुर आना.”.