kanchan chavan

kanchan chavan

२० वर्षांपुर्वी आणि आज…!(२)

Written by  on May 4, 2020

काल पासून त्या काळी असणाऱ्या टिव्ही चं नांव आठवतोय. आज आठवलं ते. म्हणून कालचेच पोस्ट पुढे सुरु ठेवतोय  .  इसी टीव्ही आणि दुसरे म्हणजे डायोनारा टीव्ही त्या काळी  फार पॉप्युलर होते . नंतर अपट्रॉन टिव्ही पण  आला होता, हा टिव्ही उत्तर प्रदेश सरकारच्या अंडरटेकिंग वाल्या फॅक्ट्रीत तयार व्हायचा.आणि हेच नांव कांही केल्या मला आठवत नव्हतं कालपासून. आता लिहायला बसलो तेंव्हा आठवलं.

नंतर कांही काळाने बुश टिव्ही वगैरे पण मार्केटला आले. पण त्या रेडीओ सदृष्य टिव्हीच्या काळात अबाधित राज्य केलं ते डायोनारा आणि इसी टिव्ही ने. त्याला रेडिओ सदृश्य म्हणण्याचे कारण हे की ते टिव्ही म्हणजे व्हॉव्हच्या रेडीओ सदृश्य दिसायचा. आमच्या घरी पाय कंपनीचा रेडीओ होता– रेडियो ची आठवण यायची या टीव्ही कडे पाहिलं म्हणजे..टीव्ही म्हणजे एक प्राईड पझेशन असायचं. सौ. चा एक फोटॊ आहे ’टिव्ही सोबत’(!) ती लहान असतानाचा. खरंच!!!

हिंदी बातम्याचं वाचन करणारी एकच बाई होती ती म्हणजे सलमा सुलताना. मराठीत भक्ती ताई होती. मला भक्ती बर्वे बातम्या द्यायला आली की तिने सरळ बातम्या सांगणे बंद करुन ती फुलराणी मधला तो प्रसिद्ध प्रवेश करुन दाखवावा असे वाटायचे. इतक्या जणी होऊन गेल्या पण भक्ती सारखा तो प्रवेश कोणीच सादर केलेला नाही. नुकताच , एका ठिकाणी सुप्रिया पिळगांवकर ने हा प्रवेश सादर केला होता, तेंव्हा वाटलं की हो.. हीच ती फुल राणी…

त्या दिवसात  आमच्या घरी आम्ही सगळॆ जण नेट लावतो म्हणजे  याचा अर्थ असा होता, की आम्ही सगळॆ मच्छरदाणी लावून झोपतो 🙂 नेट म्हणजे इंटरनेट हे कुणालाच माहिती नव्हतं.. मॉस्क्युटॊ रिपेलंट म्हणजे कछुवा छाप मच्छर अगरबत्ती. त्याच्या धुराची मला तरी ऍलर्जीच होती. तरी पण आमचं गांव डासांचं शहर, म्हणून   कछुवा लावावाच लागायचा.

मच्छरदाणितला एक मच्छर हा मच्छरदाणीच्या बाहेरच्या डझनभर मच्छरांपेक्षा पण जास्त डेंजरस असतो, हा शोध लावण्याचे दिवस तेच होते. विदर्भात यवतमाळ, अमरावती हे जिल्हे म्हणजे डांसांचे माहेरघर असलेले जिल्हे होते.

राजीव गांधी यांचे फक्त नाव फक्त ऐकलेले होते. आम्हाला फक्त इतकंच ठाऊक होतं की इंदिरा गांधींचा एक मुलगा आहे — जो पायलट आहे, आणि त्याची बायकॊ एक फॉरिनर आहे. बस्स! संजय गांधी अगदी फॉर्म मधे होता आणि राजीव गांधी मात्र अगदी लो प्रोफाइल घेउन होते. असं कधीच वाटलं नव्हतं की  राजीव गांधी हे कधी पंतप्रधान होतील म्हणून. .

रेडीमेड कपडे घालण्याचे दिवस नव्हते ते. सगळेच लोकं कपडे शिंप्याकडे शिवून घालायचे. बेल बॉटम पॅंट मधे पँट चा बॉटम अगदी ४० पर्यंत असायचा. मला आठवतं माझ्या एका मित्राने ४४ बॉटमची पॅंट शिवली होती. कांही मुलं पण हाय हिल्स ची चप्पल घालायचे .

सगळेच सिनेमे हे लॉस्ट ऍंड फाउंड या थिम वर अवलंबून असायचे. प्रकाश मेहेरा वगैरे मंडळी खूपच पॉप्युलर होती. आरडी बर्मन ची गाणी ऐकणं म्हणजे अगदी कुल समजलं जायचं. ऋषी कपूर चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध होता. मल्टिप्लेक्स वगैरे कांही नव्हते. आणि प्रत्येक सिनेमा पहिले कांही दिवस तरी नक्कीच हाउस फुल्ल असायचा.

नवीन सिनेमा आला, की एक रिक्षा किंवा टांगा गांवभर ऍडव्हर्टाइझ करित फिरायचा. त्यावरच्या लाउडस्पिकर वर ” आपके अपने राजकमल टॉकिज मे … धर्मेंद्र और जितेंद्र का… धमाकेदार पेशकश.. रोजाना ४ खेल.. ” अशा जाहिराती करित तो रिक्षा गावभर फिरायचा. सोबतच एक ३ बाय ६ च्या साइझ चं ऍडव्हर्टायज ऑफ्सेट वर प्रिंट केलेले उधळीत जायचा तो रिक्षा/टांगा वाला, आणि मुलं त्याच्या मागे धावायची ते पॅम्प्लेट घ्यायला. ( मी पण असायचॊ त्या मुलांमधे:) )

कांही चित्रपटाचे तर अगदी सकाळी सहा वाजल्यापासून खेळ सुरू व्हायचे. जे अगदी सिनेमाचे खास वेडे चाहते होते ते सकाळच्या ६ च्या शो ला पण जायचे. मला आठवते की मी फिरोझखानचा कुठलाही चित्रपट अगदी फर्स्ट शो चुकवत नसे.खोटे सिक्के मी सकाळी ६ वाजता जाउन बघितला होता. घरुन निघतांना टॉवेल घेउन घरुन निघालो होतो, पोहायला जातो म्हणुन सांगुन.. 🙂 मी खुप बदमाश होतो ना?? हा माझा एक फेवरेट पिक्चर..

फिरोझ खानच्या चित्रपटात व्हिक्टर ह्युगो मोंटॅंग्रॊ च्या ट्युन्स असायच्या. तुम्ही क्लिंट इस्ट्वुड चे सिनेमे पाहिले आहेत कां? गुड बॅड ऍंड अगली, किंगा फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर?? त्यातल्या सगळ्या ट्य़ुन्स विह्क्टर्च्या आहेत. माझ्या कडे त्याची एल पी आहे अजुनही.. 🙂  क्लिंट इस्ट वुड , क्रेझी बॉइज, पोलिस ऍकेडमी हे माझे आवडते चित्रपट. आजही माझ्या लॅप टॉप मधे पोलिस ऍकेडमी चे सगळे भाग सेव्ह करुन ठेवलेले आहेत. वेळ मिळेल तेंव्हा पहातो. ह्या सिनेमात कांही सिंगल एक्स रेटेस सिन्स असल्यामुळे घरी पहाता येत नाही. पण तेवढं सोडलं तर पिक्चर्स एकदम मस्तं..

बरं त्या काळी फिरोझखानच्या सिनेमात ( ज्यांचं शूटींग नेहेमी फॉरिनला व्हायचं) त्यात तो कार मधल्या फोनवरुन बोलतांना दाखवायचे. तेंव्हा हा प्रश्न पडायचा की हे कसं शक्य आहे? वायर तर नाही फोनला? हा काय ट्रान्समिटर आहे कां? मोबाइल फोन म्हणजे अगदी कल्पनातित होता. कॉर्डलेस फोनला मोबाइल फोन म्हंटलं जायचं. आणि फोन घरी असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण असायचं. दोन किंवा तिन आकडी फोन नंबर असायचे. फारच झालं तर चार आकडी..

परदेशी जाण्याला म्हणायचे   फॉरिनला जाणं.. आणि त्यासाठी मिळायचे केवळ ५०० डॉलर्स. जास्त पैसे हवे असतील तर ते मनी एक्स्चेंजर कडुन ब्लॅकने घ्यावे लागायचे. आजकाल हवे तेवढे पैसे नेऊन खर्च करता येतात. खूप फरक पडलाय या कांही वर्षात.

इफ यू आर होमोसिपियन, मिन्स यू आर अ लायर

Written by  on May 3, 2020

micro compiledतुम्ही कोणाशी तरी बोलताय, काही तरी महत्त्वाचं सांगताय, पण समोरचा माणूस तुमचे बोलणे किती सिरियसली घेतोय ? त्याला राग तर येत नाही ना? की त्याला आवडतंय आपलं बोलणं? हे असे प्रश्न नेहेमीच डोक्यात येत असतात . याचं उत्तर मिळालं असतं तर? असं म्हणतात, की प्रत्येक माणूस दर दहा मिनिटात एकदा तरी खोटं बोलतोच. असं म्हणतात, की ” मस्जिद मे बैठके पिने दो, नही तो वो जगह बताओ, जहा खुदा ना हो” अगदी त्याच धर्तीवर ,  “मला खॊटं न बोलणारा माणूस दाखवा  किंवा सगळेच खोटं  बोलतात हे मान्य करा असं म्हणावसे वाटतंय”.

इंग्लिश टिव्ही सिरीज पहाणे हा माझा छंद आहे. सध्या तर रिकामा वेळ असला की कुठली तरी एखादी  सिरीज टोरंट वरून डाउन लोड करून पहात असतो मी . काही वर्षापूर्वी  ’लाय टू मी’ ही टिव्ही सिरीज सुरु झाली होती .  मला मनापासून आवडलेल्या  टिव्ही सिरीज पैकी ही एक . टिव्ही सिरीज आवडायचे कारण तरी काय बरं असेल? कशावर  सिरीज आहे ही?  तुम्ही कोणीही असा, हाऊस वाईफ, विद्यार्थी, किंवा टेररिस्ट, तुमच्या रिअ‍ॅक्शन्स, किंवा चेहऱ्यावरचे मायक्रो एक्स्प्रेशन्स  अगदी सारखेच असतात- ही ह्या सिरीज ची थिम आहे.

सुरुवातीला  म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी जेंव्हा मी पहिला सिझन डाउनलोड करून पाहिला, तेंव्हा  सौ. बरोबर गप्पा मारतांना या सिरीज बद्दल बोललो, तर ती म्हणाली, की कदाचित हे सगळं काल्पनिक असेल, हे काही शक्य असेल असे मला वाटत नाही, किंवा हे जरी शास्त्र असेल तरी पण इतकं सोपं नसावं -कसल्या शास्त्राबद्दल लिहितोय मी इथे?

या टिव्ही सिरीजचा हिरो म्हणजे डॉ. कॅल लाइटमन! ह्याचे काम  म्हणजे  कोण खोटं बोलतोय ते केवळ बॉडी लॅंग्वेज वरून ओळखायचे. . एखादी व्यक्ती तुम्हाला काही तरी सांगते आहे, आणि तुम्ही ते ऐकत असतांना तुमहाला त्या गोष्टीबद्दल काय वाटतं हे भाव तुम्ही तुमच्या नकळत चेहेऱ्यावर मायक्रो एक्स्प्रेशन्स मधे दाखवत असता, आणी त्यावर तुमचा काहीच कंट्रोल नसतो, हे मूळ तत्त्व आहे या सिरीजचे. तुम्ही जेंव्हा खोटं बोलता, खरं बोलता, घृणा वाटते, प्रेम वाटते ,भीती वाटते, तेंव्हा हे सगळे भाव तुमच्या नकळत तुमच्या चेहेऱ्यावर क्षणभरासाठी का होईना,  दिसून येतात, कदाचित तुम्ही स्वतःला सावरून चेहेरा निर्विकार कराल, पण  तुमच्या मनातले खरे भाव हे अगदी काही सेकंदासाठी  तरी  तुमच्या कंट्रोल मधे नसतात.  या मायक्रो एक्स्प्रेशन्सचा आधार घेऊन कॅल लाइटमन हा गुन्हे शोधण्य़ा साठी ह्युमन लाय डिटेक्टर चं काम करत असतो.

पहिल्या  सिझन मधे कॅल लाइटमॅन चेहेऱ्या वरच्या बारीक अगदी लहान म्हणजे   मायक्रो एक्स्प्रेशनचे   विश्लेषण   करून दाखवतो  . त्याने   केलेले     ऍनॅलिसिस इतके साधे सरळ आणि सोपे आहे की   तो सिझन  संपे पर्यंत आपणही    आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहेऱ्या वर येणाऱ्या मायक्रो एक्स्प्रेशन्स कडे लक्ष देऊन   समोरची   व्यक्ती   खरं बोलते आहे की  खोटं?   हे शोधण्याचा प्रयत्न करू लागतो .  इतरांचे फेसबुक वरचे वगैरे  फोटो पाहिल्यावर त्यातले खरे भाव काय आहेत ? समोरचा माणूस खरंच आनंदी आहे  की उगीच हसतोय ? याचा अंदाज बांधणे सुरु होते.

कॅल लाइटमॅन चा   डाय हार्ड फॅन झालोय मी. ह्या सिरीज चे आज पर्यन्त तीन सिझन झाले आहेत- सगळॆ टोरंट वर उपलब्ध आहेत. तिन्ही सिझन्स नक्कीच छान आहेत, पण पहिला सिझन मात्र एकदम मेस्मराइझ करून टाकणारा आहे.

डॉ. कॅल लाइटमॅन हे पात्र अगदी आपल्यातलंच वाटावं, इतकं साधं सरळ दाखवलं आहे . असा कोणीतरी असायलाच हवा की  ज्यावरून ही सिरीज तयार केली आहे असे वाटत होते, म्हणून नेट वर शोधले, तर  खरोखरच  ’पॉल एकमॅन’ नावाचा एक माणूस सापडला. पॉल चे काही व्हिडीओज नेट वर आहेत, पण त्या पेक्षा कॅल जास्त जवळचा वाटला मला.

इथे  वर जे  काही चित्र देतोय, नेट वरून घेतलेले , त्या वरून हे अ‍ॅनॅलिसीस कसे करायचे याचा अंदाज येईल. तरी  थोडी  माहिती खाली देतोय.

चूक मान्य करणे. गिल्टी चेहेरा. कदाचित व्यक्ती बोलणार नाही, पण असा चेहेरा दिसला की गिल्टी आहे हे मान्य केले आहे असे समजा.

चूक मान्य करणे. गिल्टी चेहेरा. कदाचित व्यक्ती बोलणार नाही, पण असा चेहेरा दिसला की गिल्टी आहे हे मान्य केले आहे असे समजा.

ही सिरीज पहातांना काही खास क्यु   लक्षात आले. म्हणजे जर एखादा माणूस तुमच्याशी बोलतांना नजरेला नजर   भिडवून बोलत असेल ( विनाकारण) तर नक्की समजा की तो खोटं बोलतोय.  त्याचं विनाकारण नजरेला नजर भिडवणे हे केवळ तो जे खोटं बोलतोय त्यावर तुमचा किती विश्वास आहे हे पहाण्यासाठी असते.

एखादी गोष्ट सांगतांना किंवा ऐकतांना समोरच्या माणसाच्या कपाळावर दोन उभ्या  आठ्या दिसल्या तर त्याचा अर्थ म्हणजे त्या समोरच्या  व्यक्तीला चिंता वाटते आहे .

लज्जा.. शेम..

लज्जा.. शेम..

समोरच्या व्यक्तीच्या कपाळावर  आडव्या आठ्या  पडल्या   आणि त्याने डोक्याला/कपाळाला हात लावत असेल तर   शेम- लज्जा दर्शवते. बिल क्लिंटन हीच पोज घेऊन बसला होता मोनिका लेवेन्स्की च्या केस च्या वेळेस. 🙂

जेंव्हा अगदी मनापासून आणि खरं खरं कोणी हसतो तेंव्हा डोळ्याखाली किंचित सुरकुत्या पडतात,  याचे कारण म्हणजे गालाचा उंचवटा  ( चिक बोन)थोडा वर उचलला जातो, पण हेच जर फेक स्माइल  असेल तर त्या सुरकुत्या दिसत नाहीत.

खोटं बोलणे, स्वतः   जे बोलतोय त्यावर विश्वास नसणे

खोटं बोलणे, स्वतः जे बोलतोय त्यावर विश्वास नसणे

जर एखादी व्यक्ती बोलतांना माउथ श्रग ( मराठी मधे काय म्हणतात याला? चंबू करणॆ?) करत असेल तर तो नक्की खोटं बोलतोय असं समजा. स्वतःच्या शब्दावर अजिबात  विश्वास नसणारी व्यक्तीचे पण असेच हावभाव दिसून येतात.

तोंड वाकडे करणे म्हणण्यापेक्षा ओठाचा एका बाजूचा कोपरा वाकडा करणे, हे असे बहुतेक कोणी समोरची व्यक्ती जे काही सांगते आहे, ते पटत नसेल तर , पण त्याला तुम्ही ते सांगू शकत नसाल तर केले जाते. थोडक्यात समोरचा माणूस मूर्ख आहे    अशी भावना दर्शवणे. समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काही तरी सांगितले, आणि ते खोटे निघाले, की हा  असा चेहेरा केला जातो
.
बोलता बोलता मानेला/कानाला/गळ्याला  हात लावणे हे खोटे बोलण्याचे लक्षण आहे.

घृणा

घृणा

दुःखी व्यक्ती तर अगदी सहज ओळखता येते. डोळ्याच्या पापण्या किंचीत जड झालेल्या, ओठ किंचित उतरल्यासारखे दिसतात अशा व्यक्तीचे.

बरेचदा तुम्ही एखादी  उत्कंठावर्धक गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगता, पण तिला खरंच आश्चर्य वाटल असेल तर त्या व्यक्तीच्या भुवया किंचित उचलल्या जातील, ओठ विलग झालेले, आणि डोळे विस्फारलेले दिसतील.

घाबरणे:-भुवया उंचावलेल्या , पण चेहेरा हसरा, डोळे डायेलेट झालेले.

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घॄणा, ही भावना दिसायला खूप सोपी असते, चेहेऱ्यावर क्षणभरच येऊन लगेच नाहीशी होऊ शकते. ओठाचा कडेने चेहेरा वाकडा होणे, बस मधे एखादा पुरुष स्त्री च्या जवळ जवळ करायला लागला की हे असे भाव नेहेमीच दिसतात .

हे सगळं विश्लेषण एका टिव्ही सिरीज वर केलंय. आता एखाद्या सिरीज वर का विश्वास ठेवावा? तर  याचे कारण म्हणजे  कॅल लाइटमन हे पात्र एका खऱ्या व्यक्तीरेखेवरून बेतलेले आहे. त्याचे नाव आहे ’पॉल एकमॅ”! हे शास्त्र खरे आहे की नाही हे माहिती नाही, पण ही टिव्ही सिरीज मात्र एकदम अफलातून आहे, आणि माझे अंदाज तर हल्ली अगदी बरोबर निघतात. मस्ट ्वॉच धिस! तर चला डाउनलोड सुरु  करा लवकर. या पूर्वी पण एक लेख लिहिला होता बॉडी लॅंग्वेज वर.. तो इथे आहे. ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2009/04/29/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9C/)

माझं बॅचलर लाइफ…(४)

Written by  on May 3, 2020

बिहारमधे दोन प्रकारच्या माइन्स असतात. एक म्हणजे ओपन कास्ट  आणि दुसरी म्हणजे अंडर ग्राउंड. अंडरग्राउंड माइन्स तुम्ही सगळ्यांनी अमिताभ बच्चन च्या सिनेमा मधे  पाहिली असेलच. नांव आठवत नाही आता, पण त्या मधे शत्रुघ्न सिन्हा आणि शशी कपुर वगैरे होते. अंडरग्राउंड माइन्स  मधे कुठे आणि कसं डिप जायचं ते सगळं जमिनिचा स्टॅटा पाहुन ठरवलेलं असतं. आतला भाग कोसळू नये म्हणुन रुफ बोल्टींग सिस्टीम वापरुन टनेल ला स्ट्रेंथन केलेलं असतं. ह्या प्रकारच्या माइन्स मधे मिथेन मुळे धोका असतो.

ओपन कास्ट माइन्स हा हल्ली खुप पॉप्युलर झालेला प्रकार आहे. जेंव्हा कोळसा जमिनिच्या वरच्या थरापासुन जास्त खोल नसतो तेंव्हा वरची सगळी माती , दगड, खडक, फोडून मग खालचा कोळसा एक्स्पोझ करुन माइनिंग केलं जातं. ह्या प्रकारामधे आऊटपुट खुपच जास्त असतं कारण हेवी मशिनरीज चा उपयोग केला जातो एक्स्कॅव्हेशन साठी.वरची माती काढली की मग खोल खड्ड्यामधे बरंच ग्राउंड वॉटर जमा होतं. त्या करिता डिवॉटरिंग पंप्स बसवले असतात. पावसाळ्यात इलेक्ट्रिक डिवॉटरिंग पंप्स पाण्यात बुडले की मग डिझल पंप्स सुरु केले जातात. माइन्स मधलं पाणी काढायला.

हे सगळं सांगण्याचं कारण?? ओपन कास्ट माइन्स मधे जमिनिला ड्रिलिंग करतात रॉक रोलर बिट्स ने आणि मग त्यामधे एक्सप्लोझिव्ह्ज भरुन नंतर ब्लास्ट केलं जातं . ब्लास्टींग केल्यानंतर निघालेला कोळसा डम्पर्स वापरुन लोडींग पॉइंट ला ट्रान्सफर केला जातो. ब्लास्टींग करता या लोकांना भरपुर एक्स्प्लोझिव्ह्ज लागतात. इथे स्टॉकमधले डिटोनेटर्स वापरुन फिशिंग करण्याचं प्रमाणही खुप दिसलं.

डीटोनेटर ला इलेक्ट्रिक सप्लाय दिला की तो ब्लास्ट होतो. एखाद्या तलावामधे डिटोनेटर टाकुन त्याला ब्लास्ट केलं की मग भरपुर मासळी मरुन पाण्यावर तरंगायला लागते. अर्थात हे लिगली आलाउड नाही. पण अगदी सर्ररास अशा तर्हेने फिशिंग करणं बिहारात कॉमन होतं…! अशा प्रकारे केलेल्या फिशिंग मधे खुप मासे विनाकारण मारले जातात. जे मासे डॅमेज होतात ब्लास्ट मधे ते पाण्यात तसेच राहु दिले जातात- इतर माशांना खाण्यासाठी.आसनसोलला असतांनाचा एकदा हेड ऑफिसमधुन फोन आला की ताबडतोब कलकत्त्याला निघ. म्हणुन ताबडतोब दुसऱ्या दिवशी सकाळच्या ट्रेनने निघालो . दुपारी कलकत्त्याला पोहोचलो. रिजनल ऑफिसच्या ए एस एम ने सांगितले की मला  दार्जीलिंग डूवाट्झ टी गार्डन्स ला जायचं आहे.

ह्या टी गार्डन्स मधे (प्लॅंटर्स म्हणतात त्यांच्या मॅनेजर्सला) जाण्याची ही माझी पहिलिच वेळ होती. किंबहुना दार्जिलिंगला जाण्याचिच पहिली वेळ होती. एअरपोर्ट होता बागडोगऱयाला . जेंव्हा तिथे पोहोचलो, तेंव्हा कळलं की बा बागडोगरा अगदी सेंटरला आहे दार्जलिंग आणि सिलिगुडी च्या मधे.एकदम मन उदास झालं.. अरे? दार्जिलिंगला नाही जायचं तर..  😦 सिलिगुडीच्या पुढे भुतान च्या सिमेवर एक टी गार्डन आहे तिथे जायचं होतं. एअर पोर्टला टॅक्सी आली होती टी गार्डनची. हा माझा हिमालयातला पहिला प्रवास.. म्हणुन लक्षात राहिला.

गाडीत मागे बसलो होतो. सोबतंच एक टी गार्डनचा मॅनेजर आला होता रिसिव्ह करायला. टी गार्डन म्हणजे एक सेल्फ कंटॆंड एरिया असतो. तिथे  रहाण्यासाठी हॉटेल्स वगैरे नसतात. रहाण्याची सोय एका मॅनेजरच्या घरामधेच करण्यात आली होती. मोठे बंगले आहेत अजुनही ब्रिटीश कालिन. एका गेस्ट रुम मधे मला ठेवण्यात आलं. ब्रेक फास्ट ते डिनर, त्या मॅनेजरच्याच घरी.

मी ज्याच्या घरी उतरलो होतो, तो म्हणजे अग्रवाल. खुप छान होता स्वभावाने. आपल्या सारखे कल्चर्ड लोकं तिथे गेले की त्यांना आनंद होतो. आणी पुनासे आया किंवा बॉंबे से आया म्हंटलं की त्यांना तर अगदी आदराचे भरते येते. या गार्डन मॅनेजर्सचा पगार पण खुप असतो. नसतं ते फक्त सोशल लाइफ. हे लोकं आपली मुलं दार्जिलिंगच्या महागडया शाळांत शिकवतात.

टी गार्डन्स मधे एक पद्धत आहे. एकदा सिझन संपला की हे लोकं सगळ्या मशिनरिजचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करुन ठेवतात . मग गरज असो की नसो, प्रत्येक इंजिन उघडून सगळे पार्टस चेक करुन परत असेम्ब्ली करायची. मला तर मुर्ख पणाच वाटला. पण कंपनिला स्पेअर्सचा धंदा मिळतो म्हणुन निमुटपणे कस्टमरचया इच्छेप्रमाणे कामं केली जातात.

टी गार्डन्स मधे एक बामन डांगा टोंडू टी ईस्टेट अगदी लक्षात राहिली होती. तिथला मॅनेजर अग्रवाल आणि मी अगदी मस्त दोस्ती झाली होती. २१ दिवस होतो त्याच्या गार्डनमधे. आमच्या आवडी.. म्हणजे वाचन.. अगदी मस्त जुळायच्या. माझ्या बॅगेतलं त्याने व्हेअर इगल डेअर्स बघितलं आणि, आशाळभुत पणे त्याच्याकडे पहायला लागला. माझ्या लक्षात आली त्याची नजर.. लगेच काढुन त्याला दिलं आणि म्हंट्लं माझं झालंय वाचुन.. . आयर्विंग वॅलेसच्या फॅन क्लब चा तो फॅन होता.. माझ्या प्रमाणेच.. ते पुस्तकं तेवढ्यातंच निघालं होतं.  माझी सगळी वाचुन झालेली पुस्तकं त्याला दिली आणी त्याच्या खजिन्यामधली न वाचलेली मी घेतली. त्या मधे एक केन ऍंड एबल आणी प्रॉडिगल डॉटर पण होतं..

टी गार्डन मधे त्या दिवसांत नक्षलवादी मुव्हमेंटचा इंपॅक्ट अजुन आलेला नव्हता. त्या मुळे टी गार्डनचा ’बरा साब’ म्हणजे मॅनेजर अक्षरशः राजा सारखा रहात होता. मोठ्ठा बंगला, आणि प्लॅंटेशन ची जबाबदारी. तिथे तो अगदी ’जे वाट्टेल ते’ करु शकत असायचा. जास्त डिटेल्स लिहित नाही.

टी गार्डन्स हे हिमालयात उतारावर असायचे. कांही गार्डन्स ऑर्गनाइझ्ड सेक्टर चे होते, आणि कांही प्रायव्हेट सेक्टरचे. प्रायव्हेट सेक्टरच्या टी गार्डन्स मधे दोन प्रकारचा चहा निर्माण व्हायचा. कांही ठिकाणी सिटीसी म्हणजे कट, टिअर, ऍंड कर्ल.. म्हणजे आपण जो नेहेमी दाणेदार चहा विकत आणतो तो आणि दुसरा म्हणजे ऑर्थोडॉक्स , ह्यामधे प्रत्येक पान वाती वळल्या प्रमाणे वळले जाते -अर्थात मशिन्सने आणि नंतर मग गरम पाण्यात टाकला , की ती पानं उमलतात.  बरं आता जास्त डीटेल लिहित नाही.

चहाची झाडं आपण पहातो ती असतात २-३ फुट उंचिची. खरं तर ही झाडं म्हणजे बोन्साय केलेली असतात. जर तुम्ही झाडं कापली नाहित तर त्यांची उंची एखाद्या चिंचेच्या झाडाएवढी होऊ शकते. मी स्वतः असं मोठं झालेलं चहाचं झाड पाहिलं आहे.

रानटी हत्ती पण ह्या लोकांच्या ( म्हणजे कामगारांच्या ) वस्ती मधे यायचे. इथे लोकं तांदुळाची दारु बनवतात. त्याला हाडीया असं नांव आहे. हत्तीला या दारुचा वास आला की ते तिकडे जाउन तोडफोड करतात. हत्तीला दारु आवडते..?? हा एक नविन शोध लागला होता मला. कधीतरी एखादा चिता पण दिसायचा. रान कोल्हे तर हमखास रस्त्यावरुन आडवे जायचे.

हे टी गार्डन तिन्हि बाजुने हिमालयाने वेढलेले होते. आणि चौथी बाजू होती, त्या साइडला डायना रिव्हर वहात होती.पावसाळ्यात नदी ला पुर आला की मग मात्र उर्वरित जगाशी दळणवळण ठप्प व्हायचं इतर वेळी तिथे एक कामचलाउ पुल बांधलेला असायचा, पण पावसाळ्यात तो वाहुन जायचा.

एकदा या भागात कामासाठी तुम्ही गेलात, की कमित कमी दोन महिने तरी परत येता येत नसे इतकं काम असायचं. या दोन महिन्यांच्या काळात माझा  हा सगळा भाग  पाहुन झाला होता. इथे लवकर होणारी सकाळ, आणि संध्याकाळी ४ वाजता पडणारा अंधार अगदी वेड लावायचा. कांही तरी विचित्र वातावरण होतं. मला अगदी धुलाबारी पर्यंत जावं लागायचं.

धुलाबारी म्हणजे नेपाळ आणि भारताच्या सिमेवरचं गांव. तसं ते गांव नेपाळात येतं, पण तिथे  बॉर्डर वर तेंव्हा इम्पोर्टेड गुड्स ची दुकानं होती. मी तिथुन कांहीच आणलं नाही ,पण एकदा जाउन मात्र आलो तिथे.  जस्ट मार्केट बघायला !

माझं स्पष्ट मत आहे, या भागात यावं ते फक्त साईट सिइंग साठी.. कामासाठी नाही.. अगदी १०० टक्के तुम्ही इथे बोअर होणार.. कांहीच एंटरटेनमेंट नाही. या गार्डन्स मधे मग हे प्लॅंटर्स रात्री क्लबिंग करतात. पत्ते, कॅरम आणि इतर खेळ चालतात. मी आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा पुल टेबल इथे पाहिला होता.

एक गोष्ट आहे, ती म्हणजे , ही गार्डन्स सगळी सारखीच.. !इथेच कलकत्याला असतांना एकदा मला कुच बिहारला जायला सांगितलं होतं, तो प्रसंग आधीच एकदा लिहिलेला आहे.  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/05/11/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AB%E2%80%A6%E0%A5%AA/?preview=true&preview_id=2584&preview_nonce=d493bd2b24)पुनरावृत्ती टाळतो.

मला हल्ली एक जाणवतंय की माझं मराठी आता जास्त सुबक होत चाललंय. इंग्रजी शब्दांचा वापर कमी होतोय. कदाचित प्रॅक्टिस मुळे असेल. ब्लॉग लिहिण्याचा हा पण एक फायदा.

असे आठवणित रहाण्यासारखे बरेच प्रसंग आहेत. आपल्या इथे कांही कंपन्या आहेत ( भारत शासनाच्या अंतर्गत) मुखत्वे करुन आय बि एम.. ( इंडियन ब्युरो ऑफ माइन्स- मल वाटलंच आय बि एम म्हंटलं की तुमच्या डोक्यात काही वेगळं येणार म्हणुन इथे क्लिअर करतोय) एम ई सी एल, ( मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पो लि) किंवा मॉयल.. (  मॅंगनिझ ओअर इंडीया लि. ) ही नांवं केवळ, नमुन्या दाखल देतोय.

अशा बऱ्याच कंपन्या होत्या की ज्यांच्याकडे अगदी बाबा आदम च्या जमान्यातल्या मशिनरीज पहायला मिळायच्या. उदाहरणार्थ बुडा क्रेन, रस्टन बुसायरस ५ सिलेंडर इंजिन, किंवा युडी १० युक्लिड डंप ट्र्क्स.. वगैरे. मला या साइटसला जायला खुप आवडायचं कारण , जुन्या व्हिंटेज मशिनरिज , आणि त्या पण वर्किंग कंडिशन मधल्या…म्हणजे पर्वणिच होती. क्रेन च्या खाली शिरुन एकदा बाहेर पडलं की कार्डीयम कंपाउंड जे स्विव्हेल गिअरला लावलेलं असायचं ते शर्टला लागुन माझे कित्येक शर्ट्स खराब झाले आहेत.  त्याचे डाग कांहिही केलं तरी निघत नसंत.

या मॉयल चं गेस्ट हाउस पण खुपच छान होतं. ब्रिटिश स्टाइलचा बंगला होता. तिथे एक खानसामा कम केअर टेकर होता. स्वयंपाक अगदी दिव्य करायचा. सकाळी ब्रेकफास्टला जे ऑम्लेट बनवायचा त्या मधे अंडी कमी आणि कांदाच जास्त असायचा. पण बिचारा, स्वभावाने खुप चांगला होता. बाहेर अगदी ४५ डिग्री जरी टेम्परेचर असलं तरीही त्या रुम्स मधे एकदम थंड वाटायचं. कारण रुमचं छत ३० फुट उंचिवर होतं. आणि भिंती २ फुट जाडिच्या !!

कलकत्त्याला असतांनाच एकदा भुबनेश्वर ऑफिस ला पण गेलो होतो. तिथे जवळंच जाझपुर केओंझार रोड वर माइन्स होत्या. त्या माइन्स मधे काम होतं. तिथे पण जाउन जिवंत दारिद्र्य पाहिलं. अगदी पोटं खपाटीला गेलेले उडिया मजुर .. आणी त्यांची मुलं.. वाईट वाटायचं त्यांना पाहुन. या भागामधे इतकी पॉव्हर्टी होती की हे लोकं फारंच कमी पैशात कामं करायला तयार व्हायची. किमान मजुरी कायदा वगैरे सगळा धाब्यावर बसवलेला असायचा. इथे जंगलातुन शिकार करुन आणलेले ससे, आणि हरिणाचे मांस मिळायचे. माइन्स मॅनेजरच्या घरिच गेस्ट हाउस होतं. त्याच्या घरी रोज पारधी, म्हणण्यापेक्षा लोकलं लोकं एखादा प्राणि घेउन यायचे. मी असतांना माझ्या समोर दोन सुंदर पांढरे शुभ्र सशाचे पिल्लं घेउन आला होता. दोन्ही पिल्लं जिवंत होती. आणि माझ्या कांही लक्षात येण्याच्या आतंच त्याने त्या सशाचे पांय धरले आणी त्याला गर गर फिरवुन त्याचे डोके खाली आपटले..  😦  माझं डोकं सुन्नं झालं तो प्रकार बघुन. मी  तिथे असे पर्यंत रोज फक्त ऑम्लेट आणि रोटी खाउन दिवस काढले. कधिही कुठलंही मांस खाल्लं नाही..कांही प्रसंग मनावर कोरले जातात, त्यातलाच हा एक!

जनरेटींग सेट्स बहुतेक सगळ्याच प्रकारच्या ईंडस्ट्रिज मधे वापरले जातात. त्या मूळे बहुतेक सगळ्या प्रकारच्या फॅक्टरिजला जावं लागायचं. निरनिराळे कस्टमर्स भेटायचे. अगदी स्पिनिंग मिल्स ते डाइंग प्रिंटींग.. अगदी स्मॉल स्केल ते लार्ज स्केल.

सगळ्यात जास्त फॅसिनेट करणारा बिझिनेस म्हणजे डायमंड कटिंग .. सुरतेचा. एकेका लहानशा बिल्डींग मधल्या इंडस्ट्रिज जेंव्हा मार्केट वर होतं , तेंव्हा कमित कमी १००० कोटींचा धंदा करित असे. डायमंड कटींग असं म्हंटलं जातं, पण ऍक्चुअली डायमंडला ग्राइंडींग व्हिल वर घासुन शेप मधे आणलं जातं.

हे माझं चौथं पोस्ट याच विषयावरचं. आता थांबवतो . अहो, २५ वर्षांचा फिल्ड एक्सपिरिअन्स, त्यामधे ८ वर्ष मार्केटींग .. ( सेल्स इंजिनिअर म्हणुन, प्रॉडक्शन इंजिनिअर म्हणुन ३ वर्षं , इतर उरलेला सगळा सर्व्हीस डिपार्टमेंटचा एक्सपिरिअन्स) त्यामुळे बरेच अनुभव.. बरे.. आणि वाईट आहे .जसे आठवले तसे लिहिले. आता हा विषय इथे बंद करावा म्हणतोय..

अबु गरिब जेल

Written by  on May 2, 2020

युद्धात   कैद्यांना कसं वागवायचं याचे नियम आहेत, पण किती देश ते कायदे पाळतात? आणि जर तो देश अमेरीके सारखा बलाढ्य असेल तर, आणि त्याने कायदे पाळले नाही तर?

अबु गरिब जेल. हे इराक मधील बगदाद इथलं एक जेल. हे जेल नेहेमीच हेडलाइन्स मधे राहिलं आहे. अगदी सद्दाम हुसेन च्या काळा पासून ते अगदी आत्ता पर्यंत..  त्याचं नामकरण ’बगदाद करेक्शन फॅसिलिटी’ हे केलंय अमेरिकेने.

याच जेल मधे हज्जारो कुर्द शिया लोकांना आणून ठेवलं होतं सद्दाम हुसेन ने. २६ डिसेंबर १९९८ मधे सद्दामचे पोलिटिकल विरोधक असलेले १५ लोकं ठार मारले गेले ह्या जेल मधे आणि त्यांच्या डेडबॉडीज  जवळच एका निर्जन स्थळी पूरण्यात आल्या ( एकत्रित पणे).

ह्या नंतर म्हणजे सद्दामच्या लक्षात आल्यावर की अशा तऱ्हेने केलेला आपल्या राजकीय विरोधकांचा चा खून सहज पचतो, मग त्याने जवळपास १००० च्या वर आपल्या पोलिटीकल अपोनंट्स ला यमसदनी पाठवले.तिथे नंतर उत्खननात सापडलेल्या शेवटच्या सांगाड्याचा नंबर होता.. ९९३. ही एक मास ग्रेव्ह सापडली केवळ एका आय विटनेस मुळे. इतर ठिकाणी पण अशा ग्रेव्हज असण्याची शक्यता आहे आणि किती लोकं मृत्युमुखी पावले, हे कळणे खरंच अशक्य आहे.

हे जेल तसे नेहेमीच वादात होते. दररोज कांही तरी बातम्या असायच्याच. नंतर अमेरीकेने मधे इराक ऍक्वायर केल्यावर मग हे जेल अमेरिकेच्या ताब्यात आले. आणि अमेरिकेने ह्याचा अगदी पुरेपूर उपयोग करुन घेतला. युध्द कैदी ठेवायला जागा लहान पडली म्हणून ६ बऱॅक्स पुन्हा वाढवण्यात आल्या. अमेरिकन आणि ब्रिट सैन्याने बरेच युद्ध बंदी इथे ठेवले होते. आता त्यांना कसं वाचवण्यात आलं हे माहिती आहेच, पण पुन्हा एकदा थोडक्यात जुन्या गोष्टींना उजाळा देतो.

ब्रिट च्या  टेलिग्राफ ने हा मुद्दा सर्वप्रथम इन्व्हेस्टीगेटिव्ह जर्नॅलिझम करुन पेपरमधे छापला होता. टेलिग्राफ हा माझा आवडता पेपर आजही आहे. रोज टेलिग्राफ आणि चायना मेल एकदा तरी नजरेखालून घालतोच.

२००४ मधला एक दिवस. सकाळच्या टेलिग्राफ मधे यु एस सोल्जर्स ने केलेल्या छळाचे फोटो प्रसिद्ध झाले या पेपरमधे. ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन नेटवर्क ने पण काही फोटॊ ग्राफ्स टिव्ही वर दाखवले. या फोटो मधे यु एस, ब्रिट, आणि इतर मित्र देशांच्या सैनिकांनी केलेल्या छळ, बलात्काराचे फोटोग्राफ्स होते.

मित्र देशांनी एकदा इराक वर ताबा मिळवल्यावर या जेल मधे कित्येक लोकांना डांबून ठेवण्यात आले होते. अगदी थोडा जरी संशय आला तरीही जेल मधे बंद करुन ठेवण्यात आले होते. फ्री ट्रायल्सची तर शक्यताच नव्हती. जज पण अमेरिकन, पोलिस पण अमेरिक्न्स, आणि कित्त्येक अमेरिकन सैनिकांच्या मृत्युचा बॅक्ग्राउंड असल्याने  कैद्यांच्या बद्दल अजिबात सहानुभूती  नव्हती कोर्टाला पण.

अगदी काही पत्रकारांना पण अटक करुन ठेवण्यात आलेली होती. त्या पैकी एकावर तर ब्रिट पिएम चा खुन करण्याचा प्लानिंग केलं असा आरोप होता. बरं

हे फोटॊ बाहेर आले तरी कसे?? बरेचसे सैनीक जे या जेलमधे होते त्यांनी इराकी बंद्यांच्या अगतिकतेचा अगदी पुरेपूर फायदा घेतला. मग एखाद्याचा छळ करणे, कपडे काढून ह्युमिलिएट करणे, बलात्कार- पुरुष सैनिकांनी पुरुष कैद्यांवर केलेले, आणि पुरुष कैद्यांनी स्त्रियांवर केलेले, ह्या सगळ्यांचे फोटो पण काढले गेले सेल फोन कॅमेऱ्यावर.

हे सैनिक  मग मायदेशी परत गेल्यावर  त्यांनी आपले हे वीरता पुर्ण प्रताप  आपल्या  मित्र मंडळींना दाखवले, आणि मग सगळ्या ऍट्रोकसीज बाहेर आल्या. सैनिकांना असं कधीच स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण जिंकून आलेले युध्दवीर आहोत, तेंव्हा आपण जे कांही केलं ते क्षम्य आहे. पण तसं झालं नाही!

हे सगळ्या पेपरमधे आल्यानंतर मात्र अमेरिकन गव्हर्नमेंट जागं झालं.. खरं तर ते जागे होतेच, कारण वरिष्ठांच्या परवानगी शिवाय असे उद्योग करण्याचे धाडस सैनिकांना होणे शक्यच नाही. यानंतर मात्र १७ सैनिकांना नोकरी वरुन काढले . नंतर टप्प्या टप्प्याने बऱ्याच सैनिकांचे कोर्ट मार्शल करण्यात आले. आणि बऱ्याच सैनिकांना १० वर्षा पर्यंत कैदेची शिक्षा देण्यात आली.त्या जेलचे सुप्रिटॆंडन्ट, ब्रिग्रेडीयर जनरल जानिस ला कर्नल म्हणुन डीमोट करण्यात आलं .

त्या फोटॊज मधे काय आहे ते इथे विस्ताराने लिहित नाही पण जर तुम्ही मानसिक दृष्ट्या तयार असाल तर.. रिपीट… जर मानसिक दृष्ट्या तयार असाल तरच इथे फोटॊ पहाण्यासाठी क्लिक करा.. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.antiwar.com/news/?articleid=2444)

दुसरे कांही फोटॊ इथे पण आहेत.. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.antiwar.com/news/?articleid=8560) यातले बरेचसे फोटो हे बिभत्स आहेत. तेंव्हा क्लिक करण्याआधी विचार करा ..

मेजर जनरल टगुबा  ह्यांना  ब्रिट सरकारने  या सगळ्या प्रकरणाचा शोध घेण्या साठी नियुक्त केले होते. . हे टगुबा आता रिटायर झाले आहेत आणि आता त्यांनी हे मान्य केलंय, की टेलिग्राफ मधे प्रसिद्ध झालेले सगळे काही खरे आहे.त्यांनी जवळपास २००० च्या वर फोटोग्राफ्स  स्टडी केलेत. आणि त्यांचं मत आहे की हे सगळे फोटॊ  इतके वाईट आहेत की त्याबद्दल बोलणे हे पण मला संयुक्तीक वाटत नाही.

हे फोटोग्राफ्स  जे आहेत ते जवळपास ४०० वेगवेगळ्या  लोकांवर केलेल्या अत्याचाराचे सगळे  पुरावे आहेत. त्या मधे बलात्कार , विक्रुत संभोग इत्यादींचे फोटो आहेत की पाहुन शिसारी यावी. केवळ सरकारच्या हस्तक्षेपामुळेच हे फोटो पब्लिसाइझ्ड करण्यात आलेले नाहीत.

अशाच प्रकारचे आरोप हे अफगाणिस्तानातही करण्यात आलेले आहेत. युद्ध जिंकल्यावर कैद्यांना गुलामा प्रमाणे वागवायची पद्धत फार पुरातन काळापासुन चालत आलेली आहे. तीच पद्धत आजही अस्तित्वात असलेली पाहून मला तरी खरंच वाईट वाटलं.
आता ओबामानी स्टेटमेंट दिलंय की ह्या फोटोग्राफ्स मधले सगळे आरोपी ओळखल्या गेले आहेत, आणि सगळ्यांनाच आता शिक्षा पण करण्यात आलेल्या आहेत.

आकाश कंदील.. पुन्हा एकदा..

Written by  on May 2, 2020
आकाश कंदील

मागच्या वर्षीच्या आकाश कंदीलाचा सांगाडा

आकाशकंदील बनवणे म्हणजे माझा आवडता  उद्योग. अशी एकही दिवाळी गेली नाही की ज्या मधे मी किल्ला आणि आकाशकंदील बनवला नाही . मध्यंतरी बराच काळ म्हणजे जवळपास २० -२५ वर्ष तरी आकाशकंदील बनवणे बंद झाले होते, ते मागल्या वर्षीपासून पुन्हा सुरु केले. मुंबईसारख्या ठिकाणी आकाशकंदील बनवण्यासाठी रॉ मटेरीअल ( म्हणजे बांबूच्या काड्या वगैरे)  कसे मिळवले ते मागच्याच वर्षीच्या पोस्ट मधे लिहिले आहे. ” मी आकाशकंदील बनवतो त्याची पोस्ट ” इथे आहे. ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2009/10/14/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/)

तर या वर्षी पण आकाशकंदील बनवायचा ठरवले. एका रविवारी धाकट्या मुलीने आठवण करून दिली   की दिवाळी जवळ आली आहे, आणि   माझ्या पण लक्षात आलं, की आता पासून सुरुवात केली तरच आकाशकंदील वेळेपर्यंत  पुर्ण होईल.  माळ्यावर टाकलेला मागच्या वर्षी बनवलेला आकाशकंदील  आठवला आणि तो बाहेर काढला .   त्याचा लावलेला कागद खूप खराब झाला होता, म्हणून मग सगळा कागद काढून टाकल्यावर  त्यावर नवीन कागद बसवावा का? की  हा आकार मोडून दुसरा एखादा आकार बनवावा? असा विचार केला. वेळ पण भरपूर होता, आणि काड्या पण होत्याच .. मग आहे त्याच काड्या वापरून दुसरा आकार बनवण्याचे ठरवले.

नविन आकाशदिव्याची फ्रेम

लहानपणी तीन आकाराचे आकाशकंदील बनवता यायचे मला. त्यापैकी एक चांदणी तर बनवून झाली होतीच.. आता शिल्लक होते ते विमान किंवा  षटकोनी डायमंड. या षटकोनी डायमंड  ( चार बाजुला चार कोन , एक वर आणि एक खाली असे सहा कोन )मधे बनवतांना आत मधे बल्ब आणि होल्डर लावावे लागते, आणि एकदा बनवला, की आतला बल्ब बदलता येत नाही. म्हणून त्याचा खालचा कोन न बनवता पंचकोनी बनवायचे ठरवले.

आकाशकंदील बनवणे= घरभर कचरा करणे

जुन्या आकाश कंदीलाच्या सगळ्या काड्या सुट्या केल्या आणि सम आकाराचे तुकडे कापून एक बेसीक स्ट्रक्चर तयार केले. या वेळेस काड्या जरा लहान पडल्याने आकारात सफाई आली नाही. पण स्वतः करण्याचा आनंद हा विकतचा आकाशकंदील  लावण्यापेक्षा खूप  जास्त असतो,  म्हणून आहे त्यात समाधान मानून आणि  कॉम्प्रोमाइझ करून एक स्ट्रक्चर बनवले. वर कागद कुठला लावायचा हा प्रश्न होताच. शेवटी जिलेटीन चे लाल रंगाचे आणि भगव्या रंगाचे फ्लुरोसंट कागद आणले आणि त्रिकोणी आकाराचे तुकडे कापून चिकटवण्याचे चिकट ( की किचकट?) काम  संपवायला जवळपास तीन तास लागले. आणि शेवटी एकदाचा आकाशकंदील तयार झाला.

शुभ दिपावली....बऱ्याच लहानपणीच्या गोष्टी आपण पुन्हा जेंव्हा करतो, तेंव्हा एक निराळाच आनंद देऊन जातात त्या  गोष्टी, आणि सणाचा आनंद द्विगुणित करतात.  तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन हे

पत्रिका …

Written by  on May 1, 2020

बाहेरून कार पार्क करून नेहेमीप्रमाणे लेटर बॉक्स उघडला , आणि त्यामधील पत्रं बाहेर काढली. आजकाल पत्र येणं तसं कमीच झालेले आहे. पत्र येतात ती फक्त बॅंकांची किंवा शेअर्सच्या संदर्भातली. या पार्श्वभूमीवर ते एकुलते एक ‘पोस्ट कार्ड’ लक्ष वेधून घेत होते. कार्डावरचा मजकूर चक्क  प्रिटींग प्रेस मधून छापून घेतलेला दिसत  होता.

कार्ड वाचायला सुरुवात केली, आणि एकदम हसूच आलं. कार्ड होतं एका मित्राच्या वडीलांच्या मृत्यु संदेशाबद्दल- आणि तरीही हसू?? काहीतरी चुकतंय ना??   आमच्या कडे विदर्भात कोणी वारल्यावर तेरवीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याची पद्धत आहे. काही विशिष्ट समाजात तर बऱ्याच लोकांना पत्रिका पाठवून बोलवायची पद्धत असते.

कार्डातला मजकूर होता, ” आमचे येथे आमचे तीर्थरूप श्री नारायणराव उर्फ नानासाहेब यांच्या मृत्यु प्रीत्यर्थ (??) तेरवीचा समारंभ करण्याचे ठरवले  आहे, तरी आपण सर्वांनी अवश्य जेवणास यावे ही विनंती. आणि शेवटी लिहिले होते मुहुर्त:- (……….)  !!!!!!आता एखादा माणूस वारल्यावर त्याबद्दल तेरवीचा “समारंभ”?? साधं सरळ ’तेरवीचा कार्यक्रम ’ आहे असं लिहिलं असतं तरीही चाललं असते. मुहुर्त?? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय??  पत्रिके मधे कुठला शब्द वापरावा याचे भान सुटले की असे होते.

पत्रिका हा आजकाल तर एक धंदाच झालेला आहे. लग्न ठरलं की प्रिंटींग प्रेस मधे जायचं आणि हव्या असलेल्या विषयावरची पत्रिका  त्या प्रिंटींग प्रेसवालयाला मागायची. तो त्याच्याकडे आजपर्यंत प्रिंट झालेल्या पत्रिका ज्या एका छानशा अल्बम मधे लावून ठेवल्या आहेत -तुमच्या पुढे सरकवतो. तुम्ही आवडलेलं डीझाईन त्याला सांगितलं की मग पुढचं सगळं सोपं असतं. लोकं फक्त डिझाईन अप्रुव्हल ला भरपूर वेळ लावतात, मॅटर जुन्याच एखाद्या पत्रिकेवरचं फक्त नावं बदलून छापलं जातं. मॅटर मधे काही चुका असतील तर त्या तशाच पुन्हा रिपीट केल्या जातात, म्हणूनच ह्रस्व दीर्घाची एकच चूक बऱ्याच पत्रिकांवर दिसून येते. कधी तरी एखादा उत्साही कलाकार आपल्या पत्रिकेचा मजकूर स्वतः लिहितो – तेवढाच काय तो एक विरंगुळा.

मध्यंतरी  शिवाजी महाराजांच्या काळातल्या प्रमाणे कापडावर छापलेला खलिता पण पाठवायची पद्धत होती. बरेच लोकं तशाच  पत्रिका छापायचे.  एका सुंदरशा केशरी रंगाच्या कपड्यावर लग्न पत्रीका छापून मग तिला एका काडी भोवती गुंडाळून वर रेशमी दोऱ्याने बांधून पाठवायचा प्रकार होता तो. याच सुमारास कमीत कमी ६ पानी पत्रिका पाठवायचे फॅड पण निघाले होते. मारवाड्यांच्या लग्नात तर पाणी-ग्रहण लिहिले असते. हे पाणी ग्रहण म्हणजे काय? हा प्रश्न तर कित्येक वर्ष सुटत नव्हता . भलतंच काहीतरी संशय यायचा  वाचतांना 🙂 !

बरं ते असो . पत्रिकेवरचा मजकूर पण खूप छान असतो, कधी तरी, ” श्रीबाबामहाराज यांच्या  कृपेने  आमचे घरी सौ… हिला सुपुत्र प्राप्त झालेला आहे , आता तो या जगात आल्यावर त्याला काहीतरी नांव द्यावेच लागेल ना, म्हणून त्याच्या नामकरणाचा कार्यक्रम ( इथे समारंभ चालला असता शब्द 🙂 ) आयोजित केलेला आहे, या शुभ प्रसंगी आपली आणि  सहकुटुंब उपस्थिती प्रार्थनीय आहे.. आता ही पत्रिका वाचल्या बरोबर माझ्या मनात  (१) हे बाबामहाराज  कोण हा प्रश्न मला पहिले पडतो??  (२)आणि यांना मुलं व्हायला ’बाबामहाराजांची कृपा”  का बरं लागली असावी हा प्रश्न पण पडतो .. विनोदाचा भाग सोडून द्या.. पण असे अर्थाचे अनर्थ निघतात पत्रिका वाचताना.

“नामकरण विधी” ची पत्रिका पण येते बरेचदा. इथे सरळ सरळ बारशाची पत्रिका म्हणता येईल, पण नामकरण विधी हा हमखास वापरला जाणारा शब्द! ( यात ’विधी”  हा शब्द वाचला, की मला ’प्रातर्विधी’ हा शब्द का आठवतो हेच समजत नाही) .

आमंत्रण आणि निमंत्रण या मधे पण बरेचदा लोकांचा खूप घोळ झालेला असतो. एकदा मला एक लग्नाची पत्रिका आली होती त्यावर पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात  “आमंत्रण” असे  लिहिलेले होते. पहिल्याच घासात खडा यावा तसे वाटले एकदम.

पत्रिकेतल्या मजकुराबद्दल तर न बोललेलेच बरे.. पत्रिकेच्या वर कोपऱ्याला एक हळदीचे बोट लावलेले असते – का ते माहिती नाही, पण कदाचित पद्धत म्हणून असेल. वर श्री भुतोबा प्रसन्न, वेताळेश्वर प्रसन्न, म्हसोबा प्रसन्न किंवा अगदी  शनीमहाराज प्रसन्न असं काहीही असू शकते. शनीमहाराज प्रसन्न हे तर माझ्या एका मित्राच्या पत्रिकेत होतं लिहिलेलं,  शनीची साडेसाती आहे, म्हणून पंडीतजींनी शनीमहाराज प्रसन्न लिहायला सांगितलंय असं तो म्हणत होता. अखंड बालब्रह्मचारी प्रसन्न हे पण एका लग्नाच्या पत्रिकेवर वाचल्याचं आठवतं.

पत्रिकेत किती नावं असावी याला पण काही धरबंद राहिलेला नाही. अजूनही गावाकडल्या लग्नात , आमचं नांव पत्रिकेवर नाही म्हणून आम्ही लग्नाला येणार नाही असं म्हणून रुसून बसणारे लोकं पण असतात.पत्रिकेच्या शेवटी सगळे काका, मामा, मावशा वगैरे नांवं लिहून झाले की  रिंकू , पिंकू, मोना, राजू, वगैरे मुलामुलींची नांवं…. आणि ’ काकाच्या लग्नाला नक्की यायचं हं……… असाही एक सूर लावलेला असतो. अगदी सुरुवातील जेंव्हा अशी पत्रिका पाहिली, तेंव्हा कौतूक वाटलं होतं, पण नंतर जवळपास प्रत्येकच पत्रिकेत असाच साचेबद्ध मजकूर दिसू लागल्यावर मात्र कंटाळवाणी व्हायला लागली.

“कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेतच, पण आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे” हे वाक्य पण वाचलं की मला संताप येतो. का कोणास ठाऊक पण फार उद्धट वाक्य वाटतं मला हे. (कदाचित नसेलही… पण मला वाटतं). काही लोकं लग्नाच्या पत्रिकेला अगदी  एखाद्या सार्वजनिक उत्सवाच्या पत्रिकेचे स्वरूप देतात. म्हणजे  पत्रिकेत एका बाजूला “कार्य वाहक ” म्हणून ८-१० नांवं दिलेली असतात, आता  लग्न कार्यामधे हे कार्य वाहक म्हणजे कोण ???   बरं एवढ्यावरच थांबत नाही, तर खाली पुन्हा प्रमुख उपस्थिती  आणि त्याखाली पुन्हा नावं… कमीत कमी १० तरी!!!!एखाद्या  राजकीय पक्षाचे कार्य असल्यासारखे वाटते अशी पत्रिका पाहिली की!

पूर्वीच्या काळी बरं होतं. आपलं सरळ काम असायचं.. मजकूर साधारण पणे असा असायचा:- आमचे येथे श्री कृपे करून आमची ज्येष्ठ सुपुत्र राघव याचा शरीर संबंध गोरवाडीचे चे त्र्यंबकराव यांची सुकन्या ची. सौ, का. गोदावरी हिज बरोबर , मार्गशिर्ष महिना,गुरुवार, शुध्द द्वादशी   शके १८९० या दिवशी गोरज मुहुर्तावर ( किंवा ब्राह्म मुहूर्तावर)  करण्याचे योजले आहे.तरी आपली उपस्थिती सहकुटुंब सहपरीवार प्रार्थनीय आहे” कशी अगदी सरळ   कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिलेली पत्रिका .. मी स्वतः पाहिलेली आहे अशी पत्रिका आजोबांच्या पोथीमधे.

लग्नाची पत्रिका किंवा मौंजेची  तेच आपलं थ्रेडींग सिरेमोनी हो… ती पत्रिका जर इंग्रजी मधे असली  की  त्यात इतरांना काय कार्यक्रम आहे ते समजावे म्हणून जे काही लिहिले असते, ते वाचले, तर ज्याला मौंज म्हणजे काय  घे माहिती असेल तरीही तो पण   विसरून जाईल असे वाटते. कैच्याकै लिहितात पत्रीकेमधे.

काही वेळेस  खाली लिहिलेले असते बरेचदा , की “योर प्रेझेन्स इज अवर ब्लेसींग्ज” !! मला तर कायम भिती असते की  कधी चुकून  “योर प्रेझेंट्स आर अवर ब्लेसींग” असं छापण्याची चूक त्या प्रिंटरने केली तर काय होईल?  मराठी लोकांमधे हल्ली इंग्रजी पत्रिका छापायची पद्धत निघालेली आहे.  ऑफिस मधे देण्याची पत्रिका  ( सगळे ऑफिसचे लोकं मराठी असले तरीही) इंग्रजीत छापली जाते. मग त्या मधे पण वाचतांना खूप करमणूक होते. जसे सौ. कां. चे इंग्रजीत  chi. sou. kan. – असे लिहिले जाते. हे वाचताना ’ सौ कान ’ असे इतर भा्षिक वाचतात, आणि  मग इतर भाषिक लोकांची ह. ह. पू. वा. होते. इंग्रजी मधे पत्रिका तर असते, पण मग वर गणेश प्रसन्न शेजारीच मल्हारी मार्तंड प्रसन्न , आणि त्याखाली मग अजून पाच देवांना प्रसन्न करूनच पत्रिकेचे लिखाण सुरु केलेले असते. पत्रिकेत एका बाजूला प्रोग्राम या हेडींग खाली  घटिका, पळे वगैरे  लिहिलेले असतात.  मर्यादा पुरुषोत्तम एकपत्नीव्रत पाळणारा “राम प्रसन्न “हे कधीच लिहिलेले दिसत नाही 🙂 पण ब्रह्मचारी हनुमान प्रसन्न मात्र दिसते पत्रिकेत लिहिलेले.

हे वाक्य की प्रेझेंट्स, किंवा पुष्प गुच्छ आणू  नये  बरेचदा पत्रिकेत लिहिलेले असते. आपल्यालाही बरं वाटतं की चला, एक तरी लग्न आहे बिना प्रेझेंट्स चे.. पण तिथे लग्नाला गेल्यावर वेगळंच चित्र दिसतं. आपण रिकाम्या हाताने गेलेलो असतो, पण इतरांनी प्रेझेंट्स आणलेले असतात, आणि नवरा मुलगा , मुलगी  इतरा कडून प्रेझेंट आणि बुके  बिनदिक्कत स्विकारताना दिसतात.  आपल्या कडे काहीच नेलेले नसते, आणि मग आपल्याला उगीच  लाजिरवाणे होते.  एकीकडे प्रेझेंट नको असं लिहायचं, आणि कोणी आणलं तर घ्यायचं, ह्या सारखी दुतोंडीपणा कोणी केला की संताप होतो जीवाचा.  उगाच  ज्यांनी पत्रिकावाचून  प्रेझेंट्स आणलेले नसतात त्यांना लाजिरवाणे होते.  या वर उपाय  म्हणजे मी हल्ली एक पाकीट सोबत ठेवतो लग्नाला जातांना.

पण हे सगळं पाहिल्यावर मात्र वाटतं की विवाह हा एक संस्कार आहे, आणि म्हणूनच त्याचे इतके बाजारीकरण होऊ नये.पत्रिका छापताना आपण कशासाठी छापतोय ह्याची जाणीव ठेवली की मग मात्र पत्रिका व्यवस्थित छापली जाईल.  माझी फक्त एकच इच्छा आहे, कुठलीही पत्रिका पाहिल्यावर ’आता आवरा’ असे म्हणायची वेळ येऊ नये बस्स!!

ब्लॉगचे आयुष्य

Written by  on May 1, 2020
ब्लॉग  चे आयुष्य

ब्लॉग चे आयुष्य

दोन दिवसापूर्वी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे  चार वर्षापूर्वी माझ्यासोबत ज्यांनी ब्लॉगिंग सुरु केले होते, त्या पैकी फारच कमी लोकं ऍक्टीव्ह आहेत. बहुतेक ब्लॉग हे निद्रावस्थेत  आहेत.हे असे का  झाले असावे? ब्लॉग चे आयुष्य कसे ठरते? लोकांनी लिहीणे का बंद केले असावे? हा प्रश्न डोक्यात आला , आणि त्यावरून हे पोस्ट.

१)लोकं ब्लॉग का सुरु करतात याची बरीच कारणं आहेत, पण पहिले कारण म्हणजे मिसळपाव, मी मराठी, मायबोली , उपक्रम वगैरे साईट्स वर टोपणनावाने १०-१२  लेख लिहून झाले की आपले हे सगळे लेख एकत्र असावे , म्हणून एखाद्या ब्लॉग ला तयार केले जातो. एकदा मनातले विचार कागदावर उतरवता यायला लागले की मग ब्लॉग वर लेख लिहीणे सुरु होते,

२)ब्लॉग सुरु  करण्याचे दुसरे कारण म्हणजे ,   एकटेपणा!   दिवसभर बोलायला कोणी नसतं,  आपल्या मनात काय आहे ? हे ऐकायला कोणी तयार नाही अशी परिस्थिती असते.  संवाद साधणे ही मानवाची मुलभूत गरज आहे, आणि मग संवाद साधायला कोणी समोर नसेल तर मग ब्लॉग काय वाईट?मग जे काही मनात येईल ते ब्लॉग वर लिहून टाकले जाते.

३) तिसरे कारण म्हणजे इतरांचे ब्लॉग वाचल्यावर ” अरे असं तर मी पण लिहू शकतो, मग का नाही सुरु करायचा ब्लॉग? ”   ह्या विचाराने सुरु केल्या जाणारे ब्लॉग. जसे  – “काय वाटेल ते ”   😀

४)ब्लॉग सुरु करण्याचे कुठलेही कारण जरी असले तरी त्याचे आयुष्य साधारणपणे सारखेच असते.  सुरु झालेल्या ब्लॉग पैकी ७० टक्के हे पहिल्या सहा महिन्यातच बंद पडतात, उरलेले ३० टक्के काही वर्ष ( १-२ वर्ष )सुरु रहातात आणि उरलेले रडत पडत का होईना, पण जिवंत रहातात.

५)सुरुवातीला तुमचा विचार फक्त चांगलं लिहायचं एवढाच असतो, त्यामुळे ब्लॉग प्रमोट वगैरे करण्याच्या भानगडीत तुम्ही पडत नाही. ब्लॉग स्वान्तसुखाय आहे हे विचार मनात पक्के असतात.पण जेंव्हा सारखे स्टॅट पहाणे सुरु होते, तेंव्हा वाचक कसे वाढवायचे या दृष्टीने हालचाल सुरु होते. तुम्ही अगदी “मॅडली इन लव्ह विथ युवर ब्लॉग” होता.   किती लोकं आहे, किती कॉमेंट्स आल्या वगैरे वगैरे यांचा ट्रॅक ठेवणे हेच तुमचे लक्ष असते .

६)तुमचे लक्ष तुमच्या फॉलोअर्स च्या संख्येकडे  जाणे सुरु होते,  जितके जास्त फॉलोअर्स तितकी जास्त पोहोच! 🙂 स्वतःच्या ब्लॉग चे मार्केटींग करण्याचा तुम्ही पद्धतशीर पणे प्रयत्न करता.

-त्या साठी शक्य तितक्या ठिकाणी फेसबुक वर आपल्या ब्लॉग ची लिंक शेअर करता. मेल मधे लिंक लोकांना पाठवता.

-ब्लॉग ला  मराठी ब्लॉग . नेट किंवा मराठी ब्लॉगर्स . नेट शी जोडता.

-तुमच्या ब्लॉग च्या नावाने  फेसबुक पेज, ट्विटर  हॅंडल सुरु करता.

-सगळ्या मित्रांना माझं पेज लाइक करा म्हणून मेसेज करता- ( खरं तर त्यांनी तुमचे पेज लाइक केले काय किंवा नाही, तरी काही फरक पडत नाही, कारण तुम्ही तुमच्या प्रोफाइल वर  टाकलेली ब्लॉग लिंक त्यांना दिसतच असते.)

-तुमच्या मी  मराठी, मिपा, माबो, उपक्रम वगैरे साईट्स च्या सिग्नेचर मधे तुमच्या ब्लॉग लिंक देता, त्या सोशल साईट्स वरून पण तुमच्या ब्लॉग वर व्हिजिटर्स येणे सुरू होते.

७)पहिले हजार वाचक झाले की मग खूप आनंद होतो, तुम्ही वाचकांचे आभार मानणारी  पोस्ट टाकता. अजून वाचक कसे मिळवायचे हा विचार करू लागता. एखादं खूप कॉंट्रोव्हर्सीअल पोस्ट टाकता आणि मग प्रतिक्रियांचा पाऊस सुरु होतो. ब्लॉग आता बाळसं धरू लागतो.

८)इतर ब्लॉगर्स कोण असतील? कसे असतील? हा विचार मनात येतच असतो, बऱ्याच ब्लॉगर्सशी व्हर्च्युअल मैत्री झालेली असते, तुम्ही मग “ब्लॉगर्स मिट” अरेंज करता- सगळ्या ब्लॉगर्स ला भेटणे हा एक मूळ उद्देश असतो. ओघाओघाने पेपर मधली प्रसिद्धी, टिव्ही वर न्युज येतेच  🙂  त्या नंतर नियमित, बाहेर भेटी गाठी , ट्रेक्स, खादाडी वगैरे सुरू होऊन व्हर्चुअल संबंध वैयक्तिक पातळीवर पोहोचतात.

९)इतर ब्लॉग वर जाउन कॉमेंट टाकणे हा वाचक मिळवण्याचा एक उपाय आहे  हे तुमच्या लक्षात आल्याने तुम्ही बहुतेक सगळ्या ब्लॉग वर कॉमेंट्स करणे  सुरू करता. जेंव्हा तुम्ही कॉमेंट देता, तेंव्हा त्या बरोबरच तुम्ही आपल्या ब्लॉग ची लिंक पण देत असता:)  त्या ब्लॉग  चे  इतर वाचकही तुमची   कॉमेंट पाहून  तुमच्या   ब्लॉग लिंक वर क्लिक करून   वाचक मिळण्याची शक्यता जास्त वाढते.नियमित पोस्ट+ नियमित कॉमेंट्स = जास्त वाचक.:)

१०) म्युच्युअल एनकरेजमेंट सुद्धा ब्लॉग साठी पोषक  आहे. एकाच विचाराचे ब्लॉगर्स , पण वेगवेगळ्या विषयावर लिहणारे चांगले मित्र होऊ शकतात, आणि एकमेकांना एनकरेजही करू शकतात, हे सिक्रेट ऑफ द ट्रेड समजले की तुमचा यशस्वी ब्लॉगर होण्याचा मार्ग मोकळा होतो. एक मेका सहाय्य करू, अवधे धरू सुपंथ  🙂

११)सुरुवातीला विषयांची कमतरता नसते, कोणी वाचेल की नाही ह्याची खात्री नसल्याने, आणि तुम्हाला कोणी वैयक्तिकरीत्या ओळखत नसल्याने तुम्ही अगदी काय वाटेल ते लिहत असता. एखाद्या दिवशी काही विषय सुचत नाही, मग स्वतःचे अनुभव, हा मुख्य विषय होतो लिहीण्याचा. दुसऱ्याच्या आयुष्यात डोकाऊन पहायला सगळ्यांनाच आवडतं, त्या मुळे ही पर्सनल पोस्ट्स नक्कीच हिट होतात.

१२)स्वतःचे काही अनुभव कथांमधे किंवा ललित लेखांमध्ये गुंफून पोस्ट्स लिहिले जाते. नंतर येतो रायटर्स ब्लॉक – म्हणजे काय लिहावं हेच सुचत नाही, तुम्ही लिहीणं बंद करता, तुमच्या ब्लॉग वर लोकं येऊन काहीतरी लिहा म्हणून गळ घालतात, तुम्ही एखादा दुसरा लेख लिहिता सुद्धा, पण लवकरच उत्साह संपतो ( कदाचित नवीन गर्ल फ्रेंड मिळणे, लग्न होणे, मुल होणे ही कारणं असतात )आणि ब्लॉग मृतवत होतो.

१३)या सगळ्या प्रकारातून वाचलेल्या ब्लॉगर्स ची नंतरची स्टेज:- स्वानुभव बहुतेक लिहून झालेले असतात, नवीन अनुभव आणायचा तरी कुठून? मग वाचलेल्या इंग्रजी कथांवर आधारित कथा, प्रवास वर्णने,   सिनेमाची परीक्षणं वगैरे लिहीणं सुरू होतं.काहीही करून एखादं तरी पोस्ट लिहिलं गेलंच पाहिजे हा अट्टाहास असतो. जेवायला गेल्यावर समोरच्या डिश चा आधी फोटॊ काढला जातो , आणि मग नंतरच जेवण सुरू केले जाते. ( काय सांगावं? कधी एखादी पोस्ट लिहावीशी वाटली तर उपयोगी पडेल, हा विचार असतो त्या मागचा 🙂  )

१४)राजकारण, समाजकारण, वगैरे अनेक गोष्टींवर तुम्ही आपली काय वाटेल ती मतं मांडत असता.वाचकांची संख्याही बरीच वाढत असते,  पण आता मात्र तुमचे लक्ष त्या संख्येकडे नसते. तुम्ही लिहिल्यावर किती वाचक आले, किती कॉमेंट्स आल्या ह्या गोष्टी गौण होऊ लागतात, फक्त काय वाटेल ते लिहीणं   एवढाच उद्देश असतो..

१५)पेपर मधे  तुमचा एखादा लेख छापून येतो, पुस्तक छापून येतं, आणि मग उगीच आपण काहीतरी मिळवलंय असा समज होतो, अत्यानंदाने मग त्या विषयावरची एखादी पोस्ट लिहीतो. या नंतर तुमचे बरेच लेख वेगवेगळ्या पेपर मधे  प्रसिद्ध होतात, पण पहिल्या लेखाच्या प्रसिद्धीचा जो आनंद असतो, तो पुन्हा अनुभवता येत नाही.

१६)तुमच्या लेखन विषयात वैविध्य आपोआपच येतं, आणि लिखाणाचा पोतं ही सवयीमुळे सुधारतो. तुमच्या ब्लॉग ला एखादं रेकग्निशन, एखादं बक्षीस , मिळतं. खूप काही तरी मिळाल्याचा आनंद होतो. आता पुढे अजून काय मिळवायचं म्हणून लिखाणातला उत्साह काही लोकांचा संपतो आणि  ब्लॉगिंग बंद होतं.

१७)या तडाख्यातून सुटलेले ब्लॉगर्स,ज्यांनी ब्लॉग बंद केलेला नाही, ते   एकप्रकारे समाधानी असतात. आपण लिहिलेले अगदीच टाकाऊ नाही ही गोष्टच त्यांना सुखावून जात असते, केवळ हेच कारण असतं की  ते  लिहीणे बंद करत नाहीत. त्यांची लिखाणाची फ्रिक्वेन्सी  आणि  लेख कमी झाले असले तरी नियमित पणा असतो, आणि त्यामुळेच वाचक वर्ग टिकून रहातो. हे समाधानी ब्लॉगर्स पुढे ब्लॉगिंग कंटीन्यु करतात  🙂 हे जरी खरे असले तरी त्यांच्याही मनात कधी तरी आता आपण बंद करायचं का ब्लॉगिंग हा विचार येतच असतो 🙂 पण ….

तर ही आहे ब्लॉगर्सच्या / त्याच्या ब्लॉग च्या आयुष्याची कथा 🙂  त्या बंद झालेल्या ब्लॉग चे काय होते? काही लोकं बंद केल्यावर तिकडे ढुंकूनही पहात नाहीत, तर काही लोकं चक्क ब्लॉगच डिलीट करून टाकतात. तुम्ही सध्या कुठल्या स्टेजला आहात?

शिंडलर्स लिस्ट

Written by  on May 1, 2020

शिंडलर्स लिस्ट

 

तिने स्वतःच्या बोटावर हलकेच सुईने टोचले , आणि टरारुन वर आलेल्या रक्ताच्या थेंबा कडे तिने पाहिले. डोळ्यात किंचित चिंता -डोळ्यातला पाण्याचा थेंब, सुकलेला चेहेरा, थकलेलं शरीर , आणि रक्ताचा ….तो थेंब तिने बोटावर घेतला आणि गालावर ( चिक बोन्स वर) चोळला.. कदाचित किंचित गुलाबी रंगामुळे आपण हेल्दी दिसू..आणि त्यामुळे कदाचित थोडं जास्त जगता येईल, असं  तिला वाटलं असावं… पण त्यांची तीक्ष्ण नजर…………..

स्त्रिया, म्हातारे लोकं वगैरे जे कामं करु शकत नाहीत त्यांना सरळ गॅस चेंबर मधे पाठवलं जायचं. सगळी कडे नुसता हाहाकार उडालेला होता . हिटलरचे गेस्टापो फुल्ल फॉर्म मधे होते.

१९३९चं वर्षं होतं ते.. पोलंडवर नुकताच विजय मिळवला होता हिटलरच्या सैन्याला. ज्यु लोकं जे आपल्याकडल्या गुजराथ्ई लोकां प्रमाणे हाडाचे व्यावसायिक होते, त्यांच्या विरुद्ध प्रचंड  जनमत तयार होत होतं. त्यांना हुसकावून लावण्यात  येत होतं. हजारो लाखो ज्यु लोकांना क्रॅकोव्ह नावाच्या गावाला शिफ्ट केलं गेलं होतं.. छळछावण्यांमधून..

नेमका ह्याच सुमारास एक जर्मन तरूण.. खूप हॅंडसम, महागडे कपडे घालणारा  अगदी उडाणटप्पु दिसणारा.. इथे येतो.  इथे त्याला धंदा करायचाय. आज पर्यंत याने आपल्या आयुष्यात  जे काही काम केलं असते त्या मधे हा पुर्णपणे अयशस्वी झालेला असतो, पण होप्स नेव्हर डाय.

ह्या गृहस्थाचे नाव शिंडलर्स. उंची कपडे, उच्च रहाणी, महागडी कार, मुळे नाझी लोकांशी पण अगदी कम्फर्टेबली वागणुकीची असते याची. आणि कदाचित याच  कारणामुळे किंवा त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळे नाझी लोकांचा विश्वास  बसतो त्याच्यावर..

 

्शिंडलर्स लिस्ट

 

बरं आता करायचं काय? तर एका ज्यु माणसाच्या ऍल्युमिनियमच्या फॅक्टरी मधे काम करणाऱ्या  अकाउंटंट बेन किंग्जले-स्टर्न शी याची ओळख होते. शिंडलर्स  कडे इतका पैसा नसतो की हा स्वतःच्या जोरावर काही काम सुरु करु शकेल. वर्ष आहे १९३९ महायुद्ध आपल्या चरम सीमेवर पोहोचलेले नाही, पण ज्यु लोकांचा द्वेष जागोजागी दिसतोय.  शिंडलर्स हा  स्टर्न  ला विनंती करतो, की माझ्या प्रोजेक्ट साठी गुंतवणूकदार मिळवून दे म्हणून.. आणि मग स्टर्नच्याच मदतीने हा आपला प्रोजेक्ट सुरु करतो.

पैसा अरेंज झाला, आता पुढे काम करायला माणसं आणायची कुठुन?? सगळ्या ज्यु लोकांना पकडुन तर कॉन्सन्ट्रेशन कॅंप मधे पाठवणं सुरु असतं.. काय करायचं?? इथे नुसती कामं करणारे मजुरांत न घेता, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, लेखक , चित्रकार असे लोकं त्याने कुशल कामगार म्हणून  घेतलेले असतात , आता इजिनिअर्स, डॉक्टर्स ना कुठलं काम येणार?  त्यांना काम येत नसतं , म्हणून  काम शिकवून तयार करतो सगळ्यांना .. त्यांचं आयुष्य वाचवायला…??? की पैसे कमवायला???

शिंडलर्सची साईक काही समजत नाही. उंची कपडे, गाड्या वगैरे मधे नुसता मश्गुल असतो हा.. युद्धाचे दिवस असतात, आणि शिंडलर्स याचा फायदा घेउन  भरपूर पैसा मिळवतो. ऑर्डर्स मिळवतो.. पैसा नुसता पायाशी लोळण घेत असतो. तेवढ्यात याची बायको याला सोडून जाते.

स्टर्न ( अकाउंटंट ) स्वतः ज्यु असल्यामुळे सगळ्या ज्यु लोकांना ( कामगारांना ) वाचवायचा प्रयत्न करतो हे तर साहजिक आहे, पण शिंडलर्स एक जर्मन असुनही हा   प्रयत्न का करतो हे समजत नाही .  माणसाची मानसिक अवस्था कधी आणि कशी बदलेल हे सांगता येत नाही.

नाझी  लोकं वृध्द , थकलेले तरुण , स्त्रिया या सगळ्यांना बर्फ उपसायचे  अंग मेहनतीच्या कामाला लावतात. बरेच लोकं जे काम करु शकत नाहीत त्यांना गोळ्या घालुन मारणं हे तर नेहेमीचंच झालेलं असतं. शिंडलर हे सगळं तटस्थ पणे पहातांना दिसतो.

 

शिंडलर्स लिस्ट

 

बरेचदा असंही वाटतं की  ह्या माणसाला म्हणजे शिंडलर्सला फक्त पैशाबद्दलच प्रेम आहे. पण मधेच असेही प्रसंग आहेत की ज्यात लक्षात येतं.. नाही. … तसं नाही.. ह्या माणसाच्या मनात ज्युंच्या बद्दल ओलावा आहे माणुसकीचा.ज्युंच्या वरचे अत्याचार तटस्थ पणे पहातांना हा जेंव्हा निर्विकार चेहेऱ्याने बसलेला दिसतो , तेंव्हा याची मानसिकता कळत नाही. पण तेच, एका  तहानेने व्याकुळ झालेल्या कैद्यांना घेउन जाणाऱ्या गाडी वर, स्टेशन वर उभी असतांना ,  कैद्यांवर  होज पाइप ने पाण्याचा मारा करतो, तेंव्हा गाडीतले लोकं ते उडणारं पाणी आसुसुन पिण्याचा प्रयत्न करतात… आणि तिथेच त्याच्या नाजुक मनाची एक जाणिव होते.. आणि जाणवतं , शिंडलर्स इज डिफरंट….

थोडे दिवस गेले आहेत, आता ज्युंचं शिरकाण उघडपणे सुरु आहे. गॅस चेंबर्सच्या कथा सांगितल्या जाताहेत. शिंडलर्सने भरपूर पैसा कमावलाय, त्याला कुठुन तरी कुणकुण लागते की आपल्या फॅक्टरीतल्या लोकांना पण आता कॅंपवर  पाठवणार, तेंव्हा मात्र हा थोडा नर्वस झालेला दिसतो. आपल्या कडे काम करणाऱ्यांना वाचवलं पाहिजे असं त्याला वाट्त,आणि एक नवीन आयडीया घेउन तो गोईथ या जर्मन अधिकाऱ्याला  भेटतो..

मला माझ्या जन्मगावी प्लांट सुरु करायचाय, आणि म्हणून मला ही माझी माणसं हवीत.जर्मन अधिकारी आधी तर सरळ नकार देतो, पण शिंडलर्स काही पिच्छा सोडत नाही, गोईथ ला म्हणतो की तुला अगदी हवे तितके पैसे देतो मी , पण माझी ही माणसं  मला कुठल्याही परिस्थितीत हवी. तेंव्हा मांडवली केली जाते.. प्रत्येक माणसासाठी शिंडलर्स हा  ठरावीक रक्कम गोईथ  ला देण्याचं मान्य करतो .  आणि नंतर मग गोइथ एक लिस्ट बनवायला सांगतो..

११०० ज्युज ची यादी.. शिंडलर्स लिस्ट बनवली जाते,  या लोकांना वाचवायला   आजपर्यंत जितका पैसा कमावला असतो  तितका सगळा तो खर्च करुन  टाकतो.  आणि शेवटी तो दिवस उजाडतो. दोन ट्रेन मधे स्त्रिया आणि पुरुषांना बसवलं जातं आणि त्या गावाला ( नांव विसरलोय) पाठवलं जातं. पुरुषांची ट्रेन तर सुखरुप पोहोचते, पण स्त्रियांची ट्रेन मात्र मधे एकदा थांबवली जाते ऑस्टरविज  स्टेशनला.

सगळ्यांचे कपडे, काढून केस कापले जातात, आणि त्या चेंबरमधे सगळ्यांना ढकललं जातं, पहातांना आपला थरकाप उडालेला असतो, आता या सगळ्यांना गॅसने मारणार, ह्याची जवळपास खात्रीच असते आपली. पण तेवढ्यात  वरच्या गॅसच्या पाइप्स मधुन गॅस ऐवजी चक्क पाण्याच्या धारा सुरु होतात.. शिंडलर्स्चे कॉंटॅक्ट्स इथे कामी आलेले दिसतात. आणि आपण हुश्श करतो..

शिंडलर्स आता जवळपास पुर्ण ब्रोक होण्याच्या मार्गावर असतो, ११०० लोकांचा खर्च.. असतोच ना…

अगदी शेवटचा सीन खूप हदय स्पर्शी आहे. १९४४ -४५ चं वर्ष .. आता सहा वर्ष झाले आहेत.  शिंडलर्स पुर्ण पणे गरीब झालेला आहे, सगळ्या कामगारांना एकत्र करतो, आणि त्याचं भाषण.. अप्रतीम.. म्हणतो, की आता तुम्ही स्वतंत्र आहात, युद्ध संपण्याच्या मार्गावर आहे. मित्र राष्ट्र जिंकतय, आता ही फॅक्टरी बंद करावी लागेल मला , आणि इथून निघून जावं लागेल.. सहा वर्ष मी तुम्हाला सांभाळलं, पण यापुढे तुम्ही स्वतंत्र आहात..

शिंडलर्स अगदी वेगळाच उभा केलाय. एक जर्मन ,सुरुवातीला केवळ या युध्दाकडे एक इष्टापत्ती म्हणुन पहाणारा, नंतर त्या ज्यु मधे  गुंतून पडणारा भावना प्रधान जर्मन, बायको सोडून गेल्यावर पण भावनाविवश न  होणारा, पण शेवटी सगळ्यांना सोडून जातांना भावुक होणारा… असा हा …

जेंव्हा शेवटल्या भाषणानंतर जायला निघतो , शेवटी एक वर्कर जेंव्हा सगळ्यांच्या वतीने दातात लपवलेली एक अंगठी काढून देतो तेंव्हा मात्र शिंडलर्स तुटतो… आणि रडायला लागतो.   जेंव्हा त्याला स्टर्न म्हणतो, की सर, तुम्ही आमचे आणि ११०० लोकांचे प्राण वाचवले , तर त्यावर शिंडलर्सचं उत्तर असतं.. अरे   मी नाही, तर स्टर्न ने तुमचे प्राण वाचवले.. मी तर  नुसतई मजा केली , पैसा उडवला.. जर मी हा जो ऐश आरामावर खर्च केलेला पैसा लोकं वाचवायला वापरला असता तर ….  कारच्या बदल्या १० लोकं तरी वाचवता आले असते , टाय पिन च्या बदल्यात आणखीच १०-२० तरी नक्कीच वाचले असते , आणि असेच अजुन काही इतर वस्तूंच्या बदल्यात…

आत्ता पर्यंत केवळ मौज मस्तीच्या  मधे गुंतलेल्या शिंडलर्स मधला माणुस अतिशय प्रभावी पणे उभा केलाय या सिनेमात.  आता आज मी हा इतका जुना सिनेमा.. आणि त्याच्यावर का लिहितोय? तर कालच  रात्री हा सिनेमा पाहण्यात आला , आणि जेंव्हा संपला तेंव्हा आपण काय पाहिलं??? ह्याचा विचार करुन् डोकं सुन्न झालं.. आणि आजचं हे पोस्ट लिहिल्या शिवाय रहावलं नाही.

मला माहिती आहे की हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनीच  पाहिला असेल , तरी पण इथे हे लिहिलंय, जर माझ्या सारखाच तुमचा पण सुटला असेल पहायचा, तर नक्की पहा. एक अत्युत्कट भावना प्रधान चित्रपट पहिल्याचं समाधान मिळेल.

मी जेंव्हा शाळेत होतो, तेंव्हा मी कोणाला सिनेमाची स्टॊरी सांगायला लागलॊ, की मित्र थांबवायचे, म्हणायचे तु असंबध्द सांगतोस स्टोरी, अजिबात प्रयत्न करु नकोस.. .. तरी पण माझं हे पहिलं सिनेमाचं परिक्षण इथे पोस्ट करण्याची हिम्मत करतोय..आवडलं नाही, किंवा असंबध्द वाटलं तरी पण सांगा.. 🙂

इंटरनेटचा शोध जरा उशीराच लागला नाही का ?

Written by  on April 30, 2020

हल्ली इंटरनेट मुळे प्रत्येकाला कुठल्याही घटनेवर  आपले मत मांडायचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे वाटत असते, आणि मग    तो   फेसबुक, मायबोली, मी मराठी,मिसळ पाव – किंवा सकाळ मुक्तपीठ ऑन लाइन एडीशन वर  , आपल्या  प्रतिक्रिया देत असतात. ह्या प्रतिक्रिया तर बरेचदा मूळ लेखापेक्षा पण जास्त वाचनीय असतात. मानवी मनाचे विनोदी कंगोरे दाखवणाऱ्या ह्या प्रतिक्रिया खरंच वाचायला मजा येते. माझ्यासारखे काही लोकं तर  चक्क “काय वाटेल ते” ब्लॉग वर  लिहितात !

पूर्वीच्या काळी असे नव्हते, इंटरनेट नसल्याने आपली मते स्वतः पुरतीच मर्यादित ठेवावी लागायची . फार तर फार वाचकांची पत्रं मधे एखादे पत्र प्रसिद्ध झाले की  खूप काही मिळवलं असं वाटायचं. समजा,   जर “त्या काळी”  इंटरनेट असते, “तर त्या काळच्या” मोठ्या घटनांवर या इंटरनेट फ्रेंडली लोकांनी  कशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या असत्या ?  हा विषय आजचा!

बातमी क्रमांक १ :-

ताजम्हालाचे बांधकाम पुर्ण झाले.

११ सप्टेंबर १६३२ , शहंशहा शहाजहां यांनी ताजमहालाचे काम पुर्ण झाल्याचे जाहीर केले. लवकरच तिथे मुमताजचे शव आणून दफन करणार  …….हा लेखाचा मथळा

आणि ह्या प्रतिक्रिया लेखा खालच्या-

जुम्मा खान:- अभिनंदन शहेंशहाचे.. इतकी अप्रतिम सुंदर वास्तू बांधल्या बद्दल.

जुबेदा ( दूसरीबेगम):- बधाई हो.. शहंशहां.. हमारे लिए भी ऐसाही ताज बनवाओगे ना?

सुरेश:-तशी पण मुमताज काही  खास आयटम  नव्हती दिसायला, जितके पैसे त्या  ताज वर खर्च केले, तितक्या पैशात तर दररोज  नवीन मुमताज मिळाली असती.

रमेश काका:- उत्तम बातमी.

सदुभाऊ :-या बांधकामासाठी जो खर्च करण्यात आला , तेवढा पैसा   एखादे धरण जर बांधण्यात जर खर्च केला   असता तर करोडो एकर जमीन ओलिताखाली  आली असती.

रामभाऊ:- सदुभाऊ तुम्ही पुणेकर का हो?

प्रकाशचंद्र  :-खरे तर ही मूळ बातमीच खोटी आहे. ताजमहाल ही फार जुनी वास्तू आहे. ज्याला तुम्ही ताजमहाल म्हणता तो म्हणजे इथे पूर्वी शिव मंदीर होते. कळसावरच्या सूर्य प्रतिमा याची पुष्टी करतात. पूर्वी आमच्या असलेल्या मंदिराच्या चारही बाजूला मिनार बनवले आणि तिथे मुमताजला गाडणार म्हणे. तेजोमहालय चा ताजमहाल केला. निषेध!

मनोज( पुणेकर):- पुण्याचे नाव घ्यायचे काम नाही .  मुद्याचे बोला रामभाऊ, उगाच कांगावा नको, आणि पुणेकरांना दुषणे लावणे पण नको. तुम्ही बहुतेक मुंबईकर वाटतं?

(शहाजहांचे जेष्ठ पुत्र ) औरंगजेब:- की अशा तऱ्हेच्या वास्तू  ची गरज काय?  म्हातारचळ लागलाय, म्हाताऱ्याला बंदच करून टाकतो जेल मधे.

श्रीमती (इस्रायल) :- आमच्या इस्त्रायल मधे पण अशीच एक इमारत बांधण्याचा विचार केला गेला होता, पण असा पैसा खर्च करू नये ही जाणीव लोकांनी सरकारला करून दिल्याने बारगळला..

सुभाष:- नेहा , तुझ्यासाठी पण बांधेल  का ग ताजमहाल कोणी?? ( कोणी म्हणजे मी बरं कां नेहा……)

नेहा :- सुभाष, सकाळी आराशात तोंड पाहिलं होतं का? म्हणे ताजमहाल बांधतो…
रघु पुणेकर : निषेध.. निषेध.. निषेध.. जनतेच्या पैशाचा अपव्यय..
दुसरी बातमी :-  २० जुलै १९६९

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले. ही मुख्य बातमी…..

आणि ह्या प्रतिक्रिया :

टॉम:- अमेरिका रॉक्स! ये  …….

(राजशेखर ) रॉक्सी:- लॉंग लिव्ह अमेरिका. अभिनंदन! मानवाच्या उत्क्रांती मधला एक आवश्यक आणि खूप महत्वाचा दिवस.

सदुभाऊ (पुणेकर) :-  उत्क्रांती?? काय च्या कायच !

नुतन :- तुम्ही कितीही अमेरिकेचे कौतूक करा, पण अमेरिकेतल्या नासा मधे ८५ टक्के शास्त्रज्ञ हे भारतीय मुळाचे आहेत, म्हणजे एकंदरीत ह्या विजयाचे श्रेय केवळ भारतालाच दिले जाऊ शकते.

रामभाऊ :- भारतीय वंशाचे तर आहेतच, पण त्या ८५ टक्के शास्त्रज्ञांपैकी ९० टक्के हे मराठी आणि त्यातूनही औरंगाबादचे आहेत हे विसरून चालणार नाही. मराठवाडा रॉक्स!

विजय:- काहीच्या काही.. मराठवाड्यात तर सारखा दुष्काळ असतो . पश्चिम महाराष्ट्र रॉक्स!

कोंकणी  :- अरे घाटी… काय च्या काय पण बोलतो काय रे? कोंकणाची सर नसे कुणालाच… रुपेरी वाळू, माडाची बने.. सगळं काही आहे ते फक्त कोंकणातच, तुमच्या घाटावर काय आहे रे? आणि होय, ते ९८ टक्के शास्त्रज्ञ आमच्या रत्नांग्रीचे बरं कां…

फेस्बुकर:- च्या मायला, काय टाइम पास करून रायले बे? त्या ९०  टक्के शास्त्रज्ञां पैकी ८० टक्के हे गडचिरोलीचे आहेत, तुम्हाले मालुम  नसल तर नावं बी सांगतो…

शिरप्या गणपत :-आता चंद्रावर जाऊन इतका खर्च करायची काय गरज होती का ? आणि आणलं ,तर काय म्हणे दगड -गोटे.. कमीत कमी सोनं तरी आणायचं. नसती ऊठाठेव आहे ही.

तिसरी बातमी :

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2012/10/indira.jpg)

इंदिरा गांधी( नेट वरून ..)

१९६५ जवाहरलाल नेहरूंची मुलगी  इंदिरा गांधी पंतप्रधान झाली.

ही मुख्य बातमी..

आणि ह्या प्रतिक्रिया….
तुषार:- कॉंग्रेसचा विजय असो.. काय दिसते नेहेरूंची मुलगी?? सुंदर .. अशा सुंदर मुली जर राजकारणात पडल्या, तरच  देशाचे भले होईल. तरूणांमध्ये पण राजकारणाची गोडी वाढेल.

रामभाऊ :- इंग्रजां पूर्वी राजे महाराजे होते, आता इथे लोकशाही आहे ना? पण वारसाहक्क सुरु झालाय . या पेक्षा इंग्रजांचे राज्य काय वाईट होते?

सुभाष :- नेहा, तू कुठे आहेस? तुझी कॉमेंट दिसली नाही बरेच दिवसात. तुझी कॉमेंट वाचली नाही की कसे उदास मन होते.

नेहा: आहे, रे.. मी इथेच आहे, पण हल्ली जरा वेळ नसतो  ऑन लाइन यायला. मी पण राजकारणात पडायचं म्हणते आहे. माझे बाबा म्हणतात, मी दिसते इंदिरा सारखी.

कुमार :-   खरं तर बाबासाहेब हेच खरे लायक उमेदावार आहेत पंतप्रधान पदासाठी. जातीयता नष्ट झालीच पाहिजे, तेंव्हाच खरा मागासवर्गीय पंतप्रधान होऊ शकेल..

सदुभाऊ पुणेकर:- अहो, कुमार, ते देशाचाच विचार करताहेत, एकत्र येऊन लोकसंख्या कशी वाढवायची याचा..

राजश्री :- मी पण राजकारणात पडणार होते, पण ’ह्यांनी’ आधार दिला आणि राहून गेलं!

राजशेखर :- अरे  कॉंग्रेस विसर्जित करा म्हणाले होते महात्मा गांधी. आता स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉंग्रेसचे काय काम?  दिव्यावर शिक्का मारा .. मते कुणाला?…. जनसंघाला..

संतोष :- सदुभाऊ, +१  पण गेले कित्येक महिने हे दोघंही इथेच मुक्तपीठ टाइमपास करत असतात, यांची केस काही पुढे सरकतच नाही बॉ.

वर दिलेली तीन उदाहरणं केवळ सॅंपल समजा. अशा अनेक घटना आहेत, की ज्यावर मस्त कॉमेंट्स आल्या असत्या. जसे, १९७४ :- भारताने अणूस्फोट केला.१९७५ :- इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली,  जनता पार्टी सत्तेवर आली, बोफोर्स, वगैरे वगैरे….

इंटरनेटचा शोध जरा उशीराच लागला नाही का ?

 

व्हाईट इंडीयन हाउस वाईफ…

Written by  on April 30, 2020

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/01/dsc_9650-199x300.jpg)बरेचसे मराठी लोकं अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला आणि इतर देशात पोहोचले आहेत. कामाच्या निमित्याने नवऱ्याबरोबर डिपेंडंट व्हिसा ( जरी बायको सुशिक्षित असेल तरी पण) घेउन अमेरिकेत जाउन रहाणाऱ्याची संख्या पण खूप आहे. दूर कशाला, माझी बहीण पण बिई+ एमबीए फिनान्स करुन  तिथे हाउस वाइफ म्हणुन राहिली. भारता मधली कामाची सवय, आणि यु एस ला गेल्यावर भयाण रिकामपण… केवळ तिला अभ्यासाची आवड म्हणून कुठलातरी फिनान्स चा कोर्स केला होता तिने तिथल्या वास्तव्यात. पण जर असा काही इंटरेस्ट नसेल तर  बाहेर रहाणं अतिशय कंटाळवाणं होतं.

दुसरा देश, एकटं रहाणं दिवसभर.. काय करणार? दिवस काढणं कठीण होतं. इथून जातांना जास्त वजन नेता येत नाही म्हणून आवडीने घेतलेली बरीचशी पुस्तकं इथेच ठेऊन जावी लागतात.   सोशल साईट्स हा एक पर्याय असतो, पण ते तरी किती दिवस करायचं??

सोशल साईट वर विनाकारण टवाळक्या करायचा पण कंटाळा येतो. निरर्थक गप्पा, टप्पा.. किती मारायच्या?? त्याला पण लिमीट आहे की नाही.. नाही तर.. जाउ द्या…

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/01/img_0177-300x225.jpg)कधी विचार केलाय की भारता मधे जर एखादी परदेशी तरुणी आली , आणि तिने इथेच रहाण्याचे ठरवलं तर तिचं आयु्ष्य कसं असेल??..एक ऑस्ट्रेलियन तरुणी शरील कुक मेलबॉर्न मधुन  सुटीवर भारतामधे फिरायला येते. व्यवसायाने अकाउंटंट.. इथे आल्यावर एका भारतीय तरुणाशी प्रेमात पडून लग्न करते आणि इथलीच होऊन जाते.. कल्चरल डिफरन्सेस इतके जास्त असतात की सरळ परत निघून यावंसं वाट्त, पण ती मात्र  भारताच्या प्रेमातच पडते .

तिचा एक ब्लॉग आहे… तिच्या ब्लॉग  मधे ती लिहिते -भारतीयाशी लग्नं केलं , इथे भारतामधे ती रहायला आली, आता इथेच रहायचं म्हणून इथल्या संस्कृतीशी जुळवून घेणं आलंच.. इथल्या संस्कृतीशी जुळवून घेण्याची तिची धडपड……. आणि   तिच्या नजरेतून भारत कसा दिसला  ?? यावर एक सुंदर ब्लॉग वाचायला मिळाला. डायरी ऑफ अ व्हाइट इंडीयन हाउस वाईफ. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.whiteindianhousewife.com/)

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/01/snake.jpg)त्या साईटवर मी कसा पोहोचलो?? गुगल रिडर मधे रेकमंडेड आयटम्स मधे तिचे पोस्ट एक रेकमंड केलं मला गुगल अंकलनी.. क्लिक केल, तो ब्लॉग उघडला, आणि ते पोस्ट तर वाचलंच पण त्याच सोबत इतरही बरेच पोस्ट वाचून काढले. आणि नंतर मग तिचा ब्लॉग सरळ गुगल रिडरवर घेउन ठेवला.

तिचे सगळे अनुभव तिने या ब्लॉग वर लिहुन ठेवले आहे. आणि प्रत्येक पोस्ट जे आहे ते अगदी शंभर टक्के   अगदी खरं खरं .. म्हणजे तिला जे वाटेल ते – एकदम ‘दिलसे’ लिहिलंय तीने.

तिचे भारतामधले अनुभव, हिंदी शिकणं,  हिंदी मधे कोणाशी बोलते , तेंव्हा त्यांना वाटणारे आश्चर्य… आणि असे अनेक पोस्ट्स.. आहेत या ब्लॉगवर ज्या मुळे हा ब्लॉग खूप इंटरेस्टींग झालाय.. मी स्वतः हा ब्लॉग नेहेमी वाचतो.

कुठे तरी तिच्या ब्लॉग वर वाचलंय की ती स्वतः लोकांच्या पाया पडणॆ ( नमस्कार करणे) एंजॉय करते- आता ह्यात काय  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/01/request.jpg)आहे एंजॉय करते??कुणाला कुठल्या गोष्टीचं कौतुक वाटेल ते सांगता येत नाही…   असे अनेक लहान लहान प्रसंग आहेत तिच्या जीवनातले ती इथे शेअर करते.

लोकं आपलं घर स्वच्छ ठेवतात, पण खिडकी मधुन खाली कचरा का टाकतात?? याचं आश्चर्य वाट्त तिला,  आणि त्यावर पण ती एक पोस्ट लिहीते.. आता आपल्या दृष्टीने खिडकीतून कचरा फेकण नॉर्मल आहे.. पण .. तिच्या नजरेला ते बोचलं…!!! तिच्याच कॉम्प्लेक्स मधे एक नोटीस लागते, ती तिने ब्लॉग वर पोस्ट केलेली आहे.

भारतात गाय पवित्र का मानतात?? आणि तत्सम गोष्टीवर पण तिने  एक पोस्ट लिहिले आहे. बरं, नुसतं पोस्ट लिहिलं असं नाही, तर एके ठिकाणी चक्क उपनिषदावरची तिची टिप्पणी आहे की जी  वाचून आश्चर्य वाटल्या शिवाय रहाणार नाही. जेवढ्या सहजतेने ती हे लिहिते, तेवढ्याच सहजतेने डास मारायची बॅट ( अहो ती व्हिटी, किंवा चर्चगेटच्या जवळ मिळते ती) आणि तिची उपयोगिता यावर पण तेवढ्याच सहजतेने लिहिते. 🙂

भारतामधे घरात कामवाली बाई असतेच.. इथे कामवाली असणं म्हणजे लक्झुरी नाही तर नेसेसिटी आहे. जेंव्हा ती पहिल्यांदा घरात कामाला बाई ठेवते, तेंव्हा तिच्या बरोबरची ईंटरॅक्शन आणि कसं वागायचं तिच्याशी?? हा पडलेला प्रश्न म्हणजे तिचं एक पोस्ट, जेंव्हा वाचलं गुगल रिडरमधुन तिच्या ब्लॉग वर जाउन कॉमेंट टाकल्याशिवाय रहावलं नाही- उगिच तिचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून… 🙂    हो ना..  मोलकरणीला मिठ्यामारते ही  शरील….:)

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/01/img_8352a.jpg)कोणाकडे भेटायला जातांना अपॉइंट्मेंट न घेता जाणे हे  तर अगदी कॉमन आहे भारतामधे. कोणीतरी डोअर बेल वाजवत, अन दार उघडायला समोर जावं लागतं. घरात असतांना आपल्याला नाईटी घालुन कोणी पाहिल म्हणून आलेला अस्वस्थपणा, आणि नंतर इतर स्त्रियांना पण तसंच पाहिल्यावर – वागणुकीत येणारा सहजपणा अतिशय सुंदर व्यक्त केलाय .कधी तरी कोणाच्या तरी घरी गेल्यावर पुरुष मंडळी बाहेरच्या खोलीत बसल्यावर, घरच्या गृहिणीने तिला आपल्या सोबत किचन मधे गप्पा मारायला बोलावले, तेंव्हाचा तिला बिअर ऑफर केली जाते, आणि ती हवी असतांना पण केवळ वाईट दिसेल म्ह्णून नाही म्हणते, तेंव्हाच ती हे पण म्हणते, की माझी खरं तर इच्छा होती बिअर प्यायची, पण …..!! म्हणजे सच्चेपणा आहे तिच्या लिखाणात!

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/01/6200_110054228269_94103103269_2173060_6868903_n.jpg)बरं मंडळी.. हे सगळं तर ्ठीक आहे.. पण तिची भारता बद्दलची क्वेस्ट इतक्यावरच थांबत नाही. ती  चेन्नाई ते मुंबई ऑटो रिक्शाने प्रवास करते.. स्वतः ड्राइव्ह करत.. खरंच .. तिने १३ दिवसात चैन्नाइहून निघाल्यावर ती व्हाया म्हैसुर, बंगलोर , मुरडेश्वर, महाबलेश्वर, गोवा वगैरे ठिकाणं कव्हर करित २००० किमी चा टप्पा तिने पार केलाय १३ दिवसात. यावर तिने एक पोस्ट लिहिलंय आणि काही फोटो पण टाकले आहेत फेसबुकवर. लिंक आहे तिच्या ब्लॉग वर.. आता मुंबईला आल्यावर रोज कुठे ऑटॊ चालवायला मिळणार?? पण एक दिवस   रात्री एका ऑटॊ  वाल्याने ऑटॊ चालवायला दिला, आणि दुसऱ्या दिवशी  तिने एक पोस्ट टाकले …

अजुन बरेच अनुभव आहेत तिचे.. जसे पायात जोडवी (टो रिंग)घालणं वगैरे पण एका पोस्टचा विषय आहे. लग्न झालं आणि ही बाई आधी मार्केटला जाउन जोडवी विकत आणून पायात घालते… !!! कल्चरल डिफरंन्सेस ची गॅप भरुन काढायला??

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/01/img_7511a.jpg)तिचा ब्लॉग  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.whiteindianhousewife.com/)म्हणजे अशा अनेक अतर्क्य घटनांची जंत्री आहे.. एकदा वाचणे सुरु कराल , तर नक्कीच किती वेळ घालवाल या ब्लॉग वर ते सांगता येत नाही. प्रत्येक पोस्ट वाचनीय आहे.. एकदा वाचाल, तर नक्कीच फॉलो कराल.

हे पोस्ट शेरिलला थॅंक्स म्हटल्या शिवाय पुर्ण होऊच शकत नाही.  तिला मेल पाठवला, तिने फोटो वापर म्हंटलं, पोस्ट लिहिण्याला पण काही आक्षेप घेतला नाही म्हणून हे पोस्ट लिहिता आलं.. तिला समजावं म्हणून खाली एक लहानशी टीप्पणी देतोय..

Hi Sharell,
Thank you very much for allowing me to use your pics on my blog in this post..
Mahendra