हॅपी टु हेल्प

Written by  on May 31, 2014

Everyday I want to fly, stay by my side
Everyday I want to dream, stay by my side
Every morning I wish I could just play
Wish the mornings would just stay…..

you and I

परवा टिव्ही वर तो चीर परिचित आवाज आणि म्युझिक सुरु झालं.. आणि तो पग आणि मुलगी पुन्हा टीव्ही वर दिसली आणि एकदम छान वाटलं. जसं कोण एखादा जुना मित्र भेटल्यावर वाटावं तस्सं वाटलं अगदी. नाही.. मी इंग्रजीत ब्लॉगिंग सुरु करणार नाही. 🙂 फक्त हे गाणं इथे पोस्ट केलंय..

व्होडाफोनच्या जाहीरातीमधुन त्या पग ला काढुन टाकलं आणि त्या ऐवजी ते झु झु कॅंपेन सुरु केलं म्हणून मला खूप वाईट वाटलं होतं.पण त्या झु झु ऍड कॅंपेन ला पेटाचं  ( पिपल फ़ॉर एथिकल ट्रिटमेंट टु ऍनिमल्स) बक्षिस मिळालं होतं हे किती जणांना माहिती आहे?  या जाहिरातीमधे प्राण्यांचा वापर न करुन सुध्दा इतक्या चांगल्या पद्धतिने मेसेज कन्व्हे केला म्हणून हे बक्षिस देण्यात आलं होतं..

व्हॊडाफोनची  ऍड आल्यावर -जेंव्हा ही ऍड खुप हिट झाली होती तेंव्हा या पग ची फॅशनंच आली होती. आर्टीफिशिअल ब्रिडींग करुन बरेच पग विकले गेले.ज्यांच्याकडे कालांतराने खूप दुर्लक्ष केलं त्यांच्या मालकांनी… (असं पेटाला वाट्तं)आणि केवळ याच कारणासाठी पेटाचा या जाहिरातींना विरोध ( म्हणण्यापेक्षा प्राण्यांना जाहिरातीत वापरण्यावर विरोध होता)

ते कुत्र्याचं पिलु मला इतकं आवडायचं ,की अगदी आपलं स्वतःच्या मालकीचं असल्यासारखं वाटायचं. ती जाहिरात सुरु झाल्यावर   मी कधीच चॅनल बदललं नाही. कितीही वेळा ती ऍड आली तरीही सर्फिंग न करता पुर्ण पहायला मला आवडायची.या जाहिरातीतल्या त्या सिंपल चार ओळी, सुंदर अगदी मेलोडियस म्युझिक आणि फेशनेस… इतका की कधीही पहा , ऍड फ्रेश वाटेल असा..म्हणून मला वाटतं, ती जाहिरात न आवडणारा माणुस  क्वचितच सापडेल.

अशा परिस्थितीत ती झु झु ची ऍड लॉंच केली गेली – जी मला कधीच आवडली नव्हती.कारण त्या  मधे अजिबात ह्युमन टच नव्हता. त्यामुळे   एकदा पाहिली जायची .पण परत तिच पुन्हा दाखवली की मग मात्र   इरिटेटींग व्हायचं. पण ती जाहिरात पण आपला मेसेज कन्व्हे करण्यात यशस्वी ठरली. कालांतराने फॅड ओसरल्यावर मात्र व्ह्युअर्स पण कंटाळले , आणि हेच लक्षात आलं म्हणून कदाचित पुन्हा ते जुनाच कॅंपेन ( जे २००८ पासून सुरु आहे ते) पुन्हा सुरु केलंय व्होडाफोननी.

ते पग म्हणजे व्होडाफोन- हे समिकरण इतकं डोक्यात बसलंय लोकांच्या, की अगदी रस्त्याने जातांना जरी एखादा तसा पग दिसला तर.. सहजच म्हंटलं जातं.. तो बघ व्होडाफोनचा कुत्रा….  🙂 एखाद्या गोष्टीला एखाद्या प्रॉडक्ट शी कोरिलेट करुन ओळखलं जाणं हेच त्या ऍड चं सक्सेस आहे.

एका लहान मुलीला तो पग प्रत्येक गोष्टीत मदत करतो. ती जिथे कुठे जाईल तिथे तिला फॉलो करतो.तिचे सॉक्स , तिला आणून देतो.. वगैरे वगैरे .. मला सगळ्यात जास्त आवडली होती जाहिरात, ती- ज्या मधे ती मुलगी पोस्टाची तिकिटं चिकटवते, आणि हा पग आपली जीभ बाहेर काढून तिला चिकटवायला मदत करतो.

आता या जुन्या जाहिरातींसोबतंच नवीन जाहिराती बघायला मिळतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पग परत आला… मला खूप आनंद झाला….. !

या व्यतिरिक्त पण खूप जाहिराती आहे यु ट्य़ुबवर.. जवळपास सगळ्याच…. जरुर पहा.. जर डाउन लोड करुन संग्रह करायचा असेल तर इथे क्लिक करा ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.vodafone.in/existingusers/Pages/vodafoneTVC.aspx?PNo=02&yr=2007).. या ठिकाणी व्होडाफोनच्या सगळ्य़ा जाहिराती.. इन्क्लुडींग झु झु आहेत…

पण एक सांगावंसं वाटतं , की हच च्या जाहिराती या व्होडाफोनपेक्षा जास्त चांगल्या वाटायच्या… अर्थात  पग च्या म्हणतोय मी..

मुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का?

Written by  on May 19, 2014

काय वाटेल ते, mahendra kulkarni, kayvatelte.comमाणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का वृद्धांना? आपण रहातो कसे तर कंजूष माणसासारखे.. नेहेमीच हा विचार मनात असतो, की मुलांची शिक्षणं व्हायची आहेत, आजारपण, म्हातारपण या साठी पैसा गाठीशी असायला हवा, म्हणून आज काटकसर करून पैसा जमा करून ठेवण्याकडे आपला कल असतो.

आपलं वृद्धावस्थेतलं जीवन सोपं होईल या पैशांमुळे असे वाटत असते आपल्याला. पण खरंच तसं असतं का?   हा जवळ असलेला पैसाच जिवाचा शत्रू बनल्याचे गेल्या पंधरा वीस दिवसातील सहा वृद्धांच्या दिसून येते.

चांगल्या मोठ्या हुद्द्यावर रिटायर झाल्यावर,पैसा गाठीशी असतो, भरपूर पेन्शन असते, आणि मग स्वतःच्या स्वातंत्र्यावर कुठलीही बंधन नको  म्हणून स्वखुशीने एकटे रहाणारे   वृद्ध, किंवा दुसरा प्रकार म्हणजे मुलं परदेशी नोकरी निमित्त गेल्याने नाईलाजाने एकटे रहाणारे वृद्ध, किंवा तिसरे म्हणजे निराश्रित वृद्ध.

वृद्ध मंडळींनी एकटे रहाण्यात काही  वावगे आहे असे नाही,पण गेल्या पंधरा दिवसात सहा वृद्धांची  हत्या केल्याची बातमी वाचली,  आणि वृद्धांनी एकटं रहाणं किती अवघड आहे हे जाणवलं.   ” मॅन सपोझेस, ऍंड गॉड डिस्पोझेस” किती खरी आहे -नाही का? आयुष्यभर काट कसर करून जमवलेले पैसे, एक दिवस कोणीतरी कामवाला, कामवाली घेऊन पळून जातो, आणि जाताना  आपण सापडू नये म्हणून त्या वृद्धाचा खून पण करतो.

पोलीस नेहेमी ओरडून सांगत असतात, की घरगडी ठेवतांना त्याची माहिती पोलीस स्टेशनला पाठवून त्याचा शहानिशा करून घ्या, पण तसे कोणी करतांना दिसत नाही, आणि मग शेवटी त्याचा परिणाम असा झालेला दिसतो.

पूर्वीच्या काळी शेजारधर्म होता. शेजारच्या खोली मधे काय सुरु आहे हे चाळीतल्या सगळ्यांना माहिती असायचं. कोणाकडे कोणीही  नवीन माणूस आलेला दिसला   तरी ” तू कॊण रे बाबा? ” म्हणून आवर्जून चौकशी केली जायची. आजच्या फ्लॅट संस्कृती मधे शेजारच्या फ्लॅट मधे कोण रहातं हे पण कोणालाच माहिती नसते. एखाद्या वृद्धाचा खून झाल्यावर त्याच्या डिकम्पोझ्ड शरीराचा वास येणे सुरु झाल्याशिवाय शेजारचा माणूस चौकशी करत नाही.

हे असे लोकं आपल्या सोबतीला म्हणून नोकर ठेवतात. घरकाम करायला वेगळा, स्वयंपाकाला वेगळा आणि सोबतीला वेगळा असे काहीसे स्वरूप असते. कंपॅनियन म्हणतात या नोकरांना. यांच्या आवश्यकता पण वेगळ्या असतात, या नोकरांना टीव्ही, एसी, फ्रीज चा पूर्ण असेस हवा असतो.   आवडीचे प्रोग्राम टिव्हीवर पहाण्याचे स्वातंत्र्य, जे हवे ते खाण्याचे स्वातंत्र्य.. वगैरे वगैरे नोकरीच्या सुरुवातीलाच ठरवून घेतले जाते. हे नोकर दिवसभर कंपॅनियन म्हणून असल्याने सा्रखे घरमालक सोबतच असतात- त्यांना औषध देणं, घरातली फुटकळ कामं करणं एवढंच त्यांचं काम.  सारखे सोबतच असल्याने,   घरातले पैसे काढणे, दाग दागिने काढणे  वगैरे त्यांच्या समोरच केले जाते.  घरात कुठे काय आहे , हे सगळं त्यांना ठाऊक असतं. सुरुवात फुटकळ चोऱ्या पासून होते, आणि नंतर मग …..

सगळ्या फ्लॅट्सच्या सुरक्षेची जबाबदारी वॉचमन या प्राण्यावर असते. हे वॉचमन शक्यतो बिहार किंवा युपी मधले असतात, आणि जवळ पासच्या  कुठल्यातरी झोपडीत रहात असतात. सोसायटी एखाद्या वॉचमन पुरवणाऱ्या कंपनीशी संधान बांधून हे वॉचमन भाड्याने घेते.   ह्या  वॉचमन लोकांना सप्लाय करणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे.     सप्लाय कंपनी  जे वॉचमन सप्लाय करते, ते पण  सगळ्या वॉचमन बद्दल माहिती ठेवत असतील का? हा संशयच आहे .   बरेचदा तर  सोसायटी मधे  रहाणाऱ्या रहिवाशांना अडवण्यापासून तर एखाद्या भिकाऱ्याला/ सेल्स मॅनला  दारावरची घंटी वाजवून त्रास देण्यासाठी  आत सोडण्याचा  मूर्खपणा करतांना हे दिसतात.  याचे कारण म्हणजे जी कंपनी वॉचमन पुरवते ती दर पंधरा दिवसांनी वॉचमन बदलत असते, ज्या मुळे सोसायटीत रहाणारे कोण आणि चोर कोण हेच त्यांना ओळखता येत नाही.

या शिवाय घरात भांडी, धुणे, लादी कामासाठी येणारा नोकर वर्ग वेगळा. या लोकांची एक  स्वघोषितसंघटना असते. यांचे पण काही अलिखित नियम असतात. किती पैसे घ्यायचे, किती काम करायचे, वगैरे वगैरे.. एकमेकाच्या कामावर डल्ला मारायचा नाही वगैरे. चांगला नोकर मिळवणे हे पण हल्ली दुरापास्त झाले आहे. आजकाल घरातले सगळे लोकं काम करण्यासाठी बाहेर जातात. मग घराची किल्ली पण कामवाली कडे दिलेली असते. तिने यायचे आणि आपले काम करून जायचे.

घराची किल्ली एखाद्या नोकराच्या हाती देणं हे हल्ली काळाची गरज झालेली आहे असेही म्हणणारे लोकं दिसतात. पण त्यांनी घरात इकडे तिकडे पसरलेले पैसे, किमती वस्तू वगैरे समोर दिसल्यावर त्या नोकराचा स्वतःवर किती दिवस ताबा राहील? एखाद्याने चान्स नाही म्हणून चोरी न करणे वेगळे, आणि उघडी तिजोरी समोर दिसत असतांना चोरी न करणे वेगळे! घरातल्या वस्तू कुलुपात ठेवणे, घरातल्या नोकरा समोर आपल्या संपत्तीचे प्रदर्शन न करणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर थोडा तरी आळा बसेल या गुन्हेगारीला. ..

हल्ली प्रत्येक गोष्टी साठी कॉंट्रॅक्ट लेबर  बोलावण्याची पद्धत  सुरु झालेले आहे. त्या मधे पाण्याचा नळ लिक होणे पासून तर लाईट स्विच बदलणे, सुतार या सगळ्या कामासाठी कॉंट्रॅक्ट लेबर्स सोसायटी मधे येत असतात. या लेबर्स ला कोणी आय कार्ड वगैरे विचारत नाही.   ह्या कामांच्या बुरख्याआड    कोणीही फ्लॅट  मधे येऊन चोऱ्या करू शकतो.

एक लक्षात येतंय, की हल्ली सगळे फ्लॅट मधे  एकेकटे रहाणारे वृद्ध  लोकंच या गुन्हेगारीचे बळी ठरत आहेत. ज्या वेगाने ह्या घटना दररोज पेपर मधे छापून येत आहेत, त्यावरून संशय येतो की हे लोकं एखाद्या संघटित गुन्हेगारीचे मोहोरे तर नाहीत?? सरकार प्रत्येक फ्लॅट स्क्मिला संरक्षण तर पुरवू शकत नाही हे जरी खरं असलं, तरीही सोसायटी मधे कामासाठी येणाऱ्यांचं पोलिस व्हेरीफिकेशन आवश्यक आहे असा कायदा सोसायटीने केला तरच याला आळा बसू शकेल.

मुंबई, वृद्धांनी रहाण्यासाठी सुरक्षित आहे का? याचं उत्तर मला तरी सापडत नाही.