शशी थरुर कॉंट्रोव्हर्सी

Written by  on January 12, 2014

शशी थरुरच्या नावाने सारखा काहितरी इशु करायची सवयच लागलेली आहे मिडीयाला. त्या कॅटल क्लास च्या कॉमेंट मुळे मला पण थोडा राग आलाच होता, पण नंतर  इन द लाइटर व्हेन जेंव्हा बघितलं , आणि ते वाक्य जेंव्हा वाचलं ,तेंव्हा तितकंसं मनाला बोचलं नाही ते वाक्य, उलट मला हसु आलं.. फॉर अ मोमेंट..

शशी विमानातल्या एकॉनॉमी क्लास ला कॅटल क्लास  म्हंट्लं,तर इतकी बोंबाबोंब केली मिडीयानी, जर शशी एखाद्या दिवशी मुंबईच्या लोकलने प्रवास करा असं म्हंटलं तर  मुंबईच्या लोकलला काय म्हणेल शशी??

एखाद्या खाण्याच्या वस्तुच्या डब्यात जसे झुरळं तयार व्हावेत तशी परिस्थिती असते मुंबईच्या लोकल्सची.लोकल हा इशु नाही आजच्या लेखाचा. जस्ट लिहिण्याच्या ओघात आलं म्हणुन लिहिलं झालं.

तर आजच्या पेपर मधे शशी थरुरच्या कालच्या ट्विट वर पुन्हा गदारोळ उठवायचा प्रयत्न सुरु केलाय मिडीयाने. असं काय लिहिलं होतं त्यानी?? खरं तर ते ट्वीट मी पण पाहिलंय.त्या ट्विट मधे कांहिही ऑफेन्सिव्ह नाही. ते ट्विट असं आहे..

” Have   ridiculously   full   schedule   tomorrow   with   17   meetings   /  engaements.   You   always   pay   price   when    u   come   back   from   a   trip“

.त्यामुळेच कदाचित असेल की त्याच्या प्रत्येक ट्वीट वर मिडियाची तिक्षण नजर असते. त्याने कुठलेही ट्विट केले की लगेच मिडिया त्या ट्वीट चा अर्थ लावण्यात मग्न असतात. मग कुठलेही साधे सरळ ट्विट पण  तोडु फोड करुन किंवा त्याचा नसलेला अर्थ लाउन प्रसिध्द केलं जातं वृत्तपत्रात.. ….आज काय तर  म्हणे शशीला कामाचा कंटाळा आलाय….असा अर्थ काढलाय वरच्या ट्विट चा! 😀

त्याचे  ट्विट्स वाचल्यावर लक्षात आलं की हा पण अगदी आपल्या सारखाच एक सामान्य माणुस आहे. ज्याला पण कधी तरी ह्युमर हवंसं वाटतं , तर कधी तरी काम इतकं वाढून जातं की कामाचा पण कंटाळा येतो. अर्थात, यामधे मला तरी काहिच वावगं वाटलं नाही.

शशी थरुरच्या नावाने नुसती बोंबाबोंब करणाऱ्या मिडीयाने त्याच्या सॉफ्टर साईडला नेहेमीच नजर अंदाज केलंय. केरळामधल्या एका १७ वर्षाच्या मुलिचे दोन्ही पाय रेल्वे ऍक्सिडेंट मधे कापल्या गेले. तिच्याबद्दल त्याने जेंव्हा ट्विट  ^(http://rangmarathiche.com/goto/http://tharoor.in/media/lifeline-from-twitterer-tharoor-for-kerala-girl/)केलं तेंव्हा बऱ्या फॉलोअर्सनी तिला मदतिचा हात दिला. तिच्या आर्टिफिशिअल लिंब्स चा , आणि ऑपरेशन चा खर्च पुर्णपणे या ट्विटमुळे निघाला.

भारतिय मिडीयाला सारखं मायावती, लालू यादव, मुल्लायम सिंग सारख्या “लर्नेड” लोकांशी डिल करण्याची सवय झालेली असल्या मुळे शशी थरुर सारख्या उच्चशिक्षित आणि ऍरिस्टोक्रॅट पर्सनॅलिटीला सारखं पाण्यात पहाण्याशिवाय काहिच करु शकत नाही.तसं आपले पंतप्रधान किंवा चिदंबरम पण हार्वर्ड ग्रॅज्युएट आहेत. पण दोघांचिही रहाणी अतिशय साधी असल्यामुळे ते लक्षात येत नाही.

शशी थरुरचा म्हणजे इतर सोम्या गोम्या राजकारण्यांप्रमाणे नाही, की जो इतर राजकारण्यांप्रमाणे लोकसभेमधे मारा मारी, किंवा आरडा ओरडा करेल असा!! तो एक सुशिक्षित नेता आहे, आणि अशा प्रकारच्या नेत्यांचीच आज आवश्यकता आहे भारताला. नुसते स्वतःचे पुतळे उभे करणाऱ्या त्या मायावती पेक्षा , किंवा गुंड, खुनाचे आरोप असलेले, जेल मधे राहुन इलेक्शन जिंकलेले, भाईगिरी करणारे नेते.. यांच्या पेक्षा शशी थरुर खुपच वेगळा आहे, आणि नेमकं हेच मिडियाला सहन होत नाही.

मिडीयाच्या लोकांना जास्त हुशार  (म्हणजे त्यांच्या पेक्षा) लोकं आवडत नाहित.. त्यांना डंब ऍंड डंब लोकंच ज्यांचा बुध्यांक त्यांच्यापेक्षा कमी आहे असेच लोकं आवडतात.. धोतराचा सोगा सांभाळत पैशाच्या पेट्या रिचवणाऱ्या नेते लोकं मिडीयाला आवडतात. दुधाची पिशवी जमिनिवर ठेवल्यावर दिसणाऱ्या शरिर यष्टीचे नेते हेच खरे नेते असं जर्नॅलिस्ट लोकांना  वाटतं की काय हा प्रश्न मला नेहेमिच सतावतो.

जर्नॅलिझम क्षेत्रात आजकाल पुर्वी प्रमाणे विचारवंत कमी होत चालले आहेत. जे कोणि आहेत ते सगळे कुठल्या ना कुठल्या पक्षाचे भोंपु बनलेले आहेत. विद्याधर गोखले, अरुण टीकेकर, माधव गडकरी, किंवा अरुण शौरी असे अनेक जर्नॅलिस्ट होऊन गेले.( कुमार केतकर पण मला आवडतात, त्यांचं लिखाण पण वाचनिय असतं-जरी ते गांधी घराण्याचे भोंपु असले तरिही  मला आवडतात). पण आजचे जर्नॅलिस्ट काय करतात? तर नेट वर बातम्या वाचुन त्याच बातम्या थोड्या फरकाने छापुन नुसती पानं भरतात पेपरची. स्पेशिअली इंग्रजी वत्तपत्रात तर चक्क बातम्या ढापलेल्या असतात ब्रिटिश मिडीया किंवा अमेरिकन मिडियाच्या..

तर हे असे जर्नॅलिस्ट जेंव्हा शशी थरुर सारख्या वयाच्या २० व्या वर्षी राजिका कृपलानी यंग जर्नॅलिस्ट ऍवॉर्ड मिळवणाऱ्या , तसेच १९८८ मधे स्विट्झरलॅंडला वल्र्ड इकॉनॉमिक फोरमने शशी चा  “वर्ल्ड लिडर ऑफ टुमारो” म्हणुन गौरव केला होता- अशा माणसाच्या नावाने ओरडा करणे निव्वळ मुर्खपणा आहे असं मला तरी वाटतं..  त्याच्या नावाने  शिमगा करण्यापेक्षा, त्याच्या क्वॉलिटीज पैकी १० ट्क्के जरी मिळवायचा प्रयत्न केलात ना, तरिही तुम्ही यशस्वी जर्नॅलिस्ट होऊ शकाल…

बदकांच्या कळपात एखादा राजहंस आला तर बदकं त्या राजहंसाला जसं ट्रिट करतात ,तसं ट्रिट करणं सुरु आहे शशी थरुरला मिडायामधे.. इंडीयन मिडीया शुड ग्रो अप…अजुन काय लिहावं यावर? मला वाटतं माझा मुद्दा मी  स्पष्ट लिहिलाय..

पाण्यात विरघळणारं प्लास्टीक…

Written by  on January 2, 2014

अगदी मनापासून सांगतो.. हे पोस्ट तुम्हाला ज्ञान बिड्या पाजायला लिहित नाही. आता ज्ञान बिड्या ( खरा शब्द आहे ग्यान बिड्या = विनाकारण एखादी गोष्ट पांडीत्याचा आव आणून शिकवणे ) हा शब्द लहानपणी खूप वापरायचो आम्ही. काल सहज आठवला, आणि आता लिहिण्याच्या भरात इथे पण उमटला.

प्लास्टीक चे दुष्परीणाम यावर काही तुम्हाला सांगायला जाणं म्हणजे काजव्याने सुर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे. या विषयावर वर्षानू वर्ष लिखाण झालंय. लोक जागृती साठी मुंबईमधे २० मायक्रॉन पेक्षा कमी साइझ चे प्लॅस्टीक वापरणे यावर बंदी घातली आहे महापालिकेने .. आता महापालिकेचं कोण ऐकतं?? अस म्हणुन कसं चालेल?? ऐकायलाच पाहिजे नां, कारण नाही ऐकलं तर दंडाचं पण प्रावधान आहे कायद्यामधे.

 

फक्त शाई, आणि गम उरलाय पाण्यात..

 

२६ जुलै ची आठवण कधीच विसरल्या जाऊ शकत नाही.  प्लास्टीक वरचं डीपेंडन्स खूप वाढलंय आपलं हल्ली. सिगारेटच्या पाकिटावर पण प्लास्टीकचं कोटींग असतं, टेट्रा पॅक मधे मिळणारे फ्रुट जुस वगैरे आपण नेहेमी घेतो,पण त्या मधेपण प्लास्टीक, कागद, आणि अल्युमिनियमचा एक थर असतो.दुधाची पाकिटं, तेलाची पाकिटं, भाज्या आणतांना भाजी घालुन भैय्या हातात देतो ती  पातळ प्लास्टीकची पिशवी, फरसाणची पाकिटं, वेफर्स वगैरे, कचरा पेटी मधे पण टाकायची प्लास्टीकची पिशवी.. अशा अनेक ठिकाणी तर वापरलं जातंच, पण इव्हन गुटखा पाकीट पण प्लास्टीकचं असतं. आता इतका वापर जर प्लास्टीकचा केला तर या पृथ्वीचे काय होईल??

बऱ्याच गोष्टी ( ज्या मधे प्लास्टीक पण आहे) या  पर्यावरणाला इतकं नुकसान पोहचवतात की जर असाच अनिर्बंध वापर सुरु ठेवला प्लास्टीकचा तर कदाचित थोड्याच वर्षात वेळ निघून गेलेली असेल. भारतात तर डम्प यार्ड मधे प्लास्टीक, आणि इतर वस्तू वेगळ्या न करता सरळ रोडरोलरच्या खाली दाबून टाकल्या जातात, ज्या मुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकत नाही- आणि अर्थातच वॉटर टेबल वाढण्यास मदत मिळत नाही.

याचं मुख्य कारण म्हणजे एखादी प्लास्टीक बॅग वातावरणात सोडली तर मिलियन वर्ष लागतील तिला पुन्हा वातावरणात मिसळून जायला. पाण्यात, ऑइल मधे अजिबात न विरघळण्याची जी क्वॉलिटी आहे प्लास्टिकची, नेमकी तिच त्रासदायक ठरते आहे, आणि डिकम्पोझिंग न होऊ शकल्याने होणारे दुष्परिणाम पुढल्या पिढीला भोगावे लागणार आहेत.

प्रगत देशामधे , प्लास्टीकच्या ऐवजी कागदी पिशव्या वापरणं काही जागरुक दुकानदारांनी सुरु केलंय. आपल्या कडे तर अनिर्बंध वापर सुरु असतो प्लास्टीकचा.असो..कालच एक इ मेल आला होता, त्यामधे प्लास्टीक – जे पाण्यात विरघळतं, त्याचा शोध लागलाय, आणि ते  व्यापारी तत्वावर तयार केलं जातंय असंही समजलं.

एक सायबर पॅक नावाची कंपनी आहे त्या कंपनी मधे जवळपास एक वर्षापूर्वी इलेक्ट्रॉनिक काम्पोनंट्स वर संशोधन सुरु होते, तेंव्हा चुकून लागलेला हा शोध. या मधे असे प्लास्टीक शोधल्या गेले की जे पाण्यात विरघळते. पाण्यात टाकल्यावर पुर्ण डिझॉल्व्ह होऊन फ्ल्श पण करता येऊ शकते.

फक्त ज्या भागावर सिन्थेटीक गम आणि प्रिंटींग इंक वापरली आहे , तो भाग पाण्यात विरघळण्यासाठी जास्त वेळ घेतो. कमर्शिअल उत्पादन पण सुरु करण्यात आलेलं आहे अशा बॅग्ज चं. एक प्लॅंट ऑस्ट्रेलियात पण सुरु करण्यात आलेला आहे. या बॅग्ज चा व्हिडीओ इथे दिलाय.. बघा..

याच कंपनीचे बरेच इन्व्हायरोमेंट फ्रेंडली प्रॉडक्ट्स आहेत बरेच…