तुम्ही मुंबईकर आहात जर…

Written by  on November 22, 2013
मुंबईकर..

मुंबईकर..

तुम्ही मुंबईकर आहात जर…

१) कोणी एखादी  जागा किती दूर आहे हे विचारले असता तुम्ही अंतर वेळेत सांगता- किमी मध्ये नाही.

२) तुमचे पाच प्रकारचे मित्र असतात. एक ऑफिस ग्रुप, दुसरा ट्रेन ग्रुप, तिसरा कॉलनी ग्रुप आणि चौथा ट्रेकींग ग्रुप आणि हो, पाचवा कॉ्लेज मधला ग्रुप.

३) पावसाळ्याची तुम्ही वाट पहात असता ते उन्हाने कासाविस झाल्याने नाही तर, खरे  कारण  तुमच्या मनातले खरे कारण पावसाळा “सुरु = ट्रेकिंग सुरु= किंवा भटकंती सुरु “हे तुमचे समीकरण असते.

४) जगातले सर्वोत्कृष्ट स्नॅक कम स्टेपल फूड हे वडापाव  आहे हे तुमचे ठाम मत असते.  बेस्ट वडापाव वाला हा तुमच्या गल्लीतला (ज्याच्या कडून तुम्ही नेहेमी वडापाव घेता तो ) असतो हे तुमचे ठाम मत असते.

५)  तुमचा वडापाव वाला जगातला उत्कृष्ट वडापाव बनवतो हे तुमचे पक्के मत असते. जर  कधी  चांगला वडा पाव हा मुद्दा डिस्कशन ला  निघाला  की  तुम्ही आपल्या वडापाव वाल्याचे नाव पुढे करता आणि आपल्या मतावर ठाम असता. दुसरी गोष्ट म्हणजे वडा-पावाची तुलना कोणी मॅक डी बरोबर  केली की तुमचा जळफळाट होतो.

६) तुम्ही कुठेही पाणीपुरी/भेळपुरी खाऊ शकता, पण पाणी प्यायची वेळ आली की बिसलेरी विकत घेता.

७)तुम्ही  जिम मधे जाणे टाळता, कारण तुमच्या मते तुमचा दररोज जो लोकल मधे चढणे उतरणे, आणि ब्रिज चढणे उतरणे हा व्यायाम पुरेसा असतो, पण जर कोणी जातच असेल तर तो  मात्र जिम पर्यंत बाईक/कार ने जातो..

८)लोकल मधे प्रवास करतांना जो पर्यंत कोणी तुमच्या पायावर पाय देत नाही तो पर्यंत लोकल मधे गर्दी आहे अशी तक्रार तुम्ही करत नाही.

९) क्रिकेट हा खेळण्याचा नाही तर बोलण्याचा /गप्पा मारण्याचा विषय आहे हे  पुलं चे मत तुम्ही पुरेपूर सिद्ध करता. सचिन चे कसे चुकले? धोनी कसा वाईट कॅप्टन आहे वगैरे वगैरे विषयावर तुम्ही तास अन तास बोलू शकता.

१०) मुंबई बाहेरच्या लोकांशी  बोलतांना तुम्ही मी कुलाब्याला जातोय  हे न सांगता टाऊन साईडला जातोय हे  सांगता, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे न समजल्याचे भाव एंजॉय करता.

११)तुम्हाला अगदी दादर पासून मुंबई सेंट्रल  ( ३-४ स्टेशन )ला जायचे असले तरी पण तुम्ही फास्ट लोकलने प्रवास करता. त्या साठी तुम्ही आधीच्या  दोन स्लो लोकल सोडून देता.

१२)पावसाळा  सुरु झाला की तुमच्या बॅग मधे  छत्री विराजमान होते. अगदी निरभ्र आकाश जरी असलं तुम्ही छत्री  वागवत फिरता.

१३)भरपूर पाऊस पडल्याचे प्रुफ म्हणजे लोकल बंद पडणे. जो पर्यंत लोकल बंद पडत नाहीत तो पर्यंत तुम्ही खूप पाऊस खूप पडल्याचे मान्य करत नाही.

१४) टुम्ही पावसाळ्यात मिलन सबवे बंद झाला का? हिंदमाता जवळ पाणी भरलं का? कुर्ल्याच्या ट्रॅक वरच्या सिग्नल प्रणाली पाण्याखाली बुडाल्या का? यावर लक्ष ठेऊन असता.

१५) हापूस आंबा हा तुमचा विक पॉइंट असतो. तुम्ही जर मूळचे  कोकणातले असाल, तर तुमच्या घरी दहा आंब्याची कलमं, २० सुपारीची आणि २० नारळ असतातच, पण तुमच्या जवळच्या नातेवाईकाने सगळे हडप केल्यामुळे तुम्हाला आंबे विकत घ्यावे लागतात हे तुम्ही सगळ्यांना आवर्जून सांगत असता.

१६)तुम्ही बहुतेक मुंबईच्या हिंदी भाषेतच सगळ्यांशी बोलता, पण जेंव्हा एखाद्या हिंदी भाषीय माणसाबरोबर लोकल मधे  भांडण होते, तेंव्हा तुम्ही आपल्या मराठीत बोलणे सुरु करता.

१७) ८-०६, ८-३५ ९-५१ ह्या सगळ्या वेळा तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात .

१८)तुमच्या दृष्टीने  तुमच्या उत्तरेला  (नॉर्थ बॉंबे ला) रहाणारे सगळे खालच्या दर्जाचे, आणि दक्षिणेला ( साऊथ बॉंबे साईडला) रहाणारे शायनिंग मारणारे असतात. सेंट्रल आणि वेस्टर्न लाइनला हे लागू होत असतं.

१९)तुमच्या दृष्टीने १० बाय १२ ची खोली म्हणजे हॉल असतो.

२०) स्टॉक मार्केट तुमचा विक पॉइंट असतो, तुमची इनव्हेस्टमेंट अगदी ५० हजार असेल तरी सुद्धा, तुम्ही स्टॉक च्या मुव्हमेंट्स वर नजर ठेऊन असता आणि लोकल मधे डिस्कशन सुरु झाले की हिरारीने आपली मतं मांडता.

२१)गर्दी नसली की तुम्ही नर्व्हस होता.

२२) पावसाळ्यात गुडघाभर घाणेरड्या पाण्यातून गर्लफ्रेंडला बाइक वर मागे बसवून ड्राइव्ह करणे ही तुमची रोमॅंटीझम ची अल्टीमेट आयडीया असते.

२३) ड्राइव्ह करतांना दहाव्या मिनिटाला तुम्ही इतरांना शिव्या देणे सुरु करता.

२४) तुमच्या दृष्टीने मुंबई मधे आत शिरतांना ३० रु टोल टॅक्स हा  योग्यच आहे

२५)तुमच्या घरी पेपर वाला   दर रवीवारी पेपर सोबत कमीत कमी ५ तरी निरनिराळे  होम डीलिव्हरीचे मेन्यु टाकुन जातो, आणि तुमच्या कडे असे सांभाळून ठेवलेले कमीत कमी २० एक तरी होम डिलिव्हरी मेन्यु कार्ड्स असतात.

२६) तुमच्या स्पिड डायल वर एक किराणा दुकानदार नक्कीच असतो.

२७)तुम्ही राणीची बाग, तारापोरवाला मत्सालय, किंवा म्युझियम कधीतरी लहान असतांना एकदा पाहिलेले असते. नंतर तुम्ही या ठिकाणी कधीचे गेलेले नसता.

२८) तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्ती चांगलं वागायला लागली की तुम्हाला त्याच्या वागणुकीबद्दल संशय वाटतो.

२९) निरनिराळ्या भाषेतल्या शिव्या तुम्ही आधी शिकता, आणि त्या  शिकल्या  की  त्यांचा मुबलक वापर केल्यावर आपल्याला ती भाषा येते असा तुमचा समज असतो. ( जसे गांडाभाई, बोकाचोदा  वगैरे वगैरे)

३०) तुमच्या फ़्लॅटला एक नेहेमीचे दार आणि एक वॉच डोअर ( जाळीचे दार) नक्कीच असते. बाहेर जातांना तुम्ही मुख्य दाराला, एक लॅच लॉक, दुसरे कडी घालून लॉक आणि तिसरे लॉक जाळीच्या दाराला लावून आणि प्रत्येक कुलुपं तीनदा चेक करूनच तुम्ही बाहेर पडता.

३१) बार मधे गेल्यावर ५५ रुपयांच्या बिअर साठी तुम्ही २०० रुपये अगदी विना तक्रार देता , पण रिक्षावाल्याला एक रुपया पण जास्त देत नाही.

३२) सुटी म्हणजे ट्रेकींगला जायचा दिवस हे तुमचे स्पष्ट मत असते.

३३) भांडताना हिंदी भाषीय वरचढ व्हायला लागला की  तुम्ही भैय्या म्हणून हिणवता, आणि मराठी मधे भांडण  मुद्दाम कंटीन्यु करता.

३४) हिवाळ्यात जेंव्हा १२ डिग्री तापमान असते तेंव्हा तुम्ही कितना चिल्ड है म्हणून स्वेटर शोधायला लागता.

३५) खूप पाऊस पडला की तुम्ही सकाळी बातम्या लावून बसता, कुठे पाणी भरलंय का हे बघायला, म्हणजे ऑफिशीअली  ऑफिसला दांडी मारण्याची सोय होते.

३६) तुमचे दररोजचे ४-५ तास ऑफिसला जाण्या – येण्यात खर्च होतात.

३७)डिओडोरंट हे तुमच्या साठी मस्ट असते.

३८) किती अंतर आहे हे तुम्ही मिनिटांमध्ये सांगता – किमी मध्ये नाही.

३९) टॅक्सी , ऑटॊ चे मीटर चुकीचे आहे म्हणून तुम्ही कमीत कमी आठवड्यात एकदा तरी त्यांच्याशी भांडता.

४०) लोकल मधे प्रवास करतांना गर्दी असेल तर तुम्ही जागा मिळवण्याचा प्रयत्न करता, पण जेंव्हा बसण्यासाठी जागा रिकामी असते, तेंव्हा मात्र लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करता.

४१) सुटीच्या दिवशी मित्र मैत्रिणी सोबत बाहेर जाऊन खाणे ही तुमचा अल्टीमेट एंजॉयमेंट!

४२) तुम्ही संध्याकाळी ५-३२ ला लोकलच्या ब्रिज वरून जात असतांना तुम्हाला ईंडीकेटर वर एखादी फास्ट लोकल  १ मिनिटात येत आहे असे दिसले तर तुम्ही धावत जाऊन ती लोकल पकडण्याचा प्रयत्न करता. त्या लोकल नंतर दोनच मिनिटांनी दुसरी लोकल आहे हे माहिती असून सुद्धा!

४३) कोणाला भेटण्याची जागा म्हणजे रेल्वे स्टेशन वरच्या प्लॅटफॉर्म वरच्या इंडिकेटर खाली ही जागा असते.

४४) कुठे टाऊन साईडला  जायचे असल्यास तुम्ही घरी कार असूनही  शक्यतो लोकल ने प्रवास करता.

४५) स्वतःच्याच बायकोला ऑफिस सुटल्यावर बाहेर भेटायला बोलावता, आणि डेट ला घेऊन जाता  🙂

४६) पुणेकर विरुद्ध मुंबईकर हा तुमचा आवडीचा डिस्कशनचा विषय असतो.

४७) तुम्ही कुठेही गेलात तरी आपण होऊन  कोणी न सांगता पण  रांगेत  उभे रहाता .

४८) तुम्ही कितीही गर्दी असलेल्या लोकल मधून उतरला तरीही तुमच्या बुटांचे पॉलिश  खराब झालेले नसते.

४९) प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे तुमचं ‘आराध्य दैवत’

५०) गणेशोत्सवात एकदा तरी लालबागला रांगेत उभे राहाता.

५१) तुमच्यासाठी बांद्रा रेक्लेमेनशन, मरीन ड्राईवच्या समुद्र किनाऱ्यापुढे हवाई आणि होनुलुलु ही ‘झक’ मारतं.

५२) मुंबईचा पाऊस + टपरी वरची चहा + चेतानाकडी (सिगरेट) = अल्टीमेट कॉम्बिनेशन !

५३) दर पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी माळशेजला जाता आणि दर उन्हाळ्यात एकदा तरी अलिबागला!

५४) नवरात्रात दांडिया खेळताना कितीही बोटं मोडली तरि तुम्ही दरवर्षी नचुकता दांडिया खेळायला जाता

५५) FM radio is your best Entertainment in Traffic

५६) दक्षिणेकडे रहाणारे सगळे ( कर्नाटकी , तामीळ तेलगू ) हे तुमच्या मते “मद्रासी” असतात/

५७)रिक्षावाल्याला “ए रिक्षा” म्हणणे

५८)वयस्कर taxi वाल्याला “अंधेरी जायेगा?” असं एकेरी विचारणे आणि त्याने देखील वाईट वाटून न घेता सरळ “नही” असं निर्विकारपणे सांगणे हे देखील मुंबईतच.

५९)आपल्या गावी गेल्यावर “आमच्या बॉम्बेला ” हि तर चाकरमान्यांची हमखास सुरुवात!

६०)आपल्या गावी गेल्यावर सगळे लोकं कसे संथ वागताहेत, कोणाला काहीच काम नाही का? अशा कॉमेंट्स करणे.

६१)स्त्रियांचे स्पेशल :- लोकल मधे क्लिपा, नेलपॉलिश वगैरे विकायला येणाऱ्याचा  खजीना  उचकटून  पहाणे , आणि घरी गेल्यावर नवऱ्यापुढे खजीना रिता केल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी दाखवणे.

६२)

वाचन संस्कार..

Written by  on November 20, 2013

धावत धावत कुर्ला स्टेशनला पोहोचलो. इंडीकेटर कडे नजर टाकली, गाडी यायला एक मिनिट होता. बाजूच्या भैय्याचा  ’सुक्का भेल”  चा स्टॉल खुणावत होता. ट्रेन अगदी प्लॅटफॉर्म वर येत असेल तरी पण ती थांबायच्या आत अगदी ३०-४० सेकंदात भेळ बनवून तुमच्या हाती पुडा देण्याचे त्याचे कसब खरंच वाखाणण्यासारखे आहे. गाडीत बसे पर्यंत अर्ध्याहून जास्त भेळ संपली होती. गाडीत  बसलो, आणि   हातातला भेळेचा कागद उघडून वाचणे सुरु केले. काही जन्मजात सवयी असतात, त्या कधीच जात नाहीत , त्यातलीच ही एक!

माझ्या लहानपणी किराणा सामान हे नाक्यावरच्या एका गुजराथ्या  कडून आणले जायचे. दुकानात तुम्हाला हव्या असलेल्या सामानाची यादी दिली, की वर्तमान पत्राच्या कागदात त्याच्या पुड्या बांधून तो द्यायचा.’ प्रि पॅक्ड ग्रोसरी” चा जमाना तेंव्हा आलेला नव्हता. घरी सामान आणल्यावर डब्यात भरून ठेवल्यावर , रद्दी पेपर वरच्या तुटक बातम्या वाचायची मला सवय होती. बरेचदा तर  कागद फाटलेला असल्याने, अर्धवट बातमी वाचल्यावर , पुढे काय असेल ? ही रुखरुख पण लागायची, तरीही सवय काही मोडली नाही.

माझा वाचनाचा पिंड जोपासला गेलाय तो केवळ रद्दी मुळे. रद्दी माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरेच मार्ग वापरते. जसे गाडीवर वडापाव , खारे दाण्याची पुडी,तिकिटं,  वगैरे वगैरे तर आहेतच पण लोकल मधे भिंतीवर चिकटवलेली रद्दी म्हणजे कुठल्यातरी बाबाच्या , जादू टोणा, मुठ-करणी, वशीकरण वगैरे जाहिराती पण मला वाचायला चालतात. या जाहिराती म्हणजे पण रद्दीचा  प्रकार आहे, फक्त भिंतीवर चिकटवलेला…. कुठल्याही मार्गाने ’रद्दी” कागद हाती लागल्यावर तो वाचल्या शिवाय मला अजिबात फेकवत नाही. लहानपणापासून रद्दीच्या दुकानात उभे राहून तिथे कोणीतरी रद्दी मधे विकलेली कॉमिक्स चाळत उभे रहाण्याची सवय होती मला. सुदैवाने, त्या दुकानदाराने ही कधी  हरकत  न घेतल्याने हा वाचनाचा छंद जास्त जोपासला गेला. माझ्या वाचनाच्या आवडीचे श्रेय त्या रद्दीवाल्याला मी नक्की देईन.केवळ या रद्दीच्या दुकान मुळेच वेगवेगळ्या विषयावरच्या पुस्तकांना हात लागला, नाही तर  कदाचित वाचनाची आवड निर्माण झालीच नसती.

कधी थोडे पैसे असले, की त्याच रद्दीच्या दुकानातून गुरुनाथ नाईक, बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्या घेऊन वाचायचो. एकदा पुस्तक वाचून झाले की दुकानदार दहा पैसे दर दिवसाचे लावायचा. थोडक्यात ’रद्दी लायब्ररी”म्हणा ना ! घरच्या लायब्ररी मधून डिटेक्टिव्ह पुस्तकं आणून वाचण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे   ही पुस्तकं अशीच  लपून वाचावी लागायची. कधी तरी त्या वयाप्रमाणे ’तशी’  पुस्तकंही वाचली जायची.

एकदा किराणा दुकानातून सामान आल्यावर लहान पुड्या पुलंच्या ’अपुर्वाई’च्या एका फाडलेल्या पानात बांधलेल्या सापडल्या. जो पर्यंत पुस्तक शेल्फ मधे असते, तो पर्यंत त्याची किंमत – नाही तर रद्दी! अपुर्वाई पण रद्दी मधे असू शकते ही कल्पनाच तेंव्हा विचित्र वाटली होती. अजूनही घरच्या पेपरची रद्दी मी दारावर विकत नाही, तर स्वतः  त्या दुकानात घेऊन जातो. नुकताच रद्दीच्या दुकानात गेलो असता मोरोपंतांची ’केकावल” हे पुस्तक सापडले, रद्दी वाल्याने त्या  ६० पानांच्या दुर्मीळ पुस्तकाची  किंमत केवळ दहा रुपये लावली. बरं ते पुस्तक उघडले, तर त्यावर चक्क लोकसत्ताचे पूर्व संपादक  विद्याधर गोखले यांची  स्वाक्षरी दिसली.एखादे पुस्तक ,  मग ते कितीही ’वजनदार’  व्यक्तीने लिहिलेले असले तरी फक्त  रद्दी च्या दुकानात किलोच्या भावानेच विकले जाते हे कटू सत्य फार लवकर समजले होते .

असेच एकदा एक जुने पुस्तक ( रवी किरण मंडळाने प्रकाशित केलेले) ’श्री मनोरमा’ नावाचे  १९२६ साली प्रकाशित झालेले पुस्तक  त्यांच्या कवितांचे पुस्तक पण ह्याच दुकानात विकत घेतले- २० रुपयांना 🙂  जवळपास १०० च्या वर ’वृत्तबद्ध”कवितांचा दुर्मीळ  संग्रह आहे हा, आणि ह्या पुस्तकावर पण   स्वतः श्री रानडे यांची  शुभेच्छांसह अशी स्वाक्षरी  आहे. असा अनमोल ठेवा हाती लागला की खूप आनंद होतो, म्हणूनच रद्दीच्या दुकानात जायला मी कधी पण तयार असतो.

माझ्या मुलींना पण  माझ्याबरोबर लहानपणापासून रद्दीच्या दुकानात   जाऊन पुस्तकं घेतांना पाहिल्यामुळे  त्यांनी पण पुस्तकं विकत घेणे सुरु केले..  त्यांचा सुरुवातीला ओल्ड क्लासिक्स, हार्डी बॉइज, नॅन्सी ड्रू वगैरे पासून सुरु झालेला प्रवास शेक्सपिअर , खलिल जिब्रान किंवा रविन्द्रनाथ टागोरांपर्यंत जेंव्हा पोहोचलेला दिसला, तेंव्हा रद्दी वाल्याने आपल्या मुलांवर वाचनाची आवड जोपासण्यासाठी  किती उपकार केले आहेत याची जाणीव झाली. अगदी लहानपणापासून रद्दीच्या दुकानातून गोष्टीची पुस्तकं विकत घेतल्याने त्यात काही वावगे आहे असे त्यांना कधीच वाटले नाही.

पुस्तक हे  कधीच रद्दी नसते, तर जो त्याला किलोच्या भावाने विकतो  त्याला त्याची किंमत समजलेली नसते, म्हणून रद्दी मधे विकले जाते. श्रीकृष्णाची  रुक्मिणी, आणि सत्यभामेने सुवर्ण तुला केली , आणि स्गळे सोने एका पारड्यात टाकले तरीही   श्रीकृष्णाचे पारडे  खाली राहिले, पण जेंव्हा राधेने त्यावर तुळशीचे पान ठेवले, तेंव्हा मात्र कृष्णाचे   पारडे वर उचलले गेले , तसेच या रद्दीचे पण आहे, खरी किंमत अजूनही समजलेली नाह……….. आणि इथे फक्त ते तुळशीचे पान अजूनही सापडलेले नाही.

एक्स्ट्रॉ मॅरिशिअल सेक्स आणि एड्स अवेअरनेस

Written by  on November 15, 2013

दादरच्या वेस्टर्न लाइन च्या ३ नंबर प्लॅटफॉर्म च्या इंडिकेटर खाली मी एका मित्राची वाट पहात  उभा होतो. इथूनच दोघांनी सोबत एका कस्टमर कडे जायचं होतं. कोणालाही भेटायचं असलं म्हणजे मुंबईकरांची रेल्वे स्टेशनवरची ठरलेली जागा म्हणजे  रेल्वे प्लॅटफॉर्मवरील इंडीकेटर्स खाली.करण्यासारखं काही नव्हतं म्हणून इकडे तिकडे बघू लागलो, एक मुलींचा ग्रुप उभा होता मोठ्याने खिदळत.. कानामधे आय पॉड/एफ एम रेडिओ ची बुचं घातलेल्या. ह्या जगाशी काही एक घेणं नाही अशा आविर्भावात. हल्ली मी म्हातारा झालोय असं वाटतं. अहो , एखादी मुलगी दिसली तर आपल्या मुलीची आठवण येते……! :) जोक अपार्ट, पण हे खरंय..   :)

मागे दोन भैय्ये उभे होते. दोघांचं बोलणं सुरु होतं. अरे कल वो “उसके” पास गया था, क्या चिज थी… वगैरे बोलण्यावरून कशाबद्दल बोलणे सुरू आहे ह्याचा लगेच अंदाज आला.अजुन कान टवकारले. मानवी स्वभाव! अशा गोष्टी कानावर पडल्या तर दुर्लक्ष करणे सहज शक्य होत नाही. उलट ’पुढे काय झालं असेल’ हे जाणून घ्यायची उत्सुकता मात्र जास्त बळावते.त्याचं बोलणं ऐकू लागलो. हा काही सेक्स ला वाहिलेला ब्लॉग नाही, म्हणून काय ऐकलं ते डीटेल्स मधे लिहित नाही.एक भैय्या दुसऱ्याला फक्त ५० रुपयात कशी मजा येते ते सांगत होता अगदी इत्यंभूत पणे.  दुसरा मात्र थोडा सेन्सिबल दिसत होता. म्हणाला, भैया एड्स होता है ना ऐसा करनेसे… तर लगेच पहिल्या चे एक्स्पर्ट ओपिनियन कानवर पडलं, ’अरे कुछ  नहीं होता है एडस वेड्स…. देखा नहीं क्या वो जगह जगह दिवार पर लिखा है ना… कंड्म युज करनेसे एड्स नहीं होता”

कपाळावर हात मारुन घ्यायची इच्छा झाली. अहो या एन जी ओ’ज ज्या पद्धतिने एड्स  च्या जाहिराती करित आहेत , त्या पद्धतीमुळे गैरसमज जास्त पसरून समाज स्वास्थ्य खराब होण्याची शक्यता जास्त आहे.

एड्स फक्त सेक्स्युअल संबंधातून होत नाही. इतरही बरीच कारणे आहेत.  जर त्या स्त्री च्या तोंडामधे अल्सर/जखमा – मे बी पान मसाला खाल्यामुळे झालेल्या  वगैरे असतील तर सलायवा मुळे पण एड्स होऊ शकतो ही गोष्ट सोयिस्करपणे दुर्लक्षली जाते . या एन जी ओ’ज ला आपलं कॅंपेन दुरुस्त करायला लिहावं लागेल ! बॅक ऑफ द माइंड रेकॉर्ड झालं.. म्हणजे आता एन जी ओ चा पत्ता वगैरे शोधा…

दोघांच्या बोलण्यातून लक्षात आलं , की ते दोघंही एकाच गावचे, मुंबईला काम करायला आलेले. एक जण दुसऱ्याला सांगत होता, गाव जाएगा तो कुछ समान ले जाना घरवा्ली के लिये.. म्हणजे हा गृहस्थ लग्न झालेला आहे तर, मनातल्या मनात बोललो ह्या माणसाला अजिबात गिल्टी कॉन्शस नाही??

विचार करु लागलॊ, ह्या माणसाचे गैरसमज दुर करुन  ह्याला समजाऊन सांगू ?   की सोडून देउ? मला काय करायचं आहे? माझा काय संबंध? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जर ह्याला काही सांगायला  गेलो , आणि ह्या माणसाने जर मलाच उलटा भोसडला तर काय करायचं? शेवटी ग्रे हेअर्स चा फायदा घेउन  त्या माणसाशी बोलणं सुरू केलं.. भैया,  ने शांतपणे सगळं ऐकुन घेतलं, आणि म्हणतो, साब क्या करेंगा, साल मे एक बार गांव जाता हुं इसलिये ये सब करना पडता है..  तरी  पण त्याला अशा संबंधांमुळे होणाऱ्या रोगाचा सिरियसनेस समजावून सांगितला!  तोंडात अल्सर असल्यास, इव्हन किसिंग मुळे पण एड्स होऊ शकतो हे जेंव्हा त्याला सांगितलं तेंव्हा  त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य तो काही लपवू शकला नाही. म्हंटलं , माझं काम मी केलं, पुढे तू, आणि  तुझं नशीब .

फक्त एकच गोष्ट झाली, त्याच्या डोळ्यामधे मला भीतीचे एक सावट दिसले. थोडा विचारात पडलेला दिसला तो..ह्या पुढे तरी कमीत कमी दूर रहा रे बाबा अशा गोष्टींच्या पासुन असा मनातल्या मनात विचार करित बाजुला झालो.

ह्या एकाच प्रसंगानी माझं अंतरंग ढवळून निघालं. डोळ्यासमोर त्या भैय्याची बायको, डोक्यावर घुंघट घेतलेली आली. आणि  कसंसंच झालं.  मध्यंतरी असंही वाचण्यात आलं होतं की एड्स चे भारतामध्ये सगळ्यात जास्त  रोगी युपी आणि बिहार मधल्या खेड्यात आहेत. ज्या स्त्रियांची  काहीच चूक नसतांना ते या रोगाचे बळी पडले आहेत. मन उदास झालं…  अजूनही अशी परिस्थिती असावी?? स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी??

सरकारने बिहार आणि यु पी मधे काहीच  केलेलं नाही. ह्या दोन्ही राज्यात  केवळ राजकारणच चालतं. इथे तो मुद्दा नाही, पण जर बिहार मधे गरीब लोकांच्या साठी रोजी रोटी ची सोय केली तर त्या लोकांना इथे मुंबईला यावे लागणार नाही. बेसिक इन्फ्रास्ट्रकचर नसल्या मुळे फारशी डेव्हलपमेंट झालेली नाही. हे सगळे भैय्ये लोकं , आपल्या बायकांना गावी ठेवून इकडे  येतात आणि मग अशा वासनेच्या खेळाचे बळी ठरतात.

परत आठवलं, कालच मलाड स्टेशन च्या ब्रिज वर एक गोंदवणारा माणुस बसला होता. सहज, कुतुहल म्हणुन जाता जाता नजर टाकली तर, एका माणसाच्या हातावर काहीतरी लिहित होता. गोंदवणे हा प्रकार पण एडस च्या ट्रान्स्फर साठी कारणीभूत होऊ शकतो. इथे कोकणातला फार मोठा वर्किंग क्लास आहे मुंबईला.ह्यांच्या पैकी बरीच मंडळी कुरार व्हिलेज, किंवा अप्पापाडा ह्या भागात मालाड इस्ट ला रहातात. हे लोकं स्वतःला फार सुधारले ले समजतात .पण प्रत्यक्षात  तसं नाही. अजूनही अमावस्येला कोहळं रात्री चौकात टाकणे, लिंबू उतरवणे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा क्लास आहे हा.  अशीच कोंकणी मंडळी बसली होती , गोंदून घेत.. एकाला हातावरचं नांव जे आधी पासूनच गोंदवलं होतं त्या भोवती नक्षी काढून हवी होती. इथे मात्र मी काहीही न बोलता पाय काढता घेतला. हातावर शंकराचे नांव गोंदवल्यामूळे शंकर प्रसन्न होणार आहे कां? अशा गोष्टी करुन लोकांना काय मिळते कोणास ठाउक.हे असे प्रसंग पाहिले की मग आपल्या समाजाच्या संकुचित मनोवृत्तीची जाणिव होते.

हल्ली मला हा एक चाळाच लागलाय. कुठेही काहीही पाहिलं की ते डोक्यामधे असं रजिस्टर होतं. २-३ दिवसा पूर्वी, कशाला, टु बी प्रिसाइझ रविवारी,  मी आणि बायकॊ दोघंही मार्केट ला गेलो होतो. ऍज युजवल पार्किंग मिळालं नाही, म्हणून सौ. ला म्हणालो, तू उतर आणि काय आणायचं ते आण, मी इथेच गाडीत बसतो.

सहज शेजारच्या हार्डवेअरच्या दुकानाकडे नजर टाकली, आठवलं, पडद्याचे रिंग्ज पण घ्यायच्या आहेत.शेजारीच एक धोपटी घेउन कटींग वाला न्हावी बसला होता. एकाची दाढी करित. हो…. मुंबईला पण असे न्हावी रस्त्यावर बसलेले दिसतिल तुम्हाला. म्हंटलं, ह्या न्हाव्याने नविन ब्लेड वापरले असेल कां? की ते एकच ब्लेड ४-५ लोकांना वापरत असेल? काय करावं? काहिही न करता गाडीमधे किशोरी आमोणकरांची नविन सिडी ऐकत बसलो….एका सभ्य मराठी माणसाने करावे ते केले.. आपल्याच दुनियेत मश्गुल झालॊ.

मला माहीत  आहे, तुम्हाला हे सगळे माझे मनाचे खेळ म्हणजे एक वेडेपणा वाटत असेल. पण खरंच .. अगदी देवा शपथ सांगतो.. मला एकच गोष्ट माहीत आहे ती म्हणजे.

“माणसाचं मन म्हणजे कसं असतं? “अ ड्रंकन मंकी स्टंग विद द स्कॉर्पियो..”

घटस्फोट..

Written by  on November 12, 2013

कालचा मुंबई मिरर पाहिला का?? ती गोंडस चेहऱ्याची , थोडीशी जाड पण अट्रॅक्टीव्ह असलेली डिलनाझ आणि तिचा नवरा दोघांचाही फोटो दिलेला होता पहिल्याच पानावर.  या दोघांनाही एका टिव्ही वरच्या डान्स रिअअ‍ॅलिटी शो मधे पूर्वी पाहिले होते .दोघंही उत्तम नाच करतात-  ’नच बलीये’ बद्दल लिहितोय मी, ज्या शो मधे पूर्वी सचिन सुप्रिया पहिले बक्षिस मिळवून विजयी झाले तोच शो..

बातमी काही फारशी चांगली नव्हती, जवळपास १४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे अशी काहीशी बातमी होती ती.दोघंही म्युच्युअल कन्सेंट वर डायव्होर्स घेत आहेत असंही म्हंटलं होतं बातमी मधे. लग्नानंतर १४ वर्षानंतर अशी वेळ का बरं यावी दोघांवर??  याचाच अर्थ आता ’जुळवून घे” एकत्र रहाण्या पेक्षा वेगळं झालेलं बरं असे विचार जास्त फोफावतात असे दिसते.

घटस्फोटाच्या कायद्या बद्दल मला काही फारसे माहिती नाही – वाचलेले सुद्धा नाही .घटस्फोट किंवा काडीमोड हे शब्द पुर्वी फार क्वचित ऐकू यायचे- जे आजकाल सर्रास ऐकू  येतात. याच बरोबर अजून एक नवीन शब्द कानावर पडतो तो म्हणजे ’ लिव्ह इन’.   बरेचदा घटस्फोट न घेता केवळ म्युचुअल कन्सेंट वर दुसरा विवाह करण्याचे प्रकारही आपल्या इथे खूप दिसून येतात. त्या  पैकी काही प्रसिद्ध लोकांच्या बाबतीत ( जसे धर्मेंद्र हेमा, कमला-सारीका, अशी अनेक उदाहरणे देता येतील.) पहिले लग्न झालेले असतांना पण  , दुसरे लग्न हे  ही हिंदू कायद्यानुसार अवैध ठरते असे असले तरीही दुसरीला पण तेवढेच मानाचे स्थान मिळालेले दिसते .  दुसरे लग्न हे बेकायदेशीर आहे ,  पण नेमकं ह्याच गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करून कायद्याचा चोळामोळा बिनदिक्कत पणे केला जातो. ( कायदा म्हणतो की जर दुसरीने तक्रार केली तरच काहीतरी कारवाई करण्याचा पोलीसांना अधिकार आहे)

धर्मेंद्र ने लोकसभेच्या फॉर्म मधे  बायकोचे नाव प्रकाश दिले होते, आणि हेमा मालीनीने राज्य सभेच्या फॉर्म मधे धर्मेंद्रचे नांव नवरा म्हणून दिले होते.  दोघांनीही निरनिराळी नावं दिल्यावर मात्र यावर खूप गदारोळ पण माजला होता, तरीही  दोघांनाही काहीच झालं नाही.

अशा प्रकारे दुसऱ्या लग्नाच्या बायकोला पुर्वी ’रखेल’, ’स्टेपनी’ म्हंटले जायचे, पण हल्ली   तसं काही नसते. बरेचदा तर ह्या  स्टेपनीने खऱ्या चाकाची जागा घेतलेली आहे असेही दिसून येते. काही दिवसा पूर्वीची गोष्ट आहे. एक मित्र आहे माझा , चेन्नाइ ला रहातो .एकदा संध्याकाळी त्याचा रस्त्यावर अ‍ॅक्सीडॆंट झाला म्हणून त्याला एका दवाखान्यात दाखल करण्यात आले.  बराच सिरियस अ‍ॅक्सीडॆंट होता . दुसऱ्या दिवशी दवाखान्यात त्याच्या दोन्ही बायका कर्म धर्म संयोगाने एकदमच आल्या , आणि त्याचं भांडं फुटलं. ही काल्पनीक गोष्ट नाही – अगदी शंभर टक्के खरी आहे. लग्नाची बायको असताना, एकाच गावात दोन घरठाव केले होते त्याने आणि जवळपास २१ वर्ष बिनबोभाटपणे सगळं काही व्यवस्थित सांभाळलं होतं त्याने.   बरं त्याने  , एकाही अगदी जवळच्या  मित्राला  पण त्याच्या या दोन बायकांची ’गम्मत’ कळू दिली नव्हती कधीच . आता  दोघींनाही मुलं आहेत , मोठा मुलगा इंजीनिअरींगला आहे- काय बोलणार ? मला जेंव्हा हे समजलं तेंव्हा तर सुरुवातीला विश्वास ठेवणेच अवघड होऊन बसलं होतं.

लग्न करून रहाणे आणि नंतर मग पुढे कधी पटलं नाही तर मग पुन्हा हा डीव्होर्सचा गोंधळ , त्या पेक्षा मग  पाश्चात्य देशातल्या प्रमाणे ’लिव्ह इन’ रिलेशनशिपचे काय वाईट?? म्हणून हे  फॅड पण भारतात आले. काही खूप मोठी नांवं जसे ’शेखर कपूर’ वगैरे किंवा ’अर्चना पुरणसिंग’ , ’ सैफ़ अली खान , रोझा’  किंवा ” जॉन बिपाशा “सारख्या प्रसिद्ध लोकांची नांवं या संदर्भात घेतली जाऊ लागली. या संबंधात  दोघांनाही एकमेकांना नीट ओळखता यावं, आणि समजून घेता यावं म्हणून कुठलीही बंधन न पाळता  दोघांनीही जितके दिवस वाटेल तितके दिवस एकत्र रहायचं आणि मग नंतर  पटलं तर सोबत रहाणं  कंटीन्यु करायच,  आणि  समजा कधी पटलं नाही तर एकमेकांपासून वेगळं व्हायचं हा कन्सेप्ट आहे. म्हणजे “विषय सुखासाठी” एकाच पार्टनरशी बांधून घ्यायची गरज नाही- हवे तेवढे दिवस एका बरोबर रहा, नंतर दुसरा/री जास्त चांगली  मिळाला/ली की हा सोडून द्या.. कायद्याची काही भिती नाही, दोघंही सज्ञान, मग काय ??

एकत्र रहाणे आणि मग नंतर कंटाळा आला, आता दुसरी /दुसरा कोणीतरी हवा म्हणून वेगळे होणे ! अतिशय डेंजरस कल्पना आहे ही. कमिटमेंट नाही म्हंटल्यावर सेक्स्युअली ट्रान्समिटेड आजार होण्याचे चान्सेस हे १०० टक्क्यांनी वाढतात.

विचार करा की एखादी तरुणी २५ व्या वर्षापासून जर पुढली दहा ते पंधरा वर्ष लिव्ह इन मधे होती,    आणि नंतर तिला तिच्या सोबत रहणाऱ्याने सोडून दिले, तर तीचे भवितव्य काय?? तिला पुन्हा  दुसरा कोणी मिळणे सहज शक्य होईल का?? जरी समजा दुसरा एखाद  पुरुष आकर्षित झाला  तरीही तो केवळ  ’तेवढ्या’ एकच कारणासाठी , म्हणजे ही “टाकून दिलेली” किंवा  “सहज अव्हेलेबल” असलेली स्त्री म्हणून असेल.  आणि याला कारण  म्हणजे आजची सामाजिक मानसिकता. एखादी एकटी स्त्री ( अर्थात डिव्होर्स्ड किंवा लिव्ह इन सेपरेटेड) म्हणजे सार्वजनिक मालमत्ता  असा काहीसा समज असतो समाजाचा.  पण एक बाकी आहे की,  विधवा स्त्रियांना अजूनही आपल्या  पुर्णपणे मान दिला जातो समाजात.

सहज आठवलं म्हणून लिहितोय, जुनीच एक म्हण आहे ” म्हातारा नवरा, आणि कुंकवाला आधार” तिची सार्थता अशाच प्रसंगी लक्षात येत असते.

याच पार्श्वभूमीवर अजून एक बातमी आली होती पेपर मधे . सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मधे  एखाद्या स्त्रीला सोडून दिलं तरीही ती पोटगी मागू शकत नाही- आणि ह्या निर्णयामुळे बऱ्याच पुरुषांना विवाह बाह्य संबंध ठेवण्यास मोकळीक मिळणार आहेच..  पण एक प्रश्न रहातोच- अशा संबंधातून निर्माण झालेल्या मुलांचं पुढे भवितव्य काय?  त्यांनी नांव तरी कोणाचं लावायचं बाप म्हणून??

अजून तरी ही कीड केवळ उच्च समाजातच आहे, पण खाली तळागाळापर्यंत पोहोचण्यास    वेळ लागेल असे वाटत नाही, आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय वाचून खंत वाटली..