जिझस जिन्स मधे..

Written by  on July 21, 2013

आजच वाचण्यात आलं की  इंग्लंड मधे ( इस्ट ससेक्स मधे) फादर डेव्हिड बकले, यांनी एका ३५ हजार पाउंड किमतीच्या सात फूट उंचीच्या जिझस च्या पुतळ्याचे उदघाटन केलं .  त्या पुतळ्याचा फोटॊ खाली दिलेला आहे.

जिझस जिन्स, ओपन बटन शर्ट, आणि जिन्स घालुन आहे.हवेमुळे शर्ट उडतोय. बरं जिझस चे केस पण अगदी व्यवस्थित कापलेले आहेत, दाढी ट्रिमिंग केलेली. हा पुतळा १०० फुट उंचिवर लावण्यात येणार आहे.

याचा उद्देश आहे, जिझस अ मॅन ऑफ २१ सेंचूरी म्हणून डिपिक्ट करण्याचा उद्देश आहे.असंही मुख्य प्रिस्ट ने सांगितले. जिझस ला लोकांच्या जास्त जवळ पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. जर तुमचा देव तुमच्या सारखाच असला, तर मग तुम्हाला त्याच्या बद्दल जास्त आत्मियता वाटेल .. असा उद्देश असावा एकदम स्टायलिश जिझस आहे हा. नेहेमीचा क्रुस वर लटकणारा काटेरी मुकुट असलेला जिझस बघून लोकांना त्याच्या बद्दल कणव येते, म्हणून तर अशी प्रतिमा तयार केलेली असावी…

एका स्विडीश चर्च ने ३०,००० पिसेस लेगो ब्लॉक्स वापरुन स्टॉकहोमपासुन ७० किमीवर असलेल्या एका चर्चमधे लावलेली आहे.

बरं हे एकच नाही, आणखी एक गोष्ट आहे..

आपल्याकडे दर वर्षी गणपतीच्या वेळेस वेगवेगळे गणपती बघायला मिळतात. त्यामधे एखादा, नारळाचा, एखादा सुपाऱ्यांचा , एखादा अजुन कसला तरी.. असे अनेक प्रकार असतात. लोकमान्य टीळकांच्या स्वरुपातला गणपती तर प्रत्येक वर्षीच असतो. खरं तर आपण सगळ्यांनी गणपतिला कुठल्याही स्वरुपात ऍक्सेप्ट केलेलं असतं. पण …..
gpepsi
हे अशा तऱ्हेने  इतर देवांच्या बाबतीत ,त्यांच्या पारंपारिक स्वरुपाशी कांही प्रयोग केलेले भारतात सहज मान्य केले जात नाहीत.

कांही दिवसापुर्वी भारतामधे एकदा लखनौ मधे बांके बिहारी मंदिराच्या पुजाऱ्याने कृष्णाला जिन्स ,घालुन हातामधे सेल फोन दिला होता बासरीच्या ऐवजी  म्हणून त्याला पुजारी पदावरुन काढून टाकलं होतं. आता मला तरी या मधे काही विशेष वाटत नाही. विनाकारण एखाद्या गोष्टीचा इशू करतो आपण

कांदे नवमी

Written by  on July 14, 2013
Thalipeeth

http://annaparabrahma.blogspot.com ^(http://rangmarathiche.com/goto/http://annaparabrahma.blogspot.com/)

 

माझं लहानपण अगदी बाळबोध आणि कुळ कुळाचार पाळणाऱ्या घरात गेलं. वाड्यामधे शेजारी पण सगळे आमच्या सारखेच होते. जवळपासच्या पंचक्रोशित, नॉनव्हेज खाणा कोणीही नव्हतं, कदाचित तुम्हाला खोटं वाटेल , मी अगदी २२ वर्षाचा असे पर्यंत अगदी अंडं पण खाणं दुर पण अंड्या

चा कुठलाच पदार्थ पाहिला पण नव्हता.

माझ्या घरी – मी वगळता, अजूनही  कोणीच नॉनव्हेज खात नाही..अंडं इन्क्लुडेड! सगळी भट लोकांचा वाडा होता तो. वर्षातले चार महिने, कांदा लसुण खाणं बंद असायचं. आई नेहेमी म्हणायची पावसाळ्यात कांदा सडल्या सारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज केलेला आहे(अर्थात मला ते कधीच पटलं नाही) तसेच श्रावणात वांगी पण खाणं बंद असायचं. म्हणजे आवडत्या गोष्टी बंद.. भरली वांगी तर माझ जीव की प्राण.. अजुनही भरली वांगी आणि शेवग्याच्या शेंगांचं कॉंबीनेशन खुप आवडतं..!

आमच्या घरी गोंदवलेकर महाराजांची गादी होती. म्हणजे दर शनिवारी नामःस्मरणाचा कार्यक्रम व्हायचा.अगदी बाळबोध वातावरणात वाढलोय मी.कदाचित त्या दिवसांबद्दल सांगितलं तर खोटं वाटेल, म्हणून जास्त काही लिहित नाही.

http://blog.chaukhat.com/

http://blog.chaukhat.com/ ^(http://rangmarathiche.com/goto/http://blog.chaukhat.com/)

http://blog.chaukhat.com/

http://blog.chaukhat.com/2009/07/kanda-bhaji-from-sinhgadh-aka-sinhgad.html ^(http://rangmarathiche.com/goto/http://blog.chaukhat.com/2009/07/kanda-bhaji-from-sinhgadh-aka-sinhgad.html)

 

श्रावण महिन्याच्या आदल्या नवमीला कांदे नवमी चा दिवस म्हणायचे.  मग कांदा भजी, कांद्याचं थालिपीठ, आणि इतर सगळे शक्य असलेले पदार्थ करून कांदे नवमी सिलेब्रेट केली जायची. एकादशीला कांद्यचा ढेकर पण येउ नये म्हणून नवमी नंतर कांदे -लसुन खाणं बंद केलं जायचं.मग दुसऱया दिवशी.. काय रे काल झाली का कांदे नवमी? असे प्रश्न पण विचारले जायचे.

आमच्या सारख्या मुलांना तर तसा काहीच फरक पडत नव्हता. फक्त दुपारच्या वेळी जे घट्टं वरण, चिरलेला कांदा, तेल, आणि आइने केलेल्या कैरीच्या लोणच्याची फोड आणि रस्सा घालुन एकत्र कालवलेल्या वरणाला मात्र मी खूप मिस करायचो.कधी तरी थोडासा काळा (गोडा मसाला आईच्या हातचा) आणि दाण्याचं तेलं.. घातलं की माझं दुपारचं  खाणं कालवलेलं घट्ट वरण आणि पोळी बरोबर व्हायचं.    आजकाल प्रमाणे, आई , दुपारी काय खाउ?? असा प्रश्न कधीच नसायचा.स्वयंपाक घरात जायचं आणि वरणाचा गोळा वरच्या प्रमाणे कालवला , की झालं..!

आजकाल प्रमाणे खाउ चे डबे नेहेमी भरलेले नसायचे, चिवडा वगैरे पदार्थ फक्त दिवाळी किंवा इतर काही कारणानेच केले जायचे. विकतचा फरसाण, किंवा इतर गोष्टी आणून डबे भरुन ठेवण्याची पध्दत कधीच नव्हती. मुलांना ब्रेड खाउ घालणं, किंवा विकतच्या गोष्टी खाउ घालणं  ,हे घरच्या गृहिणीला कमी पणाच वाटायचं..

त्यामूळे ब्रेड वगैरे कधीच आणली जात नव्हती.. सकाळी  ६वाजता- पाव, ब्रेड ,जिरा बटर टोस्ट…….. अशी आरोळी ऐकू आली की आईच्या मागे लागायचो. तो एक मुल्ला सायकलला पत्र्याचा डबा लावलेला हे घेउन विकायचा. मग आज वार कुठला?? मंगळवार तर नाहीं ना?? मग ठिक आहे.. असं म्हणून कधी तरी ( नेहेमी नाही) परमिशन मिळायची आणि मग पाव बटर विकत घेतलं जायचं.

चातुर्मास म्हणजे वडिलांचा एकादश्णीचा कार्यक्रम बहुतेक दर सोमवारी असायचा. एका शेवटल्या सोमवारी मग वडिलांचे काही मित्र एकत्र घरी येउन लघु रुद्र करायचे.. आजही ते तालबध्द आवाज डोक्यात घुमतात. श्रावण मधिन्यातल्या चतुर्थीला सहस्त्रावर्तन पण केलं जायचं. त्या दिवशी मला पण सोवळं नेसुन बसावं लागयचद- जे मला कधीच आवडायचं नाही.

श्रावण महिन्यात माझ्या वडिलांचे मित्र होते, ( आणि माझे हेड मास्तर कुर्हेकर सर) त्यांच्या घरी श्रावणी चा कार्यक्रम असायचा. मग सकाळी उठून त्यांच्याकडे जाउन श्रावणी चा कार्यक्रम झाला, की मग नवीन जानवं बदलणे हा कार्यक्रम व्हायचा. त्यांच्या कडे बरेच लोकं जमायचे, आणि मग नंतर तिथेच सगळ्यांचा सहभोजनाचा कार्यक्रम झाला की आम्ही घरी परतायचो. श्रावणीच्या दिवशी दिलं जाणारं “पंचगव्य” ( ज्यामधे गाइचं, दुध, तुप, दहि, गोमुत्र, थोडंशेण) थोडंसं हातावर घेउन तिर्था प्रमाणे प्यावं लागायचं. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते .तुमच्या कपाळावरच्या आठ्या मी इथूनही पाहू शकतो.. 🙂  पण तेंव्हा शुध्दीकरणासाठी ते करावं लागयच.  मोठ्या माणसांनी काही करायला सांगितलं तर त्याला नाही म्हणायची प्राज्ञा कोणाचीच नव्हती. तेंव्हा निमुटपणे ते तीर्थ हातावर घेउन जीभ लावल्या सारखं करायचं आणि उरलेलं डॊक्याला हात पुसून टाकायचा.  एकाने खाल्लं तर शेण, सगळ्यांनी मिळून खाल्लं तर श्रावणी… ही म्हण इथूनच सुरु झाली असावी.

श्रावण महिना लागला, की मग घराजवळच्या महादेवाच्या मंदीरामधे कसले ना कसले प्रोग्राम असायचे. सकाळच्या वेळी चिकण मातीचे लिंग बनवायला लोकं मंदिरात जमायचे. सहस्त्र लिंग तयार झाले की त्याच्या पुजा आणि रात्री आरास केली जायची.कधी तरी रात्री खेळता खेळता मंदिरात जाउन किर्तन पण ऐकायचो. टीव्ही नसल्यामुळे संध्याकाळ म्हणजे शाखेत जायचं, आणि मग रात्री घरी आलं की मग रामरक्षा, पाढे, झाले की मग जेवण ! जवळपास १६ वर्ष रोज सकाळी ऊठल्यावर संध्या करित होतो. पण नंतर नोकरी निमित्य पुण्याला आल्यावर सगळं बंद झालं. काही गोष्टी केवळ, वडिलांना आवडतात म्हणून केल्या जातात, त्या पैकी एक म्हणजे संध्या करणे, आणि चतुर्थी चा उपवास करणे.. कालांतराने मग सगळं सुटलं..

हे सगळं आठवलं देवेंद्रची गटारी ची पोस्ट बघुन. ^(http://rangmarathiche.com/goto/http://davbindu.wordpress.com/2009/07/19/%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/)आजकाल तर बाराही महिने कांदे वगैरे खातो, त्यामुळे त्या कांदेनवमीला खरंच मिस करतोय..  🙂

कपड्यात काय आहे??

Written by  on July 11, 2013

पवाचीच गोष्ट आहे, सकाळी ऑफिसला निघायचं म्हणुन तयार होऊन बुट घालत होतो. तर तेवढ्यात आमचं धाकटं कन्यारत्नाने ( वय वर्ष १५) एकदम हसणं सुरु केलं..

म्हंटलं काय झालं?

तर म्हणे की तुम्ही अगदी वॉचमन सारखे दिसताय आज.. अगदी तस्साच ड्रेस घातलाय तुम्ही.

मी एकदा स्वतःकडे , अन स्वतःच्या कपड्यांकडे पाहिलं.काळा रंग माझा आवडता -स्पेशली ट्राउझर साठी म्हणुन काळी ऍरोची ट्राउझर, स्काय ब्लू लाइअनिंगचा ऍरोचाच शर्ट, नेव्ही ब्लु कंपनी लोगो असलेला  टाय (कस्टमर सेमिनार होतं म्हणुन, नाही तर मी टाय वगैरे वापरत नाही , नेहेमी सेमी फॉर्मल म्हणजे फुल स्लिव्ह शर्ट ट्राउझर्स मधे असतो.) लावलेला होता. आरशा समोर जाउन उभा राहिलो.. आणी स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं.. तर समोर एक अर्धवट वयाचा पोट सुटलेला , ज्याने केवळ कंबरेला पट़्टा लावला आहे, म्हणुन पोट जागेवर आहे, नाहीतर कधीच खाली घरंगळलं असतं.. असा एक माणुस दिसला. पण  वॉचमन?? छे!!!

एकदम लक्षात आलं, की हल्ली वॉचमन लोकांचा पण असाच ड्रेस असतो. स्पेशिअली मल्टीप्लेक्स , मॉल्स मधे.. स्ट्राइप्स असलेला शर्ट, आणि काळी किंवा नेव्ही ब्लु ट्राउझर… ते  लक्षात आलं आणि एकदम हसु आलं. टाय काढुन टाकला, अन कपाटाशी गेलो, तिथे जाउन दुसरा शर्ट घालायचा म्हणुन  प्लेन आकाशी रंगाचा शर्ट काढला.

तर मागुन कॉमेंट ऐकु आली.. ’बाबा, कोरियर बॉय चा ड्रेस होतोय ’ हा शर्ट नका घालू..

तिच्याकडे जरा चिडुनच पाहिलं.. तुला काय करायचय? मी काही पण घालीन..

असं म्हंटलं खरं, पण एकदा तिने कॉमेंट टाकल्यावर मात्र तो शर्ट घालायची इच्छा झाली नाही. कपाटाशी उभा राहुन  बरेच कपडे उलथा पालथ करुन शेवटी एक पांढरा शर्ट, नविनच घेतलेला (सेल मधे .. लुई फिलीप वर सध्या ५० टक्के डिस्काउंट आहे ) तो घालायला म्हणुन बाहेर काढला, आणि कन्यारत्नाकडे ’आता काय म्हणशील?? ” अशा नजरेने पाहिलं.

ती काहीच बोलली नाही, फक्त थोडं हसली… मला बरं वाटलं… चला बरं झालं!

पण हे सुख फार काळ टिकणारं नव्हतं,   मला वाटतं की  मी शर्ट घालायची वाट पहात ती उभी होती . जेंव्हा शर्ट घालुन झाला, आणि जोव्हान वगैरे अंगावर उडवुन झाल्यावर टाय लावायला घेतला, तरीही ती काहीच बोलली नाही. मला खुप बरं वाटलं.. चला म्हणजे हाअ ड्रेस तरी चांगला आहे.. ना कोरियर बॉय , ना वॉचमन..

स्वतःशिच हासलो, अन  पायात सॉक्स घालणे सुरु केले. ओठ शिळ घालत होते, सगळं काही व्यवस्थित झालं की कसं बरं वाटतं नां? आज सकाळीच मस्त ब्रेकफास्ट झाला होता. फोडणीची पोळी अन दही ( शिळी पोळी कुस्करुन फोडणीला घातलेली ( कांदे पोह्या सारखी) मला वाटतं त्याला मुंबईला पोळीचा चिवडा म्हणतात) माझं फेवरेट आहे ते.. बायकोने  तिन वेळ चहा  पण करुन दिला होता कुरकुर न करता..

तिने न बोलताच तिच्या मनातले विचार मला समजतात , ती नक्कीच   मनातलया मनात म्हणाली असेल.. अरे किती चहा पितोस.. एका कपाला दिड चमचा साखर, म्हणजे दिवस भरात, तुझे १५ कप चहा गुणीले दिड चमचा म्हणजे जवळपास २२ चमचे साखर= २०० ग्राम साखर? इतकी साखर तुला आवश्यक नाही रे.. जरा चहा कमी कर… वगैरे वगैरे न एकावं लागल्यामुळे मी अगदी खुष होतो आज!

हं , तर काय सांगत होतो, तयार झाल्यावर मग घराबाहेर निघणार, तेवढ्यात मागुन हळुच आवाज ऐकु आला..

…….’ आई ,आपले (?) बाबा अगदी वेटर सारखे दिसतात की नाही आज  ह्या  ( काळी पॅंट +व्हाईट शर्ट + टाय) ड्रेस मधे??”

आणि नेमकं ते मला ऐकु आलं.. !!एवढा चांगला तयार होऊन घरून निघालो आणि ही अशी कॉमेंट!! आता काय करणार! तिच्याकडे पाहिलं, एक  टप्पल  द्यायला  मागे वळलो, तर ती  धावतच तिच्या बेडरुममधे गेली अन  दार लाउन घेतलं.. !! मी पण हसतंच घराबाहेर पडलो.. 🙂

थोड्या वर्षापुर्वी एक फॅशन होती. काय व्हायचं की पुर्वी लोकं सफारी घालायचे. म्हणजे ज्या कपड्याची पॅंट त्याच कपड्याचा शर्ट. त्याच्या खांद्यावर दोन पट़्ट्या किंवा समोर पॅच खिसा , असा काहीतरी ड्रेस होता तो. बरं फॅशन इतकी होती, की एखाद्या लग्नात वगैरे तर बरेचसे लोक असे सफारी घातलेले दिसायचे.बॅंड वाजवणारे पण असाच काहीतरी ड्रेस वापरायचे.  कधी कधी  या सफारीचा रंग पण अगदी बॅंडवाल्यासारखा   असायचा.   घालणाऱ्याची पर्सनॅलिटी अगदी छाडमाड असेल तर तर तो ड्रेस घालणारा आणि लग्नाच्या वरातीमधे बॅंड वाजवणारा, किंवा एखादा ऑफिस मधला चपराशी एकसारखेच दिसायचे.

या बाबतित स्त्रियांचं एकदम पक्कं असतं, की ठराविक साडी, मग यावर मॅचिंग असलेले इतर कपडे, मॅचींग बांगड्या.. इत्यादी.. त्या बाबतित त्या कधिच कॉम्प्रोमाइझ करित नाहीत. पुरुषांचं आपलं मिक्स ऍंड मॅच सुरु असतं नेहेमी.. काळी, राखाडी, किंवा नेव्ही ब्लु ट्राउझर आणि कुठलाही पाइन स्ट्रिप शर्ट.. बस.. चलता है. एक पेअर ब्लॅक शु आणि एखादा स्निकर असला की झालं.. और क्या चा्हीये?

एक गोष्ट आहे..अगदी लहानशा गोष्टींचा किती परीणाम होतो नां आपल्यावर? प्रत्येक ड्रेस हा कुठल्या ना कुठल्या तरी प्रोफेशनशी निगडीत केला जातो. मग तो ड्रेस इतरांनी वापरला तर लगेच त्या माणसाला त्या प्रोफेशनशी कोरिलेट केलं जातं.  सह्ज जाणवलं म्हणुन इथे पोस्ट करतोय.