ठाण्याचं महेश.

Written by  on January 11, 2013

लोब्स्टर.

खाण्याची खरी मजा कुठे आणि कधी येते? प्रश्न अगदी सोपा असला, तरी मला अभिप्रेत असलेले उत्तर थोडे वेगळे आहे. तसं या प्रश्नाचं उत्तर अगदी काहीही असू शकतं. आणि प्रत्येकाच्या मते आपण दिलेले उत्तर बरोबर  आहे असा विश्वास पण असतो. काही  लोकं, म्हणतील, की खाण्याची खरी मजा खूप भूक लागल्यावर , तर काही लोकं म्हणतील घरी किंवा  कुठल्या तरी खास हॉटेल मधे, वगैरे वगैरे. अशी  अनेक प्रकारची निरनिराळी   उत्तरं  जरी दिली गेली, तरी  पण सगळ्यांचंच एक कॉमन उत्तर असेल,  ते  म्हणजे मित्रांसोबत  किंवा कुटुंबियांबरोबर!

माझ्या साठी ,मित्रांबरोबर मजा वेगळी , आणि फॅमिली बरोबर मजा वेगळी,  कारण मित्रांसोबत-  गेलो की नॉनव्हेज खाता येतं.  परवाच  रोहनचा इ मेला आला, की शनिवारी ठाण्याच्या महेश लंच होम मधे जेवायला ये म्हणून. आता रोहन जातोय युकेला तीन चार वर्षांसाठी, त्यामुळे हा जाण्यापूर्वीच  हा एक शनिवारी एकत्र घालवायला   म्हणून ही खास इव्हेंट ऑर्गनाईझ केली होती. तसेच त्याच दिवशी रोहनचा वाढदिवस पण होता. महेश लंच होम ( फोर्ट मधलं) माझं फेवरेट, पण ठाण्य़ातलं महेश कधी पाहिलं नव्हतं. आजचा लेख म्हणजे  त्याचं शीर्षक हवं ” आमचा हल्ला,  पुन्हा एकदा महेश लंच होम वर – मित्रांसोबत”!

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2012/08/2012-08-25-5422.jpg)हॉटेल मधे जाऊन खायचं, तर हल्ली एकट्याने गेल्यावर थोडा प्रॉब्लेमच असतो. कारण एकाच डिशचे पोर्शन्स इतके जास्त असतात, की एक डीश मागवली , की तीच संपवता संपवता जीव मेटाकुटीला येतो आणि  इतर काही मागवता, येत नाही. म्हणूनच रोहनचा मेल आला,  आणि मेल मधे इतर १६ नावं पाहिल्यावर एकदम बरं वाटलं. म्हंटलं, आता आज व्हरायटी खादाडी होणार तर!

साडेअकरा वाजता, घोडबंदर रोडचा ट्राफिक चुकवत महेश लंच होम मधे पोहोचलो, तर तिथे सगळे जण आधीच पोहोचले होते, आणि सगळ्यांच्या समोर कमी जास्त लेव्हल असलेले सोलकढी चे ग्लासेस दिसत होते. महेशची सोलकढी थोडी स्ट्रॉंग असते, पण बेस्ट अ‍ॅपीटायझर!

आम्ही जागेवर बसे पर्यंत स्टार्टर म्हणजे लॉब्स्टर घेऊन वेटर समोर आला होता. मोठ्ठा लॉब्स्टर , चायनीज स्टाइल मधे बनवलेला, डिश मधे पहुडला होता .तसा मी शेल्स ला अ‍ॅलर्जीक आहे, पण आज मात्र फारसा विचार न करता  डिश मधल्या लॉब्स्टर चा  एक तुकडा जिभेवर ठेवला, आणि क्षणात त्याच्या चवीचा गुलाम झालो.  त्याच्या ज्युसी फ्लेश ची चव,  जिभेवर रेंगाळत असतांना हलकेच  चायनीज फ्लेवर पण जिभेवर चारही बाजूने  ढुशी मारून गेले, आणि चवीच्या घोटाळ्या मधे वेगवेगळ्या चवी ओळखण्याचा खेळ  सुरु झाला.

क्लिअर सुप.लॉब्स्टर्स खाण्याची ही पहिलीच वेळ . आजपर्यंत फार तर टायगर प्रॉन्स कधी तरी खाल्ले होते एवढेच. सेनापतींनी तो पर्यंत कॅप्टनला बोलावून क्रॅब आहेत का म्हणून विचारले, आणि   तो थोड्याच वेळात  दोन जिवंत  क्रॅब घेऊन आला. जिवंत क्रॅब दाखवण्याचे कारण हे की तुम्हाला जे काही मिळणार आहे ते फ्रेश आहे याची खात्री पटायला हवी म्हणून! आता याचं काय करायचं?? करी? की सूप? की तंदुरी?? शेवटी सुप आणि तंदुरी क्रॅब ची सर्व मताने ऑर्डर दिली गेली- आणि आमच्यासाठी ( शेल अ‍ॅलर्जी वाले ) चटपटा सुरमाई कबाब आले.

तंदूरी क्रॅब

ही सगळी ऑर्डर दिल्यावर पण गप्पा सुरु होत्याच.अजिबात कोणाला घाई नव्हती लवकर जेऊन बाहेर पडायची. समोरचा सोलकढीचा ग्लास हळू हळू रिकामा होत होता. थोड्याच वेळात  वेटर हिरवे गार क्रॅब जेंव्हा पूर्ण पणे तंदूर रोस्ट झाल्यावर केशरी रंगाचे झाले होते ते घेऊन आला. या क्रॅब चं एक असतं, जास्त रोस्ट झाले की आतलं मांस कोरडं पडतं, आणि कमी वेळ ठेवला तर कच्चं रहातं- पण इथला क्रॅब अगदी पर्फेक्ट रोस्ट झालेला होता. जसा तो टेबलवर विराजमान झाला तसे  सेनापती गळ्याभोवती रुमाल बांधून आणि हातात  क्रॅब चे तुकडे करण्याचे आयुधं घेऊन तयार होते.  काड काड आवाज करत क्रॅब चे तुकडे करून प्लेट्स मधे सर्व्ह केले, आणि सगळ्यांच्या गप्पा बोलणं एकदम थांबलं. एक लहानसा तुकडा तरी खाऊन पहायची इच्छा होत होती, म्हणून समोर बसलेल्या रोहनच्या प्लेट  मधला एक लहानसा तुकडा उचलला.एक गोष्ट पक्की, की महेश मधल्या तंदूर क्रॅब  एकदम लाजबाब असतो. इथे गेल्यावर, जर शेलची अ‍ॅलर्जी नसेल  ह्या क्रॅब ला पर्याय नाही.

चटपटा सुरमाई पण अफलातून चवीची होती. मॅरिनेट केलेले बोनलेस फिशचे पिसेस, गोवनिज स्टाइल मधे रवा फ्राय केलेले होते  , जिभेवर ठेवल्यावर वेगळीच टॅंगी चव जिभेवर येत होती, आणि सोबतीला बोंबिल फ्राय ( पार्शी स्टाइल मधे नाही, तर कोंकणी स्टाइल मधे पाट्या खाली दाबून पाणी काढून मस्त पैकी कडक फ्राय केलेले ) होतेच. बोंबिलाची चव तर अप्रतिम होती.

गप्पांमध्ये किती आणि  कसा वेळ गेला तेच समजलं नाही. फोन वाजला, सौ चा फोन होता, म्हणाली, ”  घरी केंव्हा येताय? सकाळी १०-३० ला घरून गेले आहात, आता तीन वाजले आहेत ?” माझं प्रामाणिक उत्तर की जेवतोय, तर तिचा अजिबात विश्वासच बसला नाही. ” इतका वेळ??” आता   काही न बोलता फोन बंद केला.

सुरमाई गस्सी, केरळ करी अप्पम, मेन कोर्स मधे काय मागवायचं काही ठरत नव्ह्तं. खरं तर ,  स्टार्टर्स इतके जास्त झाले होते की काही फार जास्त  खाण्याची इच्छा नव्हती.  शेवटी दोन ग्रूप करून दोन वेगवेगवळ्या डीशेस ऑर्डर केल्या.  महेश मधे कुठलंही सी फुड चांगलं असतंच. पण त्यातल्या त्यात मंगलोर  हॉटेल असल्यामुळे ’फिश गस्स” ही डिश तर नक्की  ऑर्डर होतीच.  सोबतच  रावस केरळी करी  आणि ज्यो ने  प्रॉन्स करी मागवली ( जी तिला शेवटी तिच्यापर्यंत पोहोचलीच नाही)

ही ऑर्डर दिल्यावर वेळ काढायला म्हणून रोहनचा तीन किलोचा केक वेटरने समोर तुकडे करून ठेवला , आणि सहज गप्पा मारता मारता केंव्हा संपला हेच लक्षात आलं नाही. जेंव्हा रोहनने केक कापला, तेंव्हा खरंच वाटत होतं की इतका केक कोण खाणार? पण आमची खवय्यी गॅंग एकदा खायला बसल्यावर भस्म्या रोग झाल्याप्रमाणे जे काही समोर येईल ते संपवते 🙂

फिश करी सोबत नीर दोसा आणि अप्पम मागवलं होतं. इथल्या नीर दोशापेक्षा अप्पम जास्त बरं वाटलं. अप्पमचा जाळीदार जाड भाग   फिश करी मधे बुडवला की मस्त पैकी करी मधे भिजल्यावर   चवींचं युद्ध जिभेवर सुरु होत होतं.सुरमाई गस्सी म्हणजे मंगलोरी पद्धतीने शिजवलेली सुरमाई, आणि दुसरी डिश केरळा रावस म्हणजे कढीपत्ता घालून शिजवलेला रावस मासा. केरळी फिश करी किंचित आंबटसर चव असणारी , नारळाच्या दुधात बनवलेली करी  अफलातून लागते. ही केरळी करी आणि बॉइल्ड राइस एकदम बेस्ट कॉम्बीनेशन!  दोन पिसेस रावसचे, दोन पिसेस गस्सी चे आणि सोबत निर दोसा , आप्पम एवढंच खाऊ शकलो. सगळ्याच फिशची  टेस्ट छान  होती.

फिश शिजवताना  जर फिश “जस्ट पर्फेक्ट ” शिजवलेली असली तरच छान लागते. ओव्हर कुक केलेले फिश खाणं म्हणजे एक वैताग ! मला अजिबात आवडत नाही. मुंबईला बहुतेक ठिकाणी फिशचा शिजवून शिजवून  अगदी लगदा करून टाकतात. पाप्लेटच्या बाबतीत तर हे हमखास होतंच. केवळ  याच कारणासाठी मी हॉटेल मधे पाप्लेट खाणं टाळतो . तसं कधी तरी तंदूर रोस्ट पापलेट काही ठरावीक ठिकाणी खातो.

कार्मेल कस्टर्ड

इतकं सगळं खाऊन झाल्यावर पण शेवटी स्विट डिश हवीच, म्हणून कार्मेल कस्टर्ड मागवले. कस्टर्ड तर बरं होतं, पण कार्मेलायझेशन व्यवस्थित झालेले नव्हते. साखर व्यवस्थित जळलेली नसली की मजा येत नाही कार्मेल कस्टर्ड ची.

मनातल्या मनात एक पक्कं ठरवलं, की कार्मेल कस्टर्ड फक्त इराण्याकडेच खायचं!

महेश लंच होम, एक सुखद खादाडीचा अनुभव देणारी जागा. एवढंच सांगता येईल- फक्त जातांना मस्त पैकी मित्रांच्या ग्रूप मधे जा म्हणजे जास्त एंजॉय करता येईल. माझं तसं खाण्यावर थोडं जास्तच प्रेम असल्याने पोस्ट लिहितांना थोडा वहावत गेलो असेन..  🙂 बाय द वे, आम्ही सगळे १६-१७ जण एकत्र भेटलो ते सगळे ब्लॉगर्स मिट मुळे.   🙂

 

डीसी रॉक्स!!

Written by  on January 9, 2013

दिलिप छाबरीया मॉडीफाइड कार

नॅनो.. जेंव्हा पासुन बातम्यांमधे आहे तेंव्हा पासुन काही ना काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी जोडल्या गेलेली आहे या नावाशी. आता खरं सांगायचं तर  ममता असो किंवा ज्योती बसु असो सगळी नांवं जोडली गेली आहेत या कारशी. इतकं असुनही ही कार रस्त्यावर रोल आउट झाली , ते केवळ रतन टाटांच्या मुळे.

आता ऑटोमोबाइल म्हंटलं, आणि त्यामधे दिलिप छाबरीया चं नांव नाही.. हे कसं शक्य आहे? प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या प्रकारे नॅनोशी जुळायला आवडतं- मग त्याला दिलिप तरी कसा अपवाद असेल??दिलिप छाबरीया म्हंट्लं की ऑटोमोबाइल इंथ्युझियास्ट लोकांना त्याच्या बद्दल काहीच सांगायची गरज नाही. परवाच वाचलं की डीसी आता नॅनॊ रिडिझाइन करणार आहे .

मोबाइल एटीएम

६२३ सीसी चं दोन सिलेंडर इंजिन, ४ स्पिड गेअर बॉक्स, टॉप स्पिड १०५ किमी/तास, चार सिटर कार ,असं डिझाइन असलेली आणि एक लाख किंमत असलेली नॅनो कार डीसी मॉडीफाय करुन तिला एक करोड रुपयांची करणार आहे ही बातमी जेंव्हा बातम्यांमधे दाखवली तेंव्हा एक इंजिनिअर म्हणुन मला खरंच तो आता काय या कारला एक करोडची करण्यासाठी काय करेल? हा प्रश्न पडला होता.

डीसी चा लोगो असलेल्या बऱ्याच कार्स मुंबईला दिसतात. तो लोगो म्हणजे अगदी मर्क प्रमाणेच प्रेस्टीजिअस समजला जातो . डीसी चा टच असलेली कार म्हणजे तिची किम्मत किती लाखांनी वाढेल ते सांगता येत नाही. बरेच लोकं तर अगदी नविन कार घेउन डीसी कडे मॉडीफाय करायला देतात. डिसी टच झाला, की ती कार कुठल्या मेक ची आहे हे पण ओळखता येणार नाही, इतके बदल करतो त्या मधे तो.जेंव्हा त्याने हे काम सुरु केले, तेंव्हा एक जिप्सी मॉडीफाय केली होती. ती जिप्सी आहे हे कोणिच ओळखु शकत नव्हते, आणि तेंव्हा पासुनच डीसी एकदम सगळ्यांच्या माहिती झाला.

पुर्वी  मॉडीफिकेशनचं फॅड अगदी डॊक्यात शिरलं होतं तरुणांच्या . जेंव्हा मी येझ्दी बाइक वापरायचो, तेंव्हा बाइकचं हॅंडल बदलणे, सिट अरेंजमेंट बदलणे,समोरचे मडगार्ड उचलुन लावणे.. (त्या साठी दिल्लीहुन एक दुकानदार ते स्पेशिअली आणुन द्यायचा)असे प्रकार आम्ही करित होतो. समोर विंड शिल्ड लावणं हे अगदी रेअर असायचं, त्यामुळे बाइकचा लुक एकदम बदलुन जायचा. येझ्दी च्या दोन्ही सायलेन्सर्स मधल्या त्या पुंगळ्या काढुन टाकल्या की बाइकचा एक वेगळाच आवाज यायचा. आणि ही बाइक पण एकदम डिपेंडेबल होती. पेट्रोल, केरोसिन मिक्स वापरुन पण चालायची ही बाइक- कधीच रस्त्यावर बंद पडली नाही पाच वर्षात.. नंतर बुलेट आल्यावर पण या बाइकची आठवण येते बरेचदा. बॅचलर लाइफ च्या बऱ्याच आठवणी जुळल्या आहेत तिच्याशी.

विषयांतर झालं– तर डीसी ची स्पेशॅलिटी आहे कुठलिही कार मॉडिफाय करण्यात. सगळे सिनेमा हिरॊ आपल्या व्हॅन्स डीसी कडुन डिझाइन करुन घेतात. त्या व्हॅन मधे टिव्ही फ्रिज पासुन तर बेड, सोफा वगैरे सगळं काही असतं.असंही म्हणतात, की स्कॉर्पिओ चं डिझाइन डीसीचं आहे. नक्की माहिती नाही. मध्यंतरी एक सिनेमा आला होता टारझन नावाच. ती टारझन नावाची कार डीसीनेच डिझाइन केली होती. आधीची एक जुनी ऍंम्बी अशा मॉडर्न स्टेट ऑफ द आर्ट कारमधे कन्व्हर्ट करण्याचे काम केवळ डीसीच करु शकतो.

आता हा एक करोडरुपयांची करणार म्हणजे करणार तरी काय??डीसी ने आधी तर संपुर्ण कार स्ट्रिप डाउन केली आहे. आणि त्यामधे सगळंच बदलण्यात येणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे पॉलीकार्बोनेट ग्लेझींग, झिऑन आणि एलईडी लाइट क्लस्टर्स, १४०० सीसी मॉन्स्टर इंजीन, आणि या सगळ्या बरोबरच नविन सस्पेंशन. इतकं सगळं केल्यावर ही टू सिटर मॉन्स्टर कार रस्त्यावरुन किती स्पिड ने जाउ शकेल हे गुलदस्त्यातच आहे अजुन तरी.

इंटेरिअर्स पण  जनरेशन नेक्स्ट गिझिमोज असतील .तिथे एक पिसी स्क्रीन असेल, ज्यावर इंटर्नेट , नेव्हिगेशन, गेम्स, आणि कारचे सगळे कंट्रोल्स डिस्प्ले केले जातिल.इतकं सगळं केल्यावर पण माझ्या मते त्या कारची किंमत १ करोड होणार नाही. मग अजुन काय करणार?? एखाद्या शेख प्रमाणे सिल्व्हर, किंवा गोल्ड ची कार बनवणार कां? गॉड नोज. फक्त त्या वापरल्या जाणाऱ्या गॅझेटस ची किम्मत किती असेल ते सांगता येत नाही.

डीसी ने एरोप्लेनचं इंटेरिअर पण डिझाइन केलेलं आहे. त्याची साईट बघा ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.dcdesign.co.in/) तिथे बरीच माहिती आहे दिलेली..
रिसेंटली डीसी ला ऍस्टॉन मार्टीन डी ८ ही कार ( जी जेम्स बॉंड च्या नविन सिनेमात वापरली जाणार आहे ) ती डिझाइन करण्यासाठी बोलावले गेले आहे.. तसेच ब्रिटीश कार मॅन्युफॅक्चर नोबल साठी पण एक कार डीझाइन करित आहे. ही स्पोर्ट्स कार असेल.  या व्यतिरिक्त असंही वाचण्यात आलंय की एका इटालिअन कार मॅन्युफॅक्चरर ने पण डीसीला करारबध्द केलंय….

— दिलिप छाबरीया रॉक्स!!!

मी मुंबईकर !!

Written by  on January 8, 2013

localमुंबईला अगदी नवीन आलो होतो, ( १२-१५ वर्षापुर्वी) तेव्हाची ही गोष्ट. ऑफिस होतं चर्च गेट (लायन गेट) जवळ आणि रहाणं होतं मालाड ला. मी ज्या फ्लॅट स्कीम मधे रहातो, त्याच स्कीम मधे कंपनीचे अजुन एक  फ्लॅट आहे. त्या मुळे एक मित्र होता , कसं जायचं ते सांगायला.
मालाडला सकाळी सगळ्याच लोकल्स पुर्ण भरलेल्या असतात. आणि माझ्यासारख्या नवशिक्याला तर गाडीत चढणं शक्यच होत नव्हतं.

फक्त एक आशेचा किरण होता ,तो म्हणजे मालापासून सुटणारी ८-३५ ची चर्चगेट फास्ट. कारण ही ट्रेन मालाडहुन सुटायची.त्यामुळे कमीत कमी उभ्याने तरी प्रवास करता यायचा.तरी पण ८-३५ ची मालाड फास्ट पकडून चर्चगेट प्रर्यंत प्रवास करायचा म्हणजे अंगावर काटा यायचा. त्या गर्दीची भीती वाटायची. कधीच गाडीत चढून सीट पकडता आली नाही. नेहेमी असं वाटायचं की आपण पडणार .पण सुदैवाने असं काही झालं नाही.

ह्या ८-३५ च्या ट्रेनचं महत्त्व कळण्यासाठी एकदा सकाळी ८ ते १० च्या दरम्यान कुठलीही बोरिवली ते चर्चगेट ट्रेन, मालाडपासून  पकडण्याचा प्रयत्न करा .तुम्ही मुंबईत नवीन असाल तर १०१ टक्के तुम्हाला चढता येणार नाही. आणि लगेच ८-३५चं  महत्त्व तुमच्या लक्षात येइल.

केवळ एकदाच पाय घसरला होता चढतांना पण एका गृहस्थाने सांभाळले. ज्याने मला सांभाळले होते तो एक चार्टर्ड अकाउंटंट होता. मुळ आग्रयाचा म्हणुन सगळे गाडीतले त्याला भैया म्हणायचे. केवळ एकच भैया,  म्हणुन त्याची खुप मस्करी केली जायची. आणि त्याने पण कधी मनाला लाउन घेतले नाही.

सकाळची गाडी म्हणजे , सगळे शेअर बाजारचे दलाल लोक आणि पंचरत्न मधे काम करणारे लोक फ़र्स्ट क्लास च्या डब्यात असायचे. एक गृप फॉर्म झाला होता. आठवड्यात ३ दिवस कोणीतरी काहीतरी खायला आणायचं.(सगळी मंडळी गुज्जू , त्यामुळे जास्तीत जास्त वेळा ’फाफडा अने जलेबी’अथवा ’जैन समोसा अने जलेबी’ ह मेनु असायचा. मी त्या गॄप मधे कधी आणि कसा  शिरलो आणि त्यांच्यातलाच एक म्हणून  ऍक्सेप्ट झालो ते कळलंच नाही.

हे शेअर बाजार वाले फारच अंध विश्वासू. ट्रेन ३ नंबरला लागली तर तेजी आणि ४ नंबरला लागली तर मंदी असा होरा चालायचा. मला तर शेअर्स बद्दल काहीच माहिती नव्हते. पण काही दिवसात मी पण इंडेक्स, पीई रेशो, फिफ्टी टु विक हाय आणि लो, बोनस इश्यु, राइटस आणि एक्स बोनस , कम बोनस वगैरे नॉमिनिक्लेचर शिकलो. आयसीआयसीआय बॅंकेत अकाऊंट उघडला आणि शेअर्स मधे इन्ह्वॉल्व्ह झालो. अरे जितु भाई  टाटा केम नु १०० माल पडेला छे, हवे तो माल वेचवानो कोई जल्दी नथी पर नवा आयपीओ माटे पैसा जोइजे– सुं करवाणु?  वगैरे बोलणे जमू लागलं होतं.मुंबईकर होण्याची दुसरी पायरी पार केली.

पहिली पायरी अर्थात गाडी पकडणे , कटकट न करता गर्दी एंजॉय करणे ( मला वाटतं मुंबईतिल गर्दी चा त्रास फक्त मुंबई बाहेर रहाणाऱ्यांनाच होतो) .हळू हळू चालती गाडी प्लॅटफॉर्म वर उभी रहाण्यापूर्वी चढण्यात एक्सपर्ट झालो.पहिल्या दिवशी जेंव्हा सिट पकडली, तेंव्हा ह्या ट्रेन चा फाउंडर मेंबर ( २० वर्ष याच ट्रेन ने प्रवास करणारा) विपिन भाइ म्हणाला, महींदर भाइ एक्स्पर्ट थई गयो.. एकदम धन्य धन्य वाटलं..

पुलंच्या म्हणण्यानुसार तिसरी पण ,सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेटवर बोलता येणे ही गोष्ट मला चांगली जमायची.क्रिकेट खेळता जरी येत नसलं तरी बोलता चांगलं येतं, त्यामुळे मला काही फार त्रास झाला नाही मुंबईकर होण्यात.

इतक्या सगळ्या वर्षात बरोबर प्रवास करून सुद्धा काही लोकांची फक्त नांवे माहिती होती- जसे, जितु भाइ, अतुल भाइ, बिपिन भाइ इत्यादी. कारण केवळ नावावरच भागायचं. नाही म्हणायला एक दोन मराठी लोकंपण होती . पण मेजॉरिटी गुजराथी. गॄप चा मेंबर झाल्यावर   मला पण कधी तरी ’नाश्तो’ न्यावा लागायचा गाडीत. पण ते दिवस अजुन ही आठवले की मजा वाटते.

होत होता मी पुर्ण पणे मुंबईकर झालॊ. चर्चगेटला पोहोचलो की ३ रू. देउन बुट पॉलिश करुन घेता घेता कॉफी पिणे वगैरे गोष्टी छान जमायला लागल्या होत्या. कधी कधी एका हातात वडापाव आणि  दुसऱ्या हातात पेपर वाचन सुरु असतांना , आणि प्लॅटफॉर्म वरच्या सुंदर ललनांना न्याहाळताना,((ह्या बाबतीत आमचे मत एकदम पक्कं आहे, मुलींकडे न पहाणे हा त्यांचा अपमान आहे, आणि बिईंग अ थरो जंटलमन, वुई मस्ट नॉट इन्सल्ट लेडीज.. ))

हल्ली जरा बदल झालाय, तरुण मुलगी दिसली, की आपली मुलगी आठवते आणि जरा मध्यम वयीन दिसली की बायकॊ चा चेहेरा डॊळ्यापुढे येतो..:)

पण त्या पॉलिश वाल्या पोऱ्याने टक टक असा ब्रशने आवज केला तरी त्या आवाजाकडे लक्ष जायचे. आजूबाजूला कितीही  आवाज जरी  असले तरी सुध्दा ती टक टक ऐकू  यायला लागली.

नंतर काही वर्षांनी ऑफिस वरळीला , आणि नंतर चेंबुरला  शिफ्ट झालं आणि मग ट्रेन चा संबंध संपला.ऑफिस जवळ आल्याने मी कारने ऑफिस ला जाउ लागलो. पण ते ८-३५ ची ३ वर्ष मी कधीच विसरु शकणार नाही.
अजूनही कधी तरी आठवण आली तर जातो त्या ट्रेन ला आपल्या जुन्या मित्रांना भेटायला,आणि बिलिव्ह मी , अगदी माहेरी आलेल्या मुली सारखं स्वागत होतं गाडीमधे.

हीच आहे मुंबई ची महती.