फिरोझ खान-मानाचा मुजरा!

Written by  on August 17, 2012

feroz01

आजच ह्या माझ्या सगळ्यात आवडत्या ’हिरो’ चे देहावसान झाले. कॅन्सरने पिडीत असलेल्या या महान  खऱ्या खुऱ्या  देशभक्त अभिनेत्याने    ’शान ए पाकिस्तान’ हे पाकिस्तानातील   पारितोषिक नाकारले होते .

इस्लामीक देशामधिल मुस्लिम लोकांची जी दयनिय स्थिती आहे त्यावर पाकिस्तानात जाउन स्टेज वरुन बोलण्याचं धाडस पण ह्यानेच केले होते. मुजाहिदिनांना दिली जाणारी बायस ट्रिटमेंट आणी इतर गोष्टींबद्दल त्याने पाकिस्तान सरकारला धारेवर धरले होते.पाकिस्तानी मिडीयाने पण हा इशु खुपच हाइप केला होता आणि, नंतर परवेझ मुशर्ऱफने   या अभिनेत्यावर पाकिस्तानामधे येण्यास बंदी घातली होती. मिडियाच्या प्रेशर पुढे  परवेझ मुशर्ऱफना असे करावे लागले होते..

१९७५ मधे ह्याचा पाहिलेला धर्मात्मा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपट रसिकांना मेजवानिच होता. ह्याच्या चित्रपटामधे नेहेमी फॉरिन चं शुटींग, फास्ट कार्स, आणि बेब्स असायच्या. त्या काळचा खरा शो मॅन फिरोझ खानच होता माझ्या मते.

ह्याच्या अभिनयात क्लिंट इस्टवुड नेहेमी डोकावुन जायचा. भारतिय सिनेमामधे ’स्टाइल आयकॉन म्हणावा तसा हाच एक अभिनेता होता.ज्या काळात इतर हिरो केवळ ३ पिस सूट्स घालुन असायचे त्या काळात मळक्या जिन्स घालुन पडद्यावर येणारा हाच एक अभिनेता होता.  एक चित्रपट होता- ’काला सोना’ हा म्हणजे मला अतिशय आवडलेला चित्रपट. खोटे सिक्के मधे त्या काळातील झाडून सगळे ’बॅड मेन’ म्हणजे व्हिलन्स हिरो होते. कुठल्यातरी इंग्रजी चित्रपटावरुन बेतलेली कथा. पण मस्त जमली होती भट्टी.मी ह चित्रपट कमीत कमी १० दा तरी पाहिला होता.

आरझु, औरत आणि सफर हे फिरोझ खानचे गाजलेले चित्रपट.कुर्बानी हा फिरोझ खानने काम केलेला बहुतेक शेवटचाच चित्रपट ( हिरो म्हणून) पण नंतरही कधी तरी चुकून एखाद्या चित्रपटात ह्याचे दर्शन व्हायचे.

आदमी और इन्सान  मधे बेस्ट सपोर्टींग ऍक्ट्रर चं अवॉर्ड  १९६५ साली  फिल्म फेअर तर्फे देण्यात आले होते.नंतरही बरीच अवॉर्ड्स मिळाली फिरोझ खानला इन्क्लुडींग लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड..

मी भारतीय आहे असे पाकिस्तानात अभिमानाने सांगणारा हा मुस्लिम अभिनेत्याचे जाणे काळजाला चटका लावून गेले. ह्या महान हरहुन्नरी देशभक्त कलावंतास मानाचा मुजरा..

XXV.. काळा दिवस..

Written by  on August 9, 2012

हेच ते कंटेनर ज्या मधे असलेल्या केमिकल मुळे इतका उत्पात घडला

वॉरन ऍंडरसन अजूनही मोकळाच फिरतोय. ३०००० लोकांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला हा माणुस अर्जुनही कायद्या मधल्या पळवाटा शोधून बाहेर आहे. भारतीय कायदा हा असाच.. हा माणुस मरे पर्यंत याला अटक करु शकणार नाही आपले कायदे.

याला कारण एकच आपल्याकडे एक कायदा आणि दहा पळवाटा असा सरळ हिशोब आहे.१९९२ पासून या माणसाच्या विरुध्द नॉन बेलेबल वॉरंट इशू करण्यात आलंय.१९८७ पासून केस सुरु आहे, आणि २०० च्या वर साक्षीदार येउन गेले पण अर्जुनही याला अटक करणे शक्य झालेले नाही.

डिसेंबर ३, १९८४…  युनियन कार्बाईड भोपाळ ची फॅक्टरी. इथे बॅटरी /सेल बनवले जायचे..   सकाळची वेळ होती. एका मोठ्या कंटेनर मधे मेथिलायसोसायनाईड ठेवलेलं होतं. तसा हा पदार्थ जो पर्यंत पाण्याच्या संपर्कात येत नाही तो पर्यंत निरुपद्रवी असतो. पण एकदा हा पाण्याचा संपर्कात आला की मग काहीही होऊ शकतं.

ब्लास्ट नंतर....नेमकं ३ डिसेंबरला काय झालं ते कळलं नाही पण या कंटेनर मधे पाणी शिरलं. आणि पाण्याची या ४२ टन मेथिलायसोसायनाईड वर रिऍक्शन होऊन प्रेशर फॉर्म झालं त्या कंटेनर मधे.  आणि गॅस लिक होणं सुरु झालं.

काही वेळाने  हायड्रोजन सायनाईड गॅस आणि इतर   तयार झालेल्या गॅसचं   प्रेशर असह्य होऊन ब्लास्ट झाला,आणि ते कंटेनर फुटलं.  अगदी सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या दोन तासातच युनियन कार्बाईडच्या अगदी जवळ रहाणारे ४ हजारच्या वर लोकं मारले गेले.  थोड्याच वेळात हा आकडा १४ हजाराच्या वर गेला.

अगदी लहान बाळं , ज्यांची प्रतिकार शक्ती अतिशय कमी असते,ते तर या गॅसच्या प्रभावामुळे आधी मृत्यु पावले. जे वाचले, त्यांच्या मधे पण नजर कमजोर होणं,किडनी विक असणं असे डिफेक्ट्स राहिलेच. गर्भाशयात असलेल्या मुलांच्या वर पण या गॅसचा परिणाम झाला.

डोळे गेलेले लोकं... त्याच विदशीचा फोटो या गॅसच्या प्रभावातून जे  प्रौढ वाचले, त्यांची पुढची पिढी काहीतरी वैगुण्य घेउन जन्माला येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. गेल्या २५ वर्षात  नुकत्याच  जन्मलेल्या मुलांच्या मधे डिफेक्ट्स्चं प्रमाण या भागात खूप वाढलेलं आहे.

आपल्या कडे पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर आहे. पण ते लोकं खरंच काम करतात कां ? हा एक मोठा प्रश्न आहे. हे बोर्ड जेंव्हा एखाद्या कंपनीला परमिशन देते, तेंव्हा बऱ्याच गोष्टींवर विचार करुन मग द्यावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे , सांडपाण्याची व्यवस्था.. सांडपाणी डिटॉक्स करुन मगच नाल्यात सोडणे.. आवाज प्रदुषण आणि असे बरेच फॅक्टर्स आहेत.मग या कारखान्याला परवानगी देतांना ह्या गोष्टींकडे सोईस्कर दुर्लक्ष का करण्यात आलं? नंतर लक्षात आलं, की बरयाच पर्यावरण विषयक नियमांना धाब्यावर बसवले आहे या कंपनीने..

मेलेल्या मुलाला कडेवर घेउन जाणारी आई.. असा पुतळा त्या दिवसाची आठवण म्हणुन उभा केला गेलाय भोपाळलाइतके  लोकं मृत्युमुखी पडले, मग त्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या एकाही अधिकाऱ्यावर का म्हणून ऍक्शन घेतली गेली नाही?? दुसरी गोष्ट, या स्फोटामुळे बरेच केमिकल्स जमिनीखालच्या पाण्यात जाउन ग्राउंड वॉटर  विषारी  झालेलं आहे. जो पर्यंत सगळी स्वच्छता होत नाही, तो पर्यंत तिथे जवळपास रहाणारे लोकं… हेच दुषीत पाणी पिउन रोग राईला आमंत्रण देत रहातील. डाउ केम ने नकार दिलाय सफाइ करायला…

डाउ केमिकल्स!! युनियन कार्बाईडच्या साईटला स्वच्छ करणे.. डीटॉक्सिंग करणं आवश्यक आहे. अंडर ग्राउंड वॉटर दूषित झालेलं आहे.  तिथे अजूनही बरिच केमिकल्स पडलेली आहेत. या ब्लास्ट नंतर तिथली सफाई करण्याचे काम आपले नाही असे सांगून या डाउ केमिकल्स् ने जबाबदारी टाळलेली आहे.

डाउ कंपनी समोरची निदर्शनं

हे बघा, कसे नालायक लोकं आहेत ते.. फॅक्टरी डाऊ केमिकल्सची, जागा त्यांची,  केमिकल त्यांचं, साठवण करण्याची पद्धत त्यांची, निष्काळजीपणा पण त्याच कंपनीचा. इतकं सगळं आहे, आणि आता ब्लास्ट झाला तर म्हणताहेत की स्वच्छता करणे त्यांचे काम नाही..   मग हे काम कोणी करायचं? यांची घाण दुसऱ्या कोणी  का काढायची?

बरं इतकं होऊन पण क्रिमिनल केस का केली जात नाही भारतातील अधिकाऱ्यांच्या वर? तसेच पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकार यांवर पण केस करायला हवी, म्हणजे पुन्हा असा हलगर्जी पणा करणार नाहीत ते..

या मल्टीनॅशनल्स कंपन्या  ना भारत हवाय असे प्रोजेक्ट्स लावायला,केमिकल्स, डेंजरस प्रोजेक्ट्स… कारण कायदा हा इथे खुप फ्लेक्झिबल आहे.इतके कुचकामी कायदे असतील तर मग हे असे कायदे हवेतच कशाला? असंही वाटतं मला.

बरं त्या भागात गरिबी इतकी जास्त आहे की लोकं अजूनही जागा सोडून गेलेले नाहीत कुठे. पिण्याचं पाणी अजूनही तिथलेच वापरतात, आणि म्हणूनच जर डाउ केमिकल्स जर तिथले रेसिड्युअल्स काढून टाकायला तयार नसेल, तर ती जागा विकून त्याच्या पैशातून का डीटॉक्सिंग केलं जात नाही? इथे पण कायदा आडवा येत असावा!!!

आज पुन्हा नेमेची येतो पावसाळा प्रमाणे आपले राजकीय नेते काहीतरी रॅलिज काढतील, भाषणं देतील.. आणि नंतर घरी  सगळं विसरतील..

आज २५ वर्ष झालीत या प्रकाराला, आणि म्हणून त्या ३०००० अज्ञात नागरिकांना श्रध्दांजली देण्यासाठी हे पोस्ट..

(वर घेतलेले सगळे फोटॊ , आणि थोडी माहिती पण बिग पिक मधुन घेतली आहे)

कौतुक

Written by  on August 3, 2012

महेन्द्र, mahendraस्वभाव कधी बदलतो का? कठीण प्रश्न आहे. पण विचार करा आणि स्वतःला प्रामाणिक पणे उत्तर द्यायचे म्हटले तर लक्षात येईल की मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. वेळ प्रसंगी आपण त्याला मुरड घालून आपला स्वभाव बदलला आहे अशी स्वतःची समजूत घालून घेतो.
प्रत्येकाचा स्वभाव जरी वेगवेगळा असला तरी एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या स्वभावात अगदी सारखी असते ती म्हणजे आपल्याला आपले कौतूक केलेले खूप आवडते.  दोन वर्षाच्या चिंगी पासून तर ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत. चिंगी, “तुझे बुटू किती छान आहेत गं ”  , किंवा “तू किती सुंदर आहेस गं”.. म्हटले की चिंगी खूष होते,तसेच एखाद्या ८०वर्षाच्या आजोबांना तुमची तब्येत खूप छान आहे हो असे म्हंटले की ते  खूश होतात.. थोडक्यात काय तर  प्रत्येकालाच आपले कौतूक केलेले आवडते.

आपले  जे वागतो ते पण बरेचदा केवळ इतरांनी आपले कौतूक करावे , आपल्याला चांगले म्हणावे म्हणूनच असते  . बायकोने स्वयंपाक केल्यावर ” छान झाली आहे भाजी” असे म्ह्टले की तिला भरून पावते, त्या पेक्षा जास्त तिची अपेक्षा  पण नसते.  ऑफिस मधे एखादे काम   केल्यावर बॉस ने दिलेली कौतुकाची थाप नक्कीच सुखावून जाते .जर कोणी कौतुक करणारे नसेल तर काय फायदा हो  कामं करण्याचा?

कौतूक बरेचदा आपल्याला इतरांकडून हवे असते. आपल्या लोकांकडून नाही. नाही पटत?? उदाहरणार्थ घरात कळकट गाऊन घालून दिवसभर बसणाऱ्या  बायका   तयार होतात  ते केवळ बाहेर निघतांना, कौतुकाची नजर हवी असते ती बाहेरच्या लोकांकडून नवऱ्याकडून नाही, आता काही स्त्रिया म्हणतील, की नवऱ्याच्या  कौतुकाच्या नजरेत स्वार्थ दिसतो 🙂 असो.. विषयांतर होतंय.

मी हे लिहितोय म्हणजे मी पण काही वेगळा नाही. मला पण कौतूक खूप आवडते. मग ते अरे बारीक झालास रे थोडा. असे जरी कोणी म्ह्टले तरी मला आनंद होतो.  ब्लॉग वर पण काही तरी लिहिल्यावर कौतूक व्हावे असे वाटत असतेच, किंबहूना मी लिहितो ते पण केवळ माझे कोणी तरी कौतूक  करावे म्हणूनच!   केवळ याच कारणासाठी आपण काही लिहिले की ब्लॉग ची लिंक मी चार – दोन गृप मधे आणि स्वतःच्या भिंतीवर लटकवत, सोबतच ही जाहिरात नाही हे बिरुद चिकटवायला पण कमी करत नाही

जर एखाद्या व्यक्तिने  आपल्या लेखाचे अपेक्षे प्रमाणे कौतूक केले नाही की मग थोडी चाहूल घेतो, की ह्याने लेख वाचला की नाही आपला?  नाही असे वाटले तर लिंक मेल करतो. नंतर तरीही त्याची रिऍक्शन आली नाही तर फोन करून विचारतो , ” की काय रे लेख वाचला की नाही?”  बरेचदा तर मित्रांच्या पोस्ट वर आपल्या लेखाची लिंक पोस्ट करून इतरांच्या फेसबुक भिंती रंगवण्याचे कामही मी कधी कधी करत असतो.

आपण लिहिलेला एखादा जुना लेख आपल्यालाच खूप आवडलेला असतो, पण त्या लेखाचे फारसे कौतूक झालेले नसते, किंवा कोणी “लेख जमलाय बरं का” असेही फारसे म्हटले नसते, तोच लेख पुन्हा पुन्हा फेसबुक मधे मित्रांच्या  भिंतीवर चिकटवून खरंच  लेख जमलाय की नाही याची चाहूल घेण्यासाठी नाही तर कौतूक करून घेण्यासाठी पोस्ट करतो मी बरेचदा.  म्हणजे काय,   कौतूक  व्हावे म्हणून लिहितो मी.

आत्म समाधान किंवा मला वाटतं म्हणून  मी “काय वाटेल ते “लिहिले असते, तर कौतुकाची अपेक्षा केली असती का? एखादा लेख कोणी वाचला नसेल तर ” अरे माझा तो लेख वाचलास की नाही?” असे विचारून त्याने वाचे पर्यंत पाठपुरावा   म्हणजे  माझा लेख वाच आणि माझे कौतूक कर, छान झालाय म्हण” ही आंतरिक इच्छा लपवून …………….!  किती दांभिक पणा नाही का ?

हे आयुष्य आहे ते आपण जगतोय ते केवळ पाठीवरच्या कौतुकाच्या थापे साठी! लहान मुल जेंव्हा स्वतःच्या पायावर पहिल्यांदा उभे रहाते, तेंव्हा आई नजरेतले कौतुक त्याला नक्कीच समजते. शाळेत सरांनी केलेले सुंदर हस्ताक्षरा बद्दलचे कौतूक , एखाद्या मैत्रिणीने अरे वा.. मस्त आफ्टर शेव्ह आहे रे म्हणून केलेले कौतूक, नवीन बाईक घेतल्यावर नाक्यावर बाईक घेऊन गेल्यावर मित्रांनी केलेले बाईकचे कौतूक, लग्न झाल्यावर बायको सोबत बाहेर निघाल्यावर नातेवाईकांनी/ मित्रांनी बायकोचे केलेले कौतूक, मुलीचे इंजिनिअरींग पुर्ण झाल्यावर जसे काही आपणच काही तरी मिळवले आहे असे समजून स्वतःचे करून घेतलेले कौतूक…. असे अनंत प्रकार आहे. शेवटी काय तर ह्या आयुष्याचा सगळा पायाच ह्या कौतुकावर अवलंबून आहे.

लेख लिहिलाय बरेच दिवसापूर्वी पण पण पोस्ट करायची इच्छा होत नव्हती. आज सहज ड्राफ्ट चेक केले तर हा लेख दिसला आणि पोस्ट करतोय आज..