३६० -रुबिक स्फिअर

Written by  on July 18, 2012

प्राध्यापक एर्नॊ रुबिक.. रुबिक क्युबचा जनक.  या रुबिक क्युब ने मला एकेकाळी वेड लावलं होतं. अगदी सारखा क्युबशी खेळत बसायचो. बराच प्रयत्न करुनही एकदाही हा क्युब सॉल्व्ह करता आला नाही. माझे काही मित्र पण ट्राय करित होतेच. तेंव्हा इंटरनेट नव्हतं .. त्यामुळे फक्त पुस्तकांवरच सगळी मदार असायची. एक दिवस एका मित्राच्या मोठ्या भावाने इंग्लंडहुन  एक पुस्तक आणलं होतं की रुबिक क्युब कसा सोडवायचा ते. ते पुस्तक वाचुन  एकदाचा क्युब सोडवायला शिकलॊ रुबिज क्युब कसा सोडवायचा ते. साधारण पणे दोन मिनिटं लागायची, पुर्ण क्युब सोडवायला. हा क्युब कसा सोड्वायचा इथे दिलंय.. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.wikihow.com/Solve-a-Rubik%27s-Cube-%28Easy-Move-Notation%29)

या क्युब मधे पण नंतर बऱ्याच व्हेरिएशन करुन चार बाय चार चे, किंवा ५बाय ५ , ६ बाय ६ चे क्युब्ज पण मार्केटला आलेत.  २००८ च्या वर्ल्ड रुबिज क्युब सॉल्व्हिंग कॉंपिटिशनमधे अवध्या ७.०८ सेकंदामधे क्युब सोड्वुन एरिक नावाच्या झेक नागरिकाने  पहिला नंबर पटकावला.
.
रुबिक क्युब हाताळलेला नाही असा माणुस विरळाच. तरी पण बराच प्रयत्न करुनही सोड्वता आला नाही की मग आलेलं फ्रस्ट्रेशन.. आणि चिड चिड.. ही प्रत्येकानेच अनुभवली असावी. नेटवर पण बरंच काही आहे या क्युबला सोड्वण्याबद्दल.

जगात अशीही काही लोकं आहेत , की एकदा क्युबचे सगळ्या रंगाची पोझिशन्स पाहिली की मग डॊळे बांधुन क्युब सोडवु शकतात. अशा बऱ्याच प्रकारच्या कॉंपिटीशन्स पण जगभर होतात. यात नंतर स्फिअर्स, कोन,  आणि बरेच प्रकार आलेत पण क्युब इतकी पॉप्युलरीटी कोणालाच मिळाली नाही.

Rubik Ball Rrubiks

१९७५ साली हा क्युब लॉंच केला गेला आणि आज पर्यंत त्याच्या ऑथोराइझ्ड  ३५० मिलियन कॉपिज सेल झालाय.त्या नंतर मग ३३ वर्षांनी , वयाच्या चौसष्टाव्या वर्षीया हंगेरियन प्रोफेसरने हे नविन पझल ( म्हणण्यापेक्षा ऍप्रोप्रिएट वर्ड आहे ब्रेन टिझर )  डिझाइन केले आहे.  दोन दिवसात हा साधारणपणे त्याच तत्वावर आधारित ’३६०’ नावाचा एक नविन खेळ लॉंच करणार आहे.
rubik-360
हे ३६० म्हणजे एक प्लास्टीक बॉल असेल , की ज्या मधे सहा वेगवेगळ्या रंगाचे बॉल्स असतिल प्लेअरने आतल्या स्फिअरच्या सरकम्फरन्सवरचे बॉल्स त्या रिस्पेक्टीव्ह त्याच रंगाच्या  खाचेत  घालायचे. यासाठी बॉल शेक करा, आणि असलेल्या दोन होल्स मधुन ते बॉल्स डिझायर्ड लोकेशन ला बसवायचे.. प्रिन्सिपल हे रुबीज क्युबचेच आहे. मला असं वाटतं याचं नावं काहिही जरी ठेवलं तरिही रुबिक स्फिअर हेच बहुतेक पॉप्युलर होइल. दिसायला अतिशय सोपा असलेला हा खेळ अतिशय कठिण आहे, पण एकदम मस्त आहे.  वाट पहातोय या नविन गेमची कधी लॉंच होतो ते…. 🙂