बायको, व्हर्जिनिटी, बाळ, विकणे आहे..

Written by  on June 8, 2012

इ बे वरची एक जाहिरात वाचण्यात आली. खरं तर  या विषयावर बरयाच ठिकाणी थोडं थोडं वाचल्या गेलंय.. ई बे ला आताच १० वर्ष पुर्ण झाले.एक संपुर्ण ऑन लाइन खरेदी विक्री केंद्र म्हणून त्याचे नांव युरोप आणि अमेरिकेत परिचयाचे आहे. याची पॉप्युलरीटी पण खुप आहे. अगदी टी शर्ट पासून तर इतर लहान सहान गोष्टी म्हणजे सेफ्टी पिन्स पर्यंत वस्तुंमध्ये व्यवहार इथे होतो.इथे काही विचित्र जाहिरातींच्या बद्दल लिहिलंय… ज्यांच्या बद्दल आपण कधी कल्पनाही करु शकत नाही अशा!!!!!

Wife_for_sale २६ वर्षं ती दोघं अगदी सुखासमाधानाने राहिली. पण नंतर त्याला (पॉल ऑस्बॉर्नला) समजलं की आपली बायकॊ आपल्यालाच चिट करते आहे. म्हणून त्याने एका नॉव्हेल पद्धतिने बदला घेतला. त्याने काय केलं की सरळ इ बे वर एक जाहिरात टाकली, त्यात त्याने एक्स बायकोचा फोटो, तिचा सेल नंबर, तिच्या बॉय फ्रेंड चा फोन नंबर,दिला होता आणि ज्यात तो म्हणतो, ही माझी … बिच वाइफ… वगैरे वगैरे… इथे लिहायला पण ऑकवर्ड होतंय.. पण तिच्या साठी तुम्ही बिड करु नका, असाही सल्ला देतोय..

Merlinएका जर्मन कपल ने आपले बाळ खूप रडत म्हणून इबे वर विकायला ठेवले होते.स्टार्टींग प्राईस होती १ डॉलर.त्या बाळाचा फोटो दिलाय खाली इतकं सुंदर आणि गोड बाळ आहे ते…… !आणि म्हंटलं होतं, मेल बेबी, २८ इंच लांबीची ,कॅन बी युझ्ड इन बेबी कॅरीअर ऑर प्रॅम. आता पोलिसांनी जेंव्हा जाउन चौकशी केली तेंव्हा मर्र्लीन   (त्या छॊट्य़ा बाळाची) आई म्हणाली की नाही हो… तो फक्त एक लहानसा प्रॅक्टिकल जोक होता, मी आपल्या छकुल्याला कधीच विकणार नाही. नंतर मग पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल तर केलाच, पण नंतर कोर्टाने समज देऊन सोडून दिले.. खरं तर असे जोक्स  करणे हे अमेरिकन्सच्या बाबतीत  ऐकुन आहे, पण आता युरोपियन्स पण???

Wedding Dressत्याचं लग्न झालं होतं ५ वर्षांपूर्वी, लग्नामधे मोठ्या कौतुकाने आपल्या बायकोसाठी वेडिंग ड्रेस घेतला होता विकत.. १२०० डॉलर्स चा.. जाहिरातीत लिहिले होते, की ह्या ड्रेस करता १२०० डॉलर खर्च केलाय , खरं तर लग्न ठरलं तेंव्हा  माझ्या बेवड्या सासर्याने ह्या ड्रेसचे पैसे  देण्याचे मान्य केले होते , पण त्याने ते पैसे दिले नाहीत. फक्त दोन वेळा हा ड्रेस घातल्या गेलाय हा ड्रेस, एकदा लग्नात बायकोने वापरलाय, आणि आता ह्या फोटॊ शुट करता मी घातलाय तो.आता बायको ला पण सोडून दिलंय आणि सासऱ्याने पण पैसे दिले नाहीत म्हणून आता थोडे तरी पैसे वसूल करण्यासाठी हा सुट विकायला काढला आहे.. आणि टू माय  सर्प्राइझ हा ड्रेस   ३८५० डॉलर्स विकल्या गेला. परवाच वाचले होते की एका मुलीला इबेवर ९९ सेंट्स मधे वेडींग ड्रेस मिळाला विकत..

रोझी रेड … हिने आपली व्हर्जिनिटी विकायला काढली होती ई बे वर. रेड…   तिला कॉलेज एज्युकेशन करता पैसे हवे होते, म्हणून तिने जाहिरात दिली होती.अर्थात, लवकरच ही जाहिरात इबे ने काढून टाकली,पण तिच्या जाहिरातीला एका दिवसात ७ हजारच्या वर हिट्स मिळाले होते. तिला कमीत कमी २२ लाख इ मेल्स पाठवले लोकांनी.

खरं तर , तिच्यावरच एक संपुर्ण लेख होऊ शकतो.रोझी ला कॉलेज शिक्षणासाठी पैसे हवे होते म्हणून तिने इंटरनेट वर जाहिरात दिली होती इ बे वर. पण लवकरच ती विथड्रॉ केल्यावर  र्रोझी ने आपली वेब साईट सुरु केली आणि तिथे पोस्ट पाउंडाच्या कर्जात असेन.सध्या मी ४.७५ पाउंड दर तासाला या रेटवर वेट्रेस म्हणून काम करते पण ते पैसे पुरेसे नाहीत. आणि जर अशाच तर्हेने मी माझं शिक्षण पुर्ण होईपर्यंत जवळपास १५ हजार पाउंडाच्या कर्जात असेन.
आता बरेच लोकं सेक्स मधे इन्व्हॉव्ल्ड असतातच, पण मी  एक लेस्बियन आहे आणि त्यामुळे अजूनही व्हर्जिन आहे. तेंव्हा या साठी मी पैसे घेण्याचं ठरवलंय..!

virginrosyreidतीने आपले शिक्षण ब्रिस्टॉल उनिव्हर्सिटी मधे  सुरु केले आहे, ती बॅचलर्स डिग्री इन सोशल पॉलिसी या विषयात ग्रॅज्युएशन करते आहे.तिने लिहिलंय, की अजुन तिन महिने जायचे आहेत आणि मी ऑलरेडी ३००० पाउंडाच्या कर्जात आहे. जस्ट माहिती साठी.. तिच्याच कॉलेज मधे टोनि ब्लेअरचा मुलगा पण शिकतो..:)

रोझी  – तिचे वडील जे व्यवसायाने डॉक्टर आहेत, त्यांनी म्हटलंय, की ती आपलं  शरीर नाही तर आत्मा विकते आहे आणि ही एक एम्ब्रॅसिंग सिच्युएशन आहे आमच्या साठी.

तिच्या साठी कित्येक लोकांनी ( जगात कुठेही जा , अगदी सारखीच मेंटॅलीटी.. आपल्या कडे जुन्या काळी पाटील , सावकार लोकं ’नथ’ उतरवायचे हजारो रुपये द्यायचे) बिड केले होते!

अमेरिकन इंटेरिअर डिझायनर कॅथी कॉब्लरसन याने तर ६५ हजार पाउंड ची ऑफर दिली होती.  पण काही रिस्पॉन्स मधे तिला लोकांनी ती स्वतःला कुठल्या धोक्यात घालते आहे याची जाणिव पण करुन दिली होती.

इ बे ने तिची जाहिरात काढून टाकल्यावर मग मात्र तिने आपली वेब साईट सुरु केली,आणि फायनली द चेरी वॉज पॉप्ड फॉर सम अनडिस्क्लोज्झ्ड अमाउंट!!!

एम एफ हुसेन ची गुफा.

Written by  on June 5, 2012

हुसेन ची गुफा

हुसेन च्या पेंटींग बद्दल मी आधी पण लिहिलेले आहेच-आणि आताही पुन्हा एकदा लिहीणार आहे, पण हे पोस्ट हुसेनचे पेंटींग चांगले की वाईट ह्या विषयी चे नसून हुसेनच्या   भारतात असलेल्या एकुलत्या एक आर्ट गॅलरी बद्दल आहे .

हुसेन हा जगविख्यात पेंटर- ह्याच्या पेंटींग बद्दल, आणि  ह्याने ज्या प्रकारची हिंदू धर्मियांना दुखावणारी चित्रं काढल्यामुळे त्याच्या बद्दल माझ्या मनात एक वेगळाच आकस आहे ,आणि हे मी उघडपणे मान्य पण करतो. कदाचित हेच एक कारण असेल की कित्येक वर्ष अहमदाबादला जाऊन आल्यावर पण कधी मला  हुसेनची गॅलरी पहायची इच्छा झाली नव्हती .पण या वेळेस मात्र जेंव्हा सहकुटुंब  अहमदाबादला गेलो होतो, तेंव्हा  मात्र इथे जाऊन आलो. जाण्याचे कारण अर्थातच सौ. ! कारण  सौ. सध्या दृष्य कला खंडाचे (चरित्र कोशाचे) संपादन करते आहे,त्यामुळे तिचा संबंध सध्या या चित्रकला जगातील दिग्गज लोकांशी  सारखा  येतो आहे. कदाचित सारखं संपादनाचं काम करून चित्रं समजू पण लागली असावी. निरनिराळ्या चित्रकारांचा आणि त्यांच्या शैलीचा अभ्यास केल्यामुळे पण तिचा  या विषयातला इंटरेस्ट हल्ली थोडा जास्तच  वाढल्यासारखा दिसतोय . मध्यंतरी “चिन्ह” च्या पुस्तकाचं पण एक परीक्षण केलं होतं तिने. असो.. कदाचित  हेच कारण असेल  की  ज्यामुळे तिच्या अजेंडा वर ही गॅलरी पहाणे हे  काम एकदम वरच्या क्रमांकावर होते.

अहमदाबादला ही हुसेनची गफा म्हणजेच गॅलरी कुठे आहे  हे माहिती नव्हतं. त्यामुळे  अगदी अगदी लोकेशन कुठे आहे? इथपासून  सगळी सुरुवात होती. ह्या गॅलरी  बद्दल  माझी अपेक्षा म्हणजे एखादी सिमेंट कॉंक्रिटची बिल्डींग , जिथे हुसेनची पेंटींग फ्रेम करून लावली गेली असतील, अशी होती,  पण प्रत्यक्षात  खरंच तसं होतं का?

आता  मकबुल फिदा हुसेन पंढरपूरचा, कर्म नगरी म्हणाल तर मुंबई! अख्खं आयुष्य मुंबई मधे काढले, मग असे असतांना पण त्याची ही गॅलरी अहमदाबाद मधे का सुरु केली असावी  हा प्रश्न  मला सारखा सतावत होता. थोडी चौकशी केल्यावर  असं समजलं, की  अहमदाबादला एक  ( बाळकृष्ण )बी व्ही दोशी. नावाचे जगविख्यात आर्किटेक्ट आहेत.   दोशी   आणि हुसेनचे मित्रत्वाचे संबंध. हुसेन अहमदाबादला गेल्यावर    आर्किटेक्ट बिव्ही दोशींच्या  कडे नेहेमी जायचे .

असं म्हंटलं जातं की एकदा बी व्ही दोशी यांनी   हुसेनला चॅलेंज दिलं, की मी इथे इतकी सुंदर  ( अर्किटेक्चरल मार्व्हल )गॅलरी बनवेन ,की त्या ठिकाणी पेंट करण्यासाठी  तुला म्हणजे  हुसेनला आपल्या कलेची पण पातळी वाढवावी लागेल.  आणि हुसेन ने हे चॅलेंज मान्य केले. शेवटी दोशींनी एक गॅलरी बनवली, आणि हुसेनला पेंट करण्यासाठी बोलावले. ह्याच  गॅलरीला  हुसेनची गुफा किंवा अहमादावादी गुफा म्हणून ओळखले जाते.

ह्या गॅलरी चा प्लान तसा एकदम जगावेगळा आहे. जगातली एकुलती एक अशी ही इमारत आहे.  या बिल्डींगचे डिझाइन कॉंप्युटर एडेड सॉ्फ्टवेअर वापरून  बनवलेले आहे.हेच कारण आहे, की पर्फेक्ट स्ट्रेस रिझोल्युशन मुळे इमारतीचे   घुमट  आणि इतर भाग   स्वतःलाच  “से्ल्फ सपोर्ट” करतात.

ही  इमारत अर्धी जमिनीखाली, तर अर्धी जमिनीच्या वर आहे ,थोडं विचित्र वाटणारं डिझाइन अहमदाबादच्या    गरम  तापमान मधे उन्हाळ्यातही ह्या बिल्डींग मधे थंडावा रहावा म्हणून मुद्दाम तयार करण्यात आलं आहे. कन्स्ट्रक्शन साठी   फेरोसिमेंट चा   वापर करण्यात आल्याने डॊम चे वजन कमी होण्यास मदत झाली आहे. आतल्या सगळ्या भिंती या नेहेमीप्रमाणे अगदी प्लेन नसल्याने फेरॊसिमेंटचा वापर उपयोगी पडला असावा.

आम्ही त्या गॅलरी जवळ पोहोचलो, आणि समोर असलेली इमारत पाहून आपण एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमाच्या सेट वर आलो की काय असे वाटले. समोर जमिनीवर बरीच घुमट दिसत होती. जमिनीवर हेल्मेट्स चा ढीग रचून ठेवावा , किंवा बरीच कासवं एकमेकांच्या अंगावर चढून मस्ती करताहेत अशी काहीशी रचना वाटत होती. . सगळ्या घुमटांना मोझॅक ने कव्हर केलेले आहे. एका मोठ्या सापाचे  पसरल्या सारखं डिझाइन  काळ्य़ा टाइल्स चे  मोझॅक वापरून बनवले होते. असे म्हणतात, की मुद्दाम काळ्य़ा पोर्सलिनच्या  डिश बनवून त्या फोडून त्याचे तुकडे करून हे डिझाइन बनवले गेले.

जेंव्हा आपण पायऱ्यांवरून खाली उतरतो, तेंव्हा  एखाद्या गुफे मधे आपण शिरतोय असा फिल येतो. गुफेच्या आत शिरल्यावर एक गोष्ट लक्षात आली की या गॅलरी मधली  प्रत्येक भिंत ही ओबडधोबड आहे, एकही भिंत सरळ नाही- हुसेन चे पेंटींग लावायचे तर कमीत कमी सरळ भिंत तर हवीच ना? पण नाही तसे नाही. दोशी यांनी खरंच हुसेन साठी चॅलेंज म्हणून या बिल्डींगचे बांधकाम केलेले आहे ही गोष्ट आठवली 🙂 आणि हसू आलं.   वर दिलेल्या डोम वर जे ओपनिंग आहेत, त्यातून प्रकाश आत शिरत होता. डॊम ला सपोर्ट करण्यासाठी  चित्रविचित्र आकाराचे सपोर्ट्स ( कॉलम्स) दिलेले आहेत.

ही गॅलरी बनवल्या नंतर इथे हुसेनला बोलावून  ही जागा दाखवल्यावर, हुसेनच्या लक्षात आलं, की आपल्याकडे असलेले एकही पेंटींग इथे लावले जाऊ शकत नाही, आणि  मग हुसेनने गुफेच्या आतला भाग त्याच्या खास शैली मधे पेंट केला. या मधे त्याचे फेमस घोडे, माणसांच्या आकृत्या, जनावरं , बरंच काही पेंट केलेले आहे. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटींग चा प्रकार इथे पहायला मिळतो.  समीक्षक  असे असं म्हणतात   की गुफेचे डिझाइन आणि हुसेनचे पेंटींग एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात. “आर्किटेक्ट्स गुफेची तारीफ करतात, तर पेंटर्स हुसेनच्या कलेची.”

मला स्वतःला पेंटींग मधले काही समजत नाही, पण ही गॅलरी मात्र आवडली हे नक्की. १९९३ मधे केवळ १८ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या या गुफेची आजची किंमत ( अर्थात हुसेनच्या पेंटींग सोबतची, कारण ते वेगळे केलेच जाऊ शकत नाही ) कोट्यावधी रुपये होईल. तेंव्हा जर  पुढल्या वेळेस कधी गेलात तर इथे नक्की भेट द्या. एक दिड तास चांगला  घालवण्याचे एक ठिकाण आहे हे अहमदाबाद मधले. इथलेच काही  फोटॊ  इथे पोस्ट करतोय. काही फोटो मी काढलेले तर काही नेट वरून घेतले आहेत.

मोझॅक वर्क.

हुसेन ने केलेले पेंटींग. या मधे कॅनव्हास म्हणजे चक्क आतला भिंतीचा आणि छताचा वापर केलेला आहे.

आतला भाग.

बिल्डींगचा बाहेरचा भाग.या डोमच्या छता खाली ती गुफा आहे.

आत शिरण्याचा रस्ता.

रंगांची उधळण..

हुसेन

हुसेन ने केलेले पेंटींग. या मधे कॅनव्हास म्हणजे चक्क आतला भिंतीचा आणि छताचा वापर केलेला आहे.

हुसेन दोशी गुफा

सेक्स टॉइज

Written by  on June 4, 2012

हे असं भलतं सलतं डिस्कस करणं तर दुरच, पण इथे आपल्या समाजात यावर बोलणं पण वाईट समजलं जातं, तरी पण आज यावर काहीतरी लिहिण्याची हिंम्मत करतोय.  खरं तर हा विषय आपल्या समाजात अजूनही टॅबो या सदरातच मोडतो.

परवाचीच गोष्ट आहे, फोर्ट ला फाउंटन आय एन एस (आंग्रे) म्हणजे इंडियन नेव्ही मधे काही कामासाठी जाणं झालं. एशियाटीकच्या उजव्या बाजुच्या गल्लीत हे ऑफीस आहे. काम आटोपून बाहेर निघे पर्यंत ४ वाजले . आता ऑफीसला जाणं शक्य नव्हतं, म्हणून सहज टंगळ मंगळ करीत फाउंटनच्या शेजारी फिरत होतो.  लहान लहान दुकानं रस्त्यावरची.. मला बघायला खूप आवडतात.  इथे कधी काय मिळेल ते सांगता येत नाही.

नुकतंच हरेक्रिष्णजींच्या ब्लॉग वर त्यांना मिळालेल्या सुंदर लेखांच्या पुस्तका बद्दल त्यांनी लिहिल्या मुळे माझे  पण पाय  फुटपाथवरच्या  जुन्या पुस्तकांच्या दुकाना कडे कधी वळले तेच समजले नाही, म्हंटलं की  आपलं लक चांगलं असेल तर आपल्यालाही एखादं चांगलं पुस्तक मिळेल.. त्या पुस्तकाच्या  दुकानाकडे जाणार,  तेवढ्यात एकदम शेजारीच असलेल्या  दुसऱ्या एका दुकानाकडे लक्षं गेलं.

रंगीबेरंगी चित्र पाहिली की आपसूकच पाय थांबत होते..त्यावर  अतिशय आकर्षक पणे रचुन ठेवलेल्या रंगिबेरंगी बॉक्सेसकडे नजर गेली. मानवी स्वभावानुसार , पाउलं नकळतच त्या दुकानाशी थांबली.. नीट पाहिलं तर तिथे  त्या बॉक्सेस वरचे  रंगीबेरंगी  फोटॊ सेक्स टॉइज चे होते.अतिशय आकर्षक!!  पाहिले, आणि लक्षात आलं की आपण कुठे  तरी भलत्याच ठिकाणी थांबलोय ते! आणि चपापून एकदम पुढे सरकलो. उगीच आजूबाजूला पाहिलं, कोणी ओळखीच्या माणसाने तर  नाहीं ना पाहिले आपल्याला इथे ?? आणि जर पाहिलेलं असेल तर   आपल्याबद्दल काय समज करुन घेतला असेल?? असा विचार आधी मनात आला. थोडं पुढे गेलो तर तो दुकानदार मागे मागे आला, आणि   हळूच पुटपुटला , सब कुच मिलेंगा इधर, सिडी,xxxxके अलावा ‘डॉल’ भी मिलेंगी.   त्याच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे निघालो, पण मनात विचार आला , इतक्या  सहजपणे हे सगळं असं उघड्यावर विकलं जातंय?ज्या सहजतेने तो माणुस मला अप्रोच झाला , ते बघून मी तर आवाकच झालो, आणि असं वाटलं , की ह्याच सहजतेने तो हेच प्रॉडक्ट्स १५-१६ वर्षाच्या मुलांना पण दाखवत/विकत असेल?? आणि नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा आला.. जग किती बदलतंय?

एक बातमी  ^(http://rangmarathiche.com/goto/http://hindi.webdunia.com/news/news/regional/0706/20/1070620111_1.htm)वाचली होती,२००७ मधली गोष्ट आहे ही..  एका मेडिकल कंपनीने व्हाय्ब्रो रिंग आणली होती मार्केट मधे आणि ती एक मेडीकल  इन्स्टृमेंट म्हणून मध्य प्रदेशात भोपाळ मधे विकली जात  होती.नंतर मग कोणीतरी त्या बद्दल कम्प्लेंट केल्यावर ती विक्री बंद झाली . भारता मधे सेक्स टॉइज विकणं हा कायद्याने गुन्हा आहे, आणि तरी पण   इतक्या ओपनली कायद्याची पायमल्ली कशी केली जाउ शकते? आणि हे थांबवायला पंतप्रधानांना हस्तक्षेप करावा लागतो? एक मंत्री अशा कामात लिप्त असू शकतो?? असे कित्येक प्रश्न आहेत..कधी कधी तर विचार करून वेड लागायची पाळी येते. कठीण आहे..

कालच पुन्हा एक बातमी, याच विषयाच्या संदर्भात  वाचली- टाइम्स ऑफ इंडीया मधे . लास व्हेगास येथे ऍडल्ट एंटरटेनमेंट एक्स्पो मधे एक रोबोट गर्ल विकण्यात आली – अगदी ऍस्ट्रोनॉमस किमतीला. ती फक्त व्हॅक्युम करु शकत नाही आणि स्वयंपाक करु शकत नाही.. बाकी सगळं(?) करु शकते अशी जाहिरात केली गेली या रोबोट गर्ल ची. कालच्या टाइम्स मधे तुम्ही पण यावर वाचलं असेलंच. ती संपुर्ण पणे प्रोग्रामेबल आहे. तुम्ही तुमच्या आवडी फिड केल्या, की ती पण त्याच आवडी निवडी ऍडॉप्ट करेल. तुम्हाला जे आवडेल तेच तिला पण आवडेल, आणि तुमच्याशी ती त्याच  म्हणजे तुमच्या आवडीच्या विषयावर गप्पा मारु शकेल.इंटरनेटशी ती कनेक्टेड राहिल,ऍटोमॅटीक सॉफ्ट वेअर अपडेट साठी.. तसेच ती तुम्हाला इमेल पण पाठवू शकेल . माणसाची कल्पनाशक्ती कुठपर्यंत जाईल हेच सांगता येत नाही.

सेक्स टॉइजवर बंदी असावी की नाही हा पुर्णपणे वेगळा प्रश्न आहे.  काही एक्सपर्ट्स चं असंही म्हणणं आहे, की अशा प्रकारचे टॉइज  सहज उपलब्ध करून दिल्यास त्या अनुषंगाने होणारे क्राइम्स कमी होतील, एड्स वगैरे चे प्रमाण कमी होईल, तर काही एक्सपर्ट्स असंही म्हणतात, की हे असे प्रकार मानसिक आजाराला आमंत्रण देणारे पण ठरु शकतात, स्त्री ,पुरुष दोघेही  मानसिक दृष्ट्य़ा एकलकोंडे बनु शकतात.

जरी फॉर द सेक ऑफ डिस्कशन आपण असं जरी समजलो की याचा खूप फायदा आहे, तरी पण आजच्या परिस्थितीत या गोष्टींची इतक्या सहजपणे उपलब्धता नसावी  असे मला वाटते.   पुढच्या पिढीला या अशा जोमाने फोफावणाऱ्या या काळसर्पाच्या तावडीतून कसे सुखरुप ठेवायचे हा पालकांच्या दृष्टीने एक मोठ्ठा प्रश्नंच आहे. मुलं अशा गोष्टींना अतिशय सहजपणे बळी पडू शकतात….म्हणून जास्त काळजी वाटते .

ऍव्हलीन टॉफलरच्या “फ्युचर शॉक” मधे यावर काहीच लिहिलें नाही… मला वाट्तं विसरला असावा तो…  🙂