बंदी घातलेली पुस्तकं..

Written by  on April 25, 2012

कुठलीही गोष्ट आपण नेहेमीच एका ठरावीक बौद्धिक तराजू मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणूनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच  बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल   वाचण्यात आलं होतं. त्यामुळे ही पुस्तकं वाचायची  इच्छा वाढली होती. थोडी राजकीय , पण बरीचशी श्रृंगारिक पुस्तकं होती बंदी घातलेल्या पुस्तकांमधे .  लेखकांवर अशी पुस्तकं लिहिल्या बद्दल   खटले  चालवून   लेखकांना अटक पण करण्यात आली होती-  आता, इतकी गाजलेली पुस्तकं, मग त्यामधे काय असेल ही उत्सुकता  काही शांत बसू देत नव्हती- ती पुस्तकं एकदा तरी वाचलीच पाहिजे अशी इच्छा व्हायची .

नेटवर बहुतेक सगळी पुस्तकं पिडीएफ मधे उपलब्ध आहेत- .बंदी घातली गेलेली  पुस्तकं नेट वर शोधली आणि डाउन लोड करुन वाचली- काही पुर्ण वाचली , तर काही नुसती चाळली त्यांचीच थोडी माहिती इथे देतोय. यातली काही पुस्तकं ही अश्लीलतेकडे झुकणारी, किंवा अश्लील म्हणता येतील अशी पण आहेत. पुस्तकांचा काळ हा अगदी १७ व्या शतका पासून तर १९ व्या शतका पर्यंत   आहे. त्या काळी पण असं साहित्य अस्तित्वात होतं हे बघून खरं तर आश्चर्यच वाटतं.

एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा काही दशका  पूर्वीचा दृष्टीकोन आणि आजचा दृष्टीकोन यामधे जमीन अस्मान चं अंतर आहे. मी लहान असतांना चंद्रकांत काकोडकर हे अश्लील – चावट लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते.ह्यांची शामा ही कादंबरी बरीच गाजली होती. त्या  कादंबरी मधे काय होतं असं?? आजच्या तुलनेत अजिबात काही नव्हतं. थोडं रोमान्सचं वर्णन केलं गेलं होतं. त्या काळात या कादंबरी कडे एक श्रृंगारिक कादंबरी म्हणून बघितलं जायचं आणि आमच्या सारखे मुलं चोरुन वाचायचे . तेंव्हा नुस्तं नायकाने नायिकेला जवळ घेतलं, आणि तिचं चुंबन घेतलं, इतकं जरी वाचलं तरी  अंगावर शहारुन यायचं   🙂  सगळ्यात जास्त इरॉटीक /रोमॅंटीक साहित्य होतं मराठी मधलं. आता नेटवर इतकं जास्त व्हिडिओ आणि अश्लील फोटो, लेख उपलब्ध आहेत, की काकोडकर एकदम फिके वाटतात, आणि त्यांच्यावर का केस केली गेली होती हेच समजत नाही??

काही महिन्यांपूर्वी एक रा.घो. कर्वेंवरचा चित्रपट पाहिला होता टिव्हीवर. त्या मधे दाखवलं आहे, की समाज स्वास्थ्य म्हणून जे मासिक ते काढायचे त्याला पण एक अश्लील साहित्य म्हणून त्यावर खटले भरण्यात आले होते.मराठी साहित्य इतके शुचिर्भूत होते, की सीमा रेषेला कधी  किंचितही स्पर्श झाला तरी लोकं अकांड तांडव करायचे. हा चित्रपट अतिशय सुंदर होता. संतती नियमां साठी त्यांनी केलेलं काम उत्कृष्ट रीत्या दाखवलं होतं. पदरचे पैसे खर्च करुन ते एक समाजस्वास्थ्य म्हणून  मासिक चालवायचे. अश्लिलतेच्या कायद्याखाली त्यांच्यावर बरेचदा खटले दाखल करण्यात आले . पैसा नसतांना पण त्यांनी हे मासिक सुरु ठेवलं.

केवळ भारतामधे नाही तर जगभरात असे अनेक साहित्य प्रकाशित केले गेले आणि त्या साहित्यिकांवर खटले पण चालवले गेले. काही ठिकाणी तर जेल मधे पण जावं लागलं साहित्यिकांना.

लेडी चॅटर्लीज लव्हर हे पुस्तक एवढ्यातच म्हणजे १९६० सालपर्यंत बंदी घातलेलं पुस्तक होतं . या पुस्तकावर १८५७ चा ऑब्सिन पब्लिकेशन ऍक्ट खाली खटला भरण्यात आला होता. या पुस्तका मधे होतं तरी काय?? मी वाचलंय.. अजिबात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही मला.प्लॅटोनिक लव्ह वगैरे काही नसतं.प्रेम हे शेवटी   शारिरीक पातळीवरच जाउन पोहोचतं असं लिहिलंय यामधे-.

हे पुस्तक मला तरी अतिशय उत्कटतेने लिहिलेली एका स्त्रीची अतृप्त भावनांची कहाणी वाटली. कॉनी चा नवरा लॉर्ड क्लिफोर्ड… एका युध्दामधे जातो- तो जातो तेंव्हा होणारा सेक्स्युअल भावनांचा कोंडमारा आणि ती वाट पहात असते तो परत येण्याची. तो जेंव्हा परत येतो तेंव्हा व्हिल चेअर वरच बसलेला!!  अजिबात  खालच्या शरीराची हालचाल करता येत नसते त्याला.

कॉनीच्या स्त्रीसुलभ आणि सेक्स्युअल  भावना  या सारख्या उफाळून येतात- त्यांची पूर्ती तर व्हायलाच हवी. नवऱ्यावर असलेलं प्रेम, त्याची  ’ती’ असमर्थता, त्यातुन आलेलं वैफल्य आणि त्या मुळे  उद्युक्त होणाऱ्या सेक्स्युअल  भावनांची  दमन करण्याचा प्रयत्न आणि नंतर मग   पूर्ती करण्यासाठी तिने तिच्या नवऱ्याच्या मॅनेजर बरोबर केलेली शय्या सोबत -अशी सरळ धोपट कहाणी आहे.  कॉनी ही व्याभीचारी नाही- तिचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे अगदी मनापासून.. पण , परिस्थिती मुळे  ती  केवळ शरीरसूखा साठी  नवऱ्याच्या मॅने्जर बरोबर  लग्न बाह्य संबंध ठेवते.

जर तिचा नवरा व्हिल चेअर बाउंड झाला नसता, तर ती अशी वागली असती कां?? हा विचार बरेचदा वाचतांना मनात येतो..बऱ्याच लहान लहान प्रसंगातून अतिशय सुंदर रीतीने  तिचा मॅनेजर बरोबरचा रोमान्स रंगवला आहे.  डि एच लॉरेन्स यांचं हे पुस्तक लिहिलेलं हे पुस्तक एकदा तरी अवश्य वाचायलाच हवं .पुस्तकाची भाषा अप्रतिम आहे  डीएच लॉरेन्सचं पुस्तक  असल्यामुळे !! आता हे पुस्तक म्हणजे श्रृंगारिक कादंबरीतला एक मानदंड ठरावा असे आहे . या पुस्तकातल्या नायिकेचा तिरस्कार करावा की तीची कीव करावी – ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधताच हे पुस्तक संपत. एकदा आवर्जून वाचा..इथे लिंक दिलेली आहे  ^(http://rangmarathiche.com/goto/http://catdir.loc.gov/catdir/samples/cam031/91008194.pdf)डाउन लोड करायला.

स्त्री पुरुष संबंधाची उघडपणे  केली गेलेली वर्णने आपल्या देशात अगदी फार पुरातन काळापासून चालत आली आहेत. वात्सायनाचे कामसुत्र म्हंटलं की  फक्त ती ऍक्रोबॅटीक आसनंच आठवतात. पण खरंच तसं आहे का? कामसुत्रा मधे त्या व्यतिरिक्त खुप माहिती दिलेली आहे. आपण फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन आपली मतं बनवतो- काम सुत्र म्हणजे ती चौर्यांशी आसनं इतकंच समजतो आपण पण तसं नाही. हे पुस्तक अतिशय सुंदर रितीने त्या काळातल्या वातावरणामधून वैवाहीक जिवन सुखी कसं असावं याची माहिती देणारं पुस्तक होतं.  ह्या पुस्तकामध्ये आदर्श वैवाहीक जीवन कसं असावं याची माहिती दिलेली आहे .स्त्री ला काय आवडतं? पुरुषाने कसे वागावे? असे अनेक मुद्दे आहेत दिलेले. दुर्दैवाने आजही इतक्या सुंदर ग्रंथाकडे भारतामधे एक पोर्नोग्राफिक पुस्तक म्हणून पाहिलं जातं.इथे वाचा  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.hawaii.edu/hivandaids/Kama%20Sutra.pdf)ते पुस्तक.

हे पुस्तक खरं तर या विषयावरचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक ठरु शकतं . याच पुस्तकावरून बेतलेलं एक अरबी पुस्तक पण त्या काळी निघालं होतं त्याचं नाव होतं पर्फ्युम्ड गार्डन.वाचायचं असेल तर इथे आहे ते. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.tantra-sex.com/perfumedgarden.html). यावर जास्त काही लिहित नाही फक्त एकच आहे हे पुस्तक म्हणजे परस्त्रीला प्रेमात कसे पाडायचे याचे पाठ पढवतं.नवऱ्याच्या नकळत एखाद्या स्त्रीला प्रेमात कसं पाडायचं?? ( या अरबांची स्टाइल तेंव्हा पण तशीच होती. )मला वाटतं की पुस्तका पेक्षा फॅंटसी कडे वळणारे लेखन होते हे. १८५० च्या काळात अशी पुस्तकं छापण  म्हणजे ्खूपच धैर्याचं काम होतं. ही पु्स्तकं कामोत्तेजक   जरी नसलं, तरीही नैतीक मुल्यांना धक्का देणारं म्हणून हे पर्फ्युम्ड गार्डन तेंव्हा खुप गाजलं होतं. अशाच लेखनामुळे नैतीक अधःपतन होतं अशी कल्पना पण काही लॉर्डस लोकांनी हाउस ऑफ कॉमन्स मधे मांडून त्यावर बंदीची मागणी केली.पुढली बरीच वर्ष यावर बंदी घातली गेली होती .

सगळ्यात जास्त गाजलेलं पहिलं सेक्स बद्दल स्पष्ट पणे लिहिल्या गेलेलं एका वेश्येचं आत्मचरित्र म्हणजेच फॅनी हिल्स वुमन ऑफ प्लेझर!! १७४८ साली ही कादंबरी लिहिली गेली. जॉन क्विलंड हा लेखक होता या कादंबरीचा. अतिशय  धीट विषय, उत्कृष्ट हाताळणी, आणि भावना चेतवणारं लिखाण म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. फॅनी हिल्स म्हणजे आजकालची कहाणी फक्त लिहिल्या गेली १७४८ मधे.

एका गावाकडल्या मुलीला शहरात आणून कुंटणखान्यात आणून ठेवलं जातं. तिथे ती दररोजच  स्त्री पुरुष संबंध पहाते ,आणि नकळत त्या बद्दल एक वेगळं आकर्षण निर्माण होतं तिच्या मनात.पुरुषाची भिती संपून जाते .एकदा भिती संपली की तिला असे संबंध हवे हवेसे वाटु लागतात.    अगदी जो कोणी पहिला पुरुष येइल त्याबरोबर किंवा कोणाही बरोबर शैय्या सोबत करायची मानसिक तयारी होते तिचे.. नंतर तिचं चार्ल्स वर प्रेम बसून त्याच्या  बरोबर पळून जाणं, चार्ल्सच्या वडिलांनी त्याला परदेशी पाठवून देणं.. आणि मग फॅनीचं केवळ स्वतःच्या सेक्स्युल निड्स पुर्ण करुन घेण्यासाठी  फुल फ्लेज्ड प्रॉस्टीट्य़ुशन -सुरु करणं आणि येन केन प्रकारेण …. जाउ द्या. .. पुस्तक वाचायचं असेल तर.. इथे आहे ते ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.google.co.in/url?sa=t&source=web&ct=res&cd=3&ved=0CBMQFjAC&url=http%3A%2F%2Fwww.feedbooks.com%2Fbook%2F84.pdf&rct=j&q=fanny+hills+pdf+download&ei=JcxwS6m5BtegkQXP_u3zCQ&usg=AFQjCNHvmxn8SMn2S4EL_0yjZ3efW6M5tQ)!  असं म्हणतात की त्या काळी स्त्रियांना लैगीक भावना फार दाखवणं अपेक्षित नव्हतं, कद्चित म्हणून एक स्त्री आपल्याला सेक्स आवडतो, आणि तो पुर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पुरुषांशी शैय्या सोबत करते.. ही गोष्टच सर्व मान्य नव्हती.  म्ह्णूनही असेल हे पुस्तक गाजलेलं.  इतकी वर्ष बंदी असलेलं पुस्तक म्हणुन एकदा तरी वाचावं म्हणून मी डाउन लोड केलं पण पुर्ण वाचलं नाही.. अर्धवट वाचून सोडून दिलं.

दसऱ्या महायुध्दाच्या काळात , कोणी वॉल्टर हे काल्पनीक  नांव घेउन  एक माणुस  आपला निरनिराळ्या  १००० स्त्रियांबरोबरच्या सेक्स्युअल संबंधाची कहाणी   लिहितो. माय सिक्रेट लाइफ या अतिशय पॉप्युलर पुस्तका मधे- आणि  ते पण ११ खंडामध .इस १८५७ च्या कालावधीमधे असे स्पष्ट लिहिले गेलेले हे एकुलते एक   अश्लील पुस्तक म्हणावे लागेल.  खुप पॉप्युलर पुस्तक होतं ते.हलकं फुलकं, किंचित तोचतोपणा असलेलं हे पुस्तक आहे..  अर्थात तुम्ही जर आजच्या अव्हेलेबल असलेल्या साहित्याबद्दल बोलाल, तर हे पुस्तक एकदम मिळमिळीत वाटण्याची शक्यता आहे पण १८५७ च्या काळात ह्या पुस्तकामुळे किती वादळ उठलं असेल ते तुम्ही समजू शकता.  हा वॉल्टर कोण होता ते कधिच समजलं नाही.या पुस्तकावर बऱ्याच देशात आणि खूप वर्ष बंदी होती.   (ऑब्सिन ऍक्ट च्या अंतर्गत बंदी ). ते पुस्तक इथे आहे. ^(http://rangmarathiche.com/goto/http://s3.amazonaws.com/manybooks_pdf/anonymous3036030360-8?AWSAccessKeyId=17359FS6G622SA3TH7R2&Expires=1265685147&Signature=FcLhkRLkh%2FMD8NYa1utp0LVHS84%3D) आजकालच्या अश्लिलतेच्या मानदंडापुढे हे पुस्तक एकदम फूसकं वाटू शकतं- आणि कंटाळवाणं तसेच रिपिटेटिव्ह नेचरच.

एक पुस्तक होतं. १२० डेज ऑफ सोडोम. सेक्स फॅंटसी वर वाहिलेलं हे पुस्तक अतिशय बिभत्स म्हणता येइल असं पुस्तकात होतं. मार्किस नावाच्या फ्रेंच लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक सॅडिझम वर लिहिलं होतं. हे पुस्तक वाचलं की  किळस वाटते वाचतांना. यावरच एक चित्रपट पण काढला गेला होता- याच नावाने. याची लिंक मला सापडली पण मुद्दामच इथे देत नाही. १७व्या शतकात फ्रान्स मधे एका निर्जन भागातल्या पॅलेसमधे सरदार लोकं खून, वासना, बिभत्सता वागणूक, यांचा जो खेळ खेळतात त्याचं वर्णन आहे या पुस्तकामधे. १६ कुमारीका, ८ तरुण, आणि काही स्त्रियांना एका ठिकाणी डांबून ठेवले जाते. हे सरदार चार वेश्यांकडुन त्यांचे अनुभव ऐकतात आणि त्यांची उजळणी या तरुणींवर केली जाते.या मधे छळाची वर्णनं आहेत केलेली की वाचतांना घृणा यावी. मी तर हे पुस्तक वाचूच शकलो नाही.शेवटी प्रत्येकाचाच खून केला जातो. यु ट्युब वर काही क्लिप्स आहेत या चित्रपटाच्या. शोधा, हव्या असतील तर- मी देणार नाही लिंक्स किंवा पुस्तकाची पिडीएफ लोकेशन..

हेन्री मिलर नावाचा एक लेखक होऊन गेला. त्याने १९४० मधे एक ट्रॉपिक ऑफ कन्सर ही कादंबरी लि्हीली.अमेरिकेत ऑल टाइम फर्स्ट ५० बेस्ट नॉव्हेल्स मधे पण हिचा समावेश केला गेला आहे.

याच सुमारास  डेल्टा ऑफ व्हिनस हा कथा संग्रह पण प्रकाशित करण्यात आला- लेखिका होती अनेस निन -मिलरची प्रेयसी!!!!. असं म्हणतात की प्रत्येक पान  लिहीण्यासाठी लेखकाला त्या काळी एक डॉलर देण्यात आला होता. अट एकच होती, कादंबरी मधे इतर वर्णन, ्निसर्ग वगैरे अजिबात नसावे , फक्त सेक्स आणि सेक्स यावरच ही कादंबरी असावी. १९६७ मधे पेंग्विनने प्रकाशित केलेली हा कथा संग्रह मजेशिर आहे.  या कथा संग्रहामुळे उत्तेजक लेखन करणारी पहिली लेखिका म्हणून तिला मान मिळाला.

त्या काळात जेंव्हा आपल्या भारता मधे आपण राघो कर्वेंवर खटला चालवत होतो, त्याच काळात जगात इतकं काही  होऊन गेलं होतं. काही बाबतीत मागासलेलं असणं  पण खूपच चांगलं असतं नाही??

सेक्स आणि संस्कृती

Written by  on April 12, 2012

मी आधीच सांगितलंय की मी किती चांगला अन सत्प्रवृत्त आहे हे दाखवण्यासाठी हा ब्लॉग मी लिहित नाही. माझ्या मनातील विचार अगदी प्रामाणिक पणे लिहिण्याचा मी इथे प्रयत्न करतो. आपल्या  भारतीय संस्कृती मधे ह्या विषयावर काहीही बोलणे म्हणजे महा पाप आहे. . . भारतामधे सेक्स हा शब्द टॊटली टॅबु आहे. नुसता शब्द जरी उच्चारला तरीही भुवया वक्र होतात. या विषयावर पुर्वी काहीही बोलले जायचे नाही. हा प्रकार म्हणजे काही तरी घाण गोष्ट असा कन्सेप्ट होता.ज्या गोष्टींवर जगाचे रहाट गाडगे चालते ती गोष्ट म्हणजे सेक्स.. मग तिला वाईट का म्हणायचं? मला वाटतं आता वेळ आलेली आहे, की भारतीयांनी पण क्लोझेट मधून बाहेर येउन या गोष्टीवर पण ओपनली चर्चा केली पाहिजे.

पूर्वीच्या काळी, जी काही माहिती मिळायची, ती फक्त ऐकीव स्वरुपातच असायची आणि अर्धवट माहिती असलेल्या माणसा कडूनच- , हल्ली तसं नाही, इंटरनेट आल्या पासुन बरंच जग बदललंय..

ह्या विषयावर जरी काही बोलणे किंवा इतर काही ज्ञान दिले जात नसले तरी पण योनी शुचुता हा भारतियांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. काहीही झालं तरी हरकत नाही, पण स्त्री ची अब्रु ही काचे प्रमाणे असते वगैरे वगैरे गोष्टी अगदी  बालपणापासून स्त्री च्या मनावर बिंबवल्या गेल्या असतात.( ह्या गोष्टी बरोबर की चूक हे डिस्कस करणार नाही इथे)

हा विषय डोक्यामधे घोळत होता बरेच दिवसा पासून. हा  विषय साधारणतः तीन पिरियडस मधे विभागला जाउ शकतो. एक म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळ, दुसरा म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काळ, आणि आत्ताचा काळ..  ^(http://rangmarathiche.com/goto/http://en.wikipedia.org/wiki/G-spot)की जेंव्हा आता ऑफिसेस मधे समवयीन लोकं जी स्पॉट ^(http://rangmarathiche.com/goto/http://en.wikipedia.org/wiki/G-spot) वगैरे गोष्टी पण हल्ली डिस्कस करतात..

पहिला पिरियड:-

पुर्वी च्या काळी जेंव्हा बाल विवाह पद्धती भारतामधे होती( १९व्या शतकाच्या सुरवातीला) तेंव्हा वयाच्या १५-१६ व्या वर्षीच  विवाह होऊन मुलगी पती कडे रहायला जायची. तेंव्हा सेक्स विषयी चे ज्ञान अगदीच नगण्य असायचे. जे काही शिकायचं ते केवळ प्रॅक्टीकल अनुभवा वरुन, नैसर्गिकरीत्या हे शिकता येइल ते.. .सेक्स म्हणजे काय हे समजण्या पूर्वीच आणि सेक्स हा एंजोय करायचा असतो हे समजण्या पूर्वी  ,दोन तिन मुलं पदरी पडायची अन रोजच्या रहाटगाडग्यात स्त्री ने गुंतून जायचे. अगदी दोन पिढ्या आधी.. ही सिस्टीम प्रचलित होती. स्त्रियांचा एक भोग वस्तु म्हणून वापर अगदी सर्वमान्य होता. प्रत्येक स्त्रीला ( भरल्या घरातली) कमीत कमी ६ ते ९ मुलं असायची. अर्थात ह्या पैकी सगळी मुलं जगायची असं नाही. त्यापैकी बरीच मुलं बाळंतपणातच दगावायची. बऱ्याच स्त्रियांचा  बाळंतपणातजीव पण जायचा. सेक्स म्हणजे मुलं होण्याकरिता करण्याची क्रिया..असाच समज होता. हा प्रकार स्त्रियांनी एंजॉय करायचा असतो हा कन्सेप्टच नव्हता..

दुसरा पिरियड :-

भारत स्वतंत्र झाला होता, बाल विवाह हा कायद्याने गुन्हा झाला होता .स्वातंत्र्याकरता लढलेल्या लोकांच्या नंतरची पिढी होती ही. ह्या लोकांनी स्वतंत्र भारतामधे जन्म घेतला होता. साधारण ६० व्या दशकात जन्मलेली मुलं आणि मुली  यांनी शिक्षण घेणे सुरु केले होते. सेक्स म्हणजे संभोग , म्हणजे दोघांनीही एकत्र घेतलेला भोग( म्हणजे काय?) ,… वगैरे वगैरे.. गोष्टी थोड्याफार वर्गामधे मुलांमधे चर्चिल्या जाउ लागल्या होत्या. तरीही ह्या विषयावरचे ज्ञान मात्र अगदी( खरं तर शुन्य) यथा तथाच होते.तसंही नाही म्हणायला पिवळ्या कव्हरमधली पुस्तकं रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडे दिसु लागली होती. मुलांच्या हातामधे पैसा हा कधिच नसायचा. त्यामुळे एखादेच पुस्तक  ,लगन झालेल्या मोठ्या भावाच्या गादिखालचं कोणितरी आणायचा.वर्गामधे सगळी मुलं ते पुस्तक आळीपाळीने वाचायची. मला आठवतं मी आठवीत असतांना सुहागरात म्हणुन एक पुस्तक एका मुलाने आणले होते, त्या पुस्तकाचे कॉमन रिडींग एका ऑफ पिरियडला झाले होते .. भर वर्गात… आता वर्गामधे मुली नव्हत्या म्हणून बरं… आमची केवळ मुलांचीच शाळा होती ना…..!अर्थात त्या पुस्तकात अजिबात काहीच दिलेले नव्हते पण जेवढे काही दिलेले होते, तेच आमच्या दृष्टीने खुप होते.

वात्सायनाचे काम शास्त्र ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.urday.com/kart.html) म्हणुन एका संस्कृत ग्रंथाच्या बद्दल पण भारतियांमधे आणि परदेशामधे एक वेगळंच सुप्त अट्रॅक्शन असते.आम्ही पण शाळेत असतांना हे पुस्तक म्हणजे काहितरी ग्रेट असेल म्हणुन वाचायला जीव टाकायचो.. एकदा एका मित्राने वर्गात आणले होते तेंव्हा वाचायला मिळालं पण होतं.. पण त्यात असं काही वावगं दिसलं नाही.. फक्त कॉम्प्रोमायझींग पोझिशन्स मधली रेखा चित्रे मात्र पाहिल्याचं आठवतं..तसेच एकदा  एका मुलाने वर्गामधे अने विर्यनाश म्हणजे मृत्यु हे पुस्तक आणले होते, आणि नंतर कित्येक दिवस आम्ही लोक घाबरुन गेलो होतो. सायकिक डिसऑर्डर व्हायची वेळ आली होती.. पण हळु हळू सांभाळल्या गेलो.

बरं ह्या गोष्टी कुणाला विचारायच्या तरी पण लाज वाटायची.. एक बाकी खरं,  मुलांना  ह्या विषयावरचं ज्ञान अगदी शून्य होतं, जे काही समजायचं ते असंच उडत उडत.केवळ म्हणूनच मला असं वाटतं की पौगंडावस्थेतील मुलांना ( ७ वी ८ वीत )ह्या विषयावर शास्त्र शुद्ध शिक्षण देणे आवश्यक आहे..

हे सगळं लिहिण्यामागचा उद्देश केवळ हाच की पौगंडावस्थेतील मुलांना ह्या गोष्टी बद्दल सुप्त अट्रॅक्शन असतं.. आणि त्यामुळे ह्या मधली काहिही माहिती काढण्यासाठी मुलं काहिही करण्यासाठी तयार असतात. ब्लॉटींग पेपर जसा शाई टिपून घेतो, तसाच ह्या वयात जे काही बरं वाइट वाचायला मिळेल  ते मुलं वाचतात.

ह्याच पिढी ने वपु काळेंचं पुस्तक पार्टनर वाचलं.. मला आठवतं १९८२ मधे ह्या पुस्तकाचं अगदी पारायण केलं होतं.. त्यामधले ते पार्टनरने लिहलेले पत्र.. … वाचून संभोग म्हणजे काय ? ह्या गोष्टी बद्दल अजूनच कन्फ्युजन वाढीला लागायचं…

हेच ते वपुंचं पार्टनर मधलं पत्र..
“समुद्राची ताकद टिटवी समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फुलाला उमलत नाही.
एवढासा तू, त्याहून एवढासा मी मला जीवनाचा अर्थ कसला विचारतोस?आणि त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो, हे तुला कोणी सांगितले?
पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मूर्ख म्हणून नव्हे तर जाणकार म्हणून थांबले.
पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणून.
कोणता आनंद क्षण जीवी नाही?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास.
सुगंधाचं नातं नाकाशी.घशातून आत गेल्यावर ती फ़क्त हवा.
खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेचे नसून तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसिकता संपली.
इतर अनेक गरजा प्रमाणे “तृप्ती” जी एक गरज आहे.
जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ.”

काय सुंदर लिहिलंय ना? वपुंचं ते पार्टनर प्रत्येकाने एकदा तरी जरुर वाचावे. आज जवळपास तिस वर्षानंतर पण त्या पुस्तकाची जादु काही कमी झालेली नाही.

तिसरा पिरियड:-

.आजच्या पिढी मधे आता इतकी डेव्हलपमेंट झालेली आहे की आपण सेक्स एज्युकेशन बद्दल बोलणं सुरु केलंय, शाळेमधे द्यायचं की नाही हे डिस्कस करणे सुरु केले आहे…मुलांना  नको त्या वयात इंटरनेट वर बऱ्याच गोष्टी माहिती झालेल्या असतात. अगदी डीप सेक्स्युअल इंटरकोर्स मधल्या इंट्रिकसीज पण फुकट ऍव्हेलेबल असलेल्या चित्रफिती मधून आणि चित्र पाहून माहिती झालेल्या असतात.

माझ्या सारखे पालक म्हणून घरच्या कॉंप्युटर वर नेट नॅनी इन्स्टॉल करण्यासाठी खर्च करायला तयार असतात आणि करतात पण…..,!मुला मु्लिंच्या मित्र मैत्रिणीकडे  घरी इंटर्नेट “पुर्ण पणे असेसेबल” असते. मग मित्रांकडे जाउन नेट सर्फिंग सुरु होतं. देअर आर आल्वेज फ्यु थिंग्स बियॉंड युवर कंट्रोल…ह्या अशा प्रश्नांना काहिच उत्तरं नाहित हे मात्र खरं..

बरोबरचे वर्गातली मुलं काही तरी वाचून आणि बघून मग  स्वतःचे कन्सेप्ट फॉर्म करतात. फार नाही , पण इंटरनेट वर पाहून फिजिकल क्रिया कशी असते, एवढं तर मुलांना नक्कीच कळतं.चित्र , लिखित स्वरुपातलं वांगमय, आणि इतर गोष्टी..बरं इतकं सगळं असून सुध्दा अजूनही मुलांना आणि मुलींना ह्या विषयातले ज्ञान अतिशय कमी आहे. जे काही आहे ते चिप पोर्न मटेरिअल बघुन  स्वतःचे कन्सेप्ट फॉर्म केलेले असतात.

मला एक मोठा प्रशन पडलाय, की हे असं कां? मुलं इतकी इंटरनेट सॅव्ही आहेत, इतका वेळ इंटरनेट वर घालवतात, तरीही ह्या विषयावरचे ज्ञान इतके कमी कां? मला वाटते चिप पॉर्न बघून ह्या विषयाबद्दल भीतीच निर्माण होत असेल. काही मुलं मात्र नकॊ ते जास्त शिकून मग नसते प्रयोग करतात.. (डीपीएस  केस , ती डीपिएस ची चित्रफित मला पण इ मेल मधे आलेली होती, जवळपास ५ मिनिटांच्या चित्र फिती मधले ती मुलगी अन तो मुलगा दोघांचेही वागणे एकदम पोर्न स्टार्स ला लाजवणारे होते.) अशा परिस्थिती मधे मुलांना सेक्स एज्युकेशन हे अतिशय गरजेचे आहे असे वाटते…चित्रांमधले चित्र विचित्र प्रकार पाहून हा विषय म्हणजे काहीतरी अगम्य आणि जिम्नॅस्टीक सारखा खेळ वाटायला लागतो, अन या खेळामधे आपण पुरु शकतो का? हा प्रश्न मनात उभा रहातो. मग केवळ स्वतःची कॅपॅसिटी टॆस्ट करायला म्हणून सुद्धा काही तरुण वेश्या गमन वगैरे गोष्टी  करतात… हल्ली हाय सोसायटी मधे पण ,ह्याच वयात  कॅज्युअल सेक्स हा कन्सेप्ट वा्ढीस लागलाय …एड्स आणि तर संसर्गजन्य रोग, नवीन पिढी मधे पसरु नयेत म्हणून तरी जागरूकता आणणे आवश्यक आहे.

मुंबई मिरर मधे सेक्स ऍडव्हाइस या सदरामधे, अतिशय प्रिलिमीनरी प्रश्न विचारले गेले असतात. तसेच मटा  ^(http://rangmarathiche.com/goto/http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4220688.cms)मधे पण असेच काही  प्रशन डिस्कस केल्या गेले असतात..ह्याच गोष्टींच्या मुळे मग खरंच काय असतं हे शोधण्याची प्रक्रिया सुरु होते.

सेक्स म्हणजे संभोग.. दोघांनीही समप्रमाणात घ्यायचा भोग.. पण आपल्यावरच्या संस्कारांमुळे, दोन्हीही  सेक्स पार्टनर्स दुसऱ्याला जास्त सुख द्यायचा प्रयत्न करतात, (पुरुष स्त्रिला आणि स्त्री पुरुषाला ),त्यामुळे होतं काय…….. की दोघंही देणारेच .. !!!  सुख घ्यायला कोणीच तयार नाही.. !!सगळा वेळ केवळ दुसऱ्याला बरं कसं वाटेल, ह्याच गोष्टीवर विचार आणि क्रिया करण्यात जातो. स्वतःला काय आवडतं आणि कसं आवडतं हे सरळ विसरल्या जातं..आणि अल्टिमेटली दोघंही एंजॉय करित नाहीत.. ह्या सगळ्या परिस्थिती मधे मग सेक्स ही क्रिया एक मेकॅनिकल गोष्ट होऊन जाते..

माझ्या मते सेक्स ही फक्त देण्याची नाही तर सुख घेण्याची क्रिया आहे. दोघांनीही शक्य होइल तेवढं सुख घ्यायचं असतं………

माझ्या वाचण्यात आलंय की बऱ्याच स्त्रियांना लग्नानंतर पण कित्येक वर्ष ऑर्गझम म्हणजे काय हे ठाऊक नसते.. स्पेशिअली हा प्रकार भारतामधे जास्त प्रमाणात दिसून येतो..

शक्यतो  कुठेही अश्लिल न होऊ देता लिहण्याचा प्रयत्न केलाय. .. ह्या विषयावर जितके लिहावं तितकं थॊडंच आहे. तरी पण माझ्या कडून एक लहानसा प्रयत्न.  मला जे काही कन्व्हे करायचे आहे ते झालेले आहे., म्हणून इथेच थांबतो आता.