भारतिय नेव्ही

Written by  on August 31, 2011

भारतीय नेव्ही किंवा एअरफोर्स यांच्या सक्षम ते बद्दल फारच कमी बोललं किंवा लिहिलं जातं. एक सामान्य भारतीय म्हणून मला स्वतःला भारताच्या फोर्स बद्दल आकर्षण वाटत आलंय. माझी स्वतःची पण इच्छा होती नेव्हीत जायची.. पण जमलं नाही.भारतीय नेव्हीच्या बाबतीत सुरेश मेहेतांचे स्टेटमेंट.. नेव्हीचे ऍडमिरल सुरेश मेहेता आता रिटायर्ड होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या भारतामधे ब्युरोक्रसी इतकी जास्त आहे की नेव्हल चिफला सुध्दा आपले कॉंट्रोव्हर्शिअल विचार मांडायला निवृत्तीची वाट पहावी लागते.

इतकी वर्ष नेव्हीचे चिफ असतांना ते काहीच बोलले नाही , पण आता निवृत्तीच्या वेळेस का होईना पण त्यांनी हे जे बोलुन दाखवलं त्या करता त्यांचे आभारच मानायला हवेत. राज्यकर्त्यांच्या डोळ्यात घातलेल्या अंजनाने त्यांना किती दिसेल हेच आता पहायचं.

तसं, नेव्ही, आर्मी , एअर फोर्स हे तिन्ही विभाग सरकारी बाबुगिरीच्या नाकर्तेपणा चा बरेचदा बळी ठरलेले आहेत. कारगिलच्या युद्धाच्या वेळेस पण सैनिकांना दिले गेलेले बुट आणि इतर साहित्यावर बरंच लिहिलं गेलं होतं. आता काळाच्या पडद्याआड बरंचसं विस्मृतीत गेलंय.माझ्या कालच्या लेखात म्हटल्या प्रमाणे आपली मिलिट्री किंवा नेव्ही ची क्षमता वाढवायला आपण सक्षम असलो तरीही काहीच करित नाही. एक लहानशी युध्द नौका तयार करायची म्हंटलं तर आपण रशियाचं कींवा युरोपियन देशांचं स्क्रॅप यार्ड धुंडाळतो.आपल्या देशात क्षमता असतांना का बरं आपण डेव्हलप करित नाही हवी असलेली सामग्री?

माझं स्वतःचं मत आहे, की प्रायव्हेट सेक्टरला जर हे बनवायला परवानगी दिली , तर आर ऍंड डी चा खर्च करुन सुध्दा प्रायव्हेट कंपन्या या साठी कामं करतील . अमेरिकेत गन्स वगैरे च्या फॅक्टरिज या प्रायव्हेट आहेत ( असं मी ऐकुन आहे) फक्त या कंपन्यांनीच डेव्हलप केलेली सामग्री कुठे विकली यावर लक्ष ठेवले की झाले.किंवा प्रायव्हेट कंपनीने बनवलेली संपुर्ण सामग्री शासनाने  विकत घ्यायची आणि जर जास्त झाली, तर आफ्रिकन किंवा इतर देशांना विकायची.. असंही केलं जाऊ शकतं..

याच विषयावर जाणारे ऍडमिरल मेहेता यांनी म्हंटलं आहे की भारता कडे चायनाच्या फोर्स ची बरोबरी  करण्यासाठी – ना सक्षमता आहे – ना इच्छाशक्ती !.इतकं व्होलाटाइल वाक्य बोलायला पण गट्स लागतात राव.. पण एक सांगतो, मेहेतांनी जे काय म्हटलंय त्यात १०० टक्के तथ्य आहे.चायनाचा जिडीपी ग्रोथ रेट हा भारताच्या दुप्पट आहे.चायना सध्या आपल्या अव्हेलेबल रिसोअर्सेसचं कन्सोलिडेशन करण्याच्या मागे आहे आणि जर भारताने पण ते सुरु केलं नाही तर मात्र चायना बरोबर मॅच करणं कठिण होइल.

ह्या साठी काय करावं लागेल? नुसतं जिडीपी ग्रोथ वाढवून चालणार नाही. त्याच सोबत इतर डेव्हलप्ड नेशन्स बरोबर ( ग्लोबल पॉवर्स बरोबर) हात मिळवणी करुन आपली शक्ती वाढवणं आवश्यक आहे.भारताचे  वार्षिक खर्च  डिफेन्स वरचा चायनाच्या अगदी निम्मा आहे. आपण जेंव्हा डीफेन्सच्या खर्चाची तुलना करतो तेंव्हा आपल्या डोक्यात पोटेन्शिअल थ्रेट म्हणुन फक्त पाकिस्तान/ बांग्लादेशचा विचार येतो. चायना ला आपण थ्रेट मानतच नाही.

या सगळ्या प्रकारात एक सिल्व्हर लाइनिंग आहे ती म्हणजे आय एन एस अरिहंत. अमेरिका, युके, रशिया, चायना आणि फ्रान्स याच देशांकडे न्युक्लिअर सबमरिन बनवण्याची कॅपेब्लिटी आहे. आता त्यामधे भारताचे पण नांव जोडले गेले आहे. संपुर्ण भारतीय बनावटीची ही पहिलीच सबमरिन. 🙂 आता मला एक कळंत नाही, की जर ही सबमरीन संपुर्ण भारतीय बनावटीची आहे, तर मग पंतप्रधानांना रशियाला ऍप्रिशिएट करण्याची काय गरज होती???जेंव्हा ही सबमरिन लॉंच केली तेंव्हा मनमोहनसिंग यांनी रशियाचे आभार मानले!!! रशियाचे आभार मानायचे कारण काय?ह्या मिलियन डॉलर प्रश्नामुळे या विजयाला पण एक लहानशी काळी छटा जाणवते.. की खरंच कांआपण स्वतः बनवली आहे ही?? की टेक्नॉलॉजी रशियाची????

चायनाची नेव्ही जगातली तिसरी सगळ्यात मोठी नेव्हल फोर्स  म्हणून  ओळखली जाते. पूर्विच्या काळी तर चायनाच्या  लोखंडी  पडद्याच्या मागे त्यांच्या सगळ्या कॅपॅब्लिटीज लपून रहायच्या. चायना सरकार आपल्या कॅपॅब्लिटीज बद्दल बोलणं / किंवा सेल्फ बुस्टींग करणं नेहेमीच टाळत आलेली आहे – दुर  कशाला, चायना मान्य पण करित नव्हतं की त्यांच्या कडे अशा क्षमता आहेत म्हणून .

चायनाची सबमरीन फ्लिट जगातली सगळ्यात मोठी फ्लिट आहे ज्या मुळे चायना आज अमेरिकेला पण चॅलेंज करण्याची क्षमता बाळगून आहे.चायनिज नेव्हीचे ऑफिसर्स म्हणतात की चायना एअरक्राफ्ट कॅरियर्स बनवण्याची क्षमता पण बाळगून आहे आणि या दहा वर्षात मधे नविन शिप बाहेर पडेल  .जर चायनाची शक्ती अशीच वाढत राहिली तर इंडियन ओशन मधून अमेरिकेला काढता पाय घेण्याची वेळ पण येउ शकते.

हनियन आयलंडच्या दक्षीण भागात चायनाने आपल्या न्युक्लिअर सबमरिन्स डिप्लॉय केलेल्या आहेत . हा भाग भारतापासून फक्त १२०० मैलांवर आहे.इथूनच इंडीयन ओशन चा भाग सुरु होतो.

पाकिस्तानचं ग्वडार पोर्ट, नेव्हल बेस म्यानमारचा तर आहेच, पण या  व्यतिरिक्त मला एक भिती वाटते ती म्हणजे जर बांगला देशाने चायनाला बेस बनवायला जागा दिली तर???

चायनिज  मिडियामधे एक बातमी आली होती.. त्यांनी भारतीय सबमरिनला सरफेसवर येण्यासाठी भाग पाडले..  .

लॅपटॉप

Written by  on August 21, 2011

^(http://rangmarathiche.com/goto/http://kayvatelte.com/)लॅप टॉप देणार आहेत म्हणे – मॅनेजर  लोकांना. म्हणजे .लॅपटॉप मिळणार म्हंटल्यावर – म्हणजे काय नवीन सेक्रेटरी का? असे फालतू जोक्स पण मारून झाले होते. पूर्वीच्या काळी मराठी मासिकांमधून बॉस आणि सेक्रेटरी हे विषय इतक्या वेळेस चघळली आणि  चोथा करून टाकले होते की असे जोक्स आणि अशी नाती हीच खरी नाती असतात की काय बॉस आणि सेक्रेटरी मधे असा संशय यावा.

लॅपटॉप या शब्दाविषयी खूप आकर्षण होतं. फार दूर कशाला, आता फक्त सात आठ वर्षापूर्वीच तर या लॅपटॉपचे अस्तित्व जाणवायला लागलं होतं. चांगला दोन किलो वजनाचा असलेला तो दगड  गळ्यात बांधून फिरतांना पण   खूप अभिमान वाटायचा. आयबीएम चं नांव खूप प्रसिद्ध होतं तेंव्हा. बहूतेक सगळ्याच कंपन्या आयबीएमचे लॅप टॉप द्यायच्या आपल्या एम्प्लॉइज ला. चांगले दणकट असलेले हे लॅपटॉप्स तसेच वजनदार पण असायचे…

लॅप टॉप पण त्या कर्ण पिशाच्चा सारखाच. एकदा कानावर बसला की उतरत नाही . म्हणजे सेल फोन म्हणतोय मी. नसेपर्यंत खूप हवा हवासा वाटतो, पण एकदा एकदा हातात आला आणि एखाद्या ’च्यायला बंद का पडत  नाही हा?’ असे वाटत असते. सगळी प्रायव्हसी संपवून टाकलेली आहे हल्ली या फोनने.

सध्या तरी लोकं खोटं बोलू शकतात. म्हणजे अंधेरीला असतांना पण मी ठाण्याला आहे म्हणून सांगून टाकतात- ते कसं जमणार ३ जी मुळॆ? फोन करताना एकमेकांना पहायची सोय झालेली आहे आता ३ जी  मुळे. ही ३ जी टेक्नॉलॉजी  पण लवकरच बस्तान बसवणार  यात काहीच संशय नाही . अ्सो..विषयांतर होतंय.

अकाउंट्स मधला एक मित्र हलक्या आवाजात तो म्हणाला.  लॅपटॉप?? मज्जा आहे राव तुम्हा मार्केटींगवाल्यांची  , म्हणाला. लक्षात आलं,  एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही ती दूसऱ्याला मिळते आहे या मधेच असलेली असूया आहे या वाक्यात. आता काय तुम्ही लोकं घरी जाउन पण कॉंप्युटरवर गेम्स खेळू शकाल.  आयला  कसले कन्सेप्ट असतात ना लोकांचे…अरे काय म्हणजे आम्ही काय लॅपटॉप वर खेळच खेळत असतो असं म्हणायचंय का तुला? .चिडचीड  झाली नुसती.  साहजिकच आहे, जेंव्हा कॉम्प्युटर पण घरी असणं म्हणजे मोठेपणाचे लक्षण असायचे, तेंव्हा लॅपटॉप म्हणजे तर खूपच झालं. मी पण एक दिवस अभिमानाने तो दगड गळ्यात बांधून घेतला.

जेंव्हा अगदी नवीन लॅपटॉप आला होता तेंव्हा, पब्लिक प्लेस मधे लॅपटॉप सुरु करून कामं करणं ही  फॅशन झाली होती.  बसमधे किंवा ट्रेन मधे एखाद्याने लॅपटॉप सुरु केला की त्यामधे शेजारचा माणूस हमखास डोकावून पहायचा. विमानात तर अगदी एक तासाची फ्लाईट जरी असली त्यातली २० एक मिनिटॆ लॅपटॉप वर काम करणारे महाभागही होते.कॅप्टनने अनाउन्स केले  की इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू शकता, की ताबडतोब यांचा लॅपटॉप सुरु.मला तर संशय होता की लोकं काम करण्यापेक्षा आपल्याकडे लॅपटॉप आहे हे दाखवणे हा मूळ उद्देश असायचा?

एकाने तर चक्क एक स्क्रिन सेव्हरच बनवला होता, डोन्ट स्टेअर अ‍ॅट मी…

सुरुवात झाली होती टॉप मॅनेजमेंटच्या लोकांना देण्यापासून. त्यातले काही लोकं तर अजूनही फॅक्स आणि टेलेक्सच्या जमान्यातून बाहेर आले नव्हते. अजूनही इ  मेल चा प्रिंट आऊट सेक्रेटरीने काढून दिल्यावरच तो वाचायचा आणि मग डिक्टेशन देऊन त्याचं उत्तर द्यायचं असा कन्सेप्ट असणारे आमचे एक बॉस होते- आता ते रिटायर झाले आणि म्हणून तर इथे मी लिहितोय त्यांच्या बद्दल. 🙂

दूसरी फळी म्हणजे आमचा पण नंबर लवकरच लागला. घरी लॅपटॉप घेऊन जायला लागलो, तर ए आता घरच्या लॅपटॉपचं काय करणार? (??????) असा भंकस जोक मारलाच एका मित्राने. पहिल्या दिवशी लॅपटॉप घेउन जेंव्हा घरी गेलो, तेंव्हा अगदी कृत कृत्य झाल्यसारखं वाटलं. ते चांगलं अडीच किलोचं वजन पण हवं हवंसं वाटत होतं. ती लॅपटॉपची बॅग लोकल मधे जेंव्हा वर ठेवली तेंव्हा पुर्ण वेळ तिकडेच  लक्ष ठेउन होतो.

घरी पोहोचल्यावर मग मुलींनी बाबांचा लॅपटॉप म्हणून बघितला. माउस कसा असतो ते – माउस कंट्रोल करत धाकटीने पेंट ब्रश उघडुन काहीतरी केलं. लवकरच त्यांचा पण इंट्रेस्ट संपला. दररोज लॅपटॉप खांद्यावर घेउन ऑफिसला जातांना अभिमान तर वाटायचा आणि   उगीच  एक मोठेपणा पण वाटायचा.

लॅपटॉप मिळालाय म्हणजे हा एक मोठा माणूस दिसतो. अशी एक इमेज असायची. जो लॅपटॉप मिळाला होता तो इतका स्लो होता की एकदा ऑन केल्यावर त्यापुढे बसून एक मेथीची जूडी पण निवडुन व्हायची तो सुरु होई पर्यंत.

सारखी लॅप्टॉपची बॅग कॅरी करुन लवकरच खांदे पण दुखायला लागले.डॉक्टर पण हे बंद करा म्हणाले- अर्थात ते शक्य नव्हतं. तरी पण रडत खडत ते ओझं वागवणं सुरुच ठेवावे लागायचे, जसे सेल फोन म्हणजे कर्णपिशाच्च तसेच हे एक दुसरे ओझे. घरून लॅपटॉप घेऊन निघालं की मग शेवटी आपण ओझं वाहणारा बैल आहोत की काय अशी पण शंका यायला लागली होती. यावरचा उपाय म्हणजे लॅपटॉप ऑफिसमधेच ठेवणॆ, पण नेमकं घरी पण काम पडायचं आणि लॅपटॉप नसला की कुचंबणा व्हायची.

खांदे दुखणं सुरु झालं. मग दोन्ही खांद्यावर घ्यायची रुकसॅक घेउन वापरण हा उपाय सुरु केला . तेवढाच आराम.. हे असं करता करता तीन वर्ष गेली आणि नवीन लॅपटॉप दिला कंपनीने.. हा कॉंपॅकचा एक लहानसा लॅपटॉप होता. लहानसा म्हणजे अडीच किलो च्या ऐवजी दिड किलॊ चा. थोडा आराम मिळाला. तरीपण खांदे दुखी आणि स्पॉंडीलायटीस सुरू झाला की तो  काही कमी होत नाही.

या सांधेदुखी मुळे वैतागून शेवटी आता एक नविन उपाय केलाय. घरचा माझा लॅपटॉप वेगळा घेतलाय ८ इंची सोनी व्हायो-७०० ग्राम वजनाचा . ऑफिसचा लॅपटॉप ऑफिसमधेच ठेवतो. टूरला पण स्वतःचाच लॅपटॉप नेणे सुरु केलंय.

एखादी हवीहवी वाटणारी वस्तू इतकी त्रासदायक होऊ शकते हा अनुभव मात्र खूप काही शिकवून गेला आयुष्यात.