मनात आलं, ही सीडी मी जी विकत घेतोय- ह्याची जाणीव पण मनात आहे की ही सीडी पायरेटेड आहे -हे माहीत असूनही मी विकत घेतो … हा एक प्रकारे पायरसी ला सपोर्ट नाही का? अर्थात, सपोर्ट तर आहेच, आमच्या सारखे लोक विकत घेतात, म्हणून तर विकणारे नवीन पायरेटेड मटेरिअल विकतात.
एखादी गाण्याची सीडी जी मला बाहेर २५–३० रु ला मिळते, आणि तीच सीडी जर ओरिजिनल घ्यायला गेलो तर कमीत कमी ४०० ते ८०० रु. मोजावे लागतात. एका सीडी वर एखाद्या मॅन्युफॅक्चरर ने किती प्रॉफिट कमवावे- याला काही मर्यादा असाव्या की नाही? माझं म्हणणं असं आहे, की जर अन ऑरगनाइझड सेक्टर जर एखादी सीडी ३० रुपयाला विकू शकते, तर तीच सीडी ऑर्गनाइझ्ड सेक्टर जेंव्हा बनवते, तेंव्हा ्जरी ६० ते ७५ – किंवा १०० रुपयांना विकली तरीही जवळपास ५५ ते ९० रू प्रॉफिट कमावू शकेल. .
पण तसं होत नाही.. सीडी बनवणारे ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर्स, हे एकाच सेल मधे जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायला बघतात म्हणून तर ही पॅरलल इंडस्ट्री इतक्या जोमात चालते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल ज्या एमपी ३ सिडीज मार्केट ला ऍव्हेलेबल आहेत, त्यात एका सिडी मधे कमित कमी ६ तासाचे रेकॉर्डींग मटेरिअल असते, व्हेअर ऍज, रेग्युलर मिळणाऱ्या सिडी मधे जास्तीत जास्त १ तासाचे रेकॉर्डींग असते. फॉर एक्झांपल, रस्त्यावर भीमसेन जोशींची सिडी जर तुम्ही घेतली तर त्या मधे तुम्हाला जवळपास सगळे राग केवळ ३० रुपयात मिळतात ( सहा एलपी). अर्थात ह्या गोष्टीचे समर्थन करण्यात अर्थ नाही. पण ओरीजिनल सिडी’ज काढणार्यांनी पण डॊळॆ उघडून पहायला पाहिजे, आणि ज्या नवीन सीडीज मार्केट ला आणताहेत त्या एम पी ३ फॉर्मॅट मधे आणल्या , आणि आपले रेट्स कॉम्पिटेबल ठेवले तर नक्कीच सेल वाढेल. अन्यथा ह्या उद्योगाचे अस्तित्वच धोक्यात दिसते.
बरं ह्या किमती ला सिडी विकणं शक्य आहे हे गुलशन कुमारने फार पुर्वी दाखवुन दिलेले आहे. त्या वेळी कॅसेट्स च्या जमान्यात , गुलशन कुमारच्या कॅसेटस ने तर पायरेटेड चे मार्केट पुर्ण पणे खाउन टाकलं होतं . पण गुलशन कुमार नंतर पुन्हा सीडीचे भाव वाढलेले आहेतच. नवीन सिनेमाची सीडी कमीत कमी २०० ते ५०० कितीही रुपयाला मिळू शकते.
नंतर आज काल , मोझर बिअर मधे पण सिडीज कम्पऍरिटिव्हली स्वस्त आहेत. पण भारतीय क्लासिकलचे सीडीची किंमत ३०० रुपया पासून सुरु होते आणि पुढे कितीही असू शकते. माझ्या कडे एक पं. जसराज ची ओरिजिनल सीडी आहे, जी मी रेग्युलर फॉर्मॅट मधे विकत घेतली होती ३५० रुपयांना बहुतेक. माझा एक मित्र आला होता घरी , म्हणाला मला कॉपी करुन दे.. म्हंटलं सीडी राइट प्रोटेक्टेड आहे, तेंव्हा राइट/किंवा कॉपी होणार नाही. तर त्याने ताबडतोब चॅलेंज घेतले आणि म्हणाला उद्या पर्यंत कॉपीकरुन दाखवतो याच सीडी ची.. मला अजिबात खरं वाटलं नाही. आणि ती सीडी त्याला दिली..
आणि दुसऱ्या दिवशी… टु माय सरप्राइझ, त्याने ती ओरिजिनल सीडी परत दिली, आणि केलेली कॉपी मला दाखवली.. आणि प्रोसिजर मला पण शिकवली, एक प्रोग्राम घातला माझ्या लॅप टॉप वर, सीडी कॉपी करण्यासाठीचा. मनाला कुठेतरी बोचत होतं. आपण चोरी करतोय म्हणून… तो प्रोग्राम कित्येक दिवस लॅप टॉप वर होता पण कधी वापरायची इच्छा झाली नाही.
मात्र एक दिवस.. ग्रीड(लालच) ने सुसंस्कृत मनावर विजय मिळवला,आणि काय फरक पडतो, कॉपी केलं तर? असा विचार मनात आला. मित्रा कडल्या सगळ्या क्लासिकल सीडी एम पी ३ मधे कन्व्हर्ट करुन आय पॉड वर लोड केल्या.
तसंही आय ट्युन्स सॉफ्ट वेअर मधे सीडी रीपिंग फॅसिलिटी असतेच.. हे पण मला त्यानेच सांगितले आणि राइट प्रोटेक्टेड सिडीज आय पॉड वर कशा लोड करायच्या हे पण सांगितलं.आपण सगळे जण आय ट्युन्स वापरुन सीडी कॉपी करतोच ना आय पॉड वर?? म्हणजे ही पण एक प्रकारची पायरसीच नाही कां?
भारतामधे बरंच सॉफ्ट वेअर्स पण असेच वापरले जातात. जवळपास प्रत्येक कॉम्प्युटर वर विन झिप असतं.. तुम्ही त्याचं पेमेंट करणं .. एक महिन्यानंतर .. अपेक्षीत असतं. पण कोणीच पेमेंट करित नाही आणि सॉफ्ट वेअर वापरणं सुरु ठेवतात.ऍडॉब ऍक्रोबॅट रायटर पण नॉर्मली असंच कुठुन तरी आणलेलं असतं.
माझ्या पहाण्यात सगळं सॉफ्ट वेअर पायरेटेड – इन्क्लुडींग विंडॊज… आणी एक्स पी पायरेटेड वापरणारे लोकं पण आहेत. माझ्या मते ऑपरेटींग सिस्टिम्स चे सॉफ्ट वेअर्सच्या किमती पण भारता मधे कमी केल्या, तर लोकं ओरिजिनल सॉफ्ट्वेअर्स वापरतील. डॉलर्स मधे ८० डॉलर्स काही फार मोठी किंमत वाटत नाही, पण रुपयां मधे ४,५०० रुपये फार जास्त वाटते.(including VAT).
इंटरनेट वरची एम पी ३ गाणी आपण जी डाउन लोड करतो, ती पण एक प्रकारे पायरसीच! पण सर्व मान्य…..म्हणजेच काय , तर एका प्रकारच्या पायरसी सपोर्ट ला एक प्रकारे समाजाची मान्यता असते.आपली पण सायकॉलॉजी अशी होते, की अशा प्रकारे गाणी डाउन लोड करणं म्हणजे काही चोरी नाही.आणि मी काय फक्त ७-८ गाणी तर डाउन लोड केलीत. त्याने काय असा फरक पडणार आहे ?
तर ह्या अशा पायरसी युध्दामधे आपण कुठल्या बाजुला रहायचं ते प्रत्येकाने आपापलं ठरवायचं.