रॅग्ज टु रिचेस

Written by  on November 25, 2010

अशा कहाण्या वाचायला खूप आवडतात प्रत्येकालाच. जसे धिरुभाई अंबानी.. ची गोष्ट सारखी चघळली जाते प्रत्येक माध्यमात. तशाच प्रकारचा हा माणुस.. कायम  वादाच्या भोवऱ्यात सापडलेला.

कर्नाटकातल्या एका लहानशा गावातला जन्म असलेला हा मुलगा जेंव्हा मुंबईला आला, तेंव्हा एक मोठं स्वप्नं डॊळ्यात घेउन.. खूप खूप शिकायचं आणि पोलीस व्हायचं…घरची परिस्थिती अगदी बेताचीच. त्या मुळे मुंबईला आल्यावर एका हॉटेल मधे वेटरची नोकरी करित त्याने आपले शिक्षण केले आणि शेवटी पोलीस दलात भरती झाला .पोलीस दलात भरती झाल्यानंतर या नंतर आपल्या धडाक्याच्या कामाने आणि ८४ एनकाउंटर्स मुळे  खुप कुख्यात झाला होता दया नाइक.

प्रसार माध्यमाने अगदी डॊक्यावर घेतलं होतं दयाला. प्रत्येक एन्काउंटर चे कव्हरेज मिडीयाला कसं द्यायचं, आणि आपले फोटो कसे छापून आणायचे हे दयाला व्यवस्थित माहीत होते.

खरं सांगायचं तर एनकाउंटर हा प्रकार सुरु होण्याचे मुख्य करण म्हणजे भारतीय कायद्याची लवचिकता. आपला कायदा कुठेही कसाही वाकवता येतो.. आणि शंभर गुन्हेगार सुटले तरीही चालेल पण एक निरपराध मारला जाउ नये- असा कायदा असल्यामुळे , गुन्हेगारांना पुर्ण पणे मोकळं रान मिळालं होतं.

काहीही गुन्हे करा, आणि नंतर कोर्टात चांगले महागाचे वकील जसे राम जेठमलानी , मनोहर  लावून कसंही करुन बेल मिळवायची. आणि एकदा बाहेर आले, की आपल्या बाहूबलाच्या जोरावर आणि पर्स पॉवर मुळे सगळ्या  साक्षीदारांना फितवणे, आणि सगळे पुरावे नष्ट करुन मोकळं सुटणं सोप्पं होतं.

असं झालं होतं, की पोलिसांनी गुन्हेगारांना पकडायचं, आणि त्यांना कोर्टाने नंतर पुराव्या अभावी मोकळं सोडून द्यायचं.. ह्या सगळ्या प्रकारामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य खूप वाढले होते. त्यांना पुर्ण कल्पना होती, की कांहीही केलं तर आपला केसही कोणी वाकडा करु शकत नाही ते. आणि मग एका नवीन आयडीऑलॉजी चा जन्म झाला- तो म्हणजे एन्काउंटर!! १९९४ ते ९७ मधे एक्स्टॉर्शन आणि नंतर खून करणे पण खुप वाढलं होतं. मुंबईतले  सगळे बिल्डर्स घाबरुन गेले होते. कोण कधी उचलेल तेच कळत नव्हतं. कायदे नसलेला महाराष्ट्र या सारखे लेख पेपरला येउ लागले.

शिवसेना भाजप सरकार होतं तेंव्हा.  लवकरच पोलिस कस्टडीतल्या मृत्युंचं प्रमाण पण खुप वाढलं(!!!)आणि एक्स्टॉरशन च्या ऐवजी एनकाउंटरच्या बातम्या पेपर मधे येउ लागल्या. गुन्हेगारी जगातही धर्मानुसार पोलरायझेशन सुरु झालं- कारण नेमकं याच वेळी बाबरी मस्जिद धराशायी करण्यात आली होती. तुमचा ’दाउद’ तर आमचा ’राजन’ अशा कॉमेंट्स बाळासाहेबांनी प्रसार माध्यमापुढे केल्या होत्या. पण या एनकाउंटर्स चा एक फायदा झाला, तो म्हणजे या गुन्हेगारांवर आता वचक बसला होता. एनकाउंटर्स सोबतच गुन्हेगारांच्या मधल्या गॅंग वॉर्स मुळे त्यांची शक्ती क्षीण होणे सुरु झालं होतं.

याच काळात दया नाईक, शर्मा अशा पोलिसांचे नांव एन्काउंटर स्पेशॅलिस्ट म्हणून घेतले जाउ लागले. दया नाईकच्या नावे ८४ एनकाउंटर्स आहेत. सत्ता, बंदुक, आणि पोलिटीकल बॅकिंग मुळे दया नाईक हा मुंबई पोलिसांचा पोस्टर बॉय ठरला. त्या काळात, एक वेळेस पोलिस कमिश्नर कोण हे लोकांना माहिती नसायचं, पण दया नायक कोण हे तर लहान पोरंही सांगू शकायचं.

आज डायरेक्टर जनरल पोलीस यांनी एसिबी चा क्लेम खारीज करुन ६ वर्षापासूनच्या सुरु असलेल्या दया नाईक यांच्या वनवासाला स्थगिती देऊन, त्याचा पोलीस दलात येण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे.  दया नायक वर माहिती असलेल्या स्त्रोता पेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याचा आरोप होता. आणि ह्याच आरोपासाठी दयाला सस्पेंड करण्यात आलं होतं.  आणि फेब्रु २००७ मधे दया नायक ला ६० दिवस जेल मधे कुठलीही चार्ज शिट न लावता ठेवले होते.

२००७ मधेच एसिबी ने दया नायकवर केस करण्यासाठी डीसीपी ची परवानगी मागितली होती. तेंव्हा डिसिपी ने परवानगी नाकारली पण नाही,किंवा मान्य पण केली नाही. डिसिपीच्या म्हणण्याप्रमाणे पुरेसे पुरावे नव्हते दयाच्या विरुद्ध! एसिबी नेहेमीच क्लेम करत आली आहे  की दया नायक कडे १०० कोट रुपयांची मालमत्ता आहे म्हणून..

दयाच्या मालमत्ते बद्दल चा एसिबी चा क्लेम ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.mid-day.com/news/2006/jan/129102.htm) हा इथे आहे. पण या मालमत्ते बाबत एकही पुरावा एसिबी कोर्टासमोर ठेउ शकली नाही. अशाच प्रकारची आणखीन एक केस होती, ती म्हणजे  पी मणिवेल्हन यांची. त्या सुमारास एसिबीच्या ऍडिशनल एसीपी होत्या प्रज्ञा सरवदे. त्यांनी या गृहस्थाला ६२ दिवस कस्टडी मधे ठेवले होते. नंतर त्याला सोडून देण्यात आले. मणिवेल्हेन ने नंतर कोर्टात आणि ह्युमन राईट्स कमिशन कडे तक्रार केली आणि कोर्टाने प्रज्ञा सरवदे यांनी मणिवेल्हन यांना २५ हजार रुपये स्वतःच्या खिशातून द्यावे असा निकाल दिला.

या माणसावर खूप कांही लिहिण्यासारखं आहे.. पण आता थांबतो इथेच.. आजच दयाला निर्दोष मुक्त करण्यात आलं.. म्हणून हे पोस्ट…. अशी एक म्हण आहे इंग्रजीत.. फर्स्ट कॉल हिम अ मॅड डॉग.. ऍंड देन शुट हिम..!!!