’त्याने’ पुन्हा बाजी मारली…

Written by  on July 26, 2010

दादू … अरे काय करतो आहेस? झोपला आहेस कारे???  अरे जागा हो लवकर !!

त्या मस्तवाल व्होडाफोन आणि इतर मोबाइल कंपन्यांना मराठीत बोलायला लाउन ’त्याने’ बाजी मारली. छान कव्हरेज पण मिळालं त्याला सगळ्या पेपर मधे. आणि तू.. नेमकं तू काहीच केलं नाहीस. काय करायचं ते ठरवता ठरवताच दोन महिने निघून गेले आणि काहीएक निर्णय घेतला नाहीस तू काय करायचं ते. सगळे आपले सैनिक बिचारे तुझ्या आदेशाची वाट पहात  होते….. अजूनही वाटच पहाताहेत.

एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का?  तुला असं वाटू देू नकोस की लोकं फक्त आपल्यालाच इ मेल्स पाठवून त्यांचे प्रॉब्लेम्स सांगतात. त्याच मेल च्या कॉपीज ’त्याला’ पण देतात.  अरे लोकांचं काय दोघांनाही इ मेल्स पाठवायचे, कोणी ना कोणीतरी काम करेलच ना..  जो  आधी काम करेल किंवा ऍक्शन घेईल  आणि त्यांचे  काम करेल  त्याचे नांव होईल, आणि तो लाइम लाईट मधे राहील. पुढल्या इलेक्शन ला पुन्हा त्यांना एक  चांगला मुद्दा मिळेल, की मराठी साठी आम्ही काय केलं ते दाखवायला!! अरे तुला जे इतके मेल्स येतात ना- त्या प्रत्येक मेल वर लवकर निर्णय घेत जा रे काही तरी, नाहीतर संपेल सगळं काही!!.

त्या “रेडीओ” साठी एक मेला आला होता  ना गेल्या आठवड्य़ात त्या कांही ब्लॉगर्सचा, की रेडीओ वर मराठी गाणी लावत नाहीत, आणि ते भैय्ये रेडीओ जॉकी पण मराठी लोकांची  टर उडवतात, पण तू त्याच्या कडे पुर्ण दुर्लक्ष केलंस, आणि ’त्याने’ बघ एकाच आठवड्यात त्या रेडीओ स्टेशन्स ला ’आवाज’ पण दिला की लवकर मराठी गाणी सुरु करा नाहीतर ………….!!!!! पेपरवाल्यांनी पण बघ लगेच बातमी बनवून छापली सुद्धा.

इथेच नेमकं तुझं चुकतंय. प्रत्येक बाबतीत तू अगदी गोगलगाईच्या चालीने निर्णय घेतोस, म्हणून सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तू जर तो मेल वाचल्याबरोबर रेडीओ स्टेशन्स ला धमकी दिली असतीस की मराठी गाणी वाजवा – म्हणून तर आज तुझं नांव पेपरला आलं असतं, पार्टीचं नांव पण मोठं झालं असतं.

तू नेमके ते फालतू इशूज (रोमपौत्र किंवा माजोर्डा खान सारखे ) काढून प्रसिध्दी मिळवायचा प्रयत्न करतोस. आणि हे असे सोपे सॉफ्ट टार्गेट्स ’त्याच्या’ साठी सोडून देतोस. ’तो’ पण शहाणा आहे, बरोबर या अशा सॉफ्ट टार्गेट्सला धमकावून स्वतःचा आणि पार्टीचा फायदा करून घेतो. या टार्गेट्सला थोडा दम भरला की लगेच वाकतात ते तुमच्यापुढे गुडघे टेकवून.. ’

आजच त्या मटा मधे बातमी आलेली आहे की ’तो’ आता सगळ्यां चॅनल्स ला पत्र पाठवणार आहे की मराठी गाणी वाजवणं सुरु करा म्हणून. जर त्याचे पत्र तुझ्या आधी गेले तर पुन्हा ही बाजी पण तो मारेल. तुझं नशीब चांगलं म्हणून पेपरवाल्यांनी पत्र देण्या पूर्वीच छापून टाकलंय पेपर मधे..आता तरी जागा हो.. रात्र वैऱ्याची आहे रे बाबा!!!!लोकांच्या इमेल्स वर काही ऍक्शन घेतली नाही, तर लोकांना संशय येतो की आपण इलेक्शन फंडाला त्या लोकांकडून पैसे घेतले असावेत म्हणून आपण त्यांच्या विरोधात काही निर्णय घेत नाही.

अजूनही वेळ गेलेली नाही, आता एक काम कर लवकर एक पत्र पाठव सगळ्या रेडीओ चॅनल्सला की ताबडतोब मराठी गाणी लावणे सुरु करा, आणि सोबतच मराठी रेडीओ जॉकीला पण ठेवा. दोन गाण्यांच्या मधे जी काही बडबड करायची आहे ती मराठीत करा म्हणाव, नाही तर …………………!!!
जय महाराष्ट्र!!  जय हिंद!!

एक कथा- ५ ( शेवटचा भाग)

Written by  on July 11, 2010

माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो नां? जी गोष्ट सहज मिळत असते, ती नको असते, आणि एखादी गोष्ट थोडी हाताबाहेर जाते म्हंटल्यावर मात्र ती हवी हवीशी वाटते! रीनाला काल पर्यंत रोहनन जेंव्हा इथुन जाईल तेंव्हा त्याच्या मनात आपल्याबद्दलची वाईट इमेज नसावी, केवळ इतकीच इच्छा होती. पण आज मात्र जेंव्हा शितलची इंटीमसी थॊडी जास्त वाटली, तेंव्हा मात्र उगिच काहीतरी मिस होतंय तसं वाटणं सुरु झालं होतं.

प्रत्येक गोष्टीचं SWOT ऍनॅलिसिस करून निर्णय घेण्याची पध्दत पर्सनल आयुष्यात पण वापरा असं सर एमबीए च्या क्लासमधे नेहेमी म्हणायचे. पण खरंच ते शक्य आहे कां?? रोहन चा साधा सरळ स्वभाव तिला कालपासून जास्त अपिल होत होता. उगिच मनातल्या मनात कम्पॅरिझन केली जात होती, रोहन आणि गौरवची.. कधी गौरवचं पारडं जड, तर कधी रोहनचं !

रीनाला स्वतःलाच आश्चर्य वाटलं, की आपण हा असा विचार का करतोय? शितलच्या घरी जेंव्हा ती दुपारी गेली होती, तेंव्हा शितलची रोहन बरोबरची जवळीक बघुन तिला तिथुन रोहनने निघुन यावं असं वाटत होतं. आपल्याला असं कां होतंय?  रोहनसोबत ती काल दिवसभर ( जवळपास) होती, पण एकदाही रोहनचा ऍप्रोच तसा नव्हता. सहेतुक स्पर्श एकदा पण झाला नव्हता रोहनचा. त्याच्या सज्जनपणाची ही पावतीच समजायची कां??

अचानक रोहन बद्दल वेगळं फिलिंग डेव्हलप होणं सुरु झालं होतं तिच्या मनात . आपण प्रेमात तर नाही ना पडलो रोहनच्या?? तिच्या मनात एक विचार आला, आणि तितक्याच त्वेशाने तो तिने झटकून टाकला. कसं शक्य आहे?? मी एक बिई + एमबीए होतकरू विद्यार्थिनी, आणि तो केवळ एम ए !! कसं शक्य आहे आपण त्याच्या प्रेमात पडणं?? प्रेमात पडतांना अशा गोष्टींचा विचार केला जात नाही, हे तिला आज जाणवलं.

बरेचदा काही गोष्टी आपोआप होत असतात. प्रेम पण त्यातलंच. पण त्याने असं काय केलं की आपल्याला त्याच्याबद्द्ल जवळीक वाटते आहे? काही समजत नव्हतं तिला. असूया ही फक्त प्रेमात पडल्यावरच वाटते. कदाचित म्हणुनच शितल जेंव्हा त्याच्याशी मोकळेपणाने वागत होती, तेंव्हा चिडचीड होत होती आपली.

रोहन-शितल ला बघून किंवा शितल चा रोहनमधला इंटरेस्ट बघुन तिचा स्वतःवरचा ताबा सुटतो की काय असं वाटत होतं.

*********************

जेवणाची वेळ झाली होती. शितलची  सुरुवातीला   रोहनशी बोलण्याची  इच्छा नव्हतीच.. जे काही  बोलणं सुरु होतं,  ते केवळ लेलेंच्या सांगण्यावरूनच. पण जेंव्हा रोहन गप्पा टप्पा सुरु झाल्या, तेंव्हा मात्र तिला त्याची बौद्धीक चुणूक चांगलीच जाणवली होती. तिला आठवलं की, रोहन दहावीला असतांना बोर्डात राज्यातुन पाचवा आला होता! कसं विसरलो होतो आपण हे??  नंतरचे शिक्षण पण त्याने गावातच आर्ट्स कॉलेज मधेच घेतले होते, कदाचित त्यामुळे थोडा बुजरा झाला असेल तो. पण मराठी मधे एम ए करून त्याची पुढची झेप मात्र वाखाणण्यासारखी होती. त्याचं अफाट जनरल नॉलेज पाहून तर ती आवाकच झाली होती. एक मन तर म्हणत होतं की ठिक आहे, करू या लग्नं.. काय हरकत आहे, तर दुसरं मन अजूनही एम एस मधेच गुंतलेलं होतं.

बरं,   केवळ वडिलांचे म्हणणे टाळायचे नाही म्हणून त्याच्याशी बोलणं सुरु केलं होतं, पण त्याचं बोलण्याच्या ओघात जेंव्हा त्याचा आयक्यु समजला, तेंव्हा मात्र ती खूप इम्प्रेस झाली – आणि नकळतच त्याच्या प्रेमात पडली- की ही एक कॅल्क्युलेटीव्ह स्टेप घेतली आपण? शितल स्वतःशीच विचार करु लागली.

प्रत्येक गोष्टीमधे कॅलक्युलेशन्स करुन निर्णय घ्यायची तिची नेहेमीची पध्दत इथे मात्र नापास झाल्यासारखे जाणवत होते तिलाच. इतक्या लवकर लग्न वगैरे करुन घर सांभाळण्यापेक्षा अमेरिकेत जाऊन एमएस करावे, आणि लग्नाचे काय ते नंतर बघावे असे तिला वाटत होते. पण दुसरं मन वडिलांच्या इच्छेविरुध्द काही करण्यास तयार नव्हतं.. काय करावं??

******************************************

रोहन दोघींच्या समोर बसला होता. रीना कडे पहाण्याचा दृष्टीकोन आता मात्र थोडा वेगळा झाला होता. ती आवडायला लागली होती. तिच्या बद्दल साशा जेंव्हा बोलली, तेंव्हाच तिच्या बद्दल एक वेगळाच रिस्पेक्ट निर्माण झाला होता त्याच्या मनात. सौंदर्याच्या बाबतीत तर काहीच प्रश्न नव्हता. ती होतीच सुंदर !!

शितल चे त्याच्याशी वागणे थोडे खटकत होते रीनाला. आता इतक्या वर्षांच्यानंतर भॆटतोय आपण, पण बाल मित्र म्हंटलं तरीही तिची वागणूक अतिशय फ्री वाटत होती रोहनला. सारखं जाणवत होतं, की तिला काहीतरी नक्कीच माहिती आहे, जे इतर कोणालाही माहिती नाही- आणि म्हणूनच तर ती इतकी मोकळी वागत नाही नां आपल्याशी?? कालच लेले पण गावाहून परत आलेत!!! दॅट क्लिअर्स द मॅटर!!! रोहनच्या एकदम सगळं काही लक्षात आलं. 🙂 रोहन स्वतःशीच हसला.
*******************************************
लेले वाट बघत होते की रोहन आणि शितल एकमेकांना पसंत करतात का ह्याची. जर त्या दोघांचं लग्न झालं तर सगळी काळजी मिटणार होती त्यांची नाहीतर………………………??

रोहन उद्या रात्री परत जाणार होता. मेडीकल टेस्ट झाल्यावर. तो पर्यंत त्याच्या मनाचा अंदाज घेता आला तर बरं होईल, असंही त्यांना वाटत होतं.  शितलला नाही  म्हणण्यासारखं काहीच नाही, असं त्यांनी स्वतःलाच बजावलं.. आणि मन शांत करण्याचा प्रयत्न केला.
*******************************************
सुमाताई संध्याकाळपासून थोड्या चिंतेतच होत्या. परवाच्या रीनाच्या उशिरा येण्यामुळे झालेला त्यांच्या मनावरचं मळभ  काही पुर्ण पणे उतरलं नव्हतं . रोहिणी मधे जाउन नांव नोंदवायचं… हे त्यांनी दोन दिवसात दहा पेक्षा जास्त वेळा चितळ्य़ांना सांगितलं, पण चितळ्य़ांनी मात्र पुर्ण दुर्लक्ष केलं. ते म्हणत होते, आधी एमबिए होऊन जाउ दे, नंतर मग काय ते बघु!!

काल रात्री जेंव्हा रीना – रोहन परत  घरी आले, तेंव्हापासून  रीनाच्या वागण्या,बोलण्यातून ती रोहनकडे आकृष्ट झाल्याचे सुमाताईंना जाणवत होते. त्यामूळे रोहन लवकर गेला तर बरं!! अशी इच्छा होत होती. आता हीच गोष्ट जर चितळ्यांना सांगितली, तर ते उडवुन लावतील, आणि वेड्यात काढतील, म्हणतिल, ’काविळ झालं की सगळंच पिवळं दिसतं’..सुस्कार सोडला, आणि सरळ आपलया खोलित जाउन त्या पलंगावर आडव्या पडल्या. उद्या रोहनसमोरच या गोष्टीचा निकाल लावू असे त्यांनी मनात ठरवले.

****************************************************

रीना ठरल्याप्रमाणे रोहनला घेउन सिनेमाला गेली शितलला पण चल म्हंटलं, पण तिचा अभ्यास होता. येतांना मल्टिप्लेक्स मधेच स्नॅक्स हादडून आल्याने घरी आल्यावर जेवायचं वगैरे काहीच नव्हतं. रीना कार चालवत होती. एकदम तिने कार थांबवली आणि  रीनाने निर्णय घेतला, आधिच उशीर झाला आहे आणि आता आणखी होण्या आधि आपल्या मनात काय आहे ते रोहनला सांगून टाकावं.  पण पुन्हा ऍक्सिलरेट करुन त्याला जे सांगायचं  ते सांगण्याचा  विचार बदलला.

वि. स. खांडॆकरांनी म्हंटलं आहेच , की थोडं अविचारी व्हा, म्हणजेच काहीतरी निर्णय घ्याल, अन्यथा, नु्सता विचारच करीत रहाल. रात्री जेवण झाल्यावर ती रोहनच्या खोलीत गेली. रोहन नेहेमीसारखा पुस्तकात तोंड खुपसून बसला होता. रीनाने रागाने ते पुस्तक काढून घेतले आणि म्हणाली, ’एक सुंदर मुलगी समोर उभी असताना तुला हे रटाळ पुस्तक वाचावसच कसे वाटते?”

रोहन गालातल्या गालात हसत म्हणाला, ’सुंदर मुलगी – कुठे आहे गं ती? मला  नाही दिसली ती’-

रीना वैतागली आणि त्याला मारायला घावली त्याच्या अंगावर…. अगं… अगं.. थांब जरा… !!! रीनाच्या नजरेतले भाव बघुन त्याला समजलं की तिला काय म्हणायचंय ते.  रोहन म्हणाला,’ ठिक आहे, मान्य की एक सुंदर मुलगी समोर आहे,   मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे?-  त्याच्या या बोलण्यावर रीनाची नजर जमी्निकडे वळली. अन ती नासी फडकेच्या नायिके प्रमाणे अंगठ्याने जमिनीचे नसलेले पोपडे काढण्याचा प्रयत्न करणे सुरु केले .

रीना त्याच्या समोर  जावून बसली, डोळ्यानी जमिनीकडेच पहात म्हणाली, “रोहन?”

रीना कडे पहात  रोहन म्हणाला, – खरंच??

रीना म्हणाली.. होSSSSSSS!

रोहन म्हणाला “जी गोष्ट तुला इतके वर्षात सांगू शकलो नाही ती किती पटकन सांगितलीस तू?? ”

रोहन खूप आनंदात होता आज, त्याला त्याच्यावर प्रेम करणारी प्रेयसी हवी होती,   ती आज मिळाली होती.   रात्रभर त्याला झोप लागली नाही, कधि एकदा आईला ही गोष्ट सांगतो असे त्याला झाले होते.

*****************************************

सकाळी नेहेमीसारखे सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवर नाष्टा करत होते. सुमाताई मनातल्या गोष्टी कशा बोलायच्या याची जुळवा जुळव करत होत्या.

काहि तरी बोलायचे म्हणून चितळ्यांनी रोहनला विचारले, अरे रोहन तुझ्या इंटरव्ह्युचं पुढे काय झालं? तू परत कधी जाणार गावी? जर तिकडे सिलेक्शन झाले नसेल तर मला सांग, मी बघतो  ,मला काही करता येइल काय ते. अगदी कुठेच शक्य झाले नाही तर मात्र मी काहीतरी सोय करतो आमच्या कंपनीत.

रोहन काही बोलला नाही. फक्त म्हणाला की बहुतेक काही गरज पडणार नाही.

सुमाताईंनी आपल्या मनातले विचार मनातच ठेवले, उलट खुश झाल्या मनोमन की आता रोहन परत जाणार म्हणून.. रीनाला  खूप उदास वाटत होतं, आपलं त्याच्यावर प्रेम आहे, कालच लक्षात आलं , ते उड्याच माराव्याश्या वाटत होत्या.

ब्रेकफास्ट टेबलवरची प्रत्येक व्यक्तीच्या मनात निरनिराळे विचार सुरु होते. .

*****************************************

रोहनने नंतर गावी फोन करून, रीनाबद्दल त्याला काय वाटते ते भैयासाहेबांना सांगितले. ते सुद्धा आश्चर्यचकित झाले, हा गेलाय ईंटरव्ह्यु   द्यायला आणि बातमी काय सांगतोय. एक मन आनंदात होत आणि दुसर मन खात होतं मित्राला दिलेला शब्द मोडावा लागणार म्हणून. आता लेलेला काय सांगावं बरं??

**********************************************

रोहनची मेडीकल टेस्ट झाली आणि रीझल्ट यायला अवकाश असल्याने तो गावाला निघुन गेला.रोहन घरी गेल्याला, आता दोन दिवस होऊन गेले होते. लेले कधी नव्हे ते चितळ्यांच्या घरी गेले आणि त्यांना म्हणाले,

चितळेतुमच्या मुलीने आमचा आय  एस जावई पळवला हो….
चितळे म्हणाले? आय ए एस जावई?आणि माझ्या मुलीने पळवला?

म्हणजे तुम्हाला माहिती नव्हते ?? अहो रोहन इथे आय ए एस च्या इंटरव्ह्यु साठी आला होता. रिटन एक्झाम पास झाला होताच तो, फक्त इंटरव्ह्यु बाकी होता, तो द्यायला इथे आला होता तो. आता लवकरच कुठेतरी कलेक्टर म्हणून जॉइन करेल तो.मी गावी गेलो होतो, तेंव्हा  भैय्यासाहेबांशी बोललो होतो. ते पण तयार होते शितलला सून करुन घ्यायला. शितलला पण तो आवडला होताच, पण रोहनने भैय्यासाहेबांना घरी सांगितलं की त्याला रीनाशी लग्नं करायचंय म्हणून.. आणि रीनाची पण हरकत नाही म्हणाला तो..

चितळ्यांना हा शॉक ऑफ द लाइफ होता. आनंदाने  त्यांनी लेलेंना मिठीच मारली.सुमाताइंना म्हणाले , की रीनाचे लग्न ठरवले हो, तिने…. सुमा ताई बोलणं ऐकतच होत्या, त्यांनाही खूप आ्नंद झालेला होता. पोरीनं नशिब् काढलंय होSSSS!  म्हणत त्या देवापुढे साखर ठेवायला गेल्या.

रीना हे सगळं बोलणं उभं राहून ऐकत होती.. आणि  खुश झालेल्या रीनाला तर उड्याच माराव्याश्या वाटत होत्या. ती आत पळाली रोहनला फोन करन खुश खबर द्यायला.
***************************

कथा लिहिणे माझा प्रांत नाही, तरी  पण केलेला हा एक प्रयत्न आहे. कदाचित शेवटचा!!!

(ही एक कथा आहे, या कडे कृपया कथा म्हणूनच बघावे.. बऱ्याच घटना अशक्य वाटतील, पण ती एक कथा आहे हे कृपया लक्षात घेउन शक्या-शक्यते कडे दुर्लक्ष करावे ही विनंती..)