फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल

Written by  on June 26, 2010

preambleहिंदू स्थानाची रचना , अठरा पगड जाती धर्म वगैरे पहाता, हिंदू स्थानावर वर माझे कितीही प्रेम असले तरीही मी हिंदू स्थानाला स्वातंत्र्य देण्याच्या विरोधात आहे,  कारण हिंदू स्थानी राज्य कर्ते हे  स्वातंत्र्य दिल्यावर पन्नास वर्ष पण देशाचा  सांभाळ करू  शकणार नाहीत.  हे वाक्य माझे नाही, तर   चर्चिलने स्वातंत्र्य पूर्व काळात म्हटलेले आहे.

इमर्जन्सी साठी जेंव्हा  केंद्र सरकार जेंव्हा  १०० रुपयांची मदत कुठल्याही राज्याला पाठवते , तेंव्हा फक्त त्यातले केवळ १४ रुपयेच गरजवंता पर्यंत पोहोचतात, आणि ८६ रुपये मधल्या मधे गायब होतात. हे पण वाक्य  माझे नाही, तर पूर्व पंतप्रधान राजीव गांधी याचे वाक्य आहे.राजीव गांधी यांनी ब्युरोक्रसीच्या कार्यप्रणालीवर हा  प्रकाश टाकला आहे तो अगदी खरा आहे.

ह्या अशा परिस्थितीत जेंव्हा चिखलीकर या  एक्झिक्युटीव्ह इंजिनीअरला अटक होते, आणि त्याच्याकडे २० कोटी  रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडते , तेंव्हा मात्र मनात विचार आल्याशिवाय रहात नाही, की ह्या माणसावर काय कारवाई केली जाईल?  उतर अगदी सोपं आहे काहीही नाही….कारण लवकरच तो  काही लाख रुपयांच्या जामीनावर बाहेर निघेल,मग कोर्टात केस सुरु होईल, जी कमीत कमी १० एक वर्ष तरी चालेलच.  आणि मग समजा,  सेशन कोर्टात जरी शिक्षा झाली, तरीही तो हाय कोर्टात अपील करून पुन्हा जेलच्या बाहेरच राहील. असे होता होता , आधी हायकोर्ट , मग सुप्रीम कोर्ट असे करता करता पन्नास एक वर्ष जातील.नंतर कदाचित  या पेक्षा एखादा मोठा घोटाळा पकडला जाईल, आणि लोकं विसरतील या माणसाला, आणि हा सुखाने कुठे तरी आयुष्य जगेल.

आपल्या देशामधे देशद्रोहाचे आरोप असलेले संजय दत्त, मेमन सारखे लोकं जेंव्हा जामिनावर उजळमाथ्याने बाहेर फिरत असतात,  आणि जनता त्यांना आपल्यात सामावून घेते, तेंव्हा पण “खरंच देश मोठा की व्यक्ती ?”  या मधे देश मागे टाकून व्यक्तीला मोठेपणा देण्याची मनोवृत्ती दिसुन येते.

पिडब्लुडी, इरीगेशन, रेव्हेन्यू , कलेक्टरेट,आर टी ओ  वगैरे असे अनेक विभाग( कुठलाही सरकारी विभाग) आहेत  की , ” त्या विभागातल्या   १०० टक्के लोकांवर छापे घातले आणि संपत्तीची चौकशी केली तर त्या पैकी कमीत कमी ९० टक्के लोकांच्या कडे तरी अशीच बेहिशोबी मालमत्ता सापडेल , आणि ती पण इतकी जास्त असेल की कदाचित भारत देशा वरचे सगळे परकीय कर्ज फेडले जाऊ शकेल.ही अतिशयोक्ती नाही .

या सगळ्या विभागात किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयात  जर काम करून घ्यायचे असेल तर पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, याचा अनुभव आपण सगळ्यांनीच आयुष्यात कधी ना कधी तरी  घेतलेला असतो. त्या विभागात गेल्यावर आपण आधी तिथला दलाल कोण आहे हे शोधतो, आणि मग सगळी कामं कशी अगदी बिनबोभाट पार पडतात- फक्त काही पैसे खर्च करावे लागतात. रजिस्ट्रार ऑफिस मधे पण घराची रजिस्ट्री करायला गेलो ह्तो, आणि तिथे पण पैसे खर्च केल्याशिवाय काम होत नाही, हे जेंव्हा लक्षात आले, तेंव्हा मात्र ज्युडिशिअरीला पण या दलालांच्या  कॅन्सरने  वेठीस धरलेले आहे हे लक्षात आले.

भ्रष्टाचारावर  न लिहिलेलेच बरे. कारण भ्रष्टाचार  न करणारा माणूस आज भारतामधे केवळ तोच उरला आहे, की ज्याला पैसे खाण्याचा चान्स नाही. सगळेच जण पैसे खातात, म्हणजे ” हमाम मे सब नंगे” अशी परिस्थिती असल्याने ह्या गोष्टीला पण एक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. क्लास ४ कर्मचाऱ्या पासून ते अगदी अत्युच्च दर्जाच्या ब्युरोक्रॅट किंवा नेत्या पर्यंत सगळेच जण पैसे खातात हे उघड सत्य आज कोणीही मान्य करे. कुठलीही गोष्ट जरी हरवली तरी पुन्हा सापडू शकते, पण जर समजा एखाद्याचं चारित्र्य हरवलं तर ते पुन्हा सापडण्याचे चान्सेस अजिबात नाहीत. पण दुर्दैवाने चारित्र्याला विचारतो कोण??

मध्यंतरी येडूरप्पा , गडकरी वगैरेंच्या पैसे खाण्याबद्दल बरंच काही छापुन येत होतं, तेंव्हा एक भाजपाचा खास खंदा पुरस्कर्ता मित्र भेटला. मी जेंव्हा या मनोवृत्तीवर चिंता व्यक्त केली, तेंव्हा तो म्हणाला, “आज पर्यंत कॉंग्रेस ने खाल्ले आहे, तेंव्हा आता यांनी पण थोडे खाल्ले तर काय बिघडले?” . एक उच्च शिक्षित माणूस जेंव्हा अशा प्रकारची बेजबाबदार कॉमेंट करतो तेंव्हा, चर्चिलचे म्हणणे अगदी  बरोबर होते का? हा विचार पण मनात आल्याशिवाय रहात नाही.

काही वर्षापूर्वी ” फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल” ही लोकशाही ची व्याख्या खूप पॉप्युलर झाली होती. अगदी नेहरू,इंदिरा गांधी ते राजीव गांधी या सगळ्यांनी या घोषणेचा वापर केला होता. मला एक प्रश्न पडतो तो म्हणजे या घटने मधले ते ’ पिपल’  आहेत ते कुठले ” पिपल’ अभिप्रेत आहेत? कारण हल्ली तर हीच घोषणा, ” फॉर द पोलिटेशिअन्स , ऑफ द पॉलिटीशिअन, बाय द पॉलिटिशिअन”  किंवा  ” फॉर द ब्युरोक्रॅट्स  , ऑफ द ब्युरोक्रॅट्स, बाय द ब्युरोक्रॅट्स” अशी झालेली आहे. हे सगळे ब्युरोक्रॅट्स एकमेकांची पाठ खाजवण्यात दंग झालेले असतात. तेरी भी चूप, मेरी भी चूप असा प्रकार सुरु आहे सगळीकडे.

नियम किंवा कायदे हे बनवले जातात, ते केवळ पैसे खाण्याच्या नवीन जागा निर्माण करण्यासाठी. डान्स बार बंद करण्याचा तमाशा पण याच कारणासाठी होता . जितके कडक कायदे, तितका जास्त हप्ता – हा अलिखीत नियम आहे.

ज्या देशात आज जे काही होतंय त्या मधे सामान्य ” पिपल” ला कोणीच विचारात घेत नाही. राजकीय नेते हे ब्युरोक्रॅट्स च्या लॉबी च्या दबावात येऊन बरेच निर्णय घेतात,  त्या निर्णयांचा सामान्य माणसाला  म्हणजेच  त्या ” पिपल” वर काहीच फायदा होत नाही. लोकशाही खरंच क्षीण झाली आहे का गेल्या काही वर्षात?  आज जेंव्हा ब्युरोक्रसी ही ३३ रुपयात एखादा माणूस आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतो असे बेजबाबदार विधान निर्लज्ज पणे करतो , आणि मंत्री पण त्याचीच री ओढतो .

सध्याची पिढी ही कॉंग्रेस भाजपा, रिपब्लिकन पार्टी , आणि लोकल पार्टी जसे शिवसेना, मनसे , राष्ट्रवादी आणि या सारख्यांया असंख्य पक्षांकडे / नेत्यांकडे आशेन पहात असते,आपल्या आवडीचा पक्ष , किंबहूना ज्याला आपण मत दिले आहे तो पक्ष काहीतरी करेल अशी आम जनतेची आशा असते, पण प्रत्येकच वेळेस निराशा होते हे पण शाश्वत सत्य आहे.

’”पिपल” ने   कर्नाटकात भाजपाला उखडून तिथे कोँग्रेस चे रोपटे रोवले, त्यानेही काही फरक पडेल असे नाही. पण जर अशीच परिस्थिती राहिली, तर लवकरच लोकं नक्षलवादा कडे ओढले जाणार  नाहीत हे कशावरून? हा प्रश्न मात्र मनाला खूप अस्वस्थ करतो  .

इती लेखन सीमा.

अभिनंदन..(पुलं चं नांव दिल्या बद्दल)

Written by  on June 24, 2010

परवा पुण्याला जाउन आलो. रात्रभर पावसाने नुसता धिंगाणा घातला होता. आदल्या दिवशीचा  सेंट्रल आणि हार्बर लाईनच्या लोकल्स बंद पडण्याचा अनुभव गाठीशी होताच. म्हणून सकाळी उठून सरळ टिव्ही समोर बसलो. टीव्हीवर पण सगळ्या शिळ्या बातम्या( अगदी चावुन चावुन चोथा झालेल्या) पुन्हा पुन्हा दाखवत होत्या. आदल्या दिवशी काय झालं , ह्या पेक्षा आजची परिस्थिती कशी आहे यात मला जास्त इंटरेस्ट होता.

टॅक्सी मधे ड्रायव्हरने  गणपती, जिझस, आणी इतर देवांच्या मुर्त्या लावल्या होत्या. अगदी पुलं चा पानवाला आठवला. मधे आरशाला एक क्रॉस लटकत होता. म्हंटलं, चला, कमित कमी देव तरी आहे आपल्या बरोबर..

कुठेच काहीच दिसत नव्हतं, फक्त पुन्हा पुन्हा एकच सांगितलं जात होतं की मिलन सबवे आणि खार सबवे बंद आहेत..! मला आधी सांताक्रुझ ला जाउन एका मित्राला वेस्ट वरुन घ्यायचं होतं. म्हणून व्हाया दिंडॊशी लिंकींग रोड करत निघालो. लक फॅक्टर इतकं वाइट होतं, की ह्या रस्त्यावर पण अगदी तुडूंब गर्दी!!! पाउण तास तर लिंकींग रोडला पोहोचायला लागला. बरं.. खरं तर रस्ता जाम व्हायचं कारण म्हणजे रस्त्यावर साचलेलं पाणी.. इथे फोटॊ पहा, दोन लेन्स पाण्याखाली असल्यामुळे सगळे लोकं एकाच लेनमधे चालत होते.

150720091655

घरुन ८ वाजता निघालो आणि सांताक्रुझ ला साडे नऊ वाजता पोहोचलो. टॅक्सी ड्रायव्हर आत्ताच कंटाळल्यासारखे वाटत होता. तिथुन पुढे सायन ट्रॉम्बे रोडने पुण्याचा एक्सप्रेसवे पकडला. पाउस थोडा थांबल्या सारखा वाटत होता. रस्ता पण जरा मोकळाच होता. लवकरच एक्सप्रेस वे ला लागलो. फुडमॉल ला स्टॉप घेतला , ऍज युजवल, आणि तिथुन पुढे निघालो तर व्हिजिब्लिटी अक्षरशः १०फुट पण नव्हती. समोरचं काहीच दिसत नव्हतं. कारला फॉग लॅम्प्स नव्हते. अगदी ढगातून चालतोय असं वाटत होतं.

150720091658

हा पण एक  फोटॊ बघा, म्हणजे कल्पना येइल कसं मस्त वातावरण होतं याची.

150720091659

आणि हा पण एक फोटो..

लोणावळ्याला एका कॉन्फरन्स साठी हॉटेल बघायचं होतं, म्हणून लोणावळा एक्झिट वर एक मोठा ऍक्सिडेंट झालेला दिसला. खाली उतरुन चेक केलं, की त्या गाडीत कुणी आहे का ते.. पण कोणीच नव्हतं, बहुतेक ऍक्सिडेंट बराच आधी झालेला असावा!

150720091662

लोणावळ्याच्या काही हॉटेल्सला जाउन त्यांची कोटेशन्स घेतली आणि सरळ पुण्याला गेलो. लोणावळा पावसाळ्यात खूपच रमणीय असतं. मजा आली.जुने दिवस आठवले.एखाद्या टपरिवर थांबुन खेकडा भजी सोबत, मस्त पैकी आल्याचा चहा प्यायची इच्छा होत होती , पण वेळेच्या अभावी टाळलं.. पण इथे काही हॉटेल्सच्या प्रॉपर्टीचे फोटो पोस्ट करतोय. बघा..

150720091668पुणं जवळ आलं तसं धुकं पण कमी झालं. थोड्या थोड्या अंतरावर डॊंगरावरून खाली खळखळत पाणि वाहात होतं. पावसाळ्यात लोणावळा म्हणजे एकदम मस्त..  पूर्वी आम्ही नेहेमी जायचो पण आजकाल वेळ नसतो 😦

lonavala1

जे सरकारने काम करायचं ते या शिवसैनिकांनी करून ठेवलंय, म्हणून त्यांचं अभिनंदन  करायला हवं. पण याच सोबत एका कटु गोष्टीची पण आठवण येते, ती म्हणजे युती सरकार असतांना बाळासाहेबांवर (ठोकशाही बद्दल) पु ल देशपांड्यांनी  टीका केली म्हणून “यांना पुरस्कृत करून आम्ही झक मारली” हे बाळासाहेबांचं स्टेटमेंट उगाच आठवून वाईट पण वाटलं.. असो… मला हे निश्चित माहिती आहे की जे काही झालं ते इन द हिट ऑफ डिस्कशन्स.. आणि बाळासाहेबांचं पण पुलंच्यावर तुमच्या आमच्या इतकंच प्रेम आहे म्हणून तर त्यांना एक्सप्रेसवेला नांव देतांना पुलंच आठवले.. 🙂

पुनःश्च अभिनंदन…

expressway

ब्लॅकबेरी वापरत असाल तर…

Written by  on June 19, 2010

bbपरवा एक फोन आला होता, एक स्त्री होती, म्हणाली की मी दिल्लीहून बोलते आहे, आणि तुम्ही रोहन ला ओळखता का?  हा प्रश्न अगदी साधा सरळ वाटतो. होय, ओळखतो असे उत्तर दिल्यावर , ती बाई म्हणाली की  ” रोहन वर एक फोर्जरी चा गुन्हा दाखल झालेला आहे, आणि विटनेस म्हणून तुमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला आता दिल्ली कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतील. लगेच लक्षात आलं, की हा फ्रॉड फोन आहे आणि सरळ फोन कट केला. पहिले काम केले ते रोहनला मेल पाठवला, आणि त्याचे उत्तर अर्थातच अपेक्षित होतं, ती बाई फ्रॉड आहे, तिने बऱ्याच लोकांना असे फोन केले आहेत, तेंव्हा लक्ष देऊ नकोस.

हे कसं काय झालं असावं? एक म्हणजे हरवलेला फोन कोणाच्या तरी हाती लागला असेल का?

मोबाइल फोन हरवणे म्हणजे एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तसाही मोबाईल आल्यापासून आपली स्मरणशक्ती कमी झाल्याचे मला जाणवते. पूर्वी आपण डायरी मधे नंबर पाहून मग तो डायल करायचो, त्या मुळे नंबर्स लक्षात रहायचे, पण हल्ली आपण मोबाइल मधे केवळ नाव पाहून डायल करतो त्यामुळे नंबर वाचायचे कामच पडत नाही- आणि हेच कारण असावे बहुतेक , नंबर्स लक्षात न रहाण्याचे.

मोबाईल चोरीला जाणे हे दुःस्वप्न मी बरेचदा अनुभवले आहे. अगदी पहिल्यांदा मोबाईल जेंव्हा हरवला होता, तेंव्हा तर सगळे नंबर्स पण गेले होते, आणि मग एक – एक करून पुन्हा सगळे नंबर्स जमा करायला खूप त्रास झाला. त्यातही काही महत्त्वाच्या संपर्काचे नंबर्स तर पुन्हा मिळूच शकले नाहीत.सुरुवातीच्या काळात मोबाईल चा आकार खूप मोठा होता आणि तो कम्प्युटरला कनेक्ट केला जाऊ शकत नव्हता. त्या मुळे मोबाईल  हरवला की सगळा डेटा  पण जायचा. कॅमेरा नसल्याने फोटो वगैरे दुसऱ्याच्या हाती लागण्याची भिती नसायची.

हजार एक फोन नंबर्स, तेवढेच इ मेल अ‍ॅड्रेसेस , डेबिट कार्डचे पास कोड्स, काही पासवर्ड्स,  वाढदिवस, काही महत्त्वाच्या घटना  वगैरे सेल फोन वर सेव्ह करून ठेवायची सवय मला आहे- आणि बहुतेक सगळ्यांनाच असते.  पण जर कधी मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर  हा सगळा डेटा जर एखाद्या गैर व्यक्तीच्या हाती लागला तर ?

सिंबियन फोन नंतर आलेल्या अ‍ॅंड्रॉइड फोन ने मात्र  हा प्रॉब्लेम बराच प्रॉब्लेम कमी झालेला आहे. फोन हा कॉम्प्युटरला कनेक्ट केला जाऊ शकल्याने सगळ्या फोन नंबर्स चा वगैरे बॅक अप फोन वर घेऊन ठेवता येऊ शकतो. आणि जरी फोन हरवला तरी हा सगळा डेटा पुन्हा कम्प्युटर वरून नवीन सेल फोन वर टाकला जाऊ शकतो. पण त्या चोरीला गेलेल्या मोबाइल वरचा डेटा  त्या चोराच्या हाती लागला असेल त्याचे काय? 😦 मी मात्र सिंबियन फोन वरून सरळ ब्लॅक बेरी वर गेलो.

नुकताच माझा ब्लॅक बेरी बोल्ड चोरीला गेला, आणि नंतर मी नवीन फोन घेऊन, ब्लॅकबेरी प्रोटेक्ट   वरून सगळे नंबर्स,  डेटा डाउनलोड करून पुन्हा फोन  वापरणे सुरु पण केले. जुन्या फोन  बद्दल तर मी विसरून पण गेलो होतो.

ब्लॅक बेरी वर ब्लॅक बेरी प्रोटेक्ट म्हणून एक फ्री सर्व्हीस आहे. तुम्ही आपल्या फोन वर हे ऍप्लिकेशन डाउन लोड केले की तुमच्या फोन वरचा सगळा डेटा ब्लॅक बेरीच्या सर्व्हर वर बॅक अप घेऊन ठेवता येतो. आणि जेंव्हा तुम्ही नवीन ब्लॅक बेरी विकत घेता, तेंव्हा तो डेटा लोड करता येतो. तीन वर्ष हे ऍप्लिकेशन माझ्या फोन वर आहे, आणि मला याचा फक्त एवढाच उपयोग माहिती होता. पण हेच ऍप्लिकेशन वापरून तुम्ही तुमचा फोन रिमोट लॉक करू शकता, आणि तुमच्या  ब्लॅकबेरी वर तुम्ही सेव्ह करून ठेवलेले सगळे नंबर्स, आणि इतर डेटा पण पुसून टाकू शकता ह्या गोष्टींची कल्पना पण नव्हती.माझ्या प्रमाणेच बऱ्याच लोकांना हे माहिती नसावे म्हणून ही पोस्ट लि्हीली आहे.

पद्धत सोपी आहे, ह्या  लिंक ^(http://rangmarathiche.com/goto/https://protect.blackberry.com/protect/mydevice?cid=1290065) वर जाऊन तुमचा ब्लॅकबेरी  आयडी  ने लॉग इन  करा, तुम्हाला  पाच ऑप्शन्स दिसतील, तुम्हाला हव्या त्या ऑप्शन वर क्लिक करा..

१)तुमच्या फोन चे लोकेशन  दाखवण्यासाठी पहिला ऑप्शन आहे.  जर फोन सुरु झाला असेल तर तो फोन कुठे आहे  हे तुमच्या कम्प्युटर वर दिसते.

२) दुसरा ऑप्शन, जर तुमचा फोन सायलेंट मोड मधे असेल  आणि सापडत नसेल तर इथून तुम्ही त्या फोन ला रिंग देऊ शकतात. सायलेंट मोड मधे पण रिंग वाजेल.

३)तसेच  जर समजा तुमचा फोन हरवला असेल आणि जर लॉक केलेला असेल तर तुम्ही त्याच्या लॉक असलेल्या स्क्रिन वर एक मेसेज पाठवू शकता- म्हणजे ज्याला तो सापडला असेल तो माणूस तुम्हाला कॉंटक्ट करू शकतो..

४) फोन पासवर्ड ने लॉक करू शकता.

५) फोन वर असलेला सगळा डेटा पुसून टाकू शकता.

हे सगळं करून शेवटी काय मिळतं? तर  तुमचा डेटा पण कोणाच्या हाती लागला नाही याची खात्री आणि तुमचा चोरीला गेला फोन दुसरा कोणी वापरू शकणार नाही याचे मानसिक समाधान!