ऑन द टिकिंग बॉंब..०

Written by  on April 17, 2010

जगातिल न्युलिअर पॉवर प्लॅंट्स चे लोकेशन

हा नकाशा बघा. या नकाशावर बरेच लाल ठिपके दिसताहेत. ते आहेत जगभरात पसरलेल्या न्युक्लिअर पॉवर प्लॅंट्स चे लोकेशन्स. या पैकी आज पर्यंत १९५० पासून जवळपास २० च्या वर अपघात झालेले आहेत..जितके लाल ठिपके तितके टि्कींग न्युक्लिअर बॉम्ब म्हणायला हरकत नाही. जितका जास्त डेव्हलप्ड देश, तितका जास्त किरणोत्सर्गी कचरा.

ऍटोमिक पॉवर.. किती छान वाटतं ना वाचतांना… अगदी कमी खर्चात विद्युत उत्पादन केलं जाउ शकतं.थोडंसं युरेनियम, प्लुटिनियन, हेवी वॉटर -आणि बस्स… तुम्हाला मिळते भरपूर विद्युत अगदी कमी खर्चात.

नाही.. हे जे काही आपल्याला सांगितलं जातं ते काही खरं नाही. या मधे बऱ्याच गोष्टी अशा पण आहेत की ज्या अजूनही मुद्दाम लपवून ठेवल्या जातात. १९५० साली इलेक्ट्रिसिटी तयार करण्यात आली ऍटॊमिक पॉवर प्लॅंट वापरुन, आणि तेंव्हा पासून कित्येक प्लॅंट्स तयार करण्यात आलेले आहेत. सगळ्यात जास्त प्लॅंट्स अमेरिकेत आणि यु्रोप मधे आहेत. पण हल्ली पुन्हा जुन्या प्रकारचे थर्मल पॉवर जनरेटेड प्लॅंट्स वापरावे या साठी अमेरिकेत आंदोलनं केली जात आहेत.

प्रत्येक ऍटोमिक पॉवर प्लान्ट हा एक टिकिंग  टाइम बॉंम्ब आहे. जर व्यवस्थित हाताळल्या गेला नाही तर काहिही होऊ शकतं. आत्ताच एक वर्षा पुर्वी कसाब आणि कंपनी जर तारापुरला घुसली असती तर काय झालं असतं – याचा विचार जरी केला तरीही अंगावर काटा येतो.

हे पॉवर प्लांट अगदी इन बिल्ट ऍटोमिक बॉंब प्रमाणे आहेत. एक विमान जे ट्विन टॉवर वर आदळलं तेच जर एखाद्या पॉवर प्लांटवर आदळलं असतं तर काय झालं असतं? पुर्वी कॉंक्रिटमधे जाउन मारा करणारे बॉंब नव्हते, पण आता त्याचा पण शोध लागला आहे. बॉम्ब टाकल्यावर जमिनीच्या आता शिरून तो २० फुटावर स्फोट घडवून आणु शकतो. स्पेशली बंकर्स वर हल्ला करायला असे बॉम्ब तयार केले जातात. जरे हे्च बॉम्ब्स थोडीफार  डेव्हलप्मेंट करुन वापरले तर काय होईल?? कारण पॉवर प्लॅंट्स हे केवळ कॉंक्रिटचा आणि लेड चा वापर करुनच प्रोटेक्ट केलेले असतात. जर कॉंक्रिट… जाउ द्या…

हे पॉवर प्लॅंट कसे चालतात? अगदी साधी टेक्नॉलॉजी आहे, न्युक्लिअर फ्युजन रिऍक्टर्स मधे उष्णता निर्माण होते, त्यामुळे पाणि गरम करुन निर्माण झालेल्या वाफेला वापरुन वीज निर्मिती केली जाते. जगातली जवळपास २० टक्के विद्युत निर्मिती ही न्युक्लिअर प्लॅंट्स वापरुन केली जाते.फ्रान्स मधे सगळ्यात जास्त म्हणजे ७८ टक्के न्युक्लिअर पॉवर तयार केली जाते. ्कोळसा वापरून आणि गॅस फायर्ड बॉयलर्स वापरुन पण विद्युत निर्मिती केली जायची पूर्वीच्या काळी.

एका विद्युत निर्मिती केंद्रासाठी खर्च येतो १० बिलियन डॉलर्स.. त्यामुळे ब्रेक इव्हन पॉइंटला पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो. म्हणजे प्रत्येक पॉवर प्लांट जास्तीत जास्त चालवणे हाच एक उपाय उरतो. मरिन सबमरिन्स च्या साठी न्युक्लिअर पॉवर वापरणं हे आजकाल कॉमन झालेलं आहे.

विद्युत निर्मिती नंतर निर्माण होणारं जे किरणोत्सर्जीत करणारं द्रव्य शिल्लक रहातं, त्याची विल्हेवाट लावणं हा एक मोठा प्रॉब्लेम आहे.एकदा लोड केलेलं ऍटोमिक फ्युअल जवळपास पाच ते सहा वर्षा पर्यंत चालतं. पण नंतर या किरणोत्सर्जीत वेस्ट ची विल्हेवाट कशी लावायची हा एक सगळ्याच देशांना भेडसावणारा प्रश्न आहे. त्या संदर्भात सापडलेला एक फोटो इथे लावतोय . इथे जो काचेचा गोळा दिसतोय, तो एक माणुस आपल्या संपुर्ण आयुष्यात वापरलेल्या विजेसाठी लागणारा युरेनियम वापरुन , नंतर रिसायकल केल्या नंतर उरलेल्या  वेस्टचा गोळा आहे.

इतर डेव्हलप्ड देशांमधे ज्या गोष्टींची विल्हेवाट लावण्यासाठी खुप कठीण कायदे आहेत  त्याच गोष्टींना इथे सहज पणे केलं जाउ शकतं. जसे ऍसबेस्टॉस वापरणं हे जहाजामधे अगदी कॉमन असतं. अशी जहाजं इतर कुठल्याही देशात तोडफोड करणं फार खर्चाचं काम आहे, म्हणुन अशी जहाजं भारतामधे भावनगरला , आणि दारुखान्याला तोडली जातात. असो.. पण इतक्या सहज पणे ऍटोमिक वेस्टची विल्हेवाट अनडेव्हलप्ड देशात लावणं सोपं नाही.

बरं एक इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे या प्लांट्स मधे तयार होणारी वेस्ट ही रिसायकल करुन जवळपास ९७ टक्के युरेनियम, प्लुटोनियम पुन्हा रिकव्हर केलं जातं, आणि ३ टक्के हायली रेडिओऍक्टिव्ह वेस्ट ही शिल्लक रहाते. १००० मेगावॅटच्या प्लॅंटमधे दर वर्षी ४५ टन वेस्ट तयार होते.

नुकताच झालेला ऍक्सिडेंट .. कैगा प्रोजेक्ट मधे. त्याबद्दल जर विचार केला तर लक्षात येइल की जे कारण सांगितलं जातंय ते सहजासहजी विश्वास ठेवता येण्यासारखं नाही.कोणीतरी म्हणे पाण्याच्या कुलर मधे कॉंटॅमिनेटॆड वेस्ट टाकली म्हणून हा ऍक्सिडेंट झाला.

हे प्रगत देश, ह्यांनी आफ्रिका, वगैरे सारख्या अप्रगत देशांच्या किनाऱ्यावर हे किरणोत्सर्गी द्रव्य नेउन टाकले नाही म्हणजे झाले. कारण यांना विचारणार तरी कोण आहे आज?   जाता जाता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट.. न्युक्लिअर पॉवरचा उपयोग आधी सबमरिन्स मधे करण्यात आला होता, आणि नंतर मग ते विद्युत निर्मिती साठी वापरले गेले. थोडक्यात एकच सांगायचंय, की सगळं जगच आज टिकिंग टाइम बॉ्ब वर आहे आज… !!