वन बुलेट टु लाईव्ह्ज…

Written by  on November 26, 2009

shirts
हे काय आता नवीन?? नाही, नवीन नाही हे.. तसं २२ मार्च पासूनच सुरु आहे. पण ह्या ज्यु लोकांनी असं केलं म्हणून याचा जास्त गाजावाजा झाला नाही. हेच काम जर पॅलेस्टेनियन्सनी केलं असतं तर त्याचा खूप गाजावाजा झाला असता.

हिटलर मुळे ज्यु लोकांच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेच आपल्या सगळ्यांच्या मनात.. हिटलरने त्यांचा छळ केला म्हणून. हे जरी खरं असलं, तरी  आता गाझा पट्टिमधे ते जे करताहेत त्याला काय म्हणायचं??

असो, विषय तो नाही. ह्याच ज्यु लोकांच्या आर्मीने कांही टी शर्ट्स तयार केलेले आहेत.   त्यावरचे जे स्लोगन्स  छापले आहेत ते वाचले तर वाटेल, की हिटलरने शिल्लक ठेवलेले(ज्यांच्या पुर्वजांनी छळछावण्या पाहिल्या आहेत ते ज्यु) असे का झालेत? खरं तर यांची मेंटॅलिटी अशी व्हायला काहीच कारण नाही.. पण हेट्रेड.. मुळे डॊळ्यावरचा पडदा जुनं सगळं विसरायला लावतो.वर्षानुवर्ष फेस कराव्या लागलेल्या  व्हॉयल्न्स मुळे हे लोकं वेडे झाले आहेत. आणि केवळ ह्याच कारणासाठी त्यांनी कांही कुटूंबांवर अटॅक केला होता ऑपरेशन डेड कास्ट च्या अंतर्गत.
1
कांही दिवसांपूर्वी जे टी शर्ट्स आर्मी ने काढले त्यांच्यावरचे स्लोगन्स इथे खाली देतोय..

१) एक प्रेग्नंट स्त्री दाखवली आहे – अर्थात बुरखाधारी, आणि तिच्यावर गनची क्रॉस वायर रोखलेली आहे. खाली लिहिलंय .. वन शॉट टु किल्स!!
२)दुसऱ्या एका चित्रा मधे एक पॅलेस्टाइन बेबी मेलेली आहे, तिचा टेडी बिअर शेजारी पडलाय  अन आई रडते आहे. सोबत कॅंपेन आहे.. “बेटर युझ ड्युरेक्स..”
३)ऑपरेशन कास्ट लिड नंतर लगेच , त्या बटालियनच्या लोकांनी टी शर्ट्स प्रिंट करुन घेतलेत.. ज्या मधे …पॅलेस्टेनियन प्रेसिडॆंटला एक व्हल्चर सेक्स्युअली पेनिट्रेट करतांना दाखवलंय.
४)अ ग्रॅज्युएशन नावाचा एक टी शर्ट आहे ज्या मधे एक पॅलेस्टेनियन बेबी ग्रो होतांना दाखवली आहे. अगदी इन्फॅंट ते टिन एजर.. आणी पुढे अजुन लिहिलंय..” नो मॅटर हाउ ईट बिगिन्स वी विल पुट द एंड टु इट,
५) लाव्ही बटालियनने एक टी शर्ट काढलाय,त्या मधे दाखवलंय की एक पॅलेस्टीनियन स्त्री जखमी अवस्थेमध्ये पडलेली आहे, आणि एक स्लोगन.. “बेट यु आर रेप्ड”
६)एका बटालियनने प्रिंट करुन घेतलाय टि शर्ट.. ज्यात लिहिलंय लेट एव्हरी अरब वुमन नो हर सन्स फेट इज इन माय हॅंड्स..
७)कॅरमॉन टीम ने एक प्रिंट करुन घेतला होता, त्यात लिहिलं होतं..यु गॉट टु रन फास्ट बिफोर इट्स ओव्हर.. खाली एक चित्र होतं अरब महिला ग्रेव्ह समोर रडते आहे… त्या खाली लिहिलं होतं आफ्टरवर्ड दे क्राय.. दे क्राय..
८)ऑपरेशन कास्ट लिड ने अजुन एक टी शर्ट प्रिंट करुन घेतला होता, त्यात एक इस्रायली सोल्जर दाखवला होता, आणि खाली लिहिलं होतं.. इफ यु बिलिव्ह इट कॅन बि फिक्स्ड.. देन बिलिव्ह, इट कॅन बी डीस्ट्रॉईड..

असे टी शर्ट्स प्रिंट करण्यापुर्वी आर्मी मधे कुणाची तरी परमिशन लागतच असेल.. पण हे टी शर्ट्स इस्रायली लोकांची मेंटॅलिटी दाखवतात. ह्या मधे मला तरी काही फनी वाटत नाही.

स्त्रियांचा खून , बलात्कार, आणि इनफॅंट्सचा पण खून करा असा संदेश देणारे हे असे टी शर्ट्स वापरणे म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट आहे . इस्रायली लोकांना मिळणारा ईंटरनॅशनल प्रेसचा पाठींबा तसाही कमीच होत आहे. आणि  अशा उद्योगांमुळे नक्कीच संपेल असं वाटतं.. शेम ऑन द ब्लडी इस्रायलिज..

उबंटू.

Written by  on November 20, 2009

हे उबंटू म्हणजे नेमकं काय? आय ऍम, बिकॉज हु वी आर ऑल.. नाही लक्षात आलं? वाचा पुढे.

download (1)सध्या जगात खूप निगेटीव्हिटी भरलेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ बघायला मिळतो. पोट भरलेले असतांना पण प्रत्येक व्यक्ती आपल्याच पोळीवर तुप कसे ओढून घेता येईल ह्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्या मानव जाती मधे एक कॉमन बॉंड आहे, तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण ह्या बॉंड मुळेच एकमेकांच्या आयुष्यावर खूप परीणाम होत असतो.

तर गोष्ट अशी आहे , एक ऍथ्रोपोलॉजिस्ट- म्हणजे मानवी स्वभावाचा अभ्यासक आफ्रिकेमधे मानवी स्वभावाचा अभ्यास करायला जातो. ज्या ठिकाणी अगदी बेसिक गोष्टी सुद्धा नाहीत अशा त्या  एका दुर्गम भागातिल गरीब वस्ती मधे जाऊन हा अभ्यास सुरु ठेवतो. त्या भागातले लोकं अतिशय गरीब, म्हणजे आज सकाळी खायला आहे तर संध्याकाळी नाही.

दररोज काही मुलांना समोरच्या मोकळ्या पटांगणात खेळतांना बघत असतो.अंगावर घालायला पुरेसे कपडे नाहीत, पोटभर भोजन  पण नाही , पण मुलं मात्र नेहेमीच आनंदी दिसतात त्याला.त्याला आश्चर्य वाटतं हे कसं?

एकदा तो एक प्रयोग करण्याचे ठरवतो. दुसऱ्या दिवशी त्या भागात येतांना आपल्या सोबत तो एक सुंदर बास्केट घेऊन येतो. त्या बास्केट मधे भरपूर कॅंडी, फ्रुट्स असतात. ती मुलं पण समोर खेळत असतात. त्यांना तो बोलावतो आणि सांगतो, ” ह्या बास्केट मधे बराच खाऊ आहे, हा मी मधे ठेवणार, तुम्ही सगळ्यांनी दूर एकाच अंतरावर उभे रहायचे, आणि मी ” नाऊ” म्हणालो, की धावत जाऊन बास्केटला हात लावायचा, जो सर्वप्रथम बास्केट ला हात लावेल, त्याला ह्या बास्केट मधला सगळा खाऊ मिळेल”

पटांगणात मध्य भागी ही बास्केट ठेवली जाते. सगळी मुलं सारख्याच अंतरावर उभी करायची म्हणून गोलाकार करुन मुलं उभी रहातात. मधे असलेल्या बास्केट कडे सगळ्यांचेच डोळे लागले असतात, आणि सगळे जण ” नाऊ” शब्दाची वाट बघत असतात.

त्या ऍंथ्रोपोलॉजिस्ट ने ’नाऊ” म्हंटल्यावर जे काही होतं, ते बघुन त्याला मात्र मोठा धक्का बसला. सगळी मुलं अगदी सावकाश पणे एक एक पाऊल टाकत त्या बास्केट च्या दिशेने  चालू लागली. सगळे जण एकाच वेळी त्या बास्केटजवळ पोहोचले, आणि सगळ्यांनी आपला हात त्या बास्केटला लावला आणि  त्यात असलेला खाऊ वाटुन खाल्ला.

ज्या मुलांना दररोज साध्या जेवणाचा पण प्रश्न असतो त्यांच्या कडुन असे वागणे अपेक्षित नव्हते त्या ऍन्थ्रोपोलॉजिस्टला. त्याने  विचारले, हे असे तुम्ही का केले? जर कोणी एक मुलगा जोरात धावत गेला असता तर त्या  एकालाच सगळा खाऊ मिळाला असता तर तो त्याला कित्त्येक दिवस पुरला असता! त्यावर त्या मुलांनी उत्तर दिले, उबंटू. म्हणजे जर आमच्या पैकी इतर दुःखी होत असतिल तर “तो” ज्याला ही सगळी बास्केट मिळेल तो कसा काय आनंदी होऊ शकला असता? आपल्या सभोवतालचे लोकं जर दुःखी असतील तर आपण कसे काय आनंदी राहु शकतो?

आय ऍम बिकॉज व्हॉट वी आर ऑल! ह्या जगप्रसिद्ध वाक्यामागची ही कथा. बऱ्याच सेमिनार्स मधे सांगितली जाते, उबंटू म्हणजे मानवी व्यक्तीमत्वाचा पॉझिटीव्हनेस.तुम्ही एकटे आयसोलेशन मधे मानव म्हणुन जगुच शकत नाही.उबंटु म्हणजे पर्स्परातिल सौदार्ह्य.आपण स्वतःकडे नेहेमी एक व्यक्ती म्हणुन पहातो- इतरांपासुन वेगळा, पण खरी परिस्थिती ही असते, की तुम्ही आम्ही सगळे जोडले गेलेलो असतो, एकाने केलेल्या गोष्टीचे इतरांवर पण परीणाम होत असतात.तुम्ही जेंव्हा चांगले काही करता, तेंव्हा तेच सगळीकडे पसरते.

उबंटू हा कन्सेप्ट नाही, तर जीवन शैली आहे !

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।

कारगिल..

Written by  on November 10, 2009

कारगिल च्या युद्धामधे  हौतात्म्य पत्करलेल्या  योध्यां मधे कोण  कोण होते??  खाली यादी देतोय बघा..

मिलिटरीचे अधिकारी
मेजर :- १०
कॅप्टन :- ८
लेफ्ट. कर्नल:- ३
लेफ्टनंट:- ७
शिपाई :- २७
सगळे मिळून अधिकारी २८, आणि शिपाई २७.

एअरफोर्सचे अधिकारी
स्क्वॉड्रन लिडर :-२
फ़्लाइट लेफ्ट:- २
सार्जंट:- २

सगळे मिळून ६

वर दिलेली यादी आहे सगळ्या हुतात्म्यांची..(नेट वरून घेतलेली ) या हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी कितीही जरी  केलं तरीही या देशातला प्रत्येक नागरिक त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही या बद्दल कोणालाच आक्षेप नसावा .  जेंव्हा शासनाने ठरवले की या लोकांसाठी काहीतरी करायचे आहे  , तर   कुठल्याच लेव्हल वरून या गोष्टीला विरोध होणार  नाही, आणि  प्रत्येक भारतीय या गोष्टीचे स्वागतच करेल याची खात्री होतीच. नेमका   आपल्या नेत्यांनी जनतेच्या ह्याच मानसिकतेचा फायदा घेण्याचे ठरवले.

एक संधी दिसते आहे या शहीदांच्या नावाने पैसे कमवायची, तेंव्हा   नेत्यांच्या बरोबर, आर्मीचे  उच्चाधिकारी ,  मंत्री आणि त्यांचे  नातेवाईक आपापल्या बाह्या सरसावून आपापला वाटा उचलायला पुढे झाले. चोर चोर मावस भाऊ या अर्थाची एक म्हण आहे हिंदी मधे…एखाद्या मेलेल्या प्रेता भोवती जशी गिधाडे जमा होतात, तसे हे सगळे  लोकं एकत्र होऊन  त्या ’संधी ’ भोवती घोंगावू लागले.

या नेत्यांनी एक जावई शोध लावला, की कारगिल मधे शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवांसाठी  मुंबईला फ्लॅट्स हवे आहेत (?)…  मग काय करायचं? मिलिटरी ची एक जागा आहे कफ परेडला, तिथे   एक  बिल्डींग बांधायची आणि  ५०-६०  लाखात विधवांना/ कारगिल वीरांना फ्लॅट्स द्यायचे.

काही मुलभूत प्रश्न आहेत बघा माझ्या मनात.

पहिली गोष्ट जर एखाद्या यो्ध्याची विधवा जर दिल्ली मधे रहात असेल तर तिला मुंबईला फ्लॅट देऊन काय साधणार?? किंवा तिला इंटरेस्ट तरी असेल का या मुंबईच्या फ्लॅट मधे?? अर्थातच नाही. हीच गोष्ट इतर शहरात रहाणाऱ्या कारगिल विधवांना पण लागू होते. एखाद्या चंदीगढच्या, हिमाचल च्या विधवेला मुंबईला फ्लॅट ऑफर करण्यात काय हशील आहे?कदाचित एखाद्या हिमाचल मधल्या शिपायाच्या विधवेला तिच्या गावात किराणा दुकान सुरु करायचे असेल, दुसऱ्या एखाद्या विधवेला दुसरं काही करायचं असेल, तिच्याच गावात राहून,  कोणाला शेती करायची असेल  ! दुर्दैवाने कोणाला काय मदत हवी आहे हे विचारण्याचे पण कोणी कष्ट घेतले नाहीत आणि स्वतःच्याच मनाने काय करायचं याचा निर्णय घेतला.

वर दिलेली यादी बघा…वर दिलेल्या शहीदांच्या यादी मधे ऑफिसर्स आहेत २७…  इतर सैनिक आहेत २८ -सैनिकांच्या विधवांना प्रॉव्हीडंट फंड , आणि इतर  फायदे मिळून जवळपास १५ ते २० लाखापर्यंत पैसे मिळाले असतील. त्या पैकी जे अगदी तरूण वयात गेले, ( म्हणजे कॅप्टन , नायक वगैरे च्या लेव्हलचे) त्यांच्या विधवांना तर दहा लाख तरी प्रॉव्हिडंट फंड मिळाला असेल की नाही याची शंकाच आहे मला . समजा सगळे पिएफ चे पैसे भरले तरी पण नंतर लोन फेडायला पैसा कुठुन येणार आहे त्यांच्याकडे? मिळणारी तुटपुंजी पेन्शन आणि वाढणारे खर्च  अशी परिस्थिती असेलच..अशा परिस्थितीत एकही विधवा ते ४०-५० लाखाचे फ्लॅट्स अफॉर्ड करू शकणार नाहीत- याची पुर्ण कल्पना त्या चोर  नेत्यांना आणि इतर अधिकाऱ्यांना होती.

१०-११ वर्षापुर्वी झालेलं युध्द आज आपले सगळे देशवासिय विसरून गेले आहेत. आपले नेते आणि नागरिक  सुद्धा फारच  बेजबाबदार वागतात.एखाद्या खेळात  जर भारत जिंकला, तर तो  एखादे पदक मिळवणाऱ्या खेळाडूवर करोडो रुपयांची खैरात केली जाते. केंद्र आणि राज्य शासन एक करोड रोख, पन्नास लाख रोख अशा रकमा देतात.    तो खेळाडू  जरी १२वी नापास असेल तरी पण त्याला सरळ क्लास वन ची नोकरी दिली जाते, त्याबद्दलही  माझा अजिबात आक्षेप नाही.खेळाडूने एखादे पदक जिंकले तर देशाचे नाव उंच केले हे मान्य , त्या साठी त्याला एक कोटी दिले तरीही मान्य, त्या खेळाडूंची उघड्या ट्रक मधून मिरवणूक काढा.. ते पण मान्य, डोक्यावर घेऊन नाचा- ते पण मान्य, त्यांचे फोटो घरात लावून पुजा करा- ते पण मान्य………. पण  देशाला देश म्हणून एकत्र ठेवण्यासाठी बलिदान  दिलेल्या त्या शिपायाच्या /अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांसाठी काय केलं जातं हे आम्ही जाणून घेण्यात थोडा तरी ईंटरेस्ट घ्यायलाच हवा .

आपल्या नेहेमीच्या कामात आपण इतके मश्गुल असतो, की आपण त्या १० वर्षापुर्वीच्या घटनेला विसरून पण गेलो आहोत.   खेळामध्ये  मिळवलेल्या मेडल्स पेक्षा  सिमेवर सैनिकांनी केलेले  बलिदान जास्त श्रेष्ठ आहे,  पण  दुर्दैवाने निर्लज्ज राज्यकर्त्यांच्या डोक्यात ती गोष्ट घुसत नाही किंवा राज्यकर्त्यां कडून  मुद्दाम  त्या कडे दुर्लक्ष केलं जातं- कारण काय?? तर जनतेला पण इंटरेस्ट नाही म्हणून- जनतेला जितका इंटरेस्ट खेळात आहे त्याच्या एक  शतांश जरी या गोष्टीत असला तर शासनाची असे वागण्याची हिम्मत होणार नाही.पुन्हा एकदा लिहितो,  खेळाडूंसाठी काय  आणि किती केलं जातं यावर   अजिबात आक्षेप नाही, पण  त्याच सोबत, युध्दात देशासाठी जीव दिलेल्या त्या शिपायाच्या /अधिकाऱ्याच्या घरच्या लोकांसाठी जेवढं खेळाडूंसाठी केलं जातं त्यापेक्षा कांकणभर जास्तच करावं एवढीच इच्छा .

पतीच्या देशकार्यासाठी झालेल्या मृत्यूमुळे आधीच हवालदिल झालेल्या विधवांना मिळणारे तुटपुंजे पेन्शन आणि थोडाफार प्रॉव्हिडंट फंडाचा पैसा इतकेच काय ते इनकम.हे असे फ्लॅट्स वगैरे  त्यांच्यासाठी म्हणून बनवायचे, नंतर मग अर्थातच  त्यांना परवडत नाही  किंवा त्याना हे फ्लॅट्स घेण्यात  काही इंटरेस्ट नाही, म्हणून तेच फ्लॅट्स आपल्या आणि आपल्या नातेवाईकांना अगदी  नगण्य भावात द्यायचे अशी मोडस ऑपरेंडी. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे मुख्य मंत्र्याने दिलेला राजीनामा स्वीकारला, म्हणजे आता तो त्या पापातून मुक्त झाला असा प्रचार राजकीय दृष्ट्या केला जातो.

या नेत्यांबरोबर इतर १६ जे मिलिटरीचे लोकं ज्यांनी कारगिलच्या  युद्धात भाग घेतला नव्हता, पण तरीही इथले फ्लॅट्स पदरात पाडून घेतले होते, त्यांचे वागणे पण खरंच अशोभनीय आहे, त्यांचे ही कोर्टमार्शल करून चौकशी करायला हवी.

जर असे फ्लॅट्स द्या्यचे असतीलच म्हणजे जर शासनाची खरंच फ्लॅट्स द्यायची इच्छा असेल तर  सामाजिक जबाबदारी म्हणून किंवा त्या शहीदांना श्रद्धांजली म्हणून   एकही पैसा न घेता हे फ्लॅट्स त्या विधवांना देऊन टाकावे. जर हवे असतील तर त्या ते ठेवतील, नाहीतर बाजार भावाने विकून टाकतील.एवढेच नाही तर  या शिवाय त्यांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणारे व्यवसाय जसे पेट्रोल पंप वगैरे अलॉट करणे  जास्त योग्य ठरेल .

जरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, तरी या कारगिलच्या हुतात्म्यांच्या टाळू वरचे लोणी खाणाऱ्या या सगळ्या मिलिटरी अधिकाऱ्यांना, आणि नेत्यांना भारतीय जनता कधीच माफ करू शकणार नाही.आजच्या पेपरला वाचले की ते फ्लॅट पाडण्यासाठी नोटीस दिलेली आहे, जर सरकारला खरंच आपण केले्ल्या चुकीचे परिमार्जन करायचे असेल तर पुन्हा एकदा लिहीतो की  ते   पाडण्या ऐवजी  कारगिलच्या विधवांना विनामुल्य देऊन टाकावे.