प्लास्टीनेशन

Written by  on April 15, 2009
स्त्री आणि गर्भातले मुल प्लास्टीनेशन केलेले

स्त्री आणि गर्भातले मुल प्लास्टीनेशन केलेले

आपले हे शरीर सुंदर दिसावे म्हणून र आपण आयुष्यभर प्रयत्न करतो . फेअर ऍंड लव्हली, गोरं होण्याचं क्रिम , लांब केस होण्यासाठी निरनिराळे शांपु, थोडं लठठ वाटायला लागलो, की जिम मध्ये जाणे, फिरायला जाणे  मॅजिक पोशन म्हणजे वजन कमी करण्याचा दावा करणाऱ्या त्या पावडरी  घेणे वगैरे…. अगदी काहीही  करून पहाण्याची आपली तयारी असते.   शरीरा वरचे आपले  प्रेम काही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कमी होत नाही. जो पर्यंत जिवंत आहोत, तो पर्यंत तरी हे  रहाटगाडगे सुरुच असते.

आपल्या मृत्यु नंतर या शरीराचे काय? आयुष्यभर ज्या शरीरावर एवढं प्रेम केलं ते असंच जाळून टाकायचं? काही सेन्सेटिव्ह लोकं  ज्यांना सामाजिक जाणीव आहे ते, म्रुत्यु नंतर शरीर जाळण्यापूर्वी  डोळे, स्किन वगैरे गोष्टी दान करण्या बद्दल  इच्छा पत्रात लिहून ठेवतात, माझ्या माहितीतल्या एकाने तर आपले शरीर मेडिकल कॉलेज मधे मुलांना शिकण्यासाठी , डिसेक्शन साठी दान केल्याचे माहिती आहे.गांधीजींनी की नेहरुंनी ते निटसे आठवत नाही, पण आपल्या शरीराची राख सगळ्या भारत देशात विमानातून शिंपडावी अशी इच्छा लिहून ठेवली होती. प्रत्येकाची वेगळी आयडीया असते…

प्लास्टिनेशन नंतर तारा वगैरे वापरून शेवटचे टचेस देताना. या नंतर फक्त सुकवणे ही प्रक्रिया शिल्लक रहाते.

प्लास्टिनेशन नंतर तारा वगैरे वापरून शेवटचे टचेस देताना. या नंतर फक्त सुकवणे ही प्रक्रिया शिल्लक रहाते.

पार्शी लोकांच्या मते मृत शरीर हे अपवित्र, तेंव्हा ते जमीनिवर न ठेवता, हवेत ठेवले जाते, आणि पक्षांनी खाऊन शेवटी हाडं उरली, की चुन्यात विरघळवली जातात.

हे सगळं आठवायचं कारण काय? अहो जगात मृत्यु नंतर आपल्या शरीराचे काय करायचे ह्या बद्दल या  बद्दल काही लोकांच्या भन्नाट आयडीया असतात. काही अती श्रीमंत लोकं -जसे वाल्ट डिस्ने  ह्यांनी भविष्यात कधी तरी मृत व्यक्तीला जिवंत करण्याच्या टेक्नॉलॉजी शोधली जाईल, तेंव्हा आपले शरीर   शरीर पुन्हा जिवंत होण्यासाठी उपलब्ध असावे म्हणून  लिक्विड नायट्रोजन मधे प्रिझर्व करून ठेवावे असे लिहून ठेवले होते. या प्रकाराला क्रायोजेनिक प्रिझर्वेशन म्हणतात.एक कंपनी आहे, लाईफ एक्स्टेन्शन फाउंडेशन नावाची, ती हे काम करते.   alcor.org  नावाची बेव साईट पण अहे त्यांची. तुम्ही जिवंत असतांना त्या कंपनी बरोबर करार करायचा ,की मग ती कंपनी  तुमच्या मृत्युनंतर ताबडतोब तुमचे शरीर ताब्यात घेऊन  प्रिझर्व करून ठेवते- भविष्यात कधी तरी पुन्हा जिवंत करण्याचा शोध लागे पर्यंत….  🙂

असे म्हणतात, की आफ्रिकेत तर एका जमातीत मृत व्यक्तीला खाण्याची पद्धत आहे. म्हणजे ती व्यक्ती म्हणे आपल्यात सामावून जाईल अशी भावना.

स्वतःची स्किन हातात घेऊन उभा असलेला माणूस

स्वतःची स्किन हातात घेऊन उभा असलेला माणूस

अशा असंख्य गोष्टी आजपर्यंत वाचनात आल्या होत्या, पण मृत शरीर हे आर्ट फॉम मधे बदलण्याची आयडीया कशी वाटते? शरीरातले मसल्स , नर्व्हस वगैरे गोष्टींवर प्लास्टीनेशन ची प्रक्रिया करून त्या शरीराला  पोझ  मधे सेट  केले जाते.

आता हे प्लास्टीनेशन म्हणजे नेमकं काय?  मेडीकल सायन्स मधे पॉलिमर्स मधे  बॉडी पार्ट सॅंपल्स  प्रिझर्व केले जातात. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तिचा ट्युमर   काढला आणि टेस्ट केला, पण  पुढे भविष्यातही कधी तरी पुन्हा टेस्ट करायचे काम पडले, तर तो व्यवस्थित रहावा, सडू नये म्हणून  त्याचा एक तुकडा पॉलिमर मधे सेट केला जातो.जेंव्हा पुढे कधी  टेस्ट करायचे काम पडले तर  वरचे पॉलिमर तोडून आतला तो तुकडा पुन्हा टेस्टींग साठी काढायचा आणि हव्या त्या टेस्ट्स करायचा . ही इतकी साधी प्रोसिजर पण लवकरच आर्ट फॉर्म मधे बदलणार आहे हे कोणी सांगितले असते तर त्याला वेड्यातच काढले गेले असते.

१९७७ साली  गुंथर व्हॉन हॅग हा एका लॅब मध्ये  ऍनाटोमी असिस्टंट म्हणून काम करत होता. तिथे त्याने असेच पॉलिमर मधे सेट केलेले शरीराचे सॅंपल्स पाहिले, ते पाहिल्यावर त्याला असे वाटले की जर पॉलिमर एखाद्या भागाचे प्रोटेक्शन वरून ओतल्यावर करू शकते, तर समजा तेच पॉलिमर   त्या पार्टच्या आत इंजेक्ट केले तर?? आणि त्याला लवकरच ह्यात यश मिळाले , आणि या प्रक्रियेचे पेटंटही मिळाले.

ही प्रोसिजर नेमकी काय आहे ?   व्हॅक्युम मधे  ज्या भागाचे प्लास्टीनेशन करायचे आहे तो भाग ठेवतात – सिलिकॉन , आणि इतर पॉलिमर्स च्या  लिव्किड मधे. व्हॅक्युम मुळे त्या भागातली हवा निघून जाते आणि त्या जागी पॉलिमर्स शिरतात.  प्लास्टीनेशन केल्यावर शरीरातले सगळे बॅक्टेरिया मरतात, आणि मग शरीराची सडण्याची प्रक्रिया थांबते.

सेक्स पोझिशन . अशा अनेक प्रकारच्या पोझेस आहेत

सेक्स पोझिशन . अशा अनेक प्रकारच्या पोझेस आहेत

ही प्रोसिजर पाच भागात विभागली आहे. सर्वप्रथम जेंव्हा एखादे शरीर  येते, तेंव्हा त्याची सडण्याची प्रक्रिया थांबावी म्हणून  ते सर्वप्रथम फॉर्मल्डीहाईड मधे ठेवले जाते, आणी त्या शरीराचे हवे तसे डिसेक्शन केले जाते. एकदा मनासारखे डिसेक्शन झाले, की  त्या शरीराला  ऍसिटोन  बाथ देऊन स्वच्छ करतात आणि  नंतर सिलिकॉन रबर, एपॉक्सी रेझीन आणि पॉलिमर्स च्या  बाथ मधे आळीपाळीने ठेवले जाते.  हे सगळे करतांना व्हॅक्युम चेंबर वापरतात, ज्यामुळे हवा निघून जाऊन त्या ठिकाणी पॉलिमर्स पोहोचतात्त, आणी डिकम्पोझिशनची प्रक्रिया थांबते.

एवढे झाले की शेवटचे फिनिशींगचे काम सुरु होते. तारा, ठोकळे वगैरे वापरून  हव्या त्या पोझिशन मधे शरीर सेट केले जाते. हे काम फारच काळजीपूर्वक करावे लागते, कारण ही प्रोसेस रिव्हर्सेबल नाही. एकदा हवी ती पोझिशन सेट केली, मग तो पॉलिमर म हिट, लाईट किंवा हवा वापरून  कडक (हार्डन्ड) केले जाते . इथे हे सगळे केवळ दोन पॅरिग्राफ मधे लिहिले आहे, पण प्रत्यक्षात मात्र एका शरीराचे प्लास्टीनेशन करण्यासाठी कमीत कमी १५०० तास  आणि एक वर्ष लागते.

images (2)ह्या प्लास्टीनेशन केलेल्या  शरीरांचे नंतर म्युझियम मधे ठेऊन प्रदर्शन मांडले जाते. हे प्रदर्शन जग भर फिरतय गेली काही वर्ष. आजपर्यंत म्हणेज चाळीस मिलियन्स लोकांनी हे प्रदर्शन युरोप आणि अमेरिकेत पाहिलेले आहे, पण भारतात तरी अजून पर्यंत आलेले नाही.

प्लास्टीनेशन मधे  आज पर्यंत शेकडॊ प्रकारे शरीराची रचना केलेली  आहे. फुटबॉल, बेसबॉल खेळणारा ऍथलेट , चेस खेळणारा खेळाडू,  घोड्यावर बसलेल्या अवस्थेतल्या योध्या पासून तर गर्भात असलेल्या मुला सकट त्याच्या आईचे केलेले प्लास्टीनेशन तर आहेच पण सोबतच बऱ्याच प्राण्यांचे, पक्षांचे वगैरे पण केलेले प्लास्टीनेशन आहे .

यातल्या काही रचना जसे एक स्त्री आणी  गर्भाशयात असलेल्या मुलाचे केलेले प्लास्टीनेशन   , किंवा संभोग रत असलेली  स्त्री पुरुष   यांच्याबद्दल बरेच उलट सुलट वाद विवाद घडले आहेत. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हे असे करणे म्हणजे मृत शरीराचे धिंडवडे काढणे आहे, तर काही लोकांच्या मते हा एक  एक आर्ट चा  उत्कृष्ट प्रकार आहे.  तसेच आर्ट व्यतिरिक्त या म्युझियमचा उपयोग मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ऍनाटॉमी समजण्यासाठी पण होतो —  इथे त्या मुझियमचा एक व्हिडीओ पोस्ट करतोय ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.youtube.com/watch?v=0jZM4wDODB0), तुम्हीच बघून ठरवा की आर्ट आहे की  नाही ते..

एक बाकी खरं, जर कधी भारतात हे प्रदर्शन आले, तर मी मात्र नक्की पहाणार .

एका लग्नाची दुसरी गोष्ट

Written by  on April 15, 2009

चांगल्या मराठी मालिकांची कमतरता आहे हे कोणीही मान्य करेल, आणि म्हणूनच लोकं टोरंट वरून डाउनलोड करून इंग्रजी मालिका पहातात.हल्ली मराठी   मालिकेमधून जे काही   दाखवले जाते   त्याच्या जाहिराती मधे एकमेकांच्या कानाखाली खाड कन आवाज करणारी  पात्रं नेहेमीच दाखवली जातात. त्यामुळे बऱ्याच लोकांनी  मराठी चॅनल्स पहाणे पण बंद केले होते- मी पण त्यातलाच! अर्थात एमएम जीजी (म्युझिक मस्ती गप्पा गाणी) हा अपवाद.

काही महिन्यापूर्वी पार्ल्याला मॅजेस्टीक गप्पांचा कार्यक्रम झाला , त्या मधे  एका लग्नाची दुसरी गोष्ट चे डायरेक्टर   राजवाडे पण आले होते.त्यांची झी टीव्ही वरची कुठली तरी एक मालिका नुकतीच संपली होती. ( मी टॊरंट वाला असल्याने शक्यतो मराठी मालिकांच्या वाटेला जात नाही.) तिथे त्यांनी मान्य पण केलं की जी चूक असंभव मधे झाली, ती आता पुन्हा होऊ देणार नाही, आणि ही जी नवीन मालिका आम्ही सुरु करित आहोत, ती आम्ही बरोबर १२०-३० भागात संपवु. राजवाडेंच्या या आश्वासनावर विश्वास ठेऊन ही मालिका पहाणे सुरु केले. तशीही सौ. मुक्ता बर्वेची फॅन असल्यामूळे तिची मालिका पहाणारच ही काळ्या दगडावरची रेष !

सुरुवात तर अगदी उत्कंठापूर्ण केली होती या मालिकेची. घना- राधा ही दोन्ही पात्रं एकदम त्यांच्या रोलसाठी बिलकुल पर्फेक्ट  म्हणायला हवी. “आमचं वेगळंच आहे” म्हणत सुरुवात झालेली मालिका सुरुवातीला तर खूप मनात भरली होती, अगदी मी  स्वतः मराठी मालिका न पहाणारा पण आवर्जून ठराविक वेळेला  टिव्ही समोर बसायला तयार व्हायचो. काही दिवस बरं चाललं होतं .

लवकरच मूळ कथानकाला फाटे फुटणं सुरु झालं, एक नवीन व्यक्तीरेखा या सिरियल मधे आली, तो कोण असेल बरं ? हा सस्पेन्स फारच थोडे दिवस  टिकला, ( प्रेक्षक पण लै हुश्शार, त्यांनी पण आधिच ओळखलं होतं की आजी का बरं पुण्याला गेल्या ते !) पण नंतर लवकरच तो सस्पेन्स  संपला ऑफिशिअली संपवला गेला, आणि सिरियल ने राम म्हणायला सुरुवात केली.

खरं तर तेंव्हाच ही सिरियल संपायला हवी होती, पण टीआरपी च्या जोरावर, उगाच खेचायची म्हणून काहीही दाखवणे सुरु केले . एकदम फालतू जाहीराती (आइस्क्रिम, हेअर डाय वगैरे) कथानकात घुसडून  आपण पै्शा साठी आपल्या व्यवसायाशी पण प्रामाणिक राहू शकत नाही,  हे दाखवून दिल्या गेले.   बौद्धिक दिवाळखोरी लेखक दिग्दर्शकाने जाहीर करण्याचा प्रयत्न  म्हणायचा का ह्याला?? कारण, इतका मूर्खपणा कधीच पाहिला नव्हता, पैशासाठी काही पण हेच एक ब्रिद वाक्य  असावे प्रोड्युसर डायरेक्टरचे.

तसं म्हटलं, तर या सिरियल मधे स्पृहा जोशी ला पहाणं हा सुरुवातीला निर्भेळ आनंद होता, पण काही दिवसानंतर म्हणजे गेला महिनाभर,   तिचा अभिनय  पण भोळसट पणा पेक्षा ……असो! तसेच विनय आपटे, मोहन जोशी, आसावरी जोशी वगैरे सगळ्यांचीच कामं आपापल्या जागी ठिक आहेत, फक्त वाढवलेल्या एपीसोड मुळे  सगळेच जण थोडे डोक्यात जायला लागले होते.

इतकं जरी झालं, तरीही या सिरियलने सुरुवातीच्या काळात चांगली करमणूक केली हे मात्र नाकारता येत नाही. मुक्ता  एक गुणी अभिनेत्री आहे यात संशयच नाही, आणि तिनेही नेहेमीप्रमाणेच छानच अभिनय केलेला आहे, पण गेल्या काही दिवसापासून तिचा अभिनय पण फारच प्रेडिक्टेबल होत चाललाय.

कालचा एपीसोड म्हणजे लेखक दिग्दर्शकाच्या मानसिक गोंधळाचा अत्युच्च बिंदू होता. ह्या सिरियलचा मुख्य मुद्दा असा की घना ला अमेरिकेला जायचं आहे, त्या साठी तो काहीही करू शकतो. कालच्या एपीसोड मधे तर त्याने अमेरिकेला जाण्यासाठी घटस्फोट घेणार आहे हे पण आपल्या बॉस ला सांगितले. म्हणजे या बिंदूवर त्या राधापेक्षा अमेरिका महत्त्वाची वाटत होती. पण दुसऱ्याच क्षणी जेंव्हा बॉस म्हणतो, की तुला इथेच म्हणजे भारतात पॅकेज दिलं तर?? आणि दुसऱ्याच क्षणी तो पटकन तयार होतो.. मला वाटतं लेखक दिग्दर्शकाला शेवट नीट करता आलेला नाही. सगळं कसं कन्फ्युजन आहे.ज्या गोष्टीवर दिडशे भागाचे कथानक  बेतले होते, ती गोष्ट एकदम कचराकुंडी मधे टाकून दिली. घना पण बॉस समोर शेवटी हात जोडून ज्या पद्धतीने दररोज माझी बायको बिरड्याची उसळ करून खाऊ घालीन म्हणाला, ते पाहून खरंच कीव आली बिचाऱ्या राजवाड्यांच्या कल्पना शक्तीची.  त्यांचीच पात्रं त्यांना नीट समजली नाही असे दिसते.

या कथेमधली सगळी पात्रं अगदी घरच्या सारखी वाटायला लागली होती- श्रीयुत गंगाधर टिपरे या सिरियल प्रमाणे.  पण दुर्दैवाने जी उंची गंगाधर टिपरे या सिरियलने गाठली होती, ती या सिरियलला गाठता आली नाही.प्रेक्षकाला मायबाप म्हणण्याची बालगंधर्वांची परंपरा होती, ती कधीच मोडीत काढल्या गेलेली आहे, आणि प्रोड्य़ुसर डायरेक्टर ने प्रेक्षकांना  गृहीत धरणे   सुरु केले आहे.

महागाई

Written by  on April 11, 2009

पेपर मधली बातमी वाचली ३० वर्षाच्या तरूणाने आपल्या २८ वर्षाच्या पत्नी बरोबर आत्महत्या केली. दोनच दिवसा पूर्वी वाचलं होतं की एका ६५ वर्षाच्या वृद्धानी पण अशीच महागाईला कंटाळून आत्महत्या केली . त्यांनी लिहून ठेवलं होतं, की ” माझ्या मृत्युला सरकार जबाबदार आहे”  . जीव दिला, सरकारवर जबाबदारी पण टाकली, पण त्याने काय झालं? पेपर मधे मधल्या पानावर एक चौकट छापून आली!! बस्स!

काही दिवसांपूर्वी एक ९ वर्षाच्या लहान मुलीच्या आत्महत्येची बातमी पण वाचण्य़ात आली होती. आपल्या मृत्युनंतर आपली किडनी वडीलांना आणि डोळे भावाला लावण्य़ात यावे अशी इच्छा तिने लिहून ठेवली होती. घरातली गरिबीची परिस्थिती- पैसा अजिबात नाही  .वडिलांची किडनी खराब झालेली, तर भावाचे डोळे गेलेले.  आपल्या मृत्यु मुळे वडिलांना किडनी आणि भावाला डोळे मिळतील , आणि सगळेच प्रॉब्लेम्स आपोआप सुटतील  असे तिला वाटले, म्हणून तिने आत्महत्या केली होती.

विदर्भातले शेतकरी नेहेमीच आत्महत्या करतात. त्याची आता मिडीयाला इतकी सवय झालेली आहे की , त्याचे ’बातमी मुल्य’  शुन्य झाले आहे, आणि पेपर मधे त्याचा साधा उल्लेख पण नसतो. आज पर्यंत केवळ खेड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये असलेला हा आत्महत्या करण्याचा मानसिक रोग हल्ली शहरातल्या लोकांमध्येही पसरला आहे.आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.दोन उच्चवर्गीय स्त्रियांनी (त्यातली  एक चार्टर्ड अकाउंटंट) आपल्या रहात्या बिल्डींगच्या वरच्या मजल्यावरून, मुलासहीत  उडी मारून केलेली आत्महत्या पण उगाच मनाला चटका देऊन गेली.

ह्या सगळ्या आत्महत्यांच्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे महागाई!  महागाई वाढली म्हणून आपण हल्ली सगळेच ओरडा करत असतो. घराच्या काढलेल्या लोनचा वाढलेला हप्ता, पेट्रोल, कुकिंग गॅसचे वाढलेले भाव, भाजी-किराणा सामानाचे भाव- ह्या महागाईची झळ सगळ्यांनाच बसलेली आहे.पगार जरी वाढला तरी खर्च मात्र  त्या पेक्षा जास्त  प्रमाणात वाढल्याने सगळा मेळ बसवणे एकदम अवघड होऊन बसले आहे.

बाजारात मिळणारी प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे, आणि त्याची कारणं पण जागतीक , राष्ट्रीय किंवा प्रादेशिक असतात असतात असे म्हटले जाते. त्यावर आपला काहीच कंट्रोल नाही.  अमेरिकेचे  क्रेडीट रेटींग कमी झाले म्हणून आपला शेअर बाजार क्रॅश होणार, चांदी, सोन्याचे भाव एकदम वेड्यासारखे वाढणार. असो .

महागाई  वाढलेली असतांना हल्ली मुंबई आणि इतर शहरातही जागांचे भाव एकदम वर चढले आहेत. उपनगरातही एक लहानसा फ्लॅट घ्यायचा म्हटलं, तरीही ८० लाखा पासून तर कोटी रुपयांपर्यंत  भाव झाले आहेत.गेल्या वर्षभरापासून  भाव कमी होतील म्हणून ऐकतोय , पण बिल्डरलॉबी कडे असलेल्या पैशांमुळे  त्यांनी नेट  लावून जागांचे भाव वरच्या पातळीवर मेंटेन केलेले आहेत. थोडक्यात मध्यमवर्गीयांच्या हाताबाहेर गेले आहे घरं बांधणं.

पूर्वी पेट्रॊल टॅंक फुल केल्यावर १५०० रु. द्यावे लागायचे ते हल्ली २१०० पर्यंत द्यावे लागतात. तूर डाळीचे भाव काही महिन्यापूर्वी ४० रुपयांपासून एकदम ८० ते १०० पर्यंत गेले होते, ते अजूनही ७० च्या आसपास आहेत, मध्यंतरी कांद्याचे भाव पण असेच १०० रुपया  पर्यंत पोहोचले होते.

महागाई वाढली आहे म्हणून आपण सरकारने काही तरी केलं पाहिजे म्हणून म्हणत असतो, ते सरकारचं काम आहे यात संशय नाही, पण  केवळ सरकारला दोष देऊन गप्प बसण्यापेक्षा , त्याच सोबत आपण स्वतः काय करु शकतो हे पण पहायला हवे.

एक गोष्ट लक्षात आली  ती म्हणजे  बजेट!! खर्चाचं बजेट बनवून खर्च करणं हल्ली एकदम बंद झालंय. पूर्वी महिन्याच्या एक तारखेला रेडीओ वर गाणं लागायचं, खुश है जमाना आज पहली तारीख है.. कारण याच दिवशी लोकांचे पगार व्हायचे, आणि महिन्याच्या खर्चाचे बजेट बनवले जायचे. वाण्याकडले सामान, दूधवाला, शाळांची फी इत्यादी सगळे खर्च नीट लिहून त्या प्रमाणे केले जात असत. कशावर किती खर्च करायचा याचा विचार केला जात असे. गृहीणी खर्चाची बॅलन्स शिट तयार करत असे. हे केल्यावर कितीही कमी पगार असला, तरीही काही पैसा हा बाजूला शिल्लक पडलाच पाहिजे  या कडे गृहीणीचा कल असायचा. आजकाल ते बंद झालंय. कुठलाही विचार न करता, जसा वाटेल तसा , आपल्या खिशाचा विचार न करता खर्च करणे सुरु केले आहे आपण.

मी स्वतः मागच्या महीन्यात एक प्रयोग केला. महिनाभर सगळा  हिशोब लिहिल्यावर बऱ्याच गोष्टींसाठी विनाकारण केलेला खर्च माझ्या लक्षात आला. जो खर्च टाळता आला असता तो पण मी टाळला नाही असा! एकट्याला ऑफिसला जातांना कारने जाण्यात काय फायदा? विनाकारण तिनशे रुपये रोजचे खर्च करायचे ?  महिन्यात मी  मी सहा- सात  वेळा तरी कारने  ऑफिसला गेलो होतो  . म्हणजे १८०० रुपये पेट्रोल खर्च  झाला   ,तो वाचवता आला  असता. लाईटचे बिल हे महिन्याला साधारण  ३५० युनिट्स चं येतं, ते जर खोलीत कोणी नसतांना लाईट – पंखे बंद केले तर २५०  युनिट्स पर्यंत येतं हे पण अनुभवलं (मग बाबा हल्ली किती कटकट करातात, या अशा डायलॉग कडे दुर्लक्ष करावे लागतेच). बेस्ट ने विजेचा प्रती  युनिट  रेट्स वाढवले म्हणून ओरडा करण्यापेक्षा ( कारण फायदा काहीच नाही त्याचा ) विजेचा थोडा योग्य वापर   केला तरीही खर्च आटोक्यात ठेवला जाऊ शकतो हे लक्षात आलं.

भाजी आणायला गेल्यावर एकाच दुकानासमोर उभा राहून  दुकानदाराच्या हाता पिशवी देऊन, भाव न विचारता सगळ्या भाज्या न घेता , चार दुकानं हिंडून भाव करून भाजी घेतल्यावर जवळपास ३० टक्के तरी नक्कीच पैसे वाचले.

पूर्वी फक्त एक लॅंडलाइन फोन असायचा तो हल्ली प्रत्येकाच्या घरी चार पाच तरी मोबाईल असतात. फोनवर कामापुरतं बोललं तरीही  खर्च पण कमी केला जाउ शकतो. शिळोप्याच्या गप्पा मारायला फोन वापरणं बंद केलं. ऑफिस मधे बसलो असतानाही केवळ नंबर डायल करायचा कंटाळा येतो, म्हणून सेल वरून डायरेक्ट फोन करायचो ते फक्त बंद केले, मी आणि चक्क बिल  जे महिन्याला २१००- २५००  पर्यंत यायचे ते १६०० पर्यंत आलं.

प्लास्टीक मनी ( क्रेडीट कार्ड ) आल्यापासून जेंव्हा काही विकत घ्यायची इच्छा होते, तेंव्हा आपण ते विकत घेतो- पैसे खिशात नसले तरीही.  “ऋणं कृत्वा, धृतं पिबेत”, असं एक चार्वाक चं वाक्य आहे. त्याप्रमाणे आपण सगळे वागतो असे मला वाटते.खीशात  पैसे नसतांना पण आपल्याला काही कमी नाही, असा आव आणून कर्ज काढून ( क्रेडीट कार्ड ने )  खर्च करणे बंद केले तरीही बरीच बचत होऊ शकेल. ज्याच्या अंगावर कर्ज नाही, जो असलेल्या पैशात सुखाने चटणी भाकरी खाऊन  (शब्दशः अर्थ घेउ नये) दिवस काढू शकतो तो सगळ्यात जास्त सुखी असे मला वाटते.

एक लहानशी गम्मत, तुमच्या खिशातल्या पाकिटात किती पैसे आहेत असे विचारले तर मला वाटत नाही की तुम्ही सांगू शकाल ?  ,मला वाटत नाही. मी स्वतः पण सांगू शकणार नाही. खिशातली एखादी शंभराची नोट जरी काढून घेतली बायकोने तरीही लक्षात येत नाही . याचं कारण आपण पैशाची किंमत विसरलो आहे .जेंव्हा आपल्याला पैशाची किंमत लक्षात येईल, तेंव्हाच  त्याचा योग्य वापर करणे शक्य होईल.

बाहेर जेवायला जाणे हे आजकाल नेहेमीचंच झालं आहे. कधी बायकोला कंटाळा आला म्हणून तर कधी मुलांना काहीतरी खायचं आहे म्ह्णणून. दर महिन्याला जर हॉटेलिंगचा खर्च मुंबईला जर ३-४ वेळा गेलं, तर २ ते ३ हजार पर्यंत होतो ( व्हेज हॉटेल असेल तर )  तर तो नक्कीच कमी केला जाऊ शकतो, पण आपले खर्च तसेच ठेवायचे,   आणि मग महागाईला दुषणं द्यायची- असे आपण करतो.  वर दिलेली उदाहरणं फक्त  एक केस स्टडी  म्हणून दिलेली आहेत. या व्यतिरिक्त  अनेक गोष्टी आहेत ज्यांचा व्यवस्थित वापर केला तर खर्चावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं.

आपण सरकारला पण दोष देतो- कारण ते सोपं आहे म्हणून!  पण हे असं करण्यापेक्षा थोडा आपला माईंड सेट बदलला तर जगणं एकदम सोपं होईल.  खर्चावर नियंत्रण ठेवा असे  माझे  म्हणणे नाही, पण जो  खर्च अनावश्यक आहे तो जरी  टाळला तरीही पुरेसे आहे.

काही लोकं जे खूप आशावादी आहेत ते म्हणतील , की तुम्ही आपलं महिन्याचं इनकम वाढवा, म्हणजे महागाईचा परिणाम होणार नाही तुमच्यावर. ते जरी खरं असलं, तरीही सहज शक्य नाही. आपल्या हातात जे   आहे ते  म्हणजे अनावश्यक खर्च टाळणं , एवढं जरी केलं तरीही  महागाईला सामोरा जाता येईल आणि आयुष्य सुसह्य होईल, आणि आत्महत्या करण्या सारखे  विचार मनात येणार नाहीत.

प्लास्टीनेशन

Written by  on April 6, 2009