‘एनजीओ’- पैशांचा खेळ..

Written by  on December 9, 2008

सामाजिक बांधिलकीची जाणिव आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही कुठल्यातरी कारणाशी ( कॉज शी) स्वतःला जोडून घेत असता. कधी लहान मुलांच्या शिक्षणाची काळजी वाहणाऱ्या  , कधी पिडीत महिलांसाठी काम करणाऱ्या , किंवा कधी वृध्दांसाठी काम करणारे, कधी पर्यावरणाची काळजी करणाऱ्या एनजीओ ला तुम्ही नेहेमी पैसे वगैरे देत असता? थांबा…..!!!!

कारण एनजीओ चा आजकाल एक धंदा झालेला आहे.एनजीओ च्या नावाने पैसा गोळा करुन  बऱ्याच एनजीओ नक्षलवादी संघटनांना    फंड पुरवण्याचे  काम  करीत आहेत , एवढंच नाही तर काही अतिरेकी संघटनांना पण  याच प्रकारे पैसा पुरवला जात आहे.

एखादी एनजीओ तयार करुन इंडस्ट्रीजला ब्लॅक मेल करणे, पब्लिक लिटीगेशन मधे केसेस दाखल करण्याची धमकी देउन पैसे उकळणे अशा अनेक तक्रारी आहेत काही एनजीओ विरुद्ध. मला तर वाटतं की केवळ याच साठी एनजीओज तयार केलेल्या आहेत काही  व्हाईट कॉलर गुंडांनी.

हे लक्षात आलं म्हणून सरकारने बिहार, बंगाल, आंध्रा, उत्तरपुर्व भागामधे बऱ्याच एनजीओ वर बंदी घालण्यात आलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर ८३३  ^(http://rangmarathiche.com/goto/http://timesofindia.indiatimes.com/india/833-NGOs-blacklisted-for-misappropriation-of-funds-CAPART/articleshow/5357926.cms)व्हॉलेटरी एनजीओंना  निरनिराळ्या कारणांसाठी काळ्या  यादीत ( ब्लॅक लिस्ट)  टाकण्यात आले  आहे  यामधे पैशाचा हिशोब नीट न ठेवणं  या पासुन तर  नक्षलवादी कारवायांना पैसा पुरवणे असे गंभीर आरोप आहेत.

मनी लॉंड्रींग हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आज तुम्ही बघाल, बऱ्याच  गेम शो मधे ( टीव्ही वरच्या ) सिनेमात काम करणारे ऍक्टर्स दिसतात. तिथे ते हमखास काहीतरी पैसे जिंकतात,  (पांचवी पास से तेज है??, दस का दम, केबीसी असे अनेक उदाहरणं देता येतील). तो गेम शो संपला आणि शेवटी जिंकलेले  पैसे आपल्याच कुठल्यातरी एनजीओ ला दान करतात. कधी तुमच्या मनात संशय आलाय कां? की ह्या प्रत्येक सिनेमाच्या हिरो, हिरोइनला स्वतःची एनजीओ असावी असे का वाटते? एखाद्या अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या एखाद्या एनजीओ ला हे लोकं पैसे का देत नाहीत?

आधी मला पण फार कौतुक वाटायचं ह्या हिरो, हिरोइन्स च्या सामाजिक बांधिलकीची असलेली जाणिव बघुन. पण जेंव्हा अजुन थोडं वाचलं, तेंव्हा  ह्या मागचं कारण लक्षात आलं. मनी लॉंड्रींग साठी एनजीओ चा वापर भारतामधे फार पुर्वी पासून चालत आलेला आहे. राजकीय नेते, इतर प्रतिष्ठित व्यक्ती आपला पैसा इथेच लावून ………..असो.. तर अशा अनेक घटना निदर्शनास आल्यावर सरकारने ही काळी यादी जाहीर केलेली आहे.

अगदी आत्ता आत्ता पर्यंत म्हणजे नोव्हेंबर २००९ पर्यंत कुठल्याही एनजीओ ला  आपल्याला मिळालेल्या पैशांचा स्त्रोत /खर्च सांगणे आवश्यक नव्हते – खरं वाटत नाही??? मला पण खरं वाटत नव्हतं.  पण आता  ( नोव्हेंबर २००९ नंतर -)सेक्शन २५, इंडीयन कंपनी ऍक्ट १९५६ च्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्या संस्थांना या पुढे आपल्या पैशाचा स्त्रोत सांगावा लागेल. तसेच पैसे कुठे खर्च झाले ते पण सांगावं लागेल. तशी या कायद्याला दुरुस्ती परिपत्रक नोव्हेंबर २००९ मधे लागू करण्यात येणार होते, त्याचं पुढे काय झालं ते माहिती नाही.

आता पर्यंत कसं होतं  पैशाचं  हस्तांतरण ते बघू या…. एनजीओला १ लाख  रुपये द्या,
त्यावर ५० टक्के  टॅक्स चा फायदा मिळवा कलम ८० जी च्या अंतर्गत.
किंवा १०० टक्के टॅक्स बेनिफिट मिळवा कलम  ३५ ( एसी) ८० जी जी ए च्या अंतर्गत

अशा तर्हेने दान  दिलेल्या पैशांवर   टॅक्स बेनिफिट मिळवायचा. ५० ते ‘१०० टक्के टॅक्स वाचवायचा, आणि एनजीओ कडुन कॅश पैसे परत घ्यायचे.  जर एक लाख दिले, तर त्यातले त्या एनजीने आधी पासून ठरवलेली काही रक्कम ठेवून घ्यायची, आणि उरलेली  कॅश परत घ्यायची.. म्हणजे काळा पैसा पण तयार होतो. मजा आहे नां? शंभर टक्के टॅक्स चा फायदा, आणि सोबत काळा पैसा पण  खर्चायला.

जर यात एनजीओ ला जो पैसा जातोय तो पण वाचवायचा असेल तर स्वतःचीच एक एनजीओ काढायची म्हणजे दान देणारे पण तुम्हीच आणि घेणारे पण तुम्हीच.

काय झालं? आश्चर्य वाटतंय?? मला पण वाटलं आश्चर्य हे वाचल्यावर. डोकं चक्राउन गेलं हे वाचल्यावर. अजूनही बऱ्याच खेळी आहेत या मधे. बऱ्याच साधू महंत  लोकांच्या एनजीओ पण हे काम करतात.

इतकी वर्ष इमानेइतबारे इनकम टॅक्स न भरता, एखाद्या एनजीओला हाताशी धरुन टॅक्स वाचवता आला असता . 🙂    गमतीचा भाग सोडून द्या, पण किती सहजपणे काळे पैसे गोरे करता येतात , आणि सोबतंच काळे पैसे पण हातात रहातात ते बघा !

मी एकॉनॉमिस्ट नाही, पण मला जेवढं लक्षात आलं तेवढं लिहिलंय या खेळाबद्दल, तुम्हाला अजुन काही माहिती असेल तर जरुर कॉमेंट्स मधे लिहा. थोडं घाई घाईत लिहिलंय पोस्ट… चुक असेल तर अवश्य दुरुस्त करा  कॉमेंट्स मधे. 🙂

मुकेश-अनिल-गॅस वॉर

Written by  on December 7, 2008

या लोकांच्या बद्दल बातमी वाचली की मला त्या गुरु सिनेमातला एक डायलॉग आठवतो. उसे जुता मारो.. सोनेका, चांदी का.. या कुछ भी.. लेकीन काम होना चाहीये. काम करुन घ्यायला हे कार्पोरेट्स कुठल्या लेव्हलला जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण यांचे आतले व्यवहार गुलदस्त्यातच रहातात.

अनिल- मुकेश च्या भांडणा मुळे हे सगळॆ व्यवहार आता उघड्यावर आले आहेत. मला तर वाट्त की हे दोघं वेगळे झाले हे भारताच्या दृष्टीने खूपंच बरं झालं, नाहितर या दोघांना अख्खा देश आंदण दिल्या गेला असता आणि आपल्याला समजलं पण नसतं. अर्थात, आपल्याला समजून पण आपण काही करू शकू असंही नाही.. तरी पण…………..

अनिलने  उघडपणे  पेट्रोलियम मंत्रालयावर आरोप केले आहेत की हे मंत्रालय मुकेशच्या इशाऱ्यावर काम करते आहे.  मुकेशचे संबंध कॉंग्रेस आणि भाजपा बरोबर, तर ह्याचे समाजवादी बरोबर.अनिल आणि समाजवादी पक्षाचे संबंध काही लपून राहिलेले नाहीत. ह्या माणसाला  अगदी असंख्य वेळा समाजवादी पक्षाच्या स्टेजवर पाहिलेलं आहे. अमरसिंग आणि मुल्लायम सिंगाचे खासम खास आहेत हे.

आजकाल एक गोष्ट पहाण्यात आलेली आहे, की प्रत्येक इंडस्ट्रिअलिस्ट ( बारिंग फ्यु अदर्स) हे कुठल्याना कुठल्यातरी पक्षाच्या झेंड्याला आपल्या खांद्यावर मिरवण्यात धन्यता मानतात.अर्थात त्या मधे राजकिय पोहोच वापरुन स्वतःचा फायदा करुन घेणं हाच मुख्य उद्देश असतो.

आता भारत हा करप्ट देशांच्या रांगेत कुठल्या क्रमांकावर आहे, पाकिस्तान, आणि इंडोनेशियाच्या वर आहे की खाली आहे, ह्याच्यावरच आपण डिस्कस करतो आणि मग भारत पाकच्या खाली आहे म्हणून आनंद मानतो.

असो, विषयांतर होतंय, पण हे गॅस चं प्रकरण आहे तरी काय? बरेच दिवसापासून ही बातमी फॉलो करतो आहे. आणि आज त्यावर जरा सविस्तर लिहावं म्हणून हा लेख . मी अनिल, किंवा मुकेश, कोणाचाच फॅन नाही हे आधी नमूद करू इच्छितो.तर या दोघांचं हे भांडण सुर कसं झालं हे बघू या आपण!!!!!!

कोणे एके काळी.. मुकेश आणि अनिल नावाचे दोन भाउ एकत्र होते. एकमेकांशिवाय त्यांचं पानंही हलत नसे. त्यांच्या कंपनीला केजी बेसिन मधे गॅस  काढण्याचं काम मिळालं.लवकरच गॅस स्ट्राइक झाला, रिलायन्सचा शेअर अगदी अत्युच्य पातळीला पोहोचला. रिलायन्स म्हणजे भारत असं चित्र कार्पोरेट जगतामधे उभं केलं जाऊ लागलं.माती हातात घेतली तरी त्याचं सोनं करतील अशी प्रतिमा होती या दोन्ही भावांची. पण तेवढ्यात… म्हणजे २००५ मधे दोन्ही भावंडांमधल्या कुरबुरीचे पर्यावसान दोघांच्या वेगळं होण्यात झालं.

ही कुरबुर आधीपासूनच सुरु होती, म्हणूनच अनिलने समाजवादी पार्टी सोबतचे आपले संबंध वाढवणे सुरु केले. मुकेशला ते पसंत नव्हतेच,आणि एक दोन वेळा तर मुकेशने पत्रकारांसमोर बोलूनही दाखवले होते.आता २००४ च्या सुमारास अमरसिंगाचे आणि अनिलचे संबंध इतके सख्ख्याचे झाले होते की अनिलने  गॅस वर आधारित दादरी येथे ५००० मेगॅ वॉट चा विद्युत प्रकल्प युपी मधे उभा करण्याचे जाहीर आश्वासन एकदा समाजवादी पक्षाच्या पार्टीच्या डायसवरुन    दिले –मुकेशबरोबर डिस्कस न करता.. (!). ( या वेळी अनिल- आणि मुकेश बरोबर होते, पण कुरबुर सुरु होती दोघांत) दोघेही आपापले राजकीय खुंटे हलवून बळकट करण्याच्या मागे लागले होते.

२००५ मधे दोघंही भाउ जेंव्हा वेगळे झाले, तेंव्हा मात्र गॅस आणि पेट्रोलियम हे मुकेशच्या ताब्यात आणि इन्फोकॉम ,एनर्जी अनिलच्या ताब्यात  गेले. आणि इथूनच मग खरा खेळ सुरु झाला.

जेंव्हा दोन्ही भाऊ वेगळे झाले तेंव्हा अनिल ने या गॅस परियोजनेतुन मिळणाऱ्या गॅसचा एक हिस्सा अनिलला देण्याचे मान्य केले होते. त्याबद्दल एक किंमत २.५ डॉलर्स प्रती घन मिटर ठरवण्यात आलेली होती.पण!!!!!!! आता मुकेशने जास्त भाव मागितलाय गॅस साठी ज्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय पण त्याला सपोर्ट करतंय. म्हणुनंच अनिल म्हणतोय, की  सरकारला या करारामधे फक्त १ टक्काच फायदा आहे, बाकी सगळं मुकेशच्याच फाय्द्याचं आहे, तेंव्हा सरकार इतकं का सपोर्ट करतंय मुकेशला प्राइस वाढवून देण्यासाठी??

पर्सनल लेव्हल वरची भांडणं कार्पोरेट लेव्हलला लढली जाऊ लागली. मुकेश ने पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहमतीने आपला फायदा करुन घ्यायचा प्रयत्न करणे सुरु केले. या मधे अनिल ला जास्तीत जास्त त्रास कसा होईल हे पण त्याने पाहिले.

अजूनही दादरी परियोजना सुरु झालेली नाही. फक्त अनिलने अनाउन्स केले आहे, आणि कंपनी रजिस्टर केलेली आहे.

अजूनही काही मुद्दे आहेतच..अनुत्तरित… पण आता ही केस सुप्रिम कोर्टाधिन असल्यामुळे यावर जास्त काहि लिहित नाही. पण एकच प्रश्न आहे…

“नैसर्गिक संपत्ती एखाद्या कंपनीला आंदण देणे कितपत योग्य आहे”
“नैसर्गिक संपत्तीवर अधिकार कोणाचा?”
“केवळ नाममात्र १ टक्का अधिभार देऊन सगळे अधिकार (गॅसच्या प्रॉडक्शन आणि वितरणाचे) अनिल ला देणं हे कितपत योग्य आहे?”

” सरकार आपल्या स्वतःच्या अखत्यारीत हे गॅसचे उत्पादन का सुरु करित नाही?ओएनजीसी प्रमाणे एखादे कार्पोरेशन का सुरु करुन किंवा  सध्या अस्तित्वात असलेल्या गेल ( गॅस ऍथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) च्या अखत्यारीत हे बेसिन का देत नाही?”

असे असंख्य प्रश्न मनात आहेत , पण लेख फार मोठा होतोय, म्हणून संपवतो..तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे..

मुरली देवरांचं वक्तव्य आज पहिल्यांदा पटलं.. संसदेतलं…!

गे……..?

Written by  on December 1, 2008

’गे’ म्हणजे आनंदी.. लहानपणी घोकून पाठ केलं होतं. तर्खडकरांच्या पुस्तकात हा शब्द वाचून चांगला पाठ केला होता. या शब्दाचा ’दुसरा’ अर्थ मला कित्येक वर्ष माहिती नव्हता. ’त्या’ ज्ञानाच्या बाबतीत आमची पिढी जरा मागासलेला होती. असं काही असू शकतं.. हे खरंच वाटु शकत नव्हतं.पण जसं जसं मोठं होत गेलो, तेंव्हा ही ग्रे शेड असते एखाद्याच्या आयुष्यात हे जाणवलं. अशोक राव कवी वगैरे मंडळींचे लेख वाचलेत. आणि जेंव्हा थोडा ब्रॉड माइंडेडली विचार केला तेंव्हा लक्षात आलं, की असंही असू शकतं!!

आता ईंटरनेट भारतामधे पॉप्युलर झालं.. साधारण १२ वर्षा पुर्वी. तो पर्यंत कोणी एखाद्याने प्ले बॉय आणलं, किंवा फार तर डेबोनिअर आणलं तर त्यातली चित्र पहायची एवढंच ज्ञान होतं या बाबतीतलं. मुलं अगदी जीव टाकायची प्ले बॉय वाचायला ( की पहायला?) पण इंटरनेट आल्या नंतर या गोष्टी अगदी सहज पणे बघायला मिळू लागल्या. एकदा  सेक्स टाइप केलं गुगल च्या सर्च मधे बस्स!! झालं..

अगदी बिटींग अराउंड द बुश न करता, अगदी सरळ लिहितोय, कालच्या पेपरला वाचतांना हे पण वाचलं की पतिपत्नी मधे सुध्दा ओरल  हा प्रकार अन नॅचरल सेक्स्युल ऍक्ट मधे मोडतो, आणि कायद्याने तो गुन्हा आहे.असा गुन्हा केल्यास तुम्हाला शिक्षा पण केली जाऊ शकते.   आता कोणी आपल्या बेडरुम मधे काय आणि कसं वागायचं तो प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे.  सरकारने कोणी कसं रहायचं हे  कसं काय ठरवू शकते?

’गे’  किंवा लेस्बियन सेक्स हा पण कायद्याने गुन्हा होता. तरी पण हल्लीच्या काळात मात्र, बरेच लोकं क्लोझेट मधून बाहेर आलेत. बरेच फॅशन इंडस्ट्रीवाले डिझायनर्स , हे तर अगदी सरळ लक्षात येण्यासारखे ’गे’ वागतात.अशोक राव कवी हा ’ए’ ऍक्टीव्हिस्ट तर खूपच जोमाने आणि नेटाने गे सेक्स लिगलाइझ करण्याचा प्रयत्न करित होता. माझ्या पूर्वीच्या एका पोस्ट मधे मी याला खूप शिव्या पण घातलेल्या आहेत!

’गे’ किंवा ’लेस्बो’ रिलेशन्स चांगले की वाईट किंवा हा कोर्टाचा निर्णय योग्य की नाही, हा प्रश्न नाही.. काही दिवसांच्या पुर्वी ठाण्याला काही तरुण मंडळी अशाच एका गॅदरिंग मधे पोलिसांनी पकडली होती. सगळी मुलं मध्यमवर्गीय घरातील होती. ईंटरनेटवर याहु ग्रुप मुंबई गे असा काही तरी स्थापन करुन त्यात मेसेजेस टाकुन ही मंडळी एकत्र भेटायची. सगळं काम चोरी छुपे चालायचं… आता  पोलिसांची भिती नाही.. सगळं ओपनली होईल..

समुद्राच्या कठड्यावर एखाद्या मित्रा बरोबर भुट्टा खात चकाट्या पिटत बसाल, तरी पण पोलीस येउन तुम्हाला हटकेल.. !काहो, तुमचा याराना कां? सिनेमा मधूनही हा विषय चघळला गेला. पण स्टॊरीची साइडलाइन म्हणुन.

गे लोकं मल्टीपल पार्टनर्स ठेवणार. कारण लग्नानंतरची  कमिटमेंट या लोकांच्या मधे नसते. तेंव्हा हा ग्रुप हा एच आय व्ही साठी हाय रिस्क ग्रुप ठरतो. हाच खरा महत्वाचा प्रश्न!

ह्या प्रकाराला पुर्वी कायद्याने मान्यता दिलेली नसली तरीही तो अस्तित्वात तर होताच. कायद्याने मान्यता दिल्यामुळे काही फारसा फरक पडेल असे मला वाटत नाही. कायदेशीर झालं म्हणून कोणी सेक्स्युअल प्रिफरन्सेस चेंज करणार नाही. केवळ, जे लोकं ऑलरेडी यात आहेत त्यांच्या मागचा कायद्याचा ससेमिरा सुटेल. आणि सो कॉल्ड कायद्याच्या संरक्षकांकडुन दिला जाणार त्रास वाचेल, एवढंच काय ते या कायद्याचं फलित!

असे अजुन काही विचित्र कायदे  इतर देशात अजूनही आहेत… कदाचित वाचून खरं वाटणार नाही.  ………………

लेबनॉन मधे प्राण्यांच्या बरोबर सेक्स्युअल इंटरकोर्स करणं हा गुन्हा नाही.. जर तो प्राणी फिमेल असेल तर. पण जर तो प्राणी मेल असेल तर मात्र प्राण दंडाची शिक्षा आहे.

बहरिन मधे पुरुष डॉक्टर कायद्याने स्त्रीचे अंतर्गत अवयव तपासू शकतो, पण  त्यांच्या कडे डायरेक्ट पहाणं कायद्याने सम्मत  नाही. त्या अवयवांकडे तपासणीसाठी पहाण्या करता त्याला ’ त्या अवयवांच्या’ आरशातल्या प्रतिमांकडे  पाहून तपासावे लागते .

गुआम मधे बरेचसे पुरुष केवळ पैसे घेउन व्हर्जिन मुली डिफ्लॉवर करण्याचे काम करतात. आता हे असं का?? याचं कारण आहे की, गुआम मधे व्हर्जिन्स ना लग्नाचा अधिकार नाही.

ट्रॉपिकल फिश स्टोअर्स मधे लिव्हरपुल , इंग्लंड ला टॉपलेस सेल्स गर्ल्स लिगली अलाउड आहेत.

कॅली  ( Cali) कोलंबीया ला स्त्री जेंव्हा पहिल्यांदा तिच्या पती बरोबर समागम करेल तेंव्हा तिची आई समोर असणे आवश्यक आहे.

अमेरिकेत ओरल सेक्स इल्लिगल आहे ( अरीझोना इनक्लुडेड)
व्हर्जीनिया मधे लाइट्स सुरु ठेउन समागम करणे कायद्याने गुन्हा आहे.

ऑरिगोन, ला पतीने समागमाच्या वेळेस सेक्सी बोलणं कायद्याने गुन्हा आहे.

वॉशिंग्टन डीसी मधे  मिशिनरी पोझिशन मधे समागम करणे लिगली मान्य आहे. इतर सगळ्या पोझिशन्स इल्लिगल!

हॅरिस्बर्ग, पेनिसिल्व्हिया ला ट्रक ड्रायव्हर बरोबर टोल बुथ मधे समागम करणे गुन्हा आहे.

उटाह मधे फर्स्ट कझिन बरोबर लग्न करायचे असल्यास कायदेशिर वय आहे ६५!

जर प्राण्याचे वजन चाळिस पाउंडापेक्षा कमी असेल तर वॉशिंगटन डिसी मधे त्या प्राण्याबरोबरचा समागम अगदी कायदेशिर आहे.

दोहा , कतार मधे जर एखाद्या स्त्री ला आंघोळ करतांना एखाद्या परपुरुषाने पाहिले तर तिने आधी आपला चेहेरा झाकला पाहिजे असा कायदा आहे.

डेट्रॉइट ला कार मधे समागम करणे कायदेशीर नाही. फक्त कार स्वतःच्या मालकीच्या परिसरात असेल तर मात्र असा समागम कायदेशीर आहे.

असे हज्जारो कायदे आहेत, तुम्ही ईंटरेस्टेड असाल तर नेट वर सर्च करा. काही तर खूपच फनी आहेत.