हिजडा….

Written by  on November 5, 2008

हिजडा म्हंटलं की सिग्नलला तुमच्या कारच्या काचेवर टक टक करुन चिप मेकप केलेला, स्त्रीचे कपडे घातलेला हिरवटसर हनूवटीचा ( रापलेली दाढी खरडून खरडून चिकना चेहेरा केल्यामुळे झालेला चेहेरा)   तुम्ही पैसे देई पर्यंत टाळ्या वाजवत समोर लोकांचं लक्ष वेधून घेणारा- आणि पैसे देई पर्यंत जीव नकोसा करुन सोडणारा-नजरेपुढे येतोय का?

आता थोडे विचार बदलावे लागतील तुम्हाला.   जशी मिस इंडीया, मिस्टर इंडीया, मिसेस इंडीया वगैरे कॉम्पीटीशन्स असतात , तशीच आता एक…… मिस इंडीया सुपर क्विन कॉंपिटीशन!!!! आहे .   नियम फक्त एकच- या मधे जी मिस इंडीया सुपर क्विन होणार तीने  हिजडा असणं आवश्यक आहे. म्हणजे काय की ही कॉम्पिटिशन हिजड्यांच्या साठीच आहे.

मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनौ वगैरे  दहा   ठिकाणी ऑडिशन्स झाल्या आहेत. प्रत्येक ठिकाणुन सुयोग्य असे ३० हिजडे निवडले गेले होते. त्यांचं गृमिंग, वगैरे करुन त्यांना  कसं वागायचं, कसं बोलायचं, याचं ट्रेनिंग देण्यात आलंय, नाहीतर कॅटवॉक च्या वेळेस  सवयी प्रमाणे स्टेज वर जाउन टाळ्या वाजवल्या तर ??? .

त्या ३० हिजड्यां पैकी   १२ निवडुन  त्यामधून एक  विजेता/ती हिजडा निवडला जायचा आहे. विजेत्याला मिळणार आहे दहा लाखाचं घसघशीत बक्षीस.!!

ह्या इव्हेंट्शी आपलं नांव जोडल्या गेलेलं कोणालाच  आवडणार नाही असं वाटतंय का तुम्हाला??  जर उत्तर हो असेल तर तुमच्या सारखे   संकुचित (?) बुर्झ्वा मनोवृत्तीचे तुम्हीच . अहो सेलेना जेटली, झिनत अमान आणि मुंबईच्या मेयर श्रध्दा  जाधव सारख्या सिलेब्रिटीज नी  या कॉम्पीटीशनचे जज होण्याचं कबुल केल्याचं पेपरला आलंय.याच सोबत सिमा बिस्वास नावाची एक नटी पण या इव्हेंट्शी जोडलेली आहे. आणि या कार्यक्रमाला चक्क प्रायोजक पण लाभलेला आहे. असो..

आज सकाळचा टाइम्स ऑफ इंडीया उघडला आणि एका बातमीने लक्ष वेधुन घेतलं. म्हणे कल्याणला एका हॉलिडे रिसॉर्ट मधे हिजड्यांची सौंदर्य स्पर्धा सुरु आहे. ह्या कॉंटेस्ट मधे  हिजडे ( देशभरातुन आलेले) भाग घेण्यासाठी आले आहेत.त्यांचा फोटो   जेंव्हा टाइम्स मधे  पाहिल्यावर आधी  खरंच वाटत नाही की हे हिजडे आहेत म्हणुन. तरी पण केवळ छापील बातमी आहे म्हणून विश्वास ठेवावाच लागतो. अतिशय सुंदर दिसणाऱ्या मुलींचे (?) फोटो आहे ते. या मधे पहिला नंबर येणाऱ्या ’मिस हिजडा’ ज्याला ’मिस इंडीया सुपर क्विन’ चा किताब  मिळणार आहे तिला वर दिल्या प्रमाणे  दहा लाखाचं पहिले  पारितोषक पण देण्यात येणार आहे. त्याच सोबत सेलेना जेटली ने स्वतःकडुन पन्नास हजाराचं बक्षीस द्यायचं कबुल केलंय.

या कार्यक्रमाची प्रायोजक १२ नुन एंटरटेनमेंट ही  लक्ष्मी चीच आहे , ती म्हणते की या किन्नरांनी क्लोझेट मधुन बाहेर यावं आणि त्यांना पण नॉर्मल जीवन जगण्याचा अनुभव घेता यावा म्हणुन ही कॉंपीटिशनचे आयोजन केलेल आहे. या मुळे कसा फायदा होईल क्लोझेट मधुन बाहेर येण्यासाठी ते तर माझ्या लक्षात येत नाही. पण एक एंटरटेनमेंट इव्हेंट म्हणून या कडे पाहिलं तर जास्त योग्य ठरेल. हया लक्ष्मीची एक एन जी ओ पण आहे… आहात कुठे तुम्ही??

येत्या रविवारी वेस्टर्न सबर्ब मधल्या एका फाइव्ह स्टार हॉटेल मधे ह्या कॉम्पीटिशनची फायनल होणार आहे- अजूनही या हॉटेलचे नांव गुप्त राखण्यात आलेलं आहे. अहो अमिताभ बच्चनच्या मिस वर्ल्ड शो ला  संस्कृतीच्या रक्षकांनी   जेंव्हा सोडलं  नाही, तेंव्हा यांच्या या कार्यक्रमाला काही सांस्कृतिक रक्षक बाधा आणतील अशी शंका असेल ऑर्गनायझर्सला. टीव्ही चॅनल्स तर अशा सनसनी खेज बातम्यांकडे डोळे लाऊनच बसलेले असतात. त्यांना थोडं आधी सांगितलं की इथे या वेळेस राडा होणार  आहे , तेंव्हा सगळेच कामं सोडुन ते तिथे बरोबर हजर रहाणार!!!

लक्ष्मी नारायण त्रिपाठी!!  कदाचित याला तुम्ही पाहिले असेल, टिव्हीवर सच का सामना  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.youtube.com/watch?v=DskmfV8gOeY)मधे बिनधास्त उत्तर देत गेलेला हिजडा म्हणजेच हा /ही. थोडं कन्फ्युजन होतंय त्याला तो म्हणावं की ती ? .तिस वर्ष वयाची ही लक्ष्मी नारायण त्रिपाठी , एक हिजडा गुरु , हल्ली मुक्काम ठाणे . ही सौंदर्य स्पर्धा जी आहे तिच्या साठी स्पॉन्सर्स पासुन तर परीक्षक मिळवायचे काम लक्ष्मीच्याच  अविरत प्रयत्नाने हे शक्य झाले आहे .पुरुषाच्या शरीरामधे ट्रॅप झालेलं स्त्री चा आत्मा अशी व्याख्या करता येईल हिजडा या शब्दाची. त्याच्या जास्त टेक्निकल्याटीज मधे जात नाही, कारण सगळ्यांनाच काय ते माहिती आहे. हे नांव त्या बातमी मधे वाचल्यावर उत्सुक ते पोटी गुगल केलं, तर बरंच काही हाती लागलं.

काही दिवसापुर्वी न्युयॉर्कला झालेल्या एका एचाआयव्ही च्या अवेरनेस साठी झालेल्या युनायटेड नेशन्सच्या मिटींग मधे लक्ष्मी ने  भाग घेतला होता.युनायटेड नेशन्स्च्या सिव्हिल सोसायटीची ही लक्ष्मी संपुर्ण जगातून एकच हिजडा मेंबर आहे – आता याचं कौतुक करायचं ते तुम्हीच ठरवा. डॅनिश फिल्म फेस्टीवल मधे स्टिफन व्हाईट , आणि केट बॉर्न्स्टेन बरोबर हिने हजेरी लावली होती. मला वाट्त की सुशिक्षीत असलेला हिजडा ती एकटीच आहे. तिचा एक ब्लॉग ^(http://rangmarathiche.com/goto/http://hijdaeunuchblog.wordpress.com/) पण आहे.   तसेच फेस बुक वर, माय स्पेस ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.myspace.com/laxmihijra) वर पण तिला तुम्ही शोधू शकता. १२ जुलै २००८ ला सलमान खान बरोबर ह्या लक्ष्मीने दस का दम मधे भाग घेतला होता.

याच विषयावर एक डॉक्युमेंट्री होती ती पण पाहु शकता इथे. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.linktv.org/programs/dd_harsh) एका प्रोफेशनल फोटो ग्राफरने काढलेले तिचे फोटो फ्लिकरवर  ^(http://rangmarathiche.com/goto/http://viewmorepics.myspace.com/index.cfm?fuseaction=viewImage&friendID=401174346&albumID=100924&imageID=623086#a=100924&i=410115)आहेत.

भारतात ’ट्रान्स जेंडर्” ला थोडी वेगळी वागणूक दिली जाते. समाजात स्थान नाही हे तर आहेच, परंतु त्याच सोबत हिजड्यांना व्होटर्स आय कार्ड , बॅंक अकाउंट्स आणि इतर शासकीय  नोकऱ्यात स्थान नाही. सेक्स्युअल प्रिफरन्स  हा पर्सनलाइझ्ड असतो त्यामुळे जर एखाद्याला टीजी म्हणून जगायचं असेल तर त्याच्या बेसिक ह्युमन राईट्स ला कसे काय नाकारू शकतात कायदे? ह्या १८५७ च्या कायद्यांचे पुनर्लेखन झाले पाहिजे. हे असे कायदे आहेत म्हणून मला माहितीच नव्हतं.

काही दिवसांपूर्वी गोंदीया जवळच्या एका गावातून एक हिजडा नगराध्यक्ष म्हणून निवडुन आल्याची बातमी पण वाचण्यात आली होती. म्हणजे तुम्ही इलेक्षन ला उभं राहू शकता, पण मतदान करु शकत नाही- काय मुर्खपणा आहे हा?? हे जुने नियम आता बदलायलाच हवे असे वाटते.