काश्मिर एक वेगळा दृष्टीकोन

Written by  on May 27, 2008

फोटो शेवटी दिलेले आहेत. पण पहाण्यापूर्वी पुर्ण लेख वाचा ही विनंती

सकाळी सहा ची वेळ . चहाचा कप आणि पेपर हातात घेतला, आणि टिव्ही सुरु केला. बातम्या सुरु होत्या. काश्मीर मधला कुठला तरी एक भाग, तिथे एका १२-१३ वर्षाच्या मुलाला धरून नेतांना एक सुरक्षा सैनिक  दिसत   होता. काश्मीर मधल्या अनरेस्ट वर ती बातमी सुरु होती. अधून मधून काही जळणारी वाहनं, आणि भिंती, दुकानाची शटर्स , रस्ते ज्यावर ’ गो इंडीया गो’ लिहिले आहे ते  पण दाखवत होते. हे सगळं दाखवण्या मागचा उद्देश काय ते मला लक्षात आलं नाही.  बरेचदा तर वाटत होतं की हे  पीटीव्ही  चॅनल तर नाही??

थोडं वैतागूनच टीव्ही वरचे डॊळॆ हटवले आणि पेपर हातात घेतला. पहिल्याच पानावर “गो इंडीया” लिहिलेला मोठा फोटॊ आणि खाली पुन्हा काश्मिर मधल्या परिस्थितीला अब्दुल्ला सरकार कसे जबाबदार आहे वगैरे वगैरे….. लिहिलं होतं. बातमी मधला तो रस्त्याचा फोटो ज्यावर ’गो इंडीया गो’ लिहिलं होतं तो पाहून पुढे काही वाचायची इच्छाच झाली नाही. पेपर मधे अशाच बातम्या जास्त असतात. मिल्ट्रीच्या गोळीबारात १२ वर्षाचा मुलगा ठार, किंवा एक स्त्री ठार वगैरे  वगैरे….  पेपर समोरच्या टिपॉय वर टाकून दिला. सकाळच्या वेळेस अशा बातम्या पाहिल्या की मुड खराब होतो.

काश्मीर मधे सुरक्षा दलाची लोकं स्वतःचा जीव धोक्यात टाकून तिथली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात,  त्या प्रयत्नांना प्रसिद्धी देण्यापेक्षा   टीव्ही वरच्या बातम्यांमधे मात्र सैनिकांनी लहान मुलाला ,स्त्रियांना गोळ्या घातल्या – लाठी मार केला   अ्शा बातम्या  जास्तीत जास्त  दिल्या जातात आणि प्रसिद्धी माध्यमातून  उगाळल्या जातात.

मुलांनी किंवा स्त्रियांनी मिल्ट्रीच्या जवानांवर ग्रेनेड्स घेऊन हल्ले केले, आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला तर ती बातमी खास टीआरपी देणारी नसते, पण जर मिल्ट्री जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या  गोळीबारात एखादा मुलगा किंवा स्त्री मारल्या गेली तर ती बा्तमी टीआरपी वाली म्हणून जास्त उगाळली जात असते.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल  आणि त्या सारख्या इतर   स्वयंसेवी एनजीओ ला तर काही कामच नाही. काश्मिरी फुटीर वादी लोकांना या संस्थेचा उपयोग करून कसा घ्यायचा हे चांगलं माहिती झालेले आहे. पेपर मधे एक त्यांचा कोणी तरी एक प्रवक्ता भारत सरकारला सांगत होता, की काश्मिरी जनतेच्य आयुष्या कडे रिस्पेक्ट देऊन पहाणे कसे आवश्यक आहे ते सांगत होता.

या अशाच मानवतावादी संघटनांच्या प्रेशर खाली  लागून आणि मिडीयाच्या एकांगी बातम्यामुळे  किंवा  एकांगी फोटॊ वरून वगैरे पण  तिथे तैनात असलेल्या  सैनिकांवर पण कारवाई केली जाते.  सरकार कारवाई करत असते .  कारवाई केली आहे ही गोष्ट पण पेपर मधे  मुद्दाम प्रसिद्ध  केली जाते. (कॊणाचे मनोधैर्य वाढवायला??)

हे पण आता नेहेमीचेच झालेले आहे. मला बरेचदा प्रश्न पडतो, की आपल्याच सरकारला  अशा फुटीरवादी लोकांच्या  गोबेल्स रणनीती प्रमाणे दिलेल्या माहिती वर विसंबून   आपल्याच सैनिकांवर कारवाई करण्याची इच्छा होऊ तरी कशी शकते? दिवस बर बख्तर बंद गाडी मधे किंवा रेतीच्या पोत्यांच्या आड बसून काश्मिर मधे  या टेररिस्ट लोकांपासून आपल्या देशाची शकलं होऊ देण्यासाठी जीव धोक्यात घालणारे आपलेच जवान अशा अघोषित मिडीया युद्धाचे बळी  व्हावेत या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही.

पोलिसांचे, किंवा सैनिकांचे मुलांना पकडून नेतांनाचे, किंवा प्रसंगी मेलेल्या १०-१२ वर्षाच्या मुलाच्या प्रेताचे फोटो  नेहेमीच ह्या  टेररिस्ट संघटना लोकांच्या भावनांना साद घालण्यासाठी   निरनिराळ्या ठिकाणी पब्लिश करत असतात, की जे पाहिल्यावर कुठल्याही सर्हदय माणसाला मिल्ट्रीच्या जवानाचा राग यावा.

कधी तरी एखाद्या ब्लॉग वर मोठ्या अभिमानाने पब्लिश केलेल फोटो , की  ज्या मधे १२-१३ वर्षाची पोरं पण सुरक्षा जवानांवर कसा हल्ला करतात?  किंवा त्यांच्याही मनात ही फुटीरता वादी भावना कशी ठासून भरली गेली आहे, हे दाखवायला म्हणून प्रसिद्ध केलेले फोटो वेगळीच गोष्ट सांगत असतात ते. ते मला सापडले म्हणून हा लेख लिहायला घेतलाय, आणि त्यातलेच काही फोटो  या ब्लॉग वर  टाकले  आहेत.

गेला आठवडा पुर्ण काश्मीर मधे फुटीरतावादी संघटना जागोजागी  मिल्ट्री वर हल्ले करत होते. त् अब्दुल्ला च्या नावाने तर नुसती ओरड सुरु होती.वेळोवेळी कर्फ्यु इंपोज केला जात होता.  सरकारचे सर्वपक्षिय दल आता काश्मिरला जाउन परिस्थितीचा आढावा घेईल असे सरकारने जा्हीर  केल्या बरोबर एका चॅनलने दुपारी महबुबा मुफ्ती सैद  चा इंटरव्ह्यु लाइव्ह दाखवणे सुरु केले.

ती बाई मोठ्या तावातावाने सरकारने डिक्लिअर केलेल्या ७२ तासाच्या कर्फ्यु बद्दल बोलत होती. म्हणत होती की  तिथल्या अनरेस्ट साठी भेट देण्यासाठी जाणारे जे राजकिय दल आहे, त्याने तिथल्या जनतेशी संवाद साधायला हवा- त्यांचे म्हणणे काय आहे ते समजून घ्यावे आणि  त्यासाठी कर्फ्यु असणे अतिशय घातक आहे.  ही  अशी महबुबा मुफ्ती आणि तिचं ते प्रोव्होकेटीव्ह भाषण टिव्ही वर लाइव्ह दाखवलं जात होतं. लोकल फुटीरतावादी लोकांना काश्मिर भारतापासून वेगळा हवा आहे  म्ह्णून काय काश्मीर सोडून द्यावा असे म्हणणे आहे का तिचे?? टी आर पी साठी मिडीया काहीपण दाखवत असतो हल्ली. मला तर बरेचदा आपण पाकिस्तानी टीव्ही पहातो आहे का? असा संशय पण येतो.

काश्मिरचे विस्थापित पंडीत लोकं /हिंदू लोकं.. त्यांना काय हवंय हे विचारा असं का म्हणत नाही ही महबुबा?? जेंव्हा तिथल्या का्श्मिरी पंडीतांची घरं जाळली, त्यांच्या स्त्रियांची अब्रू लुटली गेली, तेंव्हा हा मिडीया, किंवा ऍम्नेस्टी वाले कुठे गेले होते?? काय ऍक्शन घेतली गेली त्यावर? अजूनही विस्थापितांचं जिवन जगावं लागतंय त्या लोकांना.

काल संध्याकाळी एक कुठल्यातरी फडतूस चॅनलची रिपोर्टर कर्फ्यु पास घेऊन काश्मीर मधे कार ने फिरत होती. म्हणत होती की सात किमी अंतर पार करायला तिला ४० मिनिटं लागली. आणि याच गोष्टीचा ती गवगवा करत होती.  तिला  या गोष्टी मधून काय सांगायचं होतं ते मला समजलं नाही.

मध्यंतरी एका ११ वर्षाच्या सुसाईड अ्टॅकरला पकडल्याची बातमी वाचली होती. जर हे अतिरेकी १०-१२ वर्षाच्या मुलांना पण वापरू लागले तर  त्या मुलांना एक मुलगा म्हणून ट्रिट करावे की टेररिस्ट म्हणून?

भारतीय मिल्ट्री चे लोकं तिथे का्श्मीरमधे गोळ्यांच्या आणि बॉंबस्च्या वर्षावात आपले संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी मॉरल सपोर्ट हा दिलाच पाहिजे.  मिडीयाच्या टीआरपी  साठी दिलेल्या बातम्यांकडे   कडे दुर्लक्ष करून जवानांना सपोर्ट करणे आवश्यक आहे एवढंच सांगायला हे ब्लॉग पोस्ट.

खाली दिलेले फोटो नेट वरून घेतलेले आहेत.

मिल्ट्रीच्या आर्मर्ड व्हेइकल वर अटॅक. जर मनात आणलं , तर आतले सैनिक या सगळ्या टेररिस्ट लोकांना झोपवू शकतात एका मिनिटात.

टिनेजर्स आर्मर्ड व्हेइकल्स वर अटॅक करताना. याच मुलांना ग्रेनेड्स पण दिले जातात, आणि मग एादा मुलगा मारला गेला की ह्युमन् राइट्स वाले बोंबाबोंब करतात.

या मुलाच्या हातात ग्रेनेड आहे. एका साईट वर प्राउड फोटॊ म्हणून पोस्ट केला गेलाय हा .

स्त्रियांवर गोळ्या झाडल्या, स्त्रियांना सुरक्षा बलाने मारले, म्हणूनही ओरडा केला जातो मिडीया तर्फे. अशी चित्र- स्त्रिया बंदुका घेउन असलेल्या कधी पब्लिश केले जात नाहीत.. काय कारण असेल ??

ही अशी चित्रं कधी पेपरला पाहिली आहेत का?

असे फोटो कधी पाहिल्याचे आठवतात का??

मिल्ट्रीच्या एकटया मिळालेल्या वाहनावर पण असे हल्ले केले जातात. स्वसंरक्षणासाठी जरी गोळ्या झाडल्या तरीही मिडीया ……..असो.

हे असे फोटो मिडीया खूप जास्त प्रसिध्द करते. स्पेशली फॉरिन मिडीया. हा फोटॊ पाहिला की मिल्ट्री जवान मुलांना मारताहेत हा ग्रह होणे सहाजिक आहे. असे फोटॊच मिडीयाला आवडतात. हा फोटो वॉशिंगटन पोस्ट मधला आहे

दगड मारणारे लोकं तर बरेच आहेत. त्या लोकांच्या हातात दगड आहेत की ग्रेनेड्स?? हा प्रश्न आहेच.

८-१० वर्षाची मुलं पण आजकाल वापरले जातात. दगड फेक करण्यासाठी. प्रसंगी त्यांच्या हातात ग्रेनेड पण दिले जातात आणि मग त्यातला एखादा मुलगा मारला गेला की मग मिल्ट्री वर सगळा मिडीया तुटून पडतो.

यामुलांच्या हातात पण दगड आहेत, दंगली मधे कोणी लहान मोठा नसतो सगळे फक्त दंगलखोर..

अहमदाबाद – वर्धा

Written by  on May 19, 2008

अहमदाबादचा साबरमती गांधी आश्रम

टिपिकल गुजराथी पद्धतीचे सुंदर पांढऱ्या रंगवलेल्या भिंती, लाल रंगात रंगवलेले ते छप्पर असलेले  ते लहानसे घर एखाद्या सुखवस्तू शेतकऱ्याचे  घर वाटत होते. पायातले बुट मोजे काढून त्या पायऱ्यांवर चढलो, उन्हामुळे तापलेल्या पायऱ्यांचा स्पर्श नेहेमी पायात बुट घालून चालण्याच्या सवयी मुळे  हुळहुळ झालेल्या तळपायांना नकोसा वाटत होता. पटकन पाउल उचलत सावली कडे सरकलो. समोर एक सतरंजी अंथरलेली होती, एक चरखा बेवारस पडल्याप्रमाणे तिथे पडलेला होता. त्या सगळ्या सेट अप मधे तो चरखा  पाहिल्यावर  , “हा इथे काय करतोय?? ” असे वाटत होते.

बाजूलाच एक बैठक,पांढरी शुभ्र खोळ घातलेला मोठा चौकोनी तक्क्या, आणि समोर एक लिहीण्याचा एक मेज. गांधींजी  इथे बसून लिखाण काम करायचे असे म्हणतात . थोडं आत शिरल्यावर एक खोली-  दहा बारा लोकांचा  एक ग्रूप उगाच मोठमोठ्याने बोलत इकडे तिकडे फिरत होता.  एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की इतक्या सुधारणा केल्या गेल्या आहेत, की  गांधी आश्रमाची ओरिजिनॅलिटी अजिबात शिल्लक राहू दिलेली नाही. खाली लावलेली फरसी, प्लास्टर, त्यावरचा सुबक रंग , छान लाल रंगाचं छत हे सगळं जरी छान दिसत असलं, तरी त्यात काही तरी चुकल्या सारखं सतत जाणवत होतं. सगळ्या मॉडीफिकेशन मुळे ओरिजिनलिटी हरवल्यासारखी वाटत होती आश्रमाची.

हेरीटेज वास्तू चा किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूचा एक वेगळा बाज असतो. त्या वास्तू “जशा आहेत तशा” स्वरूपात पुढल्या पिढीसाठी जतन करून ठेवायला हव्या असे माझे मत आहे.   अहमदाबादच्या गांधी आश्रमात गेल्यावर तो  जास्त चांगला दिसावा म्हणून त्याच्या मूळ स्वरुपात खूप जास्त बदल केल्याने  तो  आश्रम   महात्मा गांधींचा  आहे ह्याची जाणीव  फक्त त्या कपाटात ठेवलेल्या गांधीजींच्या काही वस्तू ( काही प्रतिकृती) पाहून वाटतं.खरं तर समोर मांडून ठेवलेला चरखा , जो स्वातंत्र्यपूर्व काळात  ’स्वातंत्र्य चळवळीश” निगडीत होता, तो पण तिथे प्रवचना मधे मारून मुटकुन बसवलेल्या लहान मुलासारखा वाटत होता.  येणारे जाणारे व्हिजिटर्स त्या चरख्याजवळ बसून फोटो काढून घेत होते.

गांधी आश्रम सेवाग्राम वर्धा

हे पाहिल्यावर काही दिवसांपूर्वी वर्ध्याच्या गांधी आश्रमाची भेट आठवली. वर्धेचा गांधी आश्रम अजूनही जसा होता तसाच मेंटेन केला आहे. शेणामातीच्या सारवलेल्या भिंती आणि जमीन. ज्यावर पाय ठेवला की जमिनीशी असलेल्या नात्याची एक वेगळीच जाणीव होते. गांधीजींच्या वापरातल्या वस्तू मग ते अगदी पाणी पिण्याचे भांडे असो की त्यांच्या वापरातले गहू -ज्वारी दळायचे जाते , उखळ, आणि इतर साध्या गोष्टी  असो,  तिथे अजूनही अगदी त्या काळात होत्या तशाच सांभाळून ठेवलेल्या  आहेत.

मी स्वतः दोन्ही आश्रम पाहिलेले आहेत. पण मला वर्धेचा आश्रम जास्त आवडला, कारण तो आश्रम  पहातांना गांधीजींच्या जवळ पोहोचल्याचा, किंवा त्यांची जीवनशैली जवळून पाहिल्या सारखे वाटते .

करी बॅशिंग.. डॉट बस्टर्स.. एकाच कुळीची अवलाद !!!

Written by  on May 2, 2008

काय करायचं?? कसं रहायचं?? रहायचं की परत जायचं पुन्हा परत भारतामधे?? असे शेकडे प्रश्न आहेत जे  सध्या ऑस्ट्रेलियात रहाणारे – म्हणजे नौकरी करणारे किंवा शिकणारे लोकं विचार करित असतिल. तसेच इतर ठिकाणी रहाणारे भारतिय पण असाच विचार करित असतिल. जे कांही आज ऑस्ट्रेलियात सुरु आहे, ते इतर ठिकाणी सुरु होऊ नये अशी इच्छा आहे.

ऑस्ट्रेलियामधे ज्या लोकांनी मार हाण केली त्या मुलांचे मी फोटोग्राफ्स बघितले. सगळी मुलं जस्ट १३ ते १५ वर्षाच्या रेंज मधली वाटतात. त्यांचं म्हणणं असं की ही सगळी भारतिय मुलं इथे कमी पैशामधे कामं करतात, त्या मुळे लोकल मुलांना कामं मिळत नाहित. आता  मुलं तिथे गेल्यानंतर शिक्षणाचा थोडा तरी खर्च निघावा म्हणुन शिक्षणाव्यतिरिक्त थोडं फार काम ( गॅस स्ट्रेशन, आणि रेस्टॉरंट्स मधे) करतात.

कितिही नाही म्हंटलं तरी ऑस्ट्रेलियामधल्या लोकांचे पुर्वज हे खुनी, दरोडेखोर, थोडक्यात आउट लॉ असल्यामुळे त्यांना इंग्लंडमधुन (डीपोर्ट) तडिपार करण्यात आलं होतं  ऑस्ट्रेलिया या बेटावर. आजचे तिथले रहिवासी म्हणजे ह्याच गुन्हेगारांची पुढची पिढी!

आज हे जे ऑस्ट्रेलियामधे होते आहे, ते अगदी पुर्वापार चालंत आलेलं आहे अमेरिकेत आणि इंग्लंड मधे. फक्त ह्या सगळ्यांची दाहकता कमी होती.. कींवा फ्रिक्वेन्सी पण कमी होती. अधुन मधुन एखादी केस असायची.. पण सध्या ऑस्ट्रेलियामधे जे चाललंय ते अगदी इतक्या जास्त लेव्हलला आहे, की जर यावर वेळिच काही कारवाई केली नाही तर तिथल्या भारतिया विद्यार्थ्यांना खुप त्रास होइल. तसंही,सध्या पण त्यांचे एकेकट्याने बाहेर निघणे बंदच झालेले आहे.

एका ऑस्ट्रेलियन ब्लॉग वर वाचलं, की सध्या चार ऑस्ट्रेलियन एकत्र भेटले आणि वेळ जात नसेल तर, नॅशनल पास टाइम म्हणजे ’ लेट्स गो करी बॅशिंग’ झालेला आहे.रेशिअल अब्युझ हे ह्या ऑस्ट्रेलियन लोकांच्या रक्तामधे भिनलेले आहे.आणि ते आपलं रेशिअल श्रेष्ठत्व असल्याचे वेळोवेळी दाखवुन देण्याचा प्रयत्न करतात.अमेरिकेत तर तिथले निगर्स पण स्वतःला एशियाई मुळाच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ समजतात.

तुम्ही बघा, क्रिकेटचे मैदान जरी असले, तरिही तिथे पण हे रेशिअल डिस्क्रिमिनेशन सरळ दिसुन येतं. त्यांच्या खेळाडूंनी काही कॉमेंट केली तर त्याला काहिच शिक्षा होत नाही, पण तेच जर एखाद्या भज्जी सारख्या क्रिकेटरला मात्र मॅचेस वर बॅन्स अशा शिक्षांना सामोरं जावं लागतं. आपलं बिसिसिआय पण पुर्ण पणे षंढ पणे काहिही प्रतिक्रिया न देता..त्यांना  वरचढ दर्जा देण्यातंच मोठेपणा मानते.

खरी गोष्ट अशी आहे, की भारतिय विद्यार्थी त्यांच्या पेक्षा कित्येक पटीने हुशार आहेत, आणि हे प्रत्येक टेस्ट मधे प्रुव्ह होतंय. त्यांच्यामधला  इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स हा हे सगळं करण्यासाठी प्रवृत्त करतो. १५ हजार अब्ज डॉलर्स ची ही ऑस्ट्रेलियन शिक्षण इंडस्ट्री सध्या स्टेक वर आहे. आता पर्यंत गेले ते गेले, पण पुढे मात्र किती विद्यार्थ्यांना त्यांचे पालक ऑस्ट्रेलियामधे शिकायला पाठवण्याची हिम्मत करतात ते सांगता येत नाही.

जरी आता पर्यंत फक्त ७ केसेस रिपोर्ट झाल्या असल्या तरी अशा कित्येक केसेस आहेत की ज्या मधे फक्त पैसे हिसकाउन घेणं आणि थोडीफार मारहाण करणे, हेच फक्त  चालायचं. आणि असे प्रसंग फारसे पोलिसांकडे रिपोर्ट केले जात नव्हते. या वेळी जे स्कृ ड्रायव्हरने भोसकणे झाले,आणि झालेले मृत्यु, यामूळे इंटरनॅशनल मेडीयाचे लक्ष या प्रकाराकडे आकर्षित झाले.

यावर उपाय म्हणजे , भारतिय विद्यार्थ्यांनी एकत्रित फिरणे , आणि एखादा मारहाणिचा लहानसा प्रसंग जरी झाला तरी, तो पोलिसांना रिपोर्ट करावा..सेल्फ डिफेन्स पण महत्वाचा. अर्थात स्टूडंट्स जरी तिथे शिकायला जरी गेले असले, तरीही त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी हात उचलायला हरकत नाही.

तिथल्या पोलिसांची वागणुक पण  खुपंच संशयास्पद दिसत होती. थोडक्यात त्यांनी पण भारतिय विद्यार्थ्यांवर हात साफ करुन घेतले. व्हिडीओ इथे आहेत. ^(http://rangmarathiche.com/goto/http://timesofindia.indiatimes.com/Oz-police-atrocities-caught-on-tape/videoshow/4604728.cms)

हे सगळं वाचतांनाच एक जुनी केस १९८७ ची आठवली.न्यु जर्सी मधे एक गॅंग फॉर्म झाली होती.. तिचं नांव होतं डॉट बस्टर्स.. ( डॉट=कुंकू.. म्हणजे एशियन्स )या गॅंगने एक पत्रक प्रसिध्द केलं न्युज पेपर मधे. त्यात म्हंट्लं होतं,की आम्ही काहिही करु भारतियांना न्यु जर्सी मधुन बाहेर हाकलण्यासाठी. या गॅंगच्या लोकांनी कित्येक घरं लुटली, लोकांना मारले, आणि सक्सेसफुली अशी लुटमार सुरु ठेवली. असंही म्हंटलं जातं की पोलिसांमधले काही लोकं या गॅंग मधे सामिल होते.त्यामुळे हे असंच १९८९ पर्यंत चाललं. तेंव्हा एक एशियन ग्रुप तयार झाला आणि त्याने जेंव्हा केलेल्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले तेंव्हा मात्र या डॉट बस्टरने हळू हळू हल्ले कमी केले.. १९९८ मधल्या ५८ केसेस ( रजिस्टर्ड केसेस ) चा आकडाच ह्या बॅशिंगचा सिरियसनेस दाखवतो.

मला काल एक कॉमेंट आली एका राज ठाकरेंच्या फॉलोअर ची. ती कॉमेंट इतकी व्होलाटाइल होती की मी ती पब्लिश न करणेच योग्य वाटले.. एक भारतिय माणुस आपल्याच बांधवांना मारल्याचा आनंद व्यक्त करतो, आणि लिहितो, की जे झालं ते बरं झालं, असंच इथे पण भैय्या लोकांच्या बद्दल व्हायला हवं असंही त्या गृहस्थाने लिहिलं होतं ..ते सगळे गेले कशाला परदेशात? त्यांनी तिथे जाउन तिथल्या स्थानिक लोकांच्या नोकऱ्या घेतल्या आहेत … वगैरे वगैरे.. अजुनही बरंच काही होतं की जे इथे पोस्ट करणे शक्य नाही.

बस्स! इथेच थांबवतो आता.. लेख फार मोठा होतोय.