एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन-२

Written by  on December 31, 2007

way toमागच्याच आठवड्यात १२ सप्टेंबरला आणि १३ सप्टेंबरला मी नाशिकला गेलो होतो. माझी धाकटी बहीण असते नाशिकला, तिने सगळी तयारी करुन ठेवली होती.. कालसर्प योगाच्या पूजेची. माझा जन्म रोहिणी नक्षत्रावरचा , ज्याची सर्प योनी असते. माझ्या वडिलांना आधी पासून विनामुल्य पत्रिका वगैरे पहाण्याची खूप आवड.गेली ५० वर्ष तरी पत्रिका वगैरे पहात असतात ..म्हणून माझे वडील कधीचं सांगताहेत की एकदा ही पुजा करुन घे. म्हणून ही पुजा…ते सारखं म्हणतात की पुजा करुन टाक -म्हणून ह्या पुजेचे प्रयोजन!

माझ्या बरोवरच माझ्या दोन्ही भाच्यांच्या पण ह्या पुजा करायच्या होत्या .त्यामुळे आम्ही जवळपास १२लोकं गेलो तिथे. त्यामुळे  ही तर एक पिकनिकच वाटत होती. अमृता (माझी भाची) ने नुकतंच सीए पास केलंय पहिल्याच अटेम्प्ट मधे. २२ व्या वर्षी सी ए म्हणजे एक मोठी उपलब्धी, आणि दुसरी गौतमी होतकरू सी ए… 🙂 आम्ही तिघंही एकदमच पूजेला बसलो होतो.  पूजेबद्दल पोस्ट नाही   हे . 🙂

ramkrishna mathअर्थातच, सगळी पूजेची तयारी माझ्या लहान बहिणीने ( नाशिकलाच असते ती) करुन ठेवली होती. त्र्यंबकेश्वर ला श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान आहे. या संस्थाना मधे कांही स्वामीजी लोकसेवेचे कार्य करतात. माझ्या  बहीणीची एकदा नागपूरहुन नाशिकला परत येतांना या स्वामीजीशी ओळख झाली.

या रामकृषण आरोग्य संस्थानाचे कार्य इथल्या वनवासी भागात चालते. जव्हार ते डहाणूच्या मधे आणि अगदी सिल्व्हासाच्या मधे खुप वनवासी लोकं रहातात . या लोकांना अगदी बेसिक आरोग्य सेवा पण उपलब्ध नाहीत.कित्येक लोकांचा औषधा अभावी मृत्यु होतो.

इथल्या या दुर्गम भागात हे स्वामीजी जाउन विनामुल्य आरोग्य सेवा देण्यासाठी कॅंम्प्स करतात.  स्वामीजींना नांव किंवा पूर्वायुष्याबद्दल विचारलं तर ते अजिबात काही सांगत नाही. म्हणतात साधूचे  कुळ विचारु नये. त्यांना इथे मोठे स्वामिजी आणी छोटे स्वामिजी म्हणतात. एका स्वामिजिंचे नांव  श्रीकंठानंद आहे,दुसरे आहेत ते विश्वरुपानंद स्वामी. अर्थात ही दोन्ही नावं सन्यास घेतल्यावर घेतलेली आहेत.

eye campजवळपासचे म्हणजे, मुंबई, पुणे, नाशिक, जळगांवचे डॉक्टर लोकं इथे वेळ काढुन येऊन  कॅम्प सक्सेसफुल करण्यासाठी मदत करतात.डॉक्टर लोकं  इथे येउन कामं करतातच आणि  सोबतच त्यांना मिळणाऱ्या सॅंपल औषधी इथे डोनेट करतात. नुकताच जवळच्याच एका दुर्गम वनवासी भागात नेत्र शिबिर, म्हणजे मोती बिंदु काढण्याचे शिबिर  करण्यात आले होते. कित्येक लोकांनी ह्या शिबिराचा फायदा घेतला. ज्या लोकांना जागेवर उपचार करणं शक्य  नसतं , त्यांना शहरात नेऊन उपचार करण्यासाठी नेलं जातं.या सगळ्या कामासाठी मिळणारा पैसा हा फक्त देणग्या मधुन  उभा केला जातो. साधारणपणे पाच एक हजार रुपये उभे झाले, की एक कॅम्प ऑर्गनाइझ केला जातो.

स्वामिजिंच्याच ओळखीने तिथे पुजा अरेंज करण्यात आली होती. आम्ही सगळे तिथे सकाळी पोहोचलो, आणि मग पुजा आटोपल्यावर सरळ मठात गेलो. ह्या मठाला मठ का म्हणायचं?? इथे चार पाच खोल्या आहेत एका रांगेत. एका खोलीत फक्त औषधं वगैरे ठेवलेली आहेत, दुसऱ्या खोलीत स्वामीजी झोपतात. एका खोलीत रामकषण परमहंस आणि माताजींचा फोटॊ लाऊन ठेवलाय. समोर एक साधी सतरंजी.. बस्स!!    एक खोली म्हणजे स्वयंपाक घर. स्वयंपाक घरात एक गॅस , भांडी आणि अगदी गरजेपुरते सामान दिसत होते.स्वयंपाक घरात अगदी बेसिक सुविधा आहेत.

vishwarupanandस्वामीजींनी पुजा झाल्यानंतर जेवायला या म्हणून आम्हाला बोलावलं होतं. तिथे पोहोचलो तर स्वामीजींचा सगळा स्वयंपाक तयार होता. स्वामी श्री विश्वरुपानंदांनी स्वतः सगळा स्वयंपाक तयार करुन ठेवला होता आमच्या साठी.भाजी, कढी, उसळ, आणि नारळाची चटणी.. असा साधासा बेत होता. पोळ्या करायला भाग्यश्री आलेली होती. भाग्यश्री ही इंजिनिअरिंग करते आहे पुण्याला डि वाय पाटिल मधे. सुटीचं ती इथे आली होती. सगळ्यांची जेवणं झाली. आणि जेवणं झाल्यावर (अमृता, आणि गायत्री  )दोन चार्टर्ड अकाउंटंट ( एक पुर्ण , दुसरी होतकरु) भांडी घासायला बसल्या.  🙂

रामकृषण परमहंसांच्या बद्दल मला फारच आदर आहे. जेंव्हा त्यांचं गॉस्पेल ऑफ रामकृष्ण परमहंस वाचलं तेंव्हा पासून नजरे समोरचा पडदा बाजुला होऊन सगळं काही स्वच्छ दिसावं तसं झालं. वाचलेलं नसेल तर जरुर वाचा हे पुस्तक. रामकृष्ण मिशनच्या कुठल्याही मठात विकत मिळते. कर्मकांडाला किती महत्व द्यायचं आणि किती भक्तीला ते लक्षात आलं..असो..

shrikanthanadया वर उल्लेखित वनवासी  भागा मधे मिशनरी कार्य खूपच जोरात सुरु आहे. बऱ्याच वनवासी पाड्यांमधे मंदिर जरी नसलं तरी चर्च मात्र आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन सुरु असतं इकडे की सांगायची सोय नाही. अर्थात, त्या ख्रिश्चन धर्मगुरुंनी इथे येउन बरंच काम केलंय. या आदिवासी लोकांना आपण तर पुर्ण पणे विसरुन गेलो होतो. तेंव्हा हे ख्रिश्चन धर्मगुरु तिकडे गेले आणि त्यांनी धर्म प्रसाराचं कार्य केलं.

वनवासी भागामधे दातांच्या आरोग्या बद्दल ( ओरल हायजिन बद्दल) कमालीचा निष्काळजी पणा असतो.त्या मूळे दांतांच्या चिकित्सेचं पण शिबिर घेण्यात येतात वनवासी भागात.

स्वामिजी वनवासी भागात एक जुनाट मोटरसायकल वर फिरतात. पैशांचा अजिबात मोह नाही. म्हणाले, की इथे सेवा देणारे डॉक्टर्स तर विनामुल्य येतात, पण त्यांची रहाणे, खाणेपिणे इत्यादी सोय करण्यासाठी थोडा फार खर्च होतो. पैशाची गरज पडते ती मुख्यत्वे करुन औषधी आणण्यासाठी. कॅम्प मधे फ्री सॅंपलची औषधं पुरत नाहीत, त्यामुळे बेसिक औषधं विकतच आणावी लागतात..

prayer roomया पोस्ट मधे स्वामीजींचा पत्ता, फोन नंबर इत्त्यादी देतोय . जर तुमच्या पैकी कुणाला इंटरेस्ट असेल तर किंवा जर वाढदिवस, किंवा एखाद्या शुभ प्रसंगा प्रीत्यर्थ , किंवा कोणाच्या स्मती प्रित्यर्थ जर एखादा आरोग्य कॅम्प स्पॉन्सर करायचा असेल तर जरुर संपर्क साधा. तुमचे पैसे सत्कारणी खर्च होतील याची खात्री मी   देतो..

मोखाडा ह्या नाशिकजवळच्या ( त्र्यंबकेश्वर जवळच्या) गावामधे त्यांना नुकतीच दोन एकर जमीन दान दिलेली आहे, जिथे आता एक दवाखाना सुरु करण्याचे योजिले आहे.

जर तुम्हाला स्वतःला कॅम्प मधे सहभागी व्हायचं असेल तर ते ही शक्य आहे. फक्त स्वामीजींशी संपर्क साधा.. बस्स!!

यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती हवी असेल तर बरेच फोटोग्राफ्स आहेत त्यांच्या ब्लॉग वर.निरनिराळ्या कॅंप्स चे फोटॊग्राफ्स आहेत, जरुर भेट द्या. ^(http://rangmarathiche.com/goto/http://shriramakrishna.co.cc/photogallery/) एखाद्या कामासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण करणाऱ्या अशा लोकांना मी तर एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन्स म्हणतो.. ह्यांच्या सारखे हेच.. जरी आपण काही करु शकत नसलो, तरी यांच्या कार्याला हातभार जरुर लाऊ शकतो.. विचार करा..

Shri Ramakrishna Aarogya Sansthan.
Reg. no: E-1163
Address: Ring Road, Trimbakeshwar, Nashik-422 212, Maharashtra, India.
Cellphone: +919822703688, +919970803660
Email: [email protected]

(Cheques/draft should be drawn in favor of “Shri Ramakrishna Arogya Sansthan”.All donations to “Shri Ramakrishna Arogya Sansthan” are exempted from Income Tax under section 80G of Indian Income Tax Act of 1961.)

एकदा स्वामी विवेकानंदांना विचारलं होतं की तुम्ही कुठल्या देवाची सेवा करता? यावर स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ” मी त्या परमात्म्याची सेवा करतो , ज्याला अज्ञानी लोकं मनुष्य म्हणतात”

चवीने खाणार हैद्राबादला…

Written by  on December 30, 2007
पॅराडाइझॉल ऑफ फेम.

पॅराडाइझॉल ऑफ फेम.

हैद्राबाद म्हणजे तर खवय्यांची राजधानी. व्हेज – नॉन व्हेज खूप उत्तम क्वालिटीचं मिळतं इथे. मग ते अगदी रस्त्यावरच्या  गाडीवरचे दोसे असो किंवा हाय क्लास हॉटेल मधले कबाब- बिर्याणी असो. चवीशी कुठेच  दगाबाजी केलेली नसते.

20140302_084017आमच्या कंपनी गेस्ट हाउस समोरच एक दोसा इडली ची गाडी लागायची. रोज सकाळी समोरून जाताना त्या माणसाला सफाईने दोसा टाकतांना बघायचो म्हणून एक दिवस थांबलो , आणि नंतर मात्र दररोज न चुकता हजेरी दिली ह्याच गाडीला. इथे स्ट्रीट फूड मधे उपमा बटर दोसा नावाचा प्रकार मिळतो. तव्यावर दोसा टाकल्यावर त्यावर चांगलं ३०  ग्राम अमूल बटर, पातळ केलेला उपमा आणि चटणी लावून त्याला अगदी खरपूस होई पर्यंत तव्यावर रोस्ट केले जाते. इतक्या  जास्त प्रमाणात घातलेल्या अमुल बटर मुळे वरून कुरकुरीत पण आतून मात्र थोडा नरम असा दोसा   तुमच्या समोर खास हैद्राबादी आल्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी या सोबत हातात दिला जातो.  पहिला घास तोंडात घातला,जिभेवर चवीचे युद्ध सुरु होते. आल्याच्या आंबटगोड चटणीचा फणका  आणि दोसा कॉम्बीनेशन अफलातून करतो. आणि भैय्या एक और दोसा बनाओ अशी ऑर्डर आपसूकच दिली जाते.

20140303_100229स्ट्रिट फूड मधे केवळ हा एकच प्रकार नाही, तर गरमागरम वाफेभरली  लुसलुशीत इडली चटणी तुमच्या समोर त्या भांड्य़ातून काढून वर चटणी घालून मिळते अर्थात थोडा वेळ थांबायची तयारी असेल तर तुमच्या समोर  गरम  कुरकुरीत मेदू वडा तळून  पण मिळतो. इकडे हल्ली तवा इडली आणि तवा वडा हा प्रकार बरेच लोकं आवडीने खाताना दिसले, म्हणून एक प्लेट ऑर्डर केली होती. भरपूर बटर मधे तव्यावर कांदा टोमॅटो घालून चांगलं फ्राय करून त्या मधे इडली , किंवा वडा, तवा रोस्ट केला जातो. सोबतच नेहेमीची हैद्राबादी मिळगी पुडी प्रमाणे असणारी गनपावडर चटणी पण तो घालतो. मला फारसा हा प्रकार आवडला  नाही

हैद्राबादला टूरला जातोय म्हटल्यावर बहुतेक ९० टक्के लोकं, अरे पॅराडाइज मधे बिर्याणी खायला नक्की जा.. हे हमखास सांगतात. जवळपास साधारण ६० वर्षाची परंपरा असलेले हे पॅराडाइज  म्हणजे एक मोस्ट हॅपनिंग  प्लेस आहे हैद्राबादचे.  ह्यांच्या हॉल ऑफ फेम मधे एक फोटो लावलाय, तो शेअर केलाय बघा इथे. त्या मधे सलमान पासून, सचिन तेंडूलकर ते राहूल गांधी पर्यंत आणि इतरही सगळी नेते/ सिनेमा  कलाकार  हिरो हिरोइन्स इथे हजेरी लावून गेल्याचे दिसते. ह्या हॉटेल ला आजपर्यंत बरेचदा  बेस्ट बिर्याणी अवार्ड, टाइम्स बेस्ट फूड अवार्ड आणि बेस्ट हलीम बिर्याणी अवार्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अर्थात त्या पुरस्कारांच्या मुळे हॉटेल ची किंमत नाही, तर हॉटेल मुळे पुरस्कारांचा मान वाढलाय  . ह्या हॉटेल ची स्पेशालिटी म्हणजे बिर्याणी  पण इथले  कबाब सुद्धा अप्रतिम असतात.

सीख कबाब पॅराडाइज चे.कबाब म्हणजे माझा जीव की प्राण.  व्यवस्थित बनवलेले सिख कबाब असतील, तर त्या  पुढे जगातले इतर कुठलाही पदार्थ झक मारतील. कबाब बनवण्याची पण एक कला आहे . कबाब म्हणजे कसा, तर आतून मस्त पैकी मॉइस्ट असायला हवा, आणि त्याच सोबत तो व्यवस्थित शिजलेला पण असावा. कबाब कसा बनेल ते तंदूर वर अवलंबून असते, फार गरम तंदूर असेल तर कबाब चा वरचा पोर्शन जळल्या सारखा होतो- मॉइस्चर निघून जातं, आणि चव एकदम वाईट लागते. तंदूर थंड असेल तर आतला पोर्शन कचवट रहातो,  पण इथला कबाब मात्र अगदी व्यवस्थित , वरून क्रिस्पी आणि आतून मॉइस्ट.. कबाब चा एक तुकडा , सोबतच्या हिरव्या पुदीन्याची चटणी लाऊन  जिभेवर ठेवयचा आणि सोबत दिलेले क्रिस्पी आणि फ्रेश सॅलड  पण सोबत तोंडात भरायचे..हा कबाब म्हणजे एक टोटल सॅटिस्फॅक्शन.चव ही पदार्थात नसते, तर ती आपल्या मनात असते …  आणि इथले कबाब अगदी माझ्या मनातल्या चवीशी जुळणारे.

पॅराडाइज बिर्याणी

पॅराडाइज बिर्याणी

वेटर ने कबाब आणि बिर्याणी पण एकदमच आणून समोर ठेवली होती. चिकन बिर्याणी म्हणजे चिकन मसाला मधे भात शिजवलेला नाही, तर अगदी खास हैद्राबादी स्टाइल ने लेअर्ड बिर्याणी शिजवली जाते. बिर्याणी मधे भात अगदी रेशमासारखा मऊ,पण एकदम मोकळा शिजवलेला ,  त्या भाताच्या आडून चिकनचा लेग पिस, मला उचल , मला उचल म्हणून खुणावत होता.शेजारी दोन कबाबचे पिसेस..इथल्या बिर्याणीची एक खासीयत म्हणजे मसाल्यामधे केशराचा केलेला मुबलक वापर. केशराचा फ्लेवर प्रामुख्याने खातांना, इतर फ्लेवर्स बरोबर असूनही वेगळा जाणवतो. इथली बिर्याणी तिखट नसते, कदाचित इंटरनॅशनल क्राउड येतो म्हणून तिखटपणा कमी केला की काय असे वाटते. पण बिर्याणी मसाला थोडा जास्त तिखट चालला असता.

20140303_142358

थोडं चिकन फ्राय सारख< पण अजिबात वातड न झालेले, कुठल्यातरी साऊथ इंडीयन मसाल्या मधे रोस्ट केलेले . वेटर म्हणाला आमची बेस्ट डिश आहे आजची म्हणून मागवले, आणि अजिबात पश्चाताप झाला नाही .

बिर्याणी सोबत मिरची का सालन, आणि  रायता दिलेला असतो, पण खरं सांगायचं तर त्या सोबत कशाचीच गरज भासत नाही. मिरची का सालन हा एक खास हैद्राबादी प्रकार. बिर्याणी सोबत तर हा हवाच. तिळाच्या कुटाच्या रश्शात केलेली हिरव्या मिरच्यांची करी म्हणजे हे मिरची का सालन. किंचित कोकम पण घातलेले असल्याने त्या ग्रेवी ला एक घरगुती टेस्ट जाणवते.

हैद्राबादचे रायलसीमा रुचिलू म्हणजे   एक ऑथेंटीक आंध्रा स्टाइल फूड मिळण्याचे ठिकाण.या हॉटेल मधे जायचे तर समोर जे काही येईल, ते तिखट असेल ही गोष्ट लक्षात ठेऊन आत पाऊल ठेवायचं.. आणि थोडा “मिर्ची कम डालना” असे वेटरला सांगून त्या डिशची मजा खराब करायची नाही. आम्ही दुपारी गेलो होतो. या हॉटेल च्या पण बऱ्याच शाखा आहेत, एक लकडी का पूल आणि दुसरी हिमायत नगरची मला माहिती आहे. चौथ्या मजल्यावर असलेले एक साधारण से हॉटेल असावे असा फिल येतो. फर्निचर अगदी साधारण, पण मेन्यु कार्ड उघडल्यावर लक्षात येतं की हे हैद्राबादच्या मानाने ओव्हर प्राइस्ड आहे.

देशी चिकन बिर्याणी, आंध्रा स्टाइल

देशी चिकन बिर्याणी, आंध्रा स्टाइल

वेटरला विचारले की स्पेशल क्या है? तो देसी मूर्गी की बिर्यानी हे नाव त्याने तेलगू मधे सांगितले 🙂 तर एक बिर्याणी आणि साईड डीश म्हणून चिकन -काहीतरी आंध्रा  नाव होतं, कढीपत्ता वगैरे घालून मॅरिनेट केलेले   चिकनचे पिसेस डिप फ्राय केलेले असावे,  आणि लकीली ते वातड नव्हते. एक तुकडा तोंडात घातल्याबरोबर  जाणवले की  देशी चिकन ते देशी चिकनच! ब्रॉयलर   ला त्याची सर नाही, थोडं फ्लेश कमी असतं, पण जे असतं ते एकदम चवदार… .‘इथली बिर्याणी पण खूप छान होती. पण चिकन स्किनिंग केलेले नव्हते, मला स्किन आवड्त नाही फारशी ( फॅट फोबिया म्हणा हवं तर!)  बिर्याणी मधे वापरलेला मसाला थोडा तिखटाकडे झुकणारा, पण ऑथेंटीक आंध्रा स्टाइल. मजा आली. साइड डीश म्हणून घेतलेले सोबतचे चिकन पण छान होते. दोन्ही डिश कशा संपल्या  हेच समजले नाही.   या हॉटेल मधे बिर्याणी ची क्वांटीटी खूप कमी होती. म्हणजे पॅराडाइज मधे एक बिर्याणी दोघांना पुरुन उरते, इथली एकाला पण पुरेशी नव्हती. पण बिर्याणीच्या चवी समोर हे सगळे निगेटिव्ह पॉईंट्स माफ !!! रोहन सांगत होता की इथे रॅबिट करी छान मिळते, पण फॅट्स च्या भितीने टाळली. कदाचित पुढल्या वेळेस नक्की!

भाताचा ढिगारा समोर आणि त्या सोबत हे सगळं.....

भाताचा ढिगारा समोर आणि त्या सोबत हे सगळं…..

हे सगळं जरी झालं तरी पण  आपल्या घरच्या  वरण भात आणि वर भरपूर तूप…. त्याची सर कशालाच नाही, आणि ती आठवण झाली की मग मात्र एखादी खाणावळ शोधावी लागते., अर्थात महाराष्ट्रात पण मराठी थाली मिळत नाही, मग ती इथे आंध्रात तरी कशी मिळणार??  मग मात्र एखाद्या साउथ इंडीयन मिल्स वाल्या रेस्टॉरंट कडे पाय आपसूकच वळतात, आणि समोरच्या भाताच्या ढिगाऱ्यावर क्रमाक्रमाने , चटणी, लोणचं, भाजी, सांबार, रसम, आणि दहया सोबत रिचवल्या जातो.

इती लेखन सीमा

मॅन्स वर्ल्ड?? छे:.. कोण म्हणतोय असं??

Written by  on December 30, 2007

इट्स मॅन्स वर्ल्ड

आजकाल तर असं झालंय की तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला हेच ऐकायला मिळतं, की इट्स मॅन्स वर्ल्ड.. माझा तर अजिबात विश्वास नाही यावर. नेहेमीच असे अनुभव येतात रोजच्या जीवनात. आता हेच बघा नां, सिटी बस मधे त्यांच्या साठी खास सिट्स रिझर्व्ड असतात.. कां ? तर इट्स मॅन्स वर्ल्ड, आणि फेअरर सेक्स मस्ट बी ऑनर्ड.. म्हणुन.. !! आता ह्या स्पेशल लेडीज सिट्स असतांना पण स्त्रिया मात्र कुठेही म्हणजे इतर सिट्स वर पण बसलेल्या असतात. एखाद्या वेळेस जर स्त्रियांसाठी राखीव असलेल्या सिट्स वर जर पुरुष बसला, आणि पुढल्या स्टॉप वर एखादी स्त्री आली आणि समजा तो ताबडतोब उभा राहिला नाही तर त्याला मॅनरलेस, दिसत नाही का ही लेडीज सीट आहे ते.. म्हणून ऐकावं लागतं !!! आणि नेमकं समजा स्त्री पुरुषांच्या सिट वर बसलेली असेल तर तिने उठून उभे न राहिलं तरीही चालतं.. कारण तो तिचा हक्कच आहे ना.. आणि म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड!!

कॉलेज च्या ऍडमिशन्स… मधे पण लेडीज कोटा राखीव असतोच.. तसाही या मुलींना अभ्यासाशिवाय काही काम नसतंच, त्यामुळे त्यांना चांगले मार्क्स हे मिळतातच.मुलांना बघा बरं किती कामं असतात, चौकात जाउन चकाट्या पिटणे, ट्रेकींगला जाणे, मित्रांच्या बरोबर सिनेमा पहाणं, कॉलेजला बुट़्टी मारुन सिनेमा पहाणं.. अशी कित्ती कित्ती कामं असतात.. मग तुम्हीच विचार करा.. कोणाला रिझर्वेशनची आवश्यकता आहे?? मुलींना की मुलांना?? मुलींचं काय हो.. त्यांना तर रिझर्व कोटा मधे ऍडमिशन मिळतेच , आणि त्याच सोबत पुन्हा जनरल कोटा मधे पण त्यांची कॉंपिटिशन असते. कसं करावं गरीब बिचाऱ्या पुरुषांनी?? अन म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड!!

रस्त्यावरुन जातांना जर एखाद्या सुंदर मुलीच्या स्कुटीने तुमच्या कारला / बाइकला किंवा तुम्ही पाय़ी चालत असतांना तुम्हाला मागून येउन ठोकले, तरी पण त्यात तिची चूक नसतेच.. जी काही चूक आहे ती तुमची.. अहो तुम्ही अशी आपली बाईक एकदम का उभी केलीत रस्त्यावर?? मग मागून येउन कोणी तरी ठोकणारच ना. आणि जर तुम्ही पायी चालत असाल , तर तुम्हाला एवढं पण समजत नाही का की रस्त्याच्या बाजुने चालावे म्हणून?? असं ऐकावं लागेल… सगळ्या स्त्रियांनी एकत्र येउन तुमच्यावर असे आरोप केले तर समजू शकतं, पण अशा वेळी रस्त्यावर उभे असलेले झाडून सगळे पुरुष त्या मुलीचीच बाजू घेतात आणि तुम्हाला ज्ञान शिकवतात की तुम्ही कसे चुकलात ते. जिथे एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला साथ देत नाही.. त्या जगाला मॅन्स वर्ल्ड कसं म्हणता येईल हो?

एखाद्या सिनेमाला जायची टुम निघते . कॉलेजची सगळी मंडळी कुठल्यातरी एखाद्या मल्टीप्लेक्स वर भेटायचं ठरवतात. प्रत्येक गृप मधे एक सुंदरी असतेच- ( दोन सुंदर मुली एका गृप मधे कधीच पहायला मिळत नाही- कारण?? अहो एक म्यान मे दो तलवार कभी रह नही सकती..) तर सगळे जण वेळेवर येउन पोहोचतात, पण नेमकी ती सुंदरी मात्र अजूनही आलेली नसते. सिनेमाची वेळ झालेली , तिकिटं तुमच्याकडे असतात, पण ती आलेली नसते ना??… तेवढ्यात ती धापा टाकत येते, आणि तिने काही म्हणायच्या आतच, तुमच्यातलाच एक अगदी काळजी युक्त आणि भावनेने ओथंबलेल्या स्वरात म्हणतो, हल्ली बसच काही खरं नाही बरं.. खूप गर्दी असते आणि वर उशिरा पण येते बस हल्ली….. तेवढ्यात!!!! नेमकं तुम्हाला पण पोहोचायला उशीर होतो.. तुम्ही पण आपली बाईक लाऊन धावतच पोहोचता, तुम्ही येण्याच्या एकच मिनिट आधी ज्याने त्या मुलीची तारीफ केली असते तो – आणि तुमची सगळी मित्र मंडळी तुमच्यावर तुटून पडतात.. साल्या जरा लवकर निघायला काय होतं रे तुला?? आम्ही तर गेलो असतो आत्ता निघून आत, जर तूआला नसतास तर.. अन म्हणे हे मॅन्स वर्ल्ड….

एखादा भावस्पर्शी सिनेमा पहातांना तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर म्हणे ते शोभत नाही तुम्हाला.. कारण तुम्ही पुरुष आहात, आणि तेच जर एखादी स्त्री अगदी येता जाता नळातुन पाणी गळल्याप्रमाणे पाणी काढू लागली तर म्हणे ती ओव्हर सेन्सेटीव्ह आहे..म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड..

मला एक तरी अशी गोष्ट दाखवा, की जिथे पुरुषांना जास्त प्रिफरन्स दिलेला आहे ?? नाही नां सापडत एकही जागा? मला पण नाही सापडली अशी एकही गोष्ट्‍ ऑफिस मधे तुम्ही एखादं काम द्या , आणि संध्याकाळी तुमच्या टेबलवर आलं की त्यात पन्नास चुका दिसल्या. नेमके ५-३० झाले ..तुम्ही तिला सगळ्या चुका दुरुस्त करुन मग घरी जा म्हंटलं तर — शी , मेला किती बॉसिंग करतो ?? अशी तुमची इमेज संपुर्ण ऑफिस मधे होईल. आणि नेमकं- समजा तुमची बॉस जर स्त्री असेल आणि तिने तुम्हाला मुद्दाम साडेपाच नंतर थांबवले,असं काम दिलं की तुम्ही ते रात्री ९ पर्यंत पुर्ण करुच शकणार नाही- तर ती तुमच्या बेटरमेंट साठी करते आहे हे सगळं करते आहे.तुमचं प्रमोशन लवकर व्हावं म्हणून…. आणि म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड!

मुली अभ्यास खूप करतात.. तसेच काही मुलं पण खुप अभ्यास करतात. अर्थात ही गोष्ट सगळ्या स्त्रिया मान्य करणार नाहीत.. इतका अभ्यास केल्यावर मुलांना पण चांगले मार्क्स मिळू शकतातच ना? आता तुम्हाला ते मिळाले, तर म्हणतील ही इज अ लकी चॅप टु गेट सच अ गुड मार्क्स….. !!बॉस, असं कोणीच असं म्हणणार नाही की तुम्ही हुशार आहात म्हणुन, किंवा खुप अभ्यास केला म्हणून तुम्हाला चांगले मार्क्स मिळालेत ते!! आणि जर नेमक मुलींच्या बाबतीत घडलं तर?? मुली हूशारच असतात.. अन कष्टाळू पण!! असं ऐकायला मिळतं, अन तुम्हाला , जरा शिका तिच्या कडून कसा अभ्यास करायचा ते असंही ऐकावं लागतं.. अन म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड!!

सगळ्यात महत्वाचे.. मुलींनी क्रॉस ड्रेसिंग केलं ( ट्राउझर ,शर्ट्स ) तरी त्यावर कोणीच आक्षेप घेत नाहीत, म्हणतात इट्स बिझिनेस ड्रेस!!.. पण जर ते पुरुषाने केले तर ??? अन म्हणे इट्स मॅन्स वर्ल्ड!!!

NO Q PLZ

Written by  on December 24, 2007

unnamedविकांत  म्हणजे ज्याची आपण अगदी सोमवार पासून वाट पहात असतो तो.  आता अशा एखाद्या विकएंड ला सकाळी चांगलं साडे नऊ दहा पर्यंत झोप काढायची, आणि मग नंतर टीव्ही, पेपर वाचत दिवस  लोळत काढायचा, असा प्लान केलेला असला, की हमखास सौ. चा स्वयंपाक घरातून आवाज येतो, “अहो.. नुसते बसु नका, लवकर लवकर आटोपून कामाला लागा”  आणि कामाची यादी सुरु होते, बाथरुम मधे फ्लश   आणि किचन  बेसिन मधला नळ   वहातोय, बेडरुम मधल्या एसी च्या पॉइंट मधून काल धूर निघाला होता, इलेक्ट्रिशियन ला फोन केला होता, पण तीन दिवस झाले, तो फक्त येतो म्हणतोय पण अजूनही आलेला नाही. बाथरुम चे पाणी भिंती मधे झिरपतंय,  लवकर   एखादा गवंडी  बोलावून काय झाले असेल, आणि काय करावे लागेल ते पहा. पुन्हा तुम्हाला आठवडाभर वेळ मिळणार नाही.

हे वर दिलेले अनुभव माझे एकट्याचे नाहीत, तर प्रत्येकालाच थोड्याफार फरकाने येत असतात. सध्याच्या या इंटरनेट आणि मोबाइल फोन च्या जमान्यातही, जेंव्हा एखादी वस्तू दुरुस्त करायची असते, तेंव्हा मात्र   काम करणारी माणसेच लागतात्त, इथे इंटरनेट काम करू शकत नाही.

या इलेक्ट्रिशिअन्स , प्लंबर्स , गवंडी वगैरे मंडळी तुमच्या कामाच्या वेळेस येतील तर शपथ. सकाळी ११ वाजता बोलावले, तर  हा गडी हमखास संध्याकाळी ६ वाजता तुम्ही सिनेमाला, किंवा मार्केटला निघाल्यावर येणार हे नक्की. बरं दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या अनोळखी प्लंबर, कार्पेंटर  ला घरात घेणे कितपत सेफ असेल? कायम भीती वाटत असते मनात!

सुटी म्हणजे चक्क घरातली कामे करण्याचा दिवस असे समीकरण  झालेले आहे. या सगळ्यांमध्ये घरातल्या स्त्रीला तर मनःस्ताप होतच असतो, कारण काही कामे ही पुरुषानेच करायची असतात असा अलिखित नियम आहे.

हे सगळे असे नेहेमीच्याच जीवनातले  आपण जे फेस करतो ते प्रॉब्लेम्स. हल्ली बायका कार चालवतात, पण पंचर झाली किंवा कुठे बंद पडली की मग मात्र यांची पंचाइतच होते. करायचं काय? ट्रॅफिक जाम झालेला असतो, नुसते हॉकिंग सुरु, अशा परिस्थिती मधे   आणखीनच घाबरल्या सारखं होतं. मेकॅनिक बोलवायचा, तर कुठून?  किती पैसे घेईल तो? आपल्या पर्स मधे पैसे आहेत की नाही  पुरेसे?
किराणा सामान कालच आणलं पण नेमकं तुरीची डाळ राहून गेली, आता जा आणि तुरीची डाळ घेऊन या पाच किलो. कपाळावर आठ्या निश्चितच पडतात, कारण रविवार म्हणजे डीमार्ट मधे मोठ्ठी रांग असण्याचा वार. अगदी एक सामान जरी असेल तरीही सामान घ्यायला कमीत कमी १५-२० मिनिटे तरी रांगेत उभे रहावे लागते.

या अशा अनेक प्रॉब्लेम्सला आपण नेहेमीच तोंड देत्त असतो. बहुतांश वेळेस घरातल्या स्त्री लाच याचा जास्त त्रास होतो. या कामगारांना बोलावल्यावर त्यांनी लवकर न येणे, अर्धवट काम करुन निघुन जाणे, आणि नंतर पुन्हा दहादा फोन केला तरीही फोन न उचलणे- या मुळे होणारा मनःस्ताप , आणि  नवऱ्याची रविवारची वाट लागली म्हणून चालणारी कुरकुर!

या सगळ्या त्रासा  पासून पुण्याच्या  एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने  ने एक ऍप तयार केलंय –   ते कसे आणि का बरं करावे लागले असेल ?  एकदा तो ऑफिस मधे गेला असता, दोन वर्षाच्या मुलीने फोन करून आइसक्रीम हवे म्हणून निरोप पाठवला. २-३ दा घराजवळच्या किराणा दुकानदाराला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तो फोन बिझी असल्याने काही ऑर्डर देता आली नाही. काही वेळा नंतर ऑफिसच्या कामात व्यस्त झाल्याने आइस्क्रीम बद्दल विसरूनच गेला तो. पुन्हा एकदा मुलीचा फोन आला, आणि मग बराच वेळ प्रयत्न केल्यावर दुकानदाराचा फोन लागला.  तेंव्हा विचार मनात आला की , असे एखादे ऍप का असू नये??  मॅक डी जर होम डिलिव्हरी देऊ शकते, तर इतर बिझिनेस का नाही? आणि ह्या ऍप ^(http://rangmarathiche.com/goto/https://play.google.com/store/apps/details?id=com.aruman.appss.noqplzuser) चा जन्म झाला.

स्वतःच्या अनुभवातून आणि स्वतःला  झालेल्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी  स्वतःला कसे ऍप हवे आहे याचा विचार करून  बनवलेले हे ऍप आहे. सध्या हडपसर परिसरातील दुकानदार, आणि इतर   लोकं या ऍप वर आहेत. तुम्ही किराणा, हॉटेल्स आणि    या ऍप चे वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला टाइप करत बसायची गरज नाही, तर तुम्ही इथे ऑडीओ मेसेजेस देऊन ऑर्डर नोंदवू शकता.

इथे अटॅच असलेल्या सगळे कारागिराचे   पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे करून मगच त्यांना इथे जोडलेले आहे, म्हणजे हे लोकं घरात आले तरीही तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. अनेकदा होणाऱ्या त्रासापासून सुटका होण्यासाठी हे ऍप ^(http://rangmarathiche.com/goto/https://play.google.com/store/apps/details?id=com.aruman.appss.noqplzuser) निश्चितच उपयोगी पडेल .

पुणे हडपसर येथे या ऍप वर सध्या, किराणा, हॉटेल, मेकॅनिक्स, प्लंबर्स, पेस्ट कंट्रोल,  आणि अनेक जीवनोपयोगी सर्व्हिसेस जोडल्या गेलेल्या आहे.  पुणेकरांनी प्रयत्न करून पहायला निश्चितच हरकत नाही.

ही लिंक आहे ऍप ची..  https://play.google.com/store/apps/details?id=com.aruman.appss.noqplzuser ^(http://rangmarathiche.com/goto/https://play.google.com/store/apps/details?id=com.aruman.appss.noqplzuser)

नाही तर गुगल प्ले वर noqplz शोधा बस्स!

एक कविता..

Written by  on December 20, 2007

नाही हो..असे घाबरुन जाऊ नका, माझी तुमच्यावर अत्याचार करण्याची मुळीच इच्छा नाही .मला कविता करता येत नाहीत हे तर मी स्वतःच मान्य करतो. त्यामुळे आता पुन्हा इथे स्वतः कवितेच्या नावाखाली ट ला ट जोडून काहीतरी पोस्ट करण्याचा माझा विचार अजिबात नाही.. कारण माझे लिमिटेशन्स मला माहिती आहेत . इथे काही  पाडगावकरांच्या दोन कविता इथे पोस्ट करतोय.. पाडगांवकरांचा मी अगदी डाय हार्ड फॅन. त्यांची सगळीच पुस्तकं.. (जवळपास सगळीच २०-२२ तरी असतील) संग्रही आहेत. पाडगांवकर, विंदा आणि बापटांच्या कविता ऐकतंच मोठं झालोय आम्ही.. ह्या तिघांचा एकत्रित कार्यक्रम मी लहान असतांना पाहिला होता, तेंव्हापासून खरं तर कविता ऐकायची वाचायची आवड निर्माण झाली.ऑर्कुटवर असतांना पाडगांवकरांचा आणि इंदिरा संतांची कम्युनिटी पण  होती माझी.

त्यांच्या कवितांचं समीक्षण करण्याची माझी पात्रता नाही, त्यामुळे तो प्रयत्न करण्याची पण हिम्मत होत नाही. जस्ट आवडीच्या कवीच्या कविता शेअर कराव्या म्हणून हे पोस्ट!!
मरण येणार म्हणुन कोणि जगायचं थांबतं कां? ही कविता खुप आवडायची.. .
आणि ही अगदी प्रत्येकालाच आवडणारी… कविता.. तुम्हाला पण नक्किच आवडेल !!
कोणे एके काळी मात्र एकदा ऑर्कुटवर असतांना हा प्रयत्न केला होता कविता करण्याचा. पण तो मात्र पहिला आणि शेवटचाच.. नंतर लक्षात आलं, की आपला तो प्रांत नाही.. आपण फक्त गाणं ऐकू शकतो, म्हणू शकत नाही, कविता वाचून त्याचा आनंद घेऊ शकतो, पण करू शकत नाही.. आणि .. बस्स्स!!!
तो आधिचा लेख इथे आहे, माझ्या कवितांवरचा.. ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/02/04/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8/)

…. ऑन द रॉक्स विथ अ डॅश ऑफ लाइम!

Written by  on December 18, 2007

ओल्डमंक

एक दिवस रात्री फेसबुक वर स्टेटस अपडेट केले, ” प्रेइंग विथ ओल्डमंक “….  आणि त्यावर बऱ्याच कॉमेंट्स आल्या.. लक्षात आलं , की ओल्डमंक बरोबर लॉयल असणारे आपल्या सारखे बरेच लोकं आहेत, की जे ओल्डमंक चे नाव जरी वाचले  तरी नॉस्टेल्जिक होतात.

आता नवीन वर्ष आलंय जवळ. सगळ्यांचेच काही ना काहीतरी प्रोग्राम्स असतीलच. आमचे पण असायचे. बहुतेक आम्ही सगळे मित्र एकत्र भेटून  ओल्डमंक   बरोबर एंजॉय करायचो. इतकी वर्ष झाली तरीही  ओल्ड मंक आजही माझा आवडता ब्रॅंड आहे. एखाद्या पार्टी मधे   स्कॉच आणि ओल्डमंक असली   तर  मी ओल्डमंक प्रिफर करतो. माझ्या मते या  जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक म्हणजे  ओल्डमंक पिणारे आणि दुसरे म्हणजे ओल्डमंक  न पिणारे! दोन ओल्डमंक पिणारे एकदम घनिष्ट मित्र होऊ शकतात हा माझा अनुभव आहे. कारण कधी पण बार मधे गेले, की काय मागवायचं या बद्दल विचार करायची वेळच पडत नाही-न मेन्यु कार्ड न पहाता, ओल्डमंक विथ सोडा अ‍ॅंड आइस  ही ऑर्डर दिली जाते.

ओल्डमंक ची ओळख तशी लहानपणीच  झाली. काकाच्या कपाटात   ओल्डमंक ची बाटली असायची, आणि त्याबद्दल एक वेगळंच कुतूहल असायचं. काय  असेल बरं त्या मधे? शेवटी एक दिवस  मी आणि विनयने त्यातली थोडी झाकणात घेऊन  चाखून पाहिलीच आणि   चव तर खूपच आवडली  . नंतर हळू हळू झाकणाचा पेग झाला, आणि जेवढी लेव्हल कमी गेली असेल, तेवढे पाणी……………असो..

जेंव्हा नवीन नवीन नोकरी लागली होती, तेंव्हा बहुतेक दर बुधवारी रात्री  मित्रांसोबत  बैठक व्हायची. जास्त पैसे नसायचे, आणि कमी पैशात मिळणारी व्हिस्की घेतली, की दुसऱ्या दिवशी डोकं चढणे हे नक्कीच ! व्हिस्की उगीच सोफिस्टिकेटेड ड्रिंक वाटायची मला. जेंव्हा व्हिस्की मधला फोलपणा लक्षात आला, तेंव्हा अगदी कॉलेजच्या दिवसापासून साथ देणारी ओल्डमंक पुन्हा आठवली, आणि तिची साथ काही सुटली नाही. सुरुवातीला नोकरी लागल्यावर व्हिस्की , जिन, व्होडका   ह्या फॅन्सी  ड्रिंक्स  चा प्रयत्न नक्कीच केला होता, पण  फारशी कधी पचनी पडली नाही. स्कॉच परवडायची नाही, आणि मॅक डॉवेल, ओसी, एसीने, हॅंगओव्हर यायचा, तेंव्हा  लक्षात आले की ओल्डमंक ला पर्याय नाही- ओल्डमंक इज द बेस्ट!

कॉलेज मधे असतांना आउट ऑफ कम्प्ल्शन ओल्डमॉंक सुरु केली , कारण थोडी जास्त जरी झाली, तरीही दुसऱ्या दिवशी डोकं दुखणे किंवा हॅंग ओव्हर हा प्रकार कधीच होत नसे. इतक्या वर्षानंतरही  केवळ हेच कारण आहे, की आजही माझी फेवरेट रम ओल्डमंक आहे, बरोबरचे मित्र जरी बकार्डी व्हाईट /रेड  घेत असले, तरी पण मी अजूनही ओल्डमंक शी प्रामाणिक आहे.  ओल्डमंक सोड्या बरोबर घेतांना मला जी किंचित व्हॅनिला एसेन्स ची चव,आणि थोडीशी  गोड चव  असते, ती  खूप आवडते.  इतर कुठल्याही रम मध्ये  हा फ्लेवर नाही.  मॅक डी  कधी तरी ओल्ड मंक नव्हती म्हणून कॉम्प्रोमाईज म्हणून ट्राय करतो, पण चव अजिबात आवडत नाही मला.

माझे  काही सोफिस्टिकेटेड ( व्हिस्की घेणारे) मित्र ओल्डमंक ला “घोड्य़ांना पाजायचे  ड्रिंक” म्हणतात, पण त्याने  आम्हाला काही फरक पडत नाही 🙂

ओल्डमंक मधे कोला वगैरे टाकणे म्हणजे ओल्डमंक च्या ओरिजिनल चवी बरोबर प्रतारणा करणे आहे हे माझे मत , पण माझे मित्र मात्र कोल्या शिवाय ओल्डमंकचा विचारही करू शकत नव्हते. ओल्ड मंक मला  किंचित लिंबू पिळून ’ऑन द रॉक्स’ किंवा विथ फूल सोडा  आवडते.  कोला घालून रम घेतली की तिची ‘किक’ लवकर लागते, याचे कारण कोला मधे असलेली साखर. साखरे मुळे अल्कोहोल रक्तामध्ये लवकर भिनते ( म्हणजे चढते), असे रम+कोला घेणाऱ्या मित्रांचे मत आहे.

कॉलेजच्या दिवसात काही जरी झालं, तरी सब मर्ज की एक दवा, ओल्डमंक हे ब्रिद वाक्य होते. सर्दी , स्टफ नोज,  खोकला, किंचित ताप वाटणे, पोट खराब असणे,  तर ओल्डमंक मधे दोन चमचे मध, गरम पाणी , किंचित लिंबू घेतले की हमखास बरे वाटते अशी माझी खात्री होती. मग बहुतेक वेळा मध नसल्याने, फक्त गरम पाणी आणि ओल्डमंक ला दुसरा पर्याय नव्हता. डॉक्टरच्या “फी ” च्या पैशात ओल्डमंक ची ’चपटी’ मिळायची तेंव्हा ! खरं सांगतो,लग्न होई पर्यंत  मी कधीच डॉक्टर कडे गेलो नाही सर्दी , खोकला ताप या साठी.

असो, तर मंडळी ही ओल्डमंक बहुतेक सगळ्याच इंजिनीअर्सची आवडती.  मला वाटतं की   इंजिनीअर्स परदेशात गेल्यावर ओल्डमंक मिस करतात. माझा एक मावसभाऊ सिंगापूरला होता तो   नेहेमी,  भारतातून  कोणी येतंय ते पहातच असयचा. इथे आल्यावर सांगायचा की ओल्डमंक च्या चवीशी साधर्म्य असणारी रम शोधणे हाच त्याचा छंद झाला होता.  इथून कोणी जाणार असला की त्याच्यासोबत  ओल्ड मंक आणि पार्लेजी पाठव म्हणायचा!  चहात बुडवून खायला पार्ले जी ,ओल्ड मंक , आणि चितळ्यांची बाकरवडी ह्या गोष्टींना अजिबात काहीच पर्याय नाही हे त्याचे स्पष्ट मत होते, आणि त्याच्याशी मी पण सहमत आहेच.

ओल्डमंक ची एक ओल्डमंक च्या आकाराची बाटली पण मध्यंतरी मिळायची . ती रिकामी बाटली पण बऱ्याच लोकांच्या घरात दिसायची शोकेस मधे, पण आम्ही मात्र कायम ’चपटी’ च घ्यायचो विकत.आणि तसेच एक  ओल्डमंक रिझर्व नावाची १२ वर्ष मॅच्युअर केलेली प्रीमियम रम   पण मार्केट मधे लॉंच केली होती, पण आमच्यासारखे लोकं मूळ ब्रॅंड सोबतच प्रामाणिक राहिले .  आमच्या लहानपणी सगळ्यांच्याच घरात मनी प्लांट लावण्याची फॅशन आली होती. बहुसंख्य घरात ओल्डमंक रमच्या बाटली मधेच हे मनीप्लांट लावलेले दिसायचे. या प्लांट साठी तरी या बाटलीला खूप मागणी असायची. आता गेले ते दिवस! हल्ली मनीप्लांट लावण्यात  लोकांचा इंटरेस्ट संपलाय आणि आमच्यासारखे काही खास दर्दी लोकंच ओल्डमंक शी प्रामाणिक आहेत. आजही एक मित्र आणि मी  ओल्डमंक बरोबर प्रेअर करत बसलोय भोपाळ मधे.

 

मित्र म्हणतो, अरे ओल्डमंक ला  बहुतेक कोणी वाली रहाणार नाही, त्यावर माझं उत्तर होतं, ” जो पर्यंत इंजिनिअरींग कॉलेजेस आहेत तो पर्यंत ओल्डमंकला मरण नाही.. काळजी करू नकोस..

लगान इन रिअल लाइफ..

Written by  on December 12, 2007

माझे काका नामांकित वकील. म्हणजे इतके की अमरावतीला नुसतं आप्पा कुलकर्णी अमरावती , इतका पत्ता टाकला तरीही पत्र मिळेल. तसे बार कौन्सिलवर पण निवडुन आले होते पुर्वी, त्यामुळे पण बऱ्याच लोकांना माहिती आहेत ते.. खरं तर वकिली हा एक बेस्ट बिझिनेस आहे असं माझं मत आहे. जसे जसे तुमचे वय वाढत जाते तसे तसे तुम्ही जास्त पैसे कमाऊ शकता..डिमांड वाढते. रिटायरमेंटला काहीच वाव नाही. तुम्ही जरी केसेस घेणं कमी केलंत तरीही लोकं मागे लागतात,की कसंही करुन  ही एवढीच केस तुम्ही लढवा म्हणून.त्यामुळे अजूनही काका  खूप बिझी असतात..

काकांना खूप गोष्टी सांगायची सवय आहे. अगदी मनापासून समरसून गोष्टी सांगतात.  स्मरणशक्ती इतकी दांडगी की अजूनही प्रत्येक प्रसंगाचे वर्ष सांगतात, कधी काय झालं होतं, किंवा कोण काय म्हणालं होतं ते अगदी नावानिशी सांगतात

.इंग्रजांचं राज्य होतं,तेव्हाची ही गोष्ट आहे…इंग्रज कसेही असले तरी एक गोष्ट आहे जी त्यांचा सुसंस्कृतपणा दाखवते. ती म्हणजे त्यांनी कोणालाच आणि कधीही गुलाम म्हणून वापरलं नाही, विकलं नाही .  अर्थात, मजूर म्हणुन मलेशिया, श्रीलंकेत कांही लोक नेले होते , त्यांना पण पैसा देऊनच काम करवून घेतलं गेलं. नेमका ह्याच्या विरुद्ध अमेरिकन्स नी जिथून शक्य होईल तिथुन गुलाम नेले होते. म्हणूनच भारत गुलाम गिरी मधे होता हे म्हणणे चुकीचे वाटते . भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता असे म्हणणेच बरोबर ठरेल..

कालच बोलतांना एक गोष्ट सांगितली माझ्या आजोबांची. माझे आजोबा म्हणजे आर. जे. कुलकर्णी.. शेवटच्या काळात म्हणजे १९५५ च्या सुमारास ते कलेक्टर होते अकोल्याचे, त्यांच्या संदर्भातली ही गोष्ट आहे. अगदी सिनेमातल्या सारखा प्रसंग आहे ह्यात.

तुम्ही लगान पाहिला आहे का? मला सुरुवा्तीला तो चित्रपट पाहिला आणि त्यात जे कांही दाखवलंय ’ब्रिटीश लोकांचे वागणे – कायद्याला धरुन” हे जरा अतिशयोक्ती ्पूर्णंच वाटलं होतं. असं वाटायचं की त्यांच्या हातामधे सत्ता असतांना त्यांनी सत्तेचा (दूर) उपयोग का केला नाही?? शेवटचा बॉल नो बॉल दिला नसता , किंवा कॅच दिली असती तर कोणाला कळलं असतं?? पण त्यात हे दाखवलंय की ब्रिटीश अगदी कायदेशीर पणे खेळ खेळलेत, आणि जेंव्हा भारतीय जिंकतात तेंव्हा त्या युरोपियन माणसाला शिक्षा करतात. पण जी गोष्ट काकांनी सांगितली ती ऐकल्यावर मात्र पटलं ते..

ही गोष्ट आहे माझे आजोबा जेंव्हा तहसिलदार होते तेंव्हाची. १९२७ चा काळ. माझे आजोबा तेंव्हा तहसिलदार होते अमरावतीला. आजोबांचे केस अवेळीच पांढरे झाले होते. तेंव्हाचा इंग्रजांचा काळ. सगळ्या वरच्या पोस्ट्स इंग्रजांकडेच होत्या. तेंव्हा सी पी ऍंड बेरार प्रोव्हेन्स होतं, आणि त्या प्रोव्हेन्स चा कमिश्नर आय सी एस अधिकारी  जेम्स ग्रिन फिल्ड होता. हा अधिकारी नुकताच आलेला होता या भागात.

त्याने कुठलीही गोष्ट आपल्याच मनाप्रमाणे करण्याची सुरुवात केली. कुणालाही नोकरिवर ठेवणे किंवा काढून टाकणे ह्याची ऍथोरिटी त्याच्याच कडे होती.  तुम्हाला फोर्ड ची ती गोष्ट  आठवते का? एका इंजिनिअरला त्याने टाईट पॅंट घालतो, म्हणजे तो गे आहे असे म्हणून नोकरी वरून काढून टाकले होते तसलाच प्रकार होता ग्रिन फिल्ड चा .

एके दिवशी सकाळी आजोबा त्यांना भेटले असता त्याचे लक्ष आजोबांच्या पांढऱ्या केसांकडे गेलं. त्याने ताबडतोब ऑर्डर काढली की आर.जे.कुलकर्णी यांचे केस पांढरे आहेत आणि त्यांना हार्ट चा प्रॉब्लेम आहे ( ही गोष्ट पुर्ण पणे खोटी होती. आजोबांना हार्ट चा कांहीच त्रास नव्हता.) म्हणून नोकरी वरून बर्खास्त करण्यात येत आहे.

आता करायचं तरी काय? लग्न झालेलं, लहान लहान मुलं, म्हणून स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून त्यांनी ’शाला पत्रिका’ नावाच्या मराठी विकली पेपरचं संपादन सुध्दा केलं. त्या काळी अमरावती मधे ना.रा.बामणगांवकर ’उदय’ नावाचा पेपर पण काढत होते. असो. विषयांतर होतंय..
तर काय सांगत होतो,की आजोबांना नोकरी वरून काढल्यानंतर त्यांनी सरकार दरबारी त्या आय सी एस कमिश्नरच्या अगेन्स्ट अपील केलं. डॉ. व्हॉड म्हणून तेंव्हा एक मोठे सरकार दरबारी डॉक्टर होते. त्यांच्याकडे आजोबांची मेडीकल चेक अप करण्याची  केस गेली !

सरकारने असा निर्णय दिला की डॉ. व्हॉड हे आजोबांची तटस्थपणे मेडीकल टेस्ट घेतिल आणि आपले फाइंडींग्स सरकारला जमा करतिल. कोर्टात केस सुरु होतिच – बर्खास्तीची..डॉ. व्हॉड ने मग सगळं टेस्ट करुन आजोबांना काहिच झालेले नाही असा रिपोर्ट दिला.

त्या रिपोर्ट च्या आधारावर आजोबांना पुन्हा नोकरीवर  घेण्यात आलं. आणि ग्रिनफिल्ड ची बदली करण्यात आली.

ही गोष्ट ऐकली आणि मला पटलं, की हो… लगान मधे जे दाखवलंय ते होऊ शकतं…!