सारेगमप लिल चॅम्प्स विनर कार्तिकी…
आता दोन दिवस झालेत.बराच धुराळा उडाला होता कार्तिकी जिंकली !तेंव्हा. आरोप प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रिमधे तिच्या बिचारीच्या विजया कडे थोडं दुर्लक्षच झालं. नाही का??
आपण सगळे मॅचुअर्ड लोकं, कमीत कमी आपण ( मी स्वतःला रेफर करतोय ) तरी अशी कोती मनोवृत्ती दाखवायला नकॊ होती.कमीत कमी आता तरी तिच्या आनंदात सहभागी होऊ..
हा लेख जो आहे, तो सगळ्या ब्लॉग्ज वर वाचलेल्या जंत्री ची गोळा बेरीज आहे. या मधे माझी मते आहेतच, पण सोबत , इतर लोकांची मते पण कव्हर केले आहेत…
मला स्वतःला पण कार्तिकी पेक्षा आर्या व प्रथमेश जास्त आवडायचे. याचे कारण प्रथमेश आणि आर्याच्या गाण्यातला व्हर्सटाइलनेस. कार्तिकी च्या आवाजा मधे गझल आणि कव्वाली खूपच सुंदर वाटते , पण इतर गाण्यामधे तिचे लिमिटेशन्स आहेत ,असं मला तिची गाणी एम पी ३ वर ऐकल्यावर जाणवलं असंही मत काही लोकांच आहे..
कार्तिकी मधे एक स्पार्क आहे जो इतर कुठल्याही चॅम्प मधे नव्हता. तिने कुठेही प्रचलित नसलेली गाणी, की ज्या गाण्यांना तिच्याच वडिलांनी चाल लावलेली आहे अशी , म्हणून त्या वर “नी” मिळवला. अर्थात हे गाणं जे तिने गायलं ते आधी कुणिच गायलेलं नसल्यामुळे, मेझर स्केल नव्हती आणि तिच्या गाण्याला भर भरुन प्रतिसाद मिळाले.
या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत हे विसरुन चालणार नाही, की कार्तिकी ही पहिली अशी पार्टीसिपंट आहे की जिला पहिल्यांदा दोन “नी” मिळाले. हे एकच दर्शवते की तिच्या मधे स्पार्क हा इन बिल्ट आहे.
काही लोकांचं मत असंही दिसलं की, कार्तिकी, दिसायला फार ’क्युट’ नाही , म्हणून तिच्या पेक्षा आर्याला लोक प्रिफर करतात. परंतु, मला तसे वाटत नाही. या गाण्यांच्या जगात दिसण्यावर काही अवलंबून नसते. तसं असतं तर लता ताई किंवा आशा ताई कधीच लोकप्रिय झाल्या नसत्या.किंवा अनुराधा पौडवाल ह्या जास्त यशस्वी गायिका झाल्या असत्या. त्यांचं विश्व केवळ गुलशन कुमार ह्यांच्या टी सिरिज कॅसेट कंपनी भोवतीच फिरत होतं. ( त्यांचा उपमर्द करायचा नाही पण जे काही वाटतंय तेच लिहितोय)
कार्तिकीचे उच्चार हे अगदी शुद्ध नाहीत , तरी पण तिला झी टिव्ही ने “जिंकवले” असाही मत प्रवाह काही ठिकाणी लोकांच्या बोलण्यातून जाणवला. चांगलं गाणं ऐकतांना शुध्द उच्चार, स्वर, आणि ताल ह्यांचे ज्ञान आवश्यक आहे. आणि कार्तिकीने जी गाणी म्हटली त्यात तिने काहीही चुका केल्या नाहीत. तिचे चुकीचे उच्चार केवळ ती जेंव्हा बोलत होती तेंव्हाच लक्षात आले. मी स्वतः तिची सगळी गाणी जी गावाकडची नाहीत ती पण.. ऐकली ( उदा. दाटुन कंठ येतो,दिवस तुझे, दाटून कंठ येतो, केंव्हा तरी पहाटे, माझ्या मनी प्रियेच्या, माझ्या मनी प्रियेच्या,धुंदीत गंधित, सजल नयन, माझिया प्रियेला, मन शुद्ध तुझं, )वगैरे गाणी ऐकली, पण मला कुठेही फारसा उच्चारांचा प्रॉब्लेम जाणवला नाही.
या कार्यक्रमा मुळे काही खेड्यात रहाणाऱ्या प्रथमेश सारख्या हिऱ्याचा शोध लागला हेच काय ते या कार्यक्रमाचे फलित.
कार्तिकी ची गाण्यातली इम्प्रुव्हमेंट ही प्रत्येक एपिसोड मधे थोडी थोडी इम्प्रुव्ह होत गेली. तिला पण आपल्याला काय “चांगलं ’ जमतं हे समजलं, आणि नंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. प्रत्येक एपिसोड ला केवळ अंतर्गत जज नव्हे तर पाहुणे जज यांनी पण तिचा पर्फॉर्मन्स वाखाणला. बरेचदा तिला बेस्ट पर्फॉर्मर ऑफ द एपिसोड चं प्राइझ मिळालं.
कार्तिकी चा आवाज हा अगदी मनातून निघालेला आणि ह्रदया पर्यंत पोहोचणारा वाटतो. तुम्ही गाणी जेंव्हा टीव्हीवर किंवा यु ट्युब वर पहाता, तेंव्हा स्वरा कडे तितकेसे लक्ष जात नाही, परंतु तुम्ही जेंव्हा तीच गाणी एम पी ३ वर डाउन लोड करुन ऐकता, तेंव्हा त्यातल्या लिमिटेशन्स एकदम समोर येतात. कार्तिकी च्या गाण्यात, फारशा चुका दिसून येत नाहीत,या उलट प्रथमेश च्या गाण्यामधे जिथे शब्द स ने संपतो तिथे उच्चाराचा प्रॉब्लेम स्पष्ट दिसून येतो..
काही लोकांच्या मते ह्या स्पर्धा केवळ खेड्यापाड्यात टॅलंट आहे हे दाखवण्यासाठी भरवतात. पण जर, तसे असते, तर आरावली हे आळंदी पेक्षा ही लहान खेडं आहे. तेंव्हा ह्या नियमाने प्रथमेश चा नंबर यायला हवा होता.
या वर्षी ५० टक्के मते, जे आहेत ते जजेस ने दिले, म्हणजे समजा, एखाद्या पार्टीसिपंट ला जर जजेस ने ४५ टक्के मत दिले तर ती४५ टक्के मते ही डिसायडींग फॅक्टर होतात. मग एस एम एस चा फारसा इम्पॅक्ट झाला नाही. माझ्या मते पण हेच झालं असावं.जजेस नी दिलेल्या जास्त मार्कांमुळे कदाचित तिला लिव्हरेज मिळालं असावं… असो.
कदाचित… जर सगळ्या जजेस चं खरं असेल, तर- कार्तिकी पण भिमण्णा ज्या प्रमाणे धारवाड सारख्या लहानशा खेड्यात जन्म घेउन , राष्ट्रपतिभवना पर्यंत पोहोचले.. तशीच ती पण पोहोचेल…
असो.. आता ह्या वादावर हळु हळू पडदा पडणारच आहेच.. आता जे झालं ते झालं, त्यावर काथ्याकुट करुन काही फारसा फायदा होणार नाही. ती कार्तिकी पण लहानच आहे, म्हणजे हार्डली ९-१० वर्षाची पोर ती.. तिच्या आनंदात आपण सगळे सहभागी होऊ या…