अडवाणीजी-बाळासाहेब कृपया भांडणं थांबवा..

Written by  on September 4, 2006

आज मुंबईला आलेले असतांना अडवाणीजींनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली . पण बाळासाहेबांनी स्पष्ट नकार कळवला.कालच्याच पेपरला बाळासाहेबांनी केलेलं वक्तव्य.. कमळाबाई प्रीतीची.. चा अर्थ मला तरी कळेनासा झाला आहे. एक दिवसा पूर्वी बाळासाहेबांनी एक स्टेटमेंट दिले आणि आजची कृती अगदी त्याच्या विरुद्ध! जर हिंदुत्व वादी मते फुटली तर इलेक्शन चा निकाल काहीच सांगता येणार नाही.

ही भेट नाकारल्या मूळे भाजपाच्या गोटात फार अस्वस्थता पसरली आहे. भाजपा च्या काही लोकांना तसेच शिवसेनेच्या काही लोकांना असे वाटते की, अशा परिस्थितींमध्ये भाजपा ने शिवसेनेशी काडीमोड घेऊनच टाकावा.अर्थात ह्या युतीचा फायदा हा फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई भागातच होतो.

माझं मत असं आहे की  सध्या ,विदर्भ आणि मराठवाड्यातही शिवसेनेचे बळ काही विशेष नाही .मनसेने ऑलरेडी शिवसेनेची आणि कॉँग्रेसची मतं खाल्ली आहेतच. भाजपाची अर्थात संघाची मतं मात्र कुठेही वळणे शक्य होणार नाही.अशा परिस्थिती मधे शिवसेनेला भाजपा चा पर्याय जास्त संयुक्तिक ठरतो. विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा जो, बाळासाहेब नेहेमी  उचलून धरायचे,   त्याच मुद्द्याला तिलांजली देऊन , कसा प्रचार करतील तेच कळत नाही?

आजपर्यंत , हाच अनुभव आहे की हिंदुत्ववादी मते फुटली की कॉँग्रेसची ची जीत होते. पण यंदा, मात्र कॉंग्रेसच्या मतांमधे मनसेने पाडलेले खिंडार, आणि राज ठाकरे ह्यांच्या कडे मराठा मतांचा झुकाव, हा मात्र सगळं समिकरण बदलू शकतो.

तसेच मायावतीचा इफेक्ट विसरता येणार नाही. म्हणजे बहुजन समाज पार्टीची पण एक गठ्ठा मते आहेतच. माझा एक मित्र सांगत होता की , मनसे मधे बरेच मुस्लीम युवकांनी  पण जॉइन केले आहे. तेंव्हा मायावती च्या बसपा ची काही मते नक्कीच मनसे कडे डायव्हर्ट होतील .अशा परिस्थिती मधे इलेक्शन चां निकाल काय आणि  कसा लागेल तेच कळत नाही.

कितीही झालं तरीही, परिवारातील जी मते आहेत , ती मात्र संपूर्णपणे भाजपाच्या पारड्यात पडणार  ह्यात काहीच शंका नाही. शिवसेना+काँग्रेस युती  जर झाली तरीही एक मात्र खरं की कुठलाही भाजपाचा मतदार काँग्रेसला मते देणार नाही, ह्याची मात्र खात्री आहे.परंतु शिवसेनेची काही मते भाजपाला आणि मनसे कडे जातील असे वाटते.

रिपब्लिक पार्टी मधे अजुन ही ५ वर्षा प्रमाणेच लाथाळ्या सुरू आहेतच! अजुन ही राजकीय समिकरण इतकं  सरळ नाही..आपल्या म्हणजे , मतदारांच्या हातामधे वाट पहाण्या व्यतिरिक्त  काहीही नाही…..अजुन एक समिकरण आहे.. भाजप+मनसे.किंवा काँग्रेस+ मनसे…. लेट्स सी.. व्हॉट एल्स वी विल हॅव टु सी इन फ्युचर!

बाळासाहेब आणि अडवाणींना एकच कळकळीची विनंती. कृपया ही अंतर्गत भांडणं थांबवा. आम्हाला धर्म संकटामधे टाकु नका. आम्हाला बाळासाहेब जितके प्रिय आहेत तितकेच अडवाणीजी पण प्रिय आहेत.आम्हाला तुम्ही दोघेही एकत्र हवे आहात.

दोन डॊळ्यांपैकी कुठला डॊळा प्रिय आहे असे विचारले तर? तशीच अवस्था आमची झाली आहे.

अजुन पण  वेळ गेलेली नाही, भाजपा आणि शिवसेना युती ही काळाची गरज आहे.तेंव्हा सगळे रुसवे फुगवे सोडून पुन्हा एकत्र या आणि निवडणुक लढवा हीच आम्हा सगळ्यांची कळकळीची विनंती आहे..