दादा ,भाई ,नौरोजीं …

Written by  on April 15, 2006

rakshabandhan

राखी !!!

मला राखी

अगदी खूप खूप

मनापासून आवडते!!

.. काय झालं?? धक्का बसला का??नाही.. तुम्हाला अजिबात धक्का बसणार नाही हे वा्चून याची मला पुर्ण खात्री आहे. कारण तुम्ही खुप हुशार आहात हे मी चांगलं ओळखून आहे….  … तुम्ही अगदी बरोब्बर ओळखलं मी कुठली राखी म्हणतोय ते… अहो… आपली सावंतांची  राखी म्हणतोय मी….

पण एक राखी अशी पण आहे की  जी सगळ्याच तरुणांना, कुठल्या का कारणाने होईना, आवडते. दुसरी राखी पौर्णिमा मात्र सगळ्यांना घाम फुटवते आणि  मुलांच्या  हदयात धडकी भरवते. कधी कोण कुठुन येइल आणि  हातामधे राखी बांधेल ह्याचा नेम नसतो.  एखादीवर वर्ष भर गळ टाकुन बसावं, आणि नेमकं तिनेच राखी घेउन समोर उभं रहावं … आणि तिला कांही सांगायचा प्रयत्न केला तर मात्र “मी तुझ्या कडे त्या नजरेने कधी पाहिलंच नाही रे…” ( मनातल्या मनात म्हणायचं अगं बघ ना गधडे मग.. इतके मोठे मोठे डोळे आहेत तरी कशाला तुझ्या चेहेऱ्यावर..? एवढा मोठ पाच फुट ११ इंचाचा देह समोर असतांना तू कधी पाहिलंच नाही हे कसं म्हणू शकतेस?? ) असा डायलॉग ऐकायचा आणि  खाली मान घालायची.. ओशाळवाण्या चेहेऱ्याने… असु दे.. काही हरकत नाही असं म्हणायचं..

यातला एक जोक मात्र मस्त आहे, एका मुलाला एक मुलगी राखी बांधायला जाते, तर तो मुलगा सरळ नकार देतो, ती मुलगी म्हणते का नाही म्हणतोस?? तर त्यावर त्या मुलाचं उत्तर असतं…. वा रे वा, जर मी मंगळसूत्र आणलं तर तु घेशील का बांधून??? मग मी का म्हणून राखी बांधून घेउ??

’मानलेला भाउ’ हे नातं अगदी तकलादू स्वरूपाचं असतं..आणि अतिशय ’सेफ’ पण. या नात्याच्या आड अगदी काहीही केलं तरीही चालून जातं.अगदी आई वडिलांना पण हा माझा मानलेला भाऊ म्हंटलं की बरेच आई वडील त्या संबंधांकडे दुर्लक्ष करतात. ( मी नाही हं..)  माझ्या पहाण्यात एक मित्र होता, त्याने त्याच्या  सख्ख्या मावस बहिणीशिच लग्न केलं तेंव्हा तुम्ही हे मानलेल्या बहिणीचं नातं काय घेउन बसलात??  त्या पेक्षा मित्र हे नातं जास्त  स्वच्छ वाटतं आणि  जवळचं वाटतं मला तरी.

एकदा मित्र किंवा मैत्री म्हटली की मग मात्र त्यातला स्वच्छ पणा टिकुन रहायलाच पाहिजे. अर्थात ते पण इतकं सोपं नाही. कारण मैत्री आणि प्रेम या मधे अतिशय थिन लाइन असते,आणि ती कधी ओलांडली जाईल हे  सांगता येत नाही.   परिचय अती परिचयात अवज्ञा म्हणतात ते या बाबतीत अगदी खोटं ठरतं. इथे एक मेकांना व्यवस्थित ओळखायला लागले की मग  प्रेम सुरु होण्याची शक्यता जास्त असते. 🙂

बरेचदा एखाद्या मुलीवर आपलं प्रेम आहे हे लक्षात तेंव्हाच येतं जेंव्हा त्या  मुलीच्या घरचे लोकं  मुलं पहाणं सुरु करतात. आणि एक दिवस ती बॉंब स्फोट करते, अरे मला आज पहायला येणार आहेत ….  की जाणवतं.. अरे हे काय होतय़? मग अशा परिस्थितीत जर करेक्ट निर्णय घेतला तर ठीक.. नाही तर त्या न सुरु झालेल्या  प्रेमकहाणीचं थडगं बांधलं जातं दोघांच्याही मनात!

त्यामधे काही वावगं आहे असं पण म्हणता येत  नाही, असं सायकॉलॉजिस्टचं म्हणणं आहे.. कारण हा एक मानवी स्वभावाचा पैलु आहे. तो जसा आहे तसाच स्वीकारावा लागतो.. असं मी नाही तर फ्रॉयड म्हणतो. एकदा बायकोच्या सायकॉलॉजिच्या पुस्तकांत वाचलं होतं हे …नाहितर मला कुठुन कळणार ?

नाते संबंध नेहेमीच बदलत रहातात.मग ते मैत्री चं नातं असो.. की मानलेल्या भावाचं.. तेंव्हा ,, जरी कोणी राखी बांधली तरीही काळजी करु नका… दादा भाई नौरोजींचा मार्ग आहेच तुमच्या साठी… 🙂

भारतामधे खरंच असं होत असतं…..

Written by  on April 2, 2006
वापीहुन मुंबईला येतांना ट्रेन मधे एक लहानसा मुलगा, फार तर ३ वर्ष वय असेल,चेहेऱ्यावर  मिशा रंगवलेल्या, डोक्यावर एक जोकर सारखी टोपी. तिला एक लांब  दोरी आणि दोरीच्या टोकाला एक रंगबेरंगी गोंडा. कंबरेवर ची चड्डी सारखी खाली घसरत होती, तिला सांभाळत आणि नाक पुसत तो मुलगा सगळ्यांकडे पहात होता.. त्या  मुलाच्या बरोबर त्याची बहिण बहुतेक दोन वर्षं, बरोबर होते. तिचेही कपडे खुप मळलेले आणि फाटलेले.फ्रॉक खांद्यावरून घसरत होता. फ्रॉकला पाठीमागची बटन्स नव्हती. त्यामुळे लज्जा रक्षणाचे काम पण तो व्यवस्थित करु शकत नव्हता.
.
त्या मुलाच्या हातात एक लोखंडी रिंग.. इतक्या आकाराची की त्यातुन तो मोठ्या मुश्किलीने पास होऊ शकेल एवढी..त्या दोघांच्या बरोबर एक जरा मोठा म्हणजे १२-१३ वर्षाचा एक मुलगा. त्याच्या गळ्यात एक ढोलकी लटकवलेली, तो मुलगा ढोलकी वाजवत होता आणि ही दोन मुलं त्या रिंग मधुन एकदम पास होत होती. तसेच कोलांट्या उड्या वगैरे पण मारत होते.
.
तो लहान मुलगा मधेच थांबला, आणि आपली मान अशा तर्हेने फिरवू लागला, की त्याच्या टोपीचा गोंडा सुदर्शन चक्राप्रमाणे फिरु लागला. ती दोन्ही मुलं अगदी पॅथेटिक दिसत होती.आपलं खेळणं.. म्हणण्यापेक्षा कलाकारी झाली आणि ती दोघंही लहान मुलं डबाभर पैसे मागत फिरु लागली. डबा धरुन तो वाजवत पैसे मागू लागले. पैसे मागण्याचे काम अर्थात त्या लहान मुली कडे होतं.ओंजळीत मावणार नाहीत इतके पैसे मिळाले त्या मुलाला. प्रत्येकानेच एक दोन रुपये दिलेत.
परवा नाशिकला गेलो होतो, तर माझा भाचा आणि भाची दोघंही मार्केटला फिरायला गेले. तिथे डोंबाऱ्याचा खेळ सुरु होता. त्यात एक लहानशी मुलगी फारतर सात आठ वर्षाची असेल.. ती एका लांब ताणलेल्या दोरावर उड्या मारत होती. दोरावर चालणं हे तर आधी पाहिलं आहे पण खाली काहीही  सुरक्षा जाळी नसतांना इतक्या बिनधास्तपणे त्या दोरीवर उड्या मारणारी मुलगी बघितली आणि मनात चर्र्र्र्र झालं. वाटलं, जर ती खाली पडली तर   १० -१२ हाडं तरी मोडतील तिची..!गौतमी ला पण माझ्या प्रमाणेच जो दिसेल तो फोटो काढायची सवय आहे. तिने एक लहानसा व्हिडीओ बनवला त्या लहान मुलीचा.
dombari
आजकाल मुंबईला वगैरे तर डोंबार्य़ाचा खेळ दिसत नाही. पुर्वी हिंदी सिनेमात गेटवे वर डॊंबाऱ्याचे खेळ दाखवले जायचे. हल्ली चाइल्ड लेबरचा कायदा स्ट्रिक्ट झाल्यामुळे बंद झाला असावा, पण लहान गावांत मात्र अगदी ओपनली सुरु असतात असे प्रोग्राम्स..
.
चाइल्ड लेबर म्हणजे फक्त असेच लेबर्स नाहीत. आज नेमकं लक्षात आलं, की रेल्वे स्टेशनवर पॉलिश करणाऱ्या मुलांचं वय १५ च्या वर नाही. समोर चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या मुलाचं वय पण १२-१३ असेल. त्या चहावाल्याला विचारलं, म्हंटलं,अशा तऱ्हेने लहान मुलाकडून काम करुन घेणं कायद्याने गुन्हा आहे, तर तो भैय्या म्हणाला, ये लडका मालिक है.. नौकर तो मै हूं…. आता बोला?? कायद्यातल्या पळवाटा आधी शोधून काढतात लोकं..
.
हाय कोर्टाने आदेश दिले आहेत पोलिसांना, की जी मुलं तुम्ही बाल कामगार कायद्याअंतर्गत सोडवलेली आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगा. मध्यंतरी पोलिसांना कोर्टाने विचारले की तुम्ही किती मुलांची  सुटका केली , आणि सध्या ती मुलं कुठे आहेत? यावर पोलिसांनी ५७०० मुलांची सूटका केल्याचं सांगितलं पण ती मुलं कुठे आहेत हे पोलीस सांगु शकले नाहीत.कोर्टाने वर असंही म्हंटलं आहे की जर तुम्ही त्यांना कांही प्रशिक्षण देत नसाल, तर v एखाद्या मेकॅनिककडे काही वर्षं काम केलं की तो मेकॅनिक बनतो.
हे सगळं इथेच संपत नाही. कुठे तरी शारीरिक मेहेनतीची कामं केलेली आपण समजू शकतो. पण अशा लहान म्हणजे अगदी दहा वर्षांच्या मुलींना देह विक्रया करता भाग पाडलं जातं. इथे असंही वाचण्यात आलं की भारता मधे असा समज आहे की दहा वर्षाखालील मुलींच्या बरोबर संबंध ठेवल्यास गुप्त रोग बरे होतात. आता अशा उपायाने रोग तर बरे होत नाहितच पण त्या बिचाऱ्या लहान मुलिंना मात्र या रोगांची लागण होते. भर रस्त्यावर फटके मारायला हवेत अशा लोकांना.

.जरी हा कायद्याने गुन्हा असला, तरीही हा व्यवसाय अगदी धडाक्यात आणि ओपनली सुरु असतो. गुगल वर व्हिडीओ सर्च केला तर इतके  बिभत्स व्ह्डीओ पहायला मिळाले, (यु ट्य़ुब वर नाही) की अगदी किळस यावी.

.इस्लाम मधे प्रोफेटने पण सहा वर्षाच्या मु्लीशी लग्न केल्याचा  दाखला आहे. त्यामुळे इस्लाम मधे धर्माच्या नावाखाली अजूनही चाइल्ड मॅरेज केले जाते. राजस्थानात तर लग्नाच्या नावाखाली ऑफिशिअली मुली विकण्याचा धंदा चालतो. आपल्याला हे सगळं माहिती असून सुद्धा आपण मात्र ’बालिका बधु’ सारखे सिरियल्स आवडीने पहातो. आपली मानसिकताच तशी झालेली आहे.

इथे मी सिलेक्टेड क्लिप्स दिलेल्या आहेत. यु ट्युब वर भरपूर माहिती आहे , पाहिली तर खरंच आपण या जगामधे का जगतो? आणि लोकं असे का वागतात? ह्या विचारानेच जीव देण्याची इच्छा होते..