ई. सन. २३५९…

Written by  on December 18, 2005

इतिहास हा कधी बदलत नाही म्हणणारे मुर्ख आहेत. अहो इतिहास हवा तसा वाकवता येतो, मोडता येतो, अगदी हवे तसे त्याचे स्पष्टीकरण केले जाऊ शकते. हा लेख म्हणजे  ई.स. २३५९ मधे इतिहासाच्या पुस्तकात धडा कसा असेल…. हा विचार मनात आला म्हणून लिहायला घेतला. खरं तर आज वेळ फार कमी आहे तरी पण जरा घाईतच आवरतोय..

इ. सन २३५९.. भारत देश. ह्या देशात काय चाललंय? आजच बातमी वाचली, की बहुसंख्य असून सुध्दा मुस्लिम समाजाला अजिबात किम्मत दिली जात नाही. सरकारचं प्रत्येक धोरण हे अल्पसंख्यांक हिंदूच्याच हिताचे असते.

मुस्लिम समाजाला कायम स्टेपमदरली ट्रिटमेंट दिली जाते, आणि हिंदूंचे लांगुलचालन केले जाते.. आणि असे असतांना सुध्दा आम्ही मुसलमान ह्याच सरकारला वारंवार का निवडुन देतो? असा सवाल बहुसंख्य मुस्लिम समाजाचे नेते श्री अफझल खान यांनी केला आहे.

आज पर्यंत इतिहासाच्या पुस्तकामधे जे काही हिंदूंच्या द्वारा लिखाण केले गेले आहे, ते सगळे खोटे आणि दिशा भुल करणारे लिखाण  असून ते रद्द बाद करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली.

पूर्वीच्या काळी   पण  मेटे आणि खेडकरांनी   इतिहासातले दाखले बदलण्यास भाग पाडले होते,  असे  साधारण पणे ई.स. २००९ च्या  पूर्वीच्या कागद पत्रांवरुन दिसून येते . दख्खन च्या दऱ्या खोऱ्यामधे एक शिवाजी नावाच एक हिंदु लुटेरा होता त्याला हिंदु लोकं राजा म्हणायचे.. त्याच्याबद्दल चा लिहुन ठेवलेला   इतिहास तद्दन  खोटा आहे असे  एका मुसलमान इतिहास तज्ञाने म्हंटले आहे.. याच तज्ञाने संपादित केलेला मुघल इतिहासावरचा धड्याचे काही अंश दिलेले आहेत. हा धडा पाठयक्रमात घेण्यात यावा अशी सूचना सरकारने केलेली आहे.

औरंगजेब नावाचा एक मुघल सम्राट होऊन गेला. हा सम्राट खुप शुर , वीर, ज्ञानी, आणि धर्माचे पालन करणारा राजा होता. याचं साम्राज्य दिल्ली पासून तर खाली दख्खन पर्यंत पसरलं होतं. याच्या राज्यात सगळे लोकं खूप सुखी होते. सर्व धर्म समभाव ह्या राजाच्या अंगी अगदी पक्का भिनलेला होता, म्हणूनच ह्याने बऱ्याच हिंदू राजकन्यांशी पण विवाह केला. याला त्या राण्यां पासून पण बरीच संतती प्राप्त झाली होती. यावरून असे दिसून येते की या राजाला इतर धर्मांविषय़ी प्रेम होते..

याच राजाच्या मुलांना पण त्याने अशीच सर्व धर्म समभावाची शिक्षा दिल्यामुळे ह्याचा मुलगा अकबर याने पण बऱ्याच हिंदु स्त्रियांशी  लग्न करुन संबंध ठेवले होते.अशा तर्हेने या राजाने मुस्लीम लोकसंख्या वाढवण्याचा उपाय सगळ्यांना दाखवून दिला.

इतिहासामधे अशीच एक घटना पुर्वी कल्याणला घडली होती. ( आणि ती पण एका हिंदु इतिहासकारानेच लिहिलेली आहे)   शिवाजी नावाचा एक लुटारू होता  जो दख्खनच्या पठारात लूटमार करायचा. एकदा त्याने  त्याने कल्याणची बाजारपेठ आणि गांव   लुटलं. आता लुटालुट झाल्यावर जेंव्हा त्याच्या काही मावळ्यांनी   त्या हरलेल्या  कल्याणच्या सुभेदाराची सुन , भेट म्हणून देण्यासाठी शिवाजी कडे नेली,   तेंव्हा त्याने तिला परत पाठवून दिले. बघा… या शिवाजीला मुसलमान धर्माबद्दल अजिबात आदर नव्हता हे या घटनेवरुन सिद्ध  होते. याच जागी जर औरंगजेब असता, तर त्याने अशा भेट म्हणून आलेल्या स्त्रीला आपल्या जनानखान्यात मानाने जागा दिली असती.

हा  राजा  औरंगजेब फार धार्मिक होता.  ह्याची कबर औरंगाबाद जवळ २० किमी अंतरावर आहे. याची कबर अतिशय साधी आहे. असं सांगितलं जातं, की ह्या कबरीसाठी लागणारा पैसा या राजाने स्वतः टॊप्या विणून कमावला. किती साधा होता बघा हा राजा.

लुटेरा शिवाजी हा दख्खनच्या भागात खूप ऍक्टीव्ह होता. ह्या लुटारुने औरंगजेबाचे खूप नुकसान केले. जर हा लुटारू नसता, तर मुघल सल्तनत ही अगदी कन्या कुमारी पर्यंत पोहोचली असती. केवळ याच शिवाजी मुळे मुघल सल्तनतीचा विजयी अश्व इथे  थांबवला गेला. अशा या लुटारू शिवाजी मुळे शहेनशहा औरंगजेबाला खूप नुकसान सहन करावं लागलं.

एक  जनाब शाहिस्तेखान नावाचा सरदार होता, त्या शूर सरदाराच्या हाताची बोटं कापुन टाकली या शिवाजी नावाच्या लूटेऱ्याने. हा शाहिस्तेखान खुप शूर विर होता, आणि त्याच्याबरोबर  युध्दात जिंकणॆ शक्य नाही हे समजल्यावर शिवाजीने, एकदा  जनाब शाहिस्तेखान आपल्या खिडकीत उभे राहुन गरीब लोकांना सोन्याचे दिनार दान करित असतांना आणि निसर्ग सौंदऱ्याचा अस्वाद घेत  असतांना , लपून येउन त्याची बोटं कापून टाकली.( हीच घटना अतिशय विकृत पद्धतीने हिंदू इतिहासकारांनी लिहिलेली आहे ) पण मुस्लिम   इतिहास तज्ञांचे मत आहे की इतिहासाची अशी अवहेलना होणे बरोबर नाही आणि म्हणून शुद्धीकरण आवश्यक आहे.

औरंगजेबाकडे  जनाब अफझल खान नावाच एक खूप शूर विर होता. त्या जनाब अफझल खानाने शिवाजी ला चांगले धारेवर धरले होते. प्रताप गढ नावाचा एक खंडहर होता, ज्या खंडहरामधे हा शिवाजी रहायचा. त्या खंडहराला वेढा घालुन बसला होता जनाब शाहिस्ते खान. तर या वेढ्यातुन सुटणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर, शिवाजीने तहाची बोलणी सुरु केली. ठरल्याप्रमाणे निःशस्त्र अवस्थेत अफझल खान भेटायला गेला शिवाजीला,  आणि  या महान लढवय्या जनाब अफझल खान यांच्यावर भ्याड शिवाजीने  धोक्याने बरोबर आणलेल्या गुप्तीने भ्याड हल्ला करुन, त्यांना परवरदिगार च्या भेटीस धाडले. इतक्या शूर लढवय्याचा अशा तर्हेने घात करणाऱ्या शिवाजी ला इतिहास कधीच माफ करणार नाही.

आनंदाची गोष्ट अशी की ही बाब लवकरंच इथल्या मुसलमानांच्या लक्षात आली, की हा जनाब अफझलखान हा एक सुफी संत आहे, म्हणुन त्याची मझार प्रतापगढाच्या पायथ्याशी बांधली गेली. गेले कित्येक शतकं त्या मजारीची सुफी पध्दतीने आराधना केली जाते. ही मझार म्हणजे एक जागृत स्थान आहे..आजही इतक्या म्हणजे ७०० वर्षानंतर त्या मजारीवर चादर चढवल्यास पुत्र प्राप्ती होते, पैसा मिळतो, आणि अशा तर्हेने नवसाला पावणारी म्हणुन ही मझार प्रसिध्द झाली आहे…

या नापाक शिवाजी लुटेरा , दख्खनका चुहा बद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे. ह्या लुटारुने जर मुघल सम्राज्याला साथ दिली असती तर इंग्रजांना इथे शुर महाराज औरंगजेबाने पाय रोवु दिले नसते. औरंगजेब इतका बडा दिल वाला होता, की त्याने ह्या शिवाजी ला अगदी मानाने आपल्याकडे आग्ऱ्याला ठेवले, पण तिथुन हा पळपुटा शिवाजी , मिठाईच्या पेट्यात बसून पळुन गेला.

तर ….. कसा काय वाटतोय इतिहास?? असं होणं सहज शक्य आहे.. आज मेटे – खेडकर ब्राह्मणाने लिहिलेला म्हणून खरा इतिहास नाकारताहेत, आणि स्वामी श्री समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांच्या सारख्यांचा उपमर्द करताहेत, बाबासाहेब पुरंदरे यांचाही येता जाता एकेरी उल्लेखाने अपमान करण्याचा प्रयत्न करताहेत…तेंव्हा त्यांनी रोवलेल्या या विषवल्लीचं रुपांतर कशामधे होऊ शकते याची ही एक झलक….

( इथे श्री शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख  अपमान करण्यासाठी केलेला नाही , पण लेखाची गरज म्हणून कराव लागला. हा लेख लिहितांना श्री महाराजांचा उल्लेख एकेरी करतांना मनाला खूप यातना होत होत्या. या सगळ्या एकेरी उल्लेखाबद्दल   क्षमस्व!)

#100 Happy Days

Written by  on December 15, 2005

Capture आज हा इंग्रजी मधला हॅश टॅग वाचून कदाचित  आश्चर्य वाटेल. पण  परवा फेसबुक वर हाच हॅश टॅग पाहिला आणि मनात प्रश्न उभा राहिला की खरंच आपण सलग १०० दिवस  आनंदी राहू शकतो का?

कठीण प्रश्न आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात रोज फक्त आपल्याला फक्त  टेन्शन आठवतं, आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या  घडणाऱ्या घटना आपण अगदी  सहजपणे विसरून जातो, किंवा त्यांच्याकडे  दुर्लक्ष करतो.  आपल्या दुःखाच्या कोषात आपण स्वतःला इतके गुरफटवून घेतले असते की  बरेचदा काही चांगल्या घटनांकडे  आपले लक्षही जात नाही, आणि त्यामुळेच हे दररोज १०० दिवस सलग आनंदी रहाणे पण एक चॅलेंज पेक्षा कमी नाही.

हे आयुष्य खरंच   का इतकं  वाईट आहे  की सलग १०० दिवस आपल्या जीवनात   किमान  एक आनंददायी घटना पण घडु नये-  अर्थात नाही. आपली दृष्टी तशी आपल्यालाच तयार करावी लागेल, आणि जिवनात  घटनांकडे  पहाण्याचा पॉझिटीव्ह दृष्टीकोन तयार करावा लागेल, म्हणजे लहान लहान गोष्टीतून मिळणारा आनंदही आपल्या लक्षात येईल. कदाचित तो शॉर्ट टर्म असेल किंवा लॉंग टर्म, पण फक्त तुम्हाला तो  क्षण जगतांना आनंद झाला की नाही?

ही पोस्ट आज सुरु करतोय, पण पुढचे १०० दिवस दररोज #100happydays    इथे  अपडेट करणार आहे. मधल्या काळात इतरही पोस्ट लिहीणार आहेच, पण तरीही ह्या पोस्टवर येऊन पुन्हा दररोज अपडेट करणारच..बघु या हे चॅलेंज मी जिंकू शकतो की नाही ते.

आणि हो, तुमच्या पैकी कोणी हे चॅलेंज घेण्यास तयार आहे? इथे कॉमेंट्स मधे लिहू शकता..

तर आजचा पहिला दिवस:-

१) आठवड्याच्या ऑफिशीअल टूर वरून घरी परत येणे, आणि बायको , मुलींना   पहाणे. #100happydays Day 1

२)Happiness is waiving off your daughter from balcony, going to her office on her birthday.#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays) Day 2

३)Happiness is समोरच्या झाडावरच्या कोकिळेच्या कुहू कुहू च्या वेक अप कॉल ने आज सकाळी आलेली जाग.#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays) Day 3

४)Happiness is रविवारी सकाळी बायकोच्या नकळत (डायटिंग ची काळजी न करता)फ्रिझ मधे शिल्लक असलेला वाढदिवसाचा केक बेडरुम मध्ये लपून खाणे. #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

५)Happiness is-इंदौर ला पोहोचल्यावर गेस्ट हाउस मध्ये ब्रेक फास्ट ला युज्क्वल ब्रेड ,कॉर्नफ्लेक्स ऐवजी इन्दौरी पोहे आणि जिलबी.#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

६)Hapiness is :- Meeting old friend after many many years.. #100happydays  ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays) with Rtn Rajeev Saxena ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/rajeev2266).

७)Happiness is :- टूर वर असताना बायकोचा जेवायाच्या वेळेस येणारा फोन,
— जेवण झाले की नाही?वेळेवर जेवून घ्या … #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

८)Happiness is -window Seat in train… #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

९)Happiness is- beautiful girl seating besides you watching what you type on your phone.#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)   lolz.

१०)happiness is -प्रवासाचा वेळ,माझा स्वतः चा वेळ, #100Happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

११)Happiness is -रत्नाग्रीहून आणलेल्या आम्ब्यान्च्या पेटितले शेवट च्या 4आम्ब्यान्पैकी 2 आंबे पिकलेले सापडणे..#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

१२)Happiness is – सकाळी उठून offiice ला जाण्यासाठी तयार झाल्यावर,एकदम लक्षात येणे की ” अरे! आज तर रविवार! #100happydaysDay ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydaysday)

१३)Happiness is :- Burning some rubber after 3 weeks #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)   बुलेट वर लॉंग ड्राइव्ह.

१४)Happiness is – To realise that we have got much more than what what we actualy considered.#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

१५)Happiness is -making up with your spouse after 3days अबोला.#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

१६)Happiness is – सकाळी उठून offiice ला जाण्यासाठी तयार झाल्यावर,एकदम लक्षात येणे की ” अरे! आज तर रविवार! #100happydaysDay ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydaysday)

१७)Happiness is-ऑफिस मधे लाईट गेले आणि जनरेटर फेल झाला म्हणुन सुटी. Yo!#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

१८)Happiness is :- Counting down the time to reach Home #1000happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/1000happydays)

१९)Happiness is:-The smell of news paper (before any one at home captures the news paper)with a cup of tea in the morning hours #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

२०)This is the real happiness…….अख्खं ” होल” पापलेट आणि चिकन करी.

२१)Happiness is :-Being with family on sea shore in the morning before sunrise.#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

२२)Happiness is :- Taking full control of kitchen for preparing breakfast#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

२३)Happiness is :- Aimless loitering in the shopping mall with daughter…#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

२४)Happiness is :- पुस्तक वाचताना सापडलेल्या एका सुकलेल्या सोन चाफ्याच्या फूलाचा वास….कदाचित कधी तरी बुक मार्क म्हणुन वापरले गेले असावे #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

२५)Happiness is :- आपल्या खूप खूप आवडीचे गाणे अनपेक्षित पणे रेडिओ वर लागणे.#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

२६)Happiness is :- एकटे असतांना एकाएकी आई वडीलांची आठवण येणे आणि त्यांचा तो आश्वासक हसरा चेहेरा नजरेसमोर उभा रहाणे,, की सगळं काही ठिक होईल. काळजी करू नकोस असे नजरेत भाव असलेला.. .#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

२७)Happiness is :- To know that some one beloved has recovered and is out of danger #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

२८)Happiness is :- कोणीतरी कलिग आपल्या चुकीवर पांघरूण घालतोय हे लक्षात येणे…#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

२९)Happiness is :- To realise that the life is like chess, King is allowed to move only one place,where as the Queen can move in any direction she desires…… However, “The Queen always saves the King” in difficult situations– LOLzz #100Happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

३०)Happiness is :- नमो चा शपथविधी याची देही ,याची डोळ्याने अनुभवणे#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

३१)Happiness is :- To get invitation for the Lunch, on account of some one’s marriage anniversary , when you have forgotten to carry your lunch box#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

३२)Happiness is :- Treating your spouse as friend while taking any important decision. #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

३३)Happiness is :-शनिवारचा उपवास… साबूदाणा खिचड़ी,उपवासाचे थालीपीठ की आंब्याचा रस आणि राजगिरा पूरी….???
#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

३४)Happiness is:- Being with sister on vacation #100happyday ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

३५)Happiness is :-caring for someone #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

३६)Happiness is :- उद्याचा दिवस नक्की काही तरी चांगली बातमी घेऊन येईल हा विश्वास!!#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

३७)Happiness is :- Intentionally annoying your spouse #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

३८)Happiness is:-scratching the itch whn no one is watching. #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

३९)Happiness is :-Sitting in office and secretly watching bourne ultimatum on laptop #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

४०)Happiness is :- restarting morning walk after a gap of 4months#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

४१)Happiness is :- Laughing, Because you Remembe the fun you had last night with your friends- #100Happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

४२) Happiness is:- finding the misplaced photo album – which was lost for last 15 years #100hapydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100hapydays)

४३)Happineas is :- Meeting fb friend in person Shri Maharaj ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/shri.maharaj.5) #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

४४)Happiness is :- gossiping with mom  #100happydaus ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydaus)

४५)Happinesa is:- Feeling that the life should go in “pause” mode,when with your old parents on vacation. #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

४६)Happiness is:- बाइक वर पावसात भिजणे आणि मग ओले कपडे अंगावर सुके पर्यंत वागवत गरम गरम भजी आणि चहा… #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

४७)Happiness is :- Plan to purchase some thing , and spend hours in scanning on line advertisements #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

४८)Happiness is:- chocolates chocolates and chocolates! #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

४९)Happiness is :- Returning to mumbai and sweating like a pig in local train#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

५०)Happines is :- Completing first 50 Happy days #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

५१)Happiness is:- competition of zillions of formalities and completing the long pending work.#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

५२)Happiness is :- catching a peeping Tom &make him understand that you are aware of his activities ..  #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

५३)HAppiness is :- .. pillow talks.. #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

५४)Happiness is :- Taking a crucial financial decision which was pending since long. #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

५५)Happiness is:- Believing in”अच्छे दिन आने वाले है” #100hqppydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100hqppydays)

५६)Happiness is :-Visiting daughter in her office .#100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

५७)Happiness is :- Night out with Gang #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

५८)Happiness is:- Privacy  #100happydays ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/hashtag/100happydays)

५९)

एक कथा- २

Written by  on December 2, 2005

राजाभाऊ बॅग उचलून गेले ऑफिसमधे, सुमाताई विचार करीत बसल्या होत्या.चेहेऱ्यावर चिंताग्रस्त भाव अगदी सहज ओळखू येत होते. रोहनला त्यांच्याकडे बघुन काय झालं असावं  याचा अंदाज येत नव्हता.

रोहनने विचारले– काय झाले?

अरे स्वयंपाकवाल्या बाई आलेल्या नाहीत आज, आणि मला पण सांधेदुखी मूळॆ काहीच करता येत नाही.. सांग तुच काय करणार??

त्यात काय विशेष, मी तुम्हाला मदत करु? मला येतं सगळं करता…कपाळावरुन इस्त्री फिरवल्याप्रमाणे सुमाताईंच्या कपाळावरच्या आठ्या कमी झाल्या थोड्या, की तसं वाटलं रोहनला??

सुमाताईंनी मनातल्या मनात विचार केला, ” काय हरकत आहे थोडी मदत केली तर? इथे आपल्या घरीच तर रहाणार आहे, करेल थोडं काम..तसंही त्याला सवय आहे म्हणतोय कामाची. करेल थोडं काम दोन तिन दिवस. त्याचा इंटरव्ह्यु पण दोन दिवसानंतर आहे म्हणे.”

बरं… काय करता येतं रे तुला रोहन?

सगळा स्वयंपाक येतो करता. अगदी सगळं!!!

सुमाताईंचा चेहेरा उजळला. रोहनला घेउन त्या किचन मधे गेल्या. त्याला सगळं दाखवलं. म्हणजे जेवढं सुमाताईंना माहिती होतं तेवढंच..

रोहनने साधा आमटी भात बनवला, पण सुमाताई एकदम खुश. चला सोय झाली आपली

********************************************************************

सकाळची वेळ होती . चितळे ब्रेकफास्ट टेबलवर रोहन सोबत बसले होते. नेहेमी प्रमाणे सुमाताई बटर घेउन टोस्टला लावित होत्या. आज नेमकं लो फॅट बटर लावलं.. चितळ्यांनी मनातल्या मनात निश्वास सोडला आणि सुमाताईंनी दिलेला तो टोस्ट् आणि अंड्यातल्या पांढऱ्या बलकाचं ऑम्लेट समोर डीश मधे घेतलं.

रोहन तुझा इंटरव्ह्यु कुठे आहे रे?
रोहनने उत्तर दिलं की उद्या सकाळी ताज मधे आहे .
ताज मधे म्हंटल्यावर चितळ्यांना ताज मधे कुक किंवा बेल बॉय वगैरे म्हणून काहीतरी असेल असेच वाटले. काल रात्रीचा रोहनचा स्वयंपाक त्यांनी पण चाखला होताच. त्यामुळे कदाचित हा तिथे कुक म्हणुनच जात असावा असा विचार आला त्यांच्या मनात. पण सरळ विचारलं तर वाईट दिसतं, म्हणुन काही विचारलं नाही.

रोहनच्या राजबिंड्या रुपाकडे बघुन त्यांना थोड वाईट वाटलं ,  पण त्याना दुर्लक्ष करणं च योग्य वाटलं , उगिच एखाद्याचा अपमान कशाला करायचा?? पण मित्राच्या मुलासाठी काही करता आलं तर बरं होईल असंही वाटत होतं चितळ्यांना !*********************************************************************************

संध्याकाळचे पाच वाजले होते, रीना बाहेर निघायला तयार झाली होती. सुमाताईंनी विचारलं कुठे जाते आहेस ?? अगं सिनेमाला जायचंय रात्रीच्या जवळच्याच मॉल मधे जाणाराय आम्ही सगळे. पैसे आहेत कां??? की हवे आहेत गं? सुमाताईंनी विचारलं.

रोहन सोफ्यावर अभ्यासाचं वाचत बसला होता, त्याला वाटत होतं की ’सात च्या आत घरात ’संस्कृती आपली आणि ही तर सातवाजता बाहेर पडते. मुंबईचं आयुष्य हे असंच असावं..

रीना बाहेर पडली आणि टॅक्सी करुन सरळ मॉल समोर गेली. सगळा गृप उभा होता. तिला वाटलं की साडेसातचा शो आहे  , पण सिनेमा पहायचा प्रोग्राम होता रात्री दहाचा – नाईट शो चा. तो पर्यंत एक नविन हॉटेल निघालं आहे तिकडे जायची टूम निघाली. खाणं झाल्यावर सिनेमा पाहून रात्री साडेअकरा वाजता सिनेमा संपल्यावर ती घरी परत आली. सुमाताईंचा पारा चढलेला होता. रात्री १२ वाजता म्हणजे काय यायची वेळ आहे आहे कां ?? सिनेमाला तु पाच वाजता गेली होतीस. रात्री ९ पर्यंत तु घरी यायला हवं होतं… इतका वेळ कां लागला तुला? आणि बराच वेळ त्या रागावत होत्या रीनाला.

रीनाला रोहन घरात वरच्या खोलीत असतांना आईचं रागावणं इन्सल्टींग वाट्त होतं – त्याला ऐकायला जाईल नां?? ममा पण ना .. एकदमच ही आहे……… पण चुक तर झाली होतीच.. ऐकुन घेणं भाग होतंच. रोहन गेस्ट रुम मधे मान घालुन उघडे असलेले कान बंद करुन आपलं लक्षंच नाही असं दाखवत पुस्तकात तोंड खुपसुन बसला होता.

*******************

रीना आपल्या खोलीत शिरली. ति काही न बोलता कपडे चेंज न करता सरळ पलंगावर आडवी पडून हमसुन हमसून रडू लागली.

आज त्या हॉटेलमधे सगळ्यांनी मिळून हुक्का मागवला होता. गम्मत म्हणून ओढायला काय हरकत आहे? सगळ्यांनी खूप आग्रह पण केला होता, तरीही तिने मात्र त्याला अजिबात हात लावला नव्हता.

हॉटॆलमधल्या त्या हुक्का प्रकरणानंतर आपण या गृप मधे आलोय ही चुक तर नाही ? असे विचार सारखे डोक्यात येत होते. आज हुक्का, उद्या सिगरेट, किंवा नशा असलेली वस्तू….. काहीही होऊ शकतं. स्पाइक्ड ड्रिंक्स च्या न्युज तर अगदी कॉमन झाल्या होत्या. त्यामुळे कुठेही काहीही घेतांना सेफ वाटत नव्हतं.

सिनेमा पहातांना पण गौरवने आणुन दिलेला पेप्सी चा ग्लास तिने न पिता तसाच ठेवला होता. गौरव च्या शेजारी बसल्यावर त्याचा येणारा सिगरेटचा वास नकोसा होत होता. सिगरेट आणि आफ्टरशेव्ह यांचा मिक्स वास सेक्सी असतो असं ऐकलं होतं, पण ते आज चुकीचं आहे हे समजलं. पुन्हा या गृप मधे यायचं नाही हे मनोमन निश्चित केलं. त्याचा होणारा सहेतुक स्पर्श पण नकोसा वाटत होता.अंग चोरून बसली होती ती सिनेमा संपेपर्यंत. सगळे मित्र मैत्रीणी बरोबर आहेत म्हणुन तिने सिनेमा पुर्ण पाहिला आणि रात्री घरी यायला निघाली. घरी पोहोचल्यावर आई रागावेलच याची खात्री होतीच. पण आता चूक केली आहेच तर भोगावे लागेलच.. !!

*******************************************

रात्री एक वाजता रोहनला जाग आली आणि तो पाणी प्यायला म्हणून किचन कडे निघाला . जातांना रस्त्यामधे रीनाच्या खोलीचे दार उघडे होते. ती कपडे वगैरे न बदलता पलंगावर आडवी पडुन अजूनही रडतच होती.टेबलावर फेकलेली तिची पर्स, त्यातुन बाहेर पडलेलं मेकपचं सामान.. टिशर्ट थोडा वर सरकलेला. .. काय करावं?? रोहनला काय करावं ते सुचत नव्हतं , त्या खोली मधे जावं आणि तिची समजूत काढावी की आपला काय संबंध म्हणून दुर्लक्ष करुन पुढे निघुन जावं??अजून दोनच दिवस तर रहायचय इथे आपल्याला.

शेवटी माणूसकीचा विजय झाला, रोहन तिच्या खोलीत शिरला आणि पलंगाशेजारी अवघडून उभा राहिला. पलंगावर तिच्या शेजारी बसणं त्याला संयुक्तीक वाटत नव्हतं. मुलिंना जात्याच एक सिक्स्थ सेन्स असतो . रीना पटकन उठुन आपले कपडे सारखे करु लागली. रोहनला काय बोलावं तेच सुचेना..

रीना आता मात्र थोडी शांत झाली होती एक परका पुरुष आपल्या खोलीत ही भावनाच तिला शांत करण्यास पुरेशी होती. ती त्याच्या कडे पहात होती.. रोहनच्या नजरेत एक सपोर्टिव्ह भावना न सांगता दिसत होती. ती उठुन उभी राहिली आणि बाथरुम कडे निघाली तोंडावर पाणी मारुन परत येई पर्यंत रोहन आपल्या रुम कडे निघुन गेलेला होता आणि तीला उगीच हसु आलं.. दार बंद केलं आणि ती कपडे चेंज करायला निघाली.
**********************************************************************************

आज मात्र सुमाताईंना खूप टेन्शन असतं. आमटी भात , किंवा भाजी पोळी बनवणे इतपत तर ठिक आहे, पण दुपारच्या किटी पार्टी साठी स्नॅक्स बनवणे जमेल का त्याला?? त्या किचन मधे शिरतात की रोहनने काय करुन ठेवले आहे ते बघायला.

रोहन तर तिथे नव्हता पण दोन भांडी मात्र व्यवस्थित झाकुन ठेवलेली होती. किटी पार्टी ठरल्याप्रमाणे झाली. सुमाताईंचा जीव मात्र एकदम भांड्यात पडला. रोहनला तर यामधे काहीच माहिती नव्हतं, तो वर रुमवर बसुन आपला अभ्यास करीत होता. उद्या सकाळी इंटरव्ह्यु !! टेन्शन आलं होतं डोक्यावर! जमेल कां आपल्याला? रिटन एक्झाम तर पास झालो आपण. लोकं म्हणतात मराठी मुलं का नाहीत या क्षेत्रात? जमेल का आपल्याला उत्तरं देणं? रात्र भर डोळ्याला डोळा लागला नाही रोहनचा. सकाळी ५ वाजताच पुन्हा अभ्यासाला बसला.

गेल्या दोन दिवसांच्या दिनचर्ये प्रमाणे , तो ब्रेकफास्टला टेबल वर जाउन बसला. रीना , आणि चितळे दोघंही तिथेच होते– रोहनची वाट पहात. रोहन ओशाळवाणं हसला. सॉरी म्हणून त्यांच्या सोबत बसला. सगळे जण शांत होते. शेवटी चितळे म्हणाले की माझ्या शुभेच्छा रे तुला.. काही मदत लागली तर सांग मला. नुसतं स्माइल देऊन त्याने टाय समोर केला, मला नॉट बांधून द्या म्हणून.. आणि सगळे एकदम जोरात हसायला लागतात काल रात्रीच्या टेन्शनचा मागमुस पण शिल्लक राहिला नव्हता….

चितळे म्हणाले, ’काय रे किती वाजता आहे तुझा इंटरव्ह्यु?’
“एक वाजता.. ” रोहनने उत्त्तर दिलं.
कसा जाशिल?
लोकलने जाईन म्हणतोय. थोडा चाचरतच म्हणाला तो. लोकलची गर्दी बघुन त्यात आपल्याला चढता येईल की नाही याची शंका होतीच त्याला. ही गोष्ट चितळ्यांच्या लक्षात आली. त्यांनी म्हंट्लं, रीना, अगं तुला जायचं होतं ना मरीन लाइन्सला– प्रोजेक्ट वर काम करायला?? तूच का नेत नाहीस याला कारने तुझ्या सोबत? मित्राच्या मुलाची किमान एवढी तरी मदत करावी ….

रीना आज घरीच होती. ’ ठिक आहे, माझं पण काम होऊन जाईल, जातांना ह्याला पण घेऊन जाईन मी. आणि येतांना परत पण घेउन येईन. रोहनचा चेहेरा एकदम उल्हासित झाला. मुंबई बाहेर रहाणाऱ्या माणसाला जर लोकल चा प्रवास टळणार आहे असे सांगितले तर त्याला किती आनंद होईल तेवढाच आनंद झाला होता रोहनला पण..
*********************************************************

रोहनच्या कालच्या सेंटिमेंटल सपोर्ट साठी त्याला थॅंक्स म्हणायलाच हवे. घरी तर तो नेहेमी पुस्तकातच बुडलेला असतो, काय करावं बर?? त्याला कार ने नेते म्हंटलं तर तो कदाचित नाही म्हणेल, पण पप्पांच्या समोर तो नाही म्हणणार नाही. म्हणूनच ब्रेकफास्टच्या वेळेस पप्पांनी त्याला नेण्याचा विषय काढला. त्याने जेंव्हा आनंदाने होकार दिला, तेंव्हा तिला खूप खूप बरं वाटलं. ”
थोडं लवकरच निघू या. म्हणजे ट्रॅफिकचा इशु रहाणार नाही! रोहन न बोलता तयार झाला. त्याने सकाळी बांधलेला टाय थोडा वाकडा लागला होता. नॉट थोडी वाकडी दिसत होती.
तिने कार सुरु केली , टाय बद्दल सांगावं का?? तिने आपणच पुढे होऊन ती नॉट सरळ करुन दिली. आणि दोघंही निघाले ताजच्या दिशेने. एकही अक्षर न बोलता कार चालवत होती रीना. रोहन रस्त्यावरची गम्मत बघत होता.त्याच्या चेहेऱ्यावरचा टेन्शन न सांगता कळत होतं. त्याचं रीना कडे लक्ष पण नव्हतं. इंटर्व्ह्युच्या टेन्शनचा परीणाम त्याच्या चेहेऱ्यावर दिसत होता.

तुमच्यात बोलत नाहीत कां मुलींशी??
अं..??? नाही तसं नाही गं.. इंटरव्ह्यु द्यायचाय नां..म्हणुन थोडं टेन्शन आहे झालं
हं..!! मग त्यात काय एवढं? नौकरी मिळेल नां.. नाहीतर दुसरीकडे कुठेतरी. पण एक विचारू का? तु मराठी मधे एम ए का केलंस?? त्या ऐवजी एखाद्या प्रोफेशनल विषयात का नाही ग्रॅज्युएशन केलं म्हणजे चांगली नौकरी मिळाली असती?
केविलवाणं हसला रोहन.. काही न बोलता. पण चेहेऱ्यावरचे भाव मात्र अजूनही नॉर्मल आले नव्हते. तिने त्याच्याकडे आज पहिल्यांदा निरखून पाहिलं. तीला वाटलं की आपण चुकीचा प्रश्न विचारलाय त्याला. तिने लगेच विषय बदलला.

तेवढ्यात कार ताज समोर पोहोचली. कार थांबवली , आणि रोहन खाली उतरला. किंचीत बावरलेला. मागे वळून पाहिलं तर रीना अजूनही तिथेच उभी होती कार ची खिडकी उघडून तिने त्याला थम्स अप ची साईन केली. थोडा हसला तो.

त्या पंचतारांकीत हॉटेलच्या दारामधे शिरल्यावर तिथला गारवा अगदी हाडापर्यंत स्पर्शुन गेला.
*****************************************************************************
सुमाताई एकट्याच घरात बसल्या होत्या. चितळे गेले होते ऑफिसला. कालच्या रीनाच्या रात्री उशिरा येण्याच्या प्रसंगामुळे त्यांना अचानकपणे रीनाची काळजी वाटू लागली. आता लग्नासाठी मुलं पहायला सुरु करावं लागेल. एकुलती एक मुलगी म्हणजे खरंच किती काळजी असते नाही?
रोहीणीमधे जाउन नांव नोंदवावे लागेल एकदा. उद्याच जाउ या. मुलगा शक्यतो भारतातला असला, तर बरं.. कमीत कमी नजरेसमोर तरी राहिल पोर!