क्रिप्टोग्राफी..

Written by  on August 25, 2005

’दा विन्सी कोड’ सगळ्यांनीच वाचलं असेल- नाही तर   सिनेमा तरी नक्कीच पाहिला असेल. त्यातल्या सारखे   क्रिप्टीक कोड   तयार करणे, आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेणे खूपच कठीण काम आहे असे वाटते ना? कधी तरी असंही  वाटतं की ,  आपली पण एक कोड लॅंग्वेज असती की जी फक्त स्वतःलाच वाचता आली असती तर ? कितीतरी पर्सनल गोष्टी लिखित स्वरुपात ठेवता आल्या असत्या.

आपल्या खास गोष्टी- म्हणजे अगदी शेजारची सुबक ठेंगणी माझ्या कडे पाहून हासली, किंवा जिच्यावर तुम्ही जीव टाकता, तिनेच  जाता जाता खूप शिव्या दिल्या अशा गोष्टी कुठे तरी लिहून ठेवाव्या ,  आणि अशा भाषेत की जी इतर कुणालाही वाचता येणार नाही – असे वाटते ना बरेचदा?.

एक अशी डायरी लिहिता येईल की ज्या मधे आपण आपलं मन शंभर टक्के मोकळं करू शकू- कोणाला काही समजेल याची भिती न बाळगता.

हो .. असे करता येणे शक्य आहे. कसे ते सांगतो. यावर पण एक उपाय आहे.  तुम्ही अगदी काय वाटेल ते लिहू शकता आणि ते तुमच्या शिवाय कोणालाच वाचता येणार नाही. आमच्या वेळी  गर्ल फ्रेंडला चिठ्ठी लिहायला ही भाषा वापरली जायची. तिला   एकदा  कशी वाचायची हे शिकवले की झाले.

अहो त्या काळी सेल फोन वगैरे नव्हते , कम्युनिकेशन म्हणजे चिठ्ठी चपाटी.. आणि पोहोचवणार कोण तर तिची सख्खी मैत्रीण. मग मैत्रिणीला   पण समजायला नको अशी भाषा असायला हवी की नाही??  म्हणुन ह्या भाषेचा शोध लागला असावा.

खाली दोन चित्र लावलेली आहेत. एका मधे ए बी सी डी अशी अक्षरे वेगवेगळ्या भागात आर पर्यंत लिहिलेली आहेत. दुसऱ्या चित्रामधे एस पासून तर झेड पर्यंत अक्षरं लिहिलेली आहेत. तुम्ही हे दोन चार्ट्स तुमच्या पध्दतीने पण बनवू शकता – म्हणजे कुठलेही अक्षरांची पोझिशन्स बदलून   .   आता या दोन चार्टस ला लक्षात ठेवा. हे दोन्ही चार्ट्स म्हणजे तुमच्या सिक्रेट डायरीचे कोड ब्रेकर्स असतील.

आमच्या वेळी सगळ्या अफेअरकरांमधे (प्रेमळ लोकांमधे) खूप फेमस होती ही भाषा. काही लोकं आपापला कोड ठरवायचे. मग त्या मधे ए पासुन तर झेड पर्यंत अक्षरांच्या जागा वेगवेगळ्या केल्या की झाला नविन कोड तयार. प्रत्येकाचा  कोड वेगळा!

आता समजा मला माझे नांव लिहायचे आहे तर ते मी कसे लिहीन? सोपं आहे. खाली दिलेले चित्र पहा. एम हे अक्षर  डावीकडच्या खालच्या  को्पऱ्यात आहे, म्हणून त्या  कोपऱ्याचा आकार लिहायचा.  एच  म्हणजे  डावीकडच्या  मधल्या भागात   दुसरे अक्षर आहे म्हणून तो  कोपरा + डॉट. ( दुसरे अक्षर असेल तर डॉट द्यायचा)

इथे कोड वापरुन माझे स्पेलिंग लिहिले आहे. चित्रावर क्लिक करुन मोठे करुन बघा

बरं, अजून एक आयडिया आहे. दोन सर्कल दिलेले आहेत खाली. एक सर्कल दुसऱ्या पेक्षा कमीत कमी एक इंच लहान आहे . दोन्ही सर्कल  प्रिंट आऊट काढून कापून घ्या. लहान सर्कल मोठ्या सर्कल वर बसवा. तुमचा कोड आधी निश्चित करा. समजा ए तुम्ही के च्या समोर ठेवला तर  ए च्या ऐवजी के लिहायचा. त्याच प्रमाणे इतरही अक्षरांसमोर दुसरी अक्षरं येतील ती लिहित जायची

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/wheel-1.jpg) ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/wheel-11.jpg)

बरं हा कोड लॉजिकली ब्रेक केला जाऊ शकतो. थोडा कठीण करायचा असेल तर त्या सर्कल वर जी अक्षरं ए पासून तर झेड पर्यंत एका सिव्केन्समधे लिहीले आहेत  तो सगळी कापून घ्या आणि मग हाताला येइल तशी त्या सर्कल वर  पुन्हा चिकटवा. म्हणजे ए नंतर बी च्या ऐवजी अगदी जे किंवा एम  पण येऊ शकेल!एवढं केलं की झाला एक नविन कोणीही न तोडू शकणारा कॊड  तयार.

काही  शंका असतील तर  कॉमेंट  मधे विचारू शकता.