हवामानाचा अंदाज

Written by  on June 24, 2005

हवामानाचा अंदाज

सकाळी घरून निघतांना छत्रीची आठवण झाली. मुंबईला पावसाळा म्हंटलं की छत्री ही प्रत्येकाच्याच बॅग मधे असते. मुंबईच्या पावसाचा काहीच खात्री देता येत नाही. मालाडहून निघावं की छान निरभ्र आकाश आहे  छत्रीची गरज नाही म्हणून ,तर दादरला पोहोचे पर्यंत अगदी धुवाधार पाऊस सुरुही झालेला असतो.

घरून निघतांना बातम्या तर हमखास पाहून निघतो. आपल्याकडे दूरदर्शनवरच्या बातम्या दाखवतांना शेवटी एक मोठा विनोदी  कार्यक्रम दाखवून बातम्यांची सांगता केली  जाते . बरोबर ओळखलंत तुम्ही तो कार्यक्रम म्हणजे  “आजच्या हवामानाचा अंदाज”. त्या कार्यक्रमामध्ये देशात कुठल्या भागात पाऊस पडेल, कुठे  नाही , किती तापमान राहिल वगैरे  पर्यावरण विषयक माहिती सांगितली जाते. मी दररोज अगदी मनोभावे सिद्धीविनायकाला हात जोडावे, त्या श्रद्धेने तो कार्यक्रम ऐकतो आणि मग घराबाहेर पाउल टाकतो.

बरं  या कार्यक्रमाचा पण एक प्रेक्षक वर्ग आहेच. मुंबईचे लोकं पाऊस पडणार का? किंवा हाय टाईड कधी आहे हे पाहातात तर विदर्भातले लोकं उन्हाळ्यात सगळ्यात जास्त तापमान कुठे आणि किती नोंदवलं गेलं हे  फॉलो करत असतात- अर्थात त्यापासून काही मिळत नाही, पण इमाने इतबारे दररोज किती तापमान रेकॉर्ड केलं गेलं ते पहात रहाणे यांना आवडते.

त्या कार्यक्रमात सांगितले की आज खूप पाऊस पडणार आहे, की मी मस्तपैकी नवीन शर्ट घालून घराबाहेर पडतो. स्टेशनला पोहोचल्याबरोबर बुटांना पॉलिश करून घेतो. कारण याची खात्री असते की जे काही बातम्यांमध्ये सांगितले आहे नेमके त्याच्या विरुद्ध वातावरण राहील आज. म्हणजे पाऊस आहे म्हणून सांगितले तर नक्कीच उघाड राहील किंवा व्हाइस व व्हर्सा…

भारत सरकारने पाळलेल्या अनेक पांढऱ्या हत्तींपैकी हा एक आहे असे मला नेहेमीच वाटत आलेले आहे. या लोकांचा  हवामानाचा अंदाज हा कधीच बरोबर नसतो. कदाचित याचं खापर ते  इन्स्ट्रुमेंट्स वर फोडतील, पण सत्यस्थिती अशी आहे की  कारण काहीही असले तरीही यांचे अंदाज बव्ह्यंशी चूकीचे  असतात.

या विभागाअंतर्गत असलेला एक विभाग  जो सिसमीक व्हायब्रेशनचा अभ्यास करतो तो सुनामी आली तेंव्हा  त्याची येण्यापुर्वी भवीष्यवाणी करू शकला नाही. सिसॅमिक व्हायब्रेशनचा डेटा तर नेहेमीच जमा केला जातो. सारखा रेकॉर्ड होत असतो, पण जर तो डेटा अ‍ॅनलाइझ करता येत नसेल तर त्याचा काय फायदा?  तो डेटा वापरून ह्या भुकंपाच्या बद्दल   जर थोडा आधी सावधगिरीचा इशारा दिला असता तर बरेच लोकं वाचले असते.

२६ जानेवारीचा गुजराथमधला भुकंप त्याबद्दल अगदी साधीशी कल्पना पण त्या लोकांना देता आली नाही. मग अशा विभागाची गरजच काय? जर नुसती माहिती गोळा करणे म्हणजे डेटा इन- डेटा आऊट असेच जर स्वरूप या विभागाचे असेल तर  त्याचा उपयोग मला तरी फारसा दिसत नाही.करोडो रुपयांचे सॅटलाइट्स, लेटेस्ट कॉंप्युटर्स आणि इतर वरीच  इंट्रिकेट सामग्री असुनही काही  बरोबर रिपोर्ट्स मिळत नाही या विभागाकडून.

२६ जून ला जो मुंबईला पाऊस झाला त्याबद्दल पण हवामान खाते  अजिबात  पुर्व सुचना देउ शकले नव्हते.  तेंव्हा जो गोंधळ झाला, त्या नंतर मात्र थोडे जरी ढग असले तरीही मोसम विभाग ’सांभाळून रहा’ हाय टाईड आहे, काहीही होऊ शकते हे सांगू लागला. पण इतक्या वेळा दिलेली वॉर्नींग खोटीच ठरली.  त्यांच्यावर विश्वास ठेउन घरी बसावं तर दिवसभर उघाड राहायची. आता तर अशी परिस्थिती आहे की त्यांनी खरंच काही सांगितलं तरीही त्यांची ’कोल्हा आला रे आला ’ प्रमाणे अवस्था होईल- .

मागल्या वर्षी जेंव्हा विदर्भात पावसाने दडी मारली होती , तेंव्हा  या लोकांनी पाऊस पडेल असे भाकिते वर्तवले होते पण  तेंव्हा नेमका कोरडा दुष्काळ पडला  विदर्भात.

या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे बरेचसे ऑफिसेस आहेत भारतामध्ये. सगळ्यात जास्त महत्वाचे सहा ऑफिसेस म्हणजे, चार मेट्रॊ आणि गौहाती, नागपुर , पुणे या ठिकाणी. या व्यतिरिक्त भोपाळ आणि इतर बऱ्याच ठिकाणी पण यांची ऑफिसेस आहेत.या सगळ्या ऑफिसेस मधे उच्च विद्याविभूषित लोकं आहेत. बरेच तर चक्क पिएचडी झालेले सो कॉल्ड सायंटीस्ट पण काम करतात. इतकं सगळं असतांना पण या लोकांचे अंदाज नेहेमीच का चुकिचे ठरतात ? या डिपार्टमेंट्वर सरकार जो इतका खर्च करते त्याचा काही फायदा होतो का?

अंतराळात बरेचसे सॅटलाइट्स सोडलेले आहेत, हे सायंटीस्ट लोकं   केवळ सॅटलाईट इमेजेस बघुन आणि सॅटेलाईट्सच्या कडून मिळणारी माहिती बघुन   हवामानाचा अंदाज वर्तवतात. आता जर केवळ सॅटलाईट इमेजेस वरच सगळा अंदाज असेल तर त्यासाठी इतकी ऑफिसेस ठेवण्याची गरज काय?  एकच ऑफिस ठेवले, आणि तिथे दहा पंधरा लोकं बसवले  संपुर्ण देशभरातल्या सॅटलाइट मॅप्स चेक करुन हवामानाचा अंदाज करणे सुरु केले, तरीही सरकारचा बराच पैसा वाचेल. दुसरा एक गृप सिसमीक व्हायब्रेशन्सचा डेटा अ‍ॅनलाइझ करून भुकंपाची माहिती जमा करेल बस्स झालं..

आणि नाही तर अजून एक उपाय  आहे, जर हवामानाचा फक्त अंदाजच करायचा तर  इतका खर्च, इतकी साधन सामग्री वगैरे कशाला हवी?  एक पोपट, नंदी बैल, पाळावा त्या सरकारी विभागाने भविष्य वर्तनासाठी – नाहीतर ’पॉल द ऑक्टॊपस’ आहेच!

त्या खात्याची वेब साईट  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.imd.gov.in/)बघितली का? खूप छान आहे..   अशा सहा साईट्स आहेत प्रत्येक ठिकाणच्या ऑफिसच्या..

टाटा -चिप ऑर प्राइसलेस??

Written by  on June 18, 2005

कांही लोकांचं मला अगदी मनापासून कौतुक वाटतं . एखाद्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसला, की मग ते त्या कामासाठी कांहीही करायला तयार असतात. पुर्वी क्रिकेटच्या मॅचेस पहातांना भर ग्राउंडवर  स्ट्रेकिंग ( सगळे कपडे काढून पळताना) करतांना कांही ऑस्ट्रेलियन  लोकांना पाहिलं आहे. अशा लोकांच्या बद्दल मी बोलत नाही.

किंवा अमिताभ बच्चनच्या घरासमोर ३ दिवस अन्न पाण्याशिवाय बसून रहाणाऱ्या आणि अमिताभने दर्शन दिल्याशिवाय अन्न पाणी ग्रहण न करणाऱ्या भैय्या बद्दल पण बोलत नाही..

सौरव ला मॅच मधे कॅप्टन केलं नाही , किंवा त्याला एखाद्या मॅच मधे घेतलं नाही म्हणून रस्ता रोको करणाऱ्या कोलकत्यातल्या त्याच्या फॅन्स बद्दल पण नाही….तर मग कोणाबद्दल सांगायचंय मला?? सांगतो..पण एकच सांगावसं वाटतं वरील गोष्टी जे लोकं करतात ते कारण एकदम फालतू आहे..  समाजाच्या दृष्टीने त्याची कांहीच किंमत नाही.. मला कौतुक वाटतं ते सामाजिक कार्यात  अशी कमिटमेंट दाखवणाऱ्यांचा.

ग्रिनपिस डॉट ओआरजी यावर पुर्वी पण एक लेख लिहीलाय(इथे वाचु शकाल तुम्ही तो) ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/04/03/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/). मग आता पुन्हा का? एकदा झालंय की सगळं लिहुन.. ??

त्या ऑलिव्ह रिडले टर्टल्स चा ब्रिडींग ग्राउंडवर टाटा पोर्ट बांधताहेत ओरिसा मधे, आणि ते होऊ नयेolive-ridley-turtleम्हणून ग्रिन पिस नावाची एक एनजीओ काम करते आहे.पब्लिक अवेअरनेस साठी त्यांना एक जाहिरात करायची होती आणि त्या साठी ऍडव्हर्टाइझ साठी  ते पैसे गोळा करत होते, म्हणून त्यांना मदत करा हे सांगायला म्हणून लिहिलेली   ती पोस्ट होती.त्यांनी पैसे द्या म्हणून आव्हान केलं होतं… मी त्यांना ३०० रुपये पाठवले होते.

कालच ग्रिन पिस क्डून एक इ मेल आला, त्यात त्यांनी लिहिलंय की पुरेसे पैसे न गोळा झाल्या मुळे जाहिरात देता आली नाही, म्हणून ज्यांनी कोणी पैसे दिले होते, त्यांचे पैसे परत पाठवण्यात येत आहेत.

पुरेसे पैसे न जमा झाल्यामुळे माझे पैसे ते परत पाठवताहेत????? माझ्या अगदी वाइल्डेस्ट ड्रिम मधे पण मला असं कधी वाटलं नव्हतं… पण रिअल  लाइफ मधे असंही होऊ शकतं???.. .झालंय! त्या एन जी ओ ने चक्क पैसे परत पाठवले! 🙂

बरं पुरेसे पैसे गोळा झाले नाहीत, म्ह्णून या लोकांनी काय लढा थांबवला असं तुम्हाला वाटतं कां?? छे!नाही.. अजिबात नाही. म्हणतात ना व्हेन देअर इज अ विल देअर इज अ वे… !रतन टाटांच्या कानावर यांना ही गोष्ट घालायची होती की “तिथे तुम्ही पोर्ट सुरु केल्यामुळे  ही नामशेष होत असलेली एनडेंजर्ड स्पेसी पुर्ण पणे नष्ट होऊ शकते”.. पण टाटांना यांचं ऐकायला वेळ नव्हता.   काय करावं बरं?? कांही दिवसा्पूर्वी यांनी एक धरणं स्टेज केलं होतं , टाटांच्या कार्पोरेट ऑफिस समोर..पण पोलिसांनी लगेच अटक केली होती.आता पुढे काय करावं ते सुचत नव्हतं . कसंही करुन कमीत कमी एकदा तरी टाटांच्या कानावर घालायचंच.. पण कसं?? अगदी मिलियन डॉलर्स क्वेश्चन!

रशिया मधे युलिया नावाची एक टाटा कस्टमर  आहे . तिने टाटांच्या कार्पोरेट ऑफिस ला फोन केला रशियाहुन आणि टाटांशी बोलायचंय म्हणून सांगितलं. पण   रिसेप्शनिस्ट ने तिला होल्डवर ठेवलं ५ मिनिटे ( मॉस्को वरून कॉल खूप महाग पडतो )आणि नंतर फोन कट केला. तिने पुन्हा फोन केल्यावर सांगितलं की टाटा सध्या प्रवास करित असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं होऊ शकत नाही.

युलियानं काय करावं?? तिने सरळ ग्रिन पिस या एन्जीओ ला फोन लावला आणि सगळी घटना सांगितली . आणि हे पण सजेस्ट केलं की एखादा व्हॉइस मेल सुरु करावा , की ज्या मधे सगळे टाटांसाठी आलेले  मेसेजेस रेकॉर्ड करावे आणि नंतर टाटांना ब्रॉडकास्ट करुन ऐकवावे. बरं ही आयडीया इतकी क्लिक झाली की सगळ्यांनी नक्की केलं आणि प्रोग्राम चॉक आउट केला..

आशिश फर्नांडीस म्हणुन एक मुंबईचा यांचा एक स्वयंसेवक आहे. त्याने काय केले, की एक टॅक्सी घेतली भाड्याने. टाटांचा रोजचा रस्ता माहिती आहेच सगळ्यांना. फाउंटनच्या समोरुन ते रोज सकाळी ९ ते ९-३० च्या दरम्यान पास होतात. भाड्याने घेतलेल्या कार वर एक ऍम्प्लिफायर अन स्पिकर लावला. आणि गुरुवारी सकाळी टाटांच्या गाडीच्या मागे ही गाडी नेली .. सगळे मेसेजेस ऍम्प्लिफायरच्या थ्रु टाटांना ऐकवले. नंतर त्यांच्या ऑफिस समोर पण तिन वेळा सगळे रेकॉर्डेड मेसेजेस प्ले केले. पण नंतर पोलिस आले आणि आशिश फर्नॅंडिस ला अटक करण्यात आली.

आता तो सुटलाय . आणि केस पेंडिंग आहे त्यामुळे या सगळ्या एपिसोडचे फोटो वगैरे कांहीच ना्हीत. तुम्हाला ते मेसेजेस ऐकायचे आहेत कां?? इथे क्लिक करा.your-message-has-been-broadcast-to-mr-ratan-tata ^(http://rangmarathiche.com/goto/http://greenpeace.in/turtle/your-message-has-been-broadcast-to-mr-ratan-tata).. .आशिश म्हणतो, की हे कॅंपेन त्याचं एकट्याचं नाही हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं आहे.. तेंव्हा आपण सगळे मिळुन काम केलं तर टाटा ऐकतिल….!

हॅट्स ऑफ टू  आशिश ऍंड सच कमिटेड पिपल अराउंड.. असे कमिटेड लोकं आहेत आपल्या कडे म्हणूनच देश चाललाय.!!

ती जुनी जाहिरात जी आजपर्यंत कधीच पब्लिश होऊ शकली नाही ती इथे पुन्हा एकदा पोस्ट करतोय…..

एक तरी कविता अनुभवावी ..

Written by  on June 9, 2005

सुपर्णा चे  ( माझी सौ.) आजपर्यंत   तिचे बरेचसे लेख प्रसिद्ध झाले  आहेत, त्या पैकी मला आवडलेला लेख इथे पोस्ट करतो आहे.   कवितांचे  विश्व फार मोठे आहे. काही कवींनी तर आपल्या मनावर कळत नकळत राज्य केलं आहे,  प्रत्येक  कविता म्हणजे कविचे मनोगत!   कविता आणि त्या कवितेचा  सामान्य जीवनाशी असलेला संबंध उलगडून दाखवणारे  सदर  “काही ओळी अनुभवाव्या” ! तरुण भारतात या सदरा मधे  २५ लेख प्रसिद्ध झाले आहेत, आणि  त्या श्रुंखलेतला  हा २५ वा लेख.

आता लवकरच सगळे लेख तिच्याच ब्लॉग ^(http://rangmarathiche.com/goto/http://http//kachapani.com) वर टाकणार आहे ( टाईप तर मलाच करावं लागतं म्हणून जवळपास वर्षभर अपडेट केला नव्हता तिचा ब्लॉग..) 🙂

कोन्यात झोपली सतार सरला रंग,
पसरली पैंजणे , सैल टाकुनी अंग,
दुमडला गालीचा, तक्के झुकले खाली,
तबकात राहीले , देठ लवंगा साली
झुंबरी निळ्या दिपात ताठली वीज
का तुला कंचनी अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते, ज्याच्या साठी
ते डावलून तू दार द्डपिलें पाठीं
हळूवार नखलीशी पुनः मुलायम पान
निरखीसी कुसर वर कलती करूनी मान
गुणगुणसी काय ते? -गौर नितळ तव कंठी-
स्वरवेल खरखरे, फुलं उमरते ओठी.
 

वडिलांचे पायी जाण्य़ाचे कष्ट वाचावे म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्याकडे हिशोबाचे काम मला द्या, वडीलांच्या ऐवजी मी ते काम करीन” असे सांगायला गेलेले गदिमा त्यावेळी फक्त इयत्ता चौथीत होते.प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, आईवडिलांचा सुसंस्कार आणि लेखणीची प्रतिभा अशा सर्व मितींनी युक्त असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रसिद्ध ’रामायण कार’ गदिमा हे आहेत. पोटासाठी पराडकरांची “सुंगंधी धूप सोंगटी” विकणाऱ्या या महाकवीने गीत रामायणा द्वारे पुढील भारतीय पिढीसाठी संस्कृतीचा धूप महाराष्ट्रात दरवळत ठेवला . आपली प्रतिभावंत लेखणी आपल्याला केवळ पैसा देते, परंतु काळावर  कायमचा ठसा उमटवत नाही हा सल त्यांना होता.त्यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून ५६ व्यक्ती चित्रे , समूह गीत, या विविध प्रकारांनी भरलेले आणि भारलेले रामायण साकार झाले.

वर  उधृत  केलेली कविता ” जोगिया” ही माडगूळकरांची लावणीतल्या चरित्र नायिकेचे मनोगत व्यक्त करणारी कविता आहे. खरे तर लावणीतील नायीकेला चरित्र नायिका म्हणणे धारिष्ट्याचे होईल. परंतु  कविता गत ’ मी ’ ने ज्या लावणी नायिकेचे वर्णन केले आहे तिचा भाव , तिची समर्पण वृत्ती, प्रेमाच्या ठायी असलेली नीती, व श्रध्दा हे सारेच तिला चरीत्र नायिकेच्याही दर्जाच्या वर नेऊन पोहोचवतात.

लावणीचा पूर्व इतिहास जाणून घेणे खूप रंजक ठरते. ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायात लावणीचे वर्णन येते. ” तमाशाच्या धर्तीवर होणारे नृत्य गायन, गीत म्हणजेच लावणी आणि घाटीव म्हणजे स्तुतीपर गीते वगैरेंच्या गायनाने कानांना सुखावतात, त्यातच फुलांचा व सुगंधी द्रव्यांचा सुवास! प्रेक्षक देहभान विसरून चोरी , लुटमार वगैरे  वाममार्गाने मिळवले धन उधळतात, म्हणजेच दौलत जादा करतात ” ही

जरी लावणी या प्रकाराची पूर्व पीठिका असली तरी लावणी खरी प्रस्थापित झाली ती पूर्व पेशवाईच्या कालखंडात. या काळात स्वराज्याचे साम्राज्य आले. मराठ्यांच्या हातात अमाप पैसा आला. त्यांची रहाणी करमणुकीची , ऐषारामाची, व वृत्ती सुख विलासी झाली. त्यातच मोगली वातावरणात वाढलेला शाहू सारखा   राजा आणि नानासाहेबांसारखा पेशवा असल्याने शाहीर, गोंधळी, भराडी, भांड, यांना नवनवीन विषयांवर नवनवीन ढंगामधे रचना करण्यात प्रोत्साहन मिळाले व उत्तर पेशवाईच्या कालखंडात लावणी  बहरात येऊन देखणी झाली.

रामजोशी अनंत फंदीं सारख्या पिढीजात कीर्तनकाराने   देखील हातात डफ धरले. सवाल- जवाब या सोबतच विषय व रचना या मधे   अहमहमिका सुरु झाली. लावणीच्या रचना जास्त खटके बाज व प्रासयुक्त झाल्या. मराठी वीर लावण्या गुणगुणत लावणीच्या शृंगारात पूर्णतः बुडाले.

लावणीतील  श्रृंगार कानाला व मनाला सुखवणारा होताच परंतु तो डोळ्यांना सुद्धा सुखवणारा असावा म्हणून कवनाची लावणी ही फडाची लावणी झाली .शाहीर संतकवी, व पंडित कवी  यांच्यामधे मुख्य भेद काय असा सवाल रामदास स्वामींना केला गेला. त्यांनी याच्यावर फार मार्मिक उत्तर दिले. पंडित हे पाठ कवी, संत हे प्रासादिक कवी, तर शाहीर हे धीट कवी .

मराठी साहित्याच्या दृष्टीने विचार केल्यास असे लक्षात येते की संताच्या लेखणीतूनही सामाजिक विचार मांडला गेला, परंतु तो उपमा दृष्टांताच्या पलीकडे गेला नाही . शाहिरानी मात्र लौकिक विषयांवर कवने करून आपल्याबरोबर श्रोत्यांनाही तो आनंद उपभोगायला भाग पाडले. त्यामुळे मराठी काव्यात ’शाहिरी काव्य’ हे अपूर्व आहे.या मधे प्रामुख्याने तत्कालीन विषय म्हणजेच लग्नानंतरचे पती विषयीचे प्रेम ,कोवळ्या मनाची अल्लड वृत्ती, पती दर्शनाची उत्सुकता, मुलूखगिरी वर गेलेल्या पती विषयीची हुरहुर, स्वारी येताच होणारा आनंद, स्वारीचा मुक्काम येताच उडणारी धांदल, रुसवे – फुगवे, राग- अनुराग, इत्यादी वर कवने झाली.

स्त्री -पुरुष प्रेमाचे उत्कट प्रणय विकारांचा स्वाभाविक आविष्कार मराठी भाषेतील लावणीत आढळतो तो तसा इतर भाषेत खचितच आढळेल. शृंगारा  प्रमाणेच पौराणिक व अध्यात्मिक विषय देखील त्यांना वर्ज्य नव्हते. कवनां मधे कूट योजना करून कलगीतुऱ्याचा बाज देखील त्यांनी वाढवला. शाहिरी काव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शुद्ध मराठीपण हे आहे. संत काव्य किंवा पंत काव्य भाषांतरीत केले तर ते कोणत्याही भाषेत खपेल, परंतु मराठी लावणीचा शाहिरी रंग कोणत्याही भाषांतरात उतरू शकणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ते काव्य पूर्णपणे लौकिक होते, तसेच ते फक्त पंडिती काव्या प्रमाणे केवळ उच्च वर्गाकरता मर्यादित नव्हते. त्यातील कवी हे बहुजन समाजातील असल्याने त्याचे शुद्ध मराठीपण जपले गेले. यातील उपमा प्रतिमा आणि वर्णने, या मनोहारी होत्या. उदाहरणार्थ ,

गगनात चांदणी ठळक मारीशी झळक
उभी गं अंगणी,
किती नटून थटून मारीशी छनछन
नैनांच्या संगिणी
किंवा
लहान चिरी कपाळी कुंकाची
लाल जशी पिकली मिरची.
किंवा
बहुतां दिवसी तुला भेटले आनंद मय दोघा
जसा पूर गंगेच्या ओघा.

लावणी ही नुसते माध्यमच नव्हते तर ते दृक़ श्राव्य माध्यम असल्याने त्याचा वर्णनपरता हा मुख्य गुण होता.

सहज मनामधे आले साजणी कधी स्वामींचा एकांत घडे
तोच जासूदे येऊन सांगितले मुक्काम गंगे अलीकडे.

एकूण  काय तर लावणीची ही सारी वैशिष्ट्ये पाहिली तर साहित्याच्या प्रांगणात इतकी देखणी भर कुठल्याच प्रकाराने घातली नाही. पूर्वी स्त्रीची भूमिका पुरुष करित असत नंतर त्याची जागा हळू हळू पोटापाण्यासाठी म्हणून स्त्रियांनी घेतली आणि  लावणीवर अश्ललतेचा ठपका आला. लावणी सादर करणाऱ्या स्त्रीच्या मनात सतत कुठला तरी सल बोचत राहिला. हाच सल माडगुळकरांच्या ’जोगिय’ मधल्या नायिकेने सांगितला आहे. –

“मी देह विकुनीया मागून घेतले मोल,
जागविते प्राण हे ओपुनिया ’अनमोल’
रक्तांत रुजविल्या भांगेच्य मी बागा
ना पवित्र देही तिळाएवढी जागा .”

जोगिया कवितेतील नायिकेला वाटते की देह विकून मिळालेले प्रेम हे शाश्वत नाही आणि ती सुद्धा शाश्वत प्रेमासाठी आसुसलेली आहे म्हणूनच ती एका विशिष्ठ तिथीला, त्या दिवसाला, अस्वस्थ होते. कवितेच्या पहिल्या कडव्यात नायिकेची व्रतस्थ स्थिती अत्यंत सुरेख पद्धतीने वर्णी नेली आहे. लावणी सादर केल्यावर रसिक जनांना न रिझवता ती थेट आत येते आणि त्या विशिष्ट दिवसाची आठवण म्हणून ’ व्रतस्थ ’ रहाते. काय घडले असते त्या विशिष्ट तिथीला? असे काय घडले असते की ’ का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने?’  अशी तिला विचारणा होते? मग ती नायिका त्या दिवसाची कथा सांगते.

शोधित एकदा घटकेचा विश्राम,
भांगेत पेरूनी तुळस परतला शाम,
सावळा तरूण तो खराच ग वनमाली
लाविते पान …तो निघून गेला खाली.
अस्पष्ट स्मरे मज त्याचा वेडा भाव
पुसले हि नाहि, मी मंगल त्याचे नांव,
बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी
’मम प्रीती आहे जडली तुजवर राणी’!

असा हा खुळा घनश्याम तिच्या रंग महाली येतो , अन प्रीतीची याचना करतो.प्रथम हिला त्याची गम्मत वाटते. नीतीच्या या व्यापारी हा ’इष्काचा’ प्यार सांगतो म्हणून ती म्हणते-

हासून म्हणाल्ये, ’ दाम वाढवा थोडा…
या पुन्हा , पान घ्या… निघून गेला वेडा’ !

आता मात्र तिला खरंच त्याच्या निघून जाण्याचा पश्चात्ताप होतो आहे.शाश्वत प्रेमाचे दान अव्हेरल्याचे दुःख तिच्या पदरी आहे. त्यामुळे ती अस्वस्थ दुःखी होते, आणि म्हणून शेवटी ती त्या खुळ्या वेड्यासाठी पान लावते आणि त्याच्या खुळ्या वेड्या प्रितीचा सन्मान ती व्रतस्थ राहून करते.

ही तिथी पाळते व्रतस्थ राहूनी अंगे
वर्षात एकदा असा ’ जोगिया’ रंगे.

खरे तर कविता संपल्यावर मनात एक विचार येतो की असा कोणी घननीळ तिच्या जीवनात खरेच आला असेल का? की हा तिच्या मनातला, वास्तवात अस्तित्वात नसलेला प्रियकर आहे ? क. भक्तीच्या भावविभोर स्थितीतील कृष्णाला अर्पिलेली सुमनांजली आहे? तिच्या मनातले खरे खोटे तिच जाणे . परंतु एक मात्र खरे की कलावंतिणीच्या ठायी असलेली श्रद्धा,नीती, शाश्वत प्रेमाची चिरंतनता हे गुण नायकिणीला चरित्रनायिकेच्याही वरचे स्थान प्राप्त करून देते हे आणखी विशद करून सांगायला नको.

श्रीलंकेत चालु तरी काय आहे??(उत्तरार्ध)

Written by  on June 1, 2005

एखाद्या मांजराला जरी तुम्ही कॉर्नर करुन मारणे सुरु केले तर ते मांजर पण वाघाप्रमाणे लढत. अगदी हीच गोष्ट  श्रीलंकेतिल तामिळांच्या बाबतीत घडलेली आहे.मी त्या तामिळ टायगर्सचे फोटोग्राफ्स पाहिले आहेत नेट वर. अगदी सडसडीत बांध्याचे आणि बरेचसे तर कुपोषित लोकं वाटतात . आणि हेच लोकं एल टी टी ई चे टायगर्स आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरा कठिणच जाते.

इथे प्रभाकरन सारखा एक माणुस केवळ स्वतःच्या विल पॉवर वर इतकी मोठी संघटना सुरु करतो, आणि तिला आजचे स्वरुप देतो ते वाखाणण्यासारखे आहे. इथे तामिळ लोकांना काहीच गमवण्यासारख नाही. त्यांनी आपलं अस्तित्व पण गमावलेलं आहे श्रीलंकेत . म्हणूनच तर सुसाइड अटॅक्स करण्यासाठी जे ‘डिव्होटॆड फॉर द कॉज’ लोकं हवेत ते आहेत प्रभाकरन कडॆ.प्रभाकरनला सहज मिळतात. जवळपास १०० च्या वर असे लोकं आहेत ज्यांनी अशा अटॅक्स मधे स्वतःला स्वाहा करुन टाकले आहे.

तामिळ टायगर्स च्या काही क्वॉलिटीज आहेत ,  त्या अगदी वाखाणण्यासारख्या आहेत .ऑर्गनायझेशन बिल्डींग ऍबिलिटी, इनोव्हेटिव्हनेस,  बॅटल फायटींग,  मोबलायझेशन ऑफ द अव्हेलेबल रिसोअर्सेस, ऑप्टीमम यूटिलायझेशन ऑफ द रिसोअर्सेस, कमिटमेंट टु द कॉज दे बिलिव्ह इन आणी क्लिअर व्हिजन!प्रभाकरन हा एक बेस्ट मॅनेजर झाला असता कार्पोरेट वर्ल्ड मधे.

मॅनेजमेंट च्या भाषेत बोलायचं तर डिफायनेबल ऑब्जेक्टीव्ह्ज , वेल थॉट प्लान्स आणि प्रोग्राम्स टु अचिव्ह इट!जगातिल हा एकच ग्रुप आहे ज्याने दोन मोठे वर्ल्ड लिडर्स असॅसिनेट केले. एक म्हणजे राजिव गांधी आणि दुसरा म्हणजे प्रेमदासा रणसिंघे.असॅसिनेशन मधे इतका हाय सक्सेस रेट दुसऱ्या कुठल्याही टेररिस्ट गृप चा नाही.

ह्या टायगर्सच्या ट्रेनिंग मधे अजुन एक गोष्ट शिकवली जाते, की कुठल्याही परिस्थितित दुश्मनांच्या हातात जिवंत पडायचं नाही. जर कधी तुम्ही शत्रुच्या हातात पडलाच, तर मग गळ्यात लॉकेट्प्रमाणे घातलेली सायनाईडची कॅप्सुल चावुन ताबडतोब प्राण द्यायचे. याच गोष्टी मुळे त्याचा ठावठिकाणा इतके दिवस सापडत नव्हता.

तामिळ लोकं श्रीलंकेमधे मोस्ट अनवॉंटेड लोकं आहेत.ह्या रेसिडंट्स्चा पदोपदी अपमान होतो, यांचं सर्व्हायव्हल टोटली डिपेंड आहे सिंहली लोकांच्यावर. हिंदु  लोकांची मंदिरं तोडली सिंहल लोकांनी.  समुद्रामधे नेउन देव  बुडवून टाकले.

कित्येक वर्ष अशा ऍट्रॊसिटीज सहन केल्यावर प्रभाकरनने लिट्टे ची स्थापना केली.. मी ह्या बद्दल आता पर्यंत इतकं वाचल,फोटॊ पाहिले आहेत नेट वर की आता यावर अजुन काही लिहायची इच्छाच मरुन गेली आहे. इतके अत्याचार एखाद्या  वंशावर  केवळ  हिटलरनेच केले असावेत. फक्त फरक एवढाच आहे की इथे रिसिव्हिंग एंड ला  ज्युज नव्हते सगळे अत्याचार सहन करायला.

कमरेभोवती बांधायच्या सुसाइड व्हेस्ट चा शोध यांनीच लावला आणी त्याचा इफेक्टिव्ह वापर पण केला.सुरुवातीच्या काळात म्हणजे हा गृप सुरु झाला त्याच्या पहिल्या वर्षी हा पण एक इतर गृप्स प्रमाणेच एक रेझिस्टन्स गृप म्हणुनच होता आणि या गृपची नोंद कुठेही फारशी घेतली गेली नव्हती.पण १९८३ मधल्या पहिल्या मिल्ट्रीवरच्या अटॅक नंतर मात्र ह्या लोकांची स्ट्रेंथ एकदम वाढली. बरेच तामिळ लोकं ह्या गृप मधे सामिल झाले. त्यांना असं वाटायला लागलं, की लिट्टॆ फक्त त्यांना तामिळ इलम देउ शकते. तामिळ टायगर्सनी पब्लिक ट्रान्स्पोर्ट, बुध्दिस्ट टेंपल्स , गव्हर्नमेंट बिल्डिंग्ज या ठिकाणी स्फोट घडवून आपलं अस्तित्व अधोरेखित केलं.

टायगर्सकडे दोन वेगवेगळे फोर्सेस आहेत. एक म्हणजे जे जमिनिवर काम करतात, आणि दुसरे म्हणजे जे समुद्रावर असतात . प्रभाकरन कडे एक सबमरिन पण आहे अशी वंदता आहे.अगदी सुरु वातीच्या काळात भारत सरकारने पण तामिळ टायगर्सला मदत केली होती पण नंतर पिस किपिंग फोर्सेस पाठवल्यावर मात्र बंद केली.

तामिळ टायगर्सच्या मते भारताने पाठवलेली पिस किपिंग फोर्स ही केवळ तामिळ लोकांना नेस्तनाबुत करण्यासाठीच पाठवली. या फोर्स ने काहिही पॉझिटिव्ह ऍक्शन्स घेतल्या नाहित हा क्रायसेस संपवायला, पीस किपिंग फोर्स ने केवळ श्रीलंकेच्या आर्मी बरोबर कांही तामिळ मारले. आपले पण १०००च्या वर सैनिक मारले गेले. त्या पिस किपिंग फोर्स ची खरच पाठवायची खरोखरिच गरज होती कां? असा प्रश्न पण मनात येतो. लंका सरकारच्या चुकिच्या निर्णयाला भारताने दिलेला  पाठिंबा हा तामिळ टायगर्स ला कधीच पसंत पडला नव्हता.राजिव गांधी ह्यांच्यावरचा हल्ला हा केवळ याच  एका कारणामुळे करण्यात आला होता.

कुठलेही राजकिय प्रेशर किंवा निर्णय घेतले गेले नाही भारता तर्फे.. हा क्रायसेस ऍड्रेस करायला. भारतामधे या टायगर्स ची तुलना नेहेमी काश्मिरातिल आतंकवाद्यांशी केली जाते. कारण आपल्या इथे बऱ्याच लोकांना अजूनही हे युध्द कां सुरु झालंय आणि कुठल्या कारणासाठी ? हे अजुनही निटसं माहिती नाही.

पहिला सुसाइड अटॅक जुलै ५, १९८७ , मिल्ट्रीचे ४० जवान मारले गेले. आणि एकदा अशा प्रकारच्या अटॅक्सला यश मिळतं हे बघितल्यावर मात्र मग पुढे जास्त मॅग्निट्य़ुडचे असे १०७ अटॅक्स करण्यात आलेत. ह्या अटॅक्सची माहिती तुम्हाला वाचायची असल्यास इथे  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.spur.asn.au/chronology_of_suicide_bomb_attacks_by_Tamil_Tigers_in_sri_Lanka.htm)मिळेल. या वेब साइटवरचे फोटोग्राफ्स जरा डिस्टर्बींग आहेत .

मे १९९१ मधे श्री राजिव गांधी आणी इतर १८ लोकं पेरम्बुर इथे मारल्या गेले. तसेच या लोकांनी एक मर्चंट जहाज ्जे सप्लाय घेउन जाफन्याला जात होती ती , बुडवली.. केवळ एक तराफा वापरुन.. इथे फोटॊ  दिलाय त्याचा.अशा तराफ्यावर बसुन एखाद्या  जहाजाला बुडवणे.. हा म्हणजे एक चमत्कारच वाटतो मला. इथे पण त्या सुसाइड बॉंबरची कमिटमेंट होती टूवर्डस द कॉज.

टिपिकल तामिळ टायगरची सुसाइड किट अशी असायची. एक हाफ पॅंट , अंगाभोवती बांधलेले  आर डी एक्स आणि त्याचा ट्रिगरिंग बेल्ट  कमरेभोवती.डीटॊनेटर ट्रिगर करायला म्हणुन साधा पेन्सिल सेल वापरला जायचा. डिटॊनेटर एकदा ब्लास्ट केला की मग सोबतचे एक्स्प्लोजिव्ह्ज मोठया प्रमाणात डॅमेजेस घडवुन आणू शकायचं. जो कोणी हा अटॅक करायचा तो अटॅक म्हणजे स्वतःच्या जिवाची अजिबात फिकिर नसणारा माणुस.. त्याची मेंटॅलिटी कशी असेल मरताना? हा प्रश्न मला नेहेमिच सतावतो.त्या सुसाईड अटॅक्सच्या वेब पेज वर कांही फोटॊ आहेत. एका फोटॊ मधे केवळ चेहेरा शिल्लक आहे आणि पुर्ण धड तुकडे तुकडे होऊन गेलंय.

इतके डिसॅस्ट्रस फोटो नेटवर पहातांना अगदी कसं तरी झालं. एका वेब साइटवर एका तामिळ प्रेग्नंट स्त्रीच्या पोटातुन मुलाचा हात बाहेर आलेला दाखवला होता. पण ती लिंक मुद्दामच इथे देत नाही. हे सगळे फोटो पाहिल्यावर   मन कसं विष्ण होऊन गेलं. तो फोटो पाहिला आणि पुढे या विषयावर काहीही वाचायची इच्छाच मेली. म्हणून थांबतो इथेच..