बलात्कार लिगलाइझ्ड?

Written by  on April 20, 2004

काल एक बातमी वाचण्यात आली, ’बलात्कार  लिगलाइझ’ करण्यात आलाय. तसं बिल पण असेंब्ली मधे सबमिट करुन पास करण्यात आलंय. खरंतर ह्या बातमीवर ची प्रतिक्रिया कालच देणार होतो, पण केवळ एप्रिल फुल च्या नावाखाली डिस्कार्ड होऊ नये म्हणून आज पोस्ट करतोय..

हमिद कर्झाई यांनी यांनी एक लिगल बिल साइन केलंय.

आता हे हमिद कर्झाई कोण म्हणून काय विचारता? ते म्हणजे अफगाणिस्थानचे प्रेसिडेंट. त्यांच्या या नव्या कायद्या  नुसार अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक ’शिया’ समुदायासाठी काही कायदे घाई घाईने पास  केले आहेत.

एका कायद्यानुसार स्त्री ने पुरुषाची प्रत्येक आज्ञा पालन केलीच पाहिजे. स्त्री ने पुरुषाची प्रत्येक वेळी केल्या गेलेली सेक्स्युअल डिमांडस पुर्ण केलीच पाहीजे.   स्त्री च्या (पत्नी)  इच्छेविरुद्ध केलेला समागम हा रेप समजला जाऊ शकत नाही असाही एक कायदा पारित केल्या गेला आहे. स्त्रीने पुरुषासोबत कमीत कमी चार दिवसा मधे एकदा तरी समागम केलाच पाहिजे.पती ने स्त्रिच्या इच्छेविरुद्ध केलेला समागम हा इतर सगळ्याच प्रगत  देशात बलात्कार म्हणूनच गणला जातो.पण अफगाणिस्थान प्रगत नाही म्हणून असे कायदे करायचे?? ( हे अफगाणी सरकार येडं झालंय.. कसले कायदे काढतंय…?)

तसाही तालिबानी कायद्याप्रमाणे रेप  साठी शिक्षा  होण्यासाठी कमीत कमी ५ ऍडल्ट साक्षीदार आवश्यक आहेत.जे कधीच शक्य नाही. जर केलेला आरोप सिद्ध झाला नाही तर त्या स्त्री लाच ठेचून मारल्या जाते.

सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे ,चाइल्ड मॅरेजेस पण लिगलाइझ करण्यात आले आहेत. चाइल्ड मॅरेजच्या मागच्या निर्णयाचे कारण काही कळले नाही.  अफगाणिस्थानचे प्रेसिडॆंट हमिद कर्झाई यांनी घाईने पारित केलेला हा कायदा म्हणजे वुमन लिबरेशन च्या कार्यकर्त्यांच्या साठी एक मोठा मुद्दा आले.हा कायदा, लग्न, डिव्होर्स, प्रॉपर्टी इन्हेरिटंस वगैरे गोष्टींवर डिल करतो.

प्रत्येक बाबी मधे स्त्रिचे स्थान अगदी खालच्या पातळीवर नेउन ठेवले आहे..माझ्या मते हे एक या शतकातील कुठल्याही देशाच्या पार्लमेंट मधे पास झालेले सगळ्यात वाईट असेल.अशा दकियानुसी कायद्यामुळे स्त्रिया जास्त व्हलनरेबल होतील असे वाटते.

अफगाणिस्थान मधल्या या बिलातिल कायदे हे अगदी इंग्लंड मधल्या ’थंब रुल’ कायद्यापेक्षाही भयानक आहेत. .इंग्लंड मधे १८ व्या कि १९ व्या शतकात एक थंब रुल म्हणून कायदा पास करण्यात आला होता. त्या कायद्याप्रमाणे पुरुषाने आपल्या बायकोला अंगठ्या एवढ्या जाडीच्या केनने मारणे हे लिगली मान्य होते.तेंव्हा पासूनच हा थंब रुल हा शब्द अस्तित्वात आला .अफगाण प्रेसिडेंट्च्या  या कायद्यामुळे एक बाकी क्लिअर झालंय, की तो तालिबानचा पिट्टू आहे हे निर्विवाद सत्य अधोरेखित झालंय.

जेट एअर वेज फुल सर्व्हिस एअर लाइन्स??

Written by  on April 17, 2004

एखादा दिवस इतका वाईट निघतो की त्या दिवशी जेवणाचे नुसते हाल होतात. खिशामधे कितिही पैसे असले तरिही जेवायला वेळ मिळत नाही किंवा जे काही मिळतं ते ’~नॉट टु युवर टेस्ट’ असतं.
गुरुवारी सकाळी सकाळी औरंगाबादला जेट एअरवेज ने गेलो होतो. जेट म्हणजे हल्ली नुसती नावालाच फुल सर्व्हीस एअर लाइन्स राहिली आहे. सकाळि ७-१५ ची फ्लाइट होती.धावत पळ एअर पोर्ट ला पोहोचलो तर ४ पैकी३ किऑस बंद होत्या . जो एक सुरु होता, त्यासमोर मोठा क्यु! चरफडत क्यु मधे उभा राहिलो. किऑस चेक इन ला २५० माइल्स मिळतात.. माझा नंबर येता येता१० मिनिटे गेली. शेवटी एकदाचा बोर्डींग पास+ लाउंज कार्ड घेतला….. सकाळी घरुन उशिरा निघाल्या मुळे  आणी किऑस क्यु मधे वेळ गेल्याने  एअर पोर्ट वर लाउंज मधे पण जाता आलं नाही, विचार केला सरळ फ्लाईट मधेच ब्रेकफास्ट करु..

bf1युजवली फुल कोर्स ब्रेकफास्ट सर्व्ह केला जातो ह्या वेळेमधे पण जेंव्हा एअर होस्टेस ने ट्रे आणुन ठेवला, मी तर चक्रावुनच गेलो.. एक पिस डॅनिश ब्रेड+ एक पिस लहान बन पाव+ बटर + स्ट्रॉबेरी जाम+ चार तुकडे पपई चे + एक तुकडा खरबुज+ एक द्राक्षं+ दोन तुकडे पायनॅपलचे+पाण्याची बाटली(चहा, किंवा कॉफी पण नव्हती). हा मेनु होता.

मी विचारलं की माझा ऑप्शन तर एल सि एम एल म्हणजे लो कॅलरी मिल्स आहे तर तिने सरळ सांगितले की स्पेशल ऑप्शन्स ऍव्हेलेबल नाहित. मी जेट चा प्लॅटीनम कस्टमर, त्यामुळे जरा जोरातच तिला ‘आज्ञा ‘ केली की मला दुसरं काहितरी आण, तर त्यांची मुख्य होस्टेस आली आणि म्हणाली की  औरंगाबादची  फ्लाईट कमी वेळाची असल्यामुळे हॉट ब्रेकफास्ट सर्व केला जात नाही.

म्हंटलं, तुम्ही जरी हॉट किंवा कोल्ड  ब्रेकफास्ट दिला, तरिही खाण्यासाठी सारखाच  वेळ लागणार.. तिच्या पण लक्षात आलं पण तिने ओशाळवाणा चेहेरा करुन सॉरी म्हंटलं.. ( जशी काही सगळी चुक हीचीच आहे अशा आविर्भावात)कोणी कस्टमर रागावला की त्याच्या शेजारी जाउन मधल्या पॅसेज मधे गुडघ्यावर बसुन बोलतात त्या पॅसेंजरशी. त्या वेळचा त्यांचा आविर्भाव मात्र  एकदम असा असतो की ज्याच्याशी बोलताहेत तो म्हणजे प्रेसिडेंट ऑफ यु एस आहे..  कसलं मस्त ट्रेनिंग दिलं असतं ना ह्या मुलिंना…मग मलाच वाईट वाटलं तिच्याकडे पाहुन, आणि उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म समजुन कोरडी ब्रेड पोटात ढकलली.

औरंगाबादला पोहोचलो, आणि नेहेमी प्रमाणे हॉटेल अतिथी वर पोहोचलो. थोड्या वेळाने आमचा सर्व्हिस इंजिनिअर आला,  दुपारचा एक वाजत आला होता, सगळी कामं झाली होती,  आम्ही वाळूंज भागात होतो, तेंव्हा ’लुधियाना ढाबा’ ला जाण्याशिवाय पर्याय नव्हता .लुढियाना धाबा आदी सो सो आहे. पण वाळूंज भागातिल बेस्ट जॉइंट म्हणुन फेमस आहे. तर, असा दिवस गेला.रात्री कंटाळल्या मूळॆ हॉटेलवरच जेवलो.. अगेन टिपिकल ’कुत्तेकी(तंदुरी) रोटी’अन मिक्स व्हेज वगैरे..अख्खा दिवस व्यवस्थित जेवण मिळालं नाही.

जो पर्यंत फुलका आणि शेवटचा दहिभात  खात नाही तो पर्यंत माझे समाधान होत नाही जेवल्याचे. शेवटचा ताकाचा पेला तर मस्ट असतो घरी..टुर ला असलो की मी मिस करतो ते गोड दह्याचं तांक! घरी रात्री लावलेल्या दह्याचं तांक सकाळी, आणी सकाळी लावलेल्या दह्याचं तांक सायंकाळी.. . मला ओरिजिनल टेस्ट ताकाची  अगदी मनापासुन आवडते, त्यामधे मिठ कींवा साखर न घालता..   .

औरंगाबादची चांगली माहिती आहे .. रात्रीच ठरवुन टाकलं की उद्या जे होइल ते होइल पण शेव भाजी अन भरित भाकरी खायचिच… राजेशला ( आमचा लोकल सर्व्हिस इंजिनिअर ) ला म्हणालो, आणी रात्री त्याने परभणीकरांच्या हॉटेलमधे (जालना रोड चे- औरंगाबादेपासुन साधारण ६-७ किमी दुर असेल ) नेलं.. ऍम्बियन्स तसा अगदीच सो सो होता.. आणि गर्दी पण फारशी दिसत नव्हती.. म्हंटलं.. आजपण जागा चुकली वाटतं. पण जेंव्हा स्टार्टर म्हणून मसाला पापड आणि शेवग्याच्या शेंगा मसाल्या सहित समोर आल्या,…. आणि मी विरघळलो.. म्हंटलं… बस्स! हमियस्तु!!

पहिली गोष्ट म्हणजे हॉटेल मधे शेवग्याच्या शेंगा बघुनच मी अर्धा खल्लास झालो होतो.. आणि पहिली शेंग हातात घेतली आणी मग प्लेट रिकामी होइ पर्यंत थांबलोच नाहीशेवग्याच्या शेंगांचा मसाला एकदम वेगळाच होता. मला वाटतं बहुतेक भरपुर प्रमाणात आलं वापरलं होतं..शेवग्याच्या भाजिच्या वासानेच भुक चाळवली..

जेवणा साठी वेटरला ऑर्डर दिली.. पातळ भाकरी एकदम क्रिस्पी, वांग्याचं भरित , शेव भाजी,   दही, आणि ताक..अहो जेवण तयार होऊन यायला जवळ पास ४० मिनिटे लागली पण तो पर्यंत शेवग्याच्या शेंगाच्या सालिंचा ढीग समोर तयार झाला होता.शेवग्याच्या शेंगा इतक्या चवदार होऊ शकतात हे मला आज समजले.

वेटरने जेवण आणलं. मस्त पैकी चुलिवरच्या फुगलेल्या पातळ ( कर्नाटकी स्टाइल च्या) भाकरी , आणि ऑर्डर प्रमाणे भाजी. दही पण अगदी मस्त खवल्या खवल्यांचं होतं…. पाहुनच मेंदु ला करंट पोहोचला आणी ….राजे.. खरं सांगतो.. दोन दिवसाचा उपवास सुटल्यासारखा अगदी तुटून पडलो त्यावर.. सोबत कच्चा कांदा, हिरवी मिरची अन तिखट लोणचं होतंच.. वेटर म्हणाला लोणि नाही.. म्हंटलं हरकत नाही.. पण जेवण एकदम झकास…. जेवतांना तिखट लागलं तर ताकाचा ग्लास होता. मस्त पैकी पुदिना, मसाला ताक एकदम टेस्टी होतं.. नेमका मोबाइल बरोबर नेला नव्हता, नाहितर इथे फोटो लोड केला असता.. तर मंडळी, कधी औरंगाबादला गेलात तर नक्कीच हॉटेल अमित, जालना  रोड विसरु नका..आणी हो तिथे गेल्यावर स्टार्टर म्हणून शेवग्याच्या शेंगा जरुर ट्राय करा.. टीपिकल मर्हाट्मोळं जेवण ..इतकं सगळं जेवल्यावर बिल फक्त..२१५ रु….जेवण झाल्यावर परभणीकरांचे मनोमन आभार मानत उठाल….

{माफ करा…. अमित नाही ..हॉटेल न्यु अभिजित.. फोन न. ६९९२८७२ ( आत्ताच बिल सापडलं म्हणुन दुरुस्त करतोय.)}

काल  सकाळच्या जेट च्याच फ्लाइट ने परत आलो.येतांना पण अगदी सेम ब्रेकफास्ट होता फ्लाइट मधे. सेम डेनिश ब्रेड, वगैरे स्टफ.  पण आधिचा अनुभव गाठी असल्यामुळे हॉटेलमधुन निघतांनाच ,ब्रेड ऑम्लेट + कॉर्न फ्लेक्स चा ब्रेकफास्ट घेउन निघालो. दुपारी मात्र  घरी जेवण करुन मस्त ताणुन दिली संध्याकाळ पर्यंत..

जेट एअर्वेज हल्ली सगळी कडेच कटींग द कॉर्नर करित असते. प्रत्येक गोष्टी मधे हा चेंज लक्षात येतो.पुर्वी पण लाउंज नसेल तरिही लाउंज कार्ड द्यायचे अन लहानशा असलेल्या काउंटर वर स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक कर्टसी म्हणुन द्यायचे. आता मला वाट्तं त्यांना कळलं आहे की कर्टसी कॉस्ट समथिंग.. सो कट द कर्टसी!रेसेशन चा प्रभाव सगळी कडेच जाणवतो. लहान एअर पोर्ट वर ( रायपुर, राजकोट, इत्यादी) हल्ली लाउंज कार्ड देत नाहीत प्लॅटिनम कस्टमर्सला सुध्दा..  जेट च्या इतर फ्लाइट्स मधे पण फुड क्वॉलिटी एकदम पॅथेटीक असते. क्वांटिटी पण कमी असते.. फुल सर्व्हिस एअर लाइन्स म्हणुन जेट ने प्रवास करणार ( स्वतःच्या पैशाने) तर टाळा. जर कंपनी अकाउंट असेल तर ठिक आहे.. हे फोटो नरेश गोयल ला पण मेल करतोय..  नेहेमी प्रमाणे त्यांचे ऍपोलॉजी लेटर येइल.. पण काहीच बदलणार नाही हे  मला पक्के माहिती आहे.

ऑन स्क्रिन न्युडीटी -आपण तयार आहोत कां?

Written by  on April 3, 2004

मधुर भांडारकरांच्या बद्दल मला खरंच खूप आदर आहे. त्यांचे चित्रपट नेहेमीच काहीतरी वेगळे असतात. हिंदी चित्रकर्त्यांच्या भाषेत -’जरा हटके’ असतात. त्यांच्या चित्रपटात अगदी सुरुवातीच्या काळात मराठी कलाकारांना बराच चान्स पण दिला गेला. अतुल कुलकर्णी ह्यांना पण त्यांनीच चित्रपटात आणलं.

फॅशन, ट्रॅफिक सिग्नल – (हा मला खूप आवडला होता)पेज ३, आणि सत्ता सगळेच चित्रपट मला आवडले होते. सत्ता मधे रवी्ना  टंडन आणि अतुल कुलकर्णीचं काम अगदी आठवणीत राहण्यासारखं  झालं आहे.

कालची बातमी की मधुर भांडारकरांच्या ’जेल’ ह्या चित्रपटात बद्दल. नील नितिन मुकेश हा ह्या चित्रपटामधे एका मध्यम वर्गीय मुलाची भूमिका करतो आहे. ह्य़ा भुमिकेत खरेपणा आणण्यासाठी त्याने ठाणे कारागृहांत जाउन तिथल्या कैद्यांची परिस्थिती ची पाहणी केली.दिवसभर त्याचा मुक्काम जेल मधेच होता. त्याने कैद्यांनी बनवलेले जेवण पण घेतले.  नितीन नील मुकेश, नक्कीच एक डिव्होटॆड आर्टीस्ट आहे.  इतकी कमिटमेंट फारच कमी लोकांच्या मधे ( बारिंग आमीर खान- गजनी, अभिषेक बच्चन -गुरु) दिसून येते.

मेल न्युडीटी आता आउट ऑफ क्लोझेट येते आहे. आजपर्यंत भारतीय सिनेमामधे फक्त स्त्रियांनाच सेमी न्युड दाखवले जायचे. मेरा नाम मधल्या त्या सिम्मी गरेवाल चा शॉट हा पहिला न्युड शॉट होता भारतीय सिनेमात. ’कपुर्स’ ने पुढे मंदाकिनीला फ्रंट न्युड शॉट दाखवून  ( म्हणे कहानीकी डीमांड है) एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला.

नील नितीन मुकेश ’फ्रंट न्युड’ सिन देणार म्हणून, बातमी आली, बरेच फिड्स पण पाहिले टीव्ही वर..मला वाटतं की चित्रपटाबद्दल मिडीया हाइप क्रिएट करायला म्हणूनच हे असे टिट बिट्स मिडियाला लिक करण्यात आले . टीव्ही वर किती न्युडीटी दाखवायची ह्यावर आपल्या कडे भारतामधे मला वाटतं सेल्फ गव्हर्नंस आहे. इतकं असूनही प्रत्येक  पेड चॅनलने ही बातमी घोळून घोळून दाखवली.मला वाटत नाही की  ही अशी क्लिप फॅमिली व्हिविंग साठी योग्य आहे म्हणून…

खरं सांगायचं तर लाज वाटते असं काही घरच्या लोकांच्या सोबत पहातांना!  हे वाचलं आणि मला ट्रेसी व्हिटने आठवली सिडने शेल्डनच्या इफ टुमारो कम्स मधली.त्या मधे एक चॅप्टर आहे  , ट्रेसी ला जेल मधे जावं लागतं आणि, तिची मेडिकल एक्झाम होते तो आठवला.

कदाचित चित्रपटाकरिता  करता हा न्युड शॉट डिमांड ऑफ द  स्टोरी असेल  , पण टीव्ही वर दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही.

टीव्ही करता पण एक सेपरेट सेन्सॉर असावं कां? टीव्ही वरचं २६/११ चं कव्हरेज? अशा अनेक घटना मला अंतर्मुख करतात.. मला तर वाट्तं सेन्सॉर -असावं टीव्ही करता, पण असंही वाट्त की जर सेन्सॉरिंग करणे सुरु केले तर पुन्हा आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण होइल.. तेंव्हा आहे तेच ठिक आहे …फक्त टिव्ही च्या प्रोड्युसर्सनी ताळतंत्र सोडू नये….बस्स इतकेच!