आयकॉन

Written by  on February 23, 2004

neda-iran-videoनेदा आगा सुलतान!.१९ जुन २००९.. नेदा आगा… एक गोळी ! आणि खेळ संपला.
एखादी व्यक्ती ही कधी एखाद्या चळवळीचा फेस बनते तेच लक्षात येत नाही.मीर हुसेन च्या रॅली जवळ झालेल्या गोळीबारात हिच्या छातीवर गोळी लागली आणि तिथेच तिचा मृत्यु झाला. आता हीचा चेहेरा इतका सर्व परिचयाचा झाला आहे की तीचा फेस  म्हणजे या चळवळीचा आयकॉन झालेली आहे.इतरही बऱ्याच घटनांचे काही फोटॊग्राफ्स आयकॉन बनलेले दिसून येतात. त्यातलेच काही खाली दिलेले आहेत. तिचा फोटो पाहिला की इराण ची चळवळ आठवत.इतका हा फोटो आणि इराण प्रोटेस्ट एकमेकाशी एकरूप झालेले आहेत.

babri-masjidअगदी हाच प्रकार आहे बाबरी डिमॉलिशनच्या बाबतीत आहे. एक फोटॊ पोस्ट करतोय इथे.. बाबरी चा..   एक फोटॊ त्या दिवसातल्या सगळ्या घटनांचे मुखपत्र झाल्यासारखं वाटतो. .
gujrat
हा फोटॊ बघा, दोन्ही हात जोडुन दयेची भिक मागणारा ह्या माणसाचा फोटो पाहिला की गुजरात दंगल आठवते.

Mumbai blast २००६ च्या मुंबई टेरर अटॅक म्हणजे ट्रेनमधले बॉम्ब ब्लास्ट्स ! हा फोटो पण त्या ब्लास्टशी कोरीलेट करतो तुम्हा आम्हाला..
APTOPIX India Shooting Kasab
इतक्यातलाच तो मुंबई अटॅक .. कसाब ऍंड कंपनिचा.

911

आणि लास्ट बट नॉट  लिस्ट.. ट्विन टॉवर अटॅक… त्याचा हा फोटो…

सबकॉन्शस माइंड हे  नेहेमी  पाहिलेली प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी कोरीलेट करण्याचा प्रयत्न करते हेच सांगायचंय मला. कुठलाही फोटॊ पाहिला, तरीही त्याचा नकळत तुमच्या मनावर परिणाम होत असतोच. आणि नेमका ह्याच गोष्टीचा ऍडव्हर्टाइझमेंट करणारे फायदा घेतात. तुम्हाला एखादी ऍडव्हर्टाइझ आवडली नाही… तरी पण ती तुम्ही नोटीस केलीत.. म्हणजे त्या जाहिरातीचा उद्देश सफल झाला!!  ..

उदाहरणार्थ, सॉस खाताना नाकाला, किंवा गालाला लागलेले सॉस, किंवा मिशी प्रमाणे , एखाद्या सुंदर मु्लीच्या वरच्या वरच्या ओठाभोवती लागलेला एस्प्रेसो कॉफीचा फेस. ही सगळी ह्याच प्रकाराची उदाहरणं…तुम्ही त्या जाहिरातींना हेट करावे अशीच अपेक्षा असते.कारण टु हेट समथिंग यु हॅव टू रिमेंबर इट!

दिंडी निघाली जागतिक साहित्य सम्मेलनाची

Written by  on February 5, 2004

आजचा सकाळी जरा लवकरच उठलो. पेपर यायला वेळ होता, म्हणून मटा ( पत्र नव्हे मित्र) , लोकसत्ता आणि इ सकाळ उघडला कॉम्पुटर वर.

पहिल्या पानावर सॅन होजे येथील साहित्य सम्मेलनाच्या ग्रॅंड ओपनिंग ची बातमी वाचली. इथे खरा पत्रकारितेचा कल लक्षात येतो. मटा वर पहिली बातमी विश्व साहित्य संमेलनाची आणि सब बातमी बीड येथील नाट्य संमेलनाची. या विरुद्ध नाट्य संमेलनाच्या बातमीला इतर वर्तमान पत्रामध्ये प्राधान्य दिलेले दिसले. इंग्रजी वृत्तपत्रांना तर ह्या कार्यक्रमाची दखल पण घ्यावी वाटली नाही.

सोहोळ्याची सुरुवात ग्रंथ दिंडी ने करण्यात आली . मला तर तिथे रहाणाऱ्या लोकल मराठी लोकांचं या बाबतीत कौतुक करावंसं वाटतं. इतका सगळा ढोल, ताशा, आणि पालखी वगैरे ची अरेंजमेंट करायची म्हणजे काही सोपं काम नाही. बातमी  मधे वाचलं की लेझीम, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या स्त्री या आणि ढोल ताशांच्या संगतीत मोठया दिमाखात ज्ञानदेवाच्या पवित्र ग्रंथाची दिंडी काढण्यात आली. वाचून बरं वाटलं.. इतक्या दुर राहुन सुद्धा संस्कृतीचे पालन करण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा तर  बातमी वाचल्यावर नक्कीच लक्षात आली.

तुम्हा सगळ्या बे एरियात रहाणाऱ्या लोकांचे त्रिवार अभिनंदन… इतकी सुंदर अरेंजमेंट करण्या बद्दल.इतर गोष्टी ठिक आहे परंतु ’पालखी ’ अरेंज करणं म्हणजे अफलातून…. पुन्हा एकदा सांगतो.. यु गाइज आर टू गुड इन व्हॉटएव्हर यु अरेंज्ड.. पुन्हा एकदा अभिनंदन. मित्रांनॊ, कृपया जरा लवकर यु ट्य़ुब वर कार्यक्रमाचे कट्स ऍड करावे.

साहित्य सम्मेलनाच्या ई सकाळ मधल्या फोटो ^(http://rangmarathiche.com/goto/http://beta.esakal.com/2009/02/14235223/vishwa-marathi-sahitya-sammela.html) मधे  दिंडी च्या मागे एक कोणी तरी ढेरपोट्या माणुस दिसतो, तो कोण  असेल बरं ??

^(http://rangmarathiche.com/goto/http://beta.esakal.com/Article/d6cf9c94-b5cf-4504-a792-83b4b91fa22d100_100_secvpf.gif)माझा असा अंदाज आहे की ते नक्कीच कोणितरी भारतामधुन गेलेले असावेत. कारण इतके सगळे मराठमॊळा कुर्ता पायजामा, आणि केशरी फेटा  घालुन असतांना हे गृहस्थ  मात्र त्या फोटॊमधे, कोट आणि लाल टाय घालुन अगदी नजरेत भरतात. बरोबर आहे , एखाद्या सुंदर  बाळाला दृष्ट लागु नये म्हणून काळी तीट लावतात ना, तसा तर प्रकार असेल हा!

इतर सगळ्यांनी श्री ज्ञानदेवांच्या पवित्र ग्रंथाला व्यवस्थित आदराने खांद्यावर स्थान दिलेलं आहे, पण फोटो पाहिला की असं वाटतं की कोटाची इस्त्री खराब होऊ नये म्हणून ह्या गृहस्थाने उगाच हातावर मारुतीची जसा संजीवनी बुटी चा पहाड पेलला, तशी पालखी पेलली आहे. बरं जर खांदा द्यायचा नसेल तर कशाला उगीच फोटॊ  करता पुढे पुढे करावं?

प्रशांत दामले, अश्विनी भीडे, आशाताई, बाळासाहेब ह्या सारखे मोठे साहित्यिकांनी पण या सम्मेलनाला लावलेली हजेरी हा कौतुकाचा विषय सध्या झाला आहे.

आणि  साहित्य संमेलनाच्या वेब साइटवर पण अध्यक्षांचा नव्हे तर  ह्रुदयनाथ मंगेशकरांचा फोटॊ डकवलेला दिसतो..

जाउ द्या,आपलं काय……………उचलला लॅपटॉप आणि बडवला की बोर्ड..
काय वाट्टॆल ते………