
हे काय असेल?
हा चित्रा मधे दाखवलेला ऑरेंज कलरचा बॉल कसला असावा?? मला पण हाच प्रश्न पडला होता पहिल्यांदा हा बॉल पाहिला तेंव्हा. पण जेंव्हा तो बॉल म्हणजे आपण नेहेमी ज्याच्याबद्दल ऐकतो तो ब्लॅक बॉक्स आहे हे समजल्यावर ह्याचा रंग ऑरेंज असतांना पण याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात बरं?? याचं खरं टेक्निकल नांव म्हणजे फ्लाईट डाटा रेकॉर्डर!विमानाचा अपघात झाल्यावर नेहेमी बातमी मधे सांगितलं जातं, की विमानाचा अपघात झाला आहे, आणि ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम सुरु आहे. जरी सगळे विमानाचे भाग जळून नष्ट झाले तरीही ह्या भागाला मात्र काहीच होत नाही आणि विमानाचा अपघात कशामुळे झाला हे समजते . पाहिल्यावर हे काय बरं असेल हा प्रश्न पडला होता,पण त्या फोटॊ खाली दिलेली माहिती वाचल्यावर मात्रं समजले.

पायलट सिट, आणि वरच्या भागात असलेले पॅराशुट
नेव्हीच्या विमानांचा बेस हा जहाजावर असतो आणि जहाज खोल समुद्रात! शत्रूच्या हल्ल्याने जर फायटर विमान कोसळले तर त्यातल्या वैमानिकाचे काय होत असेल? कारण विमान तर फारच लहान म्हणजे फार तर एखाद्या मिडियम साइझ च्या ट्रक इतकच असतं. विमानावर हल्ला झाल्यावर वैमानिकाची सिट हवेत इजेक्ट केली जाते, आणि त्याच्यावर असलेले पॅराशूट उघडते… वगैरे सगळ्या गोष्टी फक्त ऐकूनच माहिती होत्या. त्या सगळ्या पहायला मिळाल्या.
एक नवीन गोष्ट जिच्या बद्दल कधी विचार पण केला नव्हता ती म्हणजे ,वैमानिकाच्या जवळ असलेली खास रेस्क्यु बॅग! ही रेस्क्यु बॅग पायलटची सिट इजेक्ट झाल्यावर पण पायलट सोबत असते. त्या

हे सगळं असतं पायलटच्या रेस्क्यु किट मधे..
रेस्क्यु बॅग मधे समुद्राचे पाणी गोड करणारे एक लहानसे यंत्र, इन्फ्लेटेबल राफ्ट, फिशिंग चे सामान, पाणी , कंपास , फ्लेअर्स आणि अशा अनेक लहान लहान गोष्टी असतात. एका रेस्क्यु बॅग मधल्या सगळ्या वस्तू काढून एका डिस्प्ले बोर्ड वर लावलेल्या होत्या. जहाज चालवतांना समुद्राची खोली माहिती असणे सगळ्यात महत्त्वाचे कारण समुद्राची खोली कमी असेल तर जहाज रुतुन बसण्याची शक्यत खूप जास्त असते. समुद्राची मोजण्याचे यंत्र जे ध्वनीच्या इको प्रिन्सिपल वर काम करते ते पण समोरच ठेवलेले होते. इतरही बऱ्याच टेक्निकल वस्तू होत्या, पण फार वेळ नसल्यात त्यात जास्त रस घेऊ शकलो नाही.
विमान प्रवास तर हजारो वेळा झाला असेल. फायटर प्लेन्स पण आधीही पाहिले होते. पण अगदी जवळून पहाण्याचा चान्स कधी आला नव्हता तो आज आला. समोरच्याच मैदानात एक दोन पंखे असलेले ऍव्हरो

्दुमडलेल्या पंखाचे विमान
च्या सारखे एक मोठे चार इंजिन्सचे विमान – जे सामानाची ने-आण करण्यासाठी वापरले जाते ते होते. त्या विमानाच्या आत जाण्यासाठी शिडी लावलेली होती. आत शिरल्यावर आधी कॉकपिट मधे गेलो, तर तिकडे सगळे इन्स्ट्रुमेंट्स काढून घेतलेले दिसले. आत बसण्यासाठी काही सिट्स पण होत्या.
या शिवाय एक हेलीकॉप्टर- जे सध्या नेव्ही ने डिकमिशन केलेले आहे ते आणि एक फायटर जेट विमान

फायटर जेट विमान आणि खालच्या बाजूला जोडलेले बॉम्ब दिसताहेत.
पण समोर दिसत होतं. जेट टेक्नॉलॉजी मुळे विमानाच्या इंजिनाचा आकार आणि वजन एकदमच कमी झालेले आहे. पूर्वी जी रेसिप्रोकेटींग पिस्ट्न्स ची सुपरचार्ज्ड इंजिन्स वापरली जायची, त्यांचे मॉडेल्स पण समोरच ठेवलेले होते, आणि बाजूलाच अगदी अद्यावत अशा जेट इंजिनाचे मॉडेल पण ठेवलेले आहेत. ही सगळी इंजिन्स अजूनही चालू होऊ शकतात!
त्याच ग्राउंड मधे एक विमान पंख दुमडून उभे होते. हे एक खास विमान जहाजावरची हॅंगर मधली जागा कमी लागावी म्हणून डिझाiन केले गेले आहे असे समजले. ह्या सगळ्या विमानांची नांवं लिहून घेतली होती, पण तो कागद कुठे तरी हरवला, आणि आता नेट वर शोधायचा कंटाळा येतोय.:)

सबमरीन वर अटॅक करण्यात येणारा टॉरपेडॊ- क्रॉस सेक्शन
विमानाला खालच्या बाजूला बॉम्ब अडकवण्याची जागा दिसत होती. एका विमानाला तर मिसाइल्स अडकवलेले दिसत होते.. त्याला बॉम्ब किंवा मिसाइल म्हणण्यापेक्षा टॉरपेडॊ म्हणणे जास्त योग्य ठरेल. एक खास प्रकारचा टॉरपेडॊ – पूर्वी सबमरीन्सवर अटॅक करण्यासाठी वापरला जायचा. त्याचे डिसेक्शन करून क्रॉस सेक्शन मॉडेल पण ठेवलेले आहे. विमानातून टाकल्यावर समुद्रात अगदी सावकाश लॅंड होण्यासाठी या टॉरपेडॊ ला एक पॅरॅशुट असतं. एकदा समुद्रात पडल्यावर सबमरीनच्या इंजिनाचे व्हायब्रेशन्स सेन्स करून हा टॉरपेडो त्या सबमरीनच्या दिशेने सुटतो. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ऐकण्यापेक्षा किंवा वाचण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी पहाण्यातच खरी मजा आहे.
नेव्हल एअर फोर्स! हे एक वेगळंच प्रकरण आहे. सर्वसामान्य माणसांचा एअरफोर्स शी आणि नेव्हीशी संबंध कधीच येत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकत्र पहायला मिळणे म्हणजे पर्वणीच म्हणायला हवी. साधारण एअर फोर्स आणि नेव्हल एअरफोर्स मधे मुख्य फरक हा की नेव्हल एअरफोर्स मधे लहान लहान फायटर विमानं जहाजावर ठेवलेली असतात, आणि तिथल्या तुटपुंज्या रनवेवरूनच टेकऑफ आणि लॅंडींग करतात. जहाजाची लांबी साधारण ७५० फुट असते.इथे एका मोठ्या विमानवाहू जहाजाचे मॉडेल पण ठेवलेले आहे. मॉडेल टु द स्केल असल्याने पहायला मस्त वाटतं. त्या मॉडेल कडे पाहिल्यावरच त्या जहाजाच्या भव्यतेची कल्पना येते. टू द स्केल असलेल्या ह्या मॉडेल वर विमानांच्या प्रतिकृती पण ठेवलेल्या आहेत.
या वेळी विमान तळावर पोहोचल्यावर समजले की फ्लाईट उशीरा आहे , दिड तास कसा घालवायचा हा प्रश्न होताच. हे जवळच असलेले एक नेव्ही चे म्युझीयम आठवले. आजपर्यंत या म्युझियम समोरून बरेचदा गेलो असेन, पण दर वेळी कामात व्यस्त असल्याने कधी थांबून पहाणे झाले नव्हते- ते पहाण्याचा योग आज आला.
आम्ही जेंव्हा या म्युझियम मधे गेलो होतो, तेंव्हा तिथे आमच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते. काउंटरवरचा माणूस म्हणाला फार कमी लोकं म्हणजे दिवसाला फार तर ५० एक लोकं येत असतिल म्युझियम पहायला. मला वाटतं की गोव्याला गेल्यावर एकदा इथे अवश्य भेट द्यायला हवी. तुमच्या पुढच्या गोवा ट्रिप च्या वेळेस इथे जाण्याचे विसरू नका. आणि हो……….. हे म्युझियम गोवा एअरपोर्ट पासून फक्त दोन किमी अंतरावर आहे…. पहायला दिड ते दोन तास पुरेसे आहेत.