मनात आलं ते….

Written by  on August 28, 2003

सकाळी फिरायला जातो रोज, तेंव्हा हातामधे बिसलेरीच्या बाटल्या घेउन जाणारे बरेच लोक दिसतात. मुंबईच्या टॉयलेटीकेट्स बद्दल तर न बोललेलेच बरे. मालाडहून लोकलने निघालो की स्पेशली बांद्रा भागात रेल्वे ट्रॅकच्या कडेने बसलेले बरेच माणसं दिसतात. बांद्रा आलं की खिडकीच्या बाहेर पहायचं नाही आणि केवळ श्वास रोखून धरता येत  नाही म्हणून  श्वास घ्यायचा.

आज सकाळी फिरतांना दोन बायका पण हातामधे बिसलेरीची बाटली आणि छत्री घेउन जातांना पाहिल्या. इतके दिवस झालेत रोज फिरायला जातो, पण आजपर्यंत कधीही कुठलीही स्त्री अशी बाहेर हातात बिसलेरीची बाटली घेउन जातांना दिसली नव्हती. ही आजची पहिलीच वेळ. आज त्या बायकांना पाहिलं आणि चंद्रकांत खोत आठवले.

मी साधारण १५-१६ वर्ष वयाचा असतांना एक पुस्तक आलं होतं चंद्रकांत खोत यांचं- उभयान्वयी अव्यय नावाचं. त्यामधे एक प्रसंग आहे स्त्रीयांनी रेल्वे ट्रॅक वर प्रातर्विधी साठी  जातांना छत्री आणि पाण्याचा डबा घेउन जायचा–त्याची आठवण झाली. खूप वर्षापूर्वी वाचलेलं हे पुस्तक. मुंबईच्या झोपडपट्टी वर लिहिलेलं हे पुस्तक, त्या काळी खूप गाजावाजा झालेलं पुस्तक होतं. कोणी वाचु नका रे हे पुस्तक, असं म्हंटलं की हमखास वाचायची इच्छा होणार. त्या पुस्तकातली ती पात्र, भागी, भागीला…….. जाउ द्या. कदाचित खूप कोवळ्या वयात वाचल्यामुळे असेल, पण पुस्तक अगदी मनावर कोरल्या गेलंय ते. माशी गुळावर बसते, आणि …गुवा वर पण बसते, अशी सुरुवात आहे त्या पुस्तकाची. सेक्स , व्हायोलन्स आणि भाषा याचा पुरेपूर वापर असलेले हे पुस्तक आहे.हे र्पुस्तक आम्ही सगळ्या मित्रांनी एकत्र बसून सामूहिकरीत्या वाचलं होतं. त्यातले ते भागी बरोबर चे संबंधांचे वर्णन त्या काळाच्या मानाने खुपच जास्त होते. अजूनही ते पुस्तक ऐकतांनाचे मित्रांचे चकाकणारे डोळे आठवतात. 🙂

साधारण त्याच काळात अरुण साधु यांचं मुंबई दिनांक पण वाचलं होतं. जेंव्हा ’चक्र’ पाहिला, आणि त्यामागची स्मिता पाटील ने झोपडपट्टीतल्या आयुष्याचा जिवंतपणा सादर करता यावा म्हणून तिथे राहिली होती हे जेंव्हा ऐकलं , तेंव्हा तिच्या कमिटमेंट्बद्दल आदर वाटला होता. अभिनयात जिवंतपणा येण्यासाठी अमिरखान नंतर तीच एक अभिनेत्री होती असे वाटते.

माननीय नगर सेवक श्री—- यांच्या कर्तृत्वाने हे स्वच्छता गृह बांधण्यात आलेले आहे अशी पाटी दिसते लागलेली .एक गोष्ट मान्य करावीच लागेल की अशा सार्वजनीक स्वच्छतागृहां मुळेही स्त्रियांची खूपच सोय झालेली आहे. अर्थात इतक्या जास्त लोकसंख्येसाठी इतकी कमी स्वच्छता गृहे पुरेशी आहेत का हा एक प्रश्न आहेच!

एकदा मी मुंबईहुन गोव्याला जात होतो. माझ्या शेजारी एक फिरंगी बसला होता. माझ्याकडे बघून हसला, आणि स्वतःची ओळख करुन देउन म्हणाला की तो रशियन आहे पण – इंग्रजी चांगलं बोलत होता,आणि  मायग्रेट झालाय म्हणाला ऑस्ट्रेलियालत दर वर्षी भारतात येतो म्हणाला सुटी मधे. असे बरेचसे विनाकारण गप्पा मारणारे लोकं भेटत प्रवासात. मला फारसा इंटरेस्ट नसतो त्यांच्याशी बोलण्यात. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं बोलणं मला नीट समजत नाही, आणि माझं त्यांना. ऍसेंटेड इंग्रजी ( ब्रिट’स तर अजुन अवघड) समजायला खूप त्रास होतो ( खरं तर बरेचदा समजत पण नाही 🙂 )

त्याला गप्पा मारायची खूपच खुमखुमी आलेली होती. भारतामधे केरळ ला फीरुन आलो, पण गोवा जास्त आवडतं वगैरे वगैरे. अर्धं बोलणं समजत होतं, अर्धं डॊक्यावरून जात होतं.एक वाक्य म्हणाला ते मात्र एकदम हर्ट  करणारं होतं.. म्हणाला इंडीया इज अ ओपन शिट हाउस.. क्षणभर तर काय बोललाय हे मेंदु पर्यंत पोहोचायलाच वेळ लागला. एखादी अनपेक्षित गोष्ट ऐकली की कसं होतं?? तस झालं होतं.

कदाचित त्याला वाटलं की मला नीटसं समजलेलं नाही, म्हणून म्हणाला, की पिपल आर शिटींग एव्हरी व्हेअर.. पहिल्यांदा तर दुर्लक्ष केलं होतं, पण जेंव्हा तो तीच गोष्ट रिपिट करु लागला तेंव्हा आता मात्र शांत रहाणं अशक्य होत होतं.

त्याला म्हणालो, ’ऍग्रीड!! बट युवर कंट्री हॅज बिकम अ ओपन ब्रॉथेल. एव्हरी वुमन किप्स रिलेशन विथ ऍटलिस्ट ११ मेन इन हर लाइफ. ईट्स द स्टॅटास्टिकल डाटा ऑफ यु एस.. बट आय ऍम शुअर इट होल्ड्स गुड फॉर युवर कंट्री रशिया ऍज वेल- यु कॅन इव्हन गेट रशियन फ्रिलान्सर ऍट गोवा इफ यु सो डिझायर.. दे हॅव स्पॉइल्ट गोवा आल्सो…”. आणि मग तो मात्र अगदी गोवा येई पर्यंत डोळे बंद करुन बसुन राहिला, एकही शब्द न बोलता.

आजचं हे पोस्ट अगदी घाई घाईत लिहिलंय. अगदी काहीही विचार न करता जे काही मनात आलं ते टाइप करत सुटलोय.

केजी १ ते १२वी

Written by  on August 28, 2003

आज  १२वी चा निकाल. आता ११ वाजता निकाल लागणार आहे. आज मुद्दाम ऑफिस ला गेलो नाही, म्हंटलं की निकाल लागला की मग निघू या . या १२ वी ने तर गेली तिन वर्षं , म्हणजे १० वी ते १२वी अगदी नाकात दम आणला होता. कुठेही जायचं म्हंटलं की क्लासेस, आणि परीक्षांचा नुसता रतीब लागलेला होता. दर रविवारी क्लासेस मधे परीक्षा घेतल्या जायच्या. आणि क्लासेस पण अगदी शाळसारखे.अभ्यास न करता गेलं तर क्लासच्या बाहेर उभं करायचे एक पिरियड..!

एखाद्या दिवशी म्हंटलं की जाउ दे.. क्लासेस ला बुट्टी मार, चल जरा नाशिकला जाउन येउ.. तर म्हणायची अहो बाबा, तुम्हालाच सिरियसनेस नाही माझ्या १२वी चा. आता काय बोलणार? मी आपलं सहज अगदी थोडा तरी चेंज मिळावा म्हणून म्हणायचो.. आज तिला शाळेत जाउन १४ वर्ष झालीत. अगदी केजी १ चा पहिला दिवस आठवतोय..

खूप खूप वर्षानंतर घरामधे जन्मलेले पहिलं लहान मुलं, म्हणून अगदी झाल्या पासूनच सगळ्यांचीच खुप लाडकी होती. आजी, आजोबांच्या सारखं अंगा खांद्यावरच असायची. खेळणं पण आजोबाच्या सोबत ..

आजोबा, मी डॉक्टर.. हं…. सांगा काय होतंय? डोकं दुखतंय की ओकी होते आहे? असं सारखं दिवसभर चालायचं.आजोबा बिचारे मग कधी डोकं दुखतं हो डॉक्टर असं म्हणत तपासून घ्यायचे. आणि आजी सोबतच आपला पोळपाट घेउन कणकेच्या गोळ्याचा नकाशा बनवायचं महत्कार्य मोठ्या आनंदात आणि हौसेने पार पडायचं. मग त्या कणकेच्या गोळ्याचा रंग अगदी काळाकुट्ट झालेला असायचा आजीच्या/आईच्या पोळ्या होई पर्यंत.शेवटी तिने केलेली ती कळकट पोळी तव्यावर भाजली की मग तिला मात्र अगदी अत्यानंद व्हायचा, आणि मग ती पोळी ताटलीत घेउन घरात सगळ्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न व्हायचा. अर्थात, खाणारे रोजचे दोन नेहेमीची हक्काची माणसं म्हणजे आजोबा, आणि बाबा. 🙂

तसेच दुकान दुकान , भाजीवाली होणं हे पण खेळणं आवडायचं तिला. घरातल्याच दोन चार वांगी बटाटे एका लहान टोपलीत घेउन -आणि ती टॊपली  नसल्यास एखाद्या भांड्यात डोक्यावर घेउन घर भर फिरायची.. आमच्या घरासमोर एक भाजी वाला यायचा, त्याची नक्कल करित .. भाजी घ्या भाजी म्हणंत..! बरं घरामधल्या प्रत्येकाने भाजी घेतलीच पाहिजे असं पण होतं, कोणी भाजी घेतली नाही तर रडू यायचं..

शाळेच्या पहिल्या दिवशी आईच्या बरोबर स्कुटीवर बसून गेली होती.. शाळेत जायचं ते कशाला? हाच एक तिला पडलेला मोठा प्रश्न होता. त्यामुळे अगदी सकाळी ऊठल्या पासूनच रडारड सुरु व्हायची. मोठ्या मुश्किलीने युनिफॉर्म चढवून आई सोबत स्कुटीवर जायची . शाळेजवळ पोहोचली की मोठ्यांदा गळा काढून रडणं सुरु व्हायचं. मग तिला सांभाळत स्कूटी स्टॅंडवर लावणे ही पण एक कसरत होती.

कसं तरी करून शाळेमधे ढकललं (!) की मग रडणं सुरु असायचंच.. पण टीचर म्हणायची, तुम्ही जा आता.. नाही तर ती रडणं थांबवणार नाही. मग सौ. थोड्या अंतरावरून लपून बघायची.. काही वेळाने रडणे थांबले की मग सौ. घरी यायची.

असा हा प्रकार   काही महिने चालला, नंतर मात्र अगदी आनंदाने जायला लागली शाळे मधे. आज हे आठवतंय कारण शाळेचं पर्व संपलं तिच्या आज पासून. उणा पुरा १४ वर्षांचा काळ कसा गेला तेच कळत नाही.

शाळेमधे काही दिवसानंतर रुळल्यावर मात्र मग खेळण्याचे विषय आता थोडे बदलले होते. घरी आली की मग खांद्याला आईची पर्स अडकवून घरभर फिरायचं.. आणि हाय ममता.. किंवा हाय योगीता असं म्हणत फिरायची. ममता आणि योगीता दोघी पण तिच्या टीचर होत्या . आणि या वयात टीचर म्हणजे सर्वस्व झालेलं असतं . प्रत्येक गोष्टीमधे टीचरला फॉलो करणं चालायचं.टोमॅटॊ केचप ओठांना चोपडून मग मी बघा टिचर सारखं लिपस्टिक लावलंय.. अशा अनेक घटना आता केवळ स्मृती मध्येच उरल्या आहेत.

घरचं आजोबांच्या बरोबरचं आणि आजी सोबतच खेळणं सुरु होतंच. फक्त विषय आता डॉक्टर कडून शाळेकडे वळला होता. ही टिचर व्हायची आणि आजोबा स्टुडंट.. मग कुलकर्णी यु स्टॅंड अप.. आय विल मेक यु स्टॅंड ऑन द बेंच इफ यु डोन्ट राईट… असे टीचरचे डायलॉग्ज आणि त्या वेळेचा तिच्या चेहऱ्यावरचा भाव पाहुन मजा वाटायची.सारखी यु स्टॅंड अप, आणि सिट डाउन म्हणून आजोबांना अगदी नकोसं करुन ठेवायची.पण त्यांनी कधिच तक्रार केली नाही. अगदी न कंटाळता दिवसभर खेळायचे तिच्याशी.

शाळे्तून आली, की तुमच्यावर उपकार केले, मी शाळेत जाउन आली.. अशा मुद्रेने दप्तर, बुट आणि अंगातले कपडे काढून फेकले की खेळायला तय्यार.अगं आधी थोडं जेऊन घे.. तर ही बाई आपली अहो आजोबा.. म्हणून त्यांच्या मागे… आजोबांचं पण सोशल वर्क म्हणजे पत्रिका पहाणं आणि लग्न जुळवण  हे आ्वडीचे काम पण त्यांना जरा बाजूलाच ठेवावं लागायचं.(दोन्ही गोष्टी पैसे न घेता करतात ते गेली ६० वर्षं , त्यामुळे खूपच गर्दी असते आमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची)   पहिली दोन वर्ष मजेत गेली. केजी आणि सिनियर केजी म्हणजे नुसती मजा मजा होती. पण कंटाळा होता एकाच गोष्टीचा.. तो म्हणजे होम वर्क!

या विषयावर तर मी कितीही लिहू शकेन.. पण आता थांबवतो.

मच्छरदाणितली कुजबुज…

Written by  on August 17, 2003

अहो.. ऐकलंत कां?? मी काय म्हणते, भाउजींनी बघा कशी वैनिंच्या साठी मोठ्ठी ’३४ फुट लांबीची याट घेतली विकत ४०० कोटी रुपयांना, नाहितर तुम्ही .. तुमचं मेलं माझ्यावर प्रेमच नाही.

अगं.. असं कसं म्हणतेस, आत्ताच एक दिड वर्षांपुर्विच तर तुझ्यासाठी ती एअर बस एक्स्प्रेस घेतली ना विकत.. २५० कोटी रुपयांना..

शीः.. त्याचं काय मेलं एवढं कौतुक, कधी नाही ते एक गिफ्ट दिलंत आणि आता सारखं उठता बसता, त्याचेच गोडवे गात असतात. आणि ते गिफ्ट पण काय तर म्हणे एअर बस.. आणि ती पण भाउजींच्या याट पेक्षा चक्क १५० कोटी रुपयांनी कमी.एअर बस घेउन तर दिली, पण वापरु नको म्हणता नां.. पेट्रोल वर खर्च केलेले  पैसे भाउजींच्या कंपनीला  मिळतात म्हणून.. हुं??

तुमचं मेलं माझ्यावर प्रेमच नाही, नाहीतर तुम्ही  बघा ना, अजुन ही मला विचारलंच नाही की तुला काय हवंय ?तुमचं माझ्यावर प्रेम असतं ना, तर नक्की नक्की विचारलं असतं  मला, की काय झालं राणिला??   पण माझं मेलं नशिबच फुटकं.. कशी तुमच्यावर भाळली आणि लग्नाला होकार दिला तेच कळत नाही मला आता. कित्ती तरी हिरो  माझ्या मागे होते, पण माझा मेलीचा जीव तुमच्यावर जडला होता नां…. तरी आई म्हणाली होतीच… …………..ह्याच्या पेक्षा दुसरा कोणीतरी बघ जरा व्यवस्थित पैसे वाला.. पण नाही.. माझं मन जडलं होतं ना तुमच्यावर….!!!मीच मेली मुर्ख…..

अहो मी जर सिनेमात राहिले असते नां, तर नक्कीच करोडॊ रुपये कमावले असते आणि आपलं स्वतःचं घेतलं असतं काहीतरी. भाउजी बघा, इतका मोठा पॅलेस बांधताहेत , आणि त्या पॅलेसमधे म्हणे हेलिपॅड पण आहे सगळ्यात वरच्या मजल्यावर…

काय शिंची कट कट आहे तुझी.. काय हवंय तुला सांग, आत्ता आणून देतो.

माहितीये.. मोठ्ठे आले आणून देणारे, तुमच्या कंपनीच्या शेअर्सची तर वाट लागलेली आहे, आणणार कुठुन तुम्ही पैसे ते सांगा आधी -तुमचं बजेट तर कळु दे, की लाडक्या बायको साठी तुम्ही किती खर्च करायला तयार आहे ते..  ..मग तुम्हाला सांगते मला काय हवंय ते….

अगं खर्चाचं काय.. पूर्वीचे दिवस असते तर एखादी नवीन कंपनी लॉंच करुन शेअर्स काढले असते मार्केटला, पण सध्या रेसिशन आहे नां  ..

म्हणजे काय आता पैसे नाहीत ना?? मला वाटलंच होतं…पैसे असले की तुम्ही नेहेमीच उडवून टाकता. थोडे पैसे ठेवायला काय होतं हो तुम्हाला बाजुला? अडी अडचणीला उपयोगी पडतात.. पण नाही…. !!!!!!कधीही काहिही मागा, तुमचं आपलं तेच.. असले पैसे की घाला ‘त्या ‘पोलीटीकल नेत्याच्या   युपी मधे नाहितर त्या कंपनीच्या बोडख्यावर… कधी मेलं थोडे पैसे घरी ठेवत नाहीत.

पैसे पैसे….   जळ्ळी मेली ‘युपी ‘  आणि कंपनी ती….  गुलाबी गाल फुरंगटून ती म्हणाली.. डोळ्याच्या पापण्या उघडझाप करित त्याच्या कडे पहात… 🙂

अगं असं काय करतेस..पुर्ण ऐकुन तर घे.. फारच सोपंय , इलेक्ट्रिसिटीचे भाव वाढवून टाकतो ना २ रु. ५० पैसे युनिटमागे, म्हणजे काय होईल , सगळे मराठीचे तारणहार थोडं तोडफोड वगैरे करतिल, आपल्याला धमक्या देतील, मग आपण घाबरल्या सारखं दाखवायचं आणि २रु.५० पै. ची वाढ १रु.५० पैशांवर उतरवायची. अगं.. प्रत्येक युनिटमागे दिड रुपया म्हणजे महिन्याला ४०० कोटी सहज येतिल..

आता ’ती’चा चेहेरा उजळला होता.. माझा गुणाचा गं तो नवरा.. आणि ती एकदेम गळ्यातच  पडली. कानाच्या पाळीला हलकेच चावत ,डोळ्याच्या पापण्यांनी त्याच्या गालाला गुदगुल्या करित म्हणाली, अहो.. आम्हाला किनई…… आम्हाला किनई………….

अगं बोल ना लवकर… किती वेळ तेच ते .. काय हवंय तुम्हाला??

हॅट मेलं.. आम्ही आपलं इत्तक प्रेमाने जवळ यावं, आणि तुम्ही…. जाउ दे.. काही नको मला…..तुमचं मेलं आमच्यावर प्रेमंच नाही….

अगं सांग नां राणी, काय हवंय तुला? मी कधी तुला नाही म्हटलंय का कधी कुठल्याही गोष्टीला?

बरं ऐका तर…. तुम्ही ती बातमी वाचली आहे का??

कुठ्ली गं??

moonअहो तिच, चंद्रावर म्हणे पाणी सापडलंय.. आणि ओबामाने पण म्हणे तिथे बॉम्ब ब्लास्ट केलाय चंद्रावर.. मस्त पैकी एक खोल खड्डा तयार झालाय म्हणे.. आपण किनई, त्या खड्ड्यामधे पाणी जमा करु, आणि त्या खड्ड्या शेजारीच एक मोठासा प्लॉट घेउन मस्तपैकी पॅलेस बांधु या कां??त्या खड्यातल्या पाण्यामधे मस्तपैकी बदकं सोडू आपण.. 😀 कित्ती छान वाटेल नं संध्याकाळच्या वेळी मस्तपैकी गरम गरम मसाला चहाचे घोट घेत समोर बसायला??

त्या पॅलेस मधे किनई, आपण, स्पेश शिप लॅंडिग पॅड पण बनवु या.. तुम्ही आपलं ओबामाला सांगून एक प्लॉट बुक करुनच टाका, किमती वाढायच्या आत. नाहितर भाउजी आहेतच, ते कदाचित सगळा चंद्रच घेउन टाकतील विकत वैनींसाठी , मग आपल्याला जावं लागेल शनीच्या चंद्रावर. खूप दुर आहे म्हणतात तो चंद्र….. आपला हा पृथ्वी जवळचा चंद्रच बरा…

कौतुकाने बायको कडे पहात.. कित्ती हूशार आहेस गं तु.. पण मला असं वाटतंय की आपणच पुर्ण चंद्र विकत घेउन टाकला तर?? म्हणजे काय आपण आपली चोरवडची वडिलोपार्जित जमीन विकून टाकु आणि चंद्रावर इन्व्हेस्टमेंट करु ..तिथे आपण मस्त पैकी एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडू या. सेव्हन स्टार हॉटेल पण उघडू , तिथे आपण खास हनी मुन सुट बनवू आणि भाड्याने देऊन खूप पैसे कमाऊ.. कशी वाटते आयडीया??

खरंच  हो, खूपच मस्त आहे आयडिया,  लहानपणापासुन आईला बघायची ना चंद्राला ओवाळतांना, तेंव्हा पासुनच मला हवा होता तो चंद्र.. आईला पण बरं होईल जेंव्हा हवं तेंव्हा ओवाळायला, नाहितर काय हो.. अमावस्येला खूप प्रॉब्लेमच यायचा नां…..बिच्चारी ची मान लागून यायची चंद्र शोधुन.. पण आता बरं होईल , चंद्रावरंच रहायला गेलो, की सरळ खाली बघुन तिला ओवाळता येइल चंद्राला..

मस्तंच हो.. आणि तिने त्याच्या गळ्यात हात घातला, त्याचा सेल फोन बंद केला, लॅंडलाइनचा रिसिव्हर उचलुन ठेवला, रिमोट कंट्रोलने एसी चा थंडावा कमी करुन , त्याच रिमोटने दार बंद केलं…… ..अंगावरची सोलापुरी चादर दुर फेकली पंखा फुल स्पिडवर करुन -मच्छरदाणी चारही बाजूंनी नीट खोचली……………अरे बस की आता किती लिहायचं.. …  🙂

हो.. त्यांच्याही घरच्या मच्छरदाणीत अशीच कुजबुज होत असते बरं का.. फारसं काही वेगळं नसतं…….त्यांचं पण आयुष्य….. :

मित्रांनॊ, हा विषय अनुजाने दिला, आणि मला पण ्खूप आवडला, म्हणून हा लेख लिहलाय.. खरं तर विनोदी लिहिण्याचा मला काही फारसा सराव नाही, तरी पण एक   नवीन प्रयत्न  .. .. वरच्या लेखामधले ’ती’ आणि ’तो’ कोण आहे हे वेगळं सांगायची गरजच नसावी… 🙂

अ(न)र्थसंकल्प

Written by  on August 15, 2003

नेमेची येतो पावसाळा प्रमाणे , साला बादा प्रमाणे यंदाही अर्थमंत्र्यांनी नववर्षासाठी  अर्थसंकल्प  संसदे मधे मांडला . या  अर्थसंकल्पाला   अर्थसंकल्पा ऐवजी अनर्थसंकल्पच म्हणायला हवे.  या संकल्पामधे कुठलाही अर्थ नसतो.सगळे भाव वर्षभर वेळोवेळी वाढवलेले असतात, पुन्हा एकदा वर्षातून एकदा सगळे भाव सरसकट वाढवण्याचा कार्यक्रम म्हणजे अर्थसंकल्प!

या अर्थ संकल्पावर वर उद्या सगळ्याच वृत्तपत्रांमधे प्रतिक्रियांचा पाऊस पडणार आहे.  अर्थ संकल्पाची पन्नास हजाराच्या वर असलेली पानं  वाचायची म्हंटलं तरीही कमीतकमी एक महिना तरी लागेल. पण इकडे मंत्र्यानी आपली ब्रिफकेस उघडून वाचणे सुरु केले, की लगेच लोकांच्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुरु होतात.  रात्री घरी गेल्यावर टिव्हीचे  बातमीदार  हातात माईक धरून लोकांच्या मागे धावतांना दिसणार आहेत. एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने बऱ्याच मान्यवरांचे  इंटरव्ह्यु घेतले आणि त्यांची या अर्थसंकल्पा बद्दलची मतं विचारली, त्यातले काही इंटरव्ह्यु     उद्या कुठल्याही वृत्तपत्रांमधे प्रसिद्ध होण्यापूर्वी इथे काय वाटेल ते वर प्रसिद्ध करीत आहोत. साधारण याच टाइपच्या  प्रतिक्रिया उद्याच्या पेपर मधे  वाचायला मिळतील.

बहुतेक सगळे वृत्तपत्र  संपादक या पन्नास हजार पानांना न वाचता त्यावर एक्स्पर्ट टिप्पणी अग्रलेख लिहितील.

मनमोहन:- अतिशय क्रांतिकारी विचारसरणीचा , पुरोगामी , देशाला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प  आहे हा.

विरोधी  नेते   :-  ” गोरगरीबांना अधिक गरीब करणारा, आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारा हा अर्थसंकल्प आहे.

दिदी:- श्रीमंत उद्योगपतींना डोक्यावर घेऊन नाचणारा   व सामान्य माणसाला वेठीला धरणारा तसेच जगणे कठीण करून सोडणारा हा अर्थ संकल्प आहे. सगळं काही महाग केले आहे. हा असा अर्थसंकल्प सादर केला म्हणून अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे.मी सांगते सोनियाला.

लोकल पार्ट्या  :- महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा हा संकल्प आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या गरजांकडे अजिबात लक्ष दिल्या गेलेले नाही या अर्थसंकल्पात.  देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई पार दुर्लक्षित केल्या गेली आहे. पुढच्यावेळी नक्की मराठी अर्थमंत्री हवा अशी आम्ही हायकमांडला मागणी करणार आहोत.

कम्युनिस्ट :- श्रीमंतांचे लाड करणारा हा अर्थसंकल्प आहे -त्यांच्या गरजेच्या सगळ्या वस्तूंवर   कर कमी केल्या गेले आहेत आणि गरीबांच्या वस्तू महाग केल्या आहेत. सगळ्या कॉम्रेडस ना एकत्र करून आता देशातल्या सगळ्या उद्योग धंद्याचे राष्ट्रीयीकरण करणे आवश्यक आहे .

समाजवादी :-  अल्पसंख्यांकांच्या, मागासवर्गीयांच्या  गरजांकडे दुर्लक्ष करणारा हा अर्थसंकल्प आहे.  अतिशय अन्यायकारक असा हा अर्थसंकल्प  मागासवर्गीयांचे कंबरडे मोडणारा ठरणार आहे.  ….!

कॉलेज विद्यार्थी :- अजिबात काही धड नाही हा अर्थसंकल्प, मुलांना दिलेल्या ’पॉकेटमनी ” वर  इनकम टॅक्स मधे सुट द्यायला हवी होती-म्हणजे बाबा लोकांनी मुलांचे पॉकेटमनी वाढवले असते .तरूणांच्या विरोधात असलेला हा अर्थसंकल्प आहे.

नोकरी करणाऱ्या स्त्रिया :- चिडलेल्या चेहेऱ्याने, केस विस्कटलेले, ( लोकलचा प्रवास करून जस्ट गाडीतून उतरलेली )अहो, आता कसं जगायचं हेच समजत नाही आम्हाला. इतकी महागाई वाढली आहे, आणि हा असा जेंडरबायस्ड अर्थसंकल्प. सगळी प्रसाधनं – लिप्स्टिक्स, कम्पॅक्ट्स वगैरे महागली आहेत.. स्त्रियांच्या विरोधात असलेला अर्थसंकल्प आहे हा.

मध्यमवर्गीय :- इनकम टॅक्सची लिमिट वाढली नाही. सामान्य नोकरदार वर्गासाठी एक वाईट अर्थसंकल्प. पेट्रोलचे भाव दुप्पट वाढले, मग इनकमटॅक्स रिबेट दुप्पट का नाही वाढवला? सगळा मूर्खांचा बाजार आहे झालं ( शेवटलं वाक्य सेन्सॉर )

सामान्य स्त्री  :-  सामान्य माणसाचे कम्बरडे मोडणारा अर्थसंकल्प आहे हा. सगळ्या महागाच्या वस्तूंवर कर सवलती दिल्या आहेत , पण सामान्य गरजेच्या वस्तू महाग केल्या आहेत.  या कर वाढीच्या ओझ्याखाली गरिबांचे कंबरडे मोडणार हे नक्की. अहो मी सांगते, सगळे कर खप वाढवले आहेत- आता हे उद्या परवा सगळीकडे बोंबाबोंब झाली, की हे सगळे वाढ्वलेले कर अर्धे करतील. हे नेहेमीचेच आहे, आधी दहा टक्के वाढवायचे, आणि नंतर लोकांनी ओरडा केला त्यात तिन चार टक्के सुट द्यायची.

विरोधी नेते (लोकल ) :- हा असा अर्थसंकल्प सादर करायला तुम्हाला अर्थमंत्री कशाला हवा? त्या साठी एखादा मंत्रालयातला क्लर्क पण चालला असता.

सोनिया:-(स्वगत:- ) चला सचिनची सेंच्युरी झाली शंभरावी, आता कोण लक्ष देतं या अर्थसंकल्पाकडे??  उद्या पहिल्या पानावर सचीन असेल.. धन्यवाद रे सचीन.. वाचवलंस देवा तू या संकटातून………

हरभजन,धोनी आणि पद्मश्री

Written by  on August 11, 2003

पद्मश्री कुणाला द्यावे ? लायक माणसाला असेच नां? देशातील सर्वात मोठे अवॉर्ड, ह्या धोनी आणि हरभजन सिंग दोघांनाही काही लाख ( जे त्यांना त्या ऍडव्हर्टाइझ करुन मिळणार होते) रुपयांपेक्षा  कमी महत्त्वाचे वाटलं. धोनी पण तसाच.. त्या  **वाला पण पद्मश्री च महत्व कळलेलं दिसत नाही.बरोबर आहे ,क्रिकेट खेळून फक्त “पैसाच” मिळू शकतो   सामान्य ज्ञान नाही, कारण जर ते असतं तर त्यांनी त्या जाहिराती पेक्षा जास्त महत्त्व दिलं असतं..

माकडाच्या हातात माणिक दिलं तर ते काय करेल?? दाताने चावेल , अन फेकून देईल बरोबर नां? अगदी सेम टू सेम प्रकार इथे आहे. फक्त माकडाच्या जागी धोनी आणि भज्जी..आणि माणकाच्या जागी पद्मश्री…!

लायकी पेक्षा जास्त मान मिळाला की त्याची किंमत रहात नाही. ह्या दोघांची लायकीच नाही हा बहुमान स्वीकारण्याची, आणि ते त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले.एखाद्या वेश्ये प्रमाणे जिथे जास्त पैसा मिळेल तिकडे हे गेले दोघंही. एखादी घरंदाज स्त्री आणि वेश्ये मधे जो फरक आहे तसाच इथे पण मला दिसतो. पद्मश्री मधे पैसा नव्हता, तिथे फक्त मान आहे. कपाळी कुंकाचा टिळा, आणि  आणि मंगळसुत्राची किंमत वेश्येला काय कळणार?

ह्यांना फक्त पैशाचीच भाषा कळते.. पैशासाठीच हे लोकं क्रिकेट खेळतात, बि सी सी आय हा एक क्लब आहे आणि त्यांचा संघ म्हणजे भारताचा संघ नाही.मला असं वाटतं की ह्या क्रिकेटर्सचे जरा जास्तच लाड होताहेत. ते जरा कमी केले पाहिजे, म्हणजे ह्यांचे फिरलेले डोके ठिकाणावर येइल. हरभजन म्हणतो, की मी त्या दिवशी दिल्लीला नव्हतो. अरे तर मग कुठे उलथला होतास रे बाबा? अशी कुठली गोष्ट आहे की तुला ती पद्म अवॉर्ड पेक्षा पण जास्त महत्त्वाची वाटली??

आणि हा पुन्हा वर तोंड करुन सांगतोय, की मी तेंव्हा दिल्ली मधे होतो, हे प्रुव्ह करा, मग मी क्रिकेट खेळणं सोडून देइन. वाह!! फार उपकार करतोस काय रे  ?? सोडून देशील म्हणजे म्हणायचं तरी काय त्या भज्जी ला?

त्याच्यावर आरोप आहे की त्याने ऍडव्हर्टाइझ ला जास्त महत्त्व दिलंय, कारण दुसऱ्या दिवशी  धोनी आफ्रिकेला जाणार होता, आणि त्या ऍड मधे धोनी + भज्जी होते, म्हणून त्या दोघांनीही ऍड चं शूटींग करण्याला जास्त महत्वाचे  वाटले, म्हणून त्यांनी ads ला जास्त महत्त्व दिले.  पद्म अवॉर्ड  सिरोमनी पण त्यांनी   टाळला.

हा भज्जी म्हणतो, की लोकांनी समजलं पाहिजे की आम्ही किती सॅक्रिफाइस करतो फॅमिली साठी ते…. मला वाटतं त्याला म्हणावं.. अरे बाबा, कशाला करतो उगाच त्याग, अन उपकार आमच्यावर क्रिकेट खेळून.. सोडून दे .. नकॊ उगाच इतका त्याग करु रे बाबा आमच्या साठी, मला फार वाईट वाटतं तुझा त्याग बघून.कोण रे तुला कम्पेल करतंय क्रिकेट खेळायला? एक गोष्ट आहे, सोडून दे रे बाबा, खूप उपकार होतील आमच्यावर…! हे खेळतात ते पण पैशा करता. देशा करता नाही..

४० वर्ष हे लोकं जिंकू शकत नाहीत न्युझिलंड मधे आणि मग एकदा जिंकले इथे मोठ्या अभिमानाने पेपर मधे हेड लाइन असते.. इंडीया विन्स आफ्टर ४० इयर्स.. अरे लाजा वाटल्या पाहिजेत, ४० वर्षात तुम्ही जिंकू शकत नाही? मग खेळता कशाला ? हरायला?

बरं इतकी मुजोरी कशाबद्दल?? नेहेमी हरण्याबद्दल?? ते   सारखे हरतात,२० -२० वर्ष एकही मॅच जिंकत नाहीत.. नंतर चुकून कधी  एखादीच मॅच जिंकली तर मग  टीव्ही वर बोलतांना यांचा उद्धटपणा पहा…. की आम्ही काय दिवे लावले म्हणून.. त्या वेळी हे विसरतात की आजपर्यंत सारखे  हारतच आहेत मॅचेस म्हणून..

भारतामधे क्रिकेटचं खुपचं फॅड वाढलं आहे. आता हे कमी झालंच पाहिजे. अर्थात पाकिस्तानातील अटॅक प्रमाणे भारतामधे पण जर काही झाला,तरच इथल्या मॅचेस बंद होतील. आणि इंटेलिजन्स च्या रिपोर्ट प्रमाणे भारतामधे पण हल्ला करण्याचा डाव होताच त्यांचा..

अगदी एक दिवस आधी पद्म अवॉर्डच्या अनाउन्समेंटच्या आदल्याच रात्री, अक्षय कुमारने आपल्या पॅंटचे बटन्स  भर पब्लिक प्लेस मधे बायकोच्या हातुन काढुन घेतले.इथे पण मला तर वाटतं की सिलेक्शन चुकलंच. ह्या व्यतिरिक्त , हेलन मॅडम ला कास दिलंय पद्मश्री?? निकष काय आहे ह्याचा?

असो..उ्गाच डोकं खराब होतं जास्त विचार केला की.. जाउ दे.. असेल पोलिटीकल पुल… असंच म्हणायचं आणि सामान्य  माणसाप्रमाणे अगदी गप्प बसायचं.. ह्या  अतिशहाण्यांची ’थेरं’ पहात!

कार्पोरेट वर्ल्ड..

Written by  on August 5, 2003

corporateहल्ली बरेचदा कार्पोरेट ट्रेनिंग अटेंड करावे लागते, आणि मग त्या ट्रेनिंगच्या दरम्यान   ऐकलेल्या काही   गोष्टी अगदी मनात घर करून बसतात, तर काही अगदी त्याच दिवशी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात.

तर अशीच ही एक गोष्ट, मला आवडलेली आणि लक्षात राहिलेली , तशी ही गोष्ट सांगितल्या गेली होती वेगळ्याच संदर्भात, पण मला मात्र लक्षात राहिली ती वेगळ्याच संदर्भात .जपान मधे सुशी नावाचा एक पदार्थ खूप प्रसिद्ध आहे असे.  हा पदार्थ बनवण्यासाठी एकदम ताजे फडफडीत मासे वापरले जातात.  कच्चे  मासे  असल्याने, ते अगदी ताजे असणे महत्त्वाचे असते. प्रत्येक बोटीवर पकडलेले मासे ठेवण्यासाठी एक जागा असते. मासेमारी साठी जातांना त्या रिकाम्या जागेत बर्फ भरून नेला  जातो आणि त्या बर्फात ठेऊन मासे आणले तर तर मासे डिकंपोझ होत नाहीत, म्हणून बर्फात ठेऊन आणण्याची  पद्धत आहे.

तर एका जपानी कोळ्य़ाने आपला सेल वाढवण्यासाठी एक युक्ती केली. समुद्रावर जातांना इतर कोळी बर्फाच्या लाद्या  भरून न्यायचे  त्याने तीच जागा मॉडीफाय करून त्या जागी  पाणी भरून त्या पाण्यामध्ये पकडलेले मासे ठेऊन आणणे सुरु केले. माशांना पुरेशी हवा मिळावी म्हणून  ती पण सोय केली.  समुद्र किनाऱ्यावर पोहोचे पर्यंत ते सगळे मासे अगदी संथ पणे पडून रहायचे पाण्यात पण  जिवंत रहायचे. जिवंत माशांना नक्कीच जास्त पैसे मिळायचे .

पण….. एका पंचतारांकित हॉटेल मधल्या  शेफ ने कम्प्लेंट केली या माशांची चव काही फार चांगली लागत नाही. मासे जरी जिवंत असले तरीही ते मेल्यातच जमा आहेत. अजिबात काही अ‍ॅक्टिव्हिटी नाही , काही नाही त्या मुळे त्यांच्या जिवंत पणाला पण काही अर्थ नाही. सुशी मधे काही खास चांगली चव लागत नाही या माशांची! त्या कोळ्य़ाच्या मनात विचार आला की  आता काय करावं?

त्याने एक नवीन युक्ती शोधून काढली, मासे पकडल्यावर त्याने त्या माशांच्या टाकी मधे एक  बेबी शार्क पण टाकला.   त्या शार्क ने आपल्या सवयी प्रमाणे त्या टाकी मधे पण  इकडून तिकडे पोहोणे आणि  मासे खाणे सुरु केले, आणि त्या बरोबर टाकी मधल्या माशां मधे हालचाल सुरु झाली, ते इकडून तिकडे पोहायला लागले, आणि खूप अ‍ॅक्टिव्ह झाले. बेबी शार्क ने काही मासे जरी खाल्ले तरी पण   समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर जे मासे होते बोटी मधे शिल्लक होते ते एकदम अ‍ॅक्टीव्ह , अगदी ’फुल ऑफ लाइफ” होते, आणि ते अगदी त्या पंचतारांकित हॉटेल ला  हव्या असलेल्या क्वॉलिटी चे होते. कोळ्याला पण खूप चांगला भाव मिळाल्या त्याच्या माशांना.

झालं संपली गोष्ट!

मॉरल ऑफ द स्टॊरी :- एक शार्क  त्या पाण्याच्या टाकीत सोडल्याबरोबर  सगळे मासे अ‍ॅक्टिव्ह झाले 🙂

आजकालच्या कार्पोरेट लाइफ मधे पण असंच सुरु असतं नाही का? . कुठलीही कंपनी घ्या, शार्क च्या जागी “एच आर”, आणि माशांच्या जागी इतर एम्प्लॉइ कन्सिडर करा- आणि हो, तो शेफ  म्हणजे मॅनेजमेंट बरं का.  आणि पुन्हा एकदा वर लिहिलेली कथा  वाचून काढा