द्वारका – ओखा पोर्ट

Written by  on May 10, 2003

12आता मी द्वारकेहुन निघालो आहे . टॅक्सी मधे बसून हे पोस्ट लिहितोय. ओख्याचं काम संपवून आता जामनगर ला निघालॊ आहे. ओखा म्हणजे एक दोन ते अडीच किलोमिटरचा अरबी समुद्रात घुसलेला एक पट्टा. तिन्ही  बाजूनी समुद्र .हवा पाणी एकदम मस्त!

ह्याचं महत्त्व  केवळ हा भाग  गुजरातच्या एक्स्ट्रिम साईडला  पाकिस्तान जवळ आहे म्हणून! म्हणतात इथून पाकिस्तानला जायला३-४ तास खूप झालेत. खरं तर या ट्रिप मधे ओखा आणी वाडीनार ला जायचा प्लॅन नव्हता. पण रिलायन्सचे काम लवकर आटोपलं, आणि वाडिनारला कर्टसी आणि ओखाला काम सुरु आहे ,  म्हणून म्हंटलं की ओख्याला आणि वाडिनारला पण व्हिजिट देऊन येऊ.

सकाळीच  निघालो आणि आधी वाडिनारला पोहोचलो.हार्डली ६० किमी आहे जामनगर पासून. वाडिनारला पूर्वी काहीच नव्हतं पण इथे  आय ओ सी एल चा एक मोठा डेपो आणि जेटी आली आणि जेटीला संरक्षण हवं म्हणून आय ओ सी एल ने कोस्ट गार्डची  सर्व्हीस घेतली आहे. गुजरातचा हा भाग खरं म्हणजे खूपच व्होलाटाइल असतो. कुठेही खुट्ट झालं की त्याचे पडसाद म्हणजे इथली सिक्युरिटी एकदम कडक होते.

आधी वाडिनारला जाउन काही महत्वाच्या लोकांची भेट घेतली . समजलं की जहाज दुसऱ्या पोर्टला गेलेलं आहे . हा भाग अगदी जंगलात, त्या मुळे को्णी बाहेरचा सुसंस्कृत जगातला प्राणी आला की इथल्या लोकांना बरं वाटतं. त्यामुळे कमांडंट शी जनरल गप्पा मारण्यातच ११ वाजुन गेले. शेवटी बाय बाय करुन उठलो आणि ओख्याला निघालो.

ओखा म्हणजे द्वारके पासुन पुढे  ३० किमी. जातांना डायव्हरला म्हंटलं की दर्शन  घेउन मग जाऊ. मंदिरात पोहोचलो तर कळलं की मंदिर १२.३० ते ५ बंद असतं. म्हणून सरळ ओखा पोर्टला निघालॊ. आज पर्यंत इतके समुद्र पाहिले पण ओख्या सारखा सुंदर समुद्र आजपर्यंत कुठेच पाहिलेला नाही. आधी डेप्यु. कमांडंट च्या ऑफिस मधे जाउन त्याची भेट घेतली , आणि सरळ जहाजावर निघालो. सोबत आमचा सर्विस इंजिनिअर पण होताच.

floatfloat-1सध्या ओख्याला खूप हवा सुरु असते आणि नेमकी सकाळची वेळ भरतीची होती. कन्सिस्टंटली रोइंग पिचिंग सुरु होतं. त्यामुळे सारखी हालत असल्यामुळे जहाजावर शिडी लावता येत नव्हती. त्या ऐवजी मधे एक फ्लोट ठेवलेला होता.त्या फ्लोट चा डायमिटर १० फुट असेल .म्हणजेच डेक वर जायला १५ फुट अंतर कापावे लागणार.. आता फ्लोटवरुन जायचं माझं वय राहिलेलं नाही.फ्लोट सिलेंड्रिकल असतो, त्यामुळे त्यावर बॅलन्स करुन उभं रहातांना थोडी ्भीतीच वाटत होती.( खरं बोलतोय) लॅपटॉप ची बॅग सर्व्हीस इंजिनिअरच्या हातात देऊन फ्लोटवर स्वतःला बॅलन्स करित कसा तरी जहाजावर पोहोचलो.१००० हॉर्स पॉवरची तिन जेट्स आहेत ह्या जहाजावर. मस्त स्पिड घेतं. अर्थात कोस्ट गार्डला जास्त स्पिड ही हवीच म्हणजेच तर घुसखोरांना पकडता येइल नां…??

खाली इंजिन रुम मधे गेलो तेंव्हा पिचिंग इतकं वाढलं होतं की मला काहिच सुचेनासं झालं.. तो सर्व्हिस इंजिनिअर सांगत होता, कि सर , हे स्टारबोर्ड साइडचं इंजिन हंटींग करतंय, आणि पोर्ट साइडच्या इंजिनाचा रुटीन करायचंय.. म्हंटलं… ठिक आहे कर तुला काय हवं ते.. आणि सरळ वर डेक वर गेलो. थंड हवा लागली तेंव्हा जरा बरं वाटलं.

वरंच बसुन रहिलो, आणि व्हिल रुम मधे बसुन कोल्डड्रिंक चा कॅन ओपन केला. फेल्ड पार्टस वर व्हिल रुम मधे आण म्हंटलं आणि तिथेच मग चेक केले. खरं तर हल्ली स्वतः काम करणं बंदच झालंय. पण पिआरओ चं काम करता करताच थकून जातो.  जहाजावरचं काम आवरुन बाहेर जेटिवर उभा राहिलो.

सहज गप्पा मारत होतो कॅप्टनशी. तर कॅप्टनने समोर हात दाखवला.. म्हणे ती मिरा बघितली कां? म्हंटलं .. काय़ विशेष? तर म्हणे ६० नॉटच्या स्पिडनी पळते. आयला.. मी तर तोंडात बोटं घालायचीच बाकी ठेवली होती.. २५० ऒबिएम.. मग माझ्यातला इंजिनिअर जागा झाला , लगेच उडी मारुन खाली उतरलो अन सरळ बोटीजवळ गेलो.. miraमोस्ट सेक्सी स्टफ आय हॅव एव्हर सिन.. 2कसली सुंदर होती ती.. एका साइडला तटरक्षक लिहिलेलं.. मागे दोन २५०ची दोन व्हिसिक्स .. वाह!! मस्त वाटलं एकदम. म्हंटलं , कॅप्टन शुड वी गो फॉर अ स्पिन?? तर म्हणे नॉट टुडे.. शी इज अंडर मेंटेनन्स.. इफ़ यु स्टे टुडे वि मे गो टुमारो इव्हिनिंग… म्हंटलंं , नो वे कॅप्टन, गॉट टू गो टु जामनगर , सिन्स माय फ्लाइट रिपोर्टींग टाइम इज ११ ए एम.. मे बी नेक्स्ट टाइम..

कॅप्टनला पण तसं काहीच काम नव्हतं.. शिप अंडर मेंटेनन्स असली की कॅप्टन तसा रिकामटेकडाच असतो. सहज त्याला म्हंटलं, की त्या फिशिंग ट्रॉलर्स अशा का पडल्या आहेत? तर म्हणे इथून पाकिस्तान बॉर्डर फक्त ६० नॉट्स वर आहे ३० कीमी पर्यंत आपली म्हणजे भारताची हद्द आहे. पाकिस्तानी बोटी आपल्या हद्दीत आल्या तर त्यांना पकडून इकडे आणले जाते. पाण्यामधे आपली हद्द कुठपर्यंत आहे हे त्या लोकांनाही ओळखणं कठिण होते. अगदी हाच प्रॉब्लेम आपल्या बाबतीतही होतो. आपले कोळी पण त्यांच्या हद्दी मधे गेले की पकडल्या जातात.  पाकिस्तानी मच्छीमार भारताच्या हद्दी मधे आले की मग त्यांना अटक करुन इथे आणले जाते. २६/११ नंतर जरा जास्तच  कडक झालंय .बऱ्याच बोटी सडल्या होत्या. काही फायबरच्या बोटी पण इथे पडल्या होत्या. त्यांची अवस्था पाहून वाईट वाटलं. सहज एका बोटीवर चढलॊ आणि  माझा इंटरेस्ट म्हणजे कुठलं इंजिन आहे ते बघायला इंजिनरुमकडे वळलो. सगळ्या बोटींची जॅपनिज इंजिन्स होती. जाउ दे तुम्हाला उगाचच बोअर करित नाही.खाली कांही पाकिस्तानी बोटींचे फोटो दिलेले आहेत ..

pakistani-fishing-boats

तस सगळं झाल्यावर म्हणालॊ, कॅप्टन निघतो मी आणि सरळ टॅक्सिमधे बसलो . सध्या इथे हवा मोठी मस्त आहे,. उन्हं अजिबात नाही, छान वारं सुटलेलं असतं. ड्रायव्हरला म्हंटलं की एसी बंद करो आणि खिडकी उघडून मस्त वारं खात प्रवास सुरु केला. डोक्यावर शिल्लक असलेले केस मस्त भुरु भुरु ऊडत होते. वाटलं.. आराधनामधल्या राजेशखन्ना सारखे केस असते तर  मस्त मजा आली असती ! 🙂

आता ५ वाजून गेले होते. म्हणून द्वारकेच्या मंदिरात गेलो. दर्शन घेतलं .. ती सुंदर काळी मुर्ती खूपच मनमोहक दिसत होती. शेजारिच शंकराचार्यांचं पण मंदिर आहे तिथे पण जाउन दर्शन घेतलं आणि थेट…. जामनगरला पोहोचलो. बेट द्वारका आणि नागनाथाचं मंदिर राहिलं, वेळेअभावी. असो, पुढल्या वेळेस बघू या..तेवढ्यात सौ. चा फोन आला.. म्हणे जेवण झालं ? म्हंटलं नाही… पण बरं वाटलं.. चला कोणी तरी तर आहे विचारणार…….! 🙂

इराणी

Written by  on May 1, 2003

इराणी म्हणजे चहा आणि ब्रून मस्का खाण्याचे ठिकाण असे समजणारे बरेच आहेत. तर काही लोकांना  इराणी हॉटेल= ऑम्लेट पाव खाण्याचे ठिकाण असे समिकरण वाटते. पण खरंच तसं आहे का? मला वाटतं नाही , अजूनही बरेच चांगले इराणी हॉटेल्स आहेत मुंबईला- अगदी खास इराणी पद्धतीचे खाद्य पदार्थ असलेले.

पुण्याला असतांना नाझ चा मटन समोसा खाण्यासाठी आवर्जून कॅम्पात जायचो.तिथे गेल्यावर मटन समोसा खाऊन नंतर पेस्ट्री आणि खारी चहा सोबत रिचवणं झालं की मग   वेस्टएंड मधे सिनेमा पहायचा- असा कार्यक्रम असायचा.

नाझ मधे गेल्यावर खारी  ऑर्डर केली की तो खारीची मोठी प्लेट आणि पेस्ट्री  ऑर्डर केली की  असॉर्टेड पेस्ट्री आणून ठेवायचा समोर  . त्यातली हवी तेवढी घ्या, उरलेली तो परत घेऊन जायचा आणि नेमकं तुम्ही घ्याल   तेवढंच बिल लावलं जायचं. तिथलं सॅंडविच पण छान असायचं बरं ..

खादाडी आणि सिनेमा झाली की    परत येतांना श्रुस्बेरी ( हे काय असतं हो?) बिस्किटं घेउन  ( कयानी बेकरी) परत यायचो. तिथली ही बिस्किटे अजूनही आपली स्पेशालिटी टिकवून आहेत.कधी कॅंपात गेलो तर ही बिस्किटे अजूनही मी आणतो.

मुंबईचे इराणी  हॉटेल  कल्चर हल्ली बरंच कमी झालेलं आहे. एक तर नवीन पिढीतल्या इराणी मुलांना यात काही इंटरेस्ट नाही, त्यामुळे बरीच नवीन पिढी ही हॉटेल धंद्यांतून बाहेर पडलेली  आहे . पण काही इराणी मात्र अजूनही  आपली जुनी परंपरा आणि सांभाळत तुमच्या टेस्ट बडस ला तृप्त करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यातलं आवर्जून नांव घेण्यासारखं माझं आवडीचं हॉटॆल म्हणजे ’मिल्ट्री कॅफे’-पण मला मात्र त्याला मिल्ट्री  काफे म्हणायला आवडतं

इराणी हॉटेल मधे जाऊन ब्रुन मस्का आणि चहा ( जर व्हेजेटीरियन असाल तर) किंवा आम्लेट पाव खाल्या शिवाय बाहेर येणं म्हणजे इराण्याचा अपमान करणे आहे असं समजणारा पण एक वर्ग आहे माझ्या सारखा. काही फारशी भुक नसेल तर मस्का पाव आणि चहा, किंवा आम्लेट पाव खाल्ल्याशिवाय इथून पाय बाहेर निघत नाही.

इराण्याकडलं आम्लेट हे एकदम वेगळंच असतं, तसं काही घरी जमत नाही कधीच. मला तर वाटतं की आम्लेट पाव या प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली ती इराण्यानेच. बरं या शिवाय मोहम्मद अली रोडवरच्या इराण्या कडला कबाब रोटी चा उल्लेख लेखा मधे केला नाही, तर इराणी शाप देईल याची भिती ही आहेच. विनोदाचा भाग सोडा पण मोहम्मद अली रोडची कबाब रोटी एकदम अफलातून असते. रुहानी माझं आवडतं आहे मोहम्मद अली रोडवरचं.

आमचं ऑफिस पुर्वी फोर्ट ला होतं. तिथे असतांना एक इराणी हॉटेल  ’ मिल्ट्री कॅफे’ नावाचं -अप्सरा पेन हाऊसच्या गल्लीत.  मोठ मो्ठया  तिथे जाणं व्हायचं. गेल्या बऱ्याच दिवसात तिकडे गेलो नव्हतो – आज  दूपारी  कामासाठी म्हणून फोर्ट ला गेलो होतो तेंव्हा तिथे एक मित्र भेटला. जनरल गप्पा मारायला   इराण्याच्य हॉटेल सारखी दुसरी जागा नाही. सरळ मिल्ट्री काफे चा  रस्ता धरला.

काफे मधे शिरल्यावर समोरचा बोर्ड लक्ष वेधून घेत होता. इथे दररोज एक निराळी पार्शी डिश असते. त्याचा एक फळा लावला होता समोर. इतक्या वर्षानंतर पण फळ्यावर खडूने लिहून ते समोर ठेवण्याची पद्धत सुरु आहे इथे या हॉटेल मधे. तो बोर्ड पाहिला, आणि उगाच एखाद्या जुन्या मित्राला भेटल्या सारखे वाटलं.

मिल्ट्री कॅफे. दरवाजासमोर ठेवलेला तो काळा फळा अजूनही असतो तिथे- रोजचे स्पेशल मेन्यु लिहायला.

समोर एल पी ची जाहीरात असलेला टेबल क्लॉथ असलेले टेबल्स आणि रांगेत मांडून ठेवलेल्या खुर्च्या.. एक कोपरा पकडला. दुपारची वेळ ,मुंबईचा उकाडा, आणि खूप दिवसानंतर लंडन पिल्सनर बिअर दिसली समोर आणि मागवल्या शिवाय रहावलं नाही.जुना मित्र, बिअर, आणि मिल्ट्री काफे !! बस्स! क्या बात है.. गप्पा मारत बसलो होतो जवळपास दिड तास. आमच्या बसण्याचा पण त्या इराण्याला काही त्रास नव्हता.

खिमा पाव स्पेशल. इथे खिमा घोटाला पण छान असतो.

मिल्ट्री काफे फेमस आहे ते तिथे मिळणाऱ्या खिमा पावा साठी. इथे येऊन खिमा पाव तर खायलाच हवा. अप्रतीम खिमा असतो इथे. या हॉटेल मधे मिळणारा पाव पण वेगळाच म्हणजे लादी पाव असतो. तो ताजा लुसलुशीत पाव आणि खिमा – आणि सोबतीला बिअर आणि गप्पा मारायला मित्र – अजून काय हवं??

इथली एक इराणी स्पेशलिटी.. सल्लीचिकन.

cafe military, military cafe, fort, mumbai, marathi, मराठी

कॅफे मिल्ट्री.. फोर्ट

धनसाक चिकन अव्हेलेबल नव्हतं म्हणून खिमा पाव आणि सल्ली चिकन मागवलं. इथल्या चिकनची खासियत म्हणजे मसाला इराणी पद्धतीचा आणि अजिबात स्ट्रॉंग नव्हता . नुसता चिकन चा पिस जरी घेतला तरीही त्या व्यवस्थित मॅरिनेट केलेल्या चिकन च्या अगदी आतपर्यंत मसाल्याची चव उतरलेली असते- आणि बिअर सोबत तर चिकनचा तो पिस एकदम अफलातून  कॉंबो. इथे जास्त लिहू शकत नाही त्या बद्दल त्या साठी तिथे भेट द्यायलाच हवी.

इतकं   खाणं झाल्यावर शेवटी एक चिकन पुलाव मागवला. तो तसा ठिक होता, पण तितकासा रिमार्केबल वाटला नाही. चिकन पुलाव खायचा तर  ब्रिटानियाला पर्याय नाही.गप्पा आणि खाणं होई पर्यंत दिड तास गेला.

कार्मेल कस्टर्ड फक्त इराण्यांनीच बनवावे. इतरांचे काम नाही ते. इथलं कार्मेल कस्टर्ड पण  चांगलं असतं ( खूप छान म्हणणार नाही.. कारण तो शब्द फक्त ब्रिटानियाच्या कार्मेल कस्टर्ड साठी राखून ठेवलाय मी) ^(http://rangmarathiche.com/goto/http://https//kayvatelte.com/2010/02/05/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/)

सकार्मेल कस्टर्ड. अफलातून बॉस.. नक्की ट्राय करा इथे आल्यावर.

बरं इथले रेट्स पण खूप कमी आहेत. खिमा पाव मागवला तर फक्त ४९ रुपये . दोन बिअर चिकन सल्ली, खिमा आणि बिर्याणी आणि शेवटी कार्मेल कस्टर्ड  या सगळ्यांच बिल झालं होतं फक्त ३९० रुपये. बिअरचे १८० कमी केले तर जेवणाचे बिल फक्त  २१० रुपये. एक विस्मृती मधे गेलेले पण अतिशय सुंदर नॉन व्हेज मिळण्याचे ठिकाण म्हणून या हॉटेल फोर्ट मधे गेलात की   नक्की भेट द्या. अगदी काही नाही तर कमीत मुंबईतल्या बेस्ट  खिमा पाव साठी तरी नक्कीच!!

इथे दररोज स्पेशल मेन्यु असतो. इथले मेन्यु  कार्ड पहायला इथे खाली दिलेल्या चित्रावर क्लिक करा   म्हणजे तुमच्या आवडीच्या मेन्युच्या दिवशी तिकडे जाता येईल….

मेन्यु कार्ड