लोकं लग्न का करतात?

Written by  on April 20, 2003

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2011/12/wedding-rings-ii.jpg)लेखाचे हे  हेडिंग वाचल्यावर तुमच्या  पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं  लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं असतं  का?

जेंव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपलं शिक्षण पुर्ण करतो आणि नोकरीला लागतो, तेंव्हा साधारण २३-२४ वय असतं. हातात मस्त पैकी पैसा खुळखुळत असतो. कॉलेज मधे शिकत असतांना बाबांच्या कडून मिळणारा लिमिटेड  पॉकेट मनी आता एकदम मल्टीफोल्ड मधे वाढलेला असतो.

नवीन मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. मस्त पैकी सिनेमे, नाटकं, ट्रेकिंग वगैरे सुरु असतं. आठवडाभर काम करायचं आणि विकएंडला मस्ती करायची… असा प्रोग्राम सुरु असतो. सुरुवातीला काही दिवस तरी घरचे लोकं काही म्हणत नाहीत, पण लवकरच, म्हणजे एक दोन वर्ष झाली की मग  जर मुलगी असेल तर आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. किती दिवस उंडारू द्यायचं हिला असं? आता लवकर  उजवून  टाकायला हवं!घरच्या लोकांची सारखी भूणभूण सुरु होते. मुलींना मात्र अजून काही दिवस तरी एकटं रहायची इच्छा असते. स्वातंत्र्य इतक्या लवकर संपावं अशी इच्छा नसते. पण……… आई वडिलांच्या इच्छे पुढे काही फारसं चालत नाही आणि चहा पोहे सुरु होण्याची लक्षणं दिसू लागतात.

मुलाच्या बाबतीत थोडं वेगळं सुरु होतं. आता २५ चा झाला, म्हणजे अजून दोन तीन वर्ष तरी लग्नाला वेळ आहेच. पण घरचे लोकं मानसिक तयारी व्हावी म्हणून येता जाता टोकत असतात. एखादी चांगली दिसणारी मैत्रीण वगैरे असेल तर ,” काय रे तसं काही आहे का तुझं? असेल तर सांग, आम्ही भेटतो तिच्या आई बाबांना” असं आई बाबा म्हणाले की मग मात्र ” अरे हो यार.. खरंच आपलं लग्नाचं वय होत आलं की आता” ही चाहूल लागते.

इथपर्यंत सगळ्यांचे सारखंच असतं. त्याला पण आपण लग्न का करायचं हे काही लक्षात येत नाही. फक्त इतर मित्रांची- मैत्रिणींची लग्न झाली म्हणून आपणही  करायचं का?  सोशल अ‍ॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की आता लग्न करा,म्हणून करायचं? त्याला थोडी भिती वाटत असते, लग्न करायचं म्हणजे  आपल्या बरोबर ती पण रहाणार, म्हणजे तिची पण जबाबदारी आलीच.काय करायचं?

तिच्याही मनात साधारण असेच  विचार येतच असतात, की कसं एखाद्या अनोळखी मुलासोबत रहायला जायचं? अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला? लग्न करायलाच हवं का??

दोघांनाही आपला प्रेम विवाह व्हावा असे वाटत असते. पण  हिम्मत दोघांचीही होत नसते.. तिला पण तो बरा वाटत असतो, त्याला पण ती छान दिसायला लागते. मैत्रिणींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अगदी निर्भेळ मैत्री असते ती थोडी पझेसिव्ह व्हायला लागते. ट्रेक ला जातांना बस मधे तिच्याच शेजारी बसायला मिळावं म्हणून धडपड सुरु असते, तिला पण हे सगळं समजत असतं, पण ती मात्र अजिबात काही लक्षात न आल्याप्रमाणे वागत असते. वाट पहात असते, ’हा येडा’ कधी काही बोलतो का ह्याची!

पण ” हा येडा” मात्र कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. समजा विचारलं, आणि मग ती नाही म्हणाली तर? असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत असतात. काय करावं बरं?? विचारावं की नको?  बरोबरच्या मित्रांच्या पण लक्षात आलेले असते हे सगळे, पण कोणी तसं बोलून दाखवत नाही. हे दोन्ही  प्राणी आपलं मुकत जीवन एंजॉय करत असतात. बरेचदा तिला पण वाटत असतं, की ह्या मुखदुर्बळ माणसाने कधी तरी विचारावे, पण हा मात्र   ढीम्म पणे बसलेला असतो- आणि कधीच काही विचारत नाही.

असेच काही दिवस जातात. तिचे चहा पोह्यांचे कार्यक्रम सुरु होतात, त्याचं अजून मुली पहाणं सुरु झालेले नसते.  मधल्या काळात ,  एक तर  तिचे लग्न ठरते किंवा  तिला कोणी  पसंत पडलेला  नसतो  .

हे वर जे काही लिहिलंय ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. लग्न का करायचं? हा कन्सेप्टच क्लिअर नसतो.वर ज्या घटना लिहिल्या आहेत, त्या सर्वसाधारण  पणे मुलांच्या  जीवनात घडणाऱ्या घटना असतात. या सगळ्या काळात एकदाही लग्नाचा विचार मनात आलेला नसतो, पण नकळत सामाजिक जाणीव लग्नाच्या दिशेने मन तयार करत असतं.

****

लग्नाचं पहिलं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून. ती   ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या  बरोबर रहायला  हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !

दुसरा कन्सेप्ट म्हणजे , दोघंही सगळीकडे आपल्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकन्या पाहून दमलेले असतात. मग दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट करायला म्हणून एकदम साक्षात्कार झाल्या प्रमाणे ” अरे आपल्याला तर हीच आवडत होती?” असे लक्षात आल्याने लग्न करतात.

काही लोकं असेही म्हणतात की मुली फायनान्शिअल सिक्युरीटी साठी लग्न करतात. पण तसे नाही. कारण आज मुली पण मुलांच्या इतक्याच शिकलेल्या असतात, आणि मुलांच्या बरोबरीने पैसे कमवायची धमक बाळगून असतात, तेंव्हा हे फायनान्शिअल सिक्युरिटी चे कारण मला तरी पटत नाही. अहो जर हेच कारण असते, तर ऐश्वर्या रायला लग्न करायची काही गरज होती का?? तिच्याकडे करोडो रुपये आहेत, कशाचीच कमतरता नाही .. पण तिलाही लग्न करावंसं वाटलंच ना?

पण याच गोष्टीवरून एक  लक्षात येतं की फायनान्शिअल सिक्युरीटी जरी असली, तरीही समाजातलं अ‍ॅक्सेप्टन्स मिळायला हवं म्हणून तिने लग्न केले असेल का? ति्चे एकटी असतांना लग्नापूर्वीचे स्टेटस आणि आजचे स्टेटस या मधे पडलेला फरक पहाता हा मुद्दा पटतो.

काही मुली कार्पोरेट वर्ल्ड मधे चांगले पैसे कमावत असतात, बरोबरचे  सगळे  लग्नाळू मुलं मागे लागलेले असतात, पण नंतर काही दिवस यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर ,  आणि बहूतेक दुसरी एखादी मुलगी आल्यावर पली एक हॉट गर्ल ची इमेज जेंव्हा थोडीविस्कळीत व्हायला लागते, तेंव्हा आपल्यापे क्षा जास्त पैसे मिळवणारा मुलगा बघून लग्न ठरवले जाते.

बरेचदा नोकरी निमित्य एकटे रहावे लागते, मग त्या  एकटेपणातुन बाहेर पडण्यासाठी , निःस्वार्थी प्रेम , की जे आजपर्यंत केवळ आई , वडील, भावंडं यांच्या कडूनच मिळालेलं असतं, ते   शोधण्याचा प्रयत्न सुरु केला जातो,आणि मग ते न मिळाल्यास, वैफल्य आणि सरळ मुलगा बघून लग्न करण्याचे ठरवले जाते. अगदी हीच गोष्ट मुलांच्या बाबतीतही घडते.

अजून एक कारण म्हणजे आई वडलांच्या बंधनात रहाण्याचा कंटाळा आलेला असतो, आणि मग त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणून लग्न करणारे पण काही लोकं असतात.

दोघांचेही एकच करिअर असतं (डॉक्टर, इंजिनिअर, नाटक वगैरे), आवड पण जुळते, जसे नाटक, सिनेमा, संगीत, वगैरे आणि मग असं वाटायला लागतं की आपण बरोबर रहायला हरकत नाही, म्हणून मग लग्न!!!

धार्मिक बंधनं, म्हणून – म्हणजे धर्मात सांगितले आहे की लग्न  रिप्रोडक्शन साठी करा म्हणूनही लग्न करणारे लोकं आहेत.

या सगळ्या गोष्टी शिवाय एक गोष्ट म्हणजे जीमी पहिल्या पॅरीग्राफ मधे तुमच्या मनात पहिले आली होती ती – म्हणजे शारिरिक गरजा ! हवं तर बायोलॉजिकल निड्स म्हणता येईल त्याला.  सेक्स हा पण  उद्देश आहेच. पण केवळ सेक्स साठी म्हणून लग्न केले जात नाही, तर सेक्स हा एक लग्न केल्यावर होणारा अनुषंगाने येणारा भाग आहे.   सेक्स साठी म्हणून कोणी लग्न करत नाही.

जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा राजकुमार, विजय मल्या,   वगैरे की ज्यांनी मनात आणले  आणि त्यांनी फक्त हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील.  त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो. एक कमिटेड रिलेशनशिप, होणाऱ्या बाळाला वडिलांचे नांव, हे मुद्दे पण आपल्या कडे फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत. कारण विवाहपूर्व संबंध अजून तरी सर्वमान्य झालेले नाहीत.

जेंव्हा कोणाचं लग्न होतं, तेंव्हा तो कोणाचा तरी कोणी तरी होतो. म्हणजे बघा, ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकची  बायको , अमिताभची सून, त्या बाळाची आई.. इतके काही झाली लग्नानंतर.  हा जो सामाजिक रिस्पेक्ट मिळतो तो मिळवण्याची प्रत्येकाचीच धडपड असते -आणि म्हणून लग्न केले जाते.

सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .

जर तुमचे लग्न झालेले असेल तर आपण लग्न का केलं?  हे   आठवुन बघा, आणि जर लग्न झालेले नसेल तर आपण लग्न का करणार आहोत याचा विचार करून पहा….  जर काही वेगळं सुचलं तर इथे कॉमेंट लिहा… 🙂

ट्विटर

Written by  on April 18, 2003

गेल्या काही दिवसांपासुन ट्विटर जरा जास्तच न्यूज मधे आहे. मग फेस बुक जास्त पॉप्युलर की ट्विटर -हा वाद चांगलाच रंगलाय. twitफेस बुक आणि ट्विटरवर तुम्हाला बऱ्याच सेलेब्रिटीज सापडतील. भारतीय सेलिब्रेटीज ंमधल्या शुभा मुदगल यांना मी फॉलो करतोय, पण त्यांचं एकही ट्विट अपडेट नसतं. मला वाटतं की एकदा अकाउंट ओपन केल्यावर स्टेटस अपडेट केलेलं नाही त्यांनी.भारतीय सिलेब्रिटीज मधे ट्विटींग इतकं पॉप्युलर नाही अजुन.. ट्विटींग ही पण एक सवय आहे.

ऑपरा कोणाला फॉलो करते तर ही बघा नांवं.. क्विन रैना अबदुल्ला ( कुठल्या देशाची राणी ही असं म्हणताय — अहो जॉर्डनची लिटरसी करता बरंच काम करते ही राणी.. आय लव्ह हर गट्स.. ), लॅरी किंग,डेमी मुर, जेनी मॅक कर्थी ( बरोबर लिहिलं असावं) आणि अशा अनेक सिलेब्रिटीज..

ऑन द कॉंटररी मी ऑपरा विनफ्रे आणि लॅरि किंग ला पण फॉलो करतो, त्या दोघांचेही अपडेट्स अगदी रेग्युलर असतात. आता ऑपराला १३ लाख लोकं फॉलो करतात 🙂 आणि ती फॉलो करते   १४ लोकांना..!मी ऑपरा चा फॅन आहे. डोना ह्यु पेक्षा ऑपराचा शो कधिही चांगला असतो. तसेच लॅरी किंग शो पण चांगला असतो ,पोलिटिकल व्ह्युज साठी.  🙂 सेलेब्रेटीज च्या नावाने सुरु केलेल बरेच फेक अकाउंट्स पण इथे आहेत !

ट्विटींग ची खरंच कांही गरज आहे कां? ट्विटर वर गेल्यावर असं लक्षात येतं की काही लोकं टिवटर चा खूप छान वापर करतात तर कांही लोकं आपला ब्लॉग, प्रॉडक्ट, कंपनी प्रमोट करण्यासाठी ट्विटर वापरतात. कांही लोकांनी तर कांही साइटसे फिड्स आपोआप ट्वीट केले जाण्याची पण सोय केलेली आहे. टिव्टरमधे तुम्ही एखादी लिंक पोस्ट केली तर ती सरळ टायनी यु आर एल मधे कन्व्हर्ट करण्याची सोय ट्विटर टुल बारने करुन दिलेली आहे, की ज्या मुळे एखादं पेज शेअर करणं सोपं जातं. ट्विटरमुळे बऱ्याचशा न्यूज ज्या नॉर्मली आपण इग्नोअर करतो त्या तर नक्कीच वाचल्या जातात. मी स्वतः, जर त्या ट्विट लिंक सोबत ती लिंक कशाबद्दल आहे हे दिलेलं नसेल तर कधीच क्लिक करित नाही.

एक बातमी होती, ट्विटरला गुगल टेक ओव्हर करणार म्हणून. ट्विटर चा वापर गुगल तर कधिपासुनच करतंय गुगलचा पण अकाउंट आहे ट्विटरवर.. म्हणजे काय, तर आपल्या युजर्स पर्यंत पोहोचण्यासाठी ट्विटरचा वापर करण्याचा मोह गुगलला पण टाळता आला नाही. मायक्रो ब्लॉगिंग हे टुल तसं फारसं पॉप्युलर झालेलं नाही आपल्या इथे .

ट्विटरला मायक्रो ब्लॉगिंग पेक्षा सोशल साइट हे नांव जास्त संयुक्तिक ठरतं. एक सर्व्हे वाचला होता, की आपण फार जास्त एकलकोंडे झालेलो आहोत. कोणाशी रिअल लाइफ मधे बोलण्यापेक्षा व्हर्चुअल रिलेशन्स, चॅटींग करणं आपण जास्त प्रिफर करतो, बायकोने सांगितले, की समोरच्या वाण्याकडून काहीतरी आणा, किंवा भाजीवाल्याकडून कोथिंबीर घेउन या.. आणि नेमकं त्या वेळी जर तुम्ही चॅट करित असाल, तर तुम्हाला… हॅट बॉ.. काय हे……!.. असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला सायकीक डिसऑर्डर होण्याची शक्यता आहे असं एक्स्पर्ट सायकिऍट्रिस्ट सांगतात. तेंवा , अशा परिस्थिती मधे तुम्ही नेट पासून काही दिवस दुर रहाणेच बरे.

दोन दिवसांपुर्वी एक सर्व्हे करण्यात आला होता, त्या सर्व्हे मधे असं लक्षात आलं की ९० टक्के ट्विट्स हे केवळ १० टक्के युजर्स करतात . बाकी सगळे सायलेंट असतात.ट्विटर हवं की नाही?? यावर माझं उत्तर आहे हो.. अवश्य असावा ट्विटर अकाउंट की जिथे सिएनएन, आणि इतर न्युज चॅनल्स चा फिड घेउन ठेवावा, म्हणजे महत्वाचे अपडेट मिळत रहातात.तसेच तुमचे मित्र असतिल तर त्यांच्याशी संपर्क ठेवणे पण सोपं जातं.

मी पण आता सुटिच्या दिवशी दिवसभर नेटवर वेळ न घालवता, घरामधली कामं करायची, वाचन करायचं असं ठरवलंय. हल्ली मला कम्प्युटर स्क्रिन्वर पेपर वाचायला जास्त आवडायला लागलाय- खरोखरच्या पेपर पेक्षा ( मला वाटतं ही पण एक डिसऑर्डर असावी!! हे बरं की वाईट माहिती नाही, पण मी आता जास्त वेळ ऑन लाइन रहाणं बंद करणार हे अगदी निश्चित!

प्रेम..

Written by  on April 17, 2003

loveभारतात अमेरिकेपेक्षा खूप कमी प्रमाणात डिव्होर्स होतात असे का बरे असावे? ह्या गोष्टीचा कधी विचार केलाय का? उत्तर अगदी सोपं आहे, अमेरिकेतील लोकं फार जास्त प्रेमळ आहेत.. 🙂 असे आश्चर्याने काय वाचताय? अहो खरंच ….!

म्हणजे असं पहा, जसे आपण जन्माला येतो, तेंव्हा आपले आयुष्यात आपल्या श्वासाचा किती कोटा आहे हे आधीच ठरलेले असते, तसेच आपल्या प्रेमाचा कोटा पण ठरलेला असतो. आता तो कोटा किती वर्षात पुर्ण करायचा हे आपल्यावर अवलंबुन असते. अमेरिकेत पहा बरं, लोकं सारखे प्रेम करत असतात, सकाळ,संध्याकाळ, उठता, बसता, काम करतांना केंव्हाही पहा सारखे प्रेम करत असतात. नवरा बायको तर लग्न होण्याच्या पूर्वीपासूनच अगदी शाळेत असतांना पासूनच प्रेम करणे सुरु करतात. आता इतके प्रेम केल्यावर त्यांचा प्रेमाचा कोटा एक दोन वर्षा संपणार नाही तर काय .. मग घेतात ना डिव्होर्स .

आपल्या कडे पहा, नेमकं याच्या उलट असतं नवरा बायको चे नाते हे एकमेकांची उणी दुणी काढण्यासाठी, आणि एकमेकांच्या नातेवाईकांची निंदानालस्ती करण्यासाठी असते की काय अशी शंका काही लोकांकडे पाहून येते.. बरं ते असो, पण थोडे निरीक्षण केलेल की लक्षात येईल, आपल्याकडे विवाहित स्त्री पुरुषांचे आयुष्य पहाल तर लक्षात येईल की, दिवस उजाडला की की ह्यांचे वादविवाद सुरु होतात, हळू हळू हे वाद विवाद भांडणा वर कधी पोहोचतात हे त्यांना पण समजत नाही, पण रात्र झाली की मात्र एकदम एकमेकाच्या बद्दलचे प्रेम उतु जायला लागते. सकाळची भांडणं आणि “रात्रीचे प्रेम “ह्यांची गोळाबेरीज शेवटी शुन्य होते!!!! अहो मग    कोटा कसा काय पुर्ण होईल?

म्हणजे पहा, की जर तुम्हाला पुढच्या जन्मी दुसरी बायको हवी असेल ना, तर या जन्मी तरी प्रेमाचा कोटा पुर्ण करा. बायकोवर , मनमुराद, शक्य होईल तितके जास्त, शक्य होईल तेंव्हा प्रेम करा. आता हे सगळं कसे करायचे माहिती नसेल तर इंग्रजी सिनेमे पहा, त्यात समजेल, एखादा हिरो कसे फायटिंग सुरु असते, मधेच हिरोइन येते, बंदूक बाजूला, आर के ची पोझ घेऊन प्रेम सुरु – किंवा ती किचन मधे स्वयंपाक करत असते, तेवढ्यात हिरो येतो आणि झाले सुरु, स्वयंपाक राहीलाच बाजूला- जाउ द्या इथे जास्त लिहण्य़ा पेक्षा नॉटी अमेरिका,  ट्युब८  पहा म्हणजे समजेल कसे असते ते.हे असे प्रेम कराल, तरच तुमचा कोटा पुर्ण होईल आणि पुढल्या जन्मी  दुसरी बायको मिळेल!

आपल्या हिंदू धर्मात स्त्रियांसाठी असे १०-१२ तरी व्रत वैकल्य दिलेले आहेत ,की जे केल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते. आता मी थोडे जास्त पॉझिटीव्ह लिहिले आहे हे….. याचाच दुसरा अर्थ हा की बायकोने व्रत मोडले की नवरा श्री राम म्हणणार!! चाळणीतून चंद्र पहायचे करवा चौथ चे व्रत तर खास या साठीच आहे. बायको दिवस भर उपवास करते नवऱ्याचे आयुष्य वाढावे म्हणून. पण……. पण एखादी दुसरी मात्र थोडी जास्तच हुषार असते, आणि ह्या व्रताचा वेगळाच उपयोग करून घेते. दिवसभर उपवास करते आणि संध्याकाळी मात्र ” अहो, मला नेकलेस हवाय, आत्ताच्या आत्ता आणून द्या , तुम्ही नाही म्हणालात, की लगेच घरातून ब्रेडचा तुकडा घेऊन येते, आणि म्हणते, आता देता की नाही आणून? नाही तर तोडते उपवास!! तो उपवास तोडला आणि आपण मेलो तर??? तुमची नाही म्हणायची काय हिम्मत आहे?  निघता बाजारात तुम्ही! अहो आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी.

वटसावित्री उपवास मात्र अगदी न विसरता करतात या स्त्रिया. अहो कधी तरी तर उपवास मोडायची धमकी द्या ना? इथे ती वर दिलेली ट्रिक चालत नाही. तर तुम्हीच सारखे, ” अगं, कशाला उपवास करतेस? जाऊ दे ना, आज किनई मस्त पैकी तुझ्या आवडीच्या त्या हॉटेल मधे जाऊ या आपण म्हणता, पण ती मात्र अगदी साता जन्माचे वैर असल्याप्रमाणे अजिबात तयार होत नाही. पुरुषांनो तुम्हाला हा एकच चान्स असतो बरं का, तेंव्हा या दिवशी प्रयत्न करत रहा तिचा उपवास मोडण्याचे, येईल कदाचित यश!

तसेही आपल्या धर्मात सगळे काही देणाऱ्या देवता स्त्री याच आहे, पैसा हवा- लक्ष्मी कडे जा, विद्या हवी- सरस्वती कडे जा. सगळं काही अगदी पूर्वापार चालत आलंय. विष्णू क्षीरसागरात कुठे तरी बसलाय, जिथे पिण्याचे पाणी जरी लागले, तरी हजारो किमी प्रवास करावा लागेल बिचाऱ्याला. शंकर तर विचारूच नका – त्या हिमालयावर त्याला नेऊन बसवलंय. एवढ्या थंडी मधे पण अंगावर कपडा म्हणाल तर एक चामड्याचा तुकडा,अंगाला एखादं क्रिम वगैरे थंडीचे लावायला द्यायचे तर दिले भस्म चोपडून- आणि हा पण त्रास कमी वाटला  म्हणून डोक्यावरून गंगा वहायला लावली- हे सगळं बिचाऱ्यानं मान्य केले आणि प्यायला मागितले तर , दिले विष–आता तुम्हीच सांगा तो तांडव करेल नाही तर काय? असो.. दोन पिडीत पती विष्णू आणि शंकर यांनी एकमेकांना भेटून आपापलं दुःख हलके करायचे ठरवले तरी पण ते शक्य नाही, कारण एक हिमालयात, तर दुसरा समुद्रात!

बरेचदा वाटते की हे इतके व्रत वैकल्य स्त्रियांसाठी आहे , किमान एक तरी पुरुषांसाठी असायला हवे होते. स्त्री पुरुष बरोबरीचा जमाना आहे हा, तेंव्हा पुरुषांना पण इक्वल चान्स हवाच की राव!

 

  संजीव देशमूख ने परवा दोन पेग चढवल्यावर जी बडबड केली ती इथे लिहून काढली. आता तुम्हाला समजलं ना की मित्रांबरोबर बसून बार मधे ढोसण्यात का मजा येते ते??  . असो तर मंडळी, या पोस्ट साठी संजीव चे आभार..:) पोस्ट तुझीच रे, फक्त शब्दांकन माझे 🙂

मराठी

Written by  on April 13, 2003
^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/06/photo0008.jpg)

कधी तरी आश्चर्याचा धक्काच बसतो बघा. परवाचीच गोष्ट आहे मी मुंबईच्या विमानतळावर सिक्युरीटी क्लिअर करुन पुढे उभा होतो. अजुन बोर्डींग सुरु झालेलं नव्हतं. समोर फुकट वर्तमान पत्राच्या स्टॉल कडे पाय वळले, आणि तिकडे पहातो तर समोरच एक विमानाच्या आगमनाच्या वेळांची माहिती देणारा बोर्ड चक्क मराठी मधे लावलेला दिसला. ( नेमका फोटो क्लिक केला तेंव्हा इंग्लिश झाला होता 😦  ) मला क्षणभर तर राज ठाकरे किंवा उध्दव ठाकरेच सत्तेवर आलेत की काय असे वाटले.

खूप आनंद झाला होता.कधी नाही ते महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी मधला बोर्ड पाहून खूप बरं वाटलं. आजचा दिवस तर माझ्यासाठी सुखद आश्चर्याचे धक्के  देणारा होता. पेपरच्या स्टॉल वर फक्त एक गठ्ठा इंग्रजी वर्तमान पत्राचा होता, आणि इतर सगळे मराठी वृत्तपत्रे होती. सकाळ, लोकमत, पुढारी वगैरे पेपर व्यवस्थित रित्या रचुन ठेवलेले दिसत होते त्या वर्तमानपत्रांच्या स्टॅंड वर. मी समोर होऊन प्रत्येकी एक मराठी पेपर उचलला. आणि बाजूला खुर्ची शोधुन वाचत बसलो. खुर्ची अगदी त्या पेपरच्या स्टॉल च्या जवळच होती.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/06/photo00041.jpg)तेवढ्यात मराठी मधे  गप्पा मारत   दोन   तरुण तिथे आले – बहुतेक आयटी च्या फिल्ड मधले असावे. त्यांच्या हातातल्या लॅपटॉप बॅग वर एकच लोगो होतो, म्हणजे बहुतेक एकाच कंपनीत काम करणारे होते दोघंही.

तिथे मराठी पेपर बघुन नाक मुरडून शिव्या घालत सुटले. “च्यायला, आता इथे एअरपोर्टवर पण मराठी पेपर आणून ठेवलेत, एकॉनॉमिक्स टाइम्स वगैरे ठेवायला काय होतं यांना? पार पावट्यांचं बसस्टॅंड करुन टाकलंय एअरपोर्ट म्हणजे” . ( एकोनॉमिक्स  टाइम्स खाली कोपऱ्यात होता बरं कां )दुसरा म्हणतो, “अरे आजकाल लो फेअर तिकिटं असल्यामुळे पावटेच जास्त असतात एअरपोर्टला , म्हणुन पावट्यांचा पेपर ठेवलाय इथे”. बहुतेक दोघांचीही वयं साधारण २५-३० च्या दरम्यान असावी.

भरभरून संताप आला, तिरिमिरीतच उठलो, आणि  त्याला म्हंट्लं की कारे बाबा, मराठीच ना तू? मग कसलं रे हे तुला डाउनमार्केट वाटतंय इथे मराठी पेपर असणं? आणि मराठी म्हणजे पावटे, म्हणजे स्वतःच्या घरच्या लोकांना  पण पावटेच म्हणतोस की काय तू? मातृभाषे ला कधी नव्हे ते  मिळणारं   महत्व बघवत नाही का तुम्हाला? जर तुम्हीच आपल्या मातृभाषेला डाउन मार्केट म्हणाल तर इतर लोकं ’तुम्हाला’ म्हणजे मराठी लोकांना पण घाटी, डाउन मार्केट म्हणतील याची तुम्हाला जाणिव आहे का?

आपल्या मातृभाषेचा मान आपणच राखायला हवा. त्याने सॉरी  , म्हणून समोरचा एक मराठी पेपर उचलला, आणि म्हणाला, माझा उद्देश तो नव्हता! आणि ओशाळवाणं हसून  जाउ लागला.  म्हंटलं, अरे  गुजराथ मधे नेहेमी गुजराथी पेपर्सच असतात बहुतेक एअरपोर्ट्वर,  राजकोटला तर फक्त गुज्जुपेपर असतो , इंग्रजी पेपर तर मागुनही मिळत नाही. इथे मुंबईला युपी  बिहारची मंडळी आवर्जुन मैथिली भाषेतला पेपर वाचतात.

जर इतरांना आपल्या मातृभाषेची लाज वाटत नाही, तर तुम्हाला का म्हणून वाटते?? थोडं अंतर्मुख झालो एकदम.

मराठी, बडोदा, एअरपोर्ट, विमानतळ, प्रवास, अभिमान ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/06/photo0033.jpg)

बडोदा एअरपोर्ट

बडोद्याला एअरपोर्ट वर उतरल्यावर सहज समोर लक्ष गेलं, तर एअरपोर्ट अरायव्हल लाउंज च्या बिल्डींग वर गुजराथी मधे बडोदरा लिहिलेलं दिसलं. मनात आलं, मुंबईला किंवा  महाराष्ट्रा मधे  मराठी कधी लिहिलेले दिसेल असे आपल्याला??

तालिबानी न्याय टिनएजर मुलिला ३७ फटके..

Written by  on April 11, 2003

taliban-hiring

कालची बातमी वाचली.तालिबान मधिल मिलीटरी कमांडर फजुल्लाह ने स्वात मधे मिलीटंट्स चा गढ असलेल्या मट्टा या ठिकाणापासून केवळ २५ कि.मी. अंतरावर, एका मुलीला चाबकाने फोडून काढले..

हे लोकं स्वतःला तालिबान म्हणवतात, म्हणजे स्टूडंट. ह्या स्टूडंट्सनी स्वतः कधी शाळॆचं किंवा कॉलेजचं तोंडही पाहिलेलं नसतं पण म्हणे तालिबान… !

ह्या लोकांनी जितके   माणसं मारली असतील तेवढी पुस्तकं पण कधी हाताळली किंवा वाचलेली असतील क ह्याची शंका आहे..हे तालिबान म्हणजे माथेफिरू आणि अशिक्षित लोकं.त्यामुळे इतर सुशिक्षित लोकांवर जरब बसवायला त्यांना असे इसविसन पुर्व काळातले नियम आणि कायदे आवश्यक वाटत असतील.

हे लोकं स्वतःला इस्लामिक म्हणवतात , मौलवी म्हणवतात, पण त्यांनी कुठलेही ट्रेनिंग घेतलेले नसते. .तालिबानच्या वर्किंग स्टाइल वर आपण बरेच काही वाचले आहे.पूर्वी मला एकदा एक व्हिडीओ इ मेल मधे आला होता, एका स्त्रिला दगडाने ठेचून मारण्याचा. काल एक दुसरा व्हिडीओ आला. एका १७ वर्षाच्या मुलीला ३७ फटके मारण्याचा. फटके मारणारे तालिबानी होते.

तिचा दोष?असं म्हणतात की ती ज्या पुरुषाबरोबर घराबाहेर पडली तो पुरुष तिचा पती नव्हता. बस! त्याकरिता इतकी शिक्षा. तिला फटके मारले जात होते, आणि ती किंचाळत, मदत मागत होती. एकाने तिचे हात धरुन ठेवले होते, तर दुसऱ्याने पाय ..हात धरण्याचे कारण तिने तिच्या हाताने मागचा भाग झाकू नये हा होता. हा व्हिडिओ एका मोबाइल फोनने शुट करण्यात आलेला आहे.

काही लोकल लोकांचे म्हणणे असेही आहे, की ह्या मुलीने एका तालिबानी कमांडर ( कसला बोडख्याचा कमांडर.. भ++ पाक सरकार पुरस्कृत टेररिस्ट )ने तिला लग्नाची मागणी घातली होती ज्याला तिने नकार दिला म्हणून तिच्यावर बाहेरख्याली पणाचा चा आरोप करुन शिक्षा करण्यात आली. तिचे पुश्तु मधले डायलॉग्स आहेत.. मी जे काही केलं त्या बद्दल पश्चाताप करते आहे, आणि माझे वडीलांना पण .

हा व्हिडीओ यु ट्य़ुब वरुन काढून टाकण्यात आलाय पण इथे ह्या ब्लॉग वर ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.liveleak.com/view?i=504_1238691910) ऍव्हेलेबल आहे.

अजुन एक बातमी वाचण्यात आली, त्या मधे शांगला( पाकिस्तान) येथील गोजकारो कलय इमरलेंड माइन्स,तालिबानच्या ७० लोकांनी एक अमेरिकन कंपनीला लिझ वर दिलेली पाचु ची माइन्स ताब्यात घेतली आहे.ही माइन पाकिस्तानने ४० मिलियन रुपयांच्या करारावर त्या कंपनीला लिझ वर दिलेली आहे.एक दिवस २५ -३० तालिबानी तिथे आले, धाड धाड गोळ्या चालवून सुरक्षा गार्ड्स ला पळवून लावले आणि मग माइन्स ताब्यात घेतली. ते लोकल लोकांना म्हणाले की आम्ही टेररिस्ट नाही, आम्ही तुमच्यातले आहोत, या आणि इथे माइन मधे काम  करा. (तुम्ही काम करा आणि  प्रॉफिट शेअर करा)

शांगला  जवळच्याच कोट्काय बाजारातुन मायनिंग इक्विपमेंट्स (म्हणजे कुदळी अन फावडॆ) आणले . तालिबानने टेकओव्हर करण्यापुर्वी ह्या माइन मधे १०० लोकं काम करित होते, आता करताहेत १०००!!!!इतकी माणसं हवे तसे माइन्स खणून  त्या माइन्स ची वाट लावणार ह्यात काहीच शंका नाही. त्याच बरोबर चूकिच्या माइनींग मुळे माइन कधिही खचू शकते आणि लोकं तिथे ट्रॅप होऊ शकतात.

हे टेकिंग ओव्हर झालंय मागच्या बुधवारी. अशा  घटना आपल्या इथे पेपरमधे पण कव्हर केल्या जात नाहीत त्यामुळे तालिबान आपली ताकद कशी वाढवीत आहे ते आपल्या लक्षात येत नाही.सध्या पाकिस्तानचे भवितव्य अशाच अशिक्षित आणि रॅडिकल इस्लामी मिलिटंन्सी च्या हातामधे गेले आहे.जे भारताच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे.असे हजारो लाखो कसाब तयार होत आहेत. अहो हातामधे बंदूक दिल्यावर तो मुलगा काम करुन पैसे मिळवायचा प्रयत्न का म्हणून करेल? तो तर सरळ एखाद्याच्या डोक्यावर नेम धरुन पैसे मागेल..

१५ ते ३५ हा एज ग्रुप आणि कुठल्यातरी कारणासाठी स्वतःला झोकून द्यायची तयारी, हातात बंदुक आणि रॉकेट लॉंचर..जेहाद च्या नावाखाली कट्टरपंथियांकडून मिळणारा आदर आणि आता मिळालेला पैसा(अफुच्या शेतिमधुन मिळणारे पैसे आणि अशा तऱ्हेने ऍक्वायर केलेल्या माइन्स मधुन मिळालेल्या जड जवाहीर विकून मिळालेले पैसे त्यांची ताकत वाढवायला पुरेशी आहे.एकदा फॅन फॉलोअर्स वाढले की झाले. ), अजुन काय हवे?

टांक येथे एका सुसाइड बॉंबरने  स्वतःला उडवून दिले काल संध्याकाळी. अटॅक मधे २९ लोक मारले गेले, पण सरकार म्हणतंय ११ लोकंच मेले,या तालिबानी लोकांमधे पण दोन ग्रुप्स आहेत.बैतुल्लह मसुद हा एक पाकि लिडर आहे आणि एक कोणी तरी ट्रायबल लिडर आहे. हा अटॅक त्या बौतुल्लाह च्या विरोधामध्ये केला गेला असे लोकल बलुचिस्तानमधल्या लोकांनी सांगितले. ही सगळी माहिती समजावुन घेण्यासाठी आपल्याला पाकी पेपर वाचावे लागतात. ह्या बातम्या थोडक्यात का होईना पण भारतीय पेपरला आल्या तर बरे होईल..

ओबामांच्या अमेरिकन डिप्लोमॅट्स ला हे माहिती असेलच…..????

चविने खाणार कोल्हापूरला…

Written by  on April 5, 2003

पुणेरी लोकांना चवीने खाण्यात मुंबईकरांपेक्षा थोडा जास्तच इंट्रेस्ट आहे.  मुंबईकर  बाहेर खायला जायचं म्हंटलं की आपला नेहेमीच्या शेट़्टीच्या हॉटेल मधे जाउन ठरलेल्या डीश खाणार – किंवा नॉन व्हेज असेल तर एखादं कोंकण किनारा, मालवणी  हॉटेल शोधणार- फॉर अ चेंज. पण पुणॆकरांचं  मात्र तसं  नाही. पुणेकर मंडळी अगदी निरनिराळ्या चवीचे पदार्थ टेस्ट करण्यास सदैव तयार असतो.   एखाद्या चांगल्या जागी जाण्यासाठी थोडा जास्त प्रवास करावा लागला तर त्याचीही तयारी असतेच.

पुणं म्हंटलं की   स्वीट होम सारखी साबुदाणा खिचडी आधी आठवते.  तशी खिचडी अजूनही जगात कुठेच मिळत नाही असं माझं मत आहे. मी जेंव्हा सदाशिवात रहायचो, त्या काळात स्वीट होम ची खिचडी म्हणजे जीव की प्राण होती. बरेचदा तर रात्रीच्या जेवणा ऐवजी खिचडी खाऊनच झोपायचो.  पुना कॉफी हाउस समोरच्या त्या कंपाऊंड च्या समोर एक माणूस बरेचसे महाराष्ट्रियन पदार्थ विकायला बसायचा. तिथलं थालीपीठ एकदम अप्रतिम असायचं ( ज्यांनी खाल्लं असेल ते नक्कीच मान्य करतील). थालीपीठ , त्यावर लोण्याचा गोळा, थोडी चटणी – कांदा वगैरे… एकदम अफलातून जागा होती ती. नंतर मग मात्र ते बंद पडलं. बेडेकरांची मिसळ वर्षानूवर्ष आपली चव चव आणि गिऱ्हाइकं टिकवून आहे.

आर आर आबांचा फोटो लागला होता समोर भिंतीवर..

पुणेकरांच्या ह्याच गुण(चव)ग्राहकतेची दखल घेत बऱ्याच हॉटेल वाल्यांनी आता  आपली हॉटेल्स स्पेशॅलिटी फूड सोबतच आऊट्स्कर्ट्स ला  उघडली आहेत.मुंबई महामार्गावर नेहेमीच फक्त फूड प्लाझा वर आपण थांबतो. नुकतंच मला कोल्हापूरला जावे लागले . या वेळेस पुण्याहून एक मित्र सोबत येणार होता. सरळ त्याच्या घरी कोथरूडला जाउन त्याला सोबत घेतलं आणि न थांबता   एक्स्प्रेसवे ने कोल्हापूरचा रस्त्याला लागलो तरीही पुण्याबाहेर पडायला १२-१५ वाजले.

वनपत्रें बंधूंचं हॉटेल..

पुण्याहून सोबत आलेला मित्र म्हणाला, की  जातांना जो पहिला घाट लागतो तो संपल्या नंतर मग  थोडं पुढे गेलं की एक हॉटेल आहे त्या हॉटेल मधे आपण जेवुन नंतर पुढे साईटला जाऊ. प्रवासात डाव्या हाताला बरीच हॉटेल्स दिसत होती. पण माझ्या मित्राला जे हवं होतं ते यायला आम्हाला ३-४ किमी प्रवास करावा लागला. त्या हॉटेल मध्ये शिरलो आणि समोर पहातो तर चक्क गृहमंत्र्यांचा फोटो लागला होता तिथे जेवताना. वनपत्रे यांचं हॉटेल आहे ते.  गृहमंत्री इथे जेवतात म्हणजे मी कुठल्यातरी खास माणसाच्या हॉटेल मध्ये आलोय हे लक्षात आलं.

साजूक तूपातलं पिठलं भाकरी. आणि अख्खा मसूर

जेवण झाल्यावर स्वीट डीश शिरा – अर्थात साजूक तूपातला.

जेवायची ऑर्डर देण्याचं काम की एक्स्पर्ट असलेल्या त्या मित्रावरच सोडलं. त्याने  साजूक  तुपातलं पिठलं, भाकरी आणि आख्खा मसूर मागवला. पिठल भाकरी मला माहिती होती, पण शुद्ध तूपातली? काहीतरीच काय असा विचार आला मनात. हात धुवुन येई पर्यंत समोर डिश मांडून तयार पण होत्या. गरम गरम पिठलं.. त्यावर तूप आणि भाकरी हा म्हणजे एकदम अफलातून मेन्यु आहे. जर कधी पूर्वी ट्राय केला नसेल तर एकदा अवश्य ट्राय करा. ती आख्खा मसूर काही फारशी आवडली नाही. खूप मसालेदार असल्याने असेल कदाचित- पण एक गोष्ट मान्य करायलाच हवी, की तो मसूर पण छान होता चविला. जेवण झाल्यावर विचारलं की स्विट डीश काय आहे? तर म्हणतो  शिरा बनवून आणतो. त्याने शिरा ’बनवून आणतो’ म्हंटल्यावर थोडा धक्काच बसला. वाटलं की कमित कमी अर्धातास तरी लागेल. पण पाच दहा मिनिटातच शिऱ्याची डिश टेबलवर होती. साजूक तूपातला शिरा एकदम अप्रतिम होता. काजूचे तुकडे चक्क दिसत होते .तृप्त होऊन परत निघालॊ.

कोल्हपुरचं ओपल;

ओपल हॉटॆल कोल्हापूर

साताऱ्या जवळच्या एका साईटची कामं आटोपुन कोल्हापूरला पोहोचलो. कोल्हापूरला आल्यावर तिन जागी जायचं असते. एक म्हणजे अंबाबाईचे मंदीर, दूसरे म्हणजे वुड हाउस , आणि चोरगे ची मिसळ .व माझ्या बरोबरचा मित्र तसा व्हेज पण  फक्त कोल्हापूरलाच आला की नॉन व्हेज खातो- आणि ते पण फक्त ओपेल मधे!जर तुम्ही जुने चित्रपट पाहिले असतील.. राजा गोसावीच्या काळातले, तर त्या मधे बरेचदा एका मोठ्या बंगल्याचे शुटींग दिसते. तो बंगला  म्हणजेच हॉटेल ओपल .

कोल्हापूरचं ओपल प्रसिद्ध आहे ते नॉन व्हेज साठी. कोल्हापूरी म्हणजे खूप तिखट असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. पण कोल्हापूरी  म्हणजे तसं नाही तर  कोल्हापूरी ही एक चव आहे .. (हे वाक्य माझं नाही) . मुंबईकरांना  किंवा पुणेकरांना कोल्हापूरी म्हणजे शेट़्टी हॉटॆल मधली थोडी तिखटावर जाणारी , आणि मध्य भागी एक तळलेली लाल मिरची खोचलेली भाजी असे काहीसे चित्र डोळ्यापुढे येते – पण  खरं कोल्हापूरी तसं नसतं.  खरं म्हणजे इतकी कोल्हापूरी मंडळी ब्लॉगिंग करतात की कोल्हापूरी खादाडी वर काही लिहायचा चान्स मला मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. 🙂

तांबडा रस्सा,पांढरा रस्सा आणि चिकन + मटन

इथे डीश चा वगैरे नाजूक प्रकार चालत नाही. सरळ घरच्या सारखं ताट समोर मांड्लं जातं

ओपेल चा   मटण, चिकन आणि सोबतचा तांबडा आणि पांढरा रस्सा एकदम फेमस. लोकं  कोल्हापूरला आले की ज्या श्रद्धेने अंबाबाईचे दर्शन घेतात, त्याच श्रद्धेने ओपेल ला भेट दिल्याशिवाय जात नाहीत. इथुन बाहेर निघालेल्या लोकांच्या तोंडी    मी किती वाट्या संपवल्या रश्श्याच्या  ह्याबद्दल चर्चा बाहेर निघतांना सुरु  दिसतात. या ट्रिप मधे काय ऑर्डर करायची हे ठरवण्याचे अधिकार माझ्या बरोबर असलेल्या मित्राला दिले होते.

ओपल मधे गेल्यावर दूसरा काहीच चॉइस घ्यायचा नाही हे नक्की केलेलं होतं त्याने. सरळ चिकन , मटण दोन्हीची ऑर्डर दिली. इथे सर्व्हिस खूप फास्ट आहेल.पाचच मिनिटात समोर डीश लागल्या, आणि त्याने तांबडा रश्श्याचं आणि पांढऱ्या रश्श्याचं बाउल आणि गरम गरम भाकरी. खूप भूक लागली होती. संध्याकाळी ओपलला यायचं म्हणून दुपारचं थोडं लाइटच जेवण घेतलं होतं. तसेच संध्याकाळचा स्नॅक्स पण अव्हॉइडच केला होता.इतकं सगळं समोर दिसलं आणि एकदम तुटूनच पडलो. नंतरची पंधरा मिनिटे आम्ही सगळे शांत होतो- उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म हेच काम सुरु होते.

ओपल म्हणजे कोल्हापूरला गेल्यावर ’चूकवु नये असे काही’ या सदरामधे मोडते. पुर्वी एक बावडा नावाची  जागा होती. तिकडे माझा एक खास कोल्हापूरी मित्र मिसळ खायला घेऊन गेला होता. कोल्हापूरकरांचा विक पॉइंट म्हणजे एक दुखती रग. बहूतेक सगळे कोल्हापूरकर मिसळ आणि कट वड्याचे डाय हार्ड फॅन्स असतात. भरपूर आलं लसून घातलेला बटाटे वडा, आणि त्यावर कट रस्सा.. अप्रतीम कॉम्बो.  एक कोल्हापूरकर मित्र सांगत होता, की मटनाचा शिळा तांबडा रस्सा घातलेली मिसळ म्हणजे कोल्हापूरकरांचे कोणाला न सांगितलेले एक रहस्य आहे. हा रस्सा स्टॉक मधून तयार केलेला असतो, त्यामूळे खूप छान चव असते या मिसळची. मिसळ बरोबर अर्थातच “स्लैस” खाण्याची पद्धत आहे कोल्हापूरला.

सकाळी मंदीरात अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर मग मिसळ खायला म्हणून चोरगे यांच्या हॉटेल मधे गेलो. आज पर्यंत जितक्या वेळी कोल्हापूरला गेलो आहे, त्तितक्या वेळी हा क्रम म्हणजे आधी दर्शन, आणि नंतर ब्रेकफास्ट मिसळ पावाचा हा कधीच चूकलेला नाही. चोरगे यांचं एक लहानसं हॉटेल आहे, पण इथली मिसळ छान असते. मंदीराजवळच अजून एक झाडाखाली पण मिसळचं हॉटेल आहे ( वर्कशॉप शेजारी)  तिथली पण मस्त असते मिसळ. चोरगेंच्या दुकानतली मिसळ  चांगलीच चमचमित होती.

मिसळ आणि स्लैस ( स्लाईस नाही स्लैस )

दोनदा एक्स्ट्रॉ रस्सा घेतला, कांदा पण एक्स्ट्रॉ घेतला ( तिथे एक्स्ट्रॉ रस्सा घेतल्यास एक्स्ट्रॉ पैसे द्यावे लागतात. प्रत्येकच जण एक्स्ट्रॉ रस्सा घेतातच, त्या पेक्षा सरळ भाव वाढवून का टाकत नाहीत चोरगे? हा प्रश्न आहेच )खाऊन झाल्यावर , बिसलेरी मागितलं. तर ते नव्हतं. त्या ऐवजी मग कोल्ड ड्रिंक.. तिथे चहा मिळत नाही. फार पुर्वी एकदा याचं कारण विचारलं होतं, तेंव्हा चोरगे म्हणाले होते, की लोकं येऊन एक कटींग चहा घेऊन तास भर गप्पा मारत बसतात म्हणून चहा ठेवलेला नाही इथे. सही नां.. मी तर आवाक झालो.. अहो त्यांची , जागा फार लहान आहे, तेंव्हा लोकं नुसते बसले तर उगाच जागा अडून रहाते. माझी आवडती जागा कोल्हापूरची .

खर्डा आणि घाटी मसाला ..

कोल्हापूरला गेल्यावर एकदा तरी घरगुती व्हेज जेवणासाठी वुड हाऊस या हॉटेल मधे गेल्याशिवाय राहिलो नाही. बांबुच झोपडी वजा बांधलेलं हॉटॆल होतं हे पूर्वी. समोर टेबल, आणि आत हात धुवायला गेलो कीचुलीवर भाकरी शेकणाऱ्या बायका दिसायच्या.

वुड हाऊस मधे काही मजा राहिली नाही पूर्वी सारखी..

या वेळी त्या झोपडीच्या जागी मोठी बिल्डींग उभी राहिलेली दिसत होती. आत   गेलो आणि टेबल वर बसलो तर  तोच चिरपरिचित मिरचीचा खर्डा आणि लाल तिखट समोर आणून ठेवलं  टेबलवर. जेवायला ठरलयाप्रमाणे कांदा बेसन आणि मटकी मागवली. भाकरी मिळणार नाही असे मालकांनी सांगितले, म्हणुन शेवटी चपातीच मागवली.

दही मडकं  मागवलं आणि ते मात्र एकदम   पूर्वी सारखंच होतं. जेवण झाल्यावर एक  निर्णय घेतला की ही वूड हाउसची  शेवटची  भेट. चूल गेल्यावर गॅस वरचा स्वयंपाक – म्हणजे वुड हाऊस ची यु एस पी ( चुली वरचा स्वयंपाक )गेली. एकदम सामान्य वाटलं जेवण. सर्व्हिस पण   खूपच वाईट.

एक शेवटची गम्मत बघा. मुंबईला परत येतांना वनपत्रे बं धूंच्या दूसर्या हॉटेलात थांबलो. तिथे एक फोटॊ होता.. खाली दिलाय बघा…. गॉगल लावून जेवणारा…. आवरा…… म्हणायची वेळ आलेली  आहे. या वेळेस पोकळा+ भाकरी आणि जयसिंगपूरचा भडंग , दिपकचा चिवडा राहिलाच  खायचा.

हा थ्रेड  आता मी  कोल्हापूरकरांकडे सोपवतो.  अजून काही चांगल्या जागा असतील तर नक्की अपडेट करा .