मुक्त विचार…

Written by  on January 25, 2003

आजचे पोस्ट म्हणजे मुक्त विचार. एका विचाराच्या अनुषंगाने येणा्रे सगळे विचार इथे मांडतोय.

सावित्री बाई फुले.

आमच्या घरी एक नागपूरला असतांना एक बाई धुणे भांडी करायला यायची. तिचा नवरा सायकल रिक्षा चालवायचा. स्वतःची प्रॉपर्टी म्हंटलं तर रिक्षा आणि कार्पोरेशनच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली एक झोपडी . पाच मुलींची आई असलेली ती बाई जेंव्हा यायची तेंव्हा तिच्या पाचही मुली वय वर्ष दोन ते ७ च्या दरम्यानच्या तिच्या मागे एखाद्या बदकाच्या मागे पिल्लं यावी तशा यायचा.अंगावर नवऱ्याने केलेल्या  मारहाणीचे डाग असले तरी ते अभिमानाने दाखवायची, म्हणायची, नवरा आहे हो, मारणारच, मुलगा होत नाही म्हणून- म्हणजे पाच वेळेस मुलगी झाली हा तिचा दोष , आणि हे तिलाही मान्य होतं! खरं तर मुलगा किंवा मुलगी होणं हे पुरुषावर   अवलंबुन असतं पण विचार कोण करतो? त्या साठी स्त्री ला दोषी समजणे ही पण  एक परंपराच आहे .  तिने एक दिवस येऊन सांगितले, की  पुन्हा दिवस गेले  आहेत, आणि तिने कामाला  येणे बंद केले.  वंशाला दिवा हवा होता त्याला.

वंशाला दिवा म्हणजे नेमकं काय असतं हो?  त्या रिक्षावाल्या कडे अशी कोणती मोठी प्रॉपर्टी होती? त्याला काय रिक्षासाठी वारस हवा होता की काय?  त्या माणसाची मुलासाठी होणारी जिवाची घालमेल पाहून खरंच नेहेमी आश्चर्य वाटायचं. गरीब असल्याने गर्भजल परिक्षा वगैरे काही केलेली नसल्याने प्रत्येक वेळी मुलाच्या अपेक्षेने चान्स घ्यायचा आणि नंतर मुलगी झाली, की तिची हेळसांड करून मारहाण करायचा.

पुरातन काळापासून हाच प्रकार सुरु आहे. केवळ अशिक्षित स्त्रीच्या च नव्हे तर चांगल्या शिकलेल्या लोकांच्या बाबतीतही हल्ली गर्भजल परीक्षा करून मुलगी असल्यास गर्भपात करण्याचे प्रमाण फार वाढले आहे.  लोकांना मुली का नको असाव्या? काय बरं कारण असेल? केवळ पूर्वापार चालत आलेले संस्कार?

दूर कशाला, एकदा नागपूरला आम्ही सगळे सासरी जमलो असतांना  जेंव्हा कोणीतरी त्यांच्या ओळखीचे पाहूणे आले होते. त्यांनी विचारलं, कोणाला किती मुलं आहेत? यावर सासूबाईंचे उत्तर मोठे मार्मिक होते, दोन्ही मुलांना एक मुलगा आणि एक मुलगी, पण मुलीला (म्हणजे सौ.ला) दोन्हीही मुलीच आहेत हो. या मधल्या ’मुलीच” ह्या शब्दावर अनावश्यक दिलेला जोर, आणि त्या मूळे एकदम हताशपणा डोकावत होता . त्यांचा तो बोलण्याचा सूर अजूनही लक्षात आहे माझ्या.

जगातल्या कुठल्याही सुखा पेक्षा अपत्य प्राप्तीचे सूख सगळ्यात मोठे आहे.अपत्य प्राप्तीचे सूख म्हणजे एक भावनिक गरज असते. स्त्रियांच्या बाबतीत तर ती खूपच आवश्यक असते, आणि पुरुषाच्या बाबतीत  तर मुलं होणं म्हणजे त्याच्या पुरुषत्वाचा विजय असतो . काही कारणाने जर या अपत्य सुखांपासून वंचित रहावे लागले तर होणारा मानसिक क्लेश हा असह्य असतो. एखाद्या अपत्य नसलेल्या दांपत्या कडे  पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. मंगल कार्यात एखाद्या  प्रसंगी ’तिला’ दिल्या जाणारी वेगळी वागणूक तर स्त्रियांच्या डोळ्यातून हमखास पाणी काढते.

फार पूर्वीच्या काळी स्त्री ला कायम कोणावर तरी अवलंबून रहावे लागायचे. ब्राह्मण समाजात तर विधवा स्त्रीचे आयुष्य अगदी खूप वाईट असायचे. पुनर्विवाह करण्याची परवानगी नाही, केशवपन, आणि नंतर लाल आलवण नेसून आयुष्यभर काबाड कष्ट करायचे. त्या स्त्रीवर इतके मानसिक अत्याचार केले जायचे, की तिला ब्राह्मण समाजात जन्म घेतल्याचा पश्चाताप होत असेल का हा प्रश्न नक्कीच पडतो. इतर समाजात पुनर्विवाह चालायचा, पण ब्राह्मण समाजात स्त्रियांची परिस्थिती फार वेगळी होती. पती निधनानंतर नात्यातल्या जवळच्याच कुठल्यातरी पुरुषाबरोबर शारिरीक  संबंध येऊन दिवस गेले तर  , तर तिलाच वाईट चालीची म्हणून मारून टाकले जायचे.  सावित्रीबाई फुल्यांनी   ब्राह्मण  स्त्रियांसाठी इतकं मोठं कार्य करून ठेवलं आहे , की आजच्या स्त्रियांनी पण त्यांचे आभार मानायलाच हवे.

राजकीय नेत्यांनी पोलिटिकल गेन साठी  सावित्री बाईं सारख्या दृष्ट्या समाज सुधारक स्त्रीला पण   जातीच्या दावणीला बांधलेले आहे, आमच्या जातीतल्या म्हणून त्यांचे आम्ही आदर करणार, अशी मनोवृत्ती पण दिसून येते. म्हणूनच सावित्री बाई फुले  फक्त “एका” समाजाच्या झाल्या आहेत. त्यांच्यावर हक्क फक्त आपलाच आहे अशी विधाने राजकीय हेतूने केली जातात. आजच्या समाजाला त्यांनी  ’ त्या काळी” काय काम केलेले आहे याबद्दल अजिबात काही माहिती नाही.

ब्राह्मण समाजात सावरकर जितक्या आत्मियतेने वाचले जातात तेवढे सावित्री बाईंच्या बद्दल का बरं वाचलं जात नाही?  कदाचित  काही  ब्राह्मण द्वेष्टा संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांकडून    सावित्रीबाई आमच्या , म्हणून सारखे  त्यांच्या फोटोच्या आड दडून  ब्राह्मण  द्वेषाचे  विचार     मुद्दाम   पसरवले जातात , त्या मूळे हा फोटो दिसला की त्याच्या खाली ब्राह्मण समाजाला शिव्या घातल्या असतील असे वाटते, कदाचित म्हणून वाचावेसे  वाटले  नसतील का?  समाजाचं मन फार हळवं असतं, असं सारखं कुठेतरी काही तरी लिहिलेले वाचून आपले विचार बनवत असतं.   सावित्री बाईंना ’त्यांच्या कडून  ” आजही सपत्न वागणूक दिलेली दिसते, कारण त्यांनी जे काम केलं, त्याचा फायदा ब्राह्मण समाजाला जास्त झाला हे तर नसेल?.   सहज मनात आलं म्हणून लिहितोय,  सावित्री बाईंचा फोटो जर आज ब्राह्मण स्त्रियां समोर ठेवला तर किती स्त्रिया त्यांना ओळखू शकतील?? जर सावित्रीबाई नसत्या  तर ’लाल आलवणातल्या ’ ब्राह्मण स्त्रियांना त्यातून बाहेर पडायला कित्येक वर्ष लागली असती. असो विषयांतर होतंय.

सावित्री बाईंच्या बद्ल विकीपिडीया वर हे असे लिहून ठेवलेले आहे.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. लहानपणीच लग्न झालेल्या अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर एकतर त्यांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.

समाजातील इतर जाती मधल्या स्त्रियांची   परिस्थिती, ब्राह्मण स्त्रियांच्या  इतकी वाईट नसली, तरीही  फारशी चांगली नव्हती.  क्षत्रीय समाजात तर लढवय्या हवा, म्हणून मुलाच्या जन्माला मुलीपेक्षा जास्त महत्व   होते. आज लढाया संपल्या पण मानसिकता तशीच आहे अजूनही.

अनादी काला पासून सगळ्या धर्मांत लग्न हे संभोग सुखासाठी नाही तर वंश वृद्धी साठी करायचे अशी शिकवण  असायची.  प्रत्येकाला (हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन) ७-८ अपत्य तरी असायचीच.मुलं जन्माला तुम्ही घालता  ते केवळ परमेश्वराची इच्छा. तुम्ही तुमचे काम करा, संगोपना बद्दल पण  हे स्त्रीचेच काम आहे, असे प्रत्येकच धर्मात तिच्या मनावर ठसवले जाते. मुलं जर दोघांचीही आहेत, तर संगोपन केवळ स्त्रीने का करायचे हा प्रश्न  कधीच कसा   कोणाला  पडलेला नाही.?मुलींच्या संगोपना कडे नीट लक्ष दिले नाही की , मग   त्यापैकी काही मुली कुठल्या तरी आजाराने मृत्यूमुखी पडायच्या. घरामधे मुलीचा जन्म म्हणजे “एक जबाबदारी”  अशी मनोवृत्ती वाढण्याचे कारण म्हणजे मुलींचे समाजात सुरक्षित नसलेले स्थान.

युद्धासाठी, शेती मधे काम करण्यासाठी, पुरुषांची गरज ही असायची, म्हणून प्रत्येक घरात जास्तित जास्त मुलं झालेली बरी अशी भावना लोकांच्या मनात रहायची . मुलगा झाला म्हणजे घरात कामासाठी दोन हात वाढले, तलवार ढाल घेऊन घराचे संरक्षण करण्यास दोन हात वाढले, अशी मानसिकता त्या काळात होती, म्हणून एखाद्या स्त्री च्या पोटी मुलगा झाला की जास्त आनंद सिलेब्रेट केला जायचा. मुलींची हेळसांड करण, मेली तर बरी, म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करणं, असे प्रकार तर आजही पहायला मिळतात. कुठल्याही युद्धाच्या प्रसंगी सर्वप्रथम जेता हा त्या जिंकलेल्या भागातल्या स्त्रियांनाच आपल्या वासनेचे शिकार बनवतो.   स्त्रियांची सामाजिक असुरक्षितता आणि  योनीशूचितेच्या  व्हिक्टोरियन काळातल्या  कल्पना हे कारण पण असेल मुलींच्या जन्माला रोखण्याचे.

हल्ली बराच बदल झालाय वरच्या परिस्थिती मधे असे तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्ण पणे चूक आहे. स्त्रिया सुशिक्षित झाल्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने पैसे कमावतात,  पण स्त्री मधे  मातृत्त्वाची भावना, म्हणजेच आई होण्याची तीव्र इच्छा  एकदा वाढीस लागली की मग ती नोकरी सोडण्यासाठी पण तयार होते.  नोकरी सोडल्यावर साहजिकच घरातले इनकम कमी होतं, पण तो त्याग करायला पण स्त्रीया तयार असतात.  दोघांचेही मुल असले, तरीही रात्री बेरात्री मुलं रडल्यास , रात्रभर जागून त्याला कडेवर घेऊन फिरवणे, नॅपी बदलणे, स्वच्छ करणे वगैरे ही कामं सगळी स्त्री ची असतात. पुरुषांना कधी बाळाची नॅपी बदलून बाळाची शी  स्वच्छ करतांना पाहिलंय का? पुरुष फक्त मुलाला तो हसरा असतांनाच कडेवर घेऊन खेळतो, पण एकदा मुलं रडू लागलं, की” अगं,ह्याला   बघ बरं का रडतोय तो” म्हणून सरळ बायकोकडे देतो.   असो, याचे कारण म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या विचारांमधे असावे. सहज गम्मत म्हणून विचार आला ’  आनुवंशिक विचार म्हणायचं का याला”?

प्रत्येकालाच  आपण वृद्ध झाल्यावर मरणार,आणि मग आपल्या पश्चात आपल्या मागे  काय रहणार याची (विनाकारण) काळजी वाटत असते. या शाश्वत जगात, आपल्या अशाश्वत आयुष्याची  कुठल्या ना कुठल्या स्वरूपात   निशाणी   सोडून जायची इच्छा असते.  काही लोकं, या अशा मानसिकते  मधला फोल पणा समजून , मुलींना पण मुलांच्या इतकंच प्रेमाने वाढवतात, मोठं करतात ,शिकवतात हे जरी खरे असले, तरी बहुसंख्य लोकं  मात्र पूर्वापार चालत आलेली  संकल्पनांची जोखडं मानेवर  अभिमानाने  वागवत “वंशाच्या दिव्या”  साठी   पुन्हा पुन्हा प्रयत्न करत रहातात.

काही कर्तृत्ववान लोकं  जसे स्वामी विवेकानंद, विदा सावरकर,  सावित्रीबाई फुले वगैरे मात्र या मनोवृत्तीवर ओव्हर राईड करून  आपल्या मृत्यु नंतर आपली छाप आपण केलेल्या  कामाने सोडून जातात,  आणि उरलेले ……….??  

हा लेख थोडा भरकटला आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, पण तरीही मी हा पोस्ट करतोय.स्त्री भ्रूण हत्या हा विषय घेऊन लिहीणे सुरु केले होते, पण लिहित असतांना  लेखाच्या अनुषंगाने बरेच बरेच  विषय मनात जसे जसे येत गेले ते तसेच लिहत गेलो. मन चक्क भरकटू दिलं जसे हवे तसे पब्लिश तर करतोय, पण …. डिलिट करावा  का? हा विचार मनात ठेऊन..

उंदरावलोकन -(उत्तरार्ध)

Written by  on January 24, 2003

एकदा वजन वाढणे सुरु झाले की  मानसिकता एकदम बदलून जाते. रस्त्यावरून चालत जाणारा एखादा बारीक माणूस दिसला की आपल्याला खूप  इन्फिरिअरीटी कॉम्प्लेक्स येतो, आणि  एखादा जाडा माणूस दिसला की मग आपण ‘त्याच्या इतके ‘ जाड आहोत की ‘त्याच्यापेक्षा कमी’ ह्याचा हिशोब मनातल्या मनात लावून स्वतः कसे दिसत असू याचा विचार सुरु होतो. सोबत बायको असेल तर, ” अगं मी त्याच्या इतका जाड आहे कां? म्हणून विचारलं जातंच..

मित्र पण ’काय रे, किती फुगला आहेस?”थोडं वजन कमी कर.. म्हणून सल्ला देतात. हे सल्ला प्रकरण पण खूप मजेशीर असतं. आता  असे सल्ले मला दिले तर माझी  काही हरकत नाही- हवे तेवढे द्या, पण सल्ला दिला जातो माझ्या बायकोला,  तिने बनवलेली मस्तपैकी कांदा भजी खात, ” वहिनी, याला  तळलेलं अजिबात देऊ नका! किती जाड झालाय हा, याला वजन  कमी करण्यासाठी तळवलकरांकडे का पाठवत नाही तुम्ही??  आणि अजून वर पुन्हा “अहो , वहिनी, सांगतो, माझा एक जवळचा मित्र नुकताच हार्ट अटॅक ने गेला. फक्त ४५ चा होता..” हे असं काही ऐकलं की मग झालं!! मला  एकदम समोर  दुधी, शेपू वगैरे समोर दिसणं सुरु होतं,  सकाळी बेड टी ऐवजी दुधी चा किंवा कारल्याचा रस….बायकोने एकदा   मनावर घेतले की  मग काही खरं नाही ..

इतके सांगून थांबेल तर तो मित्र कसा??   बायकोला सांगतो , की त्याच्याकडे जेन फोंडाची, बाबा रामदेव ,  शिल्पा शेट्टीची  योगा, ऍरॊबिक्सची सिडी आहे ती देतो,  आणि वर पुन्हा एक सल्ला पण…. ही सिडी   बघून  जरा व्यायाम करवून घ्या याच्या कडून. हे सगळं करत असतांना स्वतः ओव्हर वेट असल्याचे सोयिस्कर पणे विसरतो तो. (  ती सिडी अशीच कोणीतरी त्याच्या बायकोला दिलेली असते 🙂  – म्हणजे आता मला पण कोणी तरी बकरा बघायला हवा की ज्याच्या गळ्यात ही सिडी मारता येईल मला).

वजन कमी करण्याचा हमखास उपाय म्हणजे ,   रोज सकाळी तास भर ब्रिस्क वॉक करून ये  हा सल्ला तर हमखास सगळेच जण देतात.  आता तुम्हीच सांगा,  मस्त पैकी हिवाळ्यात   सकाळी अंथरूणात पांघरूण घेऊन पडून रहायचं की सकाळी  उठून  फिरायला जायचं??  लोकांना काय सांगणं सोपं असतं, पण खरंच फॉलो करणं इतकं का   सोपं असतं का ते?

शेपू हे गवत नसून भाजी आहे याचा शोध लावणाऱ्याचा निषेध…

एका मित्राने सांगितले की ,  याचं  खाणं कमी करा हो, किती खातो हा माणूस. याचा ब्लॉग वाचता का तुम्ही? त्यावर बघा काय काय लिहित असतो ते, आणि टुरवर असतांना काय  काय खात असतो ते. माझं तर नुसतं वाचून वजन वाढतं. (आयला, बोंबला, मी मनातल्या मनात त्याचा उद्धार करतो ) ब्लॉग बद्दल काही सांगितलं ह्याने , आणि तिने खाद्ययात्रा बघीतले तर?? कैच्याकै.. अंगावर काटा येतो माझ्या .

एका मित्राने तो जगप्रसिद्ध जनरल मोटर्स चा डायट प्लान पण इ मेल ने पाठवला.  त्यामधे कितीही प्रोटीन्स खाल्लेले चालतात, पण फक्त कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती, भात वगैरे खायचे   नाही असा प्लान आहे तो.  पहिल्या दिवशी कितीही फळं खा, दुसऱ्या दिवशी भाज्या, नंतर तिसऱ्या दिवशी भाज्या आणि फळं , नंतर वंडर सुप डिझान्ड बाय जीएम, नंतर चिकन  ……….वगैरे वगैरे.. प्लान आहे तो. तर दुसऱ्या एकाने काही मित्र स्वतःचे   “सेल्फ डिझाइन्ड”   डायट प्लान्स  – म्हणजे स्प्राऊट्स खा, हवे तितके  वगैरे वगैरे.

स्वामी राजरत्नानंदांनी तर चक्क एक रेसीपी पण पाठवली आहे माझ्या फेसबुक वर इथे खाली पोस्ट करतोय. नवीन डाएट चीकन रेसीपी १ KG चीकन + २/३ लहान कांदे मोठ्या फ़ोडी + ५/६ लसूण पाकळ्या ठेचून + ४-४ लवंग,वेलची + 5/ 6 मीरे ठेचून +१ चमचा हळद +2 चमचे tomato saus + चवी पुरते मीठ + १/४ ली. पाणी……सर्व कूकर मधे टाकून १ शिट्टी .

कूकर उतरवून चिकन  वेगळे खाणे.”ईतर पाणी मिक्सर मधून काढून १/२ चमचा बटर टाकून “मुलांना” त्यात Noodles करून देणे .” आता  ही रेसीपी वाचल्यावर मनात आलं की त्याला विचारावं, की  शुद्ध शाकाहारी  घरी जर चिकन आणलं तर  बायको राहील का घरात?? या वयात दुसरी बायको कुठून आणू रे बाबा?कधी मासे खाऊन  घरी गेलो आणि चुकून सांगितलं, तर चक्क दोन दिवस तिला वास येत रहातो  माशाचा..

दुधी.. झाडावरच कित्ती छान दिसतो नाही का? कशाला उगीच तोडायचं त्याला??

मी सध्या दुधी पालक, काकडी ,मेथी, कच्ची कोबी,  गाजर या सगळ्या भाज्या – त्यातल्या बऱ्याचशा कच्च्या- सारख्या खात असतो  , त्यामुळे मला बरेचदा आपण बोलायला तोंड उघडलं की तोंडातून बें बें…बें..बें.. असा बोकडासारखा आवाज येईल का याची शंका येते.  असं होऊ नये म्हणून बाहेर तंदूरी चिकन फिश वगैरे खाणं सुरु ठेवलंय.

फेसबुक वर कुठलं तरी डीस्कशन सुरु होतं, तेंव्हा  सात्त्विक संतापाने  एका मित्राला म्हंटलं आता वजन कमी करतोय म्हणून. तर म्हणे “त्यात काय मोठं?  कोणीही कमी करेल.” म्हंटलं, “तू   शेपू  दुधी वगैरे   भा्जी दररोज  खाल्ल्या आहेस का  कधी??”तर म्हणे “ह्या तर माझ्या आवडत्या भाजी रोज खातो मी!” काय  बोलणार? विनोद म्हणून ठिक आहे, पण खरंच खायची वेळ आली की समजते !

बरं जास्त खाल्लं की वजन वाढतं, मग यावर पण  एका मित्राने उपाय सांगितला आहे, म्हणतो की
बिरबलाच्या ( वाघ आणि शेळी च्या ) गोष्टी प्रमाणे हॉटेल मधे जेवता~ना वाटीला टेकून बायकोचा फ़ोटो ठेव, मग ..गोवा, बडोदा..मासे ,चीकन,प्राठा बीर..कश्या कश्याचा परिणाम होणार ना ही !!!!!  🙂  काय म्हणू यावर?

जास्त वजनामुळे होणारे  प्रॉब्लेम्स  तर खूप आहेत. शेअर   रिक्षा मधे बसताना, तुम्ही आत शिरलात की आत बसलेले दोघं जण एकदम अंग चोरून घेतात, तुम्हाला मागच्या सीटवर पाठ टेकवून बसता येत नाही, कायम समोर सरकून बसावे लागते ( गुडघे समोरच्या पार्टीशनला लागून रिक्षा खड्ड्यातून गेली की खूप दुखतात 😦  ).  बरं हे तर ठिक आहे, पण सगळ्यात  जास्त इनसल्टींग  -जर एखादी स्त्री शेजारी असेल , आणि जर ती अजून जास्त अंग चोरून बसली की तर तुम्हाला अगदी थोबाडीत मारल्यासारखं होतं.  थोडं जास्त चालणं झालं की दम लागणे किंवा पाय दुखणे हे तर नेहेमीचेच होऊन बसते, कितीही कमी अंतर असलं तरीही रिक्षा किंवा बसने जावेसे वाटते. एकटं असलं की ते सहज शक्य होतं, पण कोणी सोबत असला की लगेच.. अरे इथेच तर आहे, जाऊ  या चालत म्हटलं की  जाम वैताग येतो.

हे सगळं काही मान्य, पण पुर्वी बायको बरोबर एकदा लग्नाला गेलो असतांना “ही तुमची मोठी मुलगी का?” म्हणून पण एकाने विचारले होते.  हा प्रश्न ऐकला आणि माझे एकदम सार्वजनिक वस्त्रहरण झाल्याप्रमाणे अवस्था झाली.    वर्षापुर्वी   तिला  लोकल मधे एका आजींनी  तुझे बाबा काय करतात? माझा मुलगा लग्नाचा आहे म्हणून चौकशी करते आहे असं म्हणाल्या होत्या. हे असं व्हायला लागल्यावर वजन कमी करायलाच हवे  हा विचार हळू हळू पक्का होत गेला मनामधे.(फक्त विचारच बरं कां, त्यावर काहीच ऍक्शन घेतली नव्हती ) … पण आता मात्र नक्की ठरवलंय की वजन कमी करायचेच , अगदी काहीही- डायटींग जरी  करावे लागले तरी बेहत्तर!

माझ्यासारख्या माणसाला मात्र कमी खाणं हे शक्य होत नाही, आणि नुसतं भाज्या फळं खाऊनही राहणं सुद्धा  शक्य होणार नाही हे माहीती असतं,   आणि आता वजन कमी करणे खरंच आवश्यक आहे हे लक्षात आलेलं असतं, म्हणून स्वतःचा  डायट प्लान  करून  सुरु करायचं  ठरवतो  . हे सगळं काही ,एक तारखे पासून नवीन वर्षाचे रिसोल्युशन म्हणून सुरु करावे हे सगळे असं वाटत होतं, पण मग जर करायचे आहेच, तर मग एक तारखेची तरी कशाला वाट पहायची ?? म्हणून सरळ त्याच दिवसा पासून हे सगळं सुरु केलं.  ती तारीख होती १५ डिसेंबर.

धुळ झटकली बरं कां…

पलंगा्खाली पडलेले डंबेल्स , बुलवर्कर, आणि क्रंचेस हेल्पिंग स्प्रिंग काढली.  त्यावरचे सगळे जाळे स्वच्छ केले, मला वाटतं की सगळ्यांच्याच घरी ही व्यायामाची उपकरणं अशीच कधी तरी बाहेर निघत असावीत. माझ्या बहीणी कडे एक सायकल आहे व्यायामाची, तिचा उपयोग फक्त कपडे वाळत घालायलाच होतो ,एका मित्राकडे ट्रेड मिल आहे, तिचा उपयोग पण फक्त टॉवेल वाळत घालायलाच होतो. 🙂 जर वाचत असशील हे पोस्ट तर काढ बाहेर लवकर सगळं.

दुसऱ्या दिवशी पासून  सकाळी उठून योगा अर्धा तास, थोडं फार वेट्स आणि बुलवर्कर करणे  सुरु केले. तसेच जर वजन कमी करायचं  म्हणजे  जिभेवर ताबा ठेवायलाच हवा,  म्हणून साखर , भात आणि बटाटा पुर्ण पणे बंद केले . सकाळचा चहा पण बिना साखरेचा ! 😦  स्प्राउट्स सॅलड्स, आणि बॉइल्ड एग व्हाईट हे  मुख्य जेवण झाले. समोसा, बटाटेवडा  भजी ,पाणीपुरी , आणि  तर्री मारलेली मिसळ एकदम बंद!!!  😦  हुश्श किती हा ताबा ठेवायचा.

१५ डीसेंबरचा ब्रेकफास्ट… अंड्यातलं पिवळं बलक गेलं.. 😦

हे सांभाळणं घरी असतांना सहज शक्य होते. पण माझा जॉब फिरतीचा, तेंव्हा एकदा टु्र ला गेलं की मग कसं करायचं?? हा एक मोठा प्रश्न समोर होताच.  यावर पण एक उपाय  शोधून काढलाच. सकाळी ब्रेकफास्ट एग व्हाईट , दोन टोस्ट , आणि फ्रेश फ्रुट्स.. लंच मधे दाल , चिकन क्लिअर सुप, आणि एक किंवा दिड रोटी.  अर्थात प्रत्येक जेवणात सॅलड तर मुख्य भाग असतोच पण जेवल्याचे समाधान काही होत नाही. अहो भात खायचा नाही म्हटलं की जेवण झाल्यासारखे वाटतच नाही- शेवटचा दहीभात खायचा नाही म्हणजे काय चेष्टा आहे काय?? पण करतोय बिचारा ’मी’ मॅनेज सगळं!  संध्याकाळी जर भूक लागलीच तर    दोन तिन  मारी बिस्किटे आणि बिना साखरेचा चहा. ..

–आणि कळवण्यास आनंद वाटतो की हे सगळं केल्यावर मात्र वजन कमी होतंय. पॅंट्स कंबरेवर थोड्या लुझ होणे सुरु झाले आहे…. Still miles to go…

अपर्णा म्हणते की या पोस्ट चे नांव दरावलोकन हवे होते उंदरावलोकना ऐवजी.

लक्षणं प्रेमात न पडलेल्यांची…

Written by  on January 19, 2003

मागच्याच शनिवारी प्रेमात पडलेल्यांची लक्षणं यावर लिहलं होतं ,तेंव्हा सिध्दार्थ आणि इतर बऱ्याच लोकांचं म्हणणं पड्ल की प्रेमात न पडलेल्यांची लक्षणं, यावर पण एक लेख होऊ शकतो.. आणि कल्पना स्ट्राइक झाली.. !!! अरे हो.. खरंच होऊ शकतो.. म्हणून इथे आज इथे काही थोडी फार जी काही लक्षात येतील ती लक्षणं लिहितोय. जरी ही लोकं प्रेमात पडलेली नसली तरीही यांची प्रेमात पडण्याची मनापासून इच्छा असते.. अगदी शक्य तितक्या लवकर आपण कोणाच्या तरी , आणि कोणीतरी आपल्या प्रेमात पडावं असं सारखं वाटत असतं..

अजूनही सिल्व्हासलाच आहे, आणि आज थोडा कमी वेळ आहे, साईटला जायचंय म्हणून लवकर आटोपतो हे पोस्ट. इथे कॉमेंट्स मधे तुम्हाला ऍड करायला भरपूर स्कोप आहे, सुटलेले मुद्दे.

१) या लोकांना सुटीचा दिवस म्हणजे ट्रेकिंग चा दिवस असा समज असतो. (दुसरं काही करण्यासारखं नसल्यामुळे)
२)ट्रेकिंग ला जातांना   नेहेमी चांगल्या मुली असलेला ग्रुप जॉइन करण्याकडे  यांचा कल असतो, पण प्रत्येकच जण नशिबवान असतो असे नाही बरं कां.
३) नेहेमी सोबत ट्रेक ला येणारी ती एकमेव सुंदरी आपल्याकडे पाहिल आणि आपल्यावर प्रेम करायला लागेल असे याना सारखे वाटत असते.
४) ट्रेकर्स बद्दलचे एक पोस्ट वाचले होते कुठेतरी.. त्यावरचे सगळे मुद्दे यात घेतले तरीही चालती.
५) संध्याकाळी ऑफिसमधुन आल्यावर तयार होऊन लक्ष्मी रोडला किंवा झेड ब्रिज वर जाउन टाइम पास (मुलींकड पहाणं) करणे यांना आवडते.
६)कपड्य़ांच्या बाबतीत अती सेन्सेटीव्ह असतात हे लोकं. आपण व्यवस्थित राहिलं, खुप चांगले कपडे घातले की आपल्याकडे मुली बघतील अन आपल्यावर प्रेम करु लागतील असा यांचा उगाच ’ गैर समज ’असतो.
७)संभाजी पार्कातल्या झाडामागे बसलेल्या लोकांच्याकडे बघून एखादा बेंच वर एकटाच उसासे टाकत बसलेला ’बघ्या’ दिसला की समजावं की तो एकटाच आहे.. प्रेमात न पडलेला
८) ’बघे’ गिरी करायला यांना  खूप आवडतं. कुठेही एखादं प्रेमी युगुल दिसलं की त्यांच्या कडे पहात रहाणे हे एक लक्षण..
९)प्रत्येक गर्ल नेक्स्ट डोअर कडे पहात रहाणं.. ती कधीतरी आपल्याकडे पाहिल म्हणून एक अपेक्षेने हा यांचा सगळ्यात आवडता पास टाईम!
१०) काहीच काम नसेल तर , गर्ल्स कॉलेजच्या आसपास  नेहेमी भटकत रहाणारा एखादा दिसला, की त्याला प्रेमात पडण्यास इच्छुक समजायला हरकत नाही.
११) मुलींच्या समोरून बाइकवर खूप फास्ट निघून विनाकारण ऍक्सिलरेटरचा आवाज करित  जाणारा..
१२) बाईक वर व्हिली करणे.. स्पेशली सिग्नल ला उभं असतांना एखादी सुंदरी शेजारी उभी असेल तर , व्हिली करून पुढे निघून जाणारा दिसला .. की तो प्रेमात न पडलेला हे नक्की. (व्हिली म्हणजे मागच्या एका चाकावर बाइक चालवणे)  अशी सर्कस करुन मुलींचं आपल्या कडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारा …
१३)एखाद्या घरासमोरच्या टपरीवर बाइक स्टॅंड वर न लावता,बाईक वरुन न उतरता  – हातात कटींग चा कप घेउन , समोरच्या घरातली मुलगी बाल्कनी कडे डोळ्यात प्राण आणून  ’ती” कधी बाहेर  येते   ह्याची वाट पहात  उभा असलेला..
१४)कॉलेज मधे बाइक खूप फास्ट चालवत फिरणारा.
१५) बस स्टॉप वर उभा असणारा, आणि समोरून ’रिकामी’ जरी गेली तरीही ती न पकडणारा, आणि भरलेली बस केंव्हा येते याची वाट पहात बसास्टॉप वर उभा असलेला (??)
१६) एखादी सुंदर मैत्रीण लग्न करून गेली, की तिच्या  नवऱ्यावर  मग बंदर हाथ मे अद्रक सारख्या कॉमेंट्स   पास करणारा

१७)समोरुन एखादी मुलगी आली की तिची उंची अन आपली उंची कम्पेअर करुन ती आपल्याला ’सुट’ (??) होते कां?? याचा विचार करित वेळ काढत असतात.
१८)मित्रांच्या बरोबर टिपी  करण्यात वेळ घालवणारा. ( यांचे मित्र पण प्रेमात वगैरे न पडलेलेच असतात :))

१९)ऑर्कुट , फेस बुक अशा ठिकाणी  कायम ’पडीक’ असणारे.
२०) ऑर्कुटवर कायम मैत्रीणी शोधात असलेले .  दिसला सुंदर मुलीचा   प्रोफाईल की तिला फ्रेंड्शिपची रिक्वेस्ट पाठवणारे.
२१)ऑर्कुटवर आपल्या ’जातीच्या’ कम्युनिटीज जॉइन करणारे.. जसे ब्राह्मण असेल तर देशस्थ ब्राह्मण, मराठा असेल तर ९६ कुळी मराठा, किंवा सारस्वत, कोकणस्थ असेल तर ती कम्युनिटी. कमीत कमी इथे तरी एखादी मुलगी भेटेल आणि आपल्यावर प्रेम करु लागेल अशा भाबड्या आशेने दिवस कंठणारे..
२२)मुलींचे फेसबुक प्रोफाइल्स ( मग ज्यावर अगदी ऐश्वर्या रायचा फोटॊ असलेला प्रोफाइल पण) चेक करणं, आणि मग त्यांना ओळख नसतांना पण  फ्रेंड्स रिक्वेस्ट टाकणारे .
२३)ऑफिसमधली सुंदर मुलगी दिसली की तिच्या अवती भोवती रुंजी घालत फिरणारे, तिची सगळी कामं आपण होऊन करणारे सुरु होतं, आणि आपणच कसे मोस्ट एलिजिबल बॅचलर आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न करणारे.
२४) ऑफिस मधली प्रत्येकच सुंदर मुलगी इथे काम करायला नाही, तर आपल्या प्रेमात पडायला आलेली आहे असा समज करुन ’तसे’ प्रयत्न करत रहाणारे!  अर्थात मुलींना पण सगळं कळंत असतंच, त्यामुळे या मधे फारसा काही फायदा होत नाही, पण विक्रमादित्या प्रमाणे  कायम प्रयत्न करीत रहाणारे.

२५) यांचे मोबाइल कधीच एंगेज लागत नाही. कुठल्याही ट्रेकला येण्यासाठी हे कायम तयार असतात.

२६) शनीवार आला, की रवीवारच्या ट्रेकची तयारी  सुरु करणारे.

२७) एखाद्या मित्राचे लग्न वगैरे ठरले की मग त्यामधे हमखास जाऊन प्रत्येक सुंदर तरूणी कडे अपेक्षेने  पहात आपल्याला सुटेबल आहे का? हे   शोधत रहाणारे

२८)—पुढचं तुम्ही लिहा राव.. मला जायचंय साईटला. आता जास्त वेळ देता येत नाही या पोस्टला.. 🙂

हाय कम्बख्त तुने पी ही नहीं….

Written by  on January 12, 2003

पुर्वी जेंव्हा देवांनी आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेंव्हा निघालेल्या १४ रत्नांमधलं एक रत्न म्हणजे दारु. जेंव्हा ही दारु निघाली, तेंव्हा दानवांना वाटले की हाच तो अमृत कुंभ, म्हणून ते तो कुंभ घेउन पळून गेले आणि त्यातली सुरा पिऊन मदहोश झाले. जेंव्हा मंथनातून अमृत निघाले, तेंव्हा हे दानव नशेत पडलेले होते, म्हणूनच देव अमृत घेउन पळून जाउ शकले.. अशी एक कथा आहे.म्हणजे जर दारू नसती तर देवांना अमृत मिळालं असतं का? अर्थात नाही…

दा्रू ही अतिशय वाईट गोष्ट आहे, दा्रू पिणे वाईट आहे असं म्हणतात. हे वाक्य अगदी लहानपणापासून ऐकत आलोय.  पण मला एक सांगा जर देवदास दा्रू प्यायला नसता तर  आपल्याला  दिलिप कुमारचा     इतका नितांत सुंदर अभिनय पहायला मिळाला असता का? दिलिप कुमारला पण आपल्याला राम और शाम सारख्या टुकार चित्रपटातच पहावं लागलं असतं.

खरं सांगायचं तर शाहरुख खान हा अभिनेता आहे पण सिद्ध करण्यासाठी त्याला दारुचे ग्लास हातात धरावा लागला. जर संजय लिला भन्साली याने जर तो चित्रपट काढलाच नसता तर शाहरुख मधला अभिनेता बाहेर पडलाच नसता..गुरुदत्तचा  प्यासा  मधला अभिनय विसरला जाऊ शकतो??

कदाचित इथे मी जर देवडीचं उदाहरण दिलं , तर कांही भुवया नक्कीच उंचावतील 🙂 राम गणेश गडकरींच्या एकच प्याला मधे सुधाकरने जर तो प्याला घेतला नसता, तर सींधू चा नितांत सुंदर अभिनय करण्याचे काम त्या अभिनेत्रीला पहाता आलं असतं का?? ( नांव विसरलोय फार वर्षापूर्वी पाहिलंय हे नाटक)वरच्या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर आहे नाही.. म्हणजे जर दारू हा विषय नसता तर या सगळ्या सुंदर कलाकृतींना आपल्याला कधीच अनुभवता आलं नसतं.

म्हणजे थोडक्यात काय तर दारु ही काही इतकी पण वाईट नाही , थोडी फार वाईट असेल-पण ठीक आहे…आजकालच्या दिवसात माझ्या एका मित्राला तिसरी मुलगी झाली आणि त्याने तिचे नांव “वारुणी” ठेवले.  🙂 जास्त लिहित नाही.. समजून घ्या हो…

आज हा काय विषय घेतलाय लिहायला? काल एक टेक्स्ट मेसेज आला होता. मी सध्या नागपुरला आलोय कामासाठी. एका जुन्या मित्राला बहुतेक समजलं असावं की मी इथे आहे म्हणून, त्याने एक टेक्स्ट मेसेज पाठवला होता. त्यात लिहिलं होतं.. दारू ही जगातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे. म्हणून तु आज संध्याकाळी भेट म्हणजे आपण दोघं मिळून जगातली ही वाईट गोष्ट संपवून टाकू. कसली भन्नाट कल्पना आहे न?

असं म्हणतात की लोकं प्रेमभंग झाला की तो विसरायला दारु पितात. एका बारमधे बोर्ड पण लावला होता, की जर तुम्ही इथे कांही विसरायला म्हणून प्यायला आलेले असाल ,तर कृपया आमचे पैसे आधी देऊन टाका, आणि मग प्या….आता इंग्रजी सिनेमा मधे हिरोईन प्रेम भंग झाला की भरपूर खाताना दाखवलेली आठवते एका सिनेमात. मस्त पैकी ती आइस्क्रीम , डॊनट्स, आणि इतरही बरंच कांही खाते.. असो विषयांतर होतंय..

विसरायला म्हणून  दारु पिल्याने  .. म्हणजे दोन तिन पेग झाले तरीही किंवा  अगदी दहा पेग झाले आणि तो पिउन टून्न झाला  आणि त्याला कोणी विचारलं.. का रे बाबा?? का प्यायलास एवढी?? तर म्हणतो.. प्रेमभंग झाला म्हणून दारु प्यायलोय. आता हे सांगा जर दहा पेग पिून पण जर तुम्हाला प्रेमभंग झाला ही गोष्ट विसरता येत नसेल तर    तर मग दारु प्यायची कशाला??

मग दारु कधी प्यावी??काही वाईट गोष्ट विसरायला .. अजिबात नाही, पण एखादी गोष्ट जसे प्रमोशन वगैरे सिलेब्रेट करायला जर सोशलायझिंग साठी  घेतली तर चार पाच पेग नंतरपण तो मोठ्या आनंदाने सांगेल.. प्रमोशन झालं ना  म्ह्णून पितोय म्हणुन  🙂

नाही .. मला सोशल ड्रिकींग चांगलं की वाईट हा मुद्दा घेउन लेख लिहायचा नाही आज. ही गोष्ट व्यक्तीनुरुप आणि तुम्ही कुठल्या सोशल एन्व्हायर्मेंट मधे रहातात त्यावर अवलंबून आहे. प्रत्येकानेच आपापला निर्णय घ्यायचा असतो या बाबतीत.

आजकाल सोशल ड्रिंकींगचं प्रमाण थोडं वाढलंय. पुर्वी दोन मित्र भेटले की कॉफी हाउस मधे बसून टाइम पास करायचे. आजकाल कुठला तरी बार प्रिफर केला जातो गप्पा मारायला. काल पण आमच्या मित्रांना कळलं की मी नागपुरला आहे, तर लगेच बॉस कहां बैठक लगानेकी?? असे एस एम एस सुरु झाले. पूर्वी आमच्या गृप मधे एक मित्र होता त्याचं लग्न व्हायचं होतं, तेंव्हा त्याचं घर बरं होतं .. त्याचं नाव विरु, म्हणून त्याच्या घराला विरु का धाबा म्हणायचो आम्ही..

आमचा एक खास मित्र काल रात्री दोन पेग झाल्यावर  🙂 कम्प्लेंट करित होता   एक गोष्ट लक्षात आली की या   दारुड्या लोकांना सगळेच फसवतात.तुम्ही बार मधे बसले आहात,  तुमचे दोन पेग झाले की साठ एम एल मागवली तर तुमच्या समोर तो ५० एम एल आणुन ठेवतो आणि ते तुम्हाला कळत पण नाही, एक फुल बॉटल मागवली तर चक्क ७५० एम एल ची बाटली देतात १००० मिली च्या ऐवजी आणि हाफ मागितली तर ३६० एम एल दिली जाते ५०० एम एल च्या ऐवजी, तसेच क्वॉर्टर मागितली तर १८० एम एल देता २५० एम एल ऐवजी. किती ही फसवणूक??

एक गम्मत पहा.. परवाच एक सर्व्हे चा निकाल वाचला.म्हणे मुंबई शहरात काही हजार लोकं दारु  पीऊन कार चालवतांना सापडले, आणि त्याच सोबत ही पण पुस्ती जोडली होती की दारु पिउन कार चालल्यामुळे १० टक्के अपघात होतात. याचा अर्थ ९० टक्के अपघात हे दारु न पिणारे करतात.. आमचं मत असं आहे की  जर खरंच असं असेल तर सगळ्यांनाच ड्रायव्हिंग करण्या पुर्वी दारु पिणं कम्पल्सरी करावं 🙂  बरं मला एक गोष्ट समजत नाही जर फक्त ‘१० टक्के लोकं दारु पिणारे ऍक्सिडॆंट करतात, तर न पिणारे त्यांच्या मार्गातून बाजुला का होत नाहीत??

विनोदाचा भाग सोडुन द्या, पण एक गोष्ट आहे जर तुम्ही दोन किंवा तिन लार्ज घेतले असतील तर ड्रायव्हिंग करतांना थोडं जास्तच कॉनशस असता, पण थोडी जास्त झाली तर ओव्हर कॉन्फिडन्सनी कुठे तरी ठोकता कार.

पटटीच्या पिणाऱ्या ला काही तरी बहाणा लागतो. मग मित्राचं लग्नं, प्रमोशन, प्रेम जुळणं, प्रेम भंग, बदली होणं, गर्ल फ्रेंड बद्लून जाणं, काहीही कारण पुरतं प्यायला. हे लोकं जीवनातली प्रत्येक गोष्ट ही दारुशी मोठ्या बेमालूम पणे जोडतात.  एक एसएमएस खूप पॉप्युलर होता, तुम्हाला पण कदाचित आलेला असेल,

दारु प्यायल्याने नशा येते,

नशे मुळे उत्साह वाढतो ( जुनुन),

उत्साहाने मेहेनत जास्त केली जाते,

मेहेनतीने पैसा वाढतो,

पैशाने इज्जत वाढते,

म्हणून चल मित्रा आपण आज रात्री दारु पिऊ आणि इज्जत कमाऊ…..

काय भन्नाट कल्पना आहे नां?  तर मंडळी, सगळ्या एका तळीरामाची ही कविता ..पट़्टीचा पीणारा असावा, ती इथे देउन पोस्ट संपवतो.. चिअर्स….

मी मेल्यावर गंध गुलाल लाउन  तिरडी माझी सजवा
मात्र त्यावर टाकायची फुलं दारुत आधी बुडवा.
माझ्या अंत्य यात्रेत सर्व जण शुध्दीत असावेत
मात्र चार खांदेकरी थोडंसं प्यायलेले असावेत
मी मेल्यावर तुम्ही म्हणाल, “बरं झालं बेवडा गेला”
मात्र दारु पिणारे म्हणतील “आमचा जॊडीदार गेला”
असं  जीवन जगण्यापेक्षा मेलेलंच बरं
मरायची भिती वाटते म्हणून थोडं प्यायलेलंच बरं
(कवी.. अनामिक)

तृष्णा..

Written by  on January 7, 2003

तृष्णा , फोर्ट मुंबई.

परवाच टाऊन साईडला कामानिमित्त गेलो होतो. दुपारी ३ वाजे पर्यंत कामाच्या रगाड्यात काही वेळ मिळाला नाही जेवायला! कडकडून भूक लागली होती.  “महेश लंच होमला’ जाऊ या का रे??”  बरोबर असलेल्या मित्राला विचारले, पण  त्याला मात्र त्याच्या अमेरिकन मित्राने रेकमंड केलेले   ’तृष्णा’ ट्राय करायचे होते . हे तृष्णा म्हणजे  नगीनदास मास्तर मार्गाच्या  आणि ह्रिदम हाऊसच्या मधल्या भागात असलेले    रेस्टॉरंट. दोन वेळा टाइम्सचं बेस्ट फुड अवॉर्ड मिळवलेले आणि लंडन मधे  शाखा असलेले…. इतकी वर्ष झाली मी त्या भागात जात असतो, पण ह्या हॉटेल मधे कधीच गेलो नव्हतो .

’तृष्णा’ कडे मोर्चा वळवला.  ऍज युजवल पार्किंगची बोंब आहे या भागात. फाउंटन वर कार पार्क करून चरफडत चालत चालत आलो पुन्हा हॉटेल पर्यंत! अंतर फार नव्हतं पण पोहोचे पर्यंत पार घामाघूम झालो होतो.सध्या मुंबईचे चांगले दिवस (थंडीचे) संपले आहेत. दुपारी बाहेर पडलं की होणारी नुसती घामाने होणारी कचकच.

हॉटेलचे मुख्य दार पाहिल्यावर आत मधे इतके चांगले हॉटेल असेल असे अजिबात वाटत नाही. दाराजवळ गेल्याबरोबर दरबानने दार उघडून धरले आणि आम्ही आत शिरलो.  एसीचा  आतला थंडावा एकदम हाडापर्यंत शिरला. ह्या दरबानला बाहेर निघतांना त्याने तुमच्या साठी दार उघडले म्हणून, आणि थॅंक्यु सर म्हणून मान झुकवली म्हणून  त्याला किती टीप द्यायची – हा प्रश्न नेहेमीच पडतो मला. 🙂 असो.

घामाने थबथबलो असतांना जर राईट टेम्प्रेचरची बिअर मिळाली तर??

हॉटेल मधे शिरल्यावर आधी पहिला फिल येतो की आपण ’ऑड मॅन आऊट’ आहोत इथे. कारण सगळे फिरंगी लोकंच दिसतात इकडे बसलेले. मला वाटतं की आमच्या शिवाय फक्त चार पाच भारतीय लोकं असतील.

हॉटेल मधे शिरल्या बरोबर काय दिसलं असेल ? तर जवळपास मनगटा एवढा जाड आणि चांगला १२ इंच लांबीचा  असलेला लॉब्स्टर घेऊन  वेटर एका टेबल वर सर्व्ह करत होता. इथला क्रॅब आणि प्रॉन्स फेमस आहे . पण  काय कोण जाणे, खाण्याची मात्र इच्छा होत नव्हती. तसाही शेलफिश ला मी ऍलर्जिक आहेच.

वेटरने येऊन काय आणू म्हणून विचारल्यावर, मी आणि माझा मित्र दोघंही एकदम म्हणालो.. ’किंगफिशर’!!!!! बिअर चे घोट घेत मेन्यूकार्ड चाळणे सुरु केले. मेन्यू कार्ड बघतांना कार्डाच्या डाव्या बाजू सोबतच उजव्या बाजूला पण लक्षं द्यावं लागते. प्रत्येक डिश साधारण ५५० ते ६०० रू. प्लेट आहे. स्पेशल डीशचे भाव तर विचारूच नका. 😦

आम्ही फिश टिक्का ( हैद्राबादी रावस) , चिकन टिक्का मसाला,  आणि  पांप्लेट  चायनीज स्टाइल मागवलं. सोबतीला अर्थातच नीर दोसा!  वेटर म्हणाला की नीर दोसा चायनीज फिश सोबत चांगला लागणार नाही, म्हणून ’पाप्लेट इन ग्रिन सॉ”(?????)घ्या.  फारसा विचार न करता म्ह’ट्लं, की चला, आपल्याला माहीती नाही, आणि तो सांगतोय तर घेऊ या “फिश इन ग्रीन सॉस!”

रावस हैद्राबादी टिक्का..

पंधरा मिनिटातच टेबलवर जेवण आणून लावलं त्या वेटरने. स्टार्टर म्हणून मागवलेले रावस हैद्राबादी  सर्व्ह केलं ,आणि  एक घास घेतला नसेल तर लगेच  मेन कोर्स एकदमच आणून ठेवलं समोर. ’रावस टीक्का’ पूर्णपणे थंड झालेला होता, पण चवीला छान होता. फिशचे पिसेस पण चांगलेच मोठे होते. एका प्लेट मधे सहा पोर्शन्स होते. ’पाप्लेट इन ग्रीन सॉस’ म्हणजे पालकात शिजवलेले पापलेट ( जर हे माहीत असतं तर मी ऑर्डर केलंच नसतं कधी). तसंही मला फारसं पाप्लेट आवड्त नाही आणि ते पण पालकात शिजवलेले?? मसाले वगैरे एकदम कमी, मिठ , तिखट कसलीच फारशी चव नसलेले ते पाप्लेट अजिबात आवडले नाही. ’चिकन तृष्णा’ आणि ’नीर दोसा’  मात्र खूपच छान होता.असं म्हणतात इथे गार्लिक बटर क्रॅब/ प्रॉन्स  चांगला मिळतो पण  ट्राय केले नाही.

फिश जर फ्रेश असेल तर फिशचा अजिबात वास येत नाही. पण थोडी जरी ( म्हणजे चार तासापेक्षा जास्त) शिळी असली की फिशला एक वेगळाच दर्प येतो.इथे फिश एकदम ताजी होती हे नक्की. 🙂

तृषणा मधलं लंच.. पाप्लेट इन ग्रीन सॉस एकदम बेचव होतं.

एकंदरीत हॉटेलचे नुसतेच नाव मोठे  आहे, जेवण पण  फारसे आवडले नाही. जरी चिकन करी चांगली असली तरीही तिचे भाव पहाता खूप ओव्हरप्राइस्ड वाटते.  इथे बहुतेक परदेशी नागरिक जेवायला येतात, त्यामुळे सगळं काही चवीला एकदम माइल्ड असं असतं. वेटर्सची सर्व्हीस पण काही फारशी चांगली नव्हती.एकंदरीत इथला अनुभव काही फारसा चांगला नव्हता.

जेंव्हा बिलं हातात आलं, तेंव्हा दोन किंगफिशर,एक फिश टीक्का,एक फिश इन ग्रिन सॉस, आणि चिकन तृष्णा यांचं बिल होतं- ३१७०/ रुपये. यामधे १० टक्के म्हणजे  अंदाजे ३०० रु.सर्व्हीस टॅक्स इन्क्लुडेड आहे. थोडक्यात माझ्या मते इथली प्रत्येक डीश ही ओव्हरप्राइस्ड आहे, अर्थात त्यांचा एक्स्पेक्टेड कस्टमर हा तुमच्या माझ्यासारखा नाही, तर परदेशी पर्यटक आहेत- तेंव्हा इथे न गेलेलेच बरे असे मला वाटते..  थोडक्यात काय- तर नाम बडे और दर्शन खोटे..

महेश लंच होम मधला फोटो. फार पूर्वी काढून ठेवला होता.मंगलोरी डीशेस एकदम मस्त!

या हॉटेल पेक्षा मला महेश लंच होम जास्त आवडतं .  काही दिवसापूर्वी महेशला गेलो होतो, आम्ही तीन मित्र. तर दोन बिअर आणि फिशकरी राइस, फिश टिक्का , आणि नीर डोसा यांचं बिल फक्त १६०० रुपये झाले. तिथली फिश करी अगदी ऑथेंटीक कारवार मंगलोर स्टाइलची असते. सीफुड साठी माझं रेकमंडेशन महेश लंच होम-आजकाल  जरी पुर्वीपेक्षा भाव खूप वाढवलेले असले तरीही.. !म्हणून टाऊन साईडला कधी गेलात तर महेश लंच होम ला थम्स अप!!

खिशात   खूप पैसे खुळखुळत आहेत?  आणि  एखाद्या खूप फेमस हॉटेल मधे जाऊन  काहीतरी खायची इच्छा आहे टाऊन साईडला?    तर  मासे खाण्यासाठी म्हणून  तर मग तृष्णा ठीक आहे-

महेश लंच होम.. माझं फेवरेट (टाऊन साईडचं) इतर भागातलं म्हणाल तर फ्रेश कॅच.. माहीम.

पण माझा प्रिफरन्स महेश लंच होम.. पण  माझं सगळ्यात फेवरेट  सीफूड चं हॉटेल कुठलं ते विचाराल, तर त्याबद्दल पुढच्या पोस्ट मधे. अतीशय स्वस्त आणि चांगले सीफूड मिळण्याचे ठिकाण म्हणजे “फ्रेश कॅच”  आणि कोंकण्याचे गोमंतक..पण त्याबद्दल नंतर कधी तरी लिहीन….

पाचव्या राणीचे साम्राज्य..

Written by  on January 5, 2003

काहीही झालं तरी एक गोष्ट आहे, सगळ्या जगातली राजेशाही पद्धत जरी रसातळाला गेली , नष्ट झाली , तरीही पाच राण्या मात्र कायम रहाणार आहेत.  त्यापैकी एकही राणी जनता कमी होऊ देणार नाही.  त्या पाच राण्या आहेत :- ’पत्त्याच्या कॅट ’मधल्या चार राण्या आणि पाचवी राणी अर्थात ’इंग्लंडची राणी”!

इंग्लंडची जनता मोठ्या प्रेमाने हे बांडगूळ  का पाळत असते ते मला माहीती नाही, आणि एवढंच नाही तर त्याचा अभिमान पण बाळगते.बांडगुळ पाळणं, आणि त्याचा अभिमान बाळगणं अशा दोन्ही गोष्टी ’रेसिस्ट’ असलेली ब्रिटीश जनताच करू शकते.   जगात कुठेही गेलात तरीही ही अशी मनोवृत्ती दिसून येते.

दूर कशाला आपल्या भारता मध्ये आपल्या नेत्यांची पोरं बाळं, त्यांची लायकी नसतांना पण  आपण डोक्यावर घेऊन नाचतो,    त्यांचा बाप नेता आहे, म्हणून त्यांना पण नेते बनवतो, आणि नंतर काही वर्षांनी आपल्याच रक्तावर पोसलेली ती बांडगुळे इतकी मोठी होतात की…… असो.. तसेच आहे हे पण.

ब्रिटनच्या राणीचे गोडवे गात अजूनही गॉड सेव्ह द क्विन म्हणून आळवत युनियन जॅक फडकवणाऱ्या बसणाऱ्या ब्रिटीश जनतेची मानसिकता, आणि आपल्या कडे नेत्यांच्या परिवाराची  (इथे मुद्दाम कुणाचे नांव लिहत नाही पण तुम्ही अगदी कोणाचेही नांव घालू शकता 🙂 )  भाटगिरी करणाऱ्यांची जातकुळी एकच आहे असे म्हणावे लागेल.  नेत्याने काहीही केले तरी, “राजकारणात असे करावेच लागते “, म्हणून  नेत्याच्या चुकीच्या विचारांची पाठराखण करणारे  निर्बुद्ध “चमचे” कार्यकर्ते असल्यावर  दुसरं काय होणार??????

राणीची  तारीफ करतांना हे ब्रिटीश लोकं सगळं काही विसरतात. सुरु असलेले युद्ध, इराक मधे मेलेले सैनिक, ब्रिटन मधले घरांचे प्रॉब्लेम्स, नोकऱ्या, हेल्थ केअर  वगैरे सगळ्या गोष्टी विसरून जातात, अगदी भारतातल्या प्रमाणेच, आणि मास हिस्टेरीयाचा विजय होतो.भारतात  लोकांची ही  अशीच मनःस्थिती क्रिकेटच्या वेळेस असते.

टीव्ही वर लग्नाचे  थेट प्रक्षेपण,( जवळपास प्रत्येक चॅनल)  आणि त्या आधी प्रिन्स चा्र्ल्स च्या लग्नाची व्हिडीओ कॅसेट पण दाखवली जात होती, आणि ती बहुसंख्य लोकांनी पाहिली.  आपल्या देशातल्या लोकांना पण या लग्नात  इतका इंटरेस्ट आहे म्हणून हे  पोस्ट लिहायला घेतले.तसाही गोरा रंग आणि त्याचं महत्त्व आपल्याकडे इतकं जास्त आहे की पुरुषांचे पण गोरे होण्याचे क्रिम्स मार्केटला  भरपूर विकले जातात.  आपल्याकडे गोरं म्हणजे चांगलं, सुंदर, उच्च वर्णीय असं समजलं जातं.

अजूनही आपण ब्रिटीशांच्या मानसिक गुलामगिरी मधून  मुक्त झालेलो नाही, गोरे  म्हणजे सुपीरिअर रेस असं समीकरण आहे आ्पल्याकडे. सगळ्या जाहीरातीनं काळ्या लोकांची मानखंडना करणाऱ्या  असतात, आणि त्या चवीने पाहिल्या जातात.  गोऱ्यांच्या देशात गेल्यावर, एक भारतीय इतर भारतीयांशी व्यवस्थित   बोलणार नाही, पण (अमरू बरोबर) गोऱ्या कातडीच्या लोकांशी ( अगदी प्लंबरशी पण ) मात्र अदबीने बोलताना दिसतात.

प्रिन्स चार्ल्स चे दुसर लग्न, त्यामधे आपल्या डबेवाल्यांना बोलावल्या बरोबर ती पण बातमी झाली होती. त्या डबेवाल्यांनी पण जातांना पैठणी आणि मंगळसूत्र दिलं प्रेझेंट. ते तिने वापरले नसेल ह्याची खात्री आहेच .पण डबेवाल्यांना राजपुत्राने बोलावले याचे केवढे अप्रूपच… कारण पांढरी कातडी.

ह्या सगळ्यात जास्त रेसिस्ट असलेल्या कुटुंबा बद्दल फार कमी बोललं जातं.  त्यांच्या विरुद्ध जाणारे सगळे मुद्दे सोयिस्कर पणे बाजूला ठेवले जातात.  असं म्हणतात, की १६०३ मधे पहिली एलिझाबेथ ही सिफ्लिसीस ने मरण पावली. तिची परिस्थिती इतकी वाईट होती, की चेहेऱ्यावर कित्येक पुटं चढवायची मेकपची.

राणी स्वतः मात्र आपले मत कधीच प्रदर्शित करत नाही. प्रिन्स फिलिप च्या रेसिस्ट कॉमेंट्स मुळे तर भरपूर टिका झालेली आहे.  १९८६ मधे चिन मधल्या काही ब्रिटीश विद्यार्थ्यांना तो म्हणाल होता, की जर तुम्ही अजुन काही दिवस चायना मधे रहाल तर तुमचे डोळे पण स्लिट आईज होतील.

१९९४ मधे एका केमॅन आयलंडच्या रहीवाश्याला विचारले होते, की “तुझे पूर्वज समुद्री चाचे होते का??”१९९९ मधे इडनबर्ग ला एका फॅक्ट्रीचे उदघाटन करण्यासाठी हाच प्रिन्स गेला असता, तिथे त्याला काही वायर्स लुझ लागलेल्या दिसल्यावर म्हणाला होता, की” हे काम बहुतेक एखाद्या भारतीयाने केलेले दिसते”.

. राणीची आई भारतीयांचा खूप द्वेश करायची , भारतीयांनाही  ’ब्राऊन पिपल’ म्हणायची  ती. निग्रोंचा उल्लेख पण नेहेमी बोलतांना ती ’निगनॉग्स, किंवा ब्लॅकमुर्स’ असा  करायची. इंग्लंड मधे काळ्या/ ब्राऊन लोकांच्या  इंग्लंडला इमिग्रेशनला तिचा सक्त विरोध होता. गोऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणीही  राज्य करण्याच्या लायकीचे नाही, असे मत ती नेहेमीच व्यक्त करत असे.  आजही भारतीयांवर होणारे रेसिस्ट हल्ले  (ब्रिटन, ऑस्ट्रेलियामधले) म्हणजे ब्रिटीशांचा सुपीरीआरीटी कॉ्म्प्लेक्स दाखवतो.

जसे रशिया मधे झार चे साम्राज्य खालसा करण्यात आले, आणि त्या नंतर झार चे नामोनिशाण पूर्णपणे मिटवले, आणि त्याची सगळी संपत्ती सरकार जमा केली, किंवा मंगोल सम्राज्याचे जसे धिंडवडे निघाले  तसे इंग्लंड मधे झाले नाही. तिथे ही पाचवी राणी कायम जनतेच्या डॊक्यावर बसलेली असते.

तिथल्या जनतेला पण ह्या कुटुंबा बद्दल अतीशय जास्त   कौतुक /उत्सुकता असते. मग प्रिन्स ने काय केले? राणीला शिंक आली, प्रिन्स ने अमुक मुलीचे चुंबन घेतले, त्याने हिरवी जर्सी घातली वगैरे अशा प्रकारच्या सगळ्या ” अती महत्त्वाच्या “बातम्या  मिडीया कव्हर करत असतो. इंग्लंड मधल्या टॅब्लॉइड्स ने तर या प्रकाराला खूप खत पाणी घातलेले आहे. प्रिन्सेस डायना पण अशाच पापाराझी मुळे मरण  पावली  होती.

ब्रिटीश सरकार कडून राणीला तिच्या खर्चासाठी ३५ मिलियन पाउंड्स देण्यात येतात. तिचे इंग्लंड मधले असलेले सगळे महाल जरी जनतेला दिले तर इंग्लंडमधला रहाण्याचा प्रॉब्लेम नेहेमी साठी संपेल असे गमतीने म्हटले जाते.

आपल्याकडे जर  तेंव्हा सरदार  वल्लभभाई पटेल नसते तर अशीच परिस्थिती राहिली असती. आजही कित्येक राजे दिसले असते महाल बाळगून.   पण राजे नाही तर  राजांची जागा ही नेत्यांनी घेतली. आपणही इतके मानसिक दृष्ट्या षंढ झालो आहोत, की जेंव्हा हे नेते आपली करोडॊ रुपयांची मालमत्ता जाहीर करतात, तेंव्हा एकही माईचा ला हे विचारत नाही की इतके पैसे तुमच्याकडे आले तरी कुठून??

राणीला  दर वर्षी ३५ मिलीयन्स पाउंडाची मदत सरकारी खजिन्यातूनच दिली जाते.या इतक्या म्हणजे ३५ मिलियन पाउंड्स च्या सरकारी खैरातीची गरज आहे का? कारण तिच्याकडे आज असलेली ज्ञात संपत्ती ही खाली देतोय, ती बघा आणि तुम्हीच ठरवा.तिची पर्सनल प्रॉपर्टी ही १.१८ बिलियन्स आहे . या मधे तिचे पॅलेसेस वगैरे पकडलेले नाहीत. बकिंगहॅम पॅलेस, आणि तिची इतर ठिकाणी असणारे पॅलेसेस ची मोजदाद केली तर त्या प्रॉपर्टीची किम्मत ही कित्येक करोड पाउंड होईल.

राणीकडे असलेले तिकिटांचे कलेक्शन हे ३०० अल्बम आणि २०० बॉक्स भरून आहे. त्याची अनुमानित किम्मत १०२ मिलियन पाउंड्स आहे. ७२ मिलियन पाउंड्स चे जडजवाहीर. जवळपास १.४ मिलियन पाउंड्स चे फर कोट, आणि ते ठेवण्यासाठी एक रेफ्रिजीरेटॆड हॉल आहे बकिंगहॅम मधे. ८ मिलियन पाउंड्स च्या कार्स, २ मिलियन पाउंड्स ची वाईन, आणि ६१ मिलियन्स ची ऑफिशिअल रेसीडेन्शिअल प्रॉपर्टी- आणि सगळा समुद्र!

५० वर्षापुर्वी राणी जेंव्हा राणी झाली, तेंव्हा तिने त्या काळच्या प्राइम मिनिस्टर चर्चिल बरोबर केलेल्या  करारा नुसार  राणीला डिव्हिडंट्स आणि इंटरेस्ट्स वर टॅक्सेस भरायची गरज पडणार नाही. ह्या टॅक्स न भरल्या मुळे तिची साधारण एक बिलियन ची वर्षाला बचत होते.प्रिन्स चार्ल्स ची स्वतःची संपत्ती ३४६ मिलियन पाउंड्स आहे.दोन चंगु मंगु प्रिन्स ची पण ३० मिलियन्स च्या आसपास संपत्ती आहे.

राणीला दर वर्षी पब्लिक फंडातून ३५ मिलियन पाउंड्स दिले जातात.या व्यतिरिक्त ८ मिलियन पाउंड्स तिच्या जमिनीच्या वापराबद्दल सरकार तिला देते.एक लाख विस हजार हेक्टर जमीन आणि ब्रिटनच्या शेजारचा सगळा समुद्र हा राणीच्या मालकीचा आहे.  एक लक्षात आलं का?   की हाउस ऑफ कॉमन्स ने तिची संपत्ती सरकार जमा करुन घेतली नाही.

नुकत्याच झालेल्या लग्नाचं आणि श्रीमंतीचे भोंडं प्रदर्शन आणि  लोकांचा मूर्खपणा पाहिल्यावर हे पोस्ट लिहिल्याशिवाय रहावलं नाही. आपल्या कडे पण सगळ्या पेपर मधे त्या दोघांचे चुंबन घेतानाचे फोटॊ पहिल्या पानावर दिलेले आहेत. आपल्या संस्कृती मधे अशा प्रकारे पब्लिक डिस्प्ले मधे चुंबन  सामान्यपणे घेतले जात नाही.  मिररच्या आतल्या पानावर तर नंतर त्या दोघांनी लग्न झाल्यावर संध्याकाळी बाल्कनीत चुंबन घेतले, त्याचा पण  फोटॊ आहे. नशीब, त्यांच्या बेडरूम मधे कॅमेरे बसवलेले नाहीत, नाहीतर जनतेने ते पण आवडीने पाहिले असते.

असो, थांबतो इथेच.. जितकं लिहावं तितकं कमीच आहे यावर..

पाकिस्तान ३०/३

Written by  on January 1, 2003

इथे आजच्या अटॅक बद्दल काहीच लिहिणार नाही.म्हणजे हा अटॅक कसा झाला, का झाला वगैरे… कारण ते सगळं तुम्ही कुठे ना कुठे वाचले असेलच..जे काही हल्ल्या मधे ८०० लोकं  मारले गेले त्याला पण मी काही फारसं महत्त्व देत नाही. कारण खाली दिलेलं आहे..

पाकिस्तानातला आजचा अटॅक हा पाकिस्तानावर केलेला अटॅक नाही. तो म्हणजे ओबामांच्या डीक्लिअर केलेल्या बक्षिसावर दिलेले उत्तर आहे. आजचा जो टेरर अटॅक झाला तो म्हणजे मुंबई च्या अटॅक ची सुधारित आवृत्ती होती. (पहिला अटॅक ३/३ दुसरा ३०/३.. किती को इन्सिडन्स ? नाही कां?)हा अटॅक आता मुंबईला झाला, पाकिस्तानात फॉलो अप अटॅक झालाय , आता माझ्या मते अमेरिका किंवा युरोप मधे या धर्तीवर अटॅक केला जाउ शकतो.. फक्त कधी तेच पहायचं…

गेल्या दोन वर्षा मधे पाकिस्तानात २ हजारापेक्षा जास्त लोकं टेररिस्ट अटॅक मधे मारले गेले आहेत. अतिरेक्यांना आय एस आय ने दिलेले कॉंबॅट ट्रेनिंग , की जे भारत आणि काश्मिर मधे अराजक माजवण्यासाठी देण्यात आले आहे, ते आज पाकिस्तानच्याच विरोधात वापरल्या गेले आहे. म्हणजे काय तर ’कुऱ्हाडीचा दांडा अन गोतास काळ’.

ह्या अटॅक मुळे पाकिस्तानातिल हिंदुत्ववाद्यांनी ( म्हणजे नेमकंकाय हो??  :)) आपली ताकत दाखवण्यासाठी केलेला आहे. काही दिवसांपूर्वी जेंव्हा स्वात मधे शरीया कायदा लागु करण्यास तालिबान्यांशी आशिफ अली जरदारी ने  संधी केली होती,तेंव्हा पासुनच अशा मोठ्या अटॅक्सची अपेक्षा होती. पण तो इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते. आता, तालिबान्यांच्या दृष्टीने  सोप्पं झालंय, पाकिस्तानमधे कुठेही अटॅक करा, आणि आपल्या सेफ प्लेस मधे म्हणजे स्वात मधे ( जिथे शस्त्र संधी आहे तिथे) जा .. बस्स! सोप्पा उपाय..

ओबामाने ऑलरेडी सांगितले आहेच की, पाकिस्तानमधे कॅन्सर प्रमाणे वाढणारा तालिबानी विचारधारा पाकिस्तानला डॅमेज करु शकते, म्हणून पाकिस्तानने आपली टेररिस्ट च्या अगेन्स्ट कमिटमेंट प्रुव्ह करावी. केवळ ओबामाला आणि वेस्टर्न वर्ल्ड्ला दिलेला मेसेज आहे , की त्यांना कंट्रोल करणे सोपे नाही. अगदी करोडॊ डॉलर्सचे  बक्षिस जरी डीक्लिअर केले, आणि कितीही पाक सरकारला प्रेशराइझ करायचा प्रयत्न केला, तरीही त्यांना काही फरक पडत नाही. त्यांनी आपली स्ट्रेंथ शेवटच्या दोन अटॅक्स करुन   दाखवून   दिलेली आहे..

ह्या अटॅक वरुनच हे पण टेररिस्ट लोकांनी प्रुव्ह केलं की केवळ ३-४ वेल ट्रेन्ड माणसं कुठलेही शासकीय किंवा इतर इमारत ताब्यात घेऊ शकतात. जी खरंच खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. अमेरिकेला आणि वेस्टर्न वर्ल्ड ला मेसेज दिलाय, की आम्ही तालिबानी काही पण करु शकतो….

सगळेच काही तालिबानी नसतात. हा जो हल्ला आहे जरी त्याची जबाबदारी कोणीही घेतली नसली तरी, माझ्या माहिती प्रमाणे .. जैश ए  मुहम्मद, लष्कर ए जांगवी, किंवा लष्कर ए तोयबा ह्या पैकी कोणि तरी असावे. कारण सध्या ह्याच ऑर्गनायझेशन कार्यरत आहेत. सुसाइड बॉम्बर्स पण  आमच्याकडे आहेत आणि ते किती डॅमेज करु शकतात,   ते दाखवायला म्हणून हा हल्ला केला असावा.

टेररिस्ट लोकांनी हजार पाचशे लोकांना वेठीस धरले आणि मारले वगैरे गोष्टींना मी काही फारशी किंमत देत नाही …… हे चालायचंच! पण मला सगळ्यात जास्त काळजी वाटते ती म्हणजे पाकिस्तानातिल ऍटोमिक इन्स्टॉलेशन्सची.जर असाच   हल्ला जर एखाद्या ऍटॊमिक इन्स्टॉलेशन वर झाला आणि टेररिस्ट लोकांच्या हाती जर अणु बॉंब लागला, तर काय होऊ शकेल ह्याचीच कल्पना केली जाऊ शकत नाही. फ्रेडरिक फोर्सिथ चं एक पुस्तंक वाचलं होतं.. नांव  आज ते आठवतंय.. हं… फोर्थ प्रोटोकॉल.. होतं नांव त्याचं ..

आज जे पाकिस्तानी सायंटिस्ट्स आहेत त्या पैकी एक जरी अल कायदा शी संबंधित असेल तर खुद्द पाकिस्तान,  भारत आणि तिथे पोस्ट असलेल्या  अमेरिकन सैन्याला किती मोठा धोका आहे हे लक्षात घ्यायलाच हवे.

माझ्या मते आजचा हल्ला हा तालिबानी ताकतिचा एक सुदृढ नमुना म्हणता येइल. माझ्या मते पाकिस्तानला परफेक्ट हॅंडल करु शकणारा म्हणजे परवेझ मुशर्र्फ.. बस्स. त्याला बसवावे परत गादीवर अमेरिकेने.. सध्याचे पपेट्स काही उपयोगाचे नाहीत..फक्त मुशर्र्फ कंट्रोल करु शकेल विथ द आयर्न फिस्ट!.

हुसेन चा मृत्यु..

Written by  on January 1, 2003


कोणी मेल्यावर त्याच्याबद्दल वाईट बोलू नये असे म्हणतात. माणूस मेला की त्याचं वैर पण सोबतच संपवावं असंही म्हणतात.  हे प्रत्येक वेळॆस शक्य होईलच असे नाही. विषारी साप जरी मेला तरी तो काही आपला मित्र बनत नाही- जिवंत सापाची जितकी घृणा वाटते, तितकीच घृणा मेलेल्या सापाची पण वाटत असते.कदाचित हेच कारण असेल की   एखादा माणुस आपल्या  भावनांचा इतका अनादर करतो,  पदोपदी आपल्या धर्माचा, देशाचा अपमान करतो,   अशा माणसाच्या मृत्यूबद्दल जेंव्हा समजतं तेंव्हा  बरं वाटतं.

एखादा पायातला काटा काढल्यावर पण त्याचा जसा सल रहातो, तसा त्या माणसाच्या करणीचा सल  ह्रदयात शिल्लक राहतो आणि मग त्याला माफ करणे शक्य होत नाही. हा हुसेन   पण  त्याच प्रकारातला माणूस आहे.  या माणसा विरुद्ध इतका राग मनात ठासून भरला आहे की त्याच्याबद्दल काही चांगलं मनात येणं  शक्य नाही- तो मेल्यावर सुद्धा.

हूसेन मेला! म्हणजे आता तो अल्लाह को प्यारा हूवा असे पण म्हणवत नाही!  कुठल्यातरी रौरव नरकात त्याने पडावे अशी मनापासून इच्छा.  असे विचार मनात आले आणि  ते   विचार आणि काय वाटेल ते  सरळ सरळ ब्लॉग वर  लिहावे की नाही हे ठरत नव्हते,  पण संपूर्ण पेपर जेंव्हा हुसेनला वाहिलेला  आढळला , आणि काही बुद्धी वादी निधर्मी लोकांच्या पाणावलेल्या डोळ्यातून  ओघळलेले   अश्रू जेंव्हा  त्यांच्या लेखातून   जाणवले, तेंव्हाच  आपणही थोडे   ’नक्राश्रू’ ढाळावे हुसेन साठी हे ठरवले, म्हणून हा लेख प्रपंच.

परवाच्या टाइम्स मधे फक्त हुसेनचीच  बातमी सगळ्या पेपरभर एखाद्या कॅन्सर सारखी पसरली होती. पेपर मधे इतर काही वाचायलाच नव्हते. जणू काही  हुसेन मेला ही एखादा मोठा लोकप्रिय नेता मेला   अशा स्वरूपात   या बातमीचे कव्हरेज होते. झाडून सगळ्या बुद्धी वाद्यांनी लेख  लिहिलेले होते.  इतर काही वाचायला नाही म्हटल्यावर  सगळे लेख वाचले, होय प्रितिश नंदीचा पण वाचला.

सगळ्या निधर्मी लोकांना हुसेन मेल्यामुळे झालेल्या कला क्षेत्राचे न भरून येणाऱ्या नुकसानी मुळे खूप वाईट वाटत होते . म्हणे “हा मृत्यु पावल्याने कलेचे न भरून येणारे नुकसान झाले आहे”.

माझ्या मते कसलेही   नुकसान झालेले नाही.  काही घोड्यांची चित्र काढली जाणार नाहीत , हिंदू   देवांचे विटंबन करणारी   चित्रं काढली जाणार नाहीत, या शिवाय अजून काय नुकसान झाले आहे ते मला समजत नाही .   त्यां सेक्युलर लोकांनी  केलेली हुसेनची तारिफ वाचली,  तेंव्हा माझं मन पण  ( संतापाने ) भरून आले .  झाडून सगळ्या बुद्धी वाद्यांनी   हुसेन मेल्यामुळे कलाक्षेत्राचे कसे नुकसान झाले आहे हे  लिहिले होते. कोणी तरी तर  म्हणालं की ’ पिकासो मेला भारताचा’.

राज ठाकरे म्हणतात की एक कलाकार म्हणून त्याच्या मरण्याचे दुःख झालेले आहे त्यांना .   त्याचे प्रेत आणून पंढरपूरला त्याचे अंत्यसंस्कार करा असेही म्हणताहेत  . मी  आता त्यांच्याच स्टाइल मधे विचारतो, ” मी म्हणतो कशाला? तो कोण कुठला हुसेन –  कतारचा असलेला नागरिक !  आणि आता दुसऱ्या  देशातल्या नागरिकाला   आपल्या देशात आणून त्याचे अंत्यसंस्कार का म्हणून करायचे आम्ही? कोण लागतो तो आमचा? आमच्या देवांच्या विटंबने शिवाय त्याने केले तरी काय आमच्या देशासाठी? अरे पंढरपूर हे विठोबाचे गाव आहे,   वारकऱ्यांची भूमी!  तिथे ही घाण कशाला आणायची?? काय साधणार आहे त्याने?”    या प्रश्नांची उत्तरं नाहीत. पण आपण निधर्मी आहोत हे दाखवण्याचा मोह त्यांना पण आवरता आला असता तर बरं झालं असतं. जर  ते काही बोलले नसते तरीही चालले असते माझ्या मते.

पंढरपूर आमच्या विठाईचं आहे,   नियमीतपणे    वारीला श्रद्धेने जाणाऱ्या  वारकऱ्यांचं आहे. तिथे अशा कुठल्याही प्रकारच्या राजकारणाची गरज नाही. पंढरपूर  ज्या वारकऱ्यांचं आहे, त्यांची परवानगी घ्या   हुसेनला तिथे त्याचे दफन करण्य़ासाठी आणताना.   त्यांना तरी तिथे ही अशी त्यांच्या देवाचा अपमान करणाऱ्याची समाधी हवी आहे का हे आधी विचारा , आणि  जर त्यांनी होय म्हंटले, तरच नंतर मग तिथे समाधी   बनवण्याच्या गोष्टी करा- एवढेच सांगणे आहे बस्स!

राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार   जर हुसेनला  पंढरपुरात   आणून गाडले, की काही दिवसात त्याची तिथे समाधी उभी राहील, आणि मग त्या समाधीची मजार व्हायला पण काही वेळ लागणार नाही. लोकं तिथे जाऊन नवस बोलतील, नवसाला पावणारा हुसेन म्हणून तो कदाचित प्रसिद्ध होईल लवकरच.

हे मी का म्हणतोय? कधी गेला आहात प्रतापगडावर? काय दिसतं तिथे?? अफझलखानाची पुजा करणारे लोकं, त्याची मजार?? अरे हे चाललंय तरी काय? ह्या देशामधे जर शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यावरची पक्षांनी केलेली घाण सुद्धा साफ केली जात नाही, पण  त्या अफझल खानच्या समाधीवर मात्र न चुकता फुलांची चादर चढवली जाते.

अगदी सिस्टीमॅटीक पणे त्या अफझल खानाला देवाचे रुप दिले गेले अहे. ही पण एक स्ट्रॅटेजिक मुव्ह आहे, आधी एक लहानशी मजार बांधयची , मग नंतर तिथे काही दिवसानंतर  अफवा पसरवायची, की हा अफझल खान नवसाला पावतो. एकदा ही अफवा पसरली, की झाडून सगळे लोकं ( हिंदू , मुस्लिम,  बौद्धां सकट सगळे ) त्या समाधीवर पूजा करायला पोहोचतील. आणि हे झालं की मग श्री शिवाजी महाराजांची नाही तर त्या मजारीची पूजा करतील  लोकं. आणि  हुसेनच्या बाबतीतही असंच होऊ शकतं

राज ठाकरे    म्हणताहेत, की हुसेनची मुंबईला एक गॅलरी बनवण्यात यावी म्हणून.   त्याची खरंच काही गरज आहे का? हा पण प्रश्न आहेच.आता राज ठाकरेंना कोणी विरोध तर करूच शकत नाही, पण फक्त त्या गॅलरी मधे  त्याने काढलेली देवांची विटंबना करणारी  चित्र ठेऊन आमच्या भावनांचा अनादर करू नका, आणि तिथे एक मजार तयार होणार नाही याची काळजी घ्या  इतकीच विनंती!