इन्फ्लेशन…

Written by  on December 21, 2002

महागाईचा इंडेक्स ४.५ ला पोहोचला, म्हणुन माझा एक मित्र आनंद व्यक्त करित होता काल. म्हणाला की आता  हा इंडेक्स इतक्या वर जातोय तर आता मार्केट नक्कीच सुधारणार. या गोष्टीचं कारण मला कधीच समजलं नाही. काही दिवसां्पूर्वी हा इंडेक्स १-२ असतांना पण महागाई होतीच. बरं तसं म्हणाल तर, आज तुर डाळ ८० रुपये किलो आहे, गहू २७ रुपये, तांदुळ ३० ते ४० रुपये ,कुठलीही भाजी घेतली तरी ती कमीत कमी ८ ते १० रुपये पाव आहे. आणि हा भाव जेंव्हा महागाईचा इंडेक्स ९ होता तेंव्हा पेक्षा पण जास्त आहे – हे कसं??

म्हणजे हा इंडेक्स ज्या पद्धतीने काढला जातो ती पध्द्तच  मला चुकीची वाटते.  हा इंडेक्स रोजच्या वस्तुंच्या भावाशी निगडित असतो असे म्हणतात.. पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे.जर असं नसतं तर जेंव्हा इंडेक्स ९ च्या आसपास होता तेंव्हा धान्य आजच्या भावाच्या पेक्षा ३० ते ५० टक्के स्वस्त राहिले नसते.

खरं तर अर्थशास्त्र हा माझा प्रांत नाही   तरी पण हे पोस्ट लिहिण्याचं धाडस करतोय. पण असं म्हणतात की जर इतकी महागाई वाढते आहे, म्हणजेच मार्केट मधे पैसा आणि क्रय शक्ती पण वाढते आहे. लोकांच्या कडे पैसा आहे म्हणूनच भाववाढ होते आहे.जर कोणीच घेणारं नसेल तर भाववाढ होइल का? आता एक गोष्ट अशी पण आहे की भाजी ४० रुपये किलोने विकली जाते याचे कारण एक तर घेणाऱ्या लोकांची मजबुरी आहे, किंवा काही लोकांकडे पैसा पण आहे म्हणून, जर कोणी घेणारच नसेल तर भाव वाढणार नाहीत असं समजतात.

आता आरबीआय असं काही झालं ( म्हणजे इंडेक्स वाढला)  की सरळ इंट्रेस्ट रेट्स वाढवते -उद्देश असा की मार्केटमधला पैसा शोषून घेतला जावा सिस्टीममधे म्हणून.. एकदा इंट्रेस्ट रेट्स वाढले की मग फॉरिन इन्व्हेस्टर्स ला भारतिय मार्केटचा लालीपॉप खुणावु लागतो, आणि फॉरीन इन्व्हेस्टमेंट वाढते. हा आलेला सगळा पैसा शेअर मार्केटमधेच लावला जातो.

जस पतंग दिव्यावर झेप घेतो तसे ,तुमच्या आमच्या सारखे लोकं मग दररोज चढणारा हा इंडेक्स बघुन या कडे आकर्षित होतात, आणि जेंव्हा मार्केटमधे झेप घेतात तेंव्हा  शेअर उतरायची वेळ झालेली असते, आणि तुम्ही तोंड्घशी पडता ( मी पण त्यातलाच ).  टु बी ऑन सेफर साईड ,कांही लोकं एफ डी मधे वगैरे पण पैसा गुंतवतात.

अर्थ शास्त्रज्ञांचं काही समजत नाही काय आहे ते.. महागाई वाढण्याच काम अन्न धान्याची सटटेबाजी करण्यास सरकारने दिलेली  परवानगी तर नाही? सट़्टेबाज याच गोष्टींवर सट़्टा खेळतात आणि भाव वाढवून ठेवतात. या वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. सगळा फायदा हे दलाल लोकंच घेतात. कित्येक टन इम्पोर्ट केलेलं आणि लेव्ही मधे जमा केलेलं  धान्य एफ सी आय च्या गोडाउन मधे सडत पडलंय, आणि त्याची कुणालाच शुध्द  नसते…

कंपन्या रेसेशनच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यास टाळतात. तसेच इतर बेनिफिट्स  पण टाळतात. असं असतांना मार्केटमधे पैसा वाढलाय हे कसे तेच मला समजत नाही. भारतामधे पॅरलल एकॉनॉमी ही काळ्या पैशात चालते असं म्हणतात कदाचित तेच कारण असेल . पण ज्या लोकांना काळ्या पैशाचं इनकम नाही , त्यांची मात्र परिस्थिती अतिशय वाईट आहे.

काल मेल मधे एक कार्टुन आलं होतं. ते पोस्ट करतोय. अतिशय सोप्या भाषेत इन्फ्लेशन म्हणजे काय ते सांगितलंय.. मी एकॉनॉमिस्ट नाही, तेंव्हा जे काही वर लिहिलंय ते ्चूक पण असु शकतं.. मला जे वाटलं ते लिहिलंय. पण जर तुम्हाला काही चुकिचं वाटंत असेल तर कृपया चूक कुठे झाली आहे हे सांगितल्यास बरे होईल..

 

रेसेशन ऍज एक्स्प्लेंड बाय सरदारजी

 

असंही असतं..

Written by  on December 18, 2002

वाण्याकडून किराणा आणण्याचे दिवस कधीच संपले. लहानपणी  बरं होतं, वाण्याकडे यादी नेऊन टाकली की तो आपला पेपरच्या पुड्यांमधे सगळा किराणा बांधून द्यायचा. तेल , तुप साठी डबे न्यावे लागायचे. पण प्लास्टीक ,आणि ट्रेट्रपॅकने तर क्रांतीच केली… आजकाल तर वाण्याकडे जाउन किराणा आणणं बंदच झालंय…

आपण जेंव्हा डिमार्ट, बिग बझार वगैरे ठिकाणी किराणा सामान आणायला जातो, तेंव्हा फक्त समोरच्या शेल्फ वरचं सामान काढून ट्रॉली मधे भरतो. सामान घेतांना पण शक्यतो कुठल्या शॅंपुच्या बाटली सोबत टिक्सो टेपने दुसरी बाटली लावलेली आहे, किंवा केचप च्या मोठ्या बाटली बरोबर कुठली लहान बाटली सोबत आहे का इकडेच थोडं जास्त लक्ष असतं आपलं..  ( माझं तरी असतं बॉ…. )

ही अशी अट्रॅस्क्शन्स तर नेहेमीच आपल्याला खुणावत असतात. पण ह्या अशा वस्तु घेतांना आपण एक गोष्ट विसरतो, की जगामधे काहीच फुकट मिळत नाही, आणि जेंव्हा काही फुकट मिळतंय असं दिसलं, तर त्यामधे नक्कीच कांहीतरी काळं बेरं आहे असं समजायला हरकत नाही.

मागच्याच आठवड्यात आम्ही जेंव्हा डिमार्ट ला गेलो, तेंव्हा हेंझ च्या केचप वर एकावर एक बाटली फ्री होती. मला तर बारीक अक्षरं दिसत नाहीत, आणि चष्मा फक्त रिडींगचा असल्याने फक्त वाचतानाच लावतो. धाकट्या मुलीला मात्र प्रत्येक लेबल बघायची सवय आहे. (टिव्ही वर नेहेमी जाहिरात असते, म्हणून.. ) तिने सहज एक्स्पायरी डेट बघितली तर ती फक्त २२ दिवसा नंतरची होती.

आता दोन बॉटल्स आपण २२ दिवसात  संपवू शकतो का? नाही.. म्हणजे तुम्ही फुकट मिळते म्हणून ती बाटली घरी आणणार, आणि एक्स्पायरी डेट नंतर वापरणार… असं नेहेमीच होतं.  हाच प्रकार मला लेज, भुजिया पॅकेट्स, वगैरेच्या बाबतीत पण आढळला.

 

बोर्डींग पास वर १० डिसेंबर आणी टेट्रापॅक वर जुन ०६ दिसतंय.. म्हणजे जवळपास सहा महिने पुर्ण होताहेत.

 

आता रिसेंटली हैद्राबादेहून जेट एअर  ( फुल सर्व्हिस ) ने आलो. तेंव्हा फ्लाईट मधे सुरुवातीला मॅंगो जुस चं पॅकेट दिलं होतं. जुसची चव थोडी बिघडल्या सारखी वाटते म्हणून तक्रार केली, तर त्याने दुसरा जुस आणून दिला, पण त्याची पण चव खराब लागत होती. सहज डब्यावर एक्स्पायरी डेट पाहीली आणि लक्षात आलं की सहा महिने पुर्ण होऊन गेले आहेत.

आत  ताज सॅट ची सर्व्हिस म्हंटल्यावर तर कमीतकमी आपण अशी अपेक्षा ठेवतो की   अशा एक्स्पायरी डेट च्या जवळपासच्या वस्तु तिथे सर्व्ह केल्या जाणार नाहीत.. पण तसं नसतं.एक शिकलोय या अनुभवावरून की एक्स्पायरी डेट नक्कीच पहायची.. कुठेही..!!!

लग्न करायंचय? मग हे वाचा..

Written by  on December 10, 2002

imagesकाल एक मेसेज आला, की आता मुलगी पहायला जायचंय तेंव्हा काय बोलावं तिच्याशी हेच कळत नाही. अर्ध्या तासात काय काय बोलणार? आणि तिच्याबरोबर आपले लग्नानंतर पटेल की नाही हे कसे काय समजणार? खुप कन्फ्युज झालोय म्हणाला तो.

पुर्वीच्या काळी बरं होतं, मुलगी पहाण्याचा कार्यक्रम व्हायचा, अगदी पद्धतशीर पणे घरची सगळी वडीलधारी मंडळी आणि नवरा मुलगा मुलीच्या घरी जायचे, मग आधी मोठे सगळे मुलीला प्रश्न विचारायचे, ते पण ठरलेले.. तुला गाणं येतं? स्वयंपाक येतो? काय छंद आहेत तुझे? वगैरे वगैरे.. झाल्यावर मुलाला पण तुला काही विचारायचं असेल तर विचार म्हणुन सांगितलं जायचं. आता इतक्या वडीलधाऱ्यांसमोर काही विचारायची हिम्मत त्याची कधीच व्हायची नाही, आणि मुलगा बिचारा खाली मान घालुन, वडिलधाऱ्यांच्या नकळत तिच्याकडे बघुन उगीच आपलं, काही नाही असं म्हणुन वेळ मारुन न्यायचा.

हल्ली दिवस बदलले आहेत, मोठ्या शहरात आधी मुलगा मुलीला बाहेरच कॉफी हाउस मधे भेटतो, आणि मग तिथेच दोघांचं बोलणं होतं. बरेचदा ज्या गोष्टी प्रोफाइल मधे दिलेल्या नसतात- जसे नॉनव्हेज खाणे, ड्रिंक्स घेणे, स्मोकिंगची सवय आहे का वगैरे वगैरे, आणि ह्या प्रश्नांची उत्तरं खूप महत्वाची असतात, शेवटी बरोबर रहायचं असतं पुढचं संपुर्ण आयुष्य. पण तरीही एखाद्या अनोळखी मुलीबरोबर काय बोलायचं? आणि मग दोघेही नुसते बसुन रहातात , बोलायला विषयच सुचत नाही, तेंव्ह परिक्षेत तयारी न केलेला प्रश्न आलाय, आणि त्याचे उत्तर येत नाही अशी काहीशी अवस्था होते.

खरंच, मुलगी पहायला जातांना किंवा मुलगा पहायला जातांना थोडी तयारी करुन गेलं तर? म्हणजे काय प्रश्न विचारायचे ह्याची मनातल्या मनात उजळणी केली तर नक्कीच थोडा मोकळेपणा येईल, आणि गप्पा मारायला विषयही सुचतील. काही सॅंम्पल प्रश्न खाली देतोय, त्यात तुम्हीही तुमचे खास प्रश्न ऍड करु शकता. या प्रश्नांची योग्य/अयोग्य अशी काही उत्तरं नाहीत!

१) स्वयंपाकाची आवड आहे का? आणि स्वयंपाक करता येतो का? हा प्रश्न दोघेही एकमेकांना विचारु शकतात. नोकरी करणाऱ्या मुलीने ह्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच विचारावे.
२) मी पण नोकरी करते, तेंव्हा घरी यायला वेळ होईल, तेंव्हा स्वयंपाक घरात मदत करण्याची तयारी आहे का?  बरेचदा, काही मुलं मला चहा पण करता येत नाही हे अभिमानाने सांगतात. अशा मुलाची घरामधे कितपत मदत होईल हा प्रश्नच आहे.
३)तु स्वतःला दहा वर्षानंतर कुठे पहातेस/ पहातो? तुझे लॉंग टर्म गोल्स काय आहेत?
४) करीअर बद्दल तुझ्या काय कल्पना आहेत?
५)तुला कशामुळे आनंद होतो? म्हणजे अगदी ब्राउन पेपर पॅकेजेस टाईड विथ द स्ट्रिंग्ज, दिज आर माय फेवरेट थिंग्ज- हे अशा प्रकारचे उत्तर आले तर अजूनही स्वप्निल दुनियेत वावरते/ वावरतो आहे असे समजायला हरकत नाही.
६)धार्मिक संकल्पना, सोवळ्या- ओवळ्या वगैरे बद्दल काय वाटतं? धार्मिक विचार कितपत दृढ आहेत? उपवास तापास वगैरे बद्दल काय संकल्पना आहेत?
७)तुझ्या फ्लॅटचे किती लोन शिल्लक आहे? की फ्लॅट पेड अप आहे?
८)  नोकरी करायला आवडते का? की लग्नानंतर नौकरी करणे सोडणार ?
९)कुठल्या सिरियल्स आवडतात?
१०) हॉबी कुठली आहे?
११)तुझ्या आई वडिलांशी तुझे नाते कितपत क्लोज आहे?
१२)तुला कुठला पोलिटीकल नेता आवडतो? आणि का?
१३)तुला शहराच्या कुठला भाग रहायला आवडतो?
१४) तुला अगदी जवळचे किती मित्र मैत्रिणी आहेत?
१५) इंटरनेट चा उपयोग फेसबुक आणि इमेल सोडुन कितपत करते/करतोस? बॅंकिंग व्यवहार वगैरे येतात का?
१६) तु केलेली सगळ्यात डेअरींग बाज गोष्ट?
१७)तुझ्या फॅमिली मधे कोणाला ब्लडप्रेशर ,डायबिटीस वगैरे सारखे अनुवंशिक रोग आहेत का?
१८) ब्लडगृप कुठला आहे?
१९) माझी सिटीसी अमुक अमुक आहे- तुझी किती आहे?
२०) ब्लड टेस्ट   करण्याची तयारी आहे ? Very Important.
२१) तु केलेली सगळ्यात वाईट आणि चांगली गोष्ट?
२२) तुला सुटीच्या दिवशी आयडिअली  काय  करायला आवडतं?
२३) डिनर मधे कधी तरी ब्रेकफास्ट च्या वस्तू चालतील का? जसे कॉर्नफ्लेक्स वगैरे..
२४)इन्कम टॅक्स चे रिटर्न्स स्वतः भरले आहेत की कोणाकडून भरुन घेतोस/घेते?
२५)कपडे विकत घेतांना एकटा /एकटी जातो/जाते की आई वडिल सोबत असतात?
२६) तुला कधी पोलिस स्टेशनला जायचे काम पडले होते का?
२७) घरच्या कामाची जबाबदारी दोघांनी इक्वल घेण्याची तयारी आहे का? जसे भाजी चिरुन द्यायला मदत करणे , घर आवरायला मदत करणे  इत्यादी.
२८) बॉय फ्रेंड/गर्ल फ्रेंड होती का? आणि असेल तर ब्रेक अप चे कारण?
२९) तुला मुलं आवडतात का? साधारण पणॆ लग्नानंतर किती वर्षांनी मुलं व्हावी असे वाटते?
३०) तुला गावाकडे सुटी मधे रहायला आवडेल का? ( जर आई वडील गावाकडे असतील, तर हा प्रश्न महत्वाचा)

३१) पत्रिका पहायची आहे का?  आणि कितपत विश्वास आहे पत्रिकेवर?

आता वरच्या प्रश्नांची अशी बरोबर म्हणुन काही उत्तरे नाहीत. जी काही उत्तरं मिळतील त्यावरुन आपले समोरच्या व्यक्तीशी जुळेल की नाही हा अंदाज बांधता येइल.