सानियाचं लग्नं…

Written by  on August 26, 2002
^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/sani-burqa.jpg)

सानिया मिर्झा लग्नानंतर जेंव्हा कोर्ट वर टेनिस खेळायला जाईल तेंव्हा अशी दिसेल कां?

सानिया  मिर्झा , लग्नानंतर टेनिस कोर्टवर जातांना कशी दिसेल? त्याचा एक नमुना म्हणजे हा फोटो, कदाचीत हा फोटॊ इस्लामी मूलतत्ववाद्यांच्या मतानुसार ’कमी कपडे घातलेला’ असू शकतो, पण हा ड्रेस पाहून तिच्या पुढील रूपाची कल्पना नक्कीच करू शकता.

सानिया मिर्झा-एक दुसरी मुर्ख मुलगी. रीना रॉयने ( ही एक प्रसिध्द नटी होती भारतातली)पाकिस्तानी क्रिकेटिअर मोहसीन खान सोबत लग्न केलं होतं आणि नंतर ती पाकिस्तानात गेली होती. मला तर असं वाटतं की मोहसिन खानला हिंदी सिनेमात काम करायचे होते, म्हणूनच त्याने रीना बरोबर लग्न केलं असावं  !! कारण  लग्नानंतर त्या मोहसिनने भारतात येउन सिनेमात काम करण्याचा प्रयत्न केला आणि टोटल फेल्युअर गेला. लवकरच दोघांचंही बिनसलं, आणि ते पण इतकं की शारीरीक उत्पिडनापर्यंत हे नाते संबंध पोहोचले, आणि रीना रॉय भारतात परत  निघुन आली.

इमरान खान स्वतः तर  पाकिस्तानचा आयकॉन. भरपूर पैसे कमावून रिटायरमेंट घेतल्यावर एका मल्टीमिलिनिअर मुलीशी -जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न केलं. फेअरी टॆल प्रमाणॆ सुरुवातीचे काही दिवस तर बरे गेले, पण नंतर लवकरच दोघांचेही पटेनासे झाले म्हणून   डिव्होर्स घ्यावा लागला.इंग्लंड मधिल एका प्रतिथयश उद्योगपतीची मुलगी, पण  पाकिस्तानात असतांना अल्ट्रा मॉडर्न जेमीमाला पण डोक्यावर स्कार्फ बांधुनच घराबाहेर पडायची सक्ती केली जात होती. काही दिवस जेमीमाने सहन केले पण लवकरच डिव्होर्स घेतला आणि परत आपल्या वडिलांकडे  निघुन गेली.

इतर देशातल्या  ज्या स्त्रियांनी पाकिस्तानी क्रिकेटीअर्सच्या बरोबर लग्न केले आहे त्या सगळ्यांचेच असेच आयुष्याचे धिंडवडे निघालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अर्थात सानियाला  माहिती नसतील असे समजून चालणार नाही .  आपल्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय तिने  अशा पध्दतीने घेतलेला बघून थोडं विचित्र वाटतंय.

सानिया मिर्झा ला   भारतामधे- जगात सगळ्यात जास्त मुस्लीम लोकसंख्या  (२० कोटी)असलेल्या देशात पण  लग्नासाठी योग्य असा एकही मुलगा   कसा सापडला नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.

मुंबईचे बॉम्ब ब्लास्ट, २६/११ चा कसाबचा अटॅक , रेल्वे लोकल बॉम्ब ब्लास्ट या सगळ्या गोष्टींमधला पाकिस्तानचा हात सिध्द झालेला आहेच, आणि तरी पण या मुर्ख मुलिने एका पाकी माणसाशी लग्न करावे यातच तिची देशाबरोबरची इंटिग्रिटी /देश प्रेम  कितपत आहे  हे स्पष्ट होते. आजपर्यंत जे भारताकडून खेळली ते पण एक जन्माने भारतिय आहे म्हणून, देशावर प्रेम आहे म्हणून नाही असे विचार मनात आले तर त्यामधे काही चूक आहे असे वाटत नाही.

हैद्राबादी मुस्लीम लोकांना पाकिस्तान आणि दुबईचं फार जास्त कौतूक आहे. दुबईला शेख लोकांना अगदी कमी वयाच्या ( १० वर्ष) मुलींशी लग्न लाउन देणे आणि सेक्स स्लेव्ह म्हणून  विकणे हा इथे नेहेमीचाच प्रकार आहे. अशा कित्तेक मुली लग्न करून दुबईला गेलेल्या आहेत , सुरुवातीला कुठल्या तरी शेख च्या हारेम  मधे दिवस काढायचे आणि मग त्या शेखचा इंटरेस्ट संपला की कुठल्यातरी कुंटणखान्यात जाउन पडायचं.. किंवा सेक्स स्लेव्ह म्हणून दुसरा कोणीतरी गाठायचा .

सानिया मिर्झाचं लग्न व्हायचं आहेच, पण त्यापुर्वीच  एका इंटरव्ह्यु मधे सानियाने   पाकिस्तान कडून खेळले पाहिजे असे मत  पाकीस्तानी क्रिकेट बोर्डाचे इयाज भट यांनी व्यक्त केलेले आहे.. त्यांचे म्हणणे आहे की पाकिस्तानी प्लेअरशी लग्न केल्यावर ति पाकिस्तानी नागरीक होईल म्हणून तिने  पाकिस्तान कडुन टेनिस खॆळावे.

ही घटना हैद्राबादच्या त्या समुदयाची पाकिस्तानशी असलेली मानसिक जवळीक दाखवते. आमच्या लहानपणी एक जोक होता, म्हणायचे इथे असेही काही लोकं आहेत की जे इंग्लंडला थंडी पडली की भारतामधे कोट घालतील, त्या टाइपच्या लोकांच्यामधे आणि या अशा पाक धार्जिण्या लोकांच्या मधे तसेच साम्य दिसते मला.

सानियाची भारतीय सिटीझनशिप तिने पाकिस्तानी माणसाबरोबर लग्न केल्याबरोबर कॅन्सल करण्यात यावी असे वाटते.  सेक्युलर मिडीयाने ह्या न्युज ला अगदी पहिल्या पानावरची बातमी बनवून अवास्तव महत्व दिलेले आहे. सानियाला लग्नानंतरपण भारताकडुन खेळण्याची इचछा आहे अशा बातम्या हेतुपु्रस्सर पसरवल्या जात आहेत. टीव्ही चॅ्नल्स तर ह्या घटनेला नॅशनल इम्पॉर्टन्स ची घट्ना म्हणून ब्रेकिंग न्युज मधे दाखवित आहेत.

रीनाचे, जेमीमाचे  निघालेले धिंडवडे  बघुन तरी इतर भारतीय स्त्रियांनी बोध घ्यायला हवा होता.. पण नाही! आगीत उडी घ्यायची आणि मग अंग पोळतं म्हणून ओरडायचं  !!

तुम्ही कशावर झोपता?

Written by  on August 20, 2002

तुम्ही कशावर झोपता??

हा प्रश्न जो विचारतोय त्याला काही अर्थ आहे. कदाचित काही लोकं म्हणतील गादी, पलंग , सतरंजी, चटई वगैरे आणि  काही तर म्हणतील की तुम्हाला काय करायचंय? माइंड युवर ओन बिझिनेस- कुठेही झोपू आम्ही  !! आजपर्यंत मला असं वाटायचं की आपण पलंगावर झोपतो म्हणून. पण तो गैरसमज होता हे लक्षात यायला खूप वर्ष जावी लागली. काहीतरी निरर्थक लिहितोय आणि टाइम पास करतोय असं वाट्तय का??   मला वाटतं  सगळं काही खुलासेवार सांगावच लागेल.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/bedbug5250.jpg)

ढेकूण

तर -आमच्या घरी ढेकुण झाले! ढेकुण झाले ही काही अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट नाही – आणि ही गोष्ट जेंव्हा एका मित्राजवळ बोललो आणि त्याला म्हंटलं की उद्या यावर लिहितो ब्लॉग  !तर त्याच म्हणणं होतं की  ढेकुण झाले ही काही ब्लॉग वर लिहायची गोष्ट नाही खरं तर  ढेकुण झाले, ही गोष्ट लोकांना कळू देऊ नकोस !! किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही!!

म्हंटलं- कां रे बाबा? ढेकुण कुणाच्याही घरी होऊ शकतात, आणि तू तर   ’ढेकणांचे अस्तित्व लपवून ठेवणे म्हणजे मला माझ्या अनौरस मुलाचं अस्तित्व लपवून ठेवण्यासारखी  गोष्ट असल्या सारखा बोलतो आहेस तू?

खरं सांगायचं तर   इतक्या वर्षांमधे ढेकुण कसा दिसतो हे विसरूनच गेलो होतो. किशोरकुमारचे ते गाणे आहे नां – धिरेसे जाना रे खटीयन मे- ओ खटमल- त्या गाण्यातच  ढेकुण पाहिला होता.रिअल लाइफ मधे ढेकुण पाहिलाच नव्हता कधी.  इतक्या वर्षांमधे घरी ढेकुण होण्याची   ही पहिली वेळ ! आणि पहिलटकर्णीचे कौतुक करण्याची परंपरा आहेच आपल्या मधे  – नाही का?? त्यामुळे ढेकुण झाल्याचं कोतुकच वाटत होतं.

ढेकुण झाले हे लक्षात कसं आलं? एक दिवस दुपारी आम्ही पलंगावर लोळत पडलो होतो, तेंव्हा  एक बारीकसा किडा दिसला तुरु -तुरु धावत जातांना. कौतुकाने त्याला चिमटीत धरले आणि पहातो तर काय – ढेकुण!! आता हा ढेकुण आहे की एखादा बारीक किडा आहे यावर सौ. सोबत गहन चर्चा झाली आणि निर्णय झाला की हा ढेकुणच असावा, कारण, रात्री जे काही चावत, ते डास नसावेत!! मुलींना पण मोठया कौतुकाने बोलावून ढेकुण म्हणजे मराठी मधे  (!)तो  ’बेड बग’ दाखवला.  🙂   नेट वर जाउन ’बेड बग’ कसा दिसतो याचा  शोध घेतला आणि एकदाचं तो  ( आम्हाला सापडलेला ) ढेकुणच आहे यावर शिक्कामोर्तब  केले.

हे सगळं शोधतांना , ढेकणांची लाइफ सायकल पण सापडली नेट वर. त्या मधे म्हटलंय की दररोज पाच अंडी देते मादी.. हे वाचलं आणि  घाबरलोच- आणि ताबडतोब पेस्ट कंट्रोल करायचं हे ठरवलं!!!

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/bblifecycle.jpg)

ढेकणांची लाइफ सायकल..

बरं एवढं झाल्यावर आपल्या लक्षात का आलं नाही इतके दिवस? म्हणून स्वतःलाच   शिव्या शाप, वगैरे आणि माझ्यावर दोषारोपण – तुम्ही टु्रला जाता हॉटेल्स मधून तुमच्या बॅगेत येतात ते , किंवा विमानात चेक इन  बॅगेज मधे एकत्र बॅग असतात तिथुन आले असतील वगैरे  वगैरे… सगळं काही तुमच्या घरी होतं तस्संच – झालं आमच्या घरी पण. आणि आपल्या घरी हे  न बोलावलेले पाहूणे आले तरी कुठुन? ह्याचा पण शोध घेतला .

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/bedbugs.jpg)

ढेकुण गादी मधे असे रहातात. याच दुमडी मधे तुम्हाला काळसर रंगाची अंडी पण दिसतिल त्यांची.

त्याच  दिवशी  रात्री  दोन वाजता काहीतरी चावलं, ( दुपारी ढेकुण सापडल्यामुळे ) म्हणून उठून लाईट लावून बघितलं तर एक पाहुणा तुरु तुरु चालत गादी खाली गेला. गादीवरची चादर बाजूला करून पाहिली तर तिथे त्याची पुर्ण फॅमिली दिसली  🙂 आणि ठरवलं की बस्स!! खूप झालं आता! यांना वाटेला लावलेच पाहिजे आता   लवकरच!!पेस्ट कंट्रोल साठी ऑफिस मधे सांगावं लागेल. आता ऑफिस मधे युजवली झुरळांसाठी पेस्ट कंट्रोल सांगायला काहीच वाटत नाही, पण ढेकुण साठी कसं सांगायचं??

सगळ्यांनी ढेकुण या विषयी इतकं वाईट साईट सांगितलं – आणि मलाच दोष दिला  की आपल्या घरी ढेकुण झाले , या मागे पाकिस्तानचा हात असावा , आणि म्हणून पाकिस्तानला इशारा द्यायला मनमोहन सिंग यांना सांगितलं आहे असं सांगावं लोकांना,  असाही विचार आला मनात एकदा .शेवटी इस्टेट डिपार्टमेंटच्या इंचार्ज ला फो्न केला आणि सांगितलं, की बेड बग्स के लिये  पेस्ट कंट्रोल करना है.. यावर  तो म्हणाला- साब , आपके यहां  भी?? म्हंटलं, मतलब क्या है तुम्हारा? और किसके यहां किया?? तर म्हणतो, आपका सातवा फ्लॅट है पिछले महिनेसे- छे लोगेके यहां करा चुका हूं.. . आजकल  सब लोक तो कॉक्रोचके साथ बेड बग के लिये भी  पेस्ट कंट्रोल करके लेता है ……….ब्ला ब्ला ब्ला ब्ला…. बरंच काही सांगत होतो.तर शेवटी ठरलं की शनिवारी करायचं पेस्ट कंट्रोल. त्या माणसाचा फोन पण आला, आणि नक्की केल्ं की दुपारी ११ वाजता तो येईल आणि……….

बेड ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/180420103649.jpg)

हिच ती लोखंडी हिंज..

आमचा पलंग.. ६ फुट बाय ६ फुट असलेला ( ३ फुटाचे दोन जोडलेले बॉक्स बेड्स) तो पलंग गेल्या कित्येक वर्षात आपल्या जागेवरून हललेला नव्हता. त्या दोन्ही पलंगाखाली बॉक्स आहेत. बऱ्याच गोष्टी – ज्यांची गरज नसते त्या सरळ त्या खालच्या  बॉक्स मधे टाकुन देत असतो आम्ही.  आज जेंव्हा तो पेस्ट कंट्रोलवाला आला , तेंव्हा पहिल्यांदा त्या पलंगामधे असलेलया सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या त्याने मोठं इंटरेस्टींग प्रकरण होतं ते. तुम्हाला मी सुरुवातीला विचारलं नां- तुम्ही कशावर झोपता?? हाच प्रश्न तुम्ही जर मला विचारला असता,तर कदाचित ’दुपट्यावर’ असं उत्तर द्यावं लागलं असतं मला. माझ्या पलंगावर गादी खाली एक दुपटं (प्लास्टीकच) गेल्या १३ वर्षापासून पडलेले असावे. मुलगी मोठी झाली आणि बऱ्याच गोष्टी तर टाकुन दिल्या, पण एक दुपटे मात्र गादीखाली असलेली लोखंडी हिंज गंजल्याने गादी खराब होऊ नये म्हणून तिथे टाकलेले होते. गादी  बाजूला केली आणि ते दुपटं पाहिलं आणि स्वतःशीच  हसायला लागलॊ. तो पेस्ट कंट्रोल वाला आणि  सौ. माझ्या कडे काय विचित्र माणूस आहे म्हणून पहात होते.. मी हसू दाबतंच ते दुपटं बाहेर काढलं आणि आता त्या ऐवजी आपण एखादी जुनी चादर टाकू असे ठरवले.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/180420103653.jpg)

रेकॉड प्लेअर, व्हिसीआर, रेकॉर्ड्स इत्यादी सगळं स्वच्छ केल्यानंतरचा आहे हा फोटॊ.

एका पलंगा मधे तर एक्स्ट्रॉ गाद्या, चादरी वगैरे होत्या , की ज्या कोणी पाहुणे आले की वापरायला काढले जायचे, पण दुसऱ्या पलंगा मधे जेंव्हा उघडला तेंव्हा तिथे जे काही होतं ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. लहान मुलीच्या लहानपणीची स्वयंपाकाची खेळ भांडी, गॅस, फ्रिझ, मिक्सर वगैरे कौतूकाने आणलेला खेळ. पितळेचा खेळ, लाकडी पोळपाट लाट्णं.. अगदी लहानसं, रिमोट कंट्रोल कार- १७ वर्ष जुनी – मोठ्या मुलीची लहानपणीची कार , स्क्रॅबल, सापशिडी- ह्या खेळांशी गेल्या दहा वर्षात कोणीच खेळलेलं नाही, एक डॉल हाउस!! आणि असेच लहान लहान खेळणी,स्केच पेन्स, डॉल हाउस फोल्डींग करुन ठेवलेलं, जुने एक्स रे, वगैरे वगैरे…..

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/180420103648.jpg)

पलंगामधली इस्टॆट.. जमा करून ठेवलेली.. मराठी पुस्तकांना कपाटं, आणि इंग्रजी पुस्तकं मात्र असे पलंगाच्या बॉक्स मधे बहुत नाइन्साफी है ये.. राज ठाकरे नक्कीच बक्षीस देतील मराठी पुस्तकांचा योग्य मान राखून कपाटात ठेवल्या बद्दल नाही हो, तर ही इंग्रजी पुस्तकं अशी पलंगात टाकली म्हणून.. वाट पहातोय मी. कदाचित उध्दव पण देईल काय सांगावं??

एक जुनं टर्न टेबल ( रेकॉर्ड प्लेअर)  आणि जुन्या रेकॉर्ड्स ( काय करायचं आता त्यांचं?? ) .  रेकॉर्ड प्लेअरला टर्नटेबल म्हणायची पध्दत होती –  का म्हणतात हे माहिती नाही.  ऑप्टोनिका शार्प चा व्हिसीआर, त्याचा रि्मोट,  एक एच पी चा प्रिंटर ( ज्याची शाईची कार्ट्रीज  नेहेमी वाळून जायची काम पडलं की ,एचपी वाला म्हणायचा की हमेशा वापरो, अरे म्हंटलं घरच्या साठी घेतलंय, रोज कसं वापरणार?- घरच्या साठी इंकजेट प्रिंटर कधीच घेऊ नका)  शाली -काश्मिरहून आणलेल्या – गेली पाच वर्ष पलंगामधेच पडून आहेत , मुंबईला कधीच  गरज पडत नाही, आम्ही त्या  का बरं घेतल्या – आणि कशाला आणल्या  हेच मला आज समजत नाही – आईला किंवा नागपूरकर मंडळींना द्यायला हव्या  असं म्हणून गेली कित्येक वर्ष पलंगात पडुन आहेत त्या 🙂   पण अशा अनेक गोष्टी आपण गरज नसतांना विकत घेतो, आणि पुढे सांभाळत बसतो ..ह्या शाली पण त्यातल्याच! एक सुंदर पुस्तक पण सापडलं- ’दे लिव्ह्ड विथ गॉड्स’ आणि  बरीचशी जुनी वाचून झालेली पुस्तकं. हॅरी पॉटरचे सगळे भाग, वगैरे…  मराठी पुस्तकं छान कपाटात ठेवली असतात, पण इंग्लिश पुस्तकांना कायम अशी ्दुय्यम वागणूक दिली जाते आणि सरळ माळ्यावर किंवा पलंगामधे !!!

बर बरंच छळलं तुम्हाला, खरं तर ह्या पोस्ट मधे मला काय लिहायंचय हेच मला कळलेलं नाही. त्या मुळे तुम्हाला आपण एखादा शबाना काकुंचा आर्ट सिनेमा पहातोय असा भास होऊ शकतो. आणि तसं वाटलं असेल तर ………… ठिक है यार, माफी वगैरे काय मागायची?   आपला ब्लॉगच आहे काय वाट्टेल ते!!!!

कुच बिहार…

Written by  on August 15, 2002

साधारण २० एक वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा माझं पोस्टींग कलकत्त्या ला होतं . कलकत्ता ऑफिस  मधे सर्व्हीस इंजिनिअर म्हणून साधारणतः ७-८ महिने काढले. दार्जिलिंग डुवाट्स टी गार्डन चा एरिया ,असाम,  बिहार मधे टुर ला जावं लागयचं.

८ महिन्यांच्या पोस्टींग पैकी जास्तीत जास्त वेळ मी सिलिगुडी लाच राहुन तो सगळा एरिया कव्हर करत होतो. अगदी धुला बाडी  हा नेपाळ बॉर्डर आणि ईंडॊ भुतान बॉर्डर पर्यंत.

माझा एक स्वभाव आहे . मी नेहेमीच ओव्हर कॉन्फिड्न्स   असयचो. कुठलंही काम असलं तरी केंव्हाही तयार !कारण तरुण वय, काहीही करण्याची जिद्द, आणि अंगात असलेली रग, ह्या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे त्यावेळचा “मी”.

एकदा कलकत्ता ऑफिस मधे बसलो असतांना आमचे त्या वेळचे बॉस जयदेव ह्यांनी बोलावले आणि सांगितले की तुला कुच बिहार ला कामासाठी जायचे आहे. ही गोष्ट आहे साधारणतः ५-६ महीन्या  नंतरची. तशीही मला आता सवय झाली होती , कधी बिहार, तरी उत्तर बंगाल ला जाण्याची.

बिहारचा बराचसा भाग अजुन ही पाहिलेला नव्हता. पण जेंव्हा सांगितलं की कुच बिहारला जायचयं, तेंव्हा कुच बिहार म्हणजे नक्कीच कुठेतरी बिहार मधे असेल असा मनाशी अंदाज बांधला आणि सरळ   कुणालाही   न विचारता मी सरळ बॅग उचलली आणि हावरा स्टेशन ला पोहोचलो. ब्लॅक डायमंड एक्स्प्रेस जी कलकत्ता ते धनबाद होती ती्ची वेळ झालीच होती, ती पकडली आणि सरळ धनबाद्ला पोहोचलो.

बरं, धनबादला पोहोचे पर्यंत कोणालाही काहीच विचारावेसे वाटले नाही. जेंव्हा स्टेशन उतरलो आणि बस स्टॅंड वर जाउन चौकशी करणे सुरू केले- कुच बिहारके लिये कौनसा बस जायेंगा? तेंव्हा, एक माणुस म्हणाला, साहब, आप सिधा कलकत्ता जाइये वहांसे आप कुच बिहार जा सकता है.

म्हणजे काय.. मी तर उडालोच, आणि  क्या कुच बिहार ,बंगाल मे है?? हा म्हणजे माझ्या साठी एक शॉक होता.भामट्या सारखा परत परत कलकत्त्याला गेलो आणि नेक्स्ट डे ला कुच बिहारला गेलो.

काम करुन परत आल्यावर ही गोष्ट जेंव्हा माझ्या ऑफिस मधे सांगितली तेंव्हा सगळे जण माझ्या मूर्खपणा वर हसत होते.. आणि मी सुद्धा…. कधी कधी किती मूर्खपणा करतो आपण नाही?