सेक्स पार्क.. चायना -चायना गोज क्रेझी..

Written by  on June 6, 2002

कधी तरी एखादी विचित्र बातमी सापडते चायनाच्या पेपर्स मधे. मी न चुकता तो पेपर एकदा नजरे खालून घालतो. भारता विरुध्द ओकलेली गरळ, आणि पाकिस्तान या ’मित्र’ देशाचा  ( फुकटात सियाचिनची दक्षणा दिली होती ना पाकिस्तानने चायनाला! – हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. तो   भाग भारताचा होता, पण पाकने तो चायनाला परस्पर देऊन टाकला 😦  ) असो.. विषय तो नाही.उगाच लिखाणाच्या ओघात आलं ते लिहिल्या गेलं.

ह्या चायनिज गव्हर्नमेंटच्या सिगारेट ओढण्याच्या नियमा बद्दल मागे एकदा लिहिले आहेच चायनिज वे टु फाईट रेसेशन ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/05/05/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%81-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8/) ह्या हेडींग खाली. आताची बातमी अजुन जरा जास्तच नाजूक आहे. कल्पना करा थीम पार्क ची.. काय येतंय डोळ्यापुढे म्हणण्यापेक्षा डोक्यात? वॉटर पार्क, किंवा म्युझिक पार्क, किंवा राइड्स पार्क, वगैरे वगैरे… पण कधी स्वप्नात तरी  विचार केलाय का ’सेक्स थीम पार्क’ चा??

नाही.. मला कांही वेड वगैरे लागलेलं नाही. इतकं घाबरायला काय झालं?  चायना मधे म्हणे आता सेक्स थीम पार्क तयार केल्या गेलाय. इथे कपल्स नी येउन काय ते शिकावं अशी अपेक्षा आहे.  इथे काय असेल हे मी तुमच्या कल्पना शक्ती वर सोडतो. चायना मधे पण इतर एशियन देशांप्रमाणे सेक्स हा टॅबो आहेच. कोंणीच बोलत नाही सेक्स वर. आणि न बोलल्यामुळे पसरलेले गैरसमज हे जास्तच डेंजरस असतात.

बरं तुम्हाला माहिती करता म्हणून सांगतो. की चायना हा पहिलाच देश नाही असा थीम पार्क तयार करणारा. कोरियामधे एक असाच पार्क ऑलरेडी आहे. मला आता पुर्ण खात्री आहे की कांही उत्साही लोकं आता कोरिया सेक्स थीम लव्ह लॅंड नावाचा कोरियन पार्क हा नॉर्थ आयलंड मधे छेजु कि शेजु नाव आहे त्याचं.. तिथे आहे .) पार्क चे फोटो गुगलुन काढतील. तसे त्या पार्कातले फोटो काढून कांही उत्साही लोकांनी नेट वर अपलोड केलेले आहेत. मी पाहिलेत.  एकदा विचार आला होता की इथे लिंक द्यावी. पण मग म्हंट्लं की नको.. ज्याला इच्छा असेल तो गुगलेल आणि पाहिल .

बाय द वे लंडन ला पण आहे असा एक थिम पार्क. अमोरा येथे आहे, ’द ऍकेडमी ऑफ द सेक्स ऍंड रिलेशन शिप’ ^(http://rangmarathiche.com/goto/http://travelblog.viator.com/amora-londons-sex-theme-park/).

मला पडलेला पहिला प्रश्न म्हणजे ह्याची काही गरज आहे का? ज्या गोष्टीवर जगाचं रहाट गाडग चालतं ती गोष्ट वाईट कशी म्हणता येइल? पण सोबतच ती गोष्ट सगळ्यांसोबत बाहेर पहाणं म्हणजे जरा अतीच होतंय असं वाटत नाही का तुम्हाला? कांही गोष्टी चार भिंतींच्या आतच बऱ्या वाटतात. रस्त्यावर नाही..