एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन

Written by  on May 30, 2002

मेडिकल कॉलेज मधून एम बी बी एस ची परीक्षा पास केल्यावर अगदी मनापासून आदिवासी लोकांची सेवा करण्याची इच्छा असलेले प्रकाश आमटे सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. नुकत्याच दिल्या गेलेल्या मेगॅसेस पुरस्कारामुळे त्यांचे नांव सर्वतोमुखी झालेले आहे. आज एका अशाच एका दुसऱ्या ध्येयवेड्याची  माहिती वाचनात आली.

मेळघाट!! म्हंटलं की काय आठवतं?? उपासमारीने खंगलेले मुलं. पिठाचं दूध करुन -म्हणजे पाण्यात पीठ कालवून मुलांना दुधाच्या ऐवजी पाजणाऱ्या त्या माता.कुपोषणाचे मृत्यु.. आणि मुख्य म्हणजे मुर्दाड मनोवृत्तीची प्रशासकीय यंत्रणा..

अशा परिस्थितीत डॉ कोल्हे यांनी एमबिबिएस नंतर या कोर्कू जमातीच्या सेवेसाठी इथे येउन प्रॅक्टिस करण्याचे ठरवले.एमबीबीएस नंतर दीड वर्ष मेळघाटात काम केल्यावर त्यांना असं वाटलं की आपलं इथलं काम झालेलं नाही.. म्हणून त्यांनी तिथेच राहुन गरिबांची सेवा करण्याचे ठरवले. गेली २४ वर्ष ते तिथेच रहातात. डॉ. रविंद्र कोल्हे. एम डी. हल्ली मुक्काम मेळघाट.. आदिवासींच्या मधे . यांची फी असते पहिल्या कन्सल्टेशनला २ रुपये, आणि नंतर फॉलो अप साठी १ रुपया. डॉक्टरांच्यावर रस्किन बॉंडच्या या स्टेटमेंटचा खूपच असर झालेला होता.. जर तुम्हाला मानवजातीची सेवा करायची असेल तर गरीब आणि निग्लेक्टेड लोकांची सेवा करा,आणि हे वचन अगदी अमलात पण आणलंय त्यांनी..

महाराष्ट्राच्या आणि मध्यप्रदेशच्या बॉर्डर वर असलेला एक आदिवासी विभाग..इथे नेमेची येतो पावसाळा प्रमाणे कुपोषण, बाल मृत्यु यांचं प्रमाणही खुप जास्त आहे. इतर भारतात १००० मुलांमधील जर ८ किंवा ९ मुलं दगावत असतील तर तेच प्रमाण या भागात २०० होते. पण एका ध्येय वेड्या डॉक्टर मुळे मात्र आता हे प्रमाण ६० वर आलेलं आहे. अर्थात, ही पण काही आनंदाची बाब नाही, पण दगडापेक्षा वीट मऊ.. म्हणून २०० पेक्षा ६० बरे असं म्हणायची वेळ स्वातंत्र्यानंतर ६२ वर्षांनी आलेली आहे. 😦

डॉ,. कोल्हे यांनी याच गोष्टी साठी पब्लिक लिटीगेशन केस दाखल केलेली आहे मुंबई हाय कोर्टात. यांनी ऍफेडेव्हिट फाइल केलंय आणि आता शासनाच्या उत्तराची वाट पहात आहेत. आता मी वर म्हटल्या प्रमाणे मुर्दाड मनोवृत्तीची प्रशासकीय यंत्रणा या नोटिशीला उत्तर पण अजुन देत नाही. डॉ. कोल्हे म्हणतात.. आम्ही काहीच करु शकत नाही आता…फक्त वाट पहाणं आमच्या हातात आहे.  😦

या भागात कोर्कु जमातीचे लोकं रहातात.  कित्येक किलोमिटर्स मधे अजिबात इलेक्ट्रिक सप्लाय नाही– कारण काय तर म्हणे टायगर रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे इथे विद्युत सप्लाय देता येत नाही.विज नाही, पाणी नाही.. खाण्याची व्यवस्था नाही. शासकीय स्वस्त धान्याची दुकानं नाहीत..इथे नुसती बोंबाबोंब आहे.ऍग्रिकल्चर बोर्ड बंद करण्यात आलेलं आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची पण करण्यात आली तर मग आदिवासींचे उन्हाळ्यात होणारे हाल वाचतील.

या आदिवासींच्या आयुष्याबद्दल बोलतांना डॉक्टर म्हणाले, की या आदिवासी लोकांची शेती केवळ पावसावरच अवलंबून आहे. सप्लिमेंट फुड म्हणून हे लोकं पुर्वी लहान सहान प्राणी मारुन खायचे जंगलामधे. पण आता सरकारने रिझर्व फॉरेस्ट म्हणुन घोषित केल्यापासुन शिकार करणे इल्लिगल झाले आहे. हे लोकं शिकार करतात, ते पोट भरण्यासाठी , शौक म्हणुन नाही.

इथला दुधाचा व्यवसाय.. मिल्क को ऑपरेटिव्ह सेक्टर पण फेल झालाय. कारण इथे जर्सी गाईंना पुरेसं खाद्य मिळत नाही, आणि देशी गाईंना पुरेसं दुध येत नाही.. !!!

बरं पोल्ट्री सुरु करावी म्हंटलं तर,या भागात पशूवैद्यक सुवीधा पण नाहीत. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांतच  बरीचशी कोंबडीची पिल्लं मरतात. कोंबड्यांना पहिल्या ३६ तासामधे व्हॅसिनेशन द्यावं लागतं.. पण ते देणार कोण?? म्हणून पोल्ट्री पण योग्य व्यवसाय होऊ शकत नाही.

सगळ्यात दुःखाची गोष्ट.. आदिवासींसाठी ४०० च्या वर स्किम्स आहेत, पण ज्यांची माहितीच आदीवासींना नाही. इथे वर्षातले १०० दिवस एम्प्लॉयमेंट देण्यासाठी  म्हणून नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम सुरू करण्यात आलेली होती. पण नंतर लवकरच बंद करण्यात आली. ज्या लोकांनी कामं केलीत त्यांचे पैसे पण या योजनेअंतर्गत देण्यात आलेले नाहीत असे भांडू साने, एका एनजिओ चे फाउंडर (खोज) म्हणतात.

या आदिवासींच्या कडून  कामं करुन घेउन त्यांचे पैसे बुडवणाऱ्या अधिकाऱ्यास चाबकाने फोडून काढले पाहिजे आणि सरळ जेलमधे टाकले पाहिजे, म्हणजे पुन्हा दुसरा कोणी अशी हिम्मत करणार नाही.

शासनाने एकच चांगली गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे या भागात ३०० शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. कोर्कू लोकांना प्रायमरी एज्युकेशन त्यांच्याच कोर्कु भाषेत दिलं जातं, ज्यामुळे शिक्षणाचा ओढा बराच वाढलाय.

नॅशनल  अवॉर्ड हे अशा ध्येयवेड्या व्यक्तिंना द्यायला पाहिजे.. धोनी , हरभजन ,हेलन ला किंवा ऐश्वर्याला सारख्या लोकांना नाही.. असं वाटणारे माझ्यासारखे बरेच लोकं असतील असे मला वाटते.

डॉ. कोल्हे यांचा सेल नंबर ९४२३१४६१८१, आणि लॅंडलाइन नंबर ०७२२६-२०२००२

असेच एक डॉक्टर सावजी म्हणून आहेत चांदुरबाजारचे. ते पण व्यसनमुक्ती केंद्र आणि हार्ट ट्रबल अवेअरनेस प्रोग्राम चालवतात. प्रयास नावाची एनजीओ आहे त्यांची. असे लोकं नेहेमी मागेच पडतात जेंव्हा  बक्षीसं वगैरे देण्याची वेळ येते तेंव्हा..

हा लेख रेडिफ मधे वाचलेल्या एका न्यूज वर अवलंबून आहे.मला खुप इन्स्पायरिंग वाटला, म्हणून इथे मराठीत लिहीलंय..

स्त्री पुरुष – इंटरेस्टींग सर्व्हे

Written by  on May 12, 2002

आयुष्यभरात पुरुष जवळपास एक वर्ष स्त्रियांच्याकडे पहाण्यात घालवतो. (  कोडॅक लेन्स व्हिजनने केलेल्या सर्व्हे चा रिपोर्ट) !

सर्वसाधारण माणुस दिवसभरात ४३ मिनिटे निरनिराळ्या स्त्रियांकडे बघण्यात ( वाया??) घालवतो.

म्हणजेच  वर्षातले ११ दिवस..

य़ाचाच अर्थ  पुरुषाचे  पन्नाशीला पोहोचे पर्यंत जवळपास ११ महिने आणि ११ दिवस  स्त्रियांकडे पहाण्यात वाया (???) जातात…

आणि हे सगळं  करतो ते १८ ते ५० वर्षाच्या रेंज मधे-!!!

काय वाटतंय वाचून?? क्रिमिनल वेस्टेज ऑफ एनर्जी???

अजिबात वाईट वाटून घ्यायचं कारण नाही!

कारण  ऍव्हरेज स्त्रिया पण दिवसभरात निरनिराळ्या पुरुषांकडे (दररोज  कमीत कमी निरनिराळ्या ६ पुरुषांकडे) पहाण्यात २०मिनिटे घालवतात.

म्हणजेच वयाच्या १८ ते ५० या रेंज मधे त्या सहा महिने वाया (!) घालवतात पुरुषांकडे पहाण्यात.

बरेच ( जवळपास १९ टक्के) पुरुष हे स्त्रियांनी त्यांच्याकडे पाहिलेलं एंजॉय करतात ..उरलेल्या ८०  टक्के लोकांच्या बद्दल काहीच लिहिलेलं नाही पेपर मधे.पण मला तरी वाटते की ते पण नक्कीच एम्ब्रॅस्ड फिल करत असतील . कारण आपण ( हं!!!!!!!!!) जेंव्हा एखाद्या स्त्री कडे पहातो, आणि नेमकं तिने पण जर आपल्याकडे पाहिलं तर आपण नजर आपोआप खाली झुकवल्याच जाते  ना?? का – तर आपण लाजतो? पण जर- तिने आपल्या कडे पाहिले नाही तर आपण (?????) करतोच ना एंजॉय तिचे सौंदर्य?  म्हणजे याचाच अर्थ असा, की जेंव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला न्याहाळता तेंव्हा तिने तुम्हाला पकडू नये अशीच अपेक्षा असते. आणि अपेक्षा भंग झाला की लाज वाटते.

पण स्त्रियांच्या बाबतीत हे परसेंटेज खूपंच वेगळं आहे.. कसं ते पहा इथे.. १६ टक्के स्त्रिया अनकम्फर्टेबल वाटतं,. तर २० टक्के स्त्रियांना लाज वाटते , त्या एम्ब्रॅस्ड फिल करता ( हे तर ३६ टक्के झाले.. पण इतर स्त्रियांचं काय हे दिलेलं नाही त्या सर्व्हे मधे 🙂 ) माझ्या मते पुरुषांच्या बाबतीत जे प्रपोर्शन आहे , तेच नेमकं स्त्रियांच्या बाबतीतपण खरं असावं!

४० टक्के स्त्रियांनी म्हंटलं की पुरुषांच्या डोळ्यांकडे आधी लक्ष जातं ,तर पुरुषांनी मान्य केलं की आधी फिगरकडे लक्ष जातं.चेहेरा नंतर पाहिला जातो.

टॉप ५ प्लेसेस..   आय व्हिटॅमिन्स 🙂 घेण्यासाठी:-बार, नाइट क्लब, शॉपिंग मॉल, वर्क प्लेस, ट्रान्सपोर्ट…

मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की कोडॅक ला हा सर्व्हे करणं सुचलं तरी कसं?? काही असो.. पण मला तरी हे स्टॅटस्टीक इंटरेस्टींग वाटलं. अर्थात, हा सर्व्हे केला गेला ब्रिटन मधे, जर भारतात केला गेला , तर कदाचित रिझल्ट्स वेगळे पण मिळतील .. कदाचित काय १०० टक्के रिझल्ट्स वेगळेच मिळतील..

एक गोष्ट कॉमन आहे पुरुष आणि स्त्रियांच्या बाबतीत, की जर त्यांना समजा एखादा पुरुष -स्त्री कडे ,किंवा स्त्री -पुरुषाकडे पहात असतांना, जर एखाद्या तिऱ्हाइत व्यक्तीने पाहिल्यास पुरुष किंवा स्त्री  लाजते,  ब्लश होते..

म्हणजे पहायला आवडतं, पण इतर कोणाच्या लक्षात यायला नको..  🙂  मला आज कळलं की लोकं डार्क शेड्स का वापरतात 🙂

म्हणजे हे जे कांही सगळं केलं जातं ते  ,चोरी चोरी चुपके चुपके..

(हा लेख आजच्या टेलिग्राफ मधे आलेल्या एका आर्टीकलवर आधारित आहे…)