पोपट मेला हो ssss…

Written by  on April 24, 2002

photo from net.

वापीचे एक हॉटेल. नेहेमीप्रमाणे काम आटोपल्यावर रुम वर जाऊन फ्रेश झालो, तेवढ्यात रुम बॉय काही हवे आहे का म्हणून विचारायला आला.  वापी चे लोकेशन  खूप इंटरेस्टींग   आहे  . एका बाजूला केंद्रशासित प्रदेश सिल्वासा, आणि दुसऱ्या बाजूला दमण, वापी मात्र गुजरात मधे. दमण आणि सिल्वासा ला भरपूर दारूचे बार आहेत, पण वापीला मात्र  गुजरात मधे असल्याने  दारूबंदी चा नियम लागू होतो, आणि त्या मुळे  एकही बार नाही, पण हॉटेल मधल्या रुम मधे मात्र रुमबॉय हवी ती दारू आणून देतो. दमण/सिल्वासा फक्त तीन – चार किमी दूर असल्याने, तिकडेच जायचे ठरवले.

गुजरात मधे दारू बंदी असली तरीही  दारू अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अगदी उघडपणे दारू विकली जाते. मला एक समजत नाही, हे दारूबंदीचे फॅड पाहिले की मला मात्र ती पोपटाची गोष्ट आठवते.  एक राजा असतो, त्याच्याकडे पिंजऱ्यात एक पोपट असतो, राजाचा तो खूप आवडता, एक दिवस तो पोपट मेला. आता राजाला सांगितलं तर वाईट वाटेल, म्हणून राजाला पोपट मेल्याचे कोणीच सांगत नाही, आणि राजाचे दरबारी लोकं पण  तो पोपट झोपला आहे असे म्हणून त्या मेलेल्या पोपटाच्या चोची मधे   दाणे भरवत रहातात.

दारू बंदीचा पोपटाची पण अशीच अवस्था झालेली आहे. ज्या कुठल्या ठिकाणी दारूबंदी आहे, तिथे अगदी दारूच्या नद्या वाहताहेत, पण सरकार मात्र मेलेल्या पोपटाला दाणे भरवल्या प्रमाणॆ दारू बंदीच्या पोपटाला दाणे भरवत बसले आहे.

गुजरात मधे ही अवस्था आहे, वर्धेला पण असाच प्रकार सुरु असतो. वर्धा जिल्ह्यातही दारूबंदी चा पोपट अजूनही पिंजऱ्यात बसवलाय. वर्धा जिल्ह्यातही दारू अगदी भरपूर मिळते. जिल्ह्याच्या सगळ्या  बाउंड्री वर दारूचे अड्डे आहेतच आणि त्याच सोबत वर्धा जिल्ह्यातही भरपूर प्रमाणात हवी ती दारू उपलब्ध आहे. दारूबंदीचा हा तमाशा अजून किती वर्ष सुरु रहाणार ते कोण जाणे.

महाराष्ट्रात तर दारू पिण्यासाठी तुम्हाला एक परमीट लागते. ही गोष्ट बार मधे जाणाऱ्या किती लोकांना ठाऊक आहे? जर तुम्ही बार मधे बिना परमीट दारू प्यायला बसलात तर तुम्हाला अटक  केली जाऊ शकते. जर एखाद्या दिवशी महाराष्ट्रात हा दारूचा परवाना तपासून , नसलेल्या लोकांना अटक करायचे ठरवले तर जेल मधे ठेवायला जागा पण पुरणार नाही.

हे दारूचे परमीट पूर्वी ३० रुपयांना मिळायचे. त्यात तुम्हाला एका डॉक्टरचे सर्टिफिकेट द्यावे लागायचे, त्यात लिहिलेले असायचे की ” मला तब्येतीच्या कारणासाठी दारूची आवश्यकता आहे, सबब, मला दारू  पिण्याची परवानगी देण्यात यावी..” असा काहीसा मजकूर असतो. माझ्याकडे पण २०  एक वर्षापूर्वी परमिट काढले होते, पण नंतर काही गरज पडत नाही म्हणून रिन्यु केले नाही. हे कायदे पण मोठे विचित्र आहेत, दारूच्या परमीटचा पण पोपट सरकारच्या पिंजऱ्यात आहे. जेंव्हा पोलीस  एखाद्या बार वर छापा घालतात, तेंव्हा या नियमाचा वापर केला जातो. असो..

तर आजचे पोस्ट या पोपटांच्या साठी.,  लोकं पुरेसे समजदार आहेत, ज्याला प्यायची आहे तो  कितीही कायदे केले तरी पिणार . हा दारुबंदीचा कायदा केल्याने लोकांनी दारू पिणे बंद केलेले नाही हे उघड गुपीत आहे,पण प्रश्न एकच आहे,सरकारला सांगेल कोण ” की पिंजऱ्यातला पोपट मेलाय म्हणून ” 

तालिबान – शरियत आणि भारत.

Written by  on April 9, 2002
तालिबानच्‍या मागण्‍यांच्या पुढे नतमस्‍तक होत पाकिस्‍तान सरकारने स्वात खोऱ्यासह नैऋत्‍य फ्रंटीयर प्रांतात शरीयत कायदा लागू करण्‍याची तालिबानींची मागणी मान्‍य    केलेली आहे.
अर्थात ह्या मान्यतेला अमेरिकेने कशी मान्यता दिली  हेच मला कळत नाही. एकीकडे अमेरिका तालिबानी लोकांशी लढते आहे अफगाणिस्थान मधे आणि त्या पार्श्वभूमीवर ही मान्यता का?? हे लक्षात येत नाही. अमेरिकेला कुठल्याही परिस्थितीमध्ये तालिबान्यांची ताकत वाढलेली नको आहे. तरी पण हा एक पुर्ण प्रांत तालिबान्यांच्या नियंत्रणाखाली देण्याचे प्रयोजन कळत नाही.
या उलट या भागावर अजुन जोरात हल्ला करुन तालिबान्यांना नेस्तनाबूद केले पाहिजे.माझी अपेक्षा अशी होती की अमेरिका आणि पाकिस्तान मिळून त्यांना पळता भुई थोडी करुन टाकतील. पण तसे झाले नाही.
दहशतवाद्यांबरोबर केलेल्या शांती करारास अमेरिकेकडून विरोध केला जात असतानाही या भागातील प्रशासनाने  एका करारावर स्वाक्षरी केली आहे  असे वृत्त वाचण्यात आले आहे. यावरुन एक सिध्द होते, वेळ प्रसंगी आपल्या आकावर पण दात विचकण्याची  हिंम्मत पण   ह्या पाकी कुत्र्यांमधे आहे .
या करारानुसार शरीयत किंवा इस्लामी कायद्यांच्‍या विरोधातील सर्व नियम व कायदे नष्‍ट करण्‍यात आले आहेत. तर याबाबतही संमती करण्‍यात आली आहे, की या भागात सैनिक असतील मात्र दहशतवाद्यांकडून हल्‍ला झाल्‍यासच प्रत्‍युत्तर दिले जाईल.दहशत वाद्यानी हल्ला केल्याशिवाय पाकिस्तानी सैनिक त्यांच्यावर हल्ला करणार नाहीत. म्हणजे असे… बघा एखादा तालिबानी खांद्यावर रॉकेट लॉंचर घेउन जात असेल , तरी पण त्यावर पाकी सैनिक त्याने हल्ला केल्याशिवाय हल्ला करणार नाही..
पाकिस्तान मधल्या स्वात नदी! ह्या नदीचे खोरे म्हणजे अगदी खजियार प्रमाणे पाकिस्तानचे स्वित्झर्लंड समजले जाते. केवळ १५० किलोमीटर वर आहे हा भाग इस्लामाबाद पासून.काय गंमत आहे नाही ? राजधानी पासून केवळ १५० किमी वर पाकिस्तानचे कायदे चालणार नाहीत.
निसर्ग सौंदर्याने नटलेला हा भु भाग म्हणजे पृथ्वी वरील स्वर्गच आहे.इथे काय नाही? पर्वत, हिरवळ, तलाव आणि निसर्ग सौंदर्य सगळं काही आहे इथे. नाही ती फक्त शांतता..कारण इतकं सगळं निसर्गाने दिलं पण सोबत एक शापही दिला.. तो म्हणजे हा  भाग जॉग्रोफिकली जरी पाकिस्तानला जोडला असला, तरीही इतका दुर्गम आहे, की त्या भागामधे तालिबान्यांनी आपले बस्तान चांगलेच जमवले आहे. जो पर्यंत मुश होते, तो पर्यंत ह्या भागामधे २५ हजारच्या वर पाकिस्तानी टृप्स तैनात केल्या गेले होते. पण नंतरच्या काळात ते बरेच कमी करण्यात आले.अजुन ही ट्रुप्स आहेत पण कमी प्रमाणात.
मिंगोरा हे ह्या प्रदेशातील महत्वाचे शहर. संपुर्ण तालिबानी कायदा इथूनच चालवण्यात येइल. कुठलीही केस असेल तरी तिचा निकाल इथेच लावण्यात येइल. हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट, काही नाही. पूर्वी हाय कोर्टांसाठी किंवा सुप्रीम कोर्टासाठी केसेस इस्लामाबादला नेल्या जायच्या. आता ते होणार नाही. ४ महिन्यात निकाल आणी शिक्षा सुध्दा..
  • आणि शिक्षा पण कसल्या डेन्जरस.. दगडाने ठेचून मारणे, बलात्कार प्रुव्ह होण्यासाठी कमीत कमी ५ साक्षीदार उभे करावे लागतील स्त्रीला तरच तो बलात्कार सिद्ध होईल अन्यथा , ऍडल्ट्री खाली तिलाच शिक्षा- दगडाने ठेचून मारण्याची दिली जाईल..
  • कुठलाही खेळ खेळणे हे तालिबान च्या दृष्टीने गुन्हा आहे.
  • इथे आज इस्लामी तालिबानी कानुन लागु करण्यात आला आहे. त्या नुसार, प्रत्येक खटल्याचा निकाल हा ४ महिन्यात लागलाच पाहिजे.
  • चोरी करता हात कापणे वगैरे ह्या शिक्षा तर आहेतच. फक्त एकच प्रश्न आहे, जर एखाद्याचा हात कापला, आणि नंतर कळले की हा माणुस चोर नाही आणि खरा चोर सापडला , तर हे तालिबानी लोक काय करित अस्तील बरं?
  • स्त्रियांनी मार्केटला जाणे हे शरीयत  कायद्या नुसार परमीटेड नाही.स्त्रिया मार्केटला जाउ शकतील पण केवळ मेडिकल ट्रिटमेंट साठी आणि सोबत कोणी पुरुष असेल तरच.
  • ट्रायबल नियमाप्रमाणॆ स्त्रियांनी  केवळ डोक्यावर रुमाल बांधला तरी पण चालायचं , पण आता तालिबानच्या फतव्या प्रमाणे सगळ्याच स्त्रियांना चेहेरा झाकून घेणे / चेहेऱ्यावर   पडदा घेणे कम्पलसरी केले आहे.स्त्रियांनी चेहेरा न झाकल्यास, त्यांचे नाक कापण्यात येइल असे तालिबानी लोकांनी  जाहीर केले आहे .
  • पाकिस्तानी मीडियाने असेही म्हंटले आहे की ह्या मलाकंद भागात  १९९४ पासूनच शरीयत कायदा लागू होता. पण एखादा  निकाल जर विरुद्ध गेला तर पेशा वरच्या हायकोर्टापुढे अपिलही करता यायचं. पण आत्ताच्या नवीन नियमाप्रमाणे पाकिस्तानी कायदे ’शरीयतच्या नियमानुसार दिलेले निकाल’         ( कायदे म्हणायचे कां?)   ओव्हर रुल करु शकणार नाहीत.हायकोर्टाचा रस्ता बंद झाला!!
  • पुरुषांना दाढी ठेवणे हे कम्पलसरी आहे..
  • एकंदर २१ पैकी १६ ट्राइब्ज वर त्यांनी हा तालिबानी शरीयतचा कायदा लागू केला आहे. इतर सुटलेल्या ५ ट्राइब्स वर पण हा कायदा  लादण्यात  येइल.
  • एका शरीयत एक्स्पर्ट च्या म्हणण्यानुसार तस्लीमा नसरीन ला जर शिक्षा द्यायची झाली तर तिला कंबरे खालचा भाग जमिनीत पुरुन, तिला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा द्यावी लागेल.
प्रत्येक वकिलाने शरीयत कायदा हा अभ्यासणे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे , इथे पाकिस्तानचा कुठलाही कायदा लागु होणार नाही. सध्या जे वकील आहेत त्यांनी पण मौलाना कडून शरीयत लॉ चे प्रशिक्षण घेणे कम्पलसरी करण्यात आले आहे.
या भागातील कोर्ट बरखास्त करण्यात आले आहे. जे पूर्वी जुडी शिअरी मधे कामं करायचे , त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे आणि त्या भागातील जज, वकील, सरकारी वकील, ह्या सगळ्यांनी मान तुकवून तालिबानी लोकांचे म्हणणे मान्य केले आहे .
एक कोणी फाजूल्ला नावाचा नेता आहे तालिबानी ! ह्या माणसाने हजारो लोकं मारली आहेत काहीही कारण नसतांना.ह्या भागात  जवळपास ५०० च्या वर शाळा होत्या.   मुलींना शिकणे हराम आहे असे डी क्लीअर करुन त्याने ३०-४० शाळांमधे आणि कित्येक कॉलेजेस मधे ( साधारणतः २०० च्या आसपास) बॉंबस्फोट घडवून आणले . ..केवळ मुली तिथे शिकायला जायच्या म्हणून..
या भागावर पूर्वी बुध्द लोकांनी आणि हिंदु राजांनी राज्य केले पण एकदा गझनी ने सत्ता हाती घेतल्यावर मात्र हा भाग मुस्लिम शासकांच्याच नियंत्रणाखाली राहिला. ह्याच भागात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बौध्द स्तूप, मुर्ती, आणि विहार दिसून येतात ( अर्थात तोडफोड केलेल्या अवस्थेत  )हा भाग १९६९ साली पाकिस्तान मधे सामील झाला.
पाकिस्तानच्या एका भा्गामध्ये आपले बस्तान बसवल्यावर, हळू हळू तालिबानी लोक आपले पाय पसरायला सुरुवात करणारच , आणि हे लोण लवकरच सिंध प्रांतापर्यंत पोहोचणार आहे . खरं तर तालिबान म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तानने निर्माण केलेला एक राक्षस आपल्या पुराणात एक भस्मासुर नावाचा राक्षस होता, त्याची गोष्ट आहे. तसेच हा पाकिस्ताननेच निर्माण केलेला भस्मासुर आता त्याच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला आहे.
तालिबान्यांना आता अफगाणिस्थान मधे काहीच शिल्लक राहिलेले नाही. त्यांना आता दुसरी सरजमीं पाहिजे उजाडण्या साठी.म्हणून हा स्वात चा भाग म्हणजे एक वरदान आहे त्यांच्यासाठी. अफगाणिस्थान मधे अमेरिकन्स सरळ हल्ला करु शकतात. पण इथे सिव्हिल एरियामधे आल्यावर त्यांच्या हल्ल्यावरून नियंत्रण येइल आणि तालिबान्यांना पण सेफ पॅसेज मिळेल. गोरीला युद्धासाठी तालिबान्यांना एक पोषक वातावरण निर्माण केलं जातंय.
असं ऐकण्यात आलं आहे, की इस्लामाबाद पासून केवळ २८ किमी वर तालिबानी पोहोचले आहेत. आणि लवकरच ते कराची, इस्लामाबाद नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करतील. अर्थात, अमेरिकेची आर्मी पाकिस्तानात असल्यामुळे थोडा फार कंट्रोल राहिल(?) अशी अपेक्षा …..अन्यथा आपल्याला पाकिस्तान बरा  म्हणायची वेळ येइल तालिबान्यां पेक्षा…

चविने खाणार गोव्याला..

Written by  on April 8, 2002

गोव्याची खादाडीची एक पोस्ट मराठी मंडळी वर आधिच टाकली होती. गोव्याला काय चांगलं मिळतं खायला ते त्या पोस्ट मधे लिहिले होते.सध्या गोव्यालाच आहे आणि त्या   पोस्ट मधे अजून काही जागा लिहायच्या  राहिल्या होत्या ,  म्हणून हे पोस्ट लिहायला घेत आहे.

मराठी मंडळीवर पूर्व प्रसिध्द पोस्ट जसंच्या तसं टाकतो, आणि मग पुढे उत्तम गोवनिज जेवण मिळण्याच्या काही जागांची माहिती पण देतो. ह्या सगळ्या जागा मी स्वतः जाउन बघितलेल्या आहेत, त्यामुळे अगदी निःसंकोच पणे या हॉटेल्स मधे तुम्ही जाऊ शकता. पहिली गोष्ट म्हणजे त्या हॉटेलमधलं जेवण ऑथेंटीक गोवनिज असते, आणि दुसरे म्हणजे जेवणाची चव , आणि क्वॉलिटी चांगली असते, तसेच जेवणाचे दर पण खूप जास्त नसतात केवळ अशाच जागांची   यादी देतोय.

सगळ्या मस्त्याहारी लोकांना गोवा म्हणजे जीव की प्राण असतं   कदाचित म्हणुनच माझं पण  फेवरेट शहर आहे गोवा. गेल्या कित्येक वर्षात दर महिन्याला कामानिमित्य एक तरी व्हिजीट असतेच गोव्याला. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे २०-२५ वर्षापुर्वी मी वास्कोला महाराजा हॉटेल मधे किंवा अन्नपुर्णा मधे उतरायचो. अन्नपुर्णा मधे रुम फक्त ४० रुपयांना मिळायची. तेंव्हा दररोजचा डीए पण फक्त १२५ रुपये होता. वास्को मधे उतरण्याचे मुख्य कारण म्हणजे एमपीटी ( मार्गोवा पोर्ट ट्रस्ट ) मधे काम असायचं, जास्त प्रवास करावा लागु नये म्हणुन ज्या भागात काम असायचं तिथेच रहाणं व्हायचं..

नंतर एक कर्मा म्हणुन हॉटेल निघालं, तिथे पण बरेचदा उतरलो आहे. काही जवळचे मित्र पण वास्को, बागोमोलो ला रहातात – हे पण एक कारण असेल.

नंतर मात्र काही मडगांवच्या वुडलॅंड्स मधे रहाणं सुरु केलं. वुडलॅंड्स हॉटेल जरी बरं असलं, तरी रुम सर्व्हिस च्या नावाने अगदी बोंब असायची, तरी पण काही दिवस इथेच उतरायचो. माझा एक फारच जवळचा मित्र, त्याने घर बांधलं चिनचिनिम ला, आणि मडगांव तिथुन जवळ, म्हणुन इथे मुक्काम सुरु केला. मडगांवला एक नानुटेल म्हणुन हॉटेल आहे. अतिशय सुंदर आणि निटनेटकं हॉटेल. स्विमिंग पुल वगैरे असल्याने , गोवा टुर म्हंटलं की स्विमिंग ट्रंक सुटकेस मधे टाकायची हे नक्कीच..

स्विमिंग ट्रंक वरुन आठवलं, एकदा बागोमोलो बिच वरच्या पार्क प्लाझा मधे उतरलो होतो. नाही- गैरसमज नको, फाइव्ह स्टार मधे मी कधीच उतरत नाही, कारण डिए तितका नसतो आमचा, तेंव्हा फक्त एक कॉन्फरन्स ऑर्गनाइझ केलेली होती म्हणुन तिथे उतरलो होतो. हॉटेलचा प्रायव्हेट म्हणता येइल असा बिच आहे. बिच वर समुद्रात पोहायला गेलो. समुद्र अतिशय रफ आहे इथला . तसेच इथली रेती पण खुपच रफ आहे. समुद्रातुन डुंबुन बाहेर आलो  आणि काठावर बसलो थोडावेळ. तर ही रेती स्विमिंग ट्रंक मधे दोन मांड्य़ांच्या मधे जाउन बसली. तेंव्हा लक्षात आलं नाही, पण जेंव्हा उठुन चालणं सुरु केलं तेंव्हा मात्र घर्षणाने मांड्यांची वाट लागली. कधी एकदा रुमवर जाउन शॉवर घेतो असं झालं होतं. असो.. नंतरचे दोन दिवस कॅंडीड क्रिम लाउन जखमा कुरवाळण्यातच गेले.

जेंव्हा गोव्याच्या हॉटेल्स बद्दल बोलतो आहोच, तर गोवा टुरिझमच्या चिप रेट हॉटेल्स चा उल्लेख करायलाच हवा. अगदी मोक्याच्या जागेवर आणि सुंदर प्रॉपर्टी म्हणजे गोवा टुरिझम ची हॉटेल्स, सुरुवातीच्या काळात टुरिझम ला बढावा देण्यासाठी ही हॉटेल्स इथे सुरु करण्यात आली होती. मी स्वतः इथे थांबणं कधीच प्रिफर करत नाही- पण जर कोणी इथे येणार असेल तर मी ही हॉटेल्सच नेहेमी रेकमंड करतो. समुद्र किनाऱ्यावरची यांची प्रॉपरटी व्हॅल्यु फॉर मनी चा अनुभव देते.    ग्रॅसिऍनो कॉटेजेस हे कोलवा बिचवरचं हॉटेल माझं फेवरेट झालंय किंवा सिल्व्हर सॅंड !! .

चविने खाणार गोव्याला हे हेडींग देउन हॉटेलची माहिती काय लिहित बसलोय मी?? गोव्याला आल्यावर रुम टेरिफ मधे ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असतो. तोच नेहेमीचा कट फ्रुट्स, कॉर्न फ्लेक्स, टोस्ट, ऑम्लेट, साउथ इंडीयन डिश एखादी, पोहे उपमा वगैरे काही तरी असा बफे नेहेमीच असतो. ह्याची कॉस्ट जरी रुम मधे इन्क्लुडेड असली तरी मी मात्र नेहेमी ऑथेंटीक गोव्याचा ब्रेक फास्ट घेण्यासाठी नेहेमी बाहेर एखाद्या लहानशा टपरी मधे जातो.

गोव्याचा ब्रेकफास्ट म्हणजे भाजी पाव किंवा भाजी पुरी.. इथे हा शब्द याच क्रमाने म्हणजे भाजी आधी, आणि नंतर पुरी किंवा पाव असे म्हंटले जाते. एखादी उसळ, त्यात बटाट्याची सुकी भाजी चिरलेला बारिक कांदा आणि पाव किंवा पुरी असा हा नाश्ता असतो. या नाश्त्या सोबत जर इच्छा असेल तर एखादी मिर्ची  ( म्हणजे बेसन लाउन तळलेली मिरचीची भजी) पण घेउ शकता. या भाजीमधे गोव्याचे लोकल हर्बस घातल्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो. बरेचदा भाजी सदृष्य़ गोवनिज कुर्मा पण असतो.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/goa-eating-out.jpg)

गोवन भाजी पाव बटाटा सुकी भाजी+ पातळभाजी विथ पाव. उडीपी हॉटेलमधे खायला जाउ नका. खास गोवनिज हॉटेल्स मधेच चांगली क्वॉलिटी मिळते

साधारण मिरी असतात ना त्याच्या आकाराची बारिक फळं असलेला मसाल्याचा पदार्थ आता नाव आठवत नाही त्याचं. अगदी मिऱ्याप्रमाणेच गुच्छा असतो त्यांचा पण. एकदा मी घरी आणला होता हा मसाल्याचा पदार्थ. ह्याचा उपयोग जेंव्हा एखादी थोडा जास्त वास असणारी फिश करी करायची असते तेंव्हा  केला जातो. आता नांव आठवत नाही त्या पदार्थाचं, पण त्याचा फ्लेवर अप्रतिम असतो. याच्या वापरामुळे भाजी पावाची चव एकदम वेगळीच होऊन जाते.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/presentation1.jpg)

जाम भरलेले बन आणि सोबत चहा. हे आपल्या समोरच तळून देतात. कॅलरीची काळजी करू नका खातांना. उगिच पश्चाताप होतो . मी गोव्याहून येतांना हे बन्स नेहेमी विकत आणतो.

गोव्याला असलो की एखाद्या शॅक मधे जाउन असा नाश्ता करुन दिवसाची सुरुवात करणे मला जास्त आवडते. भाजी पाव खाउन झाल्यावर   होम मेड बन नावाचा एक अतिशय टेस्टी प्रकार इथे मिळतो. (पण त्यासाठी शुध्द गोवनिज हॉटेलमधेच जावं लागेल तुम्हाला) या बन च्या सेंटर मधे कधी तरी थोडं जाम वगैरे पण असु शकतं भरलेलं . हा होम मेड गोवनिज बन आणि चहा घेउन ब्रेकफास्ट संपवायचा. दुपारी एक वाजेपर्यंत भुक म्हणजे काय याची जाणीव पण होणार नाही.

सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर वाटेल की खुप झालं ,आज जेवण टाळू, पण दुपारी एक दिड वाजला की पोटात उंदीर कबड्डी खेळणं सुरु करतात – आणि आपोआपच पाय एखाद्या हॉटेल कडे वळतात.. गोव्याची हवाच तशी आहे !! दुपारच्या वेळेस जेवणासाठी एखाद्या एसी हॉटेलात जायचं म्हणताय?? छे छे.. नाही. गोव्याला गेल्यावर गोव्याचं ऑथेंटीक जेवण घेण्यातच मजा आहे – मग ते एसी असो वा नसो. बरेचसे लहान लहान रेस्टॉरंट्स आहेत गोव्यात .पण नेहेमी जाउन काही जागा आता पक्क्या झालेल्या आहेत.  पणजी जवळचं नदिकिनारच्या स्टार मधे गेलात  तर शेल फिश क्रिस्पी फ्राय मस्त असतो. कोलोस्ट्रॉल ची काळजी कींवा ऍलर्जीची काळजी न करता खायचा पदार्थ आहे हा. अतिशय मसल्सने भरलेला मांसल पदार्थ – अप्रतिम असतो. इतर ठिकाणी मिळेल तर विचारू शकता.

एअरपोर्टवरुन मडगांवकडे निघाले असाल तर हॉटेल मार्डोल नावाचं एक चांगलं हॉटेल आहे – याच हॉटेल मधे अभिषेक बच्चनचा फोटो पण लावलाय – तो जेंव्हा इथे आला होता तेंव्हाचा. या ठिकाणी स्पेशल फिश थाली मागवली की त्यामधे – शार्कचं  मटण, फिश फ्राय – या मधे चणक असेल तर तोच घ्या. नाहीतर नॉर्मल किंग फिशचा पिस मिळतो, सोबतच चिंबोऱ्या, क्रॅब्स्चा एक तुकडा -टांग, आणि  करी असते. करी मधे प्रॉन्सचे पिसेस अगदी मुबलक प्रमाणात असतात. जर इतकं नको असेल तर नुसती साधी फिश थाली पण मागवता येते. त्यामधे फिश चा पिस, करी आणि राइस असत. सोबत सोलकढी हवी असेल तर एक्स्ट्रॉ मिळते.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/goa-eating-out-6.jpg)

अनंताश्रम, वास्को

पण माझी स्वतःची फेवरेट ठिकाणं म्हणाल, तर वास्कोचं अनंताश्रम  . या ठिकाणी जाउन फक्त फिश करी राइस ऑर्डर करायची.   अनंताश्रमचं ऍम्न्बिअन्स मला आवडतो.  टिपिकल फिशफ्रायचा वास नाकात शिरतो , हॉटेल मधे पोह्चल्या बरोबर  आणि पोटातले उंदीर पुन्हा कबड्डी खेळु लागतात. भिंतीवर मारिओ मिरांडाच्या शैली मधे काढलेली पेंटींग आहेत. त्यातलं फिशर वुमन चं पेंटींग मला खुप आवडतं. अनंताश्रम मधे जेवणाची ऑर्डर द्या आणि येइ पर्यंत थंड बिअरचा आस्वाद घेत बसा. गोव्याला जाउन बिअर न पिणॆ म्हणजे सिध्दिविनायकाच्या मंदिरात जाउन गणपतीचे दर्शन न घेणे होय.इथली फिश करी पण मला आवडते. लंच टाइम मधे म्हणजे एक ते दोन या वेळात ह्या हॉटेलमधे जाणं टाळा,. खुप गर्दी असते.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/goa-eating-out-4.jpg)

कोळीण -मारीओ मिरांडा स्टाइल पेंटींग

इथे   फिश चा पीस गोवनीज स्टाइलने फ्राय केलेला असतो, करी मधे दुसरे लहान फिश आणि प्रॉन्स वापरतात.   भाताचा डोंगर बघितला की आधी तर भिती वाटते की हा संपेल तरी कसा?? पण एकदा संपुन पुन्हा एकदा एक हेल्पिंग ऑर्डर करायची वेळ यावी इतकी सुंदर टेस्ट असते इथल्या जेवणाची. एक्स्ट्रॉ राइस मागवला तर पुन्हा राइस+ फिश फ्रायचा पिस असतो , सोबत वाटी मधे करी, एका भागात चिंबोरी, आणि थोडी कसली तरी भाजी. आणि खोटी कढी ( गोवनिज मित्रांना समजेल हा काय प्रकार आहे तो.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/beer-and-khoti-sol-kadhi.jpg)

खोटी कढी आणि बिअर. हे कॉम्बो पण मला आवडतं.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/goa-eating-out-71.jpg)

अनंताश्रम थाली. फिश करी , चिंबोरी, आणि एक व्हेज असते या मधे. सोलकढी एक्स्ट्रॉ

सोलकढी मधे नारळाचं दुध घातलेलं असतं, नुसत्या आमसुलाची सोलकढी म्हणजे खोटी  सोलकढी) फिशचा एक पिस आपल्यासारख्यांना कमी पडतो म्हणुन ऑर्डर करतानाच एक्स्ट्रॉ फिश फ्राय मागवावा. शक्यतो चणक मिळेत तर जास्त उत्तम नाहीतर बांगडा वगैरे पण चांगला असतो. माझ्या बरोबर असलेला मित्र किंग फिश चा शौकीन म्हणुन मी तरी पुन्हा किंग फिशच मागवला. गोव्याला आल्यावर पाम्प्लेट वगैरे टाळणे उत्तम. तो ब्राह्मणी मासा मला तरी फारसा आवडत नाही. :)

मडगांवचं अशोका हॉटेल पण खुप मस्त आहे . पहिल्या मजल्यावर चढलॊ की सरळ एसी रुम मधे जाउन बसा. टिपिकल खानावळ सदृष्य़ हॉटेल आहे हे . इथलं पण जेवण अतिशय सुंदर असतं. गोव्याला गेलात तर इथे नक्की या एकदा. गोवनिज फिश फ्राय आणि करी ऑर्डर करा इथे. इथली सोलकढी पण खुपच छान असते.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/070420103625.jpg)

अशोका हॉटेल थाली.सगळं काही अनंताश्रम प्रमाणेच, फक्त सोलकढी जास्तीचा आयटम असतो

गोव्याला असतांना मोठ्या हॉटेल मधे जेवायला गेलात तर  फिशचा पिस करी मधेच शिजवलेली फिश करी मिळते  पण त्या पेक्षा फिशचा पीस वेगळा रवा फ्राय ( मसाला फाय टाळा गोव्याला आल्यावर) आणि सोडे, प्रॉन्स, लहान फिशचे पिसेस घालुन केलेली वेगळी करी  लहान हॉटेल्स मधे मिळते ती मला जास्त आवडते. म्हणुनच मी शक्यतो लहान शॅक्स मधे जेवायला जातो गोव्याला असलो की.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/?attachment_id=123)खुप वर्षापुर्वी गोव्याला बिचोलिम जवळच्या सेसा गोवा माइन्स आणि डेम्पो माइन्सला जावं लागायचं. जेवणं त्यांच्या कॅंटीन मधेच व्हायचं . मोठा डॊंगर भाताचा.. तिखट जाळ करी आणि पाव असा मेनू असायचा. इथेच एकदा चुकुन बिफ खाण्यात आलं होतं.  :(
असो.

गोव्याला बरेच नॉर्थ इंडीयन्स/ आणि इतर टूरिस्ट  येतात. हॉटेल मधे बघावं तर इथे येउन पण तंदुरी रोटी ऑर्डर करतात- आणि नंतर मग हमारे यहां तो ऐसा नही होता बहुत अच्छा खाना होता है असे म्हणतांना नेहेमी ऐकतो. त्या जागेची जी स्पेशॅलिटी आहे ती ऑर्डर न करता इतर काहीतरी ऑर्डर करुन मग अशा कॉमेंट्स करणे मुर्खपणाचे वाटते मला तरी. ज्या भागात जावे, तिथलाच लोकल पदार्थ ट्राय करावा, असे माझे स्वतःचे मत आहे.

गोव्याला बागोमोलो बिच वर जायला पण मला आवडतं. पार्क प्लाझाचा कॅसिनो नेहेमी खुणावत असतो . तिथे जाउन एक दोन हजार रुपये घालवल्या शिवाय काही चैन पडत नाही मला तरी. अर्थात नेहेमीच घालवतो असेही नाही. पण पोकर खेळायची एक चांगली जागा आहे ती. तर त्या बिचवरच  एक जॉन ची शॅक आहे. तिथे जाउन प्रॉन्स फ्लेवर्ड पापड ( याला ते लोकं वेफर्स म्हणतात ) आणि बिअर अप्रतिम कॉम्बो असतं. सोबतचं एखादी फडफडीत मासळी तळुन मागवा .. बस्स.. खल्ल्लास!!! मेंदु एकदम तृप्त होऊन जाइल.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/04/goa-eating-out-8.jpg)

खादाडी साठी तर गोवा हे माझं फेवरेट ठिकाण आहे. फक्त ख्रिश्चन हॉटेल्स मधे ते जे व्हिनेगर वापरतात, त्याचा वास मला आवडत नाही म्हणुन शक्यतो हिंदु हॉटेल्सच मी प्रिफर करतो. तुम्ही दोन्ही ट्राय करु शकता..

आता हे सगळं लिहिल्यावर खाली काही माझ्या आवडीच्या खास गोवनीज  हॉटेल्सची नांवं देतोय . सगळ्या ठिकाणी मी स्वतः ट्राय केलेले आहे, तेंव्हा अगदी  बिनधास्त जा या हॉटेल्स मधे. खास गोवनिज जेवणासाठी.

१) अशोका हॉटेल.. पहिला मजला , लोटस इन जवळ, किंवा गोल्ड स्टार जवळ, मडगांव

२)अनंताश्रम – वास्को. फेमस आहे हे हॉटेल कोणीही सांगेल कुठे आहे ते.

३) भोसल्यांची खानावळ :- वास्को.. ही पण जागा फेमस आहे. (  या वेळेस गेलो होतो,  थॅंक्स प्रविण  माहिती दिल्या बद्दल)

४)हॉटेल रिट्झ :- ऍरोमा जवळ, हेल्थ सेंटर जवळ,  पणजी

५)शीला हॉटेल :-  कोर्तालिम वास्को रोड वर असलेले ..

६)हॉटेल विस्तार :- कस्टम होम जवळ , पणजी

७)अजंता हॉटेल :- पणजी

८) तातो हॉटॆल :- पणजी, फोंडा, मडगांवला आहे यांच्या शाखा. ( गोवन व्हेज)

९)हॉटेल मार्दोळ:- एअर पोर्ट ते मडगांव रस्त्यावर ,

१०) मार्टीस कॉर्नर:- बेतलबाटीम ला आहे हे. सचिन तेंडूलकरचे हे फेवरेट हॉटेल . मजोर्डा च्या रस्त्यावर आहे. कोलवा पासुन दहा मिनिटार. अ्प्रतिम फिश असते, पण थोडी महाग. एकदा जायलच हवं

११) भाजी पाव साठी कुठलेही गोवनिज मालकाचे लहानसे हॉटेल

१२) कोलवाचे शेरे पंजाब :- तंदूरी फिश साठी

१३) अन्नपुर्णा :- वास्कोचे स्नॅक्स साठी

१४)केंटूकी :- कोलवा बिच ( हे ते फ्राइड चिकन वाले नाही) गोवनिज करी राइस मागवा इथे बरा असतो.

१५) ग्रासियानो कॉटेजेस :- कोलवा, इथे लेमन फिश छान असते.

काही सुटली असतील, तर गोवनीज मित्र , किंवा नुकतेच गोव्याला जाउन आलेले  ऍड करतीलच.

ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात?

Written by  on April 7, 2002

आपण ब्लॉग वर काही तरी लिहितो, आणि लोकं ते वाचतात आणि कॉमेंट्स पण देतात.    बरेचदा तुम्ही   एखाद्या वर्षा पुर्वी लिहिलेल्या पोस्ट वर   अचानक पणे   पण  कॉमेंट येते, आणि तुम्हाला एकदम ’ ही इतक्या जुन्या लेखावर कॉमेंट कशी काय आली ?’ याचे आश्चर्य वाटते .  लोकं या इतक्या जुन्या लेखापर्यंत कसे पोहोचतात?  हा प्रश्न तर मला कित्तेक दिवस छळत होता.

ब्लॉगची माहिती लोकांच्या पर्यंत कशी काय पोहोचते?   मराठी ब्लॉग  विश्व वरून हे उत्तर बहुतेकांच्या मनात येईल .  ब्लॉग वर लिखाण नविन सुरु केल्यावर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे मराठी ब्लॉग विश्व करते.  तुमच्या नविन पोस्ट्सना  या साईटवरून भेट देणारे लोकं याच साईट वरून येतात! बरेचसे लोकं तुमच्या ब्लॉग ला इमेल मधे सब्स्क्राइब करतात, तुम्ही नविन पोस्ट लिहिली की ते त्यांना मेल मधे समजते .

सर्च इंजीन्स वरून येणारे लोकं पण बरेच असतात. सर्च इंजिन्स   मध्ये एखादा कळीचा शब्द लिहून शोध घेतला जातो, आणि जर तुमच्या ब्लॉग वर पण तो शब्द वापरला गेला असेल तर तुमचा ब्लॉग  सर्च इंजिन शोधते आणि शोधकर्त्याला  तुमच्या ब्लॉग   ची यु आर एल दाखवते.

वर्डप्रेस वर जर तुमचा ब्लॉग असेल तर लोकं    सर्च इंजिन्स  मधे कोणता शब्द शोधून  लोकं तुमच्या ब्लॉग वर  आले आहेत  ते  पण समजू शकते.   माझ्या ब्लॉग वर आजपर्यंत लोकं कुठल्या टर्म्स वापरून सर्च इंजिन्स वरून आले हे  माझ्या ब्लॉग वर चेक  केले तर खूप वेग वेगळ्या टर्म्स वापरलेल्या आढळल्या.

सगळ्यात जास्त शोधला जाणारा शब्द म्हणजे स्त्री पुरुष! आणि त्याच्या खालोखाल येतो तो अश्लिल फोटो,    नंतर एड्स आणि एड्सचा हल्ला ही टर्म पण बरेचदा शोधलेली दिसून येते.ह्या  अशा सर्च सोबतच नेदा इराण, किंवा फारशी लोकांना माहिती नसलेली एक अंदमान निकोबार द्विपसमुहातील ’जुजुब’ नावाची आदिवासी जमात या बद्दल शोध घेतांना पण लोकांनी माझ्या साईटला भेट दिलेली आहे. जवळपास ७५० लोकं ’काय वाटेल ते ’ हे शोधून या ब्लॉग पर्यंत पो्होचले . उखाणे, घर वगैरे शोधून ब्लॉग वर भेट देणाऱ्यांची संख्या पण खूप आहे.

थोडक्यात जर तुम्हाला ब्लॉग वर जास्त लोकांनी भेट द्यावी असे वाटत असेल ,तर हे जास्तीतजास्त सर्च केले जाणारे शब्द    शब्द तुम्ही आपल्या ब्लॉग वर वापरा, म्हणजे  ब्लॉग ची व्हिजीब्लिटी वाढेल..

हे सगळं शोध म्हणून ठिक आहे. पण लोकं जेंव्हा अश्लिल फोटो असे मराठी मधे लिहून शोधतात तेंव्हा काय  उत्तर मिळेल अशी अपेक्षा असेल लोकांची?   अश्लिल  फोटोंना वाहिलेल्या साईट्स असतांना पण मराठी ब्लॉग बर लोकं का बरं असे शोध घेत असावेत?

एड्स बद्दल जेंव्हा मराठी मधे शोध घेतात  ते कां?   त्यांनी काही तरी केलेलं असावं कां की जे करायला नको ते?? आणि मग आपल्याला एड्स झाला तर नाही या शंकेने  नेट वर शोधाशोध..तुम्हाला- मला कधी हिजडा, किंवा एड्स वगैरे शोधावेसे वाटत नाही-  मग लोकांना का वाटावी? या वर जास्त काही लिहित नाही, फक्त लोकं काय शोधतात ते  खाली दिलंय !

बाय द वे, या पोस्टची कल्पना सुचली नॅकोबाच्या ह्या पोस्ट ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.muktafale.com/post/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/) वरून.

Search Terms for सगळे days ending 2010-08-02 (Summarized)Summarize: 7 Days ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/08/02/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%97-%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4/index.php?page=stats&blog=6210114&view=searchterms&numdays=7&summarize) 30 Days ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/08/02/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%97-%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4/index.php?page=stats&blog=6210114&view=searchterms&numdays=30&summarize) Quarter ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/08/02/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%97-%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4/index.php?page=stats&blog=6210114&view=searchterms&numdays=90&summarize) Year ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/08/02/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%97-%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4/index.php?page=stats&blog=6210114&view=searchterms&numdays=365&summarize) All Time ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/08/02/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%97-%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4/index.php?page=stats&blog=6210114&view=searchterms&numdays=-1&summarize)

सार्वकालिक

शोधा Views
पुरुष स्त्री 3,714
अश्लिल फोटो 2,210
चावट 1,661
स्त्री 1,252
ऑर्कुट 1,143
अश्लिल 672
kayvatelte 611
एड्स चा हल्ला 568
बातम्या बातम्या 497
कविता 432
उखाणे 421
घर 418
अश्लिल कथा 410
एड्स 392
लोकमत 284
मित्र 281
स्त्री आणि पुरुष 233
कथा 224
हिजडा 213
फोटो 181
मुली 168
मनसे 167
क्रिष्ण 159
साईबाबा 153
काय वाट्टेल ते 143
चावट वहिनी 143
neda iran 139
इंटरनेट इंटरनेट 136
al jaffee 136
इंटरनेट 130
गाणी 130
झी टीव्ही 127
jujube 125
arya ambekar 121
इंटरकोर्स 120
जॉब 118
मराठी चित्रपट 116
आर्मी 110
प्रेमात 110
पत्रकारिता 108
वात्रट 106
बॉडी 101
होळी 100
किरण बेदी 97
नेव्ही 93
दुनियादारी 91
जनगणना 89
साई बाबा 82
फोटो काढले 81
सारेगमप 79