आपल्याला बिफ खाऊ घातलं जातय?

Written by  on June 30, 2020 

बंदुकीच्या गोळीच्या काडतूसावर गाईची आणि डुकरांची चरबी लावल्याने इंग्रजांच्या  सैन्यातल्या  भारतीयांनी केलेला उठाव, आणि तो निस्तरण्या साठी इंग्रजांनी मोजावी लागलेली किंमत सगळ्यांनाच माहीती आहे- थॅंक्स टू अमीर खान – मंगल पांडे बनवल्याबद्दल!

पण जेंव्हा मला हे समजले, की आजही आपल्या देशात प्रत्येकाला त्याच्या नकळत गोमांस/ डुकराचे मांसजन्य पदार्थ वापरून तयार केलेल्या वस्तू   खाऊ घातल्या  जात आहेत, तेंव्हा बसलेला धक्का हे पोस्ट लिहायला घेतले तरीही ओसरलेला नाही . मला पुर्ण कल्पना आहे की हे खूप धाडसी विधान करतोय मी. पण हे अगदी शंभर टक्के सत्य आहे .

भारता मधे मांसाहारी हिंदू लोकांची संख्या भरपूर आहे. पण त्यांचा मांसाहार फक्त चिकन किंवा मटन पर्यंतच मर्यादित असतो- अगदी फारच झालं तर एखाद्या वेळेस ससा वगैरे पण खाल्ला जातो. सांस्कृतिक,धार्मिक, आणि सामाजिक बंधनांमुळे गोमांस खाणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. जर हिंदू मेजॉरीटी असलेल्या देशात जर सामान्य जनतेला त्यांच्या नकळत गोमांस खाऊ घालणे जात असेल तर ते कितपत योग्य वाटते?? मुसलमान लोकं पण पोर्क खात नाहीत, त्यांना पण हे त्यांच्या धर्मात टॅबो असलेले पोर्क एक्स्ट्रॅक्ट खाऊ घातले जाते.

हे कसं काय केलं जात? थोडक्यात लिहतो, कारण थोडा कामात बिझी असल्याने फार मोठं पोस्ट लिहायला वेळ नाही, पण ही गोष्ट   तुम्हा सगळ्यांशी शेअर करणे अतिशय आवश्यक वाटले म्हणून हे लहानसे पोस्ट टाकतोय.

नुकताच एका एक्स्पोर्ट ओरियंटेड ’कॅटलफिड फॅक्टरील” काही कामानिमित्त भेट दिली. तिथे गेल्यावर बऱ्याच नवीन गोष्टी नजरेस पडल्या, जसे “कॅटल फिड” मधे मांस असते, आणि ते बऱ्याच शाकाहारी प्राण्यांना पण खाऊ घातले जाते. तिथल्या मॅनेजरशी बोलतांना हे अयोग्य की अयोग्य -अशी चर्चा सुरु झाली. माझं बोलणं  ऐकून तो हसला आणि म्हणाला, की ’ प्राण्यांना नॉनव्हेज खाऊ घालण्यचं काय घेऊन बसलात साहेब, भारतामधे तुमच्या नकळत तुम्हा सगळ्यांना बिफ/पोर्क एक्स्ट्रॅक्ट्स खाऊ घातलं जातात, आणि ते पण बरेचदा सडक्या मासा पासून तयार केलेलं. आपण जी औषधांची कॅप्सूल्स घेतो, तिचे कव्हर  गाई आणि डुकराच्या चरबी मधे असलेल्या जिलेटीन मधून बनवलेले असते.

जिलेटीन हे गाईच्या/ डुकराच्या कातडीच्या खाली, आणि हाडामधे मुबलक प्रमाणात मिळते. कातडीला गरम पाण्यात बुडवून त्यातले फॅटचे प्रमाण कमी केले जाते. नंतर हाडांचा चूरा करून आणि कातडीचे तुकडे करून ते अर्धा तास २०० डिग्री पर्यंत इंडस्ट्रीयल ड्रायर मधे भाजले जातात. हा चूरा नंतर अल्कली, आणि काही इतर पदार्थ मिळवून पाच दिवस ठेवला जातो आणि नंतर मशीन्स मधे या पासून जिलेटीन एक्स्ट्रॅक्ट केले जाते.  संपुर्णपणे वेस्ट प्रॉडक्ट मधून बनवल्या जाणारे जिलेटीन खूप स्वस्त असते.

कॅप्सूल्स कव्हर्स दोन प्रकारचे असतात-  व्हेज आणि नॉन व्हेज. मग असं असताना नॉन व्हेज कॅप्सूल्स का वापरल्या जातात भारता  मधे? याचं उत्तर आहे किंमत.. व्हेज कॅप्सूल्स कव्हर्स ची किंमत ही नॉन व्हेज  पेक्षा निम्म्याने कमी असते .  व्हेज कॅप्सूल्स मधे जिलेटीन ऐवजी वनस्पतीजन्य जिलेटीन सदृष्य़  वापरला जातो.  अशा प्रकारे  चिंधी चोरी करून पैसे वाचवणाऱ्या औषध कंपन्या डॉक्टर्स लोकांना परदेश वारी, कॉन्फरन्सेस साठी पैसे पुरवताना अजिबात हात आखडता घेत नाहीत.

एखादी गोष्ट नॉन व्हेज असेल तर त्याच्या पॅकिंग वर लाल डॉट द्यावा असा संकेत आहे, तोच संकेत कॅप्सूल्स -गोळ्याच्या ही बाबतीत आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू नॉनव्हेज आहे एवढेच सांगणे पुरेसे आहे का- की त्यामधे गोमांस वापरलेले नाही हे डिक्लीरेशन द्यायला हवे ? हा प्रश्न तर खूपच महत्त्वाचा आहे,पण  ज्या कडे सगळे नेते लोक पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

केवळ बंदुकीच्या गोळीच्या काडतूसांना गोमांस चरबी लावली म्हणून इंग्रजांना ज्या प्रकारे जन रोषाचा सामना करावा लागला, तसा पुन्हा कॉंग्रेस सरकारला करावा लागेल का? की स्वातंत्र्यानंतर आलेलं आणि गेल्या काही वर्षात जोपासलेलं  मानसिक षंढत्व कुरवाळत जनता गप्प बसेल??

Category : Marathi kathaMarathi Lekh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.